मारुती ची नावे

जय - गणेश's picture
जय - गणेश in काथ्याकूट
17 Mar 2011 - 1:36 pm
गाभा: 

समर्थ रामदास स्वामी नी गावो गावी मारुती ची स्थापना केलेली आहे.
आज जवळ जवळ सगल्या गावा मधे मारुती मंदीर आहे. आणी प्रत्येक गावातल्या मारुती चे नाव पण वेगळेच आहे.
आपण पाहिलेल्या, दर्शन घेतलेल्या, वाचलेल्या मारुती ची नावे सांगावीत.
...जय - हनुमान.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

17 Mar 2011 - 2:07 pm | नितिन थत्ते

रामदासस्वामींच्या नंतर धर्मवीरांनी चौका चौकात आणि फूटपाथ फूटपाथवर मारुतींची स्थापना केली.

परिकथेतील राजकुमार's picture

17 Mar 2011 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार

मारुती कांबळे

आत्ताच धागा उडाला म्हणुन आमच्या नान्याचा रागाने हनमान झाला होता. तो चालंन काय?

वपाडाव's picture

17 Mar 2011 - 3:44 pm | वपाडाव

मले भदकमकर मास्तरांची स्वाक्षरी आठौली न बा...
---------------------------------------------
हम तो चले आए सनम तुझको मनाने, अनंत माने मारुती माने

हिंदुराव धोंडेपाटील's picture

17 Mar 2011 - 4:42 pm | हिंदुराव धोंडेपाटील

मास्तर मास्तर.... आता गप र्‍हायला काय घ्याल?

हिंदुराव धोंडेपाटील

गप र्‍ह्यायला त्यांना क्वार्टर पुरते. बाकी इतका आग्रह करत आहात म्हणुन आम्हाला पण एखांदी चालुन जाईल.

डोंबिवलीत गोग्रास वाडीत समर्थ मुळे महाराजांनी पंचमुखी हनुमानाची स्थापना केली होती
आजही अतिशय जागृत असं देवस्थान मानलं जात ते

मुलूखावेगळी's picture

17 Mar 2011 - 2:19 pm | मुलूखावेगळी

तुला कोनत्या देवाला काय केल्यावर तो पावते हे कसे माहित रे स्पांडु ;)
मागे व्यन्कटेशस्तोत्राबद्दल पन असेच बोल्ला होतास.कोनकोनत्या देवाला साकडे घातलेस आजवर
ह.घे.

आम्हाला जमेल तशी माहिती देत असतो
बाकी देवावर विश्वास असल्याने, बरीच देवळ फिरुनझालेली आहेत,
आणि जागृत देवस्थान, हे तिथल्या लीकांच्या म्हणण्यावरून सांगितलेले आहे

बाकी पंचमुखी हनुमानाची मूर्ती दुर्मिळ असते , म्हणून नमूद केले :)

इंटरनेटस्नेही's picture

17 Mar 2011 - 3:01 pm | इंटरनेटस्नेही

मु वे शी सहमत
अर्थत कोणी काय लिहावे हे सांगण्याचा मला अधिकार नाही, मी फक्त एक निरीक्षण नोंदवले.

तुम्ही कंपू बदललेला पाहून मौज वाटली
:)

देवावर विश्वास आहे किंवा नाही हे फिरुन झालेल्या देवळांच्या संख्येवरुन कधीपासून ठरू लागलं ब्वॉ !!

अपेक्षित कृती, डोळे पाणावले

मारुतीचेही डोळे पाणावतील अशा कृती कराव्याच का मी म्हणतो !! :D

मारुतीचेही डोळे पाणावतील अशा कृती कराव्याच का मी म्हणतो !!

कै च्या कै वाईड बॉल

सोडून देण्यात आलेला आहे :D

झेपला नाय सांगा की राव !!!

स्पा's picture

17 Mar 2011 - 4:37 pm | स्पा

झेपला नाय सांगा की राव !!!

आम्ही सुरु झालो तर तुम्हाला झेपणार नाही असो

परिकथेतील राजकुमार's picture

17 Mar 2011 - 4:37 pm | परिकथेतील राजकुमार

मारुतीचेही डोळे पाणावतील अशा कृती कराव्याच का मी म्हणतो !!

मी 'मारुतीचे डोहाळे पाणावतील' असे वाचले.

या वरुन मला 'मारुतीला किती डोळे' हा पुण्यातल्याच एका मित्राला पडलेला प्रश्न आठवला !! :D

आम्हाला शाळेत असताना असलंच (चुचुतैच्या भाषेत) अच्र्त बव्ल्त शिकायला भेटलं होतं.
मास्तरांकडुन नव्हे. अवांतर....
म्हणे..
मा रु ति ला कि ती डो ळे ?

सांगा पाहु......

सुधीर१३७'s picture

18 Mar 2011 - 1:26 pm | सुधीर१३७

>>>>>>>>>> मा रु ति ला कि ती डो ळे ?

...........................एकावेळी फक्त एकच................... पण कितीही वेळा....... :wink:

पप्पू's picture

17 Mar 2011 - 2:13 pm | पप्पू

वारुळाचा मारुती , अहमदनगर

अकरा मारूती. पुणे
पंचमुखी मारूती, पुणे
पत्र्या मारुती , पुणे
भिकारदास मारूती, पुणे
डुल्या मारूती , पुणे

धमाल मुलगा's picture

17 Mar 2011 - 3:39 pm | धमाल मुलगा

सोन्या मारुती राहिला की हो. :)

सुधीर१३७'s picture

18 Mar 2011 - 12:38 pm | सुधीर१३७

भांग्या मारुती, शिवाजी रस्ता, बुधवार पेठ, पुणे

उंब-या मारुती, जुनी तपकीर गल्ली, बुधवार पेठ, पुणे

जिलब्या मारुती, शुक्रवार पेठ, पुणे

मला उंबर्‍या गणपति माहिती आहे ...

आणि एक..
शनि मारूती , पुणे

प्रशांत's picture

18 Mar 2011 - 11:04 am | प्रशांत

श्रीमंत भिकारदास मारूती, पुणे

धमाल मुलगा's picture

17 Mar 2011 - 3:35 pm | धमाल मुलगा

>>आपण पाहिलेल्या, दर्शन घेतलेल्या, वाचलेल्या मारुती ची नावे सांगावीत.
मारुती ८००,
मारुती एस्टिम,
मारुती ऑल्टो,
मारुती झेन,
मारुती ओम्नी,
मारुती एस एक्स ४,
मारुती स्विफ्ट

वपाडाव's picture

17 Mar 2011 - 3:53 pm | वपाडाव

धमुराव लैच गरीब दिस्तात राव...
एकतर मारुती अन त्यात बी स्वस्त्-स्वस्त गाड्या फाउन मोक्ळे...
मारुती बालेनो, मारुती विटारा, मारुती डिझायर, मारुती ए-स्टार, मारुती रिट्झ, मारुती जिप्सी, मारुती वॅगन-आर, मारुती ईस्टिलो....... इतक्या गाड्या बग्ल्या न्हाय मंजे ....
आता जौ द्या....
फुल्ल ह. घ्या.

प्रास's picture

17 Mar 2011 - 6:15 pm | प्रास

मारुती व्हर्सा नि मारुती इको......

वारकरि रशियात's picture

17 Mar 2011 - 3:55 pm | वारकरि रशियात

हा हा हा !

यावरून आठवले, आमचे एक मित्र म्हणायचे, " हा मारुती ब्रह्मचारी पण या संदर्भात मात्र त्याला आपण चक्क स्त्री (लिंगी) केला आहे !"

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Mar 2011 - 6:26 pm | श्री गावसेना प्रमुख

१)रोकडोबा हनुमान, आर्वी,(धुळे)
२)भद्रा मारुती "खुलताबाद'(औरंगाबाद)

समर्थ रामदासांनी भारतात लोकसंख्येचा महापुर येणार हे तेंव्हाच ओळखल्या होते. त्यामुळे त्यांनी स्वत: देखील ब्रम्हचर्यपालन केले परंतु मारुती मंदीरं स्थापुन अधिकाधिक लोकांनी ब्रम्हचर्य पालन करावे , असे तर त्यांना सुचवायचे नव्हते ना ? ;)

बाकी काही प्रतिसाद चौथी-पाचवीतल्या जोग्ज ची आठवण करुन देणारे :)

- टार्‍या मारुती

पंगा's picture

22 Mar 2011 - 12:20 pm | पंगा

बाकी काही प्रतिसाद चौथी-पाचवीतल्या जोग्ज ची आठवण करुन देणारे

हनुमानाच्या आरतीसंबंधी काय?

विजुभाऊ's picture

18 Mar 2011 - 11:04 am | विजुभाऊ

पुण्यात बरीच मारुती आहेत
जिलब्य मारुती
पत्र्या मारुती
डुल्या मारुती (नाना /भवानी पेठेत तील या मारुतीला हे नाव का पडले कळायला मार्ग नाही . त्या मंदीराच्या जवळ दुध भट्टी आहे)

पांथस्थ's picture

18 Mar 2011 - 11:19 am | पांथस्थ

डुबकिचा मारुती, अंमळनेर (जि. जळगाव)

जय - गणेश's picture

18 Mar 2011 - 11:33 am | जय - गणेश

पत्र्या मारुती

हे नाव कसे पडले, यावर प्रकाश टाकावा

..गणेश (उर्फ - प्रकाश)
(नाव प्रकाश अन हाती विजलेला दिवा)

स्वतन्त्र's picture

18 Mar 2011 - 2:53 pm | स्वतन्त्र

हे मारुतीचे मंदिर औरंगाबाद जवळच्या खुलताबाद येथे आहे.
मारुतीची मूर्ती झोपलेल्या अवस्थेत आहे.

स्पंदना's picture

18 Mar 2011 - 9:29 pm | स्पंदना

कुणा काय कुणा काय आठवेल साम्गता येत नाही ब्वा!!

माझ्या धन्याला 'मारुतिचा नट' आठवला!

पर्नल नेने मराठे's picture

20 Mar 2011 - 7:06 pm | पर्नल नेने मराठे

माझ्या गावात पिकेटरोडचा मारुती कम हनुमान आहे .

मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड,

बहुतेक ठीकाणी मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड बघण्यात आले आहे.

आमच्या गावात पण आहे.

असुर's picture

23 Mar 2011 - 5:44 pm | असुर

दारासिंग!!!
गोविलांचा अरुण त्याच्या दीपिकेला शोधीत आला होता तेव्हा आमचे काही लोक याच्याशीच फाईटले होते. नंतर लै लांबच्या प्रवासाला गेले हे सांगायला नकोच!

--असुर
क्याप्टन, 101st रेजिमेंट,
सिंहलद्वार डिव्हिजन,
रम्य ही स्वर्गाहून लंका

योगप्रभू's picture

23 Mar 2011 - 6:03 pm | योगप्रभू

सातार्‍यात ५ मारुती खास नावाने ओळखले जातात.
१) गोल मारुती (मंदिर गोल आहे)
२) डोंगरावरचा मारुती
३) मंगल मारुती
४) प्रताप मारुती
५) दंग्या मारुती (याच्यावरुन पूर्वी दंगल झाली होती)

मारुती च्या देवळा समोर चाफयाच झाड असतेच

दिपक's picture

18 Jun 2011 - 10:02 am | दिपक

घंटेश्वर हनुमान
खार, मुंबई.

जय - गणेश's picture

18 Jun 2011 - 10:42 am | जय - गणेश

शनिवारी नेमक हनुमान दर्शन झाल.खुप छान.

जय - हनुमान

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jun 2011 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार

आणि धागा पण वर आला.

खुपच छान.

जय - गणेश's picture

19 Jun 2011 - 11:01 am | जय - गणेश

हनुमान जी सोबत आसले की, काय धागे आणी दोरे !! नाही का ?

आवांतर : ''पोस्ट'' ला मराठीत धागा म्हणतात हे मिपा वर पहील्यांदा कळले.

वपाडाव's picture

20 Jun 2011 - 2:55 pm | वपाडाव

ओ काका, पोस्टला धागा नाही म्हणत काही....
थ्रेडला धागा म्हणतात...
वांतर :: जाणकारांनी पोस्टला काय म्हणतात यावर प्रकाष टाकावा....

जय - गणेश's picture

20 Jun 2011 - 3:33 pm | जय - गणेश

मग येथे जे लोक बेंबीच्या देटा पासुन ओरडतात की '' चांगला धागा आहे'', वाईट धागा आहे ते मग काय?

वपाडाव's picture

23 Jun 2011 - 2:16 pm | वपाडाव

तेच ना मग, धागा चांगला आहे म्हंजेच थ्रेड चांगला आहे...
पोस्ट नव्हे....
यांना न्यानाचे बाळकडु पाजण्याचे शिव-धणुष्य पेलणार्‍या महामानवाची गरज आहे....
इच्छुकांनी संपर्क साधावा....

कुणाला मारुती स्तोत्र येत असल्यास येथे द्यावे. मला फक्त पहिली ओळ येते - भीमरुपी महारुद्र वज्र हनुमान मारुती.

स्पा's picture

20 Jun 2011 - 3:32 pm | स्पा

सुनील's picture

20 Jun 2011 - 3:37 pm | सुनील

धन्यवाद!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Jun 2011 - 6:35 pm | विश्वनाथ मेहेंदळे

स्पा भाऊ, धन्यवाद. पण यात खूपच चुका आहेत हो. हरीरूपा चे हिररुपा, मनासि टाकिले मागे ऐवजी मानसी टाकिले मागे वगैरे वगैरे.

जय - गणेश's picture

20 Jun 2011 - 3:41 pm | जय - गणेश

कुणाला पाठ आहे का ?

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jun 2011 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार

पाठ आणि पोट सर्व प्राणीमात्रांना असते.

भोगगुरु
परादेव बाबा