ही विसंगती का?

शेणगोळा's picture
शेणगोळा in काथ्याकूट
20 Jun 2008 - 9:39 am
गाभा: 

आदाब!

ही वाक्ये पाहा -

"काय रे, घरी इतकी छान बायको असताना बाहेर शेण का खातोस?"

किंवा,

"इतका साधा, सज्जन आणि चांगला नवरा असून ती ऑफिसातल्या बॉसबरोबर शेण खाते!"

किंवा,

"असं करू नकोस, लोकं तोंडात शेण घालतील!"

अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो. ह्या वाक्यांतून शेण हा काहितरी वाईट, निंदनीय प्रकार आहे असा अर्थ निघतो.

आता ही वाक्ये पाहा -

"शेणाने अगदी छान सारवलेलं घर!"

किंवा,

"शेणाने अगदी छान सारवलेल्या जमिनीचा एक हवाहवासा वाटणारा वास आणि जाणवणारा तो नैसर्गिक स्पर्श!"

इथे शेण म्हणजे काहितरी एक मंगलदायी, घराचे सौंदर्य वाढवणारा प्रकार आहे असा अर्थ निघतो.

वरील दोन्ही प्रकारच्या वाक्यात 'शेण' या पदार्थाच्या अर्थाबद्दल विसंगती दिसते. ही विसंगती का? कुणी सांगू शकेल काय?

शुक्रिया!

आपल्या सर्वांचाच,
शेणगोळा.

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

20 Jun 2008 - 9:41 am | भडकमकर मास्तर

उत्तम निरीक्षण ..पण उत्तर माहित नाही.... :)
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ऋचा's picture

20 Jun 2008 - 9:44 am | ऋचा

माहित नाही

:( :(

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

सहज's picture

20 Jun 2008 - 9:48 am | सहज

उत्तम निरीक्षण

हं शेणा शेणात फरक करतात लोक. अजुन काय? :-)

भाग्यश्री's picture

20 Jun 2008 - 9:53 am | भाग्यश्री

मेबी ते त्या गाय किंवा म्हशीवर अवलंबून असावं !! :))

http://bhagyashreee.blogspot.com/

बेसनलाडू's picture

20 Jun 2008 - 10:09 am | बेसनलाडू

दृश्य,स्पर्श,गंध आणि चव(खाणे) यातला फरक. गंध हवाहवासा वाटणारी,स्पर्श सुखावह असलेली वस्तू खआण्यायोग्य असेलच/असली(च) पाहिजे असे नाही.त्यामुळे अशी खाण्यायोग्य नसलेली वस्तू(ही) खायला लागणे (तशी पाळी येणे) म्हणजे काहीतरी अयोग्य/निंद्य याचे द्योतक. मग ती वस्तू दिसायला,हुंगायला,हात लावायला कितीही चांगली असो,असे काहीसे असावे असे वाटते.
(अंदाजपंचे)बेसनलाडू

अभिज्ञ's picture

20 Jun 2008 - 10:09 am | अभिज्ञ

पहिल्या वाक्यांत शेण हे खाण्याच्या द्रुष्टिने बघितले जात असावे.
तसे बोलणा-याला शेणाच्या चवीची कल्पना असावी.
तर दुस-या वाक्यांत शेण हे सारवण्यासाठी वापरण्याचा संदर्भ आहे.

तुमच्या नावातच शेण आहे ,ते आम्हि कुठल्या अर्थाने पहायचे? किंवा ,तुम्हि ते कुठल्या अर्थाने घेतले आहे?

शेणावर सुध्दा विधायक चर्चा होते आहे(?) ,हे हि नवलच!

चालु द्यात.

धमाल मुलगा's picture

20 Jun 2008 - 11:22 am | धमाल मुलगा

अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो. ह्या वाक्यांतून शेण हा काहितरी वाईट, निंदनीय प्रकार आहे असा अर्थ निघतो.

इथे शेण ही संज्ञा विष्ठा ह्या अर्थाने वापरली जाते. झोपडपट्टीत रांगड्या भाषेत बोलणारे बर्‍याचदा 'शेण' ऐवजी 'गू' असा विष्टेलाच असलेला दुसरा किळसवाणा शब्द वापरतात...त्यावरुन ही कल्पना करता येते.

इथे शेण म्हणजे काहितरी एक मंगलदायी, घराचे सौंदर्य वाढवणारा प्रकार आहे असा अर्थ निघतो.

ह्या ठिकाणी मात्र शेण हा शब्द फक्त गोमय - गाईची विष्ठा ह्या अर्थानं वापरला जातो. गोमयाच्या औषधी /बहुगुणी वैशिष्ट्यं सध्यातरी आठवत नाहीत, पण त्या एका कारणास्तव आणि दुसरं म्हणजे गाय ही देवस्वरुप मानल्यामुळे आणि जसं गोमुत्र मुंजीच्या वेळी प्यायला देतात किंवा इतर काही घटनांनंतर घरात शिंपडतात कारण त्याचे औषधी गुण, तसंच शेणाबद्दलही.

ध्रुव's picture

20 Jun 2008 - 12:34 pm | ध्रुव

हेच वाटत आहे.
--
ध्रुव

नितीनमहाजन's picture

20 Jun 2008 - 12:11 pm | नितीनमहाजन

यावरून सहज आठवले:
एक्ट्याने खाल्ले तर शेण :( व सर्वांनी एकत्र बसून खाल्ले तर श्रावणी :) असे पूर्वी म्हणायचे.
वस्तू तीच पण संदर्भ बदलतो व त्याचा अर्थही बदलतो.

अरुण मनोहर's picture

20 Jun 2008 - 2:24 pm | अरुण मनोहर

शेणाच्या दोन अर्थाविषयी तुमचा प्रश्न वाचून मराठी भाषेच्या द्वी अर्थी शब्दसंपत्तीचा पुरेपुर कीस काढणारे महान लोकप्रीय कलाकार दादा कोंडके ह्यांची आठवण झाली. त्यांच्या चित्रपटात द्वी अर्थी शब्दांतून चावट गोंधळ उडवल्यावर सेन्सॉर कडून चित्रपटाची परवानगी मिळवण्याकरिता त्यांचे बोर्डाच्या सदस्यांशी खूपदा वाद विवाद होत. आपल्या हजरजबाबी स्वभावानुसार ते ताबडतोब चोख उलट जबाब देऊन सेन्सॉरला निरूत्तर करीत व परवानगी मिळवीत असत.

त्यांच्या आत्मकथन पुस्तकात शेणसार बोर्ड ह्या चपखल मथळ्याचे एक पूर्ण प्रकरण ह्या मजेदार वादविवादांविषयी आहे.

आता शेणसार बोर्ड हे चित्रपटातले शेण बाजूला सारून चांगला भाग प्रेक्षकांना दाखवते, की
नको ते कट्स करून चांगल्या कलाकृतीवर शेण सारते
ह्यामधले कोणते खरे आहे?

डॉ.प्रसाद दाढे's picture

20 Jun 2008 - 5:51 pm | डॉ.प्रसाद दाढे

शेणाची चव कशी लागते व ते कसे पचवतात ह्यावर आपले महान राजकीय पुढारी चा॑गले भाष्य करू शकतील..

अविनाश ओगले's picture

20 Jun 2008 - 8:54 pm | अविनाश ओगले

एक्ट्याने खाल्ले तर शेण व सर्वांनी एकत्र बसून खाल्ले तर श्रावणी असे पूर्वी म्हणायचे.

हे वाक्य वि.आ.बुवा यांच्या साहित्यात कुठेतरी वाचले असावे असे वाटते. त्या आधी आणखी उदाहरणे होती. एकाने दुसर्‍याचा जीव घेतला की खून, अनेकांनी एकमेकांचा घेतल की युद्ध. एकजण युद्धातून पळाला की पळपुटा, सगळे मिळून पळाले की यशस्वी माघार.
आणि... एक्ट्याने खाल्ले तर शेण व सर्वांनी एकत्र बसून खाल्ले तर श्रावणी ...

एडिसन's picture

20 Jun 2008 - 11:15 pm | एडिसन

१.'शेण खाणे' हा वाक्प्रचार सामान्यतः व्यभिचार दर्शवण्यासाठी वापरला जातो. 'अपयश येणे' हाही अर्थ सभंवतो. अशा वेळी context वरून अर्थ लावावा. ;)
२.'तोंडात शेण घालणे' हा वाक्प्रचार 'अब्रू जाणे' या अर्थी वापरला जातो.
३.'शेण सारवणे' हे शब्दशः शेण सारवणेच असते. दुसरा काही अर्थ अभिप्रेत असेल असे वाटत नाही.
इथे विसंगती काहीच नाही. 'शेण' शेणच रहाते. वाक्याच्या context वरून आणि बरोबर येणार्‍या खाणे, सारवणे या शब्दांमुळे विविध अर्थ होतात. यालाच मराठीचे सौंदर्य म्हणा हवं तर..

Life is Complex, it has a Real part & an Imaginary part.

अनिल हटेला's picture

22 Jun 2008 - 12:01 am | अनिल हटेला

नो कोमेन्ट्स !!!

नाखु's picture

25 Jun 2008 - 9:36 am | नाखु

बिचार्‍या गोमातेला सुद्धा भंडावणारा प्रश्न......

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"