एका मिनीटात दाढ उचकटता येते?

मिसळपाव's picture
मिसळपाव in काथ्याकूट
21 Jun 2008 - 8:11 pm
गाभा: 

परवा 'दाढ दुखत्येय' म्हणून ठणाणा करत डेन्टिस्टकडे गेलो, तर तिने ती दाढ काढायला लागेल हे शुभवर्तमान दिलंन! अक्कलदाढ असल्यामुळे दुसरया एका तज्ञ्याकडे पाठवलंन. मी निमूटपणे त्या तज्ञयासमोर जबडा वासून बसलो. एकंदरीत प्रकार बघून म्हंटलं आता बहूदा "तासभराची निश्चिंती झाली बगूनाना sss ". पण त्या प्राण्याने दाताड बधीर करायला ३० सेकंदात ३ इंजेक्क्षनं दिलीन, जेमतेम पाव मिनीट थांबला नी मी सरसावून बसतोय तोवर पुढच्या ३० सेकंदात पकडिने दाढ काढून मोकळा! हे म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेला बसावं, नी 'केशवाय नमः, नारायणाय नमः...' म्हणून आचमन संपतंय तोपर्यंत गुरूजीनी 'हं चला, नैवेद्य आणा, सगळ्याना आरतीला बोलवा' म्हणावं तसं झालं !

असो, पटकन् सुटका झाली म्हणून आनंद पण झाला आणि त्या सद्-गृहस्थाने माझा खिसा केवळ मिन्टाभराच्या करामतीने बराचसा हलका केल्याच्या जाणीवेने कळ पण आली.

- (बत्तीसावा गमावलेला) मिसळपाव

प्रतिक्रिया

प्राजु's picture

21 Jun 2008 - 8:28 pm | प्राजु

मिपाच्या कुटुंबात डॉ. प्रसाद दाढे आहेत त्यांचा सल्ला घेतला असतात तर कदाचित थोडक्यात काम झालं असतं. ते दंतिष्ट आहेत.. नावाला जागणारे आहेत.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सखाराम_गटणे™'s picture

21 Jun 2008 - 8:36 pm | सखाराम_गटणे™

मला वाट्ले की, भडकमकर मास्तर पण दाताचे डॉक्तर आहेत.

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

शितल's picture

21 Jun 2008 - 8:40 pm | शितल

अहो आमच्या शेजारच्या काकु॑च्या हातचा दिवाळीतील फराळ खाल्लात तर, एक मिनिटात तोडा॑त जेवढे दात, दाढा असतील तेवढ्या लगेचच बाहेर येतील. :)

सखाराम_गटणे™'s picture

21 Jun 2008 - 9:59 pm | सखाराम_गटणे™

आणि खर्च ही वाचेल !!!!!!!!!!
:)

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

चतुरंग's picture

21 Jun 2008 - 8:43 pm | चतुरंग

(डॉ.प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर) आहेत हे कळल्यापासून मी हल्ली फार दात काढत नाही! :D

चतुरंग

देवदत्त's picture

21 Jun 2008 - 9:33 pm | देवदत्त

मिपावर दोन दंततज्ञ (डॉ.प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर) आहेत हे कळल्यापासून मी हल्ली फार दात काढत नाही!
:D =))

ऋषिकेश's picture

22 Jun 2008 - 11:48 am | ऋषिकेश

मिपावर दोन दंततज्ञ (डॉ.प्रसाद दाढे आणि भडकमकर मास्तर) आहेत हे कळल्यापासून मी हल्ली फार दात काढत नाही!

=)) :)) =D> :D

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

भडकमकर मास्तर's picture

21 Jun 2008 - 9:33 pm | भडकमकर मास्तर

आम्ही सुद्धा अवघड अक्कलदाढा काढायला आमच्या दवाखान्यात डॊ.दाढे यांनाच बोलावतो...

मिसळपाव साहेब... शीर्षक वाचून असं वाटलं की त्या तद्न्याने अर्धा पाउण तास घेतला असता तर तुम्हाला बरं वाटलं असतं...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मिसळपाव's picture

21 Jun 2008 - 10:00 pm | मिसळपाव

गावातल्या लोकाना नाहि का, डॉक्टरने नुसतंच परत न पाठवता ग्लूकोजचं 'हिंजेशन' देउन पाठवलं कि बरं वाटतं - आम्ही त्याच पंथातले !!
गंमतिचा भाग सोडून द्या, पण क्षणापूर्वी घट्ट वाटणारी दाढ इतक्या चटकन् उपटता येते माहित मव्हतं खरं.

सारांश काय, तर तुम्हि आणि दाढेसाहेब, करण्यासारखं काहिहि उरलं नसलं तरी पटकन काम झाल्यावर उगाच पेशंटच्या तोंडात पाच-दहा मिन्टं फोरसेप किवा काहि खडखडवून, कपाळावरून हात फिरवत 'झालं बुवा' म्हणत सुस्कारा वगैरे टाकलात की तेव्हढंच पेशंटला 'पैसा वसूल'चं तरी समाधान ;)

श्रीमंतपेशवे's picture

22 Jun 2008 - 1:54 am | श्रीमंतपेशवे

पुढच्या ३० सेकंदात पकडिने दाढ काढून मोकळा

तरी बरं एकदाची दाढ काढुन तुम्हाला मोकळे तरी केले.
नाहीतर मी तपासणीसाठी गेलेल्या एका दंतवैद्य साहेबांनी माझे दुखणा-या व न दुखणा-या अशा दोन्ही दाढींचे प्रथम क्ष- किरण काढ्लेच पण इतकेच नाही तर रिपोर्ट आणायला गेलेल्या माझ्या नव-याच्याही दोन दाढींचे क्ष- किरण काढविले. अर्थात गोडीगुलाबीनेच म्हणा !!!
दुसरे काय त्यांच्या धंद्याचे कसब!!

दात कोरून पोट भरण्याचा अधिकृत धंदा असेल तर त्यात गैर काय ?

विकास's picture

22 Jun 2008 - 3:19 am | विकास

एका मिनीटात दाढ उचकटता येते?

"उचकटता" येते पण "काढता" येणार नाही.... :S :T
या बाबतीतला अनुभव आठवून अजूनही दंतवैद्याकडे जायला काचकूच करणारा .... =;

विसोबा खेचर's picture

22 Jun 2008 - 9:00 am | विसोबा खेचर

मिसळपावसाहेब,

सगळे म्हणतात तसं आधी तुम्ही मिपाचे फ्यॅमिली दंतवैद्य प्रसाद दाढे व मास्तर यांना दात दाखवायला हवे होतेत! :)

बाय द वे, तुम्ही तंबाखू वगैरे खात नाही का? तरीच तुमच्यावर अशी वेळ आली! आम्ही रेग्युलर्ली सातारी तंबाखू खातो त्यामुळे दात अगदी निरोगी राहतात! तंबाखूमुळे दातांची वाट लावणार्‍या फालतू जंतू आणि किडींचा आपोआप नायनाट होतो! :)

तात्या.

भडकमकर मास्तर's picture

22 Jun 2008 - 5:48 pm | भडकमकर मास्तर

आम्ही रेग्युलर्ली सातारी तंबाखू खातो त्यामुळे दात अगदी निरोगी राहतात
निरोगी???? ~X( ~X(
कीड लागत नाही म्हणा हवंतर ...
पण खाली लिहिलेले
१. हिरड्यांचे विविध आजार
२. कर्करोग
अशी काही क्षुल्लक गुंतागुंत निर्माण होऊ शकते :SS
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

22 Jun 2008 - 9:57 am | डॉ.प्रसाद दाढे

दात काढायला सोपा की अवघड हे बर्‍याच गोष्टी॑वर अवल॑बून आहे. दाताचा आकार, मुळा॑ची स॑ख्या, आकार, हाडाची स॑रचना इ. अक्कलदाढेचे दुखणे तरूण वयात फार सतावते (क्वचित प्रस॑गी वृद्धा॑नाही.. मी परवाच ८५ वर्षाच्या एका आजोबा॑ची अडकलेली अक्कलदाढ काढलीय :)
मी ह्याविषयावर एक स्वत॑त्र लेख लिहिण्याचा विचार करतोय..

विसोबा खेचर's picture

22 Jun 2008 - 10:03 am | विसोबा खेचर

मी ह्याविषयावर एक स्वत॑त्र लेख लिहिण्याचा विचार करतोय..

डॉक्टर, वाट पाहतो. नक्की लिहा...! :)

तात्या.

भाग्यश्री's picture

22 Jun 2008 - 10:14 am | भाग्यश्री

अगदी !! मला एका वेळेला २ अश्या दोन वेळेला अक्कल-दाढा आल्या..नशिबाने त्या सरळच येत अस्ल्याने काढव्या नाही लागल्या.. परंतू त्या अक्कलदाढा येत आहेत आणि म्हणुन सगळा गालापासून, डोक्यापर्यंतचा भाग दुखत आहे, हे समजेपर्यंत मी मायग्रेन्,कॅन्सर, ब्रेन ट्युमर अशा अनेक पर्यायांचा विचार करून घाबरून गेले होते!! भयंकर दिवस(रादर रात्र! रात्रीच दुखायचं!) होते !!

http://bhagyashreee.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

22 Jun 2008 - 10:13 am | डॉ.प्रसाद दाढे

बाय द वे, तुम्ही तंबाखू वगैरे खात नाही का? तरीच तुमच्यावर अशी वेळ आली! आम्ही रेग्युलर्ली सातारी तंबाखू खातो त्यामुळे दात अगदी निरोगी राहतात! तंबाखूमुळे दातांची वाट लावणार्‍या फालतू जंतू आणि किडींचा आपोआप नायनाट होतो!
ह्यावर लिहायचे राहिलेच की..
त॑बाखूमुळे दात किडण्यास प्रतिब॑ध होतो हे सत्य आहे पर॑तु.. त॑बाखूमुळे तो॑डाचा कर्करोग होतो हे त्याहून दाहक सत्य आहे. ते॑व्हा मित्रा॑नो, सुपारी, गुटखा वा त॑बाखू अजिबात खाऊ अथवा चघळू नका. दात किडला तर जिवास धोका नाही शिवाय रूट कॅनाल करून वाचविता येतो, काढून दुसरा बसविता येतो पण जबड्यास, जिभेस वा गालास कर्करोगाने ग्रासले तर फार मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. चेहरा विद्रूप होतो, जबडा साधा वरणभात खाण्याच्या लायकीचाही उरत नाही.. परिणाम अतिशय भीषण आहेत.
मी मु॑बईच्या टाटा मेमोरियलमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले असून मुखकर्करोग प्रतिब॑ध व उपचार हे माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहेत. ह्याविषयावरही एक सचित्र लेख लिहितो लवकरच..
पण माझ्या मित्रा॑नो माझे हे सर्वा॑ना कळकळीचे आवाहन आहे की कृपा करून सुपारी, त॑बाखू कि॑वा गुटख्याच्या भयानक व्यसनात गुरफटू नका, हे सु॑दर मानवी शरीर नासवू नका

II राजे II's picture

22 Jun 2008 - 11:05 am | II राजे II (not verified)

पण माझ्या मित्रा॑नो माझे हे सर्वा॑ना कळकळीचे आवाहन आहे की कृपा करून सुपारी, त॑बाखू कि॑वा गुटख्याच्या भयानक व्यसनात गुरफटू नका, हे सु॑दर मानवी शरीर नासवू नका

१००% सहमत व अनुमोदन !

राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!

भडकमकर मास्तर's picture

22 Jun 2008 - 5:40 pm | भडकमकर मास्तर

पण माझ्या मित्रा॑नो माझे हे सर्वा॑ना कळकळीचे आवाहन आहे की कृपा करून सुपारी, त॑बाखू कि॑वा गुटख्याच्या भयानक व्यसनात गुरफटू नका, हे सु॑दर मानवी शरीर नासवू नका

अगदी योग्य....

तंबाखूमुळे कीड लागण्यावर प्रतिबंध होतो , हे सत्य आहे परंतु त्यामुळे
१.पेरिओडाँटायटिस / दातांचा आधार कमी होणे / पायोरिया / हिरड्यांचे आजार / हिरड्यांमधून सूज/ रक्त येणे वगैरे आजार होतात... हे त्या मानानं मायनर आजार
२. आणि सर्वात भयानक म्हणजे हिरडी, गाल / ओठ आणि जीभ यांच्यावर लाल / पांढरे चट्टे उमटणे जी कर्करोगाची पूर्वावस्था असते आणि त्याही परिस्थितीत दुर्लक्ष केले तर कर्करोगापर्यंत आजार पोचतो...

कोणत्याही अँगलमधून पाहिलं तर तंबाखू खाणे हा दातदुखीवरचा उपाय होऊच शकत नाही...
आणि आजकाल गुटखा खाणं हे तंबाखूपेक्षा फॅशनेबल वाटतं , अगदी शाळेतल्या पोरांनासुद्धा...
मग दिवसाला वीस पंचवीस पाकिटं गुटखा खाणारी १५ ते २० वर्षांची पोरं असल्या तक्रारी घेऊन दवाखान्यात येतात,
१. तोंड उघडत नाही २. साधं अन्न खाताना गालाची प्रचंड आग होते ३. अन्न गिळता येत नाही.४. वजन कमी झालंय. ५. गालाची त्वचा दडदडीत, कडक आणि लालसर झाली आहे...६. सर्व अन्न तिखट लागतं, नीट चवी कळत नाहीत.

या पोरांना कितीही भयानक शब्दांत भविष्याची जाणीव करून दिली तरी पुन्हा पुन्हा ही पोरं तोंडात पुड्या ओतताना दिसतात... वेगवेगळ्या डॉक्टरांकडं जाऊन जादूई औषधांच्या , इन्जेक्शनांच्या शोधात फिरतात पण व्यसन सुटत नाही...अर्थात प्रत्येक व्यसनी माणसाला वाटत असते की माझं व्यसन नियंत्रणात आहे...

( सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातली गुटखाबंदी उठवल्यामुळे उद्विग्न ) भडकमकर मास्तर
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अवलिया's picture

22 Jun 2008 - 11:37 am | अवलिया

दंतवैद्यापासुन सावध रहा. ते प्रथम सुया टोचुन पकडीच्या सहाय्याने तुमचाच दात काढतील नंतर हात पसरुन पैसे मागतील.

(समस्त दंतवैद्य हलकेच घ्या)

नाना

वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील

भडकमकर मास्तर's picture

22 Jun 2008 - 6:08 pm | भडकमकर मास्तर

दंतवैद्यापासुन सावध रहा. ते प्रथम सुया टोचुन पकडीच्या सहाय्याने तुमचाच दात काढतील नंतर हात पसरुन पैसे मागतील.
हो ना... खरं तर रुग्णाने त्याचा महत्त्वाचा दात काढायची संधी दंतवैद्याला दिल्याबद्दल , दंतवैद्याने रुग्णाचा दात काढून झाल्यानंतर रुग्णापुढे अजिबात हात न पसरता रुग्णाची खणानारळाने ओटी भरून पुष्पगुच्छ आणि आहेर देऊन त्याची पाठवणी करायला हवी... आणि रुग्णाचा महत्त्वाचा दात प्रदर्शनात वगैरे मांडून , त्या महान आठव्या आश्चर्याबद्दल लोकांकडून ( हात न पसरता ) पैसे वसूल करावेत , म्हणजे दंतवैद्याचा चरितार्थही चालेल आणि काही चेंगट पेशंटांना "दातही घेतो आणि पैसेही घेतो " असे दु:ख होणार नाही... :D :D :D
( समस्त चेंगट पेशंटांनी हलकेच घ्यावे)
अवांतर : डॉ. दाढे, अशा रुग्णांना अजिबात सुयाच न टोचता दाढ काढायची कल्पना आपणास कशी वाटते?

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आपल्याबद्दल आदर वाढीस लागलेला आहे.

स्वाती दिनेश's picture

22 Jun 2008 - 12:07 pm | स्वाती दिनेश

दंतकथा आणि त्यावरील 'मिपा फ्यामिली' दंतवैद्यांची टिपण्णी दोन्ही आवडले.
स्वाती

त॑बाखूमुळे दात किडण्यास प्रतिब॑ध होतो हे सत्य आहे पर॑तु.. त॑बाखूमुळे तो॑डाचा कर्करोग होतो हे त्याहून दाहक सत्य आहे. ते॑व्हा मित्रा॑नो, सुपारी, गुटखा वा त॑बाखू अजिबात खाऊ अथवा चघळू नका. दात किडला तर जिवास धोका नाही शिवाय रूट कॅनाल करून वाचविता येतो, काढून दुसरा बसविता येतो पण जबड्यास, जिभेस वा गालास कर्करोगाने ग्रासले तर फार मोठी शस्त्रक्रिया करावी लागते. चेहरा विद्रूप होतो, जबडा साधा वरणभात खाण्याच्या लायकीचाही उरत नाही.. परिणाम अतिशय भीषण आहेत.
मी मु॑बईच्या टाटा मेमोरियलमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले असून मुखकर्करोग प्रतिब॑ध व उपचार हे माझ्या व्यवसायाचाच एक भाग आहेत. ह्याविषयावरही एक सचित्र लेख लिहितो लवकरच..
पण माझ्या मित्रा॑नो माझे हे सर्वा॑ना कळकळीचे आवाहन आहे की कृपा करून सुपारी, त॑बाखू कि॑वा गुटख्याच्या भयानक व्यसनात गुरफटू नका, हे सु॑दर मानवी शरीर नासवू नका

या विषयावर पुढे डॉ. दाढे किंवा भडकमकर मास्तरांनी लेख लिहिले का? असले तर दुवा द्यावा, नसले तर या डॉक्टरद्वयींनी या महत्वाच्या विषयावर नक्की सचित्र लेखन करावं हे सांगण्यासाठी हा लेख वर आणतो आहे. (बाय द वे: गेल्या बर्‍याच दिवसांत या दोघांपैकी कुणीही मिपावर आलेलं दिसलं नाही, चांगले लेखक आणि प्रतिसादक असलेली अशी मंडळी पुन्हा मिपावर दिसायला लागली तर बरं वाटेल.)

मिसळपाव's picture

30 Nov 2012 - 11:26 pm | मिसळपाव

ईन फॅक्ट दोन महिन्यांपूर्वी अजून एक दाढ पण काढली. फार दुखलं पण नंतर या वेळेला. डॉ. दाढे / भडकमकर मास्तर, काहि नाहि तर "दाढ काढणारात? मग हे करून पहा" छाप तरी काहितरी लिहा हो !!

भडकमकर मास्तर's picture

3 Dec 2012 - 9:18 pm | भडकमकर मास्तर

अक्कलदाढ काढण्यावरती दाढ्यांनी एक मोठा लेख दोन भागात लिहिल्याचे आठवते ... दुवा सापडत नाहीये...
पुढे कधीतरी मीही रूट कॅनल ट्रीटमेन्टवर लेख टाकण्याच्या विचारात होतो.. अजून लिहिलेला नाही

भाग १: http://www.misalpav.com/node/2223
भाग २: http://www.misalpav.com/node/2241

ही शोधाशोध करतांना लक्षात आलं की पूर्वी ज्या दुव्यांचे URLs
http://www.misalpav.com/misalpav/node/***** असे होते, ते लेख आता नव्या घरांत गेल्यावर
http://www.misalpav.com/node/***** अश्या URL वर सापडतात.

जेनी...'s picture

30 Nov 2012 - 11:17 pm | जेनी...

एकहि प्रतिसाद न वाचता प्रतिसाद द्यायला भारी मज्जा येते राव ;)

माझा पण दात काढाय सांगितलाय :(.म्हणे अक्कल दाढ वाकडी आलिय :-/

पण मला भ्या वाटतय .:(

काढु कि नक्को?? अस्सं झालय :(

आनंदी गोपाळ's picture

2 Dec 2012 - 9:19 pm | आनंदी गोपाळ

नेक्ष्ट टाईम माझ्याकडे या.
अर्धे इंजेक्क्षन देऊन कमीत कमी १५-२० मिनिटे लावीन तुमची दाढ उपटायला. मग समजेल आचमनं कशी घ्यायची अन मम कसं म्हणायचं ते ;)
-(सर्जन) आ.गो.

खटासि खट's picture

3 Dec 2012 - 9:15 am | खटासि खट

एका मिनिटात दात काढण्याचा खर्च एखाद्याला अव्वाच्या सव्वा वाटणे यात आश्चर्य काहीच नाही. दात काढण्यासाठी वैद्याकडेच जावे असे कुणी सांगितलेय ? एखाद्या पैलवानाची खोड काढली असती, फेसबुकवर एखादी आक्षेपार्ह कमेण्ट लिहीली असती तरी स्वस्तात काम झाले असते कि