४५ कोटीची करमाफी आणि देशाचे क्रिडाधोरण

चिंतामणी's picture
चिंतामणी in काथ्याकूट
1 Apr 2011 - 2:51 pm
गाभा: 

कोट्यावधी रूपये कमावणा-या क्रिकेट बोर्डाला करात ४५ कोटी रूपयांची सवलत निर्णय काल केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याच्या बातम्या आल्या आहेत.

सामान्य माणसाला एक एक रूपया करासाठी नडणारे, सामान्य माणसाचे कंबरडे महागाई मोडले असताना त्याबद्दल विचार न करता क्रिकेट वर्डकप संयोजनासाठी ४५ कोटिची सवलत देण्य योग्य आहे का?

आपल्या देशाकडे काही क्रिडा धोरण आहे की नाही? १४ देशांच्या वर्डकप संयोजनासाठी ४५ कोटिची सवलत. पण ज्या जागतीक महासंघांशी २०० पेक्षा जास्त देश संलग्न आहेत (व्हॉलीबॉल, फुटबॉल) अश्या खेळांचे आयोजनासाठी सवलती मदत/ मीळवण्यासाठी अनेक खस्ता खाव्या लागतात. एव्हढे करून मदत मिळेल असे नाही.

असल्या खिरापती वाटण्या ऐवजी एक दिर्धकालीन क्रिडा धोरण आखण्याची गरज आहे. कोट्यावधी रूपये कमावणा-या क्रिकेटला सवलती देण्यास हरकत नाही. परन्तु ऑलिंपीक विजेते खेळाडु बनवण्यासाठी निश्चीत धोरण हवे आहे. या साठी जनमासातुन रेटा येणे आवश्यक आहे असे मला वाटते.

(या ४५ कोटीची करमाफी विषयी बातमी येथे वाचा)

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

1 Apr 2011 - 2:58 pm | रणजित चितळे

निदान काहीतरी प्राविण्य मिळवले आहे ह्या खेळात आपण. पण हसन अली सारख्या देश बुडवी व विघातक माणसा कडून ५०००० कोटी पैकी ५००० कोटी जरी मिळवता आले तर आपल्या सरकार कडे काही धोरण आहे असे म्हणता येईल नाहीतर नुसतेच अराजक आहे असे म्हणावे लागेल.

सामान्य व मध्यम वर्गातल्या लोकांना कोण विचारतो हो हल्ली. काहीच्या काहीच अपेक्षा आपल्या.

सगळे नियम फक्त मध्यम वर्गाला असतात. बाकीच्या दोघांना नसतातच.

नितिन थत्ते's picture

1 Apr 2011 - 3:30 pm | नितिन थत्ते

हेच गांधीवादी आहेत असा संशय बळकट होत आहे.

असो. राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पण भरपूर खर्च केला गेला असे ऐकले आहे (१५ हजार कोटी).

बाकी सवलत द्यायची काहीच गरज नाही या मताशी सहमत आहे.

चिंतामणी's picture

3 Apr 2011 - 12:38 am | चिंतामणी

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पण भरपूर खर्च केला गेला असे ऐकले आहे (१५ हजार कोटी).

पण एक सांगा. या खर्चामुळे कोणाचे भले झाले?

राष्ट्रकुल स्पर्धेत मेडल मिळविलेल्या किती खेळाडुंना आशीयायी स्पर्धेत मेडल मिळाली?

चिंतामणी's picture

3 Apr 2011 - 12:39 am | चिंतामणी

राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पण भरपूर खर्च केला गेला असे ऐकले आहे (१५ हजार कोटी).

पण एक सांगा. या खर्चामुळे कोणाचे भले झाले?

राष्ट्रकुल स्पर्धेत मेडल मिळविलेल्या किती खेळाडुंना आशीयायी स्पर्धेत मेडल मिळाली?

अविनाशकुलकर्णी's picture

1 Apr 2011 - 4:21 pm | अविनाशकुलकर्णी

श्री चिंतामणी यांच्या "मुलनिवासी" विचार धारेचा निषेध

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

2 Apr 2011 - 3:38 pm | निनाद मुक्काम प...

ही कर सवलत नियमात बसते बसते असे सरकारचे म्हणणे आहे. .त्यामुळे पुढे अजून काय लिहिणे.
ह्या मुद्द्यावर विरोधी पक्षाने जर आता आवाज उठवला पाहिजे .

पुढील आय पी एल च्या वेळी सर्व राज्य झाडून कर गोळा करतील .
महाराष्ट्र सरकारचा फार मोठा कर मागच्यावेळी बुडाला .
आता नवीन पॉवर बाज उपमुख्यमंत्री व पारदर्शी कारभार करणारे मुख्य मंत्री जातीने कर गोळा करतील अशी अशा करूया .

रेवती's picture

3 Apr 2011 - 1:29 am | रेवती

४५ कोटींची सवलत योग्य नाही.
बातमी वाचल्यावर मलाही खटकले होते.
खेळाचे स्वरूप हे खेळ न राहता युद्धाचे झाले आहे.
आपण कसाब मामल्यात आणि अजूनही सिमेवरच्या राड्यात काही करू शकत नाही म्हणून त्या भावना खेळाच्या निमित्ताने उफाळून आल्यासारख्या वाटतात. हे नुसते सर्वसामान्य माणसांपुरते मर्यादित राहिले नसून आपल्या तसेच दुसर्‍या देशांचे अधिकारी हा खेळ पाहण्यासाठी येतात त्याचे नवल वाटते. त्यांनी, उद्योगपतींनी किंवा अभिनेत्यांनी येण्यास हरकत नाही पण सुरक्षाव्यवस्थेवरचा ताण, खर्चही फार होतो. फक्त खेळकर दृष्टीकोनापेक्षाही काहीतरी जास्त आहे याची जाणीव सगळ्यांनाच आहे. त्यामुळे खेळाडूंवर कमालीचा ताण असतो. सगळ्या गोष्टी महाग होत जातात. यामध्ये पाण्यापासून ते भावनांपर्यंत सगळ्याचा सौदा होतो. सेमीफायनलमध्येतर फायनल जिंकला नाहीत तरी चालेल पण पाकिस्तानला हरवायची भावना जास्त होती. यात खेळ कुठे आहे?