स्वातंत्र्याची दुसरी लढाई

विकास's picture
विकास in काथ्याकूट
6 Apr 2011 - 1:44 am
गाभा: 

श्री. बहुगुणी यांचा, "उन्मन क्षण " वर चर्चा चालू असतानाच लक्षात आले की आज पाच एप्रिल उजाडलेले आहे... आज भारतात एका अर्थी इतिहास घडत आहे. ह्या प्रसंगांच्या होऊ शकणार्‍या दृश्य परीणामांवर त्याची खोली ठरेल इतकेच.

पंतप्रधान मनमोहनसिंग, संपुआच्या आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्या श्रीमती सोनिया गांधी आदींशी संपर्क करून देखील लोकपाल विधेयक पुढे जात नसल्याने आणि भ्रष्टाचाराच्या एकापाठोपाठ एक घटना बाहेर येत असल्याने, वैतागून श्री. अण्णा हजार्‍यांनी आमरण ऊपोषण चालू केले आहे. राळेगणसिद्धी या हजार्‍यांच्या गावामधील गावकर्‍यांनी गुढीला काळे कापड लावून अण्णांना पाठींबा आणि भ्रष्टाचाराचा निषेध केला.

या आंदोलनाला देशातील अनेक सेवाभावी संस्था, अगदी भिन्न विचारांच्या संस्था आणि व्यक्ती पाठींबा देत आहेत. त्यात किरण बेदी पण आहेत, स्वामी अग्नीवेशही आहेत, बाबा रामदेव आणि श्री श्री रविशंकरही आहेत. भारतभर आणि जगात इतरत्रही भारतीय या उपोषणाला पाठींबा देत आहेत आणि लोकपाल विधेयकाची मागणी करत आहेत. अधिक माहिती येथे पहा.

अण्णांच्याच भाषेत, या स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईस शुभेच्छा!

http://indiaagainstcorruption.org/

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

6 Apr 2011 - 1:49 am | नितिन थत्ते

दुसरे की तिसरे?

१९७७ मध्ये दुसरे स्वातंत्र्य मिळाल्याचे स्मरते.

लोक पाल विधेयकास पाठिंबा.
उपोषणाविषयी काही भूमिका ठरवता येत नाहीये.

विकास's picture

6 Apr 2011 - 2:13 am | विकास

दुसरे की तिसरे?

ह्याचे उत्तर शेवटच्या लाईन मध्ये आहे: "अण्णांच्याच भाषेत, या स्वातंत्र्याच्या दुसर्‍या लढाईस शुभेच्छा!"

लोक पाल विधेयकास पाठिंबा.

सहमत.

उपोषणाविषयी काही भूमिका ठरवता येत नाहीये.
सारखे उपोषणाचे शस्त्र वापरणे, हे राष्ट्राच्या हिताचे ठरत नाही असे वाटते का? ;)

कुंदन's picture

6 Apr 2011 - 1:50 am | कुंदन

साहेब विश्व चषक आयोजनात व्यस्त होते.
ते जरा मोकळे झाले की पोहोचतील संत्रा ज्यूस घेउन , अण्णांचे उपोषण सोडवायला.

sagarparadkar's picture

6 Apr 2011 - 12:51 pm | sagarparadkar

पूर्णपणे सहमत .... :)

मल तर वाटतंय की इथे सरकारची नाही तर अण्णांचीच खरी कसोटी लागणार आहे.

अण्णांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा आहे पण गांधिजींप्रमाणे ऐनवेळी अण्णांनी माघार घेतली तर ?

विनायक बेलापुरे's picture

7 Apr 2011 - 1:19 am | विनायक बेलापुरे

आजच उपोषणाच्या दुसर् याच दिवशी स्वामी अग्नीवेश यांनी बाईट देताना म्हणले आहे ......... मध्यममार्ग निघू शकतो.

(रिट्रीट बिगूल इतक्यातच वाजला की काय ? )

काय होणार ते दिसेलच ४-६ दिवसांत......

अण्णा जर फारच हट्टाला पेटले आणि / किंवा त्यांना फारच मोठा पाठिंबा मिळतोय असं दिसल्यास राजकारणी (मग ते कोणत्याही पक्षाचे असू शकतात) पद्धतशीरपणे त्या आंदोलनाला हिंसक वळण देतील. लगेच त्या हिंसाचाराचा निषेध म्हणून अण्णा आपलं 'आमरण उपोषण' मागे घेतील. 'चौरीचुरा' ची घटना अशा ठिकाणी कायम लक्षात ठेवावी.

जे सध्या सत्तेत आहेत त्यांना आत्तासाठी आणि जे सध्या विरोधक आहेत, त्यांना 'पुढे कधी सत्तेवर आलो तर ...' म्हणून जन्-लोकपाल विधेयक हे अडचणीचेच ठरणारे आहे, तेव्हा कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही ऐर्‍यागैर्‍या कार्यकर्त्यांकडून असो पण अण्णांचा नक्कीच 'मामा' केला जाणार हे नक्की.

खाली एका प्रतिसादात मराठी लोकांकडून अण्णांच्या आंदोलनाला पुरेसा पाठिंबा मिळत नाहीये असे लिहीलेले वाचले. ते तसे आहे कारण ह्या सर्व आंदोलन प्रकारांची रंगीत तालीम महाराष्ट्रात पूर्वीच झालेली आहे आणि त्याचे फलित काय मिळाले ते मराठी जनता आधीच ओळखून आहे.

क्रिकेटला सपोर्ट करायला, त्याच्या आनंदात नाचण्या गाण्यासाठी आख्खा देश रस्त्यावर उतरतो.
पण अण्णांच्या विधायक कार्याला मात्र हळु हळु प्रतिसाद मिळतोय.
अण्णा जे काही करतायत त्याला समर्थन आहेच आणि त्यांच्या या आपल्यासाठी चालवलेल्या लढाईस शुभेच्छा !!!

नितिन थत्ते's picture

6 Apr 2011 - 3:30 am | नितिन थत्ते

आत्ताच मटा मधला हा लेख वाचला.

लोकपाल विधेयकातल्या काही तरतुदींना माझा विरोध आहे. (किंवा म्हणजे नक्की काय हे कळलेले नाही)

-मसुदा बनविण्याच्या संयुक्त समितीत ५० टक्के सरकारी प्रतिनिधी तर ५० टक्के नागरिक आणि बुध्दिमंतांचे प्रतिनिधित्व असावे असा आग्रह (बुद्धीमंतांची हुकूमशाही प्रस्थापित करण्याचा डाव?)

- तात्काळ निवाडा व्हावा. (तात्काळम्हणजे किती काळात? तात्काळ निवाड्यासाठी न्यायाची मूलभूत तत्त्वे -उदा गुन्हा बियॉण्ड रिझनेबल डाऊट सिद्ध व्हायला हवा वगैरे बाजूस ठेवणार का?)

-निवड समितीमध्ये भारतीय वंशाचे दोन नोबेल विजेते आणि दोन मॅगसेसे पुरस्कार विजेते. (याचे काय जस्टिफिकेशन आहे हे कळले नाही)

एकूणात या कायद्यामुळे भ्रष्टाचारावर काय (वेगळा) वचक बसणार हे स्पष्ट होत नाही.

त्यामुळे वरच्या प्रतिसादात व्यक्त केलेला पाठिंबा मागे घेत आहे. (माझ्या पाठिंबा मागे घेण्याला विचारतोय कोण असेही कोणी म्हणू शकतील).

विकास's picture

6 Apr 2011 - 5:45 am | विकास

मूळ लेखात त्यांच्या मागण्यांचा त्यांच्या संस्थळावरील दुवा होता ज्यात मटा पेक्षा अधिक माहिती मिळू शकली असती. त्यात आत्ताची व्यवस्था आणि जनलोकपाल म्हणून मागणी यातील फरक दाखवला आहे
खाली फक्त त्यांच्या मागण्या चिकटवत आहे:

Lokpal at centre and Lokayukta at state level will be
independent bodies. ACB and CBI will be merged into
these bodies. They will have power to initiate
investigations and prosecution against any officer or
politician without needing anyone’s permission.
Investigation should be completed within 1 year and
trial to get over in next 1 year. Within two years, the
corrupt should go to jail.

Lokpal and Lokayukta will have complete powers to
order dismissal of a corrupt officer. CVC and all
departmental vigilance will be merged into Lokpal and
state vigilance will be merged into Lokayukta.

Lokpal & Lokayukta shall have powers to investigate
and prosecute any judge without needing anyone’s
permission.

Lokpal & Lokayukta will have to enquire into and hear
every complaint.

All investigations in Lokpal & Lokayukta shall be
transparent. After completion of investigation, all case
records shall be open to public. Complaint against any
staff of Lokpal & Lokayukta shall be enquired and
punishment announced within two months.

Politicians will have absolutely no say in selections of
Chairperson and members of Lokpal & Lokayukta.
Selections will take place through a transparent and
public participatory process.

Lokpal & Lokayukta will get public grievances resolved
in time bound manner, impose a penalty of Rs 250 per
day of delay to be deducted from the salary of guilty
officer and award that amount as compensation to the
aggrieved citizen.

Loss caused to the government due to corruption will
be recovered from all accused.

Enhanced punishment - The punishment would be
minimum 5 years and maximum of life imprisonment.

मसुदा बनवण्यात सरकारात नसलेले काही प्रमाणात घेतले तरी हरकत नाही असे वाटते. तेच सुरवातीच्या निवडसमितीच्या संदर्भात... (नाहीतर दर वेळेस नवीन नोबेल विजेते कसे आणणार? ;) )

नितिन थत्ते's picture

6 Apr 2011 - 10:34 pm | नितिन थत्ते

हा प्रतिसाद विकास यांना उद्देशून नाही.

आपण दिलेला दुवा वरील प्रतिसाद देऊन झाल्यावर वाचला. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. पण सदरच्या मागण्या फारश्या विचारपूर्वक केल्या गेलेल्या नाहीत. (किंवा फार विचारपूर्वक त्या समाजातल्या आदरणीय व्यक्तींद्वारा वदवल्या गेल्या आहेत).

>>Lokpal at centre and Lokayukta at state level will be independent bodies. ACB and CBI will be merged into these bodies. They will have power to initiate investigations and prosecution against any officer or politician without needing anyone’s permission. Investigation should be completed within 1 year and trial to get over in next 1 year. Within two years, the corrupt should go to jail.

एसीबी आणि सीबीआयला लोकपालाच्या हाताखाली आणणे ठीक आहे (जरी त्यातली कारणमीमांसा कळत नसली तरी). कोणत्याही अधिकार्‍याच्या किंवा राजकारण्याच्या* विरोधात कोणाच्याही परवानगीशिवाय खटला दाखल करण्याची तरतूद घटना दुरुस्ती केल्याशिवाय कशी करणार? ती घटना दुरुस्ती व्हावी म्हणून ३५ वर्षांत काही आंदोलन का झाले नाही? किंवा सध्याच्या आंदोलनात ती मागणी का नाही. असा खास तरतूद असलेला कायदा कशासाठी हवा?

दाखल केलेला खटला चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था अस्तित्वात आणायची आहे का? वेगळी न्यायव्यवस्था नसेल तर सध्याच्या न्यायव्यवस्थेत एका वर्षात खटला निकाली काढण्यासाठी काही वेगळे पापदंड लागू करायचे आहेत का? उदा. Presumed guilty unless proved otherwise असे काहीतरी? म्हणजे ज्याच्यावर खटला दाखल केला त्याला १ वर्षात आपले निर्दोषत्व सिद्ध करता आले नाही तर १ वर्षाने तो आपोआप दोषी म्हणून जाहीर आणि शिक्षा ठोठावली जाणार.....

की लोकपालाने खटला दाखल केला असेल तर नेहमीची पद्धत बाजूला ठेवली जाणार आहे? खटल्याची सुनावणी तारखा न देता केली जाणार आहे? त्यासाठी वेगळा कायदा का? सध्याच्याच कायद्यांत तशी सुधारणा का नाही करायची?

नव्या कायद्यानुसार भ्रष्ट अधिकार्‍याला बडतर्फ करण्याचे अधिकार लोकपालाला असावेत असे म्हटले आहे. सध्या तसे अधिकार कोणालाच नाहीत काय? भ्रष्ट अधिकारी याची व्याख्या भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झालेला अधिकारी (भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नव्हे) अशी असेल तर अशी तरतूद सध्याच्या कायद्यात का करू नये?

>>All investigations in Lokpal & Lokayukta shall be transparent. After completion of investigation, all case records shall be open to public. Complaint against any staff of Lokpal & Lokayukta shall be enquired and punishment announced within two months.

ही तरतूद ठीक आहे. (तरी अशी तरतूद एकूण सध्याच्या चौकशांबाबत का करू नये हा प्रश्न उरतोच).

>>Politicians will have absolutely no say in selections of Chairperson and members of Lokpal & Lokayukta. Selections will take place through a transparent and public participatory process.

सदरच्या मागण्या फार विचारपूर्वक आदरणीय व्यक्तींच्या मार्फत वदवल्या जात आहेत या माझ्या विधानाचा संदर्भ या मागणीत (पहिल्या वाक्यात) आहे. राजकारणी या शब्दाची अधिकृत व्याख्या नसावी परंतु राजकारणी या शब्दात नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान हे लोक अभिप्रेत असावेत. कितीही नाकारले तरी हे लोक जनतेचे प्रतिनिधी असतात. लोकशाही देशात लोकहिताच्या पदावरील नेमणुकीच्या प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना बिलकुल स्थान नसावे ही मागणी करणार्‍यांच्या मनोवृत्तीबाबत काय बोलणार. म्हणूनच ही मागणी करणार्‍यांनी विचारपूर्वक वदवून घेतली आहे असे माझे मत आहे.

>>Lokpal & Lokayukta will get public grievances resolved in time bound manner, impose a penalty of Rs 250 per day of delay to be deducted from the salary of guilty officer and award that amount as compensation to the aggrieved citizen.

या मागणीतून काहीच अर्थबोध झाला नाही.

>>Loss caused to the government due to corruption will be recovered from all accused.

ठीक आहे.

>>Enhanced punishment - The punishment would be minimum 5 years and maximum of life imprisonment.

ठीक आहे. सध्या शिक्षेचा कालावधी कमी असणे हा भ्रष्टाचाराला आळा घालण्यातला अडसर आहे असे वाटत नाही. भ्रष्टाचार्‍यांवर खटले भरले जाणे आणि दोषी सिद्ध होणे हे महत्त्वाचे आहे. शिक्षेच्या कालावधीचा प्रश्न त्यानंतर उपस्थित होतो.

आळश्यांचा राजा's picture

8 Apr 2011 - 2:12 am | आळश्यांचा राजा

मांडलेल्या सर्व मुद्द्यांशी सहमत.

अप्पा जोगळेकर's picture

10 Apr 2011 - 3:37 pm | अप्पा जोगळेकर

एसीबी आणि सीबीआयला लोकपालाच्या हाताखाली आणणे ठीक आहे
एसीबी म्हणजे काय ? मी तरी ते सीबीआय सारखे एखादे व्हिजिलन्स डिपार्टमेंट असावे असे गॄहीत धरतो आहे. माहीती असल्यास त्याबाबत लिहावे.

कोणत्याही अधिकार्‍याच्या किंवा राजकारण्याच्या विरोधात कोणाच्याही परवानगीशिवाय खटला दाखल करण्याची तरतूद घटना दुरुस्ती केल्याशिवाय कशी करणार?
तुमच्या या वाक्याचा अर्थ मी असा करतो की 'सध्याच्या घटनेनुसार कोणत्याही अधिकार्‍याच्या किंवा राजकारण्याच्या विरोधात कोणाच्यातरी परवानगीशिवाय खटला दाखल करण्यास मनाई आहे.'
ओके. घटनेनुसार मनाई असेलसुद्धा. पण माझी तरी अशी समजूत आहे की जनलोकपाल विधेयक कायदा या मनाईला ओव्हरराईड (मराठी शब्द ठाउक नाही) करेल. तुम्ही याच गोष्टीला खास तरतूद म्हणत आहात.
एखाद्या कायद्यात खास तरतूद का हवी याचे पुरेसे समर्थनीय कारण असले पाहिजे.
प्रचंड रकमांच्या भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणे गेल्या काही वर्षांमध्ये उघडकीस आली आहेत. या रकमा इतक्या प्रचंड आहेत की भ्रष्टाचाराच्या रोगाने सगळी व्यवस्था पोखरुन निघाली आहे असे वाटावे.
भ्रष्टाचारविरोधी कायद्यात खास तरतूद असण्यासाठी हे कारण पुरेसे आहे असे मला वाटते.
कोणतेही कारण नसताना निव्वळ तुमच्या मुस्लिम बांधवांसाठी खास तरतुदी आहेतच की.


ती घटना दुरुस्ती व्हावी म्हणून ३५ वर्षांत काही आंदोलन का झाले नाही? किंवा सध्याच्या आंदोलनात ती मागणी का नाही. असा खास तरतूद असलेला कायदा कशासाठी हवा?

सदर घटना दुरुस्ती ३५ वर्षांत झाली नाही यातील ३५ वर्षे या संदर्भाचा अर्थ काय? १९७६ मधील एखाद्या घटनेचा संदर्भ आहे का?
आणि ३५ वर्षांमध्ये असे आंदोलन झाले नाही ही बाब तुम्हाला चुकीची वाटते ना? तर मग या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार तुम्हालाही आहेच की.

दाखल केलेला खटला चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था अस्तित्वात आणायची आहे का? वेगळी न्यायव्यवस्था नसेल तर सध्याच्या न्यायव्यवस्थेत एका वर्षात खटला निकाली काढण्यासाठी काही वेगळे पापदंड लागू करायचे आहेत का? उदा. Presumed guilty unless proved otherwise असे काहीतरी?
स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा उल्लेख मी तरी आंदोलनकर्त्यांच्या मागणीत कुठेच वाचला नाही. आणि पुन्हा एकदा हेच गॄहीत धरतो आहे की एका वर्षात खटला निकाली काढणे हे बंधन ही केवळ लोकपाल आणि लोकायुक्त यांनी दाखल केलेल्या खटल्यांनाच लागू होईल.


म्हणजे ज्याच्यावर खटला दाखल केला त्याला १ वर्षात आपले निर्दोषत्व सिद्ध करता आले नाही तर १ वर्षाने तो आपोआप दोषी म्हणून जाहीर आणि शिक्षा ठोठावली जाणार.....

Investigation should be completed within 1 year and trial to get over in next 1 year याचा अर्थ असा की तपास करणार्‍यांनी १ वर्षात तपास संपवावा आणि न्यायालयाने पुढच्या १ वर्षाच्या आत सुनावण्या संपवून निकाल द्यावा? मग यात आपोआप दोषी ठरण्याचा मुद्दाच कुठे येतो. जर दोषी नसेल तर निर्दोष म्हणून आणि असेल तर दोषी म्हणून ठाराविक कालावधीत निकाल लागावा यात काय गैर आहे?

की लोकपालाने खटला दाखल केला असेल तर नेहमीची पद्धत बाजूला ठेवली जाणार आहे? खटल्याची सुनावणी तारखा न देता केली जाणार आहे? त्यासाठी वेगळा कायदा का? सध्याच्याच कायद्यांत तशी सुधारणा का नाही करायची?
यातील सध्याच्याच कायद्यात तशी तरतूद का करु नये हा अत्यंत ग्राह्य मुद्दा आहे. पुढेमागे कदाचित अण्णांच्यासारखा एखादा माणूस किंवा ते स्वतःच देखील यासाठीदेखील आंदोलन करतीलही. पण एखादा माणूस काही विशिष्ट ध्येयाने प्रेरित होउन विचारपूर्वक एखादे चांगले कार्य करत आहे तर ते असेच का केलेस तसेच का केले नाहीस अशा पद्धतीने खुसपटे काढण्यात काही अर्थ आहे काय ?
सध्याच्याच कायद्यात तशी सुधारणा व्हावी असे ज्यांना वाटते त्यांच्यासमोर सुद्धा आंदोलनाचा पर्याय आहेच. असे आंदोलन एखाद्या माणसाने केले तर त्यालाही लोक पाठिंबा देतील.


लोकशाही देशात लोकहिताच्या पदावरील नेमणुकीच्या प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना बिलकुल स्थान नसावे ही मागणी करणार्‍यांच्या मनोवृत्तीबाबत काय बोलणार.

लोकप्रतिनिधीला लगाम लागावा याकरता आपल्या घटनेत्/संविधानात्/कायद्यात काहीच तरतूद नाही. म्हणून अशी मागणी करावी लागली. या कायद्याअंतर्गत ज्याच्यावर कारवाई होणार आहे ते अस्तील लोकप्रतिनिधी आणि नोकरशहा. मग त्यांना नेमणुकीच्या प्रक्रियेत स्थान कसे देणार?
कोणात्याही विशिष्ट कारणासाठी माझी असेसमेंट होणार आहे आणि त्याकरता इंटरव्ह्यूअर कोण असेल हे मीच ठरवणार याला काही अर्थ आहे काय ?

४२ सालच्या लढ्यामध्ये जेंव्हा आम जनता सहभागी झाली होती त्यावेळी अनेक चर्चाप्रिय हिंदुत्ववादी 'या गांधीला काय अक्कल आहे का ? अहिंसेने कधी स्वातंत्र्य मिळतं का ?' अशा गप्पा मारत जणू स्वतः जन्मठेप भोगून आले आहेत असा आव आणत आणि स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर असल्याच्या थाटात घरी तंबाखू लावत लोळत पडलेले असत ' असे पु.ल. देशपांडे यांच्या कुठल्याशा लेखात वाचल्याचे आठवते. आज त्या वाक्याची पुन्हा आठवण होते आहे.

नितिन थत्ते's picture

10 Apr 2011 - 5:22 pm | नितिन थत्ते

>>तुमच्या या वाक्याचा अर्थ मी असा करतो की 'सध्याच्या घटनेनुसार कोणत्याही अधिकार्‍याच्या किंवा राजकारण्याच्या विरोधात कोणाच्यातरी परवानगीशिवाय खटला दाखल करण्यास मनाई आहे.'

कोणत्याही अधिकार्‍याच्या नव्हे. सध्या पंतप्रधानांवर खटला दाखल करायचा असेल तर राष्ट्रपतींची आणि मुख्यमंत्र्यांवर खटला दाखल करायचा असेल तर राज्यपालांची परवानगी लागते. बाकी कोणावर खटला दाखल करायला परवानगी लागत नाही. सदरची घटनादुरुस्ती १९७६ च्या आणीबाणीत झाली. त्यानंतर अनेक गैर काँग्रेसी सरकारे येऊन गेली. आणीबाणीनंतर लगेच आलेल्या जनता सरकारने याच घटनादुरुस्तीपैकी काही कलमे रद्द करवून घेतली पण हे कलम तसेच ठेवले. हे कलम रद्द करणारी घटनादुरुस्ती होत नाही तो पर्यंत पंतप्रधान वगैरेंना इन्क्लूड करणारा कोणताही तथाकथित लोकपाल कायदा घटनाबाह्य म्हणून रद्दबातल ठरवला जाऊ शकतो. (या बाबत माझ्या मते Notwithstanding anything contained in any other law असेही लिहिता येणार नाही).

>>स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा उल्लेख मी तरी आंदोलनकर्त्यांच्या मागणीत कुठेच वाचला नाही. आणि पुन्हा एकदा हेच गॄहीत धरतो आहे की एका वर्षात खटला निकाली काढणे हे बंधन ही केवळ लोकपाल आणि लोकायुक्त यांनी दाखल केलेल्या खटल्यांनाच लागू होईल.

स्वतंत्र न्यायव्यवस्था उभी न करता सध्याच्या न्यायव्यवस्थेत एका वर्षात खटला निकाली काढण्याची तरतूद कशी पाळली जाणार? सध्याही अनेक कायद्यांत अशी कालमर्यादांची तरतूद आहे. एकवर्षात निकाल लागला नाही तर आरोपी दोषी ठरणार की निर्दोष?

>>एखादा माणूस काही विशिष्ट ध्येयाने प्रेरित होउन विचारपूर्वक एखादे चांगले कार्य करत आहे तर ते असेच का केलेस तसेच का केले नाहीस अशा पद्धतीने खुसपटे काढण्यात काही अर्थ आहे काय ?

खुसपटे काढण्याचा प्रश्न नाही. लोकपाल विधेयक "असेच" असले तरच भ्रष्टाचार संपेल आणि असे असले तर भ्रष्टाचार संपेलच अशी कल्पना करून घेतलेल्यांसाठी थोडी वस्तुस्थितीची जाणीव.

>>लोकप्रतिनिधीला लगाम लागावा याकरता आपल्या घटनेत्/संविधानात्/कायद्यात काहीच तरतूद नाही. म्हणून अशी मागणी करावी लागली.

धाडसी विधान. वर सांगितल्याप्रमाणे काही विशिष्ट पदांवरच्या व्यक्ती सोडल्या तर सर्वांना लगाम घालण्याची तरतूद आहे. उदा शरद पवारांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक कथा आपण ऐकतो. मी वर उद्धृत केलेल्या एक्सेप्शनमध्ये पवार बहुधा बसत नाहीत. (माजी मुख्यमंत्री म्हणून बसतही असतील. कल्पना नाही). सुरेशदादा जैन, कलमाडी नक्कीच बसत नाहीत.

बाकी निवडणुकीत पराभूत करण्याची तरतूद नक्कीच आहे. योग्यवेळी ती वापरली जातेही.

प्रश्न जर त्या मंडळींच्या दहशतीचा असेल तर केवळ नवा कायदा करून काहीच होणार नाही.

लोकप्रतिनिधीपेक्षा वरचढ सत्ताकेंद्र असण्यास विरोध कायम आहे.

कलमाडी/राजा यांनी एवढ्या कोटींचा भ्रष्टाचार केला अशी बातमी पेपरात येताक्षणीच त्यांना गोळ्या घालण्याचा उद्देश काही या कायद्याने साध्य होणार नाही.

अप्पा जोगळेकर's picture

12 Apr 2011 - 7:49 pm | अप्पा जोगळेकर

हे कलम रद्द करणारी घटनादुरुस्ती होत नाही तो पर्यंत पंतप्रधान वगैरेंना इन्क्लूड करणारा कोणताही तथाकथित लोकपाल कायदा घटनाबाह्य म्हणून रद्दबातल ठरवला जाऊ शकतो.
जर असे असेल तर 'मसुदा समिती' त्या घटना दुरुस्तीचीदेखील शिफारस करेल अशी आशा करतो.

(या बाबत माझ्या मते Notwithstanding anything contained in any other law असेही लिहिता येणार नाही).

याचा अर्थ कळला नाही.

स्वतंत्र न्यायव्यवस्था उभी न करता सध्याच्या न्यायव्यवस्थेत एका वर्षात खटला निकाली काढण्याची तरतूद कशी पाळली जाणार? सध्याही अनेक कायद्यांत अशी कालमर्यादांची तरतूद आहे.
मग ती पाळली जाते का? कारण ती पाळली जात असेल तरच नव्या कायद्याला अर्थ राहणार आहे.

एकवर्षात निकाल लागला नाही तर आरोपी दोषी ठरणार की निर्दोष?

त्या काळात खटला निकाली काढणे हे न्यायालयावर बंधनकारक असेल असे वाटते. आणि निकाल लागला नाही तर याचा अर्थ काय ? जशी डेडलाईन पूर्ण झाली नाही तर प्रोजेक्ट पेनल्टी असते तसेच काही म्हणजे विलंबाशी संबंधित लोकांना दंड / कारवाई इत्यादी असेल असे सध्या समजतो आहे.

खुसपटे काढण्याचा प्रश्न नाही. लोकपाल विधेयक "असेच" असले तरच भ्रष्टाचार संपेल आणि असे असले तर भ्रष्टाचार संपेलच अशी कल्पना करून घेतलेल्यांसाठी थोडी वस्तुस्थितीची जाणीव.

ओके. 'मूळ विधेयकाला पाठिंबा आहे पण त्यात अमुक एक त्रुटी आहेत' असा चिकित्सक स्टान्स असेल तर ती अत्यंत स्वागतार्ह भूमिका आहे.
एकाएकी रामराज्य येईल अशा स्वप्नात मशगुल नाहीच. पण हे विधेयक पास झाले तर भ्रष्टाचाराला काही अंशी तरी चाप बसेल असे वाटते.

धाडसी विधान. वर सांगितल्याप्रमाणे काही विशिष्ट पदांवरच्या व्यक्ती सोडल्या तर सर्वांना लगाम घालण्याची तरतूद आहे.
जर असेल तर ही तरतूद फारच दुबळी असणार. अन्यथा अपराध्यांनाना चाप लावण्यात अंशतः तरी यश आले असते.

बाकी निवडणुकीत पराभूत करण्याची तरतूद नक्कीच आहे. योग्यवेळी ती वापरली जातेही.
निवडणूकीत पराभव होणे ही केलेल्या अपराधाची कायदेशीर शिक्षा नाही.

लोकप्रतिनिधीपेक्षा वरचढ सत्ताकेंद्र असण्यास विरोध कायम आहे.
जनता पिळून निघाली तरी चालेल. लोकप्रतिनिधींनी कितीही वरचढ व्हावे उन्मत्तपणे वागावे. त्याने लोकशाहीच्या केसालाही धक्का लागत नाही.
पण लोकप्रतिनिधी अकाउंटेबल, अ‍ॅन्सरेबल असतील अशी एखादी यंत्रणा अस्तित्वात आली की ताबडतोब लोकशाहीचा खून झाला म्हणून तुम्ही गळे काढणार.

समंजस's picture

14 Apr 2011 - 1:24 am | समंजस

खाली "सीबीआई" या संकेत स्थळाची लिंक देत आहे. या संकेत स्थळा वर अर्थातच "सीबीआई" बद्दल, सीबीआई च्या कार्या बद्दल माहिती मिळेल;
http://cbi.nic.in/index.php

या सोबतच आणखी एक लिंक देत आहे. या लिंक वर PDF फाइल Download करायला आणि वाचायला मिळतील ( भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करण्या करीता किंवा खटले चालवण्या करीता संबंधीत खात्यांची परवानगी न मिळाल्या मुळे पेडींग असलेल्या केसेस)
http://cbi.nic.in/performance/pending_sanction.php

[ ज्यांना "सीबीआई" या संस्थे बद्दल जास्त माहिती हवी आहे त्यांना आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करायला किंवा खटले चालवायला संबंधित सरकारी खात्यांची परवानगी हवी की नको तसेच संबंधीत मंत्रालयांची(सरकारची) परवानगी हवी की नको या बद्दल अधिक माहीती मिळवायला ह्या लिंक उपयोगी पडतील ]

असुर's picture

6 Apr 2011 - 4:51 am | असुर

लोकपाल विधेयकाविषयी फारशी माहीती नाही, त्यामुळे पास!

अनास्था नाही पण अज्ञान आहे, ते दूर करायचा प्रयत्न करतो आहे. लोकपाल विधेयक कुणी सहजसोप्या भाषेत फायेदे-तोटे यांसह समजावून सांगू शकेल का? मसुद्यातले मुद्दे फारसे कळलेले नाहीत!

"स्वत:चे ठाम मत देण्याइतपत समजलेलं असावं" ही स्वत:कडूनच अपेक्षा आहे!

--असुर

आपल्याकडे भ्रष्टाचार विरोधी असा कायदाच नाही. आहे तो कायदा भ्रष्टाचार रोखण्यास पुरेसा नाही. अश्यावेळी भ्रष्टाचाराला आळा घालणारा कायदा यावा अशी इच्छा आहेच. मात्र भ्रष्टाचार रोखण्यात १९६९मध्ये मांडलेले जन लोकपाल विधेयक अजिबातच कामाचे नाही. मात्र श्री अण्णांनी सुचवलेल्या सुधारणांनीही कितपत फायदा होईल हे सांगता येत नाही. यावर अधिक विश्लेषण कोणी करेल काय?

तुर्तास भ्रष्टाचार विरोधी पेक्षा भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याची गरज आहे त्यामुळे असा कायदा बनविण्याच्या मागणीला पाठिंबा. उपोषणाच्या कृतीलाही सलाम! मात्र ज्या प्रकारच्या कायद्यासाठी हा लढा चालला आहे त्या कायद्याबद्दल अज्ञान असल्याने तुर्तास तटस्थ

असुरराव, मटाने इथे थोडी माहिती दिले आहे (तुम्ही कदाचित वाच्ली असेलच). मात्र ती मटाच्या इतर बातम्यांप्रमाणेच वरवरची आहे :प

विकास's picture

7 Apr 2011 - 6:07 am | विकास

मात्र भ्रष्टाचार रोखण्यात १९६९मध्ये मांडलेले जन लोकपाल विधेयक अजिबातच कामाचे नाही. मात्र श्री अण्णांनी सुचवलेल्या सुधारणांनीही कितपत फायदा होईल हे सांगता येत नाही.

सहमत आहे. मात्र त्यामुळे (अण्णा हजार्‍यांच्या उपोषण/आंदोलनामुळे) किमान राजकारणी खडबडून जागे झाले असले तर अर्धे नाही तरी पाव मैदान नक्की जिंकले. मला खात्री आहे की आंदोलकांना ते तसेच्या तसे मान्य होईल अशी अपेक्षा नसावी. पण एक स्वायत्त संस्था जर चालू करावी लागली आणि त्यात पंतप्रधानासकट सर्वच आले तर भ्रष्टाचाराला तुम्हाला पाहीजे असलेला प्रतिबंध नक्कीच बसेल. बाकी राहीले त्यातील तृटी... जर सकारात्मकतेच्या बाजूने काहीतरी चूक घडली तर ती सुधारणे सोपे जाईल. पण जर स्वार्थी राजकारण्यांच्या बाजूनेच जर कायदा आत्ता तयार झाला तर तो नव्याने सुधारायला अजून चाळीस वर्षे थांबावे लागेल...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2011 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भ्रष्टाचाराच्या विरोधात एक जनआंदोलन आकार घेत आहे. विविध सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते देशभर आपापल्या गावात उपवास करुन अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत ही आनंदाची गोष्ट वाटते. होणार्‍या आंदोलनाचा परिणाम होईल न होईल पण लोकांमधे जागृती वाढेल, वाढत आहे ही मला आनंदाची गोष्ट वाटते. क्रिकेटच्या विजयानंतर भारतीय क्रिडा रसिक जसे आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले तसेच अण्णांच्या या आंदोलनात लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले पाहिजे, असे मला वाटते.

-दिलीप बिरुटे

भ्रष्टाचाराविरुध्द असलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे.
लोकपाल विधेयकामुळे चमत्कार होईल आणि एकदम भ्रष्टाचारींना चाप बसेल असल्या स्वप्नात मशगूल नाही.
पण बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला निदान काहीसा आळा तरी बसू शकेल.

या मुद्द्यावर तरी राजकारण असू नये पण,
४२ वर्षात लोकपाल विधेयक स्विकारले गेले नाही. एनडीए च्या बाजपेयी सरकारने मांडलेले विधेयक राज्यसभेतून फेटाळले गेले जिथे काँग्रेसचे त्यावेळी बहुमत होते. म्हणजे सत्तेत नसताना सुद्धा ही मंडळी भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याबाबत किती जागरुक असतात हे दिसून येते.
आत्ता दोन्ही सभाग्रुहात बिल लगेच पास होइल अशी परिस्थिती असूनही वेळ का काढला जात आहे हे अगम्य आहे. त्यातही सरकारी ड्राफ्ट मध्ये ४ पदे (पन्तप्रधान्,उपपन्तप्रधान आनि दोन्ही सभागृहाचे स्पीकर्स ) यातून का वगळायची याच्याब्द्दल काय बोलणार ?

आण्णांचे हे आंदोलन यशस्वी व्हावे अश्या शुभेच्छा आणि पाठिंबा.

नितिन थत्ते's picture

6 Apr 2011 - 9:34 pm | नितिन थत्ते

>>त्यातही सरकारी ड्राफ्ट मध्ये ४ पदे (पन्तप्रधान्,उपपन्तप्रधान आनि दोन्ही सभागृहाचे स्पीकर्स ) यातून का वगळायची याच्याब्द्दल काय बोलणार ?

ही तरतूद न ठेवल्यास सदर कायदा घटना विरोधी म्हणून रद्दबातल होईल. या चार पदांना विधेयकात समाविष्ट करण्यासाठी आधी घटनादुरुस्ती करावी लागेल.

सदरची तरतूद ४२व्या घटनादुरुस्तीने आणीबाणीच्या काळात केली गेली. त्याबाबत भरपूर शिमगा झालेला आहे परंतु ती तरतूद रद्द केली गेली नाही.

विकास's picture

6 Apr 2011 - 9:56 pm | विकास

४२ वर्षात लोकपाल विधेयक स्विकारले गेले नाही. एनडीए च्या बाजपेयी सरकारने मांडलेले विधेयक राज्यसभेतून फेटाळले गेले जिथे काँग्रेसचे त्यावेळी बहुमत होते.

जे सिंपल दिसते त्याबद्दल काय मत आहे? मला ही गोष्ट नव्यानेच समजली. पण नितिनरावांकडून खात्री आणि टिपण्णी करून घेण्यास आवडेल.

नितिन थत्ते's picture

6 Apr 2011 - 11:07 pm | नितिन थत्ते

मला पण जाणून घ्यायला आवडेल. लोकसभेत त्यावेळी ते पास झाले होते का?

आणि

१९६९ पासून हे विधेयक मांडले जात आहे असे ऐकले. दरवेळी ते गैर काँग्रेसी खासदारांकडून मांडले गेले आहे का?

विकास's picture

7 Apr 2011 - 3:40 am | विकास

खालील दुव्यात थोडी माहिती मिळेल.

नितिन थत्ते's picture

7 Apr 2011 - 7:51 am | नितिन थत्ते

४२ वर्षात लोकपाल विधेयक स्विकारले गेले नाही. एनडीए च्या बाजपेयी सरकारने मांडलेले विधेयक राज्यसभेतून फेटाळले गेले जिथे काँग्रेसचे त्यावेळी बहुमत होते.

जे सिंपल दिसते त्याबद्दल काय मत आहे? मला ही गोष्ट नव्यानेच समजली. पण नितिनरावांकडून खात्री आणि टिपण्णी करून घेण्यास आवडेल.

सिंपल माहिती दुव्यातून मिळाली नाही. एनडीए चे बहुमत असलेल्या लोकसभेत ते पास झाले होते का याचे उत्तर कळल्याखेरीज "काँग्रेसचे बहुमत असलेल्या राज्यसभेत ते फेटाळले गेले" हे विधान खोडसाळपणाचे ठरते. दुव्यातल्या माहितीवरून काँग्रेसचे बहुमत असलेल्या लोकसभांमध्ये पूर्वी ते पास झाले होते असे दिसते.

विकास's picture

7 Apr 2011 - 9:33 am | विकास

युपिएससीच्या परीक्षेच्या पुस्तकातील कारणाप्रमाणे लोकसभा विसर्जीत झाल्याने ते पास झाले नाही...(पृष्ठ २२४ वर बर्‍यापैकी व्यवस्थित माहिती पहील्यांदाच मिळाली).

अविनाशकुलकर्णी's picture

6 Apr 2011 - 11:55 am | अविनाशकुलकर्णी

पाककृति न टाकुन आण्णांच्या उपोषणास पाठिंबा द्या...

भडकमकर मास्तर's picture

6 Apr 2011 - 9:46 pm | भडकमकर मास्तर

आणि मजेदार गोष्ट अशी आहे की मराठी माणसे या आंदोलनाकडे फार सीरियसली पाहत नाहीयेत.. आणि अमराठी लोकांनी हे जास्त उचलून धरले आहे असे वाटते....

मुक्तसुनीत's picture

6 Apr 2011 - 9:48 pm | मुक्तसुनीत

असे नक्की कशावरून वाटते ?

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2011 - 10:31 am | भडकमकर मास्तर

दिवसभर काही इंग्रजी आणि हिन्दी न्यूज च्यानल पाहिले......... त्यावरून सारे अंगात आल्यासारखं करत आहेत आणि एकूणच अण्णांच्या आंदोलनाकडे मराठी माणसे सावधगिरीने पाहत आहेत असे जाणवले....( मराठी माणसांची सावधगिरी मिपावरही प्रतिबिंबित झालेली आहे..)....... थोडावेळ या उन्मादाने थोडा अचंबित झालो होतो की राष्ट्रीय स्तरावरती अण्णांना इतका प्रचंड प्रतिसाद कसा मिळत आहे...? कदाचित आमरण उपोषण राष्ट्रीय स्तरावर भ्राष्टाचाराविरुद्ध कोणी केले नसावे आणि गेल्या काही महिन्यांतले जनतेचे फ्रस्ट्रेशन बाहेर येत असावे....

पण काहीही असो, कसेही असो, लोकपाल विधेयक योग्य त्या स्वरूपात पास व्हावे ही इच्छा...

मराठी माणसासाठी अण्णांचे उपोषण नवे नाही, त्यातून नक्की काय निष्पन्न होते यावरही खूप जणांना शंका आहेत..त्यामुळे मराठी आणि अमराठी माणसाच्या प्रतिक्रियेत थोडा फरक अहे असे म्हणावेसे वाटते......

तरीही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा...

( स्टार माझावरती सुरेशदादा जैनांची प्रतिक्रिया मजेदार होती..त्यामुळे सेनेची गोची झाली.. त्यांच्य वैयक्तिक मताशी आमचा काहीही संबंध नाही असे म्हणावे लागले)

कळस's picture

6 Apr 2011 - 9:48 pm | कळस

माझा या ऐतिहासिक आंदोलनाला मनःपूर्वक पाठिंबा ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Apr 2011 - 10:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जनलोकपाल विधयकाचा मसुदा तयार करण्याच्या समितीत श्री शरद पवार नको. [मटा बातमी] इथपर्यंत ठीक आहे, पण आत्ताच त्यांच्या कॅबिनेटचा राजीनामा मागण्याची बातमीमुळे आंदोलनाची दिशा बिघडणार तर नाही ना ?

बाकी, अण्णा नेत्यांना भेटणार नाही या भूमिकेमुळे आज उमा भारती आणि काही नेत्यांना परत फिरावे लागले. आंदोलनाचे राजकारण होऊ नये ही गोष्ट चांगली .

-दिलीप बिरुटे

पण आत्ताच त्यांच्या कॅबिनेटचा राजीनामा मागण्याची बातमीमुळे आंदोलनाची दिशा बिघडणार तर नाही ना ?

पवारसाहेब कॅबिनेटचा राजीनामा कसा देतील? ;) खालील वाक्य (म.टा. मधील) योग्य अर्थ सांगते.

अखेर अण्णांच्या भूमिकेचा मान राखत पवारांनी विधेयकाचा मसूदा तयार करणा-या मंत्रिगटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2011 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मंत्रीपदाचाही राजीनामा मागितला अशी बातमी काल वाहिन्यांवर दाखवत होते. आज मटात ''शरद पवार यांनी बुधवारी अखेर या मंत्रिगटाचा राजीनामा दिला. लागलीच अण्णांनी 'पवार यांनी मंत्रिपदाचाच राजीनामा द्यावा', अशी नवी मागणी पुढे आणली.''

-दिलीप बिरुटे

हे मात्र अति झाले हां...
एव्हढा मोठा चतुरस्त्र नेता , शेतकर्‍यांपासुन क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांना भरपुर पैसे मिळावेत म्हणुन त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे खरे.

अप्पा जोगळेकर's picture

6 Apr 2011 - 10:59 pm | अप्पा जोगळेकर

लढाईस शुभेच्छा. मसुद्याचा बराचसा भाग समजला.
एक सामान्य माणूस म्हणून काय करु शकतो हे कळत नाही.

आण्णाच्या आंदोलनाला दिल्लीत बराच पाठिंबा मिळतोय.
लोकपाल विधेयकात एखाद्या आमदार खासदाराविरुद्ध सामान्य नागरीकाला लोकपाल समितीकडे तक्रार दाखल करता येते.त्यासाठी मंत्रीमंडळाची परवानगी लागत नाही.
पण त्यात सरकारने काही पळवाटा ठेवल्या आहेत.
१)लोकपाल समितीकडे तक्रार दाखल केली गेल्यानन्तर त्या खासदार आमदाराविरुद्ध असलेल्या सर्व चौकशा थांबवाव्यात ( कोणत्याही प्रकारची चौकशी थांबवली जावी. यात एक्साईज , सेल्स टॅक्स , फसवणूक , धमकी , सी बी आय वगैरे )
२) लोकपाल समिती कदे तक्रार दाखल झाल्यानन्तर त्या लोकप्रतिनीधी वरील सर्व खटल्यांची सुनावणी थांबवावी.
३) लोकपाल समितीला लोकप्रतिनीधीला शिक्षा सुनावण्याचा अधिकार नाही मात्र लोकपाल समितीकडे केलेली तक्रार खोटी आहे किंवा तो लोकप्रतिनीधी त्या तक्रारीतून मुक्त झाला तर त्या सामान्य नागरीकाला खोटी तक्रार दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात येईल.
अशा प्रकारच्या लोकपाल विधेयकाला अण्णांचा विरोध आहे.
आंदोलनाच्या निमित्ताने आण्णांच्या जवळ येण्यार्‍या ओमप्रकाश चौटालांसारख्या नेत्याना कर्यकर्त्यानी हाकलुन लावले हे बरेच झाले.
पण आण्णानी एकाचवेळेस शरदपवार सोनीया गांधी या सर्वांविरुद्ध एकाच वेळेस आघाडी उघडायला नको होती असे वाटते.
भाजप सुद्धा जोवर आण्णा येडीयुराप्पांबद्दल बोलत नाहीत तोवर आण्णांची पाठराखण करेल. त्यानन्तर सोयीस्करपणे बाजूला होईल.

विकास's picture

7 Apr 2011 - 7:53 pm | विकास

भाजप सुद्धा जोवर आण्णा येडीयुराप्पांबद्दल बोलत नाहीत तोवर आण्णांची पाठराखण करेल. त्यानन्तर सोयीस्करपणे बाजूला होईल.

आत्ता याच विषयावरील वाचताना लक्षात आले की कर्नाटकात लोकायुक्त आहे. असे दिसतयं की त्याच्या अख्त्यारीखाली मुख्यमंत्रीपण येतात.

The public servants who are covered by the Act include :-

  1. Chief Minister;
  2. all other Ministers and Members of the State Legislature;
  3. all officers of the State Government;
  4. Chairman, Vice Chairman of local authorities, Statutory bodies or Corporations established by or under any law of the State Legislature, including Co-operative Societies
  5. Persons in the service of Local Authorities, Corporations owned or controlled by the State Government, a company in which not less than 50% of the shares are held by the State Government, Societies registered under the State Registration Act, Co-operative Societies and Universities established by or under any law of the Legislature.

अर्थात जर कुणाला येडूरप्पांना अडकवायचेच असेल तर ते आत्ता देखील अडकवू शकतात.

पण मुद्दा तो नाही. असे अनेक राज्यात (मला वाटते महाराष्ट्रात देखील) लोकायुक्त आहेत. तर मग त्यांना जे काही अधिकार त्या त्या राज्यांनी दिले आहेत त्या अख्त्यारीत आजपर्यंत त्याचा किती वापर झाला? हे विचारत असताना, तो लोकायुक्त कायदा किती बळकट आहे अथवा कमकुवत आहे, अथवा त्यामधे मुख्यमंत्री/मंत्री येतात का हा प्रश्न नाही. भ्रष्टाचार हा सार्वत्रिक आहे. त्यामुळे कुठे तरी या हक्काचा उपयोग आज जसाकसा लोकायुक्त कायदा अस्तित्वात आहे त्याखाली आहे. तर मग तो हक्क कोंणी वापरला आणि फलश्रुती काय?

त्यावर अण्णांच्या आंदोलनाचे महत्व ठरते असे म्हणायचे नाही. किमान त्यानिमित्ताने सगळे खडबडून जागे होत आहेत, हे महत्वाचे...

अप्पा जोगळेकर's picture

10 Apr 2011 - 4:12 pm | अप्पा जोगळेकर

तर मग त्यांना जे काही अधिकार त्या त्या राज्यांनी दिले आहेत त्या अख्त्यारीत आजपर्यंत त्याचा किती वापर झाला?
कदाचित वापर झालाअसेलही पण सध्याच्या लोकायुक्तांची मर्यादा खटला दाखल करणे इथवरच मर्यादित असणार. तो खटला किती दिवसात निकाली लागावा याचे न्यायालयांना भय नसल्याने कोणालाच याचा धाक नसणार.

ऋषिकेश's picture

7 Apr 2011 - 9:16 am | ऋषिकेश

सरकारी लोकपाल बिल व अण्णांच्या मागण्यांची एक चांगली तुलना आजच्या डीएनएमधे दिली आहे. ह्या चर्चेला दिशादायक ठरावी.
सरकारी लोकपाल बिल म्हणजे अगदीच पुचाट वाटते.
(हा दुवा न उघडल्यास डीएन्ए पुणे एडिशन पान ७ बघावे)

आळश्यांचा राजा's picture

8 Apr 2011 - 2:06 am | आळश्यांचा राजा

सरकारी लोकपाल बिल म्हणजे अगदीच पुचाट वाटते.

मी दोन्ही बिले एकदा वाचून पाहिली. सरकारी बिलात काय पुचाट वाटले? मला तर हे तथाकथित जन-विधेयक त्या सरकारी बिलावरच बेतलेले दिसले. काही मामुली बदल केलेले आहेत. त्या बदलांचेही कारण समजत नाही. वर नितीन थत्तेंनी म्हणल्याप्रमाणे "राजकारणी" लोकांनी निवड समितीमध्ये/ उमेदवारीमध्ये असायला बंदी आहे याचे कारण उमगत नाही. अशी बंदी का? मॅगसेसे/ नोबेल पारितोषिक मिळवणारे लोक निवडसमितीमध्ये कशासाठी हवेत? भारतरत्नवाले कशासाठी हवेत? सीएजी, सीइसी हे लोक कशासाठी हवेत? भारतरत्न देणारे राजकारणी. सीएजी, सीइसी नियुक्त करणारे राजकारणीच. राजकारण्यांनी नियुक्त केलेले लोक चालतात. पण राजकारणी नकोत. काही समजत नाही बुवा.

लोकपाल होण्यासाठी अर्हता सरकारी बिलात अचूकपणे सांगण्यात आलेली आहे. तथाकथित जन विधेयकात ती नकारात्मक आहे. (नेति नेति!)

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सरकारी बिल हे "जन" बिल नाही हा महत्त्वाचा शोध आत्ता या निमित्ताने लागलेला आहे.

आणि जन विधेयक म्हणजे तरी काय? कुठल्यातरी चार (सरकारी नोकरीत किंवा पदावर नसलेल्या) माणसांनी सरकारी बिलात काही बदल केले की झाले जन विधेयक. सरकारी बिल बनवणारे कोण इंग्रज आहेत की पाकिस्तानी? ते पण भारतातीलच "जन" आहेत ना? आणि व्यवस्थित लोकशाही प्रक्रियेतून घटनात्मक मार्गाने ज्या जागी गेले आहेत त्या जागी बसून ते बिल ड्राफ्ट केले आहे.

असो. अण्णांविषयी नितांत आदर आहे. या निमित्ताने तरुणाई राजकारणाचा गंभीरपणे विचार करतेय. राजकारण्यांना नुसत्याच शिव्या देण्याच्या पलीकडे जाऊन आपलीही काही जबाबदारी आहे याचे भान येत आहे. हा भाग महत्त्वाचा आहे. आणि एवढाच भाग महत्त्वाचा आहे.

समंजस's picture

8 Apr 2011 - 8:43 pm | समंजस

मी दोन्ही बिले एकदा वाचून पाहिली. सरकारी बिलात काय पुचाट वाटले? मला तर हे तथाकथित जन-विधेयक त्या सरकारी बिलावरच बेतलेले दिसले. काही मामुली बदल केलेले आहेत. त्या बदलांचेही कारण समजत नाही. वर नितीन थत्तेंनी म्हणल्याप्रमाणे "राजकारणी" लोकांनी निवड समितीमध्ये/ उमेदवारीमध्ये असायला बंदी आहे याचे कारण उमगत नाही. अशी बंदी का? मॅगसेसे/ नोबेल पारितोषिक मिळवणारे लोक निवडसमितीमध्ये कशासाठी हवेत? भारतरत्नवाले कशासाठी हवेत? सीएजी, सीइसी हे लोक कशासाठी हवेत? भारतरत्न देणारे राजकारणी. सीएजी, सीइसी नियुक्त करणारे राजकारणीच. राजकारण्यांनी नियुक्त केलेले लोक चालतात. पण राजकारणी नकोत. काही समजत नाही बुवा.
....जास्त जुनं नसलेलं प्रकरण म्हणजे माजी सीवीसी थॉमस यांची केलेली सदोष निवड, त्यावरून हे लक्षात यावं की अश्या नेमणूकींच्या बाबतीत राजकीय नेत्यांचा सहभाग त्यातही विशेष करून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचा सहभाग का नको.

लोकपाल होण्यासाठी अर्हता सरकारी बिलात अचूकपणे सांगण्यात आलेली आहे. तथाकथित जन विधेयकात ती नकारात्मक आहे. (नेति नेति!)
....ती नकारात्माक आहे हे कश्या प्रकारे?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सरकारी बिल हे "जन" बिल नाही हा महत्त्वाचा शोध आत्ता या निमित्ताने लागलेला आहे.
....सरकारी बिल हे कदाचीत 'जन' असेलही परंतू नक्कीच ते जन "हित" नाही, जन हिताचे नाही. सरकारी बिल हे फक्त सरकारच्या हिताचे आहे, त्यांना भ्रष्ट्राचारात मदत करणार्‍या नोकरशाहीतील अधिकार्‍यांच्या हिताचे आहे.

आणि जन विधेयक म्हणजे तरी काय? कुठल्यातरी चार (सरकारी नोकरीत किंवा पदावर नसलेल्या) माणसांनी सरकारी बिलात काही बदल केले की झाले जन विधेयक. सरकारी बिल बनवणारे कोण इंग्रज आहेत की पाकिस्तानी? ते पण भारतातीलच "जन" आहेत ना? आणि व्यवस्थित लोकशाही प्रक्रियेतून घटनात्मक मार्गाने ज्या जागी गेले आहेत त्या जागी बसून ते बिल ड्राफ्ट केले आहे.
....सदोष युक्तीवाद. भारतातील व्यक्तींनी/भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी एखादं बिल तयार केलं म्हणून ते योग्य आहे, सर्वसामान्य जनतेच्या आणि देशाच्या जनहिताचं आहे हे म्हणणे म्हणजे दिवसातून १०१ वेळेस माळीवरून हात फिरवणारा गुन्हा करूच शकत नाही, दिवसातून पाच वेळा नमाज म्हणणारा व्यक्ती गुन्हा करूच शकत नाही आणि एखादा बाप स्वतःची मुलगी आहे म्हणून तिच्यावर अत्याचार करूच शकत नाही असे म्हणण्या सारखे आहे.
(अशिक्षीत राबडीदेवी किंवा राज्य सभेतून येणारे मनमोहनसिंग किंवा उत्तरप्रदेशातील बरेचसे बाहूबली आमदार-खासदार, शिक्षीकेवर बलात्कार करणारा बिहारातील आमदार यांच्या बद्दल काय म्हणता येईल?)

ब्रिटीश राज्य कर्त्यांपासून सत्ता मिळवण्याचा उद्देश हा भारतातील मुठभर लोकांच्या हातात सत्ता देणे आणि ब्रिटीश राज्य कर्त्यांऐवजी या मुठभर राजकीय नेत्यांना पिढ्यानपिढ्या देशातील साधन सामुग्री, नैसर्गिक संपत्ति लुबाडू देणे, सामान्य जनते कडून विविध स्वरूपातून गोळा करण्यात येत असलेलल्या महसूलातून, विविध करातून पैसा खाउ देणे मुळीच नव्हता. त्या करीता महात्मा गांधींनी, त्यांच्या अनुयायींनी, क्रांतिकारकांनी त्याग केला नाही.
आज स्वतंत्र भारतात नक्षलवाद जिंवत आहे किंवा वाढत आहे तो ब्रिटीश राज्यकर्त्यांमुळे किंवा पाकिस्तानी हुकुमशहांमुळे नाही तर याच भारतिय, लोकांनी निवडलेल्या भ्रष्ट नेत्यांमुळे, या नेत्यांनी पाठिशी घातलेल्या त्यांच्या सारख्याच भ्रष्ट नोकरशाही मुळे.

भारताला स्वातंत्र्य मिळालं ते ब्रिटीश सरकार पासून परंतू अर्थातच तेव्हढं पुरेसं नाही, तर या सोबत चांगलं शासन सुद्धा हवं त्या करता भ्रष्टाचार मुक्त सरकार हवं, भ्रष्टाचार मुक्त नोकरशाहि हवी, भ्रष्टाचार मुक्त शासन हवं. माहिती अधिकार त्या दिशेने प्रथम पाउल होतं तर मजबूत आणि प्रभावी लोकपाल विधेयक हे दुसरं पाउल आहे.

जेव्हा अण्णा हजारे म्हणतात की ही स्वातंत्र्यानतरची दुसरी मोठी लढाई आहे ते खरेच आहे कारण ही लढाई स्वार्थी शासनकर्त्यांच्या(आजी/माजी) हिता विरूद्ध आहे आणि सर्वसामान्यांच्या हिता करीता आहे, गरीबांच्या, दुर्बलांच्या अधिकारा करीता आहे.

[अण्णांच्या सामर्थ्या बद्दल शंका असणार्‍यांनी माहिती अधिकार विधेयक पारित करून घेण्यात असलेला अण्णा हजारेंचा वाटा लक्षात घ्यावा, तसेच या विधेयकामुळे झालेला फायदा सुद्धा लक्षात घ्यावा.]

आळश्यांचा राजा's picture

8 Apr 2011 - 11:33 pm | आळश्यांचा राजा

...जास्त जुनं नसलेलं प्रकरण म्हणजे माजी सीवीसी थॉमस यांची केलेली सदोष निवड, त्यावरून हे लक्षात यावं की अश्या नेमणूकींच्या बाबतीत राजकीय नेत्यांचा सहभाग त्यातही विशेष करून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांचा सहभाग का नको.

जन विधेयकात सुचवलेली निवड समिती अशी आहे -

१. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष
२.सर्वोच्च न्यायालयाचे दोन जज
३. उच्च न्यायालयाचे दोन जज
४. मूळ भारतीय सर्व नोबेल विजेते
५. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष
६. मूळ भारतीय दोन मॅगसेसे विजेते
७. सीएजी
८. सीइसी
९. भारत रत्न विजेते.

आता या वरीलपैकी काहीजण तरी सरळसरळ राजकारण्यांनीच निवडलेले असतात. ते तरी का चालावेत? थॉमस यांची (सदोष) निवड ही एक घटना आहे. तसे नेहमीच होते असा निष्कर्ष काढायचा असेल, तर वरील क्र. १,२,३,५,७,८,९ हे बाद होतात. त्यांच्याही निवडी सदोष होऊ शकतात.

...ती नकारात्माक आहे हे कश्या प्रकारे?

4. The Chairperson and members of Lokpal not to have held certain offices- The Chairperson and members of Lokpal shall not be serving or former member of either the Parliament or the Legislature of any State and shall not hold any office or trust of profit (other than the office as Chairperson or member) or would have ever been connected with any political party or carry on any business or practice any profession and accordingly, before he enters upon his office, a person appointed as the Chairperson or member of Lokpal shall-
(i) if he holds any office of trust or profit, resign from such office; or
(ii) if he is carrying on any business, sever his connection with the conduct and
management of such business; or
(iii) if he is practicing any profession, suspend practice of such profession.
(iv) If he is associated directly or indirectly with any other activity, which is likely cause
conflict of interest in the performance of his duties in Lokpal, he should suspend his
association with that activity.
Provided that if even after the suspension, the earlier association of that person with
such activity is likely to adversely affect his performance at Lokpal, that person shall
not be appointed as a member or Chairperson of Lokpal.

2. Following persons shall not be eligible to become Chairman or Member in Lokpal:
(a) Any person who was ever chargesheeted for any offence under IPC or PC Act or was ever
penalized under CCS Conduct Rules.
(b) Any person who is less than 40 years in age.
3. At least four members of Lokpal shall have legal background.

4. The members and Chairperson should have unimpeachable integrity and should have
demonstrated their resolve and efforts to fight against corruption in the past.

वरील क्र. ४ फक्त पॉझिटिव्ह आहे. पण त्याचा नेमका अर्थ कसा लावावा? चारित्र्याचे आणि लढ्यात सहभागी असल्याचे सर्टिफिकीट कोण देणार? हा मुद्दा क्र. ४ म्हणजे शब्दांचा अपव्यय आहे.

सरकारी बिल हे कदाचीत 'जन' असेलही परंतू नक्कीच ते जन "हित" नाही, जन हिताचे नाही. सरकारी बिल हे फक्त सरकारच्या हिताचे आहे, त्यांना भ्रष्ट्राचारात मदत करणार्‍या नोकरशाहीतील अधिकार्‍यांच्या हिताचे आहे.

कसे काय ते स्पष्ट करावे. आणि सरकारच्या हिताचे असूनही ते अजूनपर्यंत पारित का झाले नाही तेही स्पष्ट करावे.

...सदोष युक्तीवाद. भारतातील व्यक्तींनी/भारतात जन्मलेल्या व्यक्तींनी एखादं बिल तयार केलं म्हणून ते योग्य आहे, सर्वसामान्य जनतेच्या आणि देशाच्या जनहिताचं आहे हे म्हणणे म्हणजे दिवसातून १०१ वेळेस माळीवरून हात फिरवणारा गुन्हा करूच शकत नाही, दिवसातून पाच वेळा नमाज म्हणणारा व्यक्ती गुन्हा करूच शकत नाही आणि एखादा बाप स्वतःची मुलगी आहे म्हणून तिच्यावर अत्याचार करूच शकत नाही असे म्हणण्या सारखे आहे.
(अशिक्षीत राबडीदेवी किंवा राज्य सभेतून येणारे मनमोहनसिंग किंवा उत्तरप्रदेशातील बरेचसे बाहूबली आमदार-खासदार, शिक्षीकेवर बलात्कार करणारा बिहारातील आमदार यांच्या बद्दल काय म्हणता येईल?)

हे (सरकारी) बिल अयोग्य कसे आहे ते स्पष्ट करावे म्हणजे हा आमचा "सदोष" युक्तिवाद आपोआपच मोडीत निघतो. निवडून आलेले (सर्व) लोक अपवित्र आणि अण्णा हजारेंसोबत बसलेले (सर्व) लोक पवित्र असा युक्तिवाद तुमच्या म्हणण्यातून ध्वनित होतो आहे असे आपल्याला वाटत नाही काय?

आज स्वतंत्र भारतात नक्षलवाद जिंवत आहे किंवा वाढत आहे तो ब्रिटीश राज्यकर्त्यांमुळे किंवा पाकिस्तानी हुकुमशहांमुळे नाही तर याच भारतिय, लोकांनी निवडलेल्या भ्रष्ट नेत्यांमुळे, या नेत्यांनी पाठिशी घातलेल्या त्यांच्या सारख्याच भ्रष्ट नोकरशाही मुळे.

मान्य. पण याचा, आणि सरकारी विधेयक चुकीचे/ अयोग्य असण्याचा संबंधच काय? हे आंदोलन उभे राहण्याअगोदर बरेच आधी याच भ्रष्ट राजकारण्यांनी आणि भ्रष्ट नोकरशहांनी हे विधेयक तयार केलेले होते, विदाउट एनी जनता प्रेशर, त्याचे काय? त्यांना बिचार्‍यांना काहीच क्रेडिट नको का?

जेव्हा अण्णा हजारे म्हणतात की ही स्वातंत्र्यानतरची दुसरी मोठी लढाई आहे ते खरेच आहे कारण ही लढाई स्वार्थी शासनकर्त्यांच्या(आजी/माजी) हिता विरूद्ध आहे आणि सर्वसामान्यांच्या हिता करीता आहे, गरीबांच्या, दुर्बलांच्या अधिकारा करीता आहे.

मान्य आहे. यातून गरीब दुर्बलांचे हित नेमके कसे साधले जाणार आहे, जे सरकारी विधेयकातून साधले गेले नसते, ते स्पष्ट करावे.

*हा प्रतिसाद विचार स्पष्ट व्हावेत याच मर्यादित उद्देशाने दिलेला आहे. अण्णांना विरोध नाही. सपोर्टच आहे. माझ्या सपोर्टचे कारण वेगळे आहे. या निमित्ताने राजकारणाबाबत उदासीन असलेला वर्ग राजकारणाचा अ‍ॅक्टिव्ह विचार करतोय, यासाठी मी अण्णांचा ऋणी आहे.

<<<<आता या वरीलपैकी काहीजण तरी सरळसरळ राजकारण्यांनीच निवडलेले असतात. ते तरी का चालावेत? थॉमस यांची (सदोष) निवड ही एक घटना आहे. तसे नेहमीच होते असा निष्कर्ष काढायचा असेल, तर वरील क्र. १,२,३,५,७,८,९ हे बाद होतात. त्यांच्याही निवडी सदोष होऊ शकतात.
>>>> थॉमस यांची (सदोष) निवड ही कदाचीत एक घटना आहे परंतू ही घटना घडायला एखादी नैसर्गिक प्रक्रिया जबाबदार नाही किंवा एखादी दैविशक्ती जबाबदार नाही तर हेतूपुरस्सर घडवून आणलेली ती घटना आहे आणि त्यामागे अर्थातच सत्तेतील नेते जबाबदार आहेत.

<<<<जन विधेयकात सुचवलेली निवड समिती अशी आहे -
१. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष
२.सर्वोच्च न्यायालयाचे दोन जज
३. उच्च न्यायालयाचे दोन जज
४. मूळ भारतीय सर्व नोबेल विजेते
५. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष
६. मूळ भारतीय दोन मॅगसेसे विजेते
७. सीएजी
८. सीइसी
९. भारत रत्न विजेते.
आता या वरीलपैकी काहीजण तरी सरळसरळ राजकारण्यांनीच निवडलेले असतात. ते तरी का चालावेत?थॉमस यांची (सदोष) निवड ही एक घटना आहे. तसे नेहमीच होते असा निष्कर्ष काढायचा असेल, तर वरील क्र. १,२,३,५,७,८,९ हे बाद होतात. त्यांच्याही निवडी सदोष होऊ शकतात.

>>>> वरील प्रस्तावित निवड समिती ही अर्थातच अण्णा हजारे आणि या चळवळीशी संबंधीत असलेल्यांनी तयार केलेल्या जन लोकपाल विधेयकाच्या मसुद्यातील आहे. त्यावर माझं काही उत्तर देण्यापुर्वी (या मुद्यावर उत्तर देताना प्रतिसाद जास्तच मोठा होत असल्या बद्दल क्षमा असावी) आपण हे सुद्धा बघुया की सरकारचा लोकपाल विधेयकाचा मसुदा काय बोलतोय निवड समिती बाबत, कशी आहे निवड समिती;
१) Vice President
२) PM
३) Leaders of both houses
४) Leaders of opposition in both houses
५) Law Minister
६) Home minister.
सरकारच्या मसुद्याप्रमाणे बघितल्यास हे लक्षात येतं की, निवड समितीतील सगळेच सदस्य हे राजकीय नेते आहेत आणि त्यातही विशेष म्हणजे यातील ६ पैकी ५ सदस्य हे सत्त्ताधार्‍यांचे म्हणजेच सरकारशी संबंधीत आहेत, सरकारचेच प्रतिनीधी आहेत. आता हे कळणे आणि समजणे कठिण नाही की जो कोणी व्यक्ती लोकपाल म्हणून निवडला जाणार तो अर्थातच सरकारच्याच मर्जितील असणार आणि सरकारच्या उपकारा खाली दबलेला असणार. असा व्यक्ती किती निर्भयपणे आणि कर्तव्यदक्षतेने प्रधानमंत्र्यांच्या किंवा एखाद्या सिनीयर मंत्र्या विरुद्ध आलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर कारवाई करणार?
अर्थातच ती शक्यता फार फार कमी असल्या मुळे अश्या निवड समितीची आवश्यकता पडणार की ज्या समितीला निवडल्या गेलेल्या लोकपालावर दबाव आणता येणार नाही आणि लोकपालाला कुठल्याही उपकाराच्या ओझ्याखाली काम करावं लागणार नाही.
आता बघूया, जनतेचा किंवा गैर राजकीय समितीच्या मसुद्यातील निवड समितीची प्रस्तावीत रचना जी माझ्या वाचण्यात आलेली आहे (India Against Corruption ही संस्था, जी कारणीभूत आहे जन लोकपाल विधेयकाचा मसूदा तयार करायला, त्या संस्थेची लिंक इथे देत आहे. या लिंक वर जन लोकपाल विधेयक आणि सरकारी लोकपाल विधेयक यांचा मसुदा वाचायला मिळेल, http://www.indiaagainstcorruption.org/ ) त्यात सीवीसी आणि भारत रत्न विजेते ह्या दोन सदस्यांचा समावेश नाही. सीइसीचा समावेश आहे.
'सीवीसीचा' समावेश असू नये कारण या मसुद्याप्रमाणे 'लोकपाल' ही संस्था सीवीसीला आपल्यात सामावून घेणार म्हणजेच सीवीसीचं वेगळं अस्तित्व राहणार नाही. तसेच सध्या "सीबीआइ" या संस्थेची भ्रष्टाचार विषयक तक्रारी संबंधित असलेली खाती ही सुद्धा लोकपाल यात सामावून घेतली जाणार.
दुसरं म्हणजे भारतात, भारत रत्न हे बहुदा आयष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असलेल्या व्यक्तीला देण्यात येतं किंवा काही वेळेस ती व्यक्ती मृत्यु पावल्यावर देण्यात येतं त्यामुळे भारत रत्न लाभलेला व्यक्ती या बाबतीत विशेष योगदान देउ शकणार नाही असं माझं व्यक्तीगत मत आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष - नक्कीच राजकीय नेते आहेत, माझ्या व्यक्तीगत मतानुसार त्यांना सदस्य म्हणून घेण्यात येउ नये परंतू माझ्या व्यक्तीगत मताकडे दुर्लक्ष केल्यास मी म्हणू शकेन की, बरंच आहे त्यांना घेतलं तर म्हणजे हा मसुदा लोकशाही बाह्य आहे किंवा राजकीय व्यवस्थे विरुद्ध आहे असा आरोप राजकीय पक्ष करू शकणार नाहीत :)
सर्वोच्च न्यायालयाचे दोन जज - सर्वसाधारण पद्धतीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या जजेस ची नेमणूक ही राष्ट्रपतिकडून करण्यात येते आणि या बाबत सर्वोच्च न्यायालयाकडून नावे घेण्यात येतात, सर्वोच्च न्यायालयातील ५ ज्येष्ठ न्यायाधिश या बाबतीत राष्ट्रपतींना सल्ला देतात तसेच ज्येष्ठतेला, अनुभवाला प्राधान्य देण्यात येतं. या बाबतीत सरकारचा हस्तक्षेप फार कमी असतो. या कारणांमुळे, सर्वोच्च न्यायालयाच्या जजेस चा समावेश या निवड समितीत योग्य आहे.
उच्च न्यायालयाचे दोन जज - मला व्यक्तीशः नाही वाटत की उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची आवशक्यता आहे विशेष म्हणजे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचा समावेश या निवड समितीत असल्यास. तरी सुद्धा त्यांचा समावेश करायचा झाल्यास करायला हरकत नाही. त्यांच्या नेमणूकी बाबत सुद्धा सरकारचा हस्तक्षेप कमीच चालतो.
मूळ भारतीय सर्व नोबेल विजेते - सर्व नोबेल विजेते याचा अर्थ नाही कळला. नेमकं काय अपेक्षीत आहे हे स्पष्ट होत नाही. हयात असलेले आणि नोबेल पुरस्कार मिळालेले सर्वच मुळ भारतियांना या निवड समितीत सामावून घेणार आहे का? कशा करता म्हणून? एक नोबेल विजेता पुरेसा नाही का? तसेच नोबेल विजेता हा सध्या दुसर्‍या देशातील नागरीक असल्यास आणि त्याला या निवड समितीत सहभागी व्हायचं नसल्यास काय? या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावरच काही बोलता येईल तो पर्यंत हा मुद्दा बाजूला ठेवावा लागेल :)
मूळ भारतीय दोन मॅगसेसे विजेते - एक विजेता पुरेसा असावा. असा विजेता मिळायला आणि त्या विजेत्यानी निवड समितीत सहभाग व्हायला समस्या नसावी. माझ्या माहिती प्रमाणे मॅगसेसे हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय आहे आणि ज्या भारतियांना मिळाला आहे ते व्यक्ती बहुधा सामाजिक कार्यात, लोकोपयोगी कार्यात सहभागी आहेत त्यामुळे त्यांना ही जबाबदारी स्विकारायला हरकत नसावी. हा पुरस्कार राजकीय पुरस्कार नाही, पद्मभुषण, पद्मविभुषण या धर्तीवरचा तर नक्कीच नाही. या पुरस्काराची पातळी नक्कीच या दोन पुरस्कारांपेक्षा मोठी आहे. ह्या पुरस्कारावर भारतिय राजनेत्यांचं / भारत सरकारचं नियंत्रण आहे किंवा त्यांना हा पुरस्कार हव्या त्या व्यक्तींना देणे शक्य आहे असे वाटत नाही. कोणा कडे या विरूद्ध माहिती असल्यास जाणून घ्यायला आवडेल
सीएजी - या संस्थेबद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. ही संस्था स्वतंत्र आहे, सरकारच्या अधिकारात किंवा नियंत्रणात काम करत नाही. त्या मुळे वेळोवेळी या संस्थेने सरकारातील मंत्र्याचे, त्यांच्या खात्यांचे, नोकरशहांचे घोटाळे, अवाढव्य खर्च उघडकीस आणले आहेत.
सीइसी - या संस्थेबद्दल जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. ही संस्था स्वतंत्र आहे, सरकारच्या अधिकारात किंवा (प्रत्यक्ष) नियंत्रणात काम करत नाही.

वरील विश्लेषण करण्याचं कारण हे की या जन लोकपाल निवड समितीत समाजातील जवळपास सर्व कार्य क्षेत्रातील (जिथे जनतेशी/सर्वसामान्यांशी/दुर्बलांशी संबंधीत कामे केली जातात म्हणजेच देशाशी संबंधीत, समाजाशी संबंधीत कामे केली जातात. आवश्यक असल्यास पुढील प्रतिसादात या वर सविस्तर लिहीता येईल) प्रतिनीधींना घेण्यात आलं आहे. हा एक मोठा फरक आहे सरकारी मसुद्यात आणि जनतेच्या मसुद्यात.
राहीला प्रश्न जन लोकपाल विधेयकाच्या निवड समितीत असलेल्या सदस्यांची निवडच सदोष असण्या बद्दल तर ती शक्यता गृहीत धरल्या मुळेच निवड समितीच्या सदस्यांची यादी ही एवढी लांबली आहे. या पैकी काही सदस्य सरकारच्या सदोष निवडी मुळे आले असतीलही परंतू एकाच वेळेस सर्व सदस्य सदोष असण्याची शक्यता फार कमी आहे तसेच लोकशाहीला स्विकारून चालायचं असेल तर राजकीय नेत्यांना पुर्णपणे वगळून चालणे योग्य होणार नाही, फक्त त्यांचा प्रत्यक्ष सहभाग कमी करता येईल तो सुद्धा फक्त एवढया करीता की हे विधेयक आणण्याचा उद्देशच मुळी आहे तो सत्ताधार्‍यांच्या भ्रष्ट्राचारावर नियंत्रण आणण्याकरीता, त्यांना कठोर शिक्षा करायला, कमी वेळेत करायला तसेच सध्या ज्या प्रमाणे सीबीआय ला लवकर परवानगी मिळत नाही उच्च सनदी अधिकार्‍यांच्या किंवा मंत्र्यांच्या विरुद्ध चौकशी सुरू करायला, खटला चालू करायला हे प्रकार कमी होतील कारण लोकपाल ला सरकारकडे परवानगीची भिक मागावी लागणार नाही, मंत्र्यांच्या दडपणाखाली काम करावं लागणार नाही.

<<<< ...ती नकारात्माक आहे हे कश्या प्रकारे?
4. The Chairperson and members of Lokpal not to have held certain offices- The Chairperson and members of Lokpal shall not be serving or former member of either the Parliament or the Legislature of any State and shall not hold any office or trust of profit (other than the office as Chairperson or member) or would have ever been connected with any political party or carry on any business or practice any profession and accordingly, before he enters upon his office, a person appointed as the Chairperson or member of Lokpal shall-
(i) if he holds any office of trust or profit, resign from such office; or
(ii) if he is carrying on any business, sever his connection with the conduct and
management of such business; or
(iii) if he is practicing any profession, suspend practice of such profession.
(iv) If he is associated directly or indirectly with any other activity, which is likely cause
conflict of interest in the performance of his duties in Lokpal, he should suspend his
association with that activity.
Provided that if even after the suspension, the earlier association of that person with
such activity is likely to adversely affect his performance at Lokpal, that person shall
not be appointed as a member or Chairperson of Lokpal.

2. Following persons shall not be eligible to become Chairman or Member in Lokpal:
(a) Any person who was ever chargesheeted for any offence under IPC or PC Act or was ever
penalized under CCS Conduct Rules.
(b) Any person who is less than 40 years in age.
3. At least four members of Lokpal shall have legal background.

4. The members and Chairperson should have unimpeachable integrity and should have
demonstrated their resolve and efforts to fight against corruption in the past.

वरील क्र. ४ फक्त पॉझिटिव्ह आहे. पण त्याचा नेमका अर्थ कसा लावावा? चारित्र्याचे आणि लढ्यात सहभागी असल्याचे सर्टिफिकीट कोण देणार? हा मुद्दा क्र. ४ म्हणजे शब्दांचा अपव्यय आहे.
>>>> वरील सर्व तरतूदी ह्या पात्रता ठरवण्या करीता आहेत. लोकपाल या पदा करीता कोणता उमेदवार पात्र असावा आणि कोणता असू नये हेच फक्त वरील तरतूदींवरून कळतं. यातील कोणतीही तरतूद मला व्यक्तीश: तरी नकारात्मक वाटत नाही. एवढच म्हणता येईल की, ह्या तरतूदी प्रत्यक्ष अंमलात आणणे थोडं फार कठीण जाणार परतूं अशक्य नक्कीच नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची निवड करताना यातील काही तरतूदी नक्कीच पाळल्या जातात. तसेच "सीवीसी" सारख्या पदावर निवड करताना सुद्धा integrity आणि honesty ही मुलभूत पात्रता आहे, असावी आणि हे लागू होतंय ते सर्व प्रकारच्या न्यायालयातील न्यायाधिशांच्या नेमणूका करताना विशेष करून सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांना.

<<<<<वरील क्र. ४ फक्त पॉझिटिव्ह आहे. पण त्याचा नेमका अर्थ कसा लावावा? चारित्र्याचे आणि लढ्यात सहभागी असल्याचे सर्टिफिकीट कोण देणार? हा मुद्दा क्र. ४ म्हणजे शब्दांचा अपव्यय आहे.
>>>>> निवड समितीचं काम राहणार आहे हे बघणे, आवश्यक ती माहिती गोळा करणे तसेच संभावित उमेदवारांची नावे ठरल्यावर ती नावे प्रसिद्ध केली जाणार आणि सामान्य जनतेकडून त्या वर अभिप्राय किंवा जास्तीची माहिती किंवा तक्रार असल्यास ती सुद्धा मिळवली जाणार. या नंतरच मुख्य लोकपाल आणि ईतर सदस्य नक्की केले जाणार.
(या व्यतिरीक्त सुद्धा ईतर उपाय आहेत, एखाद्याच्या योग्यतेबद्दल, चारित्र्याबद्दल माहिती मिळवायला आणि ते उपाय या पुर्वी वापरले गेले आहेत सर्वोच्च न्यायालातील न्यायाधिशांची पदे भरायला. या बाबतीत कायदेतज्ञ "फली नरीमन" यांची एक मुलाखत "इंडियन एक्स्प्रेस" या वर्तमान पत्रात येउन गेली आहे. त्याची लिंक इथे देत आहे [ http://www.indianexpress.com/news/i-am-very-angry-with-sc-saying-if-govt... ]

<<<<कसे काय ते स्पष्ट करावे. आणि सरकारच्या हिताचे असूनही ते अजूनपर्यंत पारित का झाले नाही तेही स्पष्ट करावे.
>>>>>सरकारी लोकपाल विधेयक हे सरकारच्या (राजकीय नेते/नोकरशहा) यांच्या हिताचं आहे हे जन लोकपाल विधेयकाच्या तुलनेत म्हटलेलं आहे. विस्तार पुर्वक सांगायचं झाल्यास, असे म्हणता येईल की, सरकार किंवा संसद शक्य होईल तो पर्यंत कुठल्याही प्रकारचं लोकपाल विधेयक पारित करणार नाही. कारण त्यांना कोणाचेही नियंत्रण त्यांच्या वर नकोय, त्यांच्या गैर कारभारावर लक्ष ठेवणारी कुठलीही संस्था त्यांना नकोय परंतू जर नाइलाज झालाच आणि लोकपाल विधेयक पारीत करणे आवश्यक झालंच तर मात्र सरकार स्वतःचं लोकपाल विधेयक पारित करणार कारण त्या विधेयकात लोकपालला काहीच विशेष अधिकार देण्यात आलेले नाहित. "सीवीसी" प्रमाणे लोकपाल या संस्थेला सुद्धा फक्त advisory बनवण्यात आलंय म्हणजे पिंजर्‍यात ठेवलेला सिंह किंवा दात काढून घेतलेला कोब्रा.

<<<<हे (सरकारी) बिल अयोग्य कसे आहे ते स्पष्ट करावे म्हणजे हा आमचा "सदोष" युक्तिवाद आपोआपच मोडीत निघतो. निवडून आलेले (सर्व) लोक अपवित्र आणि अण्णा हजारेंसोबत बसलेले (सर्व) लोक पवित्र असा युक्तिवाद तुमच्या म्हणण्यातून ध्वनित होतो आहे असे आपल्याला वाटत नाही काय?
>>>> हे (सरकारी) बिल अयोग्य कसे आहे ते वर स्पष्ट केलं आहेच. या व्यतिरीक्त India Against Corruption या संस्थेची लिंक दिलेली आहेच, तिथे सरकारी बिलाच्या अयोग्यते बद्दल लिहीण्यात आलेलं आहे. व्यक्तिशः मला असे वाटत नाही की निवडून आलेले सर्वच प्रतिनीधी वाईट किंवा भ्रष्टाचारी आहेत परंतू वाईट / भ्रष्टाचारी असणार्‍यांच प्रमाण जास्तच आहे हे मात्र नक्कीच म्हणणे आहे.
आणि मुळात या विधेयकाचा उद्देशच सरकारी उच्च पदस्थांपासून ते प्रधानमंत्री यांच्या विरूद्ध चौकशी करणे, खटला दाखल करणे हा आहे अश्या परिस्थीत खुद्द सरकारनेच नैतीकता दाखवून स्वतःचा सहभाग कमीत कमी ठेवायला हवा.

<<<<<मान्य. पण याचा, आणि सरकारी विधेयक चुकीचे/ अयोग्य असण्याचा संबंधच काय? हे आंदोलन उभे राहण्याअगोदर बरेच आधी याच भ्रष्ट राजकारण्यांनी आणि भ्रष्ट नोकरशहांनी हे विधेयक तयार केलेले होते, विदाउट एनी जनता प्रेशर, त्याचे काय? त्यांना बिचार्‍यांना काहीच क्रेडिट नको का?
>>>> याच भ्रष्ट राजकारण्यांनी आणि भ्रष्ट नोकरशहांनी कुठल्या प्रकारचं विधेयक तयार केलंय ते वर विस्तार पुर्वक लिहीण्यात आलं आहे त्यामुळे परत लिहीत नाही. खरं तर "सीवीसी" असताना सरकारला अश्या प्रकारची advisory, monitoring आणि recommendation देणारी दुसरी संस्था निर्माण करण्याचं काही कारणंच नव्हतं. सरकारनेच हे स्पष्ट करायलं हवं की त्यांनी हे विधेयक का तयार केलंय.

<<<<मान्य आहे. यातून गरीब दुर्बलांचे हित नेमके कसे साधले जाणार आहे, जे सरकारी विधेयकातून साधले गेले नसते, ते स्पष्ट करावे.
>>>> हे स्पष्ट करायला आवडेल :) परंतू ह्या प्रतिसादाची लांबी आधीच खुप मोठी झाली आहे त्या मुळे पुढिल प्रतिसादात हे स्पष्ट करेन :)

[ हा आणि पुर्विचा प्रतिसाद लिहीण्याचं कारण फक्त हेच की माझा अण्णांना, त्यांच्या चळवळीला, उपोषणाला, त्यांच्या ईतर सहकार्‍यांना आणि त्यांच्या ह्या भ्रष्टाचार आटोक्यात आणणार्‍या मोहीमेला पुर्ण पाठिंबा आहे.
ह्या विधेयका मुळे भ्रष्टाचार संपुर्णपणे संपणार ही वेडी आशा मला नाही. परंतू शक्य होईल तेव्हढं कमी करता येइल विशेष करून उच्च स्तरावरील तरी खुप काही मिळवलं. काहीच न करता नकारात्माक विचार ठेवणे, भ्रष्टाचार संपणार नाही असं म्हणत काहीच न करणे किंवा कोणताही प्रयत्न न करणे हे मला मान्य नाही.
मी अजून तरी स्वतःला कोंडून नाही घेतलंय, कोणतीही नवी सुधारणा, कोणताही नवा उपाय करून बघण्याची माझी तयारी आहे. हा उपाय जर अयशस्वी ठरला तर दुसरा उपाय करण्याची तयारी आहे किंवा कोणी व्यक्ती एखादा दुसरा नवा उपाय घेउन आल्यास त्याला सुद्धा माझं समर्थन राहणार आहे.
लोकपाल विधेयक हा शेवट नाही, फक्त आणखी एक पाउल आहे लोकशाही बळकट करण्या करीता, देशाला हुकुमशाही कडून लांब ठेवायला.

भारतिय लोकशाही हा कोणा एका व्यक्तीने स्थापन केलेला धर्म नाही आणि भारतिय संविधान/घटना हा एखादा धर्मग्रंथ नाही की ज्यात सुधारणा अपेक्षित नाहित. काळा प्रमाणे, परिस्थीती प्रमाणे, गरजे प्रमाणे यात सुधारणा व्हायल्याच हव्यात, आवश्यक ते बदल व्हायलाच हवेत, चांगलं साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयोग होत रहायलाच हवेत तरच ही लोकशाही टिकणार आणि हा देश टिकणार. ]

अप्पा जोगळेकर's picture

12 Apr 2011 - 8:03 pm | अप्पा जोगळेकर

काहीच न करता नकारात्माक विचार ठेवणे, भ्रष्टाचार संपणार नाही असं म्हणत काहीच न करणे किंवा कोणताही प्रयत्न न करणे हे मला मान्य नाही.
मी अजून तरी स्वतःला कोंडून नाही घेतलंय, कोणतीही नवी सुधारणा, कोणताही नवा उपाय करून बघण्याची माझी तयारी आहे. हा उपाय जर अयशस्वी ठरला तर दुसरा उपाय करण्याची तयारी आहे किंवा कोणी व्यक्ती एखादा दुसरा नवा उपाय घेउन आल्यास त्याला सुद्धा माझं समर्थन राहणार आहे.
लोकपाल विधेयक हा शेवट नाही, फक्त आणखी एक पाउल आहे लोकशाही बळकट करण्या करीता, देशाला हुकुमशाही कडून लांब ठेवायला.

अत्यंत सकारात्मक अशी ही भूमिका आहे.
'खुसपटे न काढणे आणि तरीही चिकित्सक भूमिका' याचा नेमका अर्थ या प्रतिसादामध्ये आहे.
तुमच्या प्रत्येक वाक्यावाक्याशी सहमत आहे.
हा प्रतिसाद वाचून मला शेन वॅटसनच्या १५ सिक्सर्स आठवत आहेत.

वपाडाव's picture

7 Apr 2011 - 10:13 am | वपाडाव

बरीच माहिती वाचायला मिळत आहे..
थोडेफार कळाले आहे.
त्यातुन अण्णांना पाठिंबा देणे योग्य आहे असे वाटते..
सरकार लवकरात लवकर काही पावले उचलतंय अशी शंका येते.

अवांतर :
काल हेडलाईन्स टुडेच्या बैठकीतुन अभिशेक मनु सिंघवी काही प्रश्नांची उत्तरे न देता निघुन्न गेले..
जाणकारांनी त्यांनी असे का केले यावर प्रकाश टाकल्यास बरे होइल.

राहुल कण्वालचा स्वामे अग्निवेश, केजरीवाल अन मनु सिंघवी यांना एकत्र आणुन करवलेला शो.

छोटा डॉन's picture

7 Apr 2011 - 12:09 pm | छोटा डॉन

धागा आणि त्यावरचे प्रतिसाद छान आहेत.
मनापासुन वाचतो आहे आणि ह्यासंदर्भात इतरही माहिती गोळा करतो आहे.

आण्णांचा हेतु अत्यंत साफ असला तरी ह्या आंदोलनाच्या एकंदरीतच फलिताबाबत मी जरा साशंकच आहे.
अर्थात आण्णांच्या मागे 'माहितीचा अधिकार' ह्या लढ्याचा व्यापक अनुभव आहे आणि ह्यावेळी मध्यमवर्ग व खासकरुन तरुण ह्या आंदोलनात उतरले आहेत ही जमेची बाजु.

पण आता एकामागे एक घडणार्‍या काही घटना ह्या आंदोलनाला वेगळी दिशा देत आहेत.
आण्णांनी अगदी अनावश्यक पद्धतीने 'पवारां'वर हल्लाबोल करुन उगाच ह्या लढ्याला वेगळे वळण दिले आहे, पवारांनी राजिनामा द्यायचा का नाही हे आण्णांनी ठरवु नये, निदान ह्या मंचाचा वापर जुने 'स्कोर सेटल' करण्यासाठी होऊ नये अशी प्रामाणिक भावना आहे.
जर तुम्ही 'लोकपाल विधेयका'साठी इतके रान पेटवत आहात तर प्लीज ह्यात अजुन फाटे फोडु नका ...

बाकी अजुन एक गोष्ट जरुर नमुद करावीशी वाटते व ती म्हणजे 'मंत्र्यांना पायावर लोटांगण घालणे' ही घटना किंवा पद्धत आण्णांना अत्यंत प्रिय आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास इथे अशा 'लोटांगण फेम' मंत्र्यांची एक खास फौज तयार आहे व त्यांनी आत्तापर्यंतचे आण्णांचे प्रत्येक आंदोलन एकदम उत्तम हाताळले आहे.
दिल्लीचा मंच मोठ्ठा आहे, अनेक प्यादी मैदानात उतरलीत व शह्-काटशहांना उत येईल, अशावेळी आण्णांनी ह्या मोहाला बळी पडु नये अशी प्रामाणिक इच्छा. ह्या आंदोलनाचा स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा करुन घेण्याचा चान्स भाजपापासुन ते अगदी डावे पक्षही घेतील, युपीए असे काही घडल्यास निश्चितच काटशह द्यायला येणार तेव्हा आण्णांनी ही बाब शक्य तितकी टाळल्यास उत्तम ....
राजकारणी ह्या मंचापासुन जितके दुर राहतील तितके उत्तम !

जनतेचा सहभाग आहे, निश्चितच आनंदाची गोष्ट आहे, मात्र संयम हवाच, कोणत्याच नादान आणि अतिउत्साही कॄतीमुळे आंदोलनाला वेगळे वळण लागणार नाही ह्याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे.
हे इजिप्त नाही आणि लिबियाही नाही ...

- छोटा डॉन

आनंदयात्री's picture

7 Apr 2011 - 8:25 pm | आनंदयात्री

>>अतिउत्साही कॄतीमुळे आंदोलनाला वेगळे वळण लागणार नाही ह्याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे.
हे इजिप्त नाही आणि लिबियाही नाही ...

सहमत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Apr 2011 - 1:19 am | निनाद मुक्काम प...

सावधान ,सावधान वणवा पेट घेत आहे .

नितिन थत्ते's picture

8 Apr 2011 - 9:57 am | नितिन थत्ते

श्रावण मोडक, पुणेरी, प्रसन्न केसकर यांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2011 - 10:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सर्व मागण्या जवळ जवळ मान्य झाल्या आहेत अशा बातम्या आहेत. आता जनलोकपाल विधयकापुढील मुख्य अडचणी काय आहेत ?

-दिलीप बिरुटे

>> आता जनलोकपाल विधयकापुढील मुख्य अडचणी काय आहेत ?
स्वतः सत्ताधारी व इतर राजकारणी ह्यांची उदासिनता :)

अप्पा जोगळेकर's picture

10 Apr 2011 - 4:26 pm | अप्पा जोगळेकर

आता जनलोकपाल विधयकापुढील मुख्य अडचणी काय आहेत ?
श्री. नितिन थत्ते आणि श्री. आळश्यांचा राजा यांचा या विधेयकाला पाठिंबा नाही ही एक प्रमुख अडचण आहे. :)

सरकारने जवळजवळ सर्व मागण्या मान्य करून दहा जणांची समिती या 'जनलोकपाल' विधेयकाच्या निर्मितीसाठी स्थापन करण्याचं मान्य केलं आहे. अण्णा उद्या दहा वाजता उपोषण सोडतील असं त्यांनी सांगितलं.

या समितीत अण्णांशिवाय पाच मंत्री असतील, बहुतेक प्रणब मुखर्जी अध्यक्ष असतील, इतर संभाव्य मंत्री आहेत वीरप्पा मोईली, कपिल सिबल, पी. चिदंबरम, आणि सलमान खुर्शीद. 'नागरिकां'कडून सह-अध्यक्ष असतील शांतीभूषण, इतर नांवं या वृत्तात नाहीत.

उपोषणाचा मार्ग योग्य की अयोग्य, हा कायदा (जेंव्हा अस्तित्वात येईल तेंव्हा) खरोखरच आवश्यक किंवा पुरेसा असेल की नाही, या सगळ्याची चर्चा विचारवंत यथावकाश करतीलच, पण मला वाटतं भारतीय लोकशाहीत बदलाला सुरूवात तरी झाली आहे, आणि अतिशय संयत पद्धतीने, कोणत्याही राजकीय पक्षाच्या भरीव पाठींब्याशिवाय, झुंडशाही न करता लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडलं जाऊ शकतं हा निश्चितच उल्लेखनीय आणि अभिमानास्पद विजय आहे.

विकास's picture

9 Apr 2011 - 12:30 am | विकास

अतिशय संयत पद्धतीने, कोणत्याही राजकीय पक्षाच्या भरीव पाठींब्याशिवाय, झुंडशाही न करता लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी सरकारला भाग पाडलं जाऊ शकतं हा निश्चितच उल्लेखनीय आणि अभिमानास्पद विजय आहे.

सहमत!

आत्ताच अधिक वाचले त्याप्रमाणे किरण बेदी आणि स्वामी अग्नीवेश यांनी सांगितले आहे की जो पर्यंत सरकार, औपचारीकरीत्या आदेश देत नाही तो पर्यंत निषेधासाठी साखळी उपोषण चालूच राहील. थोडक्यात सरकारवरील दबाव पूर्णपणे दूर केला गेला नाही.

लोकपाल बिलाचा मसुदा हा ३० जूनला पूर्ण केला जाईल आणि पावसाळी आधिवेशनात संसदेत मांडला जाईल... अर्थात दिल्ली अजून खूप दूर आहे...

नितिन थत्ते's picture

9 Apr 2011 - 12:55 pm | नितिन थत्ते

झालेल्या सहमतीमध्ये विधेयकाचा मसुदा बनवण्यासाठी समिती नेमली गेली हे बरे झाले.

जालावर फिरणारा मसुदाच अंतिम कायदा म्हणून मान्य करण्याचा आग्रह धरला गेला नाही याचे बरे वाटले.

ऋषिकेश's picture

11 Apr 2011 - 8:59 am | ऋषिकेश

+१

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Apr 2011 - 5:52 pm | निनाद मुक्काम प...

आण्णा हजारे ह्यांच्या कार्याची ओळख त्यांच्याच शब्दात

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Apr 2011 - 5:58 pm | निनाद मुक्काम प...

आण्णा हजारे ह्यांच्या कार्याची ओळख त्यांच्याच शब्दात

आत्ता कुठे लढाईची सुरुवात झाली आहे... लोकांनी परत झोप न काढता माजलेल्या राजकारण्यांना वठणीवर आणलेच पाहिजे...

जाता जाता :--- शरद पवार यांना सामाजिक न्याय पुरस्कार
http://www.esakal.com/esakal/20110409/4769934833543163321.htm

विकास's picture

9 Apr 2011 - 6:10 pm | विकास

आत्ता कुठे लढाईची सुरु झाली आहे..

सहमत

लोकांनी परत झोप न काढता माजलेल्या राजकारण्यांना वठणीवर आणलेच पाहिजे...

आय होप! उद्या अण्णांची बातमी पहील्यापानावरून निघून जाणार आणि मग आयपिएल चालू होणार. :(

विकासराव अगदी माझ्या मनातलं बोललात आपण... क्रिकेटवेडी जनता उन्मादात नाचत आहे जणु काही हिंदुस्थान अण्णांच्या आंदोलनाने एका महिन्यातच भ्रष्टाचार मुक्त होणार आहे !
आज लोकसत्तेत आलेला श्री गिरीश कुबेर यांचा लेख खरचं वाचनिय आहे.
http://alturl.com/de687
वाचकांनी जरुर हा लेख वाचावा.

स्मिता.'s picture

9 Apr 2011 - 9:06 pm | स्मिता.

लोकसत्तेत आलेला श्री गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. त्यातले सर्वच मुद्दे विचार करण्या सारखे आहेत.
बाकी आपल्याकडच्या क्रिकेटवेडाबद्दल काय बोलणार?

लोकपालाने एकाद्याला दोषी ठरवून शिक्षा दिली तर तो अपीलात जाऊ शकत असणारच. मग सत्र, उच्च आणि अत्युच्च न्यायालयात अपील केले की १५-२० वर्षे निवांतपणा मिळतोच. त्यामुळे या लोकपालाची नखे आणि दात कांहीं कामाचे आहेत काय? लोकपालांचा निर्णय अंतिम असणार आहे काय? कारण अपील करायची अनुज्ञा असेल तर कांहींच उपयोग नाही. फक्त या मंडळींचे पगार, भत्ते वगैरे जनतेच्या बोकांडी!
याबाबत जरा सविस्तर कुणी तरी लिहावे!
शिवाय राजकारण्यांपेक्षा उद्योगपतींनी जास्त पैसा "केलेला" आहे त्यांचे काय? त्यांचीही चौकशी अशीच लोकपाल करणार काय?

सुनील's picture

10 Apr 2011 - 4:04 am | सुनील

लोकपालांचा निर्णय अंतिम असणार आहे काय? कारण अपील करायची अनुज्ञा असेल तर कांहींच उपयोग नाही.

लोकपालाचा निर्णय अंतिम असेल आणि त्यावर अपिलाची सोय नसेल तर, ती एक नव्या हुकुमशाहीची नांदी ठरेल.

लोकपालाच्या प्रत्येक निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची सोय असलीच पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयदेखिल घटनेच्या चौकटीत आणि प्रचलित कायद्याला अनुसरून (जे पारीत करण्याचा अधिकार लोकनियुक्त प्रतिनिधींनाच आहे) निवाडा करतील, तरच ते लोकशाहीला अनुरूप ठरेल.

नितिन थत्ते's picture

9 Apr 2011 - 11:16 pm | नितिन थत्ते

>>लोकपालाने एकाद्याला दोषी ठरवून शिक्षा दिली तर तो अपीलात जाऊ शकत असणारच.

लोकपालाने दोषी ठरवलेला मनुष्य अपीलात जाऊ शकत नसेल तर असा लोकपाल आम्हाला नको.

>>शिवाय राजकारण्यांपेक्षा उद्योगपतींनी जास्त पैसा "केलेला" आहे त्यांचे काय? त्यांचीही चौकशी अशीच लोकपाल करणार काय?

श्श्श्श्श..... काहीही काय बोलताय? उद्योगपती देशाचा विकास करत आहेत. आणि तुम्ही नतद्रष्टपणे त्यांनी कमावलेला पैसा काढताय? ;)

अप्पा जोगळेकर's picture

10 Apr 2011 - 4:36 pm | अप्पा जोगळेकर

लोकपालाने दोषी ठरवलेला मनुष्य अपीलात जाऊ शकत नसेल तर असा लोकपाल आम्हाला नको.
जौंद्या हो. तुम्ही-आम्ही नोकरशहा नाही आणि लोकप्रतिनिधीसुद्धा नाही. कशाला टेन्शन घेताय. :)

मसुदा बनवणारी समिती या कायद्यासाठी विशेष कोर्ट किंवा तत्सम शिफारशी मसुद्यात करेल अशी भाबडी आशा बाळगून आहे.

बैबैकेवढीहीचर्च्यावाचूनदमलाग्लाबै

तुम्च्याक्वीतावाचून्म्हालाहीधापालाग्तात्ब्र्का!

विकास's picture

10 Apr 2011 - 8:25 pm | विकास

बैबैकेवढीहीचर्च्यावाचूनदमलाग्लाबै

बैबैकेवढाहाभ्रष्टाचार्देशाचेकाय्होणार्म्हणून्लोकपाल्नेमा

अशा भाषेत (वाक्प्रयोगात) जर अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पंतप्रधानांकडे एकोळीची याचीका केली असती तर त्यांनी उपोषण करण्याआधीच त्यांच्या सर्व मागण्या, बाकी न लिहीताच मान्य झाल्या असत्या! ;)

नितिन थत्ते's picture

16 Apr 2011 - 8:19 am | नितिन थत्ते

उच्चपदस्थ न्यायव्यवस्थेतले लोक लोकपाल कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवावे असे मत अण्णांनी व्यक्त केले आहे.

लोकांच्या प्रतिनिधींवर लोकपालाचा चाप हवा पण लोकांचे प्रतिनिधी नसलेल्यांवर कसलाच चाप नको असे चित्र दिसते आहे.

(स्वयंघोषित) शाहाण्यांच्या (उदार भासणार्‍या) हूकूमशाहीकडे वाटचाल कन्फर्म होत आहे.

(अवांतर: मूळ घटना बनवणारे सगळे वकील होते त्यामुळे त्यांनी घटनेत न्यायव्यवस्थेला कोणाशीच अकाउंटेबल ठेवले नाही असे मत एकदा वाचले होते. या लोकपाल बिलात सुद्धा असेच काहीतरी होणार असे दिसते).