आमंत्रण - सरुटॉबाने १७ एप्रिल २०११

५० फक्त's picture
५० फक्त in काथ्याकूट
5 Apr 2011 - 10:54 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरहो,

१४ फेब्रुवारीचा भोजन कट्टा झाला तेंव्हा आम्ही सांदण दरीचं स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण झालं तेंव्हाच एक स्वप्न पाहिलं होतं, एका नव्या कट्ट्याचं, ब-याच जणांच्या खवमध्ये हा शब्द गेल्या काही दिवसात वाचला असेल.

आमचे इगुरु श्री. गणपा यांच्या धाग्यानं चिकन भुजिंगच्या धाग्यानं आणि त्यातल्या फुललेल्या निखा-यंनी आमच्या स्वप्नात अजुन निखारे फुलवले.

म्हणुन आम्ही ह्या दुस-या खादाडी कट्ट्याचं आयोजन केलंय आणि आमंत्रण देतो आहे. सर्व येउ इच्छिणा-यांचं हार्दिक स्वागत आहे.

सरुटॉबाने - म्हणजे सयाजी रुफ टॉप बार्बेक्यु नेशन. पुणे -मुंबई रस्त्यावर वाकडच्या थोडं पुढे डाव्या बाजुला सर्विस रोडवर असलेलं हॉटेल सयाजि, आणि त्याच्या रुफ टॉप वर म्हणजे गच्चीवर असलेले बार्बेक्यु नेशन हे रेस्टॉरंट.

नेहमीच्या रेस्टॉरंट पेक्षा जरा वेगळे असलेले हे रेस्टॉरंट, मुद्दामच निवडलेलं आहे. नेहमीच्या ठिकाणि जाउन नेहमीचंच पिणं आणि खाणं टाळायचं म्हणुन. हे रेस्टॉरंट खास आहे, त्याच्या ऑन टेबल लाइव्ह ग्रिल साठी. इथं मेन्यु व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीही प्रकारात ५ ग्रिल बेस स्टार्टर, २-३ प्रकारचे सुप , २-३ सॅलड, मेन कोर्स आणि डेझर्ट असा असेल.

तुम्हाला जास्त माहिती धाग्याच्या शेवटी दिलेल्या दुव्यावरुन पाहता येईल.

दिवस - १७ एप्रिल २०११
वेळ - संध्याकाळी ७.३० ते ११.००
प्रकार - व्हेज आणि नॉनव्हेज
खर्च - व्हेज साठी रु. ५७२/- प्रति व्यक्ति आणि नॉन व्हेज साठी रु. ६२४/-

कोणि सदस्य इथं दारु पिउ इच्छित असतील तर आमची ना नाही, फक्त तो खर्च ज्याने त्याने करायचा असुन, दारु पिउन गोंधळ करु नये हि विनंती. आणि दारुच्या रेटबद्दल माझ्याकडे विचारणा करु नये. मी या बाबतीत पुर्ण ढ आहे.

तसेच, रविवार असल्याने बुकिंग करणे गरजेचे आहे, म्हणुन जे येणार असतील त्यांनी १४ तारखेपर्यंत मला किंवा वल्लीला व्यनि करुन कळवावे. इथे धाग्यावर कळवले तरी चालेल परंतु न आल्यास बुकिंगचा किमान खर्च उपस्थित सदस्यांना शेअर करावा लागेल हे लक्षात ठेवावे.

हा धागा १४ तारखेला लॉक करुन १५ ला संध्याकाळ पर्यंत येणा-या सर्व सदस्यांना डिटेल्स कळवले जातील. कोणी सदस्य सहकुटुंब येणार असेल तर आपल्या जोडिदारास मिपाचे काही शब्द / व्याख्या याची थोडी कल्पना द्यावी म्हणजे त्यांना अचानक विमानातुन पडुन मिपाग्रहावर आल्यासारखे वाटणार नाही.

http://www.barbeque-nation.com/
http://sayajihotels.com/punehotel/index.php

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Apr 2011 - 10:59 pm | प्रचेतस

आतापासूनच तोंडाला पाणी सुटायला लागले आहे.
यायची अट फक्त एकच. दिवसभर काही न खातापिता तिथे यायचे आणि तिथं गेल्यावर मात्र आडवा हात मारूनच उठायचं.

वपाडाव's picture

6 Apr 2011 - 9:51 am | वपाडाव

वल्लीसेठ...
खर्चाचा हिशेब पाहता मी नॉन व्हेज खाण्यास सुरुवात करावी अशी इच्छा होते आहे...
आणी १ नव्हे मी तर ३ दिवसांचा उपवास ठेवुन मग तो सोडण्यास येण्याच्या विचारात आहे...
-(आडवा/उभा/तिरपा हात मारणारा, तरीही न उठणारा)

टारझन's picture

7 Apr 2011 - 11:06 am | टारझन

मी आजपासुन .. उप्स कोकणातुन परत आल्यापासुन जेवण सोडले असे समजा. छत्रपती साहेब, आमची उपस्थिती ९९.९९९९% आहे असे सुचवु इच्छितो.

- फक्त१टण
चिक्कण मट्टण मासे ..
अवघे जिवन माझे

गवि's picture

5 Apr 2011 - 11:05 pm | गवि

mumbaikarana Wakad phaatyavar marlet...

Mhanaje amache cancel paadalet raav. Sunday eve to late night..Monday hapees.

Aso.

:-(

Wenjoy..

सूड's picture

6 Apr 2011 - 1:10 pm | सूड

+१

मुंबईकरांना "शीळ फाट्यावर" मारण्यात आल्याने धाग्याचा तीव्र निषेध ;)

"ब्लू कोरल" झिंदाबाद

प्रचेतस's picture

6 Apr 2011 - 1:44 pm | प्रचेतस

कुणालाही कुठल्याही फाट्यावर मारण्यात आलेले नाही. खुले आमंत्रण आहे हे. वाकड हे मुंबई पुणे महामार्गावरच असून डोंबिवलीवरून फक्त २ तासांच्या अंतरावरच आहे. त्यामुळे येण्यात अडचण नसावी ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Apr 2011 - 3:15 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मध्य मुंबईवरून तब्बल ३:३० तास लागतात हो (शिवनेरीने). वरून रु ६०० प्रवासखर्च (परत शिवनेरीने).

निखिल देशपांडे's picture

6 Apr 2011 - 7:17 pm | निखिल देशपांडे

स्पा..
मुंबई कट्ट्याची करा रे तयारी..
कोण कोण पब्लिक आहे रे???

धमाल मुलगा's picture

6 Apr 2011 - 8:53 pm | धमाल मुलगा

हे कोण बोलतंय?
मी स्वप्नात तर नाही ना? ;)

निखिल देशपांडे's picture

6 Apr 2011 - 9:15 pm | निखिल देशपांडे

येस मि. धमाल
एनी प्रॉब्लेम???

१५ मे नंरत ची तारीख धरा रे. :)

स्पा's picture

6 Apr 2011 - 9:27 pm | स्पा

कोण कोण पब्लिक आहे रे???

पुब्लिक माझ्या माहितीत मी, इणत्या, गवि, मेहेंदळे लीमौ बहुधा बिका सुधांशू घाशीराम कोतवाल सध्या इतकेच आठवतायेत
आर हो गणेशा आणि पैजार बुवा सुद्धा

१६ एप्रिल (शनिवार) ठाणे ...?

स्पावड्या.. दे रे अनुमोदन...

चिंतामणी's picture

6 Apr 2011 - 10:21 pm | चिंतामणी

यांना विसरालात का?

:-O

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Apr 2011 - 3:17 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आपण (पक्षी मुंबैकर) वेगळा कट्टा काढायला काय हरकत आहे?

ठाणे, हायवेवरच सर्व्हिस रोडला सन मॅग्नेटिका बिल्डिंगमधे बार्बेक्यू नेशन आहे.
....

अबब!!
मिपा कट्टे फक्त श्रीमंतांसाठी चालले आहेत असा हलकासा निषेध नोंदवतो :)

फक्त व्हेज जेवणासाठीसाठी रु. ५७२/- प्रति व्यक्ति आणि नॉन व्हेज जेवणासाठी साठी रु. ६२४/- असे ह्वे होते.

"मिपा कट्टे फक्त श्रीमंतांसाठी चालले आहेत" असे मलाही वाटले.

बाकी गोष्टींचा विचार करणे अशक्य वाटते.

(अवांतर- टारझन आणि कं.च्या कोकण दौ-याचा मुहुर्त साधून हा कट्टा ठरवला आहे का? ;)

प्रचेतस's picture

6 Apr 2011 - 9:52 am | प्रचेतस

"मिपा कट्टे फक्त श्रीमंतांसाठी चालले आहेत" असे मलाही वाटले.

मागच्या वेळी पुण्यात मयुर मध्ये खादाडी कट्टा आयोजीत केला गेला होता. अमर्यादित जेवण फक्त १७० रू.
तसेच सांदण दरीच्या वेळेसही एकूण सर्व प्रवास, खादाडीसकट ५०० रू. मध्येच आटोपला गेला होता.
अर्थात बार्बेक्यू नेशन महाग आहे हे मान्यच. पण नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारचे आणि तेही वैविध्य असलेला भरगच्च मेनू खायला मिळणे यासाठी थोडा त्याग हवाच.

आनंदयात्री's picture

6 Apr 2011 - 9:17 pm | आनंदयात्री

असं नाही एक्प्लेनेशन द्यायचं रे !! जळजळ पोचली एवढंच म्हणायचं ;)

प्रचेतस's picture

7 Apr 2011 - 6:47 am | प्रचेतस

:)

मन's picture

5 Apr 2011 - 11:20 pm | मन

कट्ट्याला शुभेच्छा!
होउ द्यात जोरदार.

--मनोबा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Apr 2011 - 11:28 pm | निनाद मुक्काम प...

इनो आणून ठेवलेला बरा
कट्याला शुभेच्छा
मग त्याचा सचित्र वृत्तात द्या ( मग आमची अजून जळजळ )

मराठमोळा's picture

5 Apr 2011 - 11:30 pm | मराठमोळा

वाह वाह..
छान प्रोग्रॅम आखलाय.. नक्की प्रयत्न करेन पुण्यात असलो तर..
मी नगर रोडच्या बार्बेक्यु नेशन मधे बर्‍याचदा गेलो आहे. वाकडचं माहित नव्हतं.. :)

आणि जेवणाचे रेट वाढलेले दिसताहेत सद्ध्या..

कट्टा आयोजनाबद्दल धन्यवाद हर्षद.
मात्र काही विधानांबद्दल मात्र संपूर्णपणे असहमत आहे.
दारु पिउन गोंधळ करु नये हि विनंती.
हे वाक्य मिपा परीवाराला पचेल असे नाही. काही मिपाकर दारू पीत असतील परंतू कोणत्याच कट्ट्याला कोणी गोंधळ घातला आहे असे कधी झालेले नाही.
तुम्ही कदाचित नवीन असाल ;प्रथमच मिपाकरना भेटत असाल परंतु मिपाकरांबद्दल हे असले विधान मात्र करू नये. असे विधान करून त्यांचा अवमान कशाला करताय
तुमच्या धाग्यात असा कट्टा तुम्ही पूर्वी एकदा आयोजीत केलेला आहे असे उमजते तरिही तुम्ही असे विधान केलेत याबद्दल खेद वाटला
.
. कोणी सदस्य सहकुटुंब येणार असेल तर आपल्या जोडिदारास मिपाचे काही शब्द / व्याख्या याची थोडी कल्पना द्यावी म्हणजे त्यांना अचानक विमानातुन पडुन मिपाग्रहावर आल्यासारखे वाटणार नाही.

बहुतेक मिपाकरांच्या घरात मिपाबद्दल माहीतच असते. मिपाकर कसे आहेत हे सुद्धा माहीत असते.
त्यामुळे असा प्रसंग उद्भवत नाही.

अशा कट्ट्याला दारू पिऊच नये अशा मताचा मी आहे. कारण बरेचजण प्रथमच एकमेकांना पहात / ओळख करुन घेत असतात. ऑनलाईन ओळख असली तरी व्यक्तिगत ओळख अजून व्हायची असते. अशा वेळी प्रथमप्रसंगी मद्यपानाने रंगाचा बेरंग होण्याची किंवा ती शक्यता गृहीत धरुन अनेकांचे पार्टनर्स उपस्थितच न राहण्याची, किंवा आले तरी नवीन मित्रमंडळींच्या भेटीगाठीचा पूर्ण आनंद घेऊ न शकण्याची शक्यता वाढते. एखादा बारीकसा तप्तप्रसंग सगळ्यांची मजा घालवू शकतो.

मद्यपान हे आपल्या नेहमीच्या रोजच्या दोस्तलोकांच्या घरगुती भेटीत करणे जास्त योग्य.

निरीक्षण नोंदवले.

कनिष्ठ उपनिरिक्षक (गवि)

विनायक बेलापुरे's picture

6 Apr 2011 - 12:09 pm | विनायक बेलापुरे

१६-१७ ला कोल्हापुरला जात आहे त्यामुळे
कट्ट्याला शुभेच्छा

सचित्र आणि सटीप वृत्तांत येउ द्यात.

बाबौ व्हेज साठी रु. ५७२/- प्रति व्यक्ति ????? (आणि नॉन व्हेज साठी रु. ६२४/- ह्ये बी महागच वाट्टयं)
हाटिलात जाउन एवढ महाग घास्फुस खान्या परीस घरी करुन खाल्ल्याल परवडन.

असो तुम्हाले कट्ट्यासाटी शुभेच्चा. आन फटु टाका नंतर. :)

हाटिलात जाउन एवढ महाग घास्फुस खान्या परीस घरी करुन खाल्ल्याल परवडन.

कधी करता गणपा भौ. तुमच्या पाकृ वाचल्या आहेत. करून बघायचा प्रयत्न केला. तुमच्या हातचे खायचा योग आला तर आवडेल. काय मदत हवी असेल तर ती करीन मी. जमवा एकदा.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Apr 2011 - 3:23 pm | परिकथेतील राजकुमार

खर्च - व्हेज साठी रु. ५७२/- प्रति व्यक्ति आणि नॉन व्हेज साठी रु. ६२४/-

हॅ हॅ हॅ
हुच्चभ्रुंनी हुच्चभ्रुंसाठी भरवलेला कट्टा.

या एकदा गरिबाच्या कावेरीत. ५००/- रुपायात बाई बाटली बिर्याणी सगळे मिळेल ;)

दारु पिणार्‍या लोकांना अशी गावकुसाबाहेरची वागणुक देणार्‍या गविंचा तिव्र निषेध ! त्यांच्या पुढील लेखनावर हिणकस प्रतिक्रीया देण्याचा निर्णय घेण्यात आल्या आहे.

परा
सदस्य (मिपा मदिरा मंडळ)

५००/- रुपायात बाई बाटली बिर्याणी सगळे ?

जगदंब..जगदंब..!!
श्रीराम..श्रीराम..!!

बार्बेक्यूनेशनमधे मदिरा तर अन्नाच्या दुप्पट महाग आहे. सामान्य मदिरेचा स्मॉल सुद्धा ३०० च्या खाली नाही.

या किंमतीमुळे तिथे मागवलेली चढलीही नाही. असो.

हि & हि द्यायला तरी का होईना.. या तर आमच्या गरिबाच्या धाग्यावर..आम्हाला त्यातच आनंद होईल.

वपाडाव's picture

6 Apr 2011 - 3:45 pm | वपाडाव

५००/- रुपायात बाई बाटली बिर्याणी सगळे ?

बिडीचे ५०/- वेक्स्ट्रा आकारण्यात आले आहेत का?
-(५० घेउन ५ रुपयांचा कट्टा देण्यात येणारे की काय !!!)

छोटा डॉन's picture

6 Apr 2011 - 3:36 pm | छोटा डॉन

कट्ट्याला शुभेच्छा :)

अवांतर :
बार्बेक्यु नेशन असले उरफाटे दर कधीपासुन आकारु लागले ?
व्हेज आणि नॉन-व्हेजसाठी वेगवेगळा दर ही कन्सेप्ट त्यांनी कधीपासुन आणली ?
च्यायला सरसकट ५५०/- हा दर असताना पुण्यातले हे सयाजीमधले बार्बेक्यु "व्हेज साठी रु. ५७२/- प्रति व्यक्ति आणि नॉन व्हेज साठी रु. ६२४/-" कुठल्या हिशेबाने घेते ?

अतिअवांतर :
दर काही का असेना, बार्बेक्यु नेशनमधले जेवण वर्थ आहे असे म्हणतो.
स्वीट डिशमध्ये त्या दिवशी जर 'फिरनी' असेल तर जनाब तुम्ही खुब खुशनसीब आहात.

- छोटा डॉन

वपाडाव's picture

6 Apr 2011 - 3:43 pm | वपाडाव

माझ्यापुरते बोलायचे झाल्यास...
वरच्या (५७२-५५०)२२/- मध्ये जाण्या-येण्याचे तिकिट इन्क्लुड आहे का असे विचारावे वाट्टे?

गवि's picture

6 Apr 2011 - 3:49 pm | गवि

-०.५

अंशतः अमान्य.

बार्बेक्यू केलेल्या पदार्थांमधे तीनचार फार छान पदार्थ असतात. (मशरूम, पनीर, प्रॉन्स (असतील तरच), अळकुडी ऊर्फ आरवी)

ते वगळता नुसते कोबी/टोमॅटो सळीला टोचून भाजलेले. किंवा बेचव चिकनचे सपक तुकडे, नुसते गाजर किंवा मक्याचे कापलेले कणीस अशा बेचव पदार्थांचीही भरताड असतेच. हे सर्व सॅलड म्हणून बरे असतीलही पण ६०० रुपये देऊन ते खायला जिवावर येते.

त्यानंतरच्या बुफे जेवणात तर काहीही चविष्ट किंवा खास आकर्षक असत नाही. त्यासाठी अजिबात भूक ठेवू नका.

बेक्ड पोटॅटो विथ व्हाईट सॉस असे काहीतरी सारखे वाढतात, ते सर्वात उत्तम असते.

स्वीटमधे फिरनी वगळता काही खास वाटले नाही.

मद्याची किंमत तर कल्पनेपलीकडची असल्याने ऑर्डर करणे जवळजवळ अवघड. केलेच तर तब्ब्येतीत पिणे अशक्य.

ही सर्व निरिक्षणे बार्बेक्यूनेशनच्या तीन वेगवेगळ्या महिन्यांतल्या व्हिजिट्समधली आहेत.

आता खात्री झाल्याने जाणे बंद केले आहे.

हो पण पहिल्यांदा जायला चांगले आहे. जे आवडले तेवढेच पोटभर खा. सगळे ट्राय करायला गेलात तर अगदी थोडा नमुना बघा, नाहीतर बराचसा नको असलेला झाडपाला खाऊन आणि आवडीच्या दोन पदार्थांना जागाच उरली नाही म्हणून परत याल.

माझीही शॅम्पेन's picture

6 Apr 2011 - 3:53 pm | माझीही शॅम्पेन

सॅश-टांग

__/\____/\____/\____/\____/\____/\__

गवि, ग्रेट प्रतिसाद दिलात.

छोटा डॉन's picture

6 Apr 2011 - 6:12 pm | छोटा डॉन

बेक्ड पोटॅटो विथ व्हाईट सॉस असे काहीतरी सारखे वाढतात, ते सर्वात उत्तम असते.

स्वीटमधे फिरनी वगळता काही खास वाटले नाही.

+१

बाकी गविंना तिथला 'हराभरा कबाब' आवडला नाही ह्याचे आश्चर्य वाटले, आजवर ह्याच्या नावाखाली जो कचरा खाल्ला आहे त्यापेक्षा हा प्रकार नक्कीच छान होता.
आणि आणि तिथली 'दाल मखनी' हो, ती कशी काय विसरलात ?

बाकी सहमत आहे, मासांहारींसाठी बरेच प्रकार आहेत हे खरे.
तसे म्हटले तर ५५० रुपये हे व्हेजेटेरियन्साठी वर्थ नाहीत, मान्य.
पण अहो आधी पोटभर बेक्ड पोटॅटो आणि इतर काहीबाही, उगाच चवीला एखादी पनीर भाजी, नंतर तब्येतीत राईस + दाल मखनी आणि ह्यावर १०-१२ डिश ( खरे तर मडकी ) 'फिरनी' .... आहाहा, क्या केहने !
फिटले हो आमचे ५५०/- .....

असो.

अवांतर : गवि म्हणतात त्यात बरेच तथ्य आहे, पण बेंगलोरला असताना जे 'बार्बेक्यु' मध्ये जे क्राऊड यायचे त्यामुळे खाण्यात २-४ पदार्थ इकडे तिकडे झाले तरी हरकत नसायची, असो, तुर्तास इथेच थांबतो.

- ( आठवणीतला ) छोटा डॉन

धमाल मुलगा's picture

6 Apr 2011 - 6:22 pm | धमाल मुलगा

>>राईस + दाल मखनी
५५०/- देऊन भात भरणार....
कोंगाडी सालं!

छोटा डॉन's picture

6 Apr 2011 - 6:25 pm | छोटा डॉन

>>५५०/- देऊन भात भरणार.... कोंगाडी सालं!

चॉकलेट घ्या. आणि कृपया जिकडे अशी भाषा चालते तिकडे जा. प्लीज.

- छोटा डॉन

धमाल मुलगा's picture

6 Apr 2011 - 6:49 pm | धमाल मुलगा

चाकलेटं वाटतायत.. लेको, त्या 'तुम्ही आम्लेट घ्या' चा दम है काय लेको ह्या चाकलिटात? का 'इनो घ्या'चा दणक्का है? चाकलेटं वाटतायत..पाप्याची पितरं!

>>आणि कृपया जिकडे अशी भाषा चालते तिकडे जा. प्लीज.
ह्हं? करुन सवरुन नामानिराळे का? आधी स्वतःच बुरखे चढवून ओकार्‍या काढत हिंडायचं गावभर आणी मग दुसर्‍याला शहाणपण शिकवायचं? भल्ला न्याय हो!

धम्या..
व्हेज मंडळीनं हजेरी लावावी की नाही....
यकंच सांग अन सुल्टं कर...

धमाल मुलगा's picture

6 Apr 2011 - 6:51 pm | धमाल मुलगा

टेन्शन कशाला घ्यायचं?
गप्पा मारता मारता कधी, किती अन काय काय खाल्लं ह्याचीही जाणीव उरली नाही म्हणजे भेट संपन्न झाली असं आपलं मत. :)

व्हेज मंडळींनी हजेरी लावायची ..
पण गपचुप नॉनव्हेज खाणारा हा व्हेज धर्म ही पाळणारा असल्याने .. चांगल्या चवीचे व्हेज पदार्थ त्याला सांगुन ते पदार्थ त्याला द्यावेत.

---
आंबरस असतो का हो तेथे .. च्याआयला .. तो असला तरकच व्हेज खाईन आपण ...

धमाल मुलगा's picture

6 Apr 2011 - 8:53 pm | धमाल मुलगा

बार्बेक्यूला आमरस? =)) =)) _/\_
आयला! उद्या हुरडापार्टीला मिसळ मागशीला की रे! :D

६०० रुपयात ब्लू कोरल मध्ये मी १ महिना जेवीन

हुच्च लोकांनी हुच्यांसाठी काढलेला हुच्च धागा :D

गवि's picture

6 Apr 2011 - 3:57 pm | गवि

हे ठिकाण कुठे आहे?

गवि साहेब

आपल्या हापिसच्या तोवर बी मध्ये पहिल्या मजल्यावर या
डोळे पाणावतील तुमचे, तिथे जेवून :d

हे काय ते ब्ल्यू कोरल तिथे आहे?
अँ ? बघायला पाहिजे.

डोळे पाणावतील? .... हं.. हे क्यांटीनचे जेवण असलेच तिखट असते नेहमीच..

धम्या य अपेक्षा आपला कात्रज कट्टा लै भारी झाला होता.
ही बघ त्याची लिंक http://misalpav.com/node/1232
शुद्ध सात्वीक अभिरुची कट्टा तर भन्नाट होता.
बहुतेक सगळेच शाम्ग्रीला कट्टे रम्गले होते.

मृत्युन्जय's picture

7 Apr 2011 - 10:51 am | मृत्युन्जय

कट्टा होण्याच्या आधीच याआधीचा कट्टा चांगला झाला होता म्हणताय? चान चान.

धमाल मुलगा's picture

7 Apr 2011 - 11:09 am | धमाल मुलगा

ओ भौ, शांग्रिला कट्ट्यांचं नाव नको. ;)
दर वेळी आमचा कलमाडी झालाय. :D

चिंतामणी's picture

9 Apr 2011 - 12:45 am | चिंतामणी

पुढच्या निवडणुकीला भाईना तिकीट नाही मिळाले तर तुलाच मिळणार. :D

१ )जेवणाच्या क्वॉलिटी बाबत तक्रार करु नये .

२) पिणार्‍यांने कृपया क्रेडीट कार्ड सोबत घेवुन जावी .

३ ) आम्ही येणार नाही .

छोटा डॉन's picture

8 Apr 2011 - 10:37 am | छोटा डॉन

जर (माझ्या) ठरलेल्या वेळापत्रकात काही फेरफार आणि गडबड झाली नाही तर मी ह्या कट्ट्याला हजरी लावेन.
साधारणता ८.१५-८.३० पर्यंत पोहचेन ...

बाकी किमान १ दिवस आधी कुणातरी संयोजकाला योग्य ते कन्फर्मेशन देईनच :)
कट्ट्याला शुभेच्छा :)

- ( टेन्टिटिव्ह उपस्थित ) छोटा डॉन

आनंदयात्री's picture

8 Apr 2011 - 11:26 pm | आनंदयात्री

एय्य ... कोण आहे रे तिकडे !!
हारतुरे, फटाके बिटाके सगळे रेडी ठेवा रे भेंडी . साहेब येणारेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Apr 2011 - 1:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हारतुरे, फटाके बिटाके सगळे रेडी ठेवा रे भेंडी . साहेब येणारेत.

असं म्हणताहेत ... ;-)

मजा करा लेकोहो!

:-)

स्मिता.'s picture

8 Apr 2011 - 6:03 pm | स्मिता.

बार्बेक्यु नेशन हे माझे आवडते रेस्टॉरंट आहे.
येऊ शकत नसल्याने आता फक्त जळजळ होत आहे :(
तरी कट्टा झाल्यावर त्याचे सचित्र वर्णन येथे द्यायला विसरू नका.
शुभेच्छा!!