गाभा:
पुण्याजवळचे १-२ तास अंतरावर असणारे एखादे चांगले रेसोर्ट किंवा एखादी पिकनिक प्लेस सुचवा जिथे येत्या विकांताला वन डे ट्रिप प्लॅन करता येइल. बरोबर सव्वा वर्षाची मुलगी असल्याने तिथे दिवसभर रहाण्याची सोय असेल तर उत्तम. कारण लहान मुलं जनरली रोज दुपारी २/३ तास झोप काढतात. आणि या विषयावर आधी चर्चा झाली असेल तर धाग्याची लिन्क द्यावी.
प्रतिक्रिया
18 Mar 2011 - 12:28 pm | मुलूखावेगळी
खडकवासला
18 Mar 2011 - 12:32 pm | गणेशा
पुण्याजवळील मला माहित असलेली आणि फॅमीली सहित करता येणार्या पिकनिक प्लेस देत आहे ...
१. महाबळेश्वर ( अंदाजे ११० किमी)
२. कार्ले-भाजे-एकविरा देवी (अंदाजे ६० किमी)
३. लोवावळा खंडाला तर माहीती असेलच.
--
जवळचे असे पिकनीक प्लेस मधील रेसोर्ट माहित नाही.. कारण वन डे ट्रीप मुळे घरीच जातो.
तरी पुण्यामध्ये बजेट मध्ये .. रविराज हॉटेल आणि मल्टीस्पाईस रहायला चांगले आहे
18 Mar 2011 - 12:37 pm | प्रचेतस
रिसोर्ट पायजे असेल ते हे उत्तम.
सूर्यशिबिर
मावळसृष्टी
नाहीतर गणेशाने सांगितल्याप्रमाणे ठिकाणे बरीच आहेत.
निळकंठेश्वर पण चांगले आहे. पण उन्हातान्हात थोढीशी चढाई करावी लागेल.
18 Mar 2011 - 12:39 pm | Pearl
धन्यवाद.
पण मी पुण्यातच रहाते:)
फक्त लहान पिल्लू बरोबर असल्याने,
१. शक्यतो पुण्याजवळचे ठिकाण हवे आहे. आणि
२. दुपारी पिल्लू झोपत असल्याने होटेल वर उतरावे लागेल. म्हणून रहाण्याची सोय हवी आहे.
18 Mar 2011 - 12:40 pm | छोटा डॉन
मुळशीजवळ 'ग्रीन गेट रिसॉर्ट' नावाचे मस्त ठिकाण आहे.
गावापासुन दुर असल्याने अजिबात गडबड गोंधळ आणि भागदौड नाही.
खालील लिंक पहा ...
http://www.tripadvisor.in/Hotel_Review-g297654-d1205399-Reviews-Green_Ga...
बाकी ह्या विषयावर मी आधीही धागा काढला होता, त्यातले काही प्रतिसाद तुम्हाला नक्कीच योग्य माहिती देतील. :)
http://www.misalpav.com/node/15943
- छोटा डॉन
18 Mar 2011 - 1:20 pm | कवितानागेश
एक धागा अलिकडे ५० फक्त यांनी काढला होता.
http://www.chincholimorachi.com/ या ठिकाणाबद्दल.
ही जागा पुण्यापसून जवळ आहे.
18 Mar 2011 - 1:56 pm | भीडस्त
भीमाशंकरला ब्ल्यू मॉरमॉन रीसॉर्ट आहे.
पुण्याजवळ मल्हारमाची नावाचं एक रीसॉर्ट आहे.त्याचं ब्रोशर पाहण्यात आलं होतं,त्यात तरी ते छानच वाटत होतं..
18 Mar 2011 - 4:07 pm | धमाल मुलगा
बनेश्वरला जाऊ शकता.
तिथं हाटिलं फिटिलं झालीयेत आता.
पुण्यातल्या पुण्यात जर पाण्याबिण्यात खेळायचं असलं तर सिंहगड रस्त्याला कृष्णाई वॉटर पार्कात जा किंवा तिकडं येरवड्यापलिकडं स्प्लॅश माऊंटनला. :)
बाकी, डानरावांनी सुचवलेलं ग्रीनगेट रिसॉर्टतर बेश्टच आहे. (म्हणजे होतं. सध्याची कल्पना नाही.) रिसॉर्टच्या मागे गेलं की मुळशीचं आख्खं ब्याकवॉटर आपल्याच बापाचं असल्यासारखं फक्त आपणच असतो तिथं. :)
19 Mar 2011 - 1:24 am | देव बप्पा
पुण्या पासून अंदाजे २० किमी..(आळंदी रोड)
एकदम बेस्ट आहे ठिकाण आहे पहा..
19 Mar 2011 - 10:49 am | नगरीनिरंजन
सगुणाबागेत जावा सरळ.
21 Mar 2011 - 12:36 pm | Pearl
सर्वांचे खूप खूप आभार.