या गडे नाचूया..नागडे नाचूया

योगप्रभू's picture
योगप्रभू in काथ्याकूट
1 Apr 2011 - 3:22 pm
गाभा: 

आपल्या टीमने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक मारल्यानंतर भारतीयांचा उत्साह शिगेला पोचणे स्वाभाविक आहे, पण हा क्रिकेटचा ज्वर आता कुठल्या पातळीपर्यंत चाललाय त्याची एक झलक सध्या माध्यमांत पाहायला मिळतीय.

पूनम पांडे नावाच्या मॉडेलने भारताने कप जिंकल्यास आपण संघासमोर कपडे काढणार असल्याचे जाहीर केले आहे. नुसते जाहीर करुन ती थांबली नाही तर तिने यासाठी बीसीसीआयकडे परवानगीही मागितली आहे. पूर्वी निर्लज्जपणाच्या कृतीचे वर्णन करताना 'कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे' असा वाक्प्रचार केला जाई. आता मात्र कमरेचे डोक्यालाही गुंडाळण्याची गरज राहिलेली दिसत नाही.

पूनम ही इतकी थिल्लर आहे, की तिला इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधीने विचारले, की तुझ्या या कृतीमुळे काही कायदेशीर समस्या उभ्या राहतील, असे तुला वाटते का? त्यावर ही बाई म्हणते, की मला बेकायदा काही करायचे नाही म्हणूनच मी रीतसर परवानगी मागितली आहे. आता हिला एवढेही समजत नाही, की बीसीसीआयने अशी परवानगी देणेही बेकायदा ठरु शकते कारण आपल्याकडे 'सार्वजनिक स्थळी नग्नावस्थेत फिरणे/नग्न होणे' हा गुन्हा आहे.

रस्त्यावर नग्नावस्थेत फिरणार्‍या वेड्याला पोलिस निदान काठीचे फटके मारुन हुसकावतात. शहाण्यासुरत्या आणि हायफाय सोसायटीतील महिला असा आचरटपणा सांगून सवरुन करायला जात आहे. तिच्यावर कारवाई होऊ शकते का? जाणकारांनी मत व्यक्त करावे.

(फार पूर्वी भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळत असताना सुनील गावस्कर खेळत होता. त्यावेळी एक इंग्लिश महिला अशीच विवस्त्रावस्थेत खेळपट्टीवर घुसली होती. पण हे घडले परदेशात. आता भारतातही ती फॅशन आली की काय?'

दिगंबरा! दिगंबरा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

1 Apr 2011 - 3:32 pm | परिकथेतील राजकुमार

हि पूनम म्हणजे आपली किंगफिशर क्यालेंडरवाली का हो ?

हिला मध्ये 'मोस्ट डाउनलोडेल मॉडेल ऑफ इंटरनेट' हा सन्मान मिळाला आहे.

मृत्युन्जय's picture

1 Apr 2011 - 3:43 pm | मृत्युन्जय

तीच ती. तिला पुढच्या वर्षी पण मोस्ट डाउनलोडेड मॉडेलचा मान पाहिजे बहुधा ;)

धमाल मुलगा's picture

1 Apr 2011 - 4:04 pm | धमाल मुलगा

=)) =))
बाला, लै चालू झालास रे तू! :D

टारझन's picture

1 Apr 2011 - 3:52 pm | टारझन

वा वा वा !! फारंच आंबट गोड बातमी दिलीत .. चला आता मित्रांच्या इथे जाऊन म्याच पहायला पाहिजे ;) अजुन काही डिटेल्स् आहेत काय ?
पर्‍या जरा लिंक बिंक दे रे पांडे बाईंची :)
ह्या संस्कृती रक्षकांना पोकळ बांबुंचे फटके द्यायला पाहिजेत (योगप्रभुंची मिपाकर म्हणुन सुटका ) .. नको तिथे विरोध :)
बाकी अंतिम सामना बघायचे अजुन एक कारण मिळाल्या गेले आहे :)

पांडे बाईंचा विजय असो ... शहा नको .. :)
अखिल अंतरजालिय महिला मुक्ती मोर्चा चे विचार वाचायला उत्सुक :) बाकी त्यांनी आता पुनम ला पुरुष पिडीत महिला ठरवल्या नाही म्हणजे मिळवली ;)

पुणम पांडे जन्माव्या .. पण शेजार्‍याच्या घरात :)

परिकथेतील राजकुमार's picture

1 Apr 2011 - 4:02 pm | परिकथेतील राजकुमार


डोळे भरून बघ रे.

खूप प्रयत्न केल्यावर हा एक त्यातल्या त्यात सभ्य फटू मिळाला ह्या बयेचा.

टारझन's picture

1 Apr 2011 - 4:21 pm | टारझन

धत तेरी की ... णॉट ऑफ माय चॉइस ... ग्राईप वाटर पाजा पोरीला =)) झिरो फिगर का मायनस झिरो फिगर आहे :) छ्या ..

बाकी अजुन एक बातमी उडत उडत आली आहे ... जर का भारतीय टिम हारली .. तर राखी सावंत ( असतील तेवढे) कपडे उतरवणार आहेत म्हणे . आणि ह्या कारणाने सगळ्या टिम ची हवा टाईट झाली आहे .. हारल्यावर चाहत्यांच्या दगडांपेक्षा राखीची जास्त भिती वाटते असे एका खेळाडु ने नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला सांगितले :)

- शेजारी

स्पंदना's picture

1 Apr 2011 - 4:34 pm | स्पंदना

हा! हा! हा! सह्ही ! सह्ही!!

'हारला बिरलात तर राखी सोडतो बघा' अशी जर जाहिर धमकी आपल्या संघाला दिली तर त्यांच्या बायकाच निम्म काम करतील आपल नाही का?

वपाडाव's picture

1 Apr 2011 - 3:32 pm | वपाडाव

तोंडाला पाने पुसणारा लेख...
इतकं वर्णन करुन / सांगुन लिंक देत नाहीत लेकाचे...
मग खाजवताच कशाला?
तर माझ्या मिपाकर मित्रांनो ही घ्या लिंक...
http://navbharattimes.indiatimes.com/cwcarticleshow/7813493.cms

वपाडाव भाऊ,
पूनमबाईंची मुक्ताफळे च्यानेलवरच्या मुलाखतीत ऐकली हो. म्हणून लिंक देता आली नाही. ते काम तुम्ही केल्याबद्दल धन्यवाद.

बाकी खाजवायला कुठे अक्कल लागते? आमचेच उदाहरण घ्या ना.. :)

मुस्तफा's picture

1 Apr 2011 - 3:32 pm | मुस्तफा

अब्बी अब्बी समझल हाय की भारताचा संग खाजगी अहे. मंग खाजगी संघसमोर खाजगीमंदी कुणी काय बी करना आपल्याला वांदा नाय !!!

मीही तेंच्च म्हटलं हों !! संघासमोर कराच्चीये नं, म्हणजे काय चारचौघात नव्हें. बघून घेतील त्यांचं ते. कसें ??

वपाडाव's picture

1 Apr 2011 - 3:57 pm | वपाडाव

तेच म्हणत होतो मी तीर्थरुपांना मला "संघात" जाउ द्या...
आज जर मी संघात असलो असतो तर त्याची फळे किती गोड आहेत हे कळाले असते....
असो... त्यांच्या नातवांच्या वेळी ही काळजी घेण्यात येइल..

>>आज जर मी संघात असलो असतो तर त्याची फळे किती गोड आहेत हे कळाले असते....
ती फळं तीर्थरुपांना कशी कळाली असती हे मला कळत नाहीये. संघाला काय फ्यामिली पास इश्श्यु करत्ये का ही बाई ??

फ्यामिली पासचा इश्श्यु मध्येच आणल्याने व्यवस्थापनाची लगणारी वाट दिसत आहे...
(जर पास देत असेल तर)...
फळे आम्हाला चाखाय्ला भेटली असती.. गोड आहेत का ते कळाले असते.. आम्हाला...
ती तीर्थरुपांना कळण्याची/चा गरज/संबंध येतोच कुठे?

प्यारे१'s picture

1 Apr 2011 - 3:37 pm | प्यारे१

तरीच इजूभौ पूनमला या म्हणत होते काय??????

पिलीयन रायडर's picture

1 Apr 2011 - 3:40 pm | पिलीयन रायडर

>>> उनकी ख्वाहिश है कि वह टीम इंडिया से संपर्क कर ड्रेसिंग रूम में सारे खिलाड़ियों के सामने कपड़े उतारें।
>>>>

ती येडी काहीही करायला तयार असेल... पण टीम इंडीया नि तर परवानगी दिली पाहीजे... खिलाडी जर का असा काही पाहु लागले तर लोक शेण नाही का घालणार तोंडात??

छोटा डॉन's picture

1 Apr 2011 - 3:52 pm | छोटा डॉन

>>खिलाडी जर का असा काही पाहु लागले तर लोक शेण नाही का घालणार तोंडात??

काय सांगता ?
मग जरा खालील लिंक बघा बरं ;)
( टिप : छायाचित्र आंतरजालावरुन साभार, ते मी काढले नसल्याने त्यातील भावनेशी मी सहमत असेनच असे नाही, आपापल्या जबाबदारीवर ते पहावे )

Do you think cricket is gentlemens game ?

- छोटा डॉन

आणि शेण घालूच म्हटलं तर देशातलं शेण वापरून पुन्हा वर इंपोर्ट करावं लागेल, त्यामुळे चिंता नाही. काही कोणी शेण-बिण घालण्याचे कष्ट घेणार नाही. :D

>>>खिलाडी जर का असा काही पाहु लागले तर लोक शेण नाही का घालणार तोंडात??<<<

बीसीसीआय ने परवानगी दिली तरी त्यासाठी खिलाड्यांना रितसर घरून परवानगी मिळाली पाहिजे...... ;)

विजुभाऊ's picture

1 Apr 2011 - 4:05 pm | विजुभाऊ

आणि शेण घालूच म्हटलं तर देशातलं शेण वापरून पुन्हा वर इंपोर्ट करावं लागेल
वर पुन्हा म्हणतील "ऑफीशीयल स्पॉन्सरर ऑफ धिस शेण इज...... भर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र"

चावटमेला's picture

1 Apr 2011 - 4:39 pm | चावटमेला

द्येवा, मला पुढच्या जन्म भारतीय टीम मधील क्रिकेटरचा दे रे ;)

प्रदीप's picture

2 Apr 2011 - 6:00 pm | प्रदीप

पूनम ही इतकी थिल्लर आहे, की तिला इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधीने विचारले, की तुझ्या या कृतीमुळे काही कायदेशीर समस्या उभ्या राहतील, असे तुला वाटते का? त्यावर ही बाई म्हणते, की मला बेकायदा काही करायचे नाही म्हणूनच मी रीतसर परवानगी मागितली आहे. आता हिला एवढेही समजत नाही, की बीसीसीआयने अशी परवानगी देणेही बेकायदा ठरु शकते कारण आपल्याकडे 'सार्वजनिक स्थळी नग्नावस्थेत फिरणे/नग्न होणे' हा गुन्हा आहे.

ह्यावरून ती थिल्लर आहे असे कसे म्हणावे? सार्वजनिक जागेत जाणूनबुजून नग्न होणे बेकायदेशीर आहे, हे तिला ठाऊक आहे, म्हणून ती बी. सी. सी. आय. ची परवानगी मागते आहे. आणि तुम्हीच म्हटल्याप्रमाणे बी. सी. सी. आय. तशी कायद्यात बसेल अशा तर्‍हेने तशी परवानगी देऊ शकणार नाही . कायद्याचे सोडाच, पण असे विधीशून्य कही करण्याची परवानगी एक प्रतिष्ठित संस्था देईल ह्यावर कुणाचाच विश्वास बसू नये. अगदी ह्या पूनमचाही. तेव्हा अशी परवानगी आपल्याला मिळणे असंभव आहे ह्याची तिला खात्री असावी. मग आपण असे काही करणार आहोत असे बिनदिक्कत जाहीर करणे तिला सोईचे आहे. ह्या स्टंटमुळे तिची पब्लिसिटी तर झाली? आणि हाच तिचा हेतू आहे. एका मॉडेलच्या पब्लिसिटी स्टंटावर आपण कशाला चर्चा करायची?

वर एका प्रतिसादात दिलेला फोटो पांडे कन्यकेचा दिसतोय.
अगदीच इटींग डिसॉर्डर असल्यागत आहे.
या शेळपट पोरी काय कामाच्या?
घरातली सतरा कामं झराझरा आवरायला येतील काय यांना?
पाहुणे आले म्हणून पटकन पोहे तरी करता येतील काय्?........निघाल्या कपडे काढायला? .........तशाही या मुली कपडे घालतात केंव्हा कि काढायची वेळ यावी?........जे काही उरलेसुरले आहेत ते काढायची गरज काय? खोटी मापं उघडकीला येतील की!

प्रोतीमा बेदी रस्त्यावरून दिगंबरावस्थेत धावल्या होत्या हे मात्र चांगलं आठवत आहे.

काकांच्या मेमेरीसाठी एक वार जोरदार टाळ्या झाल्या पहिजेत. =))

प्रदीप's picture

3 Apr 2011 - 7:09 am | प्रदीप

माझ्या आठवणीप्रमाणे तिने हा प्रकार भल्या पहाटे जुहू चौपाटीवर केला होता. आणि त्याची अगोदर जाहिरत वगैरे केली नव्हती. चु. भू. द्या. घ्या. प्रोतिमा व कबीर दोघेही नेहमीच वादग्रस्त होते, तेव्हा.

रामदास's picture

3 Apr 2011 - 4:39 pm | रामदास

१- रुसी करंजीयांसाठी (मासीकाच्या मुखपृष्ठासाठी) फ्लोरा फाउंटनच्या रस्त्यावर ही धाव घेतली होती .
२-जुहु बीच वर -काहींच्या मते गोव्याच्या एका बीचवर हे फोटो काढून नंतर ते वेगळ्या पार्श्वभूमीवर (श्लेष नाही) छापले गेले होते .

टारझन's picture

3 Apr 2011 - 8:14 pm | टारझन

प्रदिप रावांसाठी लिंक
http://www.hindustantimes.com/news/specials/proj_tabloid/protimastory.shtml

बाकी, बाई अंमळ आउट डेटेड असल्याने काही वाटले नाही :) पुजा बेदी बद्दल वाटते :)

- दुजा भेदी

कुंदन's picture

3 Apr 2011 - 8:49 pm | कुंदन

अंमळ जिम ला नेत जा रे पांड्येला. ;-)

रामदास's picture

3 Apr 2011 - 8:49 pm | रामदास

अंमळ म्हणजे प्रोतीमा आज्जी म्हणायची!!!(इमृशांदे)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Apr 2011 - 9:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ती कपडे काढणार म्हणून योगप्रभू धागेही काढत आहेत का?

अविनाशकुलकर्णी's picture

3 Apr 2011 - 12:32 am | अविनाशकुलकर्णी

नाहि दिसली ति स्टेडियम वर..
बहुतेक बाथरुम मधे लपुन बसली असेल

धमाल मुलगा's picture

3 Apr 2011 - 12:37 am | धमाल मुलगा

असते एकेकाची हौस!
नाहीतरी तिला लोक म्हणतातच 'काय बाई आहे का भित्ताड' :D ;) काय फरक पडतो एखाद्या भिंतीवरचा गिलावा/पोपडे पडल्यानं? :D

शिल्पा ब's picture

3 Apr 2011 - 12:57 am | शिल्पा ब

आजकाल भारतात चावटपणा वाढत चाललाय

गवि's picture

3 Apr 2011 - 7:29 am | गवि

धन्य त्या पूनम पांडेची.
जेकाही खरोखर मनापासून करायचंय ते मनुष्य बिनबोभाट करतोच. मग लागली तर अटक करुनही घेतो.

त्यासाठी आधीच कायदेशीर परवानग्या काढत बसणे एवढ्यानेच त्यातली खरी इच्छा कळली.

.. आणि असला काही प्रकार उत्स्फूर्तपणे झाला असताच,तरी सचिन वगैरे संसारी पुरुषांनी उत्स्फूर्तपणे आणि तातडीने ड्रेसिंग रूमेतला एखादा टॉवेल तिजवर टाकला असताच.

तिच्या आणि स्वत:च्या विनयरक्षणार्थ.

मदनबाण's picture

3 Apr 2011 - 8:03 am | मदनबाण

पांडे बाईचं काय झालं ? ;)

(अंमळ चावट) ;)

विनायक बेलापुरे's picture

3 Apr 2011 - 12:19 pm | विनायक बेलापुरे

काल पूनमची रात्र नव्हती ......
आणि आज अमावस्याच आहे
;)

कुंदन's picture

3 Apr 2011 - 1:39 pm | कुंदन

शोधा यु ट्युब वर अन दुवा व्य नी ने कळवा. ;-)

अविनाशकुलकर्णी's picture

3 Apr 2011 - 3:12 pm | अविनाशकुलकर्णी

Untitled-1.jpg
भारती दुबे
मुंबई।। टीम इंडिया की जीत के बाद हर किसी की जुबान पर यह था कि पूनम पांडे कहां हैं। टीम इंडि़या के वर्ल्ड कप जीत जाने के बाद पूनम ने अपना मोबाइल स्विच ऑफ कर दिया था।

क्रिकेट वर्ल्ड कप 2011 में टीम इंडिया के जीतने पर न्यूड होने का प्रॉमिस कर चुकीं 20 वर्षीय मॉडल पूनम पांडे ने शनिवार रात मैच खत्म होने के तुरंत बाद ट्वीट किया- और जादू काम कर गया!! इतने प्यारे जवाबों के लिए बहुत बहुत धन्यवाद। पूनम ने यह ट्वीट करने से कुछ देर पहले ट्वीट किया था- वंदे मातरम्।

मैच खत्म होने से सात घंटे पहले पूनम ने ट्वीट किया था- मेरा ऑरा काम कर रहा है!!!! तुम सब पर मुझे गर्व है। तैयार रहना!! सूत्रों का कहना है कि पूनम पांडे के पास सैंकड़ों फोन आ रहे थे जिसमें या तो उन्हें अपने चाहने वालों के लिए न्यूड होने के लिए कहा जा रहा था या फिर उन्हें धमकी दी जा रही थी कि भारतीय कल्चर के खिलाफ जा कर अगर वह न्यूड हुईं तो उन्हें परिणाम भुगतने होंगे।