काह्ही केल्या आवडतच नाही! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
18 Jun 2008 - 11:21 am
गाभा: 

राम राम मंडळी,

नाट्य व चित्रपट कलावंतांसंदर्भात हा काथ्याकूट आहे हे सर्वप्रथम नमूद करतो आणि या काथ्याकुटाचा प्रवास याच मंडळींसंदर्भात चालावा अशी विनंतीवजा अपेक्षा करतो!

तर मंडळी, काही काही नाट्य व चित्र कलावंत हे त्यांच्या त्यांच्या जागी गुणीच असतात. त्यांनी आपलं काहीच बिघडवलेलं नसतं. एक कलाकार म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल उचित आदरही असतो.

पण...

यापैकी काही कलावंत हे आपल्याला काह्ही म्हणजे काह्ही केल्या आवडतच नाहीत/नसतात. काय असेल ते असो पण त्यांना पडद्यावर पाहिलं की अगदी नक्को वाटतं! :)

हा कथ्याकूट हा याच मंडळींची नांवे लिहिण्याकरता मी सुरू करत आहे. आपण नेहमी आपल्या आवडीबद्दल/आवडणार्‍या कलावंतांबद्दल लिहीत असतो, या निमित्ताने एकदा आपल्या नावडीबद्दलही इथे लिहू या. बघुया तरी, कुणाला कोण आवडत नाही ते! :)

चला, तर माझ्यापासूनच सुरवात करतो. तूर्तास जी नांवं चटकन आठवत आहेत ती इथे लिहीत आहे. आपणही भाग घेऊन आपापल्या नावडी कळवा! :)

खालील मंडळी मला कधीच सहन होत नाहीत -

अनिलकपूरचे दोन्ही भाऊ,
संध्या,
प्रदिपकुमार,
आशिकीफेम राहूल रॉय,
जॉय मुखर्जी,
सचिन(अपवाद 'हा माझा मार्ग एकला, पण त्यानंतर कधीही आणि केव्व्हाच आवडला नाही!),
चित्रपटात काम करणारी शांतारामबापूंची अजून एक बायको (तिचं नाव आता आठवत नाही!),
इत्यादी इत्यादी इत्यादी...

बराय तर मंडळी, आता आपला निरोप घेतो. बरीचशी मंडळी मिपाचा दिवाळी अंक काढा म्हणून मागे लागली आहेत. त्या संदर्भात नीलकांत, डॉ बिरुटे, चतुरंग, मुक्तराव, प्रियाली, प्राजू, नीलकांत इत्यादी माझ्या काही मित्रमैत्रिणींशी विचारविनिमय करायचा आहे! :)

"वीस रुपये रोजी, रोजी दोन टाईम चाय अन् रोजी एक शिग्रेट" या बोलीवर काही संपादक मिळतात का तेही पाहिलं पाहिजे! :)

आपला,
(नावडता) तात्या.

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

18 Jun 2008 - 11:27 am | धमाल मुलगा

संध्या,
मिथुन दादा,
जॉनी लिव्हर,
सुनील शेपटी (शेट्टी हो),

सध्यातरी इतकेच...
बाकीची लिश्ट सवडीनं देतो ;)

विसोबा खेचर's picture

18 Jun 2008 - 11:31 am | विसोबा खेचर

हे काय धमाल्या, तुला आमचा मिथूनदा आवडत नाही? ज्जा, आपली कट्टीफू... :)

आपला,
(मिथूनप्रेमी) तात्या.

प्राजु's picture

18 Jun 2008 - 3:37 pm | प्राजु

मलाही..
१. मिथुन
२. प्रदीप कुमार
३. भारत भुषण
४. बबीता
५. शमिता शेट्टी
६. मल्लिका शेरावत
७. राखी सावंत
८. संजय कपूर
९. सुनिल शेट्टी
१०. सल्मान खान

अजून बरीच मोठी आहे यादी तूर्तास इतकेच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

11 Jul 2008 - 11:31 am | टारझन

***** अभिषेक-ऐश्वर्या-जया-अमिताभ चढत्या क्रमाने. (अमिताभ आधी आवडायचा .. पण आता तो फक्त हार्पिक च्या जाहिरातीत यायचा बाकी आहे. वेळीच निव्रुत्त व्हायचे असते) , अमिर-सलमान सोडून बाकीची खानावळ
तो बैल अभिषेक आणि त्याची बाय्को अर्रार्रारा नुसत्या विचारानेच जळफळाट,
राखी बिखी सार्ख्या पालापाचोळ्याला कंसिडर न केलेलेच ऊत्तम

बेष्ट काथ्याकूट टॉपीक तात्या ... जियो

तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

अमोल केळकर's picture

18 Jun 2008 - 11:28 am | अमोल केळकर

मराठीतील न आवडणारा कलाकार-
कुलदीप पवार

बॉलिवुड - शहिद कपुर

विसोबा खेचर's picture

18 Jun 2008 - 11:29 am | विसोबा खेचर

बच्चनसाहेबांचा मुलगा. हा प्राणी मला कधीच सहन झाला नाही! :(

मराठी_माणूस's picture

18 Jun 2008 - 11:34 am | मराठी_माणूस

राज कपूर शम्मि कपूर शशि कपूर
दिलिप कुमार

धमाल मुलगा's picture

18 Jun 2008 - 11:37 am | धमाल मुलगा

अर्रर्र..

छोटा बच्चनला विसरलोच की...
च्यामारी ते येडं माझ्यासाठी इतकं नगण्य आहे की नावडता कलावंत कोण? असं विचारल्यावर मला त्याचं नावही आठवलं नाही..

हृतिक पण बर्‍याच्दा डोक्यात जातो.

तात्याशेठ,
मिथुन मला फक्त "क्रिष्नन् अय्यर यम.ये." आणि स्वामी परमहंस म्हणून भावला. नाहीतर बाकी त्याचं किनर्‍या आवाजातलं 'अबे ए..' वगैरे आणि फाटके डायलाग आज्याबात नाय आवडत.

पण अशी कट्टी नाय करायची तात्यानुं...
संध्या, छोटा बच्चन माझ्यापण डोक्यात जातात ना...है का नै आपलं एकमत?

अनिल हटेला's picture

18 Jun 2008 - 11:39 am | अनिल हटेला

गुलशन कुमार ( सारखा कठल्याही कारनाने पुढे पुढे करायचा, गेला एकदचा)
त्याचा विचीत्र भाउ किशन कुमार

शहीद कपूर

बॉबी देवोल

करी ना ~~~~~

शाह रुख

वगैरे बरेच नमूने आहेत.....

चावटमेला's picture

18 Jun 2008 - 11:47 am | चावटमेला

एकता कपूरचा भाऊ
विवेक ओबेरॉय
शाहीद कपूर
करीना
आमीर खानचा भाऊ(जो आजिबात शोभत नाही आमीर खानचा भाऊ म्हणून)
राहुल रॉय
राखी सावंत

बाकी देतो सवडीने..
http://chilmibaba.blogspot.com/

आर्य's picture

18 Jun 2008 - 11:56 am | आर्य

तात्या भारी टॉपीक काढलाय !

राहुल रॉय हा तर १ नं वर आहे आणि तो हिमेष का कोण
कपुरांची करीना पण बोअर आहे.
कधी कधी लक्ष्याचाही पणचट पणा आवडत नाही
मंदिरा बेदी, किमी काटकर
आणि सर्व लोक जे आज काल त्या भुक्कड रीयालीटी शो मधे असतात

आवड आपली आपली ;)

ऋचा's picture

18 Jun 2008 - 12:04 pm | ऋचा

हींदी

शक्ती कपूर
गोविंदा
छोटा बच्चन
करीना......

आता इतकीच आठवत आहेत.

मराठी

अलका कुबल
लक्ष्या
भरत जाधव
......................
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

स्वाती दिनेश's picture

18 Jun 2008 - 12:08 pm | स्वाती दिनेश

चित्रपटात काम करणारी शांतारामबापूंची अजून एक बायको (तिचं नाव आता आठवत नाही!),
जयश्री किवा राजश्री .. ह्यातील एक नाव बायकोचे आणि एक मुलीचे आहे.कोणते कोणाचे ते आठवत नाही.
न आवडणारे कलाकार-
भा.भू,(ह्याच्याबरोबर मधुबाला पाहताना जीव खालीवर होतो.)
प्रदीपकुमार सारखे ठोकळे.
जॉय मुखर्जी,जितेंद्र आणि त्याच्यासारखे कवायतवीर
नवीन नटांमध्ये - (नावे सुध्दा आठवत नाहीत चटकन.. )
बटबटीत अभिनय(?) करणारे सगळेच..
यस्स.. शक्ती कपूर सहन होत नाही.

रोचीन's picture

19 Jun 2008 - 5:08 pm | रोचीन

>>>>शांतारामबापूंची अजून एक बायको >>>>
जयश्री
मुलगी---राजश्री
>>>>भा.भू,(ह्याच्याबरोबर मधुबाला पाहताना जीव खालीवर होतो>>>>
:( सहमत !!!!!!!

ऋचा's picture

18 Jun 2008 - 12:11 pm | ऋचा

आता आलेल्या बाल कंपनीत
जवळ्ज्वळ सगळीच (आई-बापाचा हात धरुन आलेली)

त्यातल्या त्यात रोशन बरा
बाकी सगळे एक से एक नग!!

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

भाग्यश्री's picture

18 Jun 2008 - 12:15 pm | भाग्यश्री

तात्या, तुमच्या यादीमधे हिमेश रेशमिया नाही?? मी एक्स्पेक्ट करत होते !!
माझी यादी पण बरीच मोठी आहे..

करीना कपूर, ऐश्वर्या राय, सेलिना जेटली,कोएना मित्रा आणि तत्सम अल्ट्रा-मॉडर्न बाहुल्या, अभिषेक बच्चन, कधी कधी अमिताभ, तुषार कपूर, सलमान खान, रेशमिया, तो गाणारा अभिजित(येस बॉस वाला), महागुरू-बांदेकर बिग्ग्ग टाईम डोक्यात जातात..
एकता कपुर च्या सिरीयल मधे काम करणारे सगळे, आणी खुद्द एकता कपूर.. मराठी मधले, अमृता सुभाष(आधी बरी होती ती), ती सारखे मोठ्ठे-मोठ्ठे डोळे करून पाहणारी श्वेता का कोणीतरी टीव्ही-ऍक्ट्रेस(अवघाची संसार मधली, कानात बांगड्या घालणारी!),या सुखांनो या मध्ला विक्रम गोखले, अरे देवा खूप मोठी यादी आहे!

उरलेली नंतर देते ! :)

http://bhagyashreee.blogspot.com/

II राजे II's picture

18 Jun 2008 - 2:55 pm | II राजे II (not verified)

"करीना कपूर, ऐश्वर्या राय, सेलिना जेटली,कोएना मित्रा आणि तत्सम अल्ट्रा-मॉडर्न बाहुल्या, अभिषेक बच्चन, कधी कधी अमिताभ, तुषार कपूर, सलमान खान, रेशमिया, तो गाणारा अभिजित(येस बॉस वाला), महागुरू-बांदेकर बिग्ग्ग टाईम डोक्यात जातात.."

हेच म्हणतो...

बाकी... मा तो बॉबी देयोल ही आवडत नाही ना त्याचा तो भाऊ ;)

राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)

ऋचा's picture

18 Jun 2008 - 12:18 pm | ऋचा

ती अमृता सुभाष तर इतकी डोक्यात जाते ना की बास.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

आनंदयात्री's picture

18 Jun 2008 - 12:20 pm | आनंदयात्री

तो वहिनी वहिनी बिनडोक आदेश बांदेकर ... नुसता आवडत नाही असे नाही तर तो दिसल्या दिसल्या फाट्टकन मुस्काटात हाणावीशी वाटते त्याच्या !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jun 2008 - 2:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तो वहिनी वहिनी बिनडोक आदेश बांदेकर ... नुसता आवडत नाही असे नाही तर तो दिसल्या दिसल्या फाट्टकन मुस्काटात हाणावीशी वाटते त्याच्या !

बरं, तो जिथे जातो तिथे ब-याचदा, दुर्दैवाने महिलाही तशाच बावळट भेटतात !!!

रम्या's picture

11 Jul 2008 - 2:49 pm | रम्या

अगदी बरोबर, होम मिनिस्टर मधे आणि त्या एका पेक्षा एक मध्ये आपल्या निरर्थक बडबडण्याने डोक्याची पार भजी करतो.
रम्या

गीतांजली's picture

18 Jun 2008 - 12:29 pm | गीतांजली

अकला बुकल (अलका कुबल)
माशा मारेत (आशा पारेख)

धमाल मुलगा's picture

18 Jun 2008 - 12:33 pm | धमाल मुलगा

अकला बुकल (अलका कुबल)

=))
लै लै भारी !!!!!

पण ते अलका'ला' बुकल पाहिजे नै का?

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

महाभारतातल्या कर्णाला जशी जन्मजात कवचकुंडले होती तशी अलका कुबल जन्मजातच मुंडावळ्या घेउनच आली असावी

वरदा's picture

18 Jun 2008 - 6:34 pm | वरदा

नाही ती आपटून धोपटून पिळ पिळ पिळलेली माहेरची साडी, हळदी कुंकु सगळच घेऊन आलेय्..आणि फक्त रडण्याचा फॉर्म्यूला....

अन्या दातार's picture

19 Jun 2008 - 5:16 pm | अन्या दातार

आपटून आपटून फाटलेली,
धोपटून धोपटून विरलेली

माहेरची साडी

भाग्यश्री's picture

18 Jun 2008 - 12:35 pm | भाग्यश्री

अकला बुकल !!! फार भारी !!! =))
http://bhagyashreee.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

18 Jun 2008 - 12:30 pm | स्वाती दिनेश

बरे आहे बाबा आमच्याकडे ह्यातली कोणतीच चॅनेले दिसत नाहीत ते.पूर्वी मला वाइच वाईट वाटायचं की आपल्याला कोणतेच मराठी,हिंदी कार्यक्रम पाहता येत नाहीत्,पण आता हे सगळे बांदेकर,अमृता सुभाष ,एकापेक्षा एक..महागुरु आणि मंडळी .. वाचल्यावर वाटलं बरंच आहे आमच्याकडे हे काही नाही दिसत ते..

कुंदन's picture

18 Jun 2008 - 12:38 pm | कुंदन

--संत संजुबाबा गांधीगिरीवाले
--अजिंक्य देव

बाकी , स्वाती ताईंशी सहमत.
आमच्याकडे ह्यातली कोणतीच चॅनेले दिसत नाहीत त्यामुळे सध्या सुखी आहे.

ऋचा's picture

18 Jun 2008 - 12:44 pm | ऋचा

प्रिया अरुण
प्रत्येक मराठी सिनेमातली १ तद्दन कंटाळवाणी बाई,
विजय चव्हाण
आताच्या सिनेमात नको तितके टुकार काम (मुन्नाभाई s.s.c)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

अन्या दातार's picture

18 Jun 2008 - 1:18 pm | अन्या दातार

अभिनेते (????????? =)) =)) )
तो हरामखोर हिम्मेश
महेश कोठारे
लक्ष्मीकांत बेर्डे
सल्लू बेवडा
अजिंक्य देव

अभिनेत्र्या (??????????? =)) =)) )
मंदिरा(खरेतर मदिरा) बेदी
ही बाई जिला क्रिकेटमधलं काही कळत नाही, आणि कॉमेंट्री करत सुटली होती; अर्थातच पाचकळ
खाकी सावंत(राखी सावंत)
केकता कपूर

प्रियंका's picture

18 Jun 2008 - 1:32 pm | प्रियंका

आमीर खानचा भाऊ
एकता कपूरचा भाऊ
राहुल रॉय
किशन कुमार
विनोद कुमार
विनोद खन्ना
शत्रुघ्न सिन्हा
गोविंदा
अतुल अग्निहोत्री
बबिता
किमी काटकर
रिया सेन
करीना कपूर
कोएना मित्रा
राखी सावंत
आदी.........

बच्चनसाहेबांचा मुलगा. हा प्राणी मला कधीच सहन झाला नाही!

X(

गुरू, युवा, सरकार, सरकार राज फेम "अभी" आम्हाला फार आवडतो हो!! ;)

अन्या दातार's picture

19 Jun 2008 - 5:18 pm | अन्या दातार

अहो प्रियंकाताई,
आता उरलयं तरी कोण? का तुम्हाला चित्रपटात काम करणारे लोक आवडतच नाहीत मुळी????????? :D

चारुता's picture

18 Jun 2008 - 2:01 pm | चारुता

आणि हिमेश रेशमिया .....

नितीनमहाजन's picture

18 Jun 2008 - 2:03 pm | नितीनमहाजन

पूर्वीच्या पैकी:
भारत भूषण
प्रदीप कुमार
प्रेमनाथ
गोपीकॄष्ण (बाकी शास्त्रीय नर्तक म्हणून चांगला असेल पण "झनकझनक पायल बाजे" मध्ये नायक कोण व नायिका कोण हा मोठा घोळ आहे)
यांना आम्ही आमच्या कंपूत अभिनयाच्या क्षेत्रातील मैलाचे दगड म्हणतो.
साधना
आशा काळे

नवीन पैकी अनेकः
गोविंदा
सनी देओल व धाकटे बंधू (एकाच घरात एक मर्दानी देखणा व जनानी देखणा पुरूष असल्याचे एकमेव उदाहरण असावे.)
संजूबाबा
सुनील शेट्टी
शिल्पा शेट्टी
......

अन्या दातार's picture

19 Jun 2008 - 5:22 pm | अन्या दातार

मैलाचे दगड

=)) =)) =)) =)) =))
ह. ह. पु. वा

अवांतरः मग ठोकळ्या नायिकांना काय म्हणता???????

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Jun 2008 - 2:25 pm | ब्रिटिश टिंग्या

ह्याला विसरलात बरे! X(

हा रद्दड ऍक्टिंगमध्ये सगळ्यांचा बाप होता....आहे....अन् राहील! :)

कुंदन's picture

18 Jun 2008 - 6:46 pm | कुंदन

एका चित्रपटाच्या परिक्षणात वाचले होते राज बब्बर बद्दल
" हा जर डायलॉग बोलायच्या आधी नाक साफ करुन आला तर बरे होत जाईल"

=)) =))

भडकमकर मास्तर's picture

18 Jun 2008 - 2:45 pm | भडकमकर मास्तर

१.अभिनेता आणि गायक हिमेश ( त्याचं संगीत मात्र जिममध्ये व्यायाम करताना पार्श्वभूमीला ला बरं असतं)
२. संध्या : फारच त्रासदायक....
३. सलमान खान : चिंकारा , काळवीट आणि माणूस मारल्यानंतर तर फारच....
४. राखी सावंत
५. महागुरू आणि बांदेकर
६. चार दिवस सासूचे आणि वहिनीसाहेब मधली सर्व पात्रे
>>>>>

प्रदीपकुमार आणि भारतभूषण माझ्या डोक्यात जात नाहीत... ते गाताना दिसले की भूतदया, करूणा ( यांचं असं का झालं असेल ?) अशी भावना मनात दाटून येते...
सुहास भालेकर घोड्याची रेस खेळणारे श्रीमंत बिझिनेस्मन दाखवले होते एका सीरियलमध्ये ( जॉकी --- १९८८ / ८९) तेव्हाही मला इतकीच करूणा, भूतदया दाटून आली होती...

गोपीकॄष्ण (बाकी शास्त्रीय नर्तक म्हणून चांगला असेल पण "झनकझनक पायल बाजे" मध्ये नायक कोण व नायिका कोण हा मोठा घोळ आहे)
यावरून अरूण दाते यांच्या "शतदा प्रेम करावे " या आत्मचरित्रातली गोपीकृष्ण यांची गोष्ट आठवली...
मुंबईत अरूण दाते यांची गोपीकृष्ण यांच्याशी ओळख झाल्यानंतर ते गप्पा मारत त्यांच्याबरोबर संध्याकाळी फिरायला जात असत... त्यावेळी त्यांचे हावभाव विचित्र वाटत असत, आणि इतर मित्रांकडून दाते यांच्याकडे नंतर त्याबद्दल विचारणा होऊ लागली... मग त्यांनी त्यांच्याबरोबर फिरणे थांबवले...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Jun 2008 - 8:37 pm | llपुण्याचे पेशवेll

सलमान खान : चिंकारा , काळवीट आणि माणूस मारल्यानंतर तर फारच....
लाख बोललात मास्तर. मला तो संजय दत्त नावचा घोड्यासारखा चेहरा असलेला माणूस देशभक्ति वगैरे म्हणायला लागला की डोक्यात जातो. तसाच तो सलमान खान एक नंबर नालायक. बिलकुल आवडत नाही. चायला असेल करत जरा बरा अभिनय म्हणून काय त्याला काहीही करायचे परमिट मिळते काय? मुन्नाभाई सिरिज मी फक्त सर्कीट साठी पाहीली. मस्त. बोमन इराणी चा पण अभिनय आवडला आपल्याला. :)

(संजूबाबा आणि सलमान जाम डोक्यात जाणारा)
पुण्याचे पेशवे

नन्या's picture

18 Jun 2008 - 3:00 pm | नन्या

मल्लीका शेरावत,
ईम्रान हाशमी,
राज बब्बर,
अरुणा ईराणी,
कादर खान,
लक्शा

काय करणार हल्ली गोविंदा, सर्किट (म्हणजे दोन्ही), परेश रावल इ. गेला बाजार झाले आहेत. खदखदून हसू येत नाही अभिनय पाहून त्यांचे. तेव्हा खूप काही विनोदी बघायचे असेल तर हटकून या लोकांचे चित्रपट पाहावेत. राखी सावंत तर खूपच लाडकी हो आमची, जरा मूड खराब असेल तर राखीचा विडीओ (विद हर आल्टर्ड नोज) बघतो आम्ही. खात्री नसेल तर बघा, यापेक्षा विनोदी काही सापडेल का?

बरं ते दिवाळी अंकाचं काय म्हणालात? मिपावर "दुधात पडली माशी" प्रकारचे लोक आहेत का? नसल्यास बोलावून घ्या.... पत्र पाठवायचे का पोष्टमनकडून अरर्रर्र! पोष्टमन कडे? त्यांच्याशिवाय दिवाळी अंक काढण्यास काही मजा नाही.

भडकमकर मास्तर's picture

18 Jun 2008 - 3:36 pm | भडकमकर मास्तर

राखी सावंत..

वह पप्पी की कमाई खा रहा है....
=)) =)) =)) ______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

18 Jun 2008 - 4:23 pm | विसोबा खेचर

बरं ते दिवाळी अंकाचं काय म्हणालात?

अगं दिवाळी अंक काढा म्हणून काही मिपाप्रेमींचा आग्रह सुरू आहे...

मिपावर "दुधात पडली माशी" प्रकारचे लोक आहेत का?

सध्या नाहीयेत/नसावेत! मिपाच्या सुरवातीसुरवतीला असे काही लोक येथे होते पण तात्या त्यांना पुरून उरला. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या बारश्याच्या जेवणाचं निमंत्रण तात्याला दिलं होतं हे त्यांना ठाऊकच नव्हतं! :)

नसल्यास बोलावून घ्या.... पत्र पाठवायचे का पोष्टमनकडून अरर्रर्र! पोष्टमन कडे? त्यांच्याशिवाय दिवाळी अंक काढण्यास काही मजा नाही.

हो, बाकी काहीही म्हण, आमच्या पोष्ट्यागजाननाशिवाय मिपाच्या दिवाळी अंकाला काही मज्जा नाही बुवा! बाय द वे, अगं आता वर्ष पुरं व्हायची वेळ आली तरी अजून पोष्ट्याचा चांदीमयी आणि चकलीबद्दलचा पोटशूळ बरा व्हायला तयार नाही! :)

बाकी, तुझ्यावरदेखील पोष्ट्यागजाननाचा भारीच जीव हो! नुकताच त्याने तुला लिहिलेला सुखसंवाद वाचला. अंमळ मजा वाटली..:)

बाकी मिपाच्या दिवाळी अंक निघाला तर पोष्ट्याला ते समजेलच. तो कावळा रोज संध्याकाळी ज्ञानेश्वरी वाचून झाली की मिपावर खरडवह्या वाचायला येतो! :)

असो, आता पुढच्या गप्पा आपण व्य नि ने शिक्रेटली मारू. इथे विषयांतराबद्दल क्षमस्व.. :)

आपला,
(हलकट असला तरी प्रियालीचा मात्र खास मित्र असलेला) तात्या.

सुवर्णमयी's picture

19 Jun 2008 - 1:32 am | सुवर्णमयी

तात्या,
शेजारच्या घरात चालू असतो तोवर तमाशा बरा असतो. आपल्या घरात आला तर घर मोडकळीला येत. तेव्हा जरा सांभाळून असा आगाऊ आणि अनुभवाचा सल्ला.
इतरांच काय घेऊन बसलात? स्वभाव बदलतच नाही . बदलण अवघड जात. अपवाद फार कमी.
तुम्हाला तरी त्या लाडक्या आणि ज्याला सोडून आलात त्या शेजार्‍याच्या नावाचा जप केल्याशिवाय झोप लागते का?सारख तिथे काय होत याविषयी चिंता असते:)
आता या सगळी़कडे वावरणारे तुमच्यासारखे अनेक आहेत. ते सारखा अंदाज घेत असतात कुठे काय बिनसलय आणि कसे त्यावर मीठ चोळायचे. चालू द्या. शेवटी तात्या, मिपा कसे आणि कशामुळे चालवायचे हा तुमचा हक्क आणि प्रश्न.
(बाकी कुणा कुणाच्या बारशाला गेलात माहिती नाही, माझ्या बारशाला येतांना तुम्हाला कथलाऐवजी चांदीचे वाळे आठवले याविषयी फार आभारी आहे. )

काळा_पहाड's picture

18 Jun 2008 - 3:04 pm | काळा_पहाड

भारत भुषण
शत्रू
राज बब्बर
झिनत
जीवन
प्रेम चोपडा
राहुल रॉय आणि त्याची आशिकीची हिरोईन
किशन कुमार
संध्या
राखी सावंत
हिमेस
अतुल अग्निहोत्री
बबिता
किमी काटकर
करीना कपूर
कोएना मित्रा
सेलिना जेटली

काळा पहाड

काळा_पहाड's picture

18 Jun 2008 - 3:07 pm | काळा_पहाड

राज किरण
तो सिनेमात का असायचा ?
काळा पहाड

चावटमेला's picture

18 Jun 2008 - 3:13 pm | चावटमेला

प्रचंड मख्ख चेहर्याचा अभिनेता

ह्याच्याकडे पाहिल्यावर वाटते की हा एरंडेलाची अख्खी बाटली चढवून तर बसला नाही ना ?? :$
http://chilmibaba.blogspot.com

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Jun 2008 - 3:20 pm | ब्रिटिश टिंग्या

खरयं खरयं!

धमाल मुलगा's picture

18 Jun 2008 - 3:30 pm | धमाल मुलगा

मी असं ऐकलंय की तो चंदीगढच्या कुठच्याशा कालेजात इतिहासाचा प्राध्यापक होता म्हणे......

महागुरु आणि बांदेकर
ऐश्वर्या नार्वेकर आणि विक्रम गोखले (या सुखांनो या)
रुतुजा देशमुख (कळतनकळत)
आनंद अभ्यंकर (नाव नक्की माहित नाही. जो त्या पुनर्जन्माच्या सिरिअलमध्ये आजोबा झालाय तो)
विद्या बालन
करीना (जब वी मेट सोडून)
तब्बू
कुलदीप पवार
जयकिशन (भोजपुरी हिरो जो हिंदी सिरिअल्स / रॅलिटी शोज् मध्ये दिसतो)
स्मृती इराणी (सांस भी कभी बहु थी)
अभिषेक बच्चन
ऐश्वर्या राय
शेखर सुमन
अरे... आलोकनाथ राहिलाच की! (२४ X ७ एरंडेल तेल प्यायल्याचा चेहेरा)

आत्तातरी येवढेच आठवताएत..

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

मनिष's picture

18 Jun 2008 - 5:00 pm | मनिष

राखी सावंत
शिल्पा/शमिता शेट्टी
ईशा देओल - तिचे सावत्र भाऊ - फनी देवर आणि भाभी देवर (असेच काहीतरी आहे ना?) :)
शाहरुख खान (तरी काही सिनेमे आवडतात ह्याचे - जसे कभी हाँ, कभी ना)
आदेश बांदेकर (मुस्काटात मारणे योग्य)
सचिन पिळगावकर
लक्षा/अशोक सराफ
भरत जाधव
आशा काळे/अलका कुबल - खर तर अलका कुबल हे नाव नसून रडणार्‍या भुमिकांसाठी विशेषण आहे. :)
जोगिंदर सिंग (२०-२० फायनल आठवते आहे का?)
नवज्योत सिंग सिद्धू
प्रशांत दामले
निर्मिती सावंत
एकता कपूर
करन जोहर
फरदीन खान
जिम कॅरी - आधी मास्क मधे आवडला...नंतर फारच डोक्यात जायला लागला. विदेशी भरत जाधव म्हणा ना
क्रिस टकर - त्याचा आवाज...फार इरीटेटींग आहे.
प्रियांका चोप्रा...मदर टेरेसा बद्द्ल दिवे लावलेच होते, आता तर सगळाच उजेड आहे.
बिपाशा बसू
संध्या
प्रदीप कुमार
भारतभुषण
राज कुमार
विवेक ओबेरॉय
अजय देवगण - सगळ्यात चिडचिड होते त्याला चांगला अभिनेता म्हटला की
...
....
...

खूप आहेत अजून - तरीही राजकीय व्यक्तींना टाळलेच. :)

शितल's picture

18 Jun 2008 - 5:11 pm | शितल

मा़झी ही यादी मोठी आहे, मराठी तर अलका कुबल, लक्ष्या, अशोक सराफ, कु. पवार, सिरीअल मधले सगळे कलाकार.
आणि हि॑दीतर सुनील शेट्टी इतका डोक्यात जातो की, तो समोर आला तरी चॅनेल चे॑ज. अजुन बरीच आहे. पण नावे आठवत नाहीत.

अनामिक's picture

18 Jun 2008 - 8:02 pm | अनामिक

मिसळपाव खायला आजच सुरवात करतोय. मस्त गप्पा रंगलेल्या दिसताहेत इथे.

आदेश बांदेकर - याला तोंड दाबून बुक्क्यांचा मार द्यायला हवा.
संध्या - हिचा "जल बीन मछली" वरचा नाच बघा... कशी काय नटी झाली कळत नाही बॉ!
कु. पवार -डोक्यात जातो!
करीना - लईच माज हाय या पोरीत!
लक्ष्या, सराफ, महेश कोठारे.
कत्रीना कैफ - दिसायला कितीही भारी असेना, तोंड उघडू नये म्हणजे कमावलं!
सलमान खान - बेडकासारखे डोळे आणि बेडकासारख्या उड्या मारतो.

बाकी नंतर...

वरद's picture

18 Jun 2008 - 8:24 pm | वरद

इम्रान किश्मी
हिशेम
बॉबी देओल (त्याला बघितला की मला एक प्रश्न पडतो बॉबी हिरो होऊ शकतो तर मी का नाही)
सूनिल शेट्टी (हसतो की रडतो हेच कळत नाही)
एकता कपूर आणि फॉमिली..
**

......

बाकी उद्या ........

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Jun 2008 - 8:42 pm | llपुण्याचे पेशवेll

बॉबी देओल (त्याला बघितला की मला एक प्रश्न पडतो बॉबी हिरो होऊ शकतो तर मी का नाही)
हाहाहा.. खरे आहे. मला पण असेच वाटते. :)
(बॉबी पेक्षा बरा, पण हिरो नसलेला)
पुण्याचे पेशवे

धमाल मुलगा's picture

19 Jun 2008 - 9:52 am | धमाल मुलगा

वरद..
लैच्च भारी रे!!!

बॉबी देओल (त्याला बघितला की मला एक प्रश्न पडतो बॉबी हिरो होऊ शकतो तर मी का नाही)

=))

सूनिल शेट्टी (हसतो की रडतो हेच कळत नाही)

असं नै कै दादा, त्याच्यावर क्लोज अप घेतला की कळतं....पण भिती वाटते की ह्याचा खालचा ओठ इतका लोंबतोय, गळून तर नाही ना पडणार !!!!

व्यंकट's picture

18 Jun 2008 - 9:03 pm | व्यंकट

तिस्ता सेटलवाड -- ( एका राजकीय पक्षाकरता अभिनय करते )
इम्रान हाश्मी

व्यंकट

शैलेन्द्र's picture

18 Jun 2008 - 10:43 pm | शैलेन्द्र

जाहीरातित्ला सचीन तेंडुलकर....

पिवळा डांबिस's picture

18 Jun 2008 - 10:55 pm | पिवळा डांबिस

बरीचशी मंडळी मिपाचा दिवाळी अंक काढा म्हणून मागे लागली आहेत.

चांगली कल्पना आहे. आम्ही आवडीने वाचू.
-पिवळा डांबिस

अन्या दातार's picture

19 Jun 2008 - 6:00 pm | अन्या दातार

आवडीने आनि सवडीने सुद्धा

ऋचा's picture

19 Jun 2008 - 9:57 am | ऋचा

सुनिल शेट्टी -अनेक दगड एकावर एक रचुन तयार झालेला माणसाचा आकार!!!! :))
देवल बंधु - चुकुन वाढलेले "बोनसाय"

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

नाखु's picture

25 Jun 2008 - 9:55 am | नाखु

ईम्रान हाशमी आणि हीमेश (नाकसुरिया)
आणी हीरो कसा नसावा या साठी कुणाला सिनेमा पहायचा असेल तर व्ही के नाईकांनि आपल्या मुलासाठी काढलेला पाहाच.
अशोक सराफ या सिनेमात आहे..
काही सिनेमात भले भले नट ईतका वीट्/वात आणतात कि विचारु नका... ऊदा कादरखान्,शक्ति

कॉन्टिनला बनवलेली भाजी (चांगल्या भाजीचि तिडिक बसावि असा दर्जा)

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

शिप्रा's picture

11 Jul 2008 - 11:22 am | शिप्रा

केतरिना कॅफ ..जिचा चेहरा ६ फुट आहे...
धर्मेंद्र ...जो एक नं चा वाय झेड आहे.... :P
प्रतिक्षा लोणकर
उर्मिला माकडतोंडकर आपले मातोंडकर

जिथे कमी तिथे आम्ही ..:)

छोट्या's picture

11 Jul 2008 - 11:43 am | छोट्या

भरत जाधव...
याला कुठे थांबावं तेच समजत नाही.
वैताग आहे डोक्याला.

रम्या's picture

11 Jul 2008 - 3:15 pm | रम्या

सलमान खानचं तर थोबाड बघू नये असं वाटतं. काळविटाची शिकार केल्यावर तर त्याची शिकार कराविशी वाटते.
गुन्हेगार संजय दत्त - बाँम्बस्फोटाच्या खटल्यात कोर्टात गेल्यावर याने यातील एका कट्टर आरोपीशी न्यायालयातच फार जुनी मैत्री असल्यासारखा हात मिळवला होता. तेव्हापासून त्याचा भयानक राग येतो

तुषार कपूर सारखा जन्मजात मख्ख चेहेर्‍याचा माणूस शोधून सापडणार नाही.

महाराष्ट्राची खंत-राखी सावंत

चेतन सुभाष गुगळे's picture

18 Nov 2008 - 7:59 pm | चेतन सुभाष गुगळे

विश्वजीत
सुनील दत्त
राजेन्द्र कुमार
अनिल धवन
प्रेम नाथ
राजेन्द्र नाथ
नरेन्द्र नाथ
प्रेम किशन (प्रेम नाथ चा मुलगा)
देवेन वर्मा (बेशरम नावाच्या अमिताभच्या चित्रपटात याने बेशरमपणाचा कळस केला आहे)
रवि किशन
हरीश
सैफ अली खान
अर्जुन रामपाल
प्रदीप पटवर्धन
विजय कदम
अमृता सिंग
बबीता
करिष्मा कपुर
श्रीदेवी
साधना
माला सिन्हा
तनुजा
नुतन
रोहिणी हट्टंगडी
सुहास जोशी
स्मिता तळवळकर
किशोरी अंबिये
मधुरा वेलणकर
सई ताम्हणकर
दीपाली सय्यद