सर्वोत्तम पाच.

शेणगोळा's picture
शेणगोळा in काथ्याकूट
20 Jun 2008 - 9:16 am
गाभा: 

आदाब!

सर्व आदरणीय मिपा सभासदांकडून इथे लिहिल्या गेलेल्या साहित्याबद्दल निम्नलिखित माहिती मागवण्यात येत आहे. सहकार्याची अपेक्षा आहे.

साहित्य प्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम.
काव्य प्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम.
पाकप्रकार - आपल्याला वाटणारे दहा सर्वोत्तम.

माझे येथील बरेच वाचन बाकी आहे. वरील माहिती मिळाल्यास मला प्रथम हेच साहित्य वाचायला आवडेल.

मला मिपाच्या दिवाळी अंकात लिहायचे आहे. ते लेखन कुणाला पाठवायचे?

आदाब!

आपल्या सर्वांचाच,
शेणगोळा.

प्रतिक्रिया

शेणगोळा's picture

20 Jun 2008 - 9:18 am | शेणगोळा

शीर्षक चुकून 'सर्वोत्तम पाच' असे झाले आहे, ते 'सर्वोत्तम दहा' असे वाचावे.

शुक्रिया...

सर्वांचाच आवडता,
शेणगोळा.

प्रियाली's picture

20 Jun 2008 - 4:46 pm | प्रियाली

इथे सर्वच उत्तम आहे. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार मेहनत घेऊन लिहितो. त्याचा दर्जा ठरवण्याची गरज कळत नाही. जे ज्याला आवडते ते त्याच्यामते उत्तम, त्यात सर्वोत्तमची चढाओढ नसावी.

त्यापेक्षा जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी.

चाणक्य's picture

20 Jun 2008 - 4:52 pm | चाणक्य

जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी.

हेच म्हणतो

प्राजु's picture

20 Jun 2008 - 4:58 pm | प्राजु

बरोबर...
सगळेच चांगले आहे इथे. आपणाला काय आवडेल ते वाचा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2008 - 4:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इथे सर्वच उत्तम आहे. जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिज्ञ's picture

20 Jun 2008 - 5:53 pm | अभिज्ञ

वरील सर्वांशी सहमत.
इथे सर्वच उत्तम आहे. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार मेहनत घेऊन लिहितो. त्याचा दर्जा ठरवण्याची गरज कळत नाही. जे ज्याला आवडते ते त्याच्यामते उत्तम, त्यात सर्वोत्तमची चढाओढ नसावी.

अगदी हेच म्हणतो.

मला वाटते कि हा तुलनात्मक कौल घेण्यापेक्षा ,जुने व काहि चांगले व वाचनीय अश्या लेखांचे दुवे
जर का माहितगारांनी इथे दिल्यास नवीन लोकांना त्याचा आनंद जरुर घेता येइल.
माझ्या वाचनात हा अप्रतिम लेख आला. आता त्या लेखाला इतक्या उशीरा प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाहि.
तरीहि नवीन लोकांनी हा जरुर वाचावा असे वाटले म्हणुन हा खटाटोप.
http://www.misalpav.com/node/114

वरदा's picture

20 Jun 2008 - 7:21 pm | वरदा

काही नाही..जुना असला तरी प्रतिक्रीया देऊ शकता तुम्ही कधीही....

पिवळा डांबिस's picture

20 Jun 2008 - 10:45 pm | पिवळा डांबिस

इथे सर्वच उत्तम आहे. प्रत्येकजण आपल्या वकुबानुसार मेहनत घेऊन लिहितो. त्याचा दर्जा ठरवण्याची गरज कळत नाही. जे ज्याला आवडते ते त्याच्यामते उत्तम, त्यात सर्वोत्तमची चढाओढ नसावी.
त्यापेक्षा जे उपलब्ध आहे ते वाचावे आणि जे आवडले त्यावर वाटल्यास प्रतिसाद/ प्रतिक्रिया द्यावी.

एग्झॅक्ट्ली!
यापेक्षा वेगळ्या शब्दांत मत मांडता येत नाही.

श्रीकृष्ण सामंत's picture

20 Jun 2008 - 11:11 pm | श्रीकृष्ण सामंत

नको म्हणू रे मनुजा!

हाच ब्लॉग बरा का तोच ब्लॉग बरा हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. निर्मिती ही निसर्गाची मानवाला दिलेली देणगी आहे.निसर्गात सुद्धा व्हरायटी असते.पण कॉपी कधीच आढळणार नाही.दोन जुळ्या भावंडात सुद्धा किंचीत असा फरक असतो.हे निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे.

प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे
सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे
गुलाब जाई जुई आणि मोगरा
घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा
नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे

नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
जा तुही करीत निर्मिती
मात्र
करू नको कॉपी दुसऱ्याची

श्रीकृष्ण सामंत