बृस्केत्ता टोस्ट (इटालियन अपेटायझर)

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in पाककृती
18 Mar 2011 - 3:18 pm

माझी ही पाक्रु 'सामना' च्या फुलोरा आवृत्तीत पण छापून आली होती. त्यावर 'उपक्रम' संकेतस्थळावर बरीच चर्चा झाली. चर्चे चा मुद्दा हा होता कि ब्रेड च्या एका स्लाईस मध्ये ६५-७५ कॅलोरी असतात तर मग ४ स्लाईस बृस्केत्ता टोस्ट मध्ये २०० कॅलोरीस असे मी कसं लिहू शकते. म्हणून मला इथे हा खुलासा करावासा वाटला. आपण अंतर्जालावर ज्या कॅलोरी काउन्ट वाचतो त्या सगळ्याच बरोबर किंवा आपल्या देशाला, राहणीमानाला अनुरूप अश्या नसतात. उ. दा. क्रीम, पनीर, केक, नान किंवा ब्रेड सारखे पदार्थ. ह्याचे कारण कि इंडिअन आणि पाश्चात्य पोर्शन साईझ मधला असलेला फरक आणि त्या पदार्थाचे ingredients आणि प्रोसेसिंग. आपल्या कडे मिळणारा होल व्हीट ब्रेड ची स्लाईस खूप बारीक असते. संकेत्स्थालान्वरच्या माहिती नुसार १ ब्रेड स्लाईस (२५ग) = ६५- ७५ कॅलोरी पण आपल्या देशात मिळणाऱ्या ब्रेड स्लाईस चे वजन १५-२० ग्रॅम (४०-४५ कॅल) असून ती जास्त बारीक पण कापलेली असते. तर म्हणून ४ बृस्केत्ता टोस्ट मधून सुमारे २०० कॅलोरी मिळतील असं माझ्या लेखात आहे. दुसरा म्हणजे ह्यात ओलिव्ह ओईल फक्त त्याच्या fragrance साठी घातले तर ते लो कॅल होते. जास्त घातलं तर साहजिकच कॅलोरी वाढतील. तर ह्या २०० कॅलोरी च्या हिशोबात ४ ब्रेड स्लाईस (१६० कॅल), १ छोटा चमचा ओलिव्ह ओईल (२० कॅल) आणि ४ टोमाटो (४० कॅल) ~ २२० कॅल असे मोजलेले आहे. (माझ्या कॅलोरी काउन्ट चा स्त्रोत : Nutritive value of Indian Foods, National Institute of Nutrition, Hyderabad हा असतो) असो.

त्यातून, मी कधीच जे खाल ते कॅलोरी चार्ट आणि कॅल्क्युलेटर वर वेरीफाय करूनच खा असं सांगत नाही आणि सांगणार हि नाही. कारण शेवटी सगळ्या कॅलोरिक value 'indicative' असतात. चला तर मग, बरंच लांबण लागला ह्या विषयाला. पाक्रु कडे वळूया. :)

बृस्केता टोस्ट एक पौष्टिक, साधा सोपा पण स्टायलिश पदार्थ आहे. आता जसा उन्हाळा वाढत जाणार तसं आपल्याला शेगडी पाशी कमीतकमी उभं रहावसं वाटणार. त्यातून परत वर्ल्ड कप च्या निमित्ताने मित्र मंडळी पण एकत्र होणार. तेव्हा हा पदार्थ उपयुक्त ठरेल. असं ह्यात काय विशेष आहे? टोमाटो, लसूण आणि ओलिव्ह ओईल. भरपूर टोमाटो असल्याने त्यातले अ‍ॅन्टी ऑक्सीडन्ट लाय्कोपीन, जीवनसत्व अ, ई आणि क, भरपूर फायबर आणि पोटॅशियम (ह्याने रक्त चाप संतुलित ठेवायला मदत होते) ह्या सगळ्याचे गुण आपल्याला मिळतात. शिवाय हा पदार्थ लो कॅल, लो सोडियम, लो फॅट पण आहे.

सामग्री:

४ स्लाईस मल्टिग्रेन किंवा होल व्हीट ब्रेड
४ टोमाटो, बारीक चिरलेले
४ पाकळ्या लसूण, किसून
१ चमचा ओलिव्ह ओईल (एका स्लाईस वर एक थेंब, कॅलोरी मोजत नसाल तर आवडी प्रमाणे घाला)
१ चमचा ऑरेगानो किंवा बेसिल (पिझ्झा बरोबर पाकीट मिळतं ते)
हवं असल्यास अगदी थोडं चीज (अगदी थोडं म्हणजे वासा पुरतं नख भर! जास्त घातलंत तर लगेच खूप कॅलोरी वाढतील :) )
मीठ आणि मिरीपूड चवीनुसार

कृती:

ओव्हन १८० डिग्री प्री हिट करून ठेवा. ह्या साठी टोस्ट मोड (वरच्या आणि खालच्या दोन्ही रॉड ला गरम करणारा मोड) चा वापर करा.
एका बेकिंग ट्रे मधे ब्रेड च्या स्लाईस पसरून ठेवा. प्रत्येक स्लाईस वर चिरलेला टोमाटो (भरपूर प्रमाणात) घाला. मग प्रत्येक स्लाईस वर किसलेला लसूण, ऑरेगानो, मीठ आणि मिरीपूड घाला. प्रत्येक स्लाईस वर १-२ थेंब ओलिव्ह ओईल घाला. हे ओईल फक्त स्वाद वाढवण्या साठी आहे. नसेल तर वगळलं तरी चालेल. सजावटी साठी, एक बारीक तुकडा चीज, स्लाईस वर ठेवा.
हा ट्रे ओव्हन मधे साधारण १० मी ठेवा. ब्रेड टोस्ट होवून कुरकुरीत झाला पाहिजे. टोमाटो साधारण वाफवल्या सारखे दिसतील.
घरी ओव्हन नसेल तरी हा पदार्थ करता येतो. बेकिंग ट्रे च्या ऐवाजी एका नॉन स्टिक पॅन मधे त्या ब्रेड च्या स्लाईस वर दिल्या प्रमाणे तयार करून घेणे. मग हे पॅन मंद आचेवर झाकून ठेवून, ब्रेड खमंग भाजला जाईपर्यंत ठेवा.
गरमागरम बृस्केत्ता टोस्ट पेश करा!

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

18 Mar 2011 - 3:29 pm | निवेदिता-ताई

मस्त..........मस्त...........मस्त.............:)

खादाड अमिता's picture

18 Mar 2011 - 3:33 pm | खादाड अमिता

टोस्ट वर पांढरा पदार्थ जो दिसतोय तो किसलेला लसूण आहे. मी मोठा चायनीज लसूण वापरला म्हणून तो एवढा जाड किसला गेलाय. फक्त डावी कडच्या खालच्या चित्रात थोडं नावापुरत मोझारेल्ला चीज घातलेलं आहे, जे वितळले कि पसरते आणि जास्त चीज असल्या सारखे वाटते. हुश्श! किती ते खुलासे! :D

परिकथेतील राजकुमार's picture

18 Mar 2011 - 3:40 pm | परिकथेतील राजकुमार

झकास !
शक्य होईल तेव्हा तुझी स्वत:ची खास चिझ चिली टोस्टची पाकृ दे ना प्लिज.

खादाड अमिता's picture

20 Mar 2011 - 1:57 pm | खादाड अमिता

अरे प्रसाद, चिली चीज टोस्ट खूप सोपा असतो करायला.

१/२ कप ब्रिटानिया पिझ्झा चीज (ह्यात मोझारेल्ला आणि शेद्दार मिक्स असते)
२-३ बारीक चिरलेल्या मिरच्या
थोडा बटर
ब्रेड च्या स्लाईस

चीज ला किसून त्यात हिरवी मिरची घालून मिक्स करायचं. अजून तिखट हवं असल्यास मिरी पूड घालायची (१/२ चमचा). ब्रेड च्या स्लाईस ला भरपूर बटर लावायचा. मग वरून हे चीज मिक्स पसरवायचा, सढळ हाताने बरं का! घरी ओव्हन असेल तर हा ब्रेड एका ट्रे वर ठेवून, ओव्हन मध्ये १५० डिग्री ला १०-१५ मिनिट ठेवायचे. कमी तापमान ठेवलं म्हणजे चीज एक सारखं मंद वितळत. ओव्हन नसेल तर, एक नोन स्टिक pan मध्ये ब्रेड स्लायेस ठेवून, वरून झाकण ठेवून मंद आचेवर चीज विटले पर्यंत टोस्ट भाजायचा. गरम गरम खायचा!

परिकथेतील राजकुमार's picture

21 Mar 2011 - 7:04 pm | परिकथेतील राजकुमार

धन्यु धन्यु धन्यु :)

खरच खूप सोपे दिसत आहे. नक्की ट्रायतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Mar 2011 - 4:22 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह छान...

प्रास's picture

18 Mar 2011 - 4:31 pm | प्रास

दिसायला तर हे लय म्हणता लयच भारीये आणि औन्दा करून बघायला हवा म्हणजे हवाच, असं वाटतंय.....

थ्यान्कू थ्यान्कू थ्यान्कू......

अमिता छान.
मि तिथले कुतिसाद वाचुन आलोय.

विंजिनेर's picture

18 Mar 2011 - 5:20 pm | विंजिनेर

मस्त!
आम्ही हीच पाकृ. बेल पेपर (ढोबळी मिरची) वापरून करतो :) शिवाय एखादे क्रिम ऑफ ब्रोकोली किंवा असेच सूप असेल तर एकदम जेवणच होऊन जाते.

Nile's picture

19 Mar 2011 - 7:41 am | Nile

आम्ही अशाच प्रकारे ब्रिझ्झा बर्‍याचदा करतो. छान.

-(कॅलरीमान सदस्य)

कच्ची कैरी's picture

18 Mar 2011 - 5:38 pm | कच्ची कैरी

मस्त !नविन रेसेपी मिळाली .

लै भारी फोटू!
पाकृ आवडते पण ऑलीव्ह ऑइल भरपूर घालून्.......ऑलिव्ह ऑइल हे व्यसन लावणारं तेल आहे असे वाटते.

प्राजु's picture

18 Mar 2011 - 9:09 pm | प्राजु

खरंच आहे हे. ऑलिव्ह ऑईल च व्यसनच लागतं.
मी करते त्यात लाल आणि पिवळी ढब्बू मिरची घालते..
बेसिल आणि ऑरिगॅनो स्वाद अफाट असतो.. :)

सानिकास्वप्निल's picture

18 Mar 2011 - 9:29 pm | सानिकास्वप्निल

इटालियन पा़कृमध्ये ऑलिव्ह ऑईल नसेल तर मजाच नाही :)
मी ही अशीच पा़कृ करते फक्त त्यात फ्रेंच ब्रेड वापरते आणी बेसिल बा.चि घालते.

ही मी केलेल्या पा़कृचा फोटो :)

.

रेवती's picture

19 Mar 2011 - 1:22 am | रेवती

नका हो नका असे फोटो देत जाऊ!
सध्या मोजून मापूनच जेवते मी!
बीएम आय पेक्षा पूर्ण तीन किलोंनी वजन जास्त आहे माझं!
तुम्हीही जरा लो कॅल पाकृ देत जावा ना!

तुम्हाला दोन चॉईसेस आहे.
एक तर कॅलरी मोजत खा आणी खाण्याची लज्जत घालवा ..नाही तर बिनधास्त खा ..आणी खाणे एंन्जोय करा..
आय प्रिफर द लॅटर..

बाकि पाकृ.. मस्तच

अवांतरः अरे खाणे कुणीतरी आमच्या पिडां काका कडुन शिका रे.

खादाड अमिता's picture

20 Mar 2011 - 2:04 pm | खादाड अमिता

आय प्रिफर द लॅटर टू!

सानिका- मस्त फोटो आहे.. तोंडाला पाणी सुटलं!

तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. :)

आशुडि's picture

21 Mar 2011 - 6:43 pm | आशुडि

रेवती
+१