युवीच्या अर्धशतकापुढे रिकीचे शतक हरले....

प्रशांत's picture
प्रशांत in काथ्याकूट
24 Mar 2011 - 11:16 pm
गाभा: 

युवीच्या अर्धशतकापुढे रिकीचे शतक हरले....
आणि गतस्पर्धेतल्या पराभवाचा पुरेपुरे 'बदला' घेवुन भारतीय संघ सेमिफायनल मधे पोहचला...

दे घुमाके...

प्रतिक्रिया

भारत जिंकला, बदला घेतला आनंद आहेच!

रिकी कितीही हरामखोर, माजखोर वगैरे असो मला तो आवडत नाहीच पण त्याची आजची खेळी एक मास्टरक्लास अ‍ॅक्ट होता. नवशिक्या बॅट्समनसाठी प्रेशरखाली खेळताना संघाला कसं सावरायचं याचं एक आदर्श उदाहरण होतं. 'रायझिंग टू द ओकेजन' वगैरे म्हणतात त्यातलं.. :)

गणपा's picture

24 Mar 2011 - 11:56 pm | गणपा

रिकी कितीही हरामखोर, माजखोर वगैरे असो मला तो आवडत नाहीच पण त्याची आजची खेळी एक मास्टरक्लास अ‍ॅक्ट होता.

सहमत

टारझन's picture

25 Mar 2011 - 12:09 am | टारझन

पण ९१ वर आउट होता. दिल्या गेला नाही . डिट्टो समोर समोर होता स्टंप च्या .. त्यामुळे आमच्या भज्जी ला विकेट मिळाली नाही ;(

गणपा's picture

25 Mar 2011 - 12:19 am | गणपा

चालायच रे टार्‍या.
आबा सांगुन र्‍हायलेत ना की बडे बडे मॅचों में ऐसी छोटी छोटी घटनाए होतीच हय. ;)
हा प्रतिसाद आज जिंकलो म्हनुन, अन्यथा वेगळा दिसला असता.

मेघवेडा's picture

25 Mar 2011 - 12:36 am | मेघवेडा

चालायच रे टार्‍या.

आज रिव्ह्यू सिस्टीम, हॉकआय टेकनॉलॉजी इ. मुळे तो बॉल स्टंपवर जात होता हे आपल्याला कळतं पण ऑन फील्ड अंपायर्सना त्याक्षणी डिसिजन्स घ्यायची असतात. त्यात भज्जी अराऊंड द विकेट टाकत असल्याने थोडा बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनला मिळणारच होता. एवढं तेवढं चालायचंच. :)

हाही प्रतिसाद आज जिंकलो म्हणूनच, अन्यथा लिहिलाच नसता. ;)

ज्ञानेश...'s picture

25 Mar 2011 - 12:19 am | ज्ञानेश...

कांगारूंचा माज उतरला.
आता टारगेट पाकडे !!

Tomorrow, SA will meet NZ at Mirpur,

and....

Australia will meet West Indies at the AIRPORT !! ;)

प्रीत-मोहर's picture

25 Mar 2011 - 7:33 am | प्रीत-मोहर

सुपरलाईक!!!

वेदनयन's picture

25 Mar 2011 - 12:24 am | वेदनयन

नरेंद्र मोदी प्रेक्षकांत बसलेले असतांना आपण हरण्याचा चान्सच नाही.

आपल्याला तर युवराजची खेळी आवडली बुवा. युवराज म्हणे पुणे वॉरियरचा (IPL) कर्णधार होणार आहे.

मोहालीत तर राडा होणारच....

आत्मशून्य's picture

25 Mar 2011 - 4:05 am | आत्मशून्य

फूल्टू राडाच होणार.... काहीही झाले तरी.......

नरेंद्र मोदी यांना आपल्या फटकेबाजीवर याऽहू करता येणार नव्हते. त्यांचे अंगरक्षक शेजारी बसले होते. शेवटच्या चार बॉलांना ते अंगरक्षकच इन्व्हॉल्व्ह होवून म्याच बघत होते आणि मोदी स्वसंरक्षण करत होते.;) मला एवढेच दिसले कारण शेवटचे चार बॉलच म्याच पाहिली.;) अंबानी कुटुंबीय आनंद व्यक्त करताना दिसले.
मोहालीमध्ये संरक्षण किती लागेल आणि काय होइल असे वाटते आहे. अर्थात ती म्याचही पाहणार नाहिये.

५००० पाकडे येणार त्या दिवशी म्याच पहाण्यासाठी...
फुल्ल टाईट सिक्युरिटी असायला पायजेल.....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2011 - 4:33 am | निनाद मुक्काम प...

मनमोहन खुद्द सामना पाहायला येणार आहे तेव्हा सुरक्षा ......
सिंग इज किंग

चतुरंग's picture

25 Mar 2011 - 12:33 am | चतुरंग

कॅप्टन्स इनिंग्ज होती! त्याने जिंकायचेच ह्या निर्धाराने स्वतःच्या शतकाने पाया रचून दिला. निश्चितच कौतुकास्पद खेळला.
शेवटी आपल्याला जिंकायला चार धावा राहिलेल्या असताना त्याच्या चेहर्‍यावर क्लोजप घेतला तेव्हा बिचारा अगदी रडवेला झाला होता!
आजच्या सामन्यात आपले क्षेत्ररक्षण कमालीचे चांगले झाले. फिरकी गोलंदाजांनी कामगिरी चांगली केली आणि शेवटी फलंदाजीने कळस चढवला. टीम एफर्ट्स!

प्रशांत's picture

25 Mar 2011 - 9:35 am | प्रशांत

>>>टीम एफर्ट्स!

१००% सहमत...

रेवती तुम्हि असा नाहि करु शकत. तुम्हाला म्याच बघायलाच हवी

स्पा's picture

25 Mar 2011 - 2:10 pm | स्पा

बद्लेकि कि आग

मालोजीराव's picture

25 Mar 2011 - 6:13 pm | मालोजीराव

चावटमेला's picture

25 Mar 2011 - 6:52 pm | चावटमेला

द्येवा म्हसूबाराया, कोंबडं असूदे, बकरं असूदे, मेंढरं असूदे, काय म्हन्चीला त्ये कापतु, पर त्येवढं त्या पाकड्यांना हरवू दे रं, काय माती खायाची असल ती फायनल मदी खावा, त्ये चालंल वो ,पर ह्यो येक डाव जिंकाच राव, माजा जीव लैच्च टांगनीला लागून रहायलाय जनू ;)

आता पाकड्यांना धूळ चाराच

उपांत्यपूर्व व त्याआधिचे सामने पाकिस्ताने सहजगत्या आणि मोठ्या फरकाने जिंकलेत. भारताची मात्र सामने जिंकता जिंकता दमछाक झालेली आहे. जाहिराती व मॉडेलींगमध्ये आपले खेळाडू इतके लटकलेले आहेत किं मैदानावर खेळतांना आपण मॉडेलिंगच करतोय असं त्यांना वाटतं त्याला आवर कसा घालणार?
धर्मयुद्धचे स्पिरिट अंगात आणल्याशिवाय पाकला हरवणे मुश्कील. पण वर्ल्ड कप पाकिस्ताने जिंकला काय वा श्रीलंकेने तो भारतीय उपखंडात राहिला याचा आनंद साजरा करायला आता आपण शिकुया.

श्रीरंग's picture

28 Mar 2011 - 11:30 am | श्रीरंग

पण वर्ल्ड कप पाकिस्ताने जिंकला काय वा श्रीलंकेने तो भारतीय उपखंडात राहिला याचा आनंद साजरा करायला आता आपण शिकुया.

हे म्हणजे अगदी 50 देश क्रिकेट खेळत असल्यासारखं बोललात्.

अविनाश कदम's picture

30 Mar 2011 - 12:40 am | अविनाश कदम

आयसीसी ने क्रिकेटचा बिजनेस वाढवायचं ठरवलंय त्यामुळे नविन नविन देशात क्रिकेटचं प्रमोशन जोरात सुरू आहे. आताच पंधरा/सोळा देश झालेत लवकरच हाफ सेंच्युरी लागेल.