नमस्कार मंडळी,
पुण्यातील जागांचे भाव आकाशाला भिडले आहेत. लोक पार तळेगाव, लोणावळा, पिरंगुट, सासवड, उंड्री, चाकण पर्यंत राहावयास गेले आहेत / जात आहेत. जागेच्या किमती २००० ते ६५०० च्याही वर गेलेल्या आहेत. आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे. आय.टी. वाले सेकंड होम घेत आहेत तर इतरांस घरभाडेही परवडेनासे आहेत. विशेषतः स्थानिक लोकांस जागा घेणे अवघड झाले आहे. पुणे आता मुंबई होऊ लागले आहे काय? इतर शहरांतील लोकांचे काय अनुभव आहेत?
मध्यमवर्गीयांची संख्या वाढत असतांनाच दारिद्र्य रेषाही वर जात आहे का? आपण एखाद्या गृहयुद्धाकडे जात आहोत काय? उत्तम, मोफत वा इंश्यूरंसवर आधारीत मेडिकल सेवा, शिक्षण, पारदर्शक न्यायव्यवस्था, उत्तम पब्लिक ट्रांस्पोर्ट, मुबलक पाणी, वीज व इतर सोई ह्या शिवाय एखादा देश प्रगत होणे शक्य आहे काय? आपण एकाच देशात दोन प्रकारचे नागरीक व नागरी सुविधा तयार करतो आहोत काय? आपल्यातीलच काही वर्गांस बरोबर न घेता, पुढे पळत सुटणे योग्य आहे काय? आपली मते व्यक्त करावीत.
पुण्यातील जागांचे भाव
गाभा:
प्रतिक्रिया
18 Oct 2007 - 10:56 am | जुना अभिजित
आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे. आय.टी. वाले सेकंड होम घेत आहेत तर इतरांस घरभाडेही परवडेनासे आहेत.
भाव वाढलेले आहेत हे बरोबर आहे पण वरील दोन वाक्ये आय टी वाल्यांबद्दल समाजात असलेला गैरसमज दर्शवतात. मित्रांनो तो जमाना गेला जेव्हा फक्त आयटीवाल्यांना धडाधड पगार आणि अमेरिकेत वगैरे जायच्या संधी होत्या. १९९८-२००३ पर्यंतचा तो मौसम होता. आयटीचा सुगीचा काळ होता. आता ऑनसाईट कमी झालेल्या आहेत. कंपन्या अधिकधिक बंधने आणत आहेत त्यामुळे पटापट कंपन्या बदलणे जाचक होत आहे. पगारवाढ नियंत्रित केली जात आहे. आतातर रुपयाच्या वाढला आहे आणि आयटी कंपन्या ऍलर्ट वर आहेत.
दुर्दैवाने एकदा वर गेलेले भाव सहसा कमी होत नाहीत. १ बीएचके साठी ६-७ हजार रुपये देणे कोणाही नोकरीकर्त्यास परवडणारे नाही.
आणखी एक अवांतर: पगार आता इतर कंपन्यांतही चांगले मिळतात. बर्याच कँपस मध्ये सर्वात जास्त पॅकेज मॅनुफॅक्चरिंग किंवा बँकींग क्षेत्रातील कंपन्या देतात. आयटी कंपन्यांत नोकरभरतीसुद्धा कमी होतेय. सहसा दर टाईम्स ऍक्सेंट्ला असणारी इंन्फोसिसची जाहीरात आता गेल्या २-३ महीन्यात कुठे आहे.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
18 Oct 2007 - 11:33 am | मनिष
बिल्डर लोकांच्या हावेमुळे भाव वाढतात आहे, आणि आता आय.टी. वाल्यांनाही घरे परवडत नाही.
18 Oct 2007 - 7:03 pm | देवदत्त
अभिजीत आणि मनिष ह्यांच्याशी सहमत.
आय टी च्या सुगीच्या काळात पगार जास्त होते आणि त्या लोकांनी मागितलेला भाव देऊन (बहुधा घासाघीस न करता) घरे घेतली.
त्यामुळे बिल्डर आणि इस्टेट एजंट ह्यांची हाव वाढली. आणि आता त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत.
पण फक्त हेच एक कारण नसावे. फक्त आय टी च नव्हे तर इतर लोकांच्या राहणीमानातही फरक पडत चालला आहे. ते ही एक कारण आहे.
18 Oct 2007 - 7:47 pm | पुरणपोळी
डिस्क्लेमरः कमकुवत ह्रुदय आणि डोकेवाल्यांनी वाचू नये
आयटि वाले...(त्यातूनहि पुण्यातले)
भाजी घेताना वाटेल त्या भावात भाजी घेणे.. रिक्शात मागतील तेवढे भाडे देणे, वस्तुची किंमत काय आपण देतोय काय ... हिच गोष्ट जागेच्या बाबतीत..आपला पगार केवळ चलन फरका मुळे आहे हे समजण्याची कुवत नसल्या मुळे ... पैशाचा प्रचंड माज ( आणि बरयाच दा नसलेल्या कर्तुत्त्वाचा), बाकिच्यांना तुछ्च समजण्याची प्रव्रूत्ती ( अमेरिकेत जावून आल्यावर जास्तीच...)
""भाव वाढलेले आहेत हे बरोबर आहे पण वरील दोन वाक्ये आय टी वाल्यांबद्दल समाजात असलेला गैरसमज दर्शवतात. मित्रांनो तो जमाना गेला जेव्हा फक्त आयटीवाल्यांना धडाधड पगार आणि अमेरिकेत वगैरे जायच्या संधी होत्या. १९९८-२००३ पर्यंतचा तो मौसम होता""
हो पण तो परयन्त काय ..पगार मिळालाच ना अव्वा च्या सवा...आणि वाढ्लेला पगार कमी तर नाहि न होत आहे?? आणि तेव्हा घेतलिच ना घर वाटेल तो भाव देवून?
""आय टी च्या सुगीच्या काळात पगार जास्त होते ""
आता कमी झाले वाटत? अरेरे वाईट झाल हं.. आय टी म्हंजे देशाचे ईजिन्..मग जे लोक ते ईंजिन ओढतात त्यांचि हि अवस्था? पुढचि हजार वर्ष आय टि कंपन्या आणि त्यांचे एकमेवद्वितिय कर्मचारि
ह्यांना १००% करमाफि दिलीच पहिजे..
19 Oct 2007 - 9:43 am | जुना अभिजित
आयटि वाले...(त्यातूनहि पुण्यातले)
सगळीकडे हाच प्रॉब्लेम आहे. हैदराबाद आणि चेन्नै मध्ये प्रत्यक्ष बघितले आहे. बंगळूरवाले तर आहेतच बिघडलेले.
भाजी घेताना वाटेल त्या भावात भाजी घेणे.. रिक्शात मागतील तेवढे भाडे देणे, वस्तुची किंमत काय आपण देतोय काय ... हिच गोष्ट जागेच्या बाबतीत..आपला पगार केवळ चलन फरका मुळे आहे हे समजण्याची कुवत नसल्या मुळे .
हे सगळ्या प्रश्नाचे मूळ आहे. ५ दिवस कमवायच आणि दोन दिवस उडवायचा ही वृत्ती वाईट. कमी वयात जास्त पैसा मिळाल्यामुळे सुद्धा असं होतंय..
हो पण तो परयन्त काय ..पगार मिळालाच ना अव्वा च्या सवा...आणि वाढ्लेला पगार कमी तर नाहि न होत आहे?? आणि तेव्हा घेतलिच ना घर वाटेल तो भाव देवून?
हे बरोबर आहे हो तंतोतंत पण २००३ नंतर नोकरीला लागलेल्या आम्हा आयटीवाल्यांच काय? आयटीवाल्यांना वेगळं पाडून शिव्या घालायचे दिवस गेले. मला म्हणायचं एवढंच आहे की आता बर्यापैकी सगळे एकाच पातळीवर येत आहेत. आणि सगळे भाजी घेताना वाटेल त्या भावात भाजी घेणे.. रिक्शात मागतील तेवढे भाडे देणे अशा गोष्टी करतात. उधळपट्टी काय फक्त आयटीवाल्यांनी करायची काय? उलट आयटीवालेच आता सावध होत आहेत.
आता कमी झाले वाटत? अरेरे वाईट झाल हं..
पगार कमी झाले नाहीत पण पगारवाढीचा दर कमी झाला आहे. कंपन्या बदलून जे लोक पगारवाढीच्या स्वरूपात फायदा उचलायचे त्यांना पद्धतशीर पुढची इंक्रिमेंट उशिरा किंवा कमी दिली जाते. शनिवार-रविवार कामावर यावे लागते. :-( ट्रेकिंग प्लॅन फिसकटतात.
भारतातील आय.टी. उद्योगाला बांग्लादेश, आप्फ्रिका, चीन सारख्या कमी खर्चात सेवा पुरविणार्या देशांकडून टक्कर मिळत आहे. रात्र वैर्याची आहे.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
18 Oct 2007 - 8:12 pm | प्रकाश घाटपांडे
कॉम्प्लेक्स नावाच्या वसाहतीत राहणारे ईडियन विरुद्ध भारत हा लढा आता होत राहणार. स्वतःला कॉम्प्लेक्स मध्य आलेले लोकांचा दशांगुळे वरती रथ जातो.हे अगोदर सदाशिव, नारायण शनिवारात राहणारे मध्यमवर्गीय होते, मुले आयटी त आले आणी चित्र बदलल. बाटलेले लोकच अधिक कट्टर असतात. हे झालय अतिसमृद्धि मुळे. भारतीय कॅन्व्हासवर अमेरिकेचे चित्र हे लोक ऍम्बॉस करतात. यातून विषमता वाढत जाणार. "ब्रेड मिळत नाही तर हे लोक केके का खात नाहीत? " याकडे वाटचाल झाली तर गुन्हेगारी ची वाढ बेसुमार होणार. मध्यमवर्गीयांना आता घर आवाक्याच्या बाहेर आहे.
इंडिया विरुद्ध भारत हा लढा हेच भारताचे भवितव्य आणि यातूनच भारताचा विकास हेच आमचे भाकित.
अवांतर- माझी बायको रिअल इस्टेट कन्स्लटंन्सी, डॉक्युमेंटेशन, केअर टेकिंग करत असल्याने भावाचे अंतरंग तिला चांगलेच माहित आहे. तरी आत्ताचा बूम आश्चर्यच्कित करणारा होता. आता तो थोडा खाली येईल.
प्रकाश घाटपांडे
19 Oct 2007 - 12:13 pm | तात्या विंचू
होय पुण्यात जागान्चे भाव खुपच वाढलेले आहेत. सध्या ज्या किम्तित पुण्यात २-बीऍचके येतो त्या किम्तित आमच्या कोल्हापुरात भारिपैकि बन्गला बान्धुन होइल....
(जागान्चे भाव कमी व्हायची वाट बघणारा)
अनुप
23 Oct 2007 - 5:29 pm | लबाड बोका
मित्रांनो
काही काळजी करु नका
थोड्याच दिवसांत सर्व महागाइ व जागांचे अवास्तच भाव खाली येतील
डोलरच्या फरका मुळे उदयास आलेल्या आय टी कंपन्या व बीपीओ कंपन्या हळुहळु गाशा गुंडाळतील
बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार हा भुतकाळ होइल
हि बातमी वाचा Link
खरोखर डोक्याचे कां करणारे नक्कीच टिकतील पण कर स्केनए कर टाइप अन मिळव ४०००० हा भुतकाळ
23 Oct 2007 - 5:58 pm | जुना अभिजित
वर व्यक्त केलेली शक्यता नाकारता येत नाही.
फक्त बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार असं म्हणण्या ऐवजी बिनडोक कामासाठी मिळणारा भरमसाठ पगार असं म्हटलं तर अधिक संयुक्तिक होईल.
अर्थात आयटीवाले कंपनीत किती आणि काय काम करतात हे त्यांनाच माहित असतं. बाहेरच्यांना एकतर खूप काम करतात असं वाटतं किंवा नुसता टाईमपास.
पण आयटी साठी नव्हे संपूर्णे निर्यातक्षम उद्योगांसाठी रुपयाचे पुन्हा एकदा अवमूल्यन होण्याची शक्यता प्रत्यक्षात येऊ शकते.
अभिजित
24 Oct 2007 - 7:37 pm | लबाड बोका
फक्त बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार असं म्हणण्या ऐवजी बिनडोक कामासाठी मिळणारा भरमसाठ पगार असं म्हटलं तर अधिक संयुक्तिक होईल.
मित्रा
मी आधी डोके असलेल्यांना बिनडोक कामांचा खुप पगार असे लिहिले होते पण
नंतर विचार केला
ज्यांना लक्षात येत नाहि की आपल्याला मिळणारा पगार आपल्या अकलेला नाही तर चलन फरका मुळे आहे
आपण दुय्यम कामे करीत आहोत
जे खुप माजले आहेत
ज्यांचा भारताशी संबंध तुटला आहे
त्यांना डोके आहे असे म्हणण्यास माझे मन तयार झाले नाही म्हणुन मी बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार असे म्हटले
कुणास राग आला असेल तर माफ करा पण परिस्थिती अशीच आहे
बोका
25 Oct 2007 - 8:30 am | जुना अभिजित
ज्यांना लक्षात येत नाहि की आपल्याला मिळणारा पगार आपल्या अकलेला नाही तर चलन फरका मुळे आहे
आपण दुय्यम कामे करीत आहोत
जे खुप माजले आहेत
हे असेल तर बिन्डोक बरोबर आहे. भारताशी संबंध वगैरे हा वेगळा विषय होऊ शकतो.
मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
23 Oct 2007 - 6:02 pm | सागर
बिनडोक माणसांना मिळणारा भरमसाट पगार हा भुतकाळ होइल
बोकोबा,
का आम्च्या प्वाटावर लबाडपणे पाय देताय?
आहो डॉलरचा भाव कमी होवो आणि आप्ल्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत होवो ही आमची पन इच्चा हाय.
पन आय.टी. कंपन्या बंद पडल्या वा स्थलांतरीत झाल्या तर आपल्या देशाचे उत्पन्न कमी नाय का होणार?
आय.टी. सेक्टर देशाला जेवढा पैसा देतं तेव्हढा कोणते सेक्टर देतं?
आय.टी. बंद पडले तर त्यांच्यावर अवलंबून असलेले रोजगारपण संपुष्टात येतील की राव
जसे ट्रान्स्पोर्टवाले (सारखे जॉब बदलणार्यांमुळे त्यांचा घरे शिफ्टींगचा धंदा झोकात चालू आहे),
कूल कॅब (सायेब लोकांना यांच्या गाडीशिवाय घरी जाता येत नाय),
केटरर्स (कॅन्टीन मधे स्टाफला हेच अन्न पुरवतात कि हो),
साफ-सफाईवाले (रोजची कमाई हाय आन् पैका पन बक्कळ मिळतो),
पेंटींगवाले (आयटी कंपनी नवीच दिसली पायजे हा हट्ट असतो ना सगळ्या कंपन्यांचा),
तसेच फर्निचरवाले, संगणकविक्रेत...पाणी विक्रेते...इ...इ... अजून नाय आठवत
लय मोट्ठा फटका बसेल की हो देशाला.
पैसाच नसला तर सामान्य लोक गुंतवणूक कशी करतील?
बाकी आमचे इन्कम वाढून जागांचे भाव खाली उतरत असतील तर लय आनंद होईल
(पुण्यातील जागांचे भाव उतरण्याची वाट पाहणारा ...तुमच्यापैकीच एक) सागर
5 Nov 2007 - 12:56 pm | लबाड बोका
-
3 Nov 2007 - 4:37 pm | तो
आय.टी. सेक्टर देशाला जेवढा पैसा देतं तेव्हढा कोणते सेक्टर देतं ????
देशाला पैसे देणे म्हणजे? आय.टी. जीडीपी त हिस्सा किती आहे. आय टीची वार्षिक उलाढाल किती आहे?
अवांतर : रिलायन्स अलिकडेच मध्यप्रदेशात ५०,००० कोटीचा उर्जा प्रकल्प सुरू करायच्या बेतात आहे म्हणे.
अति अवांतरः आय. टी. चे लोक किती खातात (केटरर्स) व किती कचरा करतात (सफाईवाले) हे जाणून घेण्याची व तुलना भारतीय रेल्वेशी करण्याची (त्यांचे ही काही १० लाख वगैरे कर्मचारी आहेत म्हणे.) उत्सुकता आपल्या प्रतिसादाने चाळवत होती. मोह टाळला.
(उत्तरे - हिस्सा - सुमारे ५.४%, उलाढाल सुमारे/आदमासे/अनुमानित ४८ बिलियन डॉलर्स (आदमासे २ लाख कोटी) , सुमारे (बोक्याने सुमार वाचू नये!) १६ लाख कर्मचारी, उत्पादकता १३ लाख प्रति कर्मचारी प्रति वर्ष (मात्र?) स्त्रोत: हा)
30 Oct 2007 - 8:15 pm | यशोदेचा घनश्याम
१. आय्.टी. वाले सोडले तर इतरांच्या कुवतीच्या पलीकडे सध्या जागा घेणे झाले आहे.
--> आय. टी. सोडूनहि , आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचे अनेक मार्ग आहेत.
कुटुंबातील स्त्री , पुरुष (अर्थात जे सक्षम आहेत ते! व्रुद्ध आणि मुले नव्हे!) सर्वांनी आपल्या शिक्षणाप्रमाणे, अथवा आवडिप्रमाणे व्यवसाय मार्गदर्शन घेऊन; व्यवसाय , नोकरी केल्यास; एका आय्.टी. वाल्याच्या कुटुंबापेक्षाहि, आपली आर्थिक परिस्थिति सुबक बनवता येइल. अर्थात ईथे, आमच्या घरच्या बायकांनी काम केलेले आम्हाला चालत नाही (बायकांच्या पॅशाचं आम्हि खात नाहि) अशी व्रुत्ती असेल, अथवा ठरलेल्या मार्गांना सोडण्याची भिती वाटत असेल तर हे शक्य नाही.
आय. टी . म्हणा किंवा ईतर कुठल्याही क्षेत्रात म्हणा, चढ - उतार होण्याची अनेक कारणे असतात (असतील), त्याची ऊहापोह इथे नको करायला! पण जे कोणते क्षेत्र सध्या जोरावर आहे, त्याचा अभ्यास करुन, त्यास पूरक क्षेत्रांचाहि विचार करून, आपापली प्रगती करुन घेता आली पाहिजे! (आता बिल्डर - कंस्ट्रक्टर लोकांनी अशाच प्रकारे आपली प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्यांना का बरे दोष द्यावा?)
२. दर वाढण्यामागची, मी विचार केलेली कारणे ...
सुरक्षितता :- अपहरण , एकट्या राहणार्या व्रुद्धांवरचे हल्ले अशा बातम्या पूण्यात वाढू लगल्य आहेत. त्यामुळे सोसायटीत पूरेसा सेक्युरिटी स्टाफ ठेवणे गरजेचे बनले आहे.
गरजेच्या सोयी सुविधा : - अखंडित पाणी पुरवठा, जनरेटर, स्वच्छता, पार्किंगसाठी जागा.
गरजेच्या नसलेल्या सुविधा : - स्विमिंग टँक, जीम वगैरे...
आता ह्यात, आपल्याला काय हव, काय नको याचा विचार केला तर, तसेच तुलनात्मक दरही भेटतील. (असं माझंतरी निरीक्षण आहे. तसं नसताचं, जर दर जास्त असतील तर, अन्याय आहे ! ...... पण कंस्ट्रक्शन व्यवसायातही स्पर्धा आहेच ! त्याचा फायदा करुन घेण्यासाठि योग्य चर्चा व अभ्यास हवा.)
३. आता, मीपण आय. टी. मधेचं जॉब करतो........
माझ्या बर्याच मित्रांनी लवकर फ्लॅट कसा घेतला?...... तर, आय. टी. मधेच काम करणार्या मुलीशी लग्न केलं, आणि दोघे मिळुन फ्लॅटचे हफ्ते लवकरात लवकर फेडायचं बघतात.
हा मार्गही आहे ;) पण इथेही पहीली गोष्ट, अशी मुलगी पटवता येण, आणि दुसरी म्हणजे, तीची करीअर मधे भरारी मार्ण्याची स्वप्नं समजावून घेणं गरजेचं आहे. नाहीतर, 'तेल गेल तूप गेल, हाती राहीलं धोपाटणं! ' अशी परीस्थिती व्ह्यायची!
असो, चूक भूल द्यावी, घ्यावी! मला जे वाटलं ते स्पष्टपणे मांडलं!
अवांतर : ३ र्या मुद्द्यातली दुसरी गोष्ट करण्यास, माझी तयारी आहे, पण पहिली करायला अजून जमले नाही! ;)
प्रयत्न नाही सोडणार ! ;)
(पूण्यात लवकरच फ्लॅट घेण्याची इच्छा असलेला) यशोदेचा घनश्याम!
1 Nov 2007 - 7:01 pm | प्राजु
घनश्याम ने जी कारणे दिली आहेत.. ती योग्य आहेत. पुण्यातील जागांचे भाव वाढण्याला आय्.टी. वालेच फक्त जबाबदार आहेत.. हा एक मोठ्ठा गैरसमज आहे.
काहीही कारण नसताना आय्.टी. वाल्यांच्या डोक्यावर खापर फोडणे बरोबर नाही.
- प्राजु.
1 Nov 2007 - 7:15 pm | लबाड बोका
काहीही कारण नसताना आय्.टी. वाल्यांच्या डोक्यावर खापर फोडणे बरोबर नाही.
बरोबर आहे तुमचे म्हणणे पण......
आय टी वाले मुर्खाप्रमाणे पैसे उधळतात त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना होतो
जसे
१० रुपयाच्या ठिकाणि भाजिला १५ रुपये मोजले की यांचा इगो सुखावतो पण सामान्य माणसाला उगाचच जास्त पैसे द्यावे लागतात
१० रुपयाच्या ठिकाणि रिक्षाला १५ रुपये मोजले की यांचा इगो सुखावतो पण सामान्य माणसाला उगाचच जास्त पैसे द्यावे लागतात
१००० रुपये स्केवर फुटाला १७००-१८०० रुपये मोजले की यांचा इगो सुखावतो पण सामान्य माणसाला उगाचच जास्त पैसे द्यावे लागतात
मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे बिनडोक माणसांनी भरलेले आय ठी त्यातल्या त्याथ पूण्याचे आय टी बावचळलेले आहे
देव त्यांचे रक्षण करो कारण डोलर ३५ च्या खाली आला की रस्त्यावर झूंडी दिसतील काम द्या काम म्हणत फिरणा-यांच्या.....
(१ डोलर = १रुपया समर्थक) बोका
2 Nov 2007 - 12:05 pm | ध्रुव
एक साप विषारी निघाला की माणसाला (बोक्याला असेही चालेल ;-)) दोरीचीही भिती वाटायला लागते.
इतका राग?? मला एक कळत नाही किती आय टी वाल्यांबरोबर तुम्ही भजी खाल्ली, किती लोकांबरोबर तुम्ही रिक्शा केली (मिटरने पैसे न देता). उगाच आपला विषय वाढवायला काहीतरी बोलत राहायचे. नुसते आयटी नाही तर Engineering सेक्टर मध्येही सद्ध्या भरमसाट पगार मिळत आहेत. धरा त्यांची मानगुट घ्या त्यांचे चावे. शेअर मार्केट वर आहे. पकडा त्या लोकांना फोडून काढा.
अहो किती दिवस असे करत बसणार,जागे व्हा!! या गोष्टीला फक्त आयटी जबाबदार आहे असे नाही. परीस्थीती बदलण्यास काहितरी करा आणि मग साहाय्य मिळाले नाही तर ओरडा.
असो, मला एक सांगा, की आयटी बद्दल तुम्हाला इतका राग आहे तर http://www.misalpav.com/node/242 हा प्रपंच का? इतरांना कशाला विचारता, बिनडोक काम आहे हे,शोधा स्वत:ची कल्पना करा तयार संकेतस्थळ, पैसे मिळ्यालावर बघू तुम्ही काय म्हणताय.
अवांतरः मागच्या एका प्रतिसादात कोल्ह्याला द्रा़क्षे आंबट ही गोष्ट आठवत नव्हती ती आता आठवायला लागली आहे थोडी थोडी!
ध्रुव
सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva
2 Nov 2007 - 2:43 pm | आनंदयात्री
लबाडाचा प्रतिसाद फारच पुर्वग्रहदुषित वाटला.
2 Nov 2007 - 3:55 pm | जुना अभिजित
उगाच दुसर्याच्या उखाळ्या पाखाळ्या काढल्यासारखा.
अभिजित
2 Nov 2007 - 3:54 pm | देवदत्त
अहो किती दिवस असे करत बसणार,जागे व्हा!! या गोष्टीला फक्त आयटी जबाबदार आहे असे नाही. परीस्थीती बदलण्यास काहितरी करा आणि मग साहाय्य मिळाले नाही तर ओरडा.
सहमत..
फक्त १२ लाख लोकांमुळे देशाला आर्थिक सहायता मिळत नाही , बाकिचे अंदाजे १०० कोटी लोकांमुळेही मिळते ना? मग फक्त त्या लोकांनी परिस्थिती बिघडविली असे कसे म्हणता येईल? हो आपल्या देशात काही मोजके राजकारणी लोक ते करू शकतात. पण त्यांनाही बाकी लोकांचे सहाय्य मिळतेच ना? क्रिकेटचे फक्त १५ खेळाडू देशात अराजक माजवण्याकरता लोकांना चिथवू शकतात. मग हे तर १२ लाख लोक आहेत. पण त्यातही सर्वांचा सहभाग असतोच ना?
मुंबई (पुन्हा मुंबई...) येथे जे जागांचे भाव आधीपासूनच आकाशाला भिडलेले आहे, त्यालाही आयटीच जबाबदार आहे का? आयटी तिथे तग धरू शकत नाही. पण तिथेही मॉल/मल्टीप्लेक्स चा सुळसुळाट आहे. ते लोक महाग गोष्टी घेऊन बाजारव्यवस्था बिघडवत नाहीत का?
तुमचे जे भजी/रिक्षा चे उदाहरण आहे त्यात १०० पै़की ०.१२ लोकांनी जास्त पैसे दिले, तर बाकिच्या लोकांनी आ़क्षेप घेतला का? त्या लोकांना जागे करा ना?
मी तर तो प्रयत्न करतच आहे, परंतु मागे मनोगत वर मी एक चर्चा लिहिली होती त्याप्रमाणे 'सगळीकडे असेच चालतं' असे म्हणत सर्व लोक टाळून देतात. त्याचे काय करायचे? मी पामर त्याचा किती पाठपुरावा करू?
पुढे मागे कोणी असेही म्हणेल की भाज्यांचे भाव, पेट्रोल चा भाव, आता प्रस्तावित दुधाचा वाढलेला भावही आयटी वाल्यांनीच वाढवून ठेवलाय. (खरे असल्यास, खरोखरच कसे ते मला जाणून घ्यायची इच्छा आहे.)
एका इंग्रजी चित्रपटाची कथा मला आठवत आहे परंतु तो काय सुचवितो ते मी नीट शोधून लिहेन. मग ते कोणत्याही समूहाला अनुमोदन करणारे असेना. पण ते बहुधा ह्या परीस्थितीला साजेसं वाटतय. :)
3 Nov 2007 - 4:04 pm | तो
एका इंग्रजी चित्रपटाची कथा मला आठवत आहे परंतु तो काय सुचवितो ते मी नीट शोधून लिहेन.
यात जिम कॅरी आहे का?
5 Nov 2007 - 1:24 pm | देवदत्त
अंदाज नाही हो... कारण ती कथा मला माझ्या बहिणीने सांगितली होती.
जिम कॅरी ची शक्यता कमी कारण तो चित्रपट फार जुना वाटतोय.
5 Nov 2007 - 2:23 pm | तो
त्याला फन विथ डिक ऍन्ड जेन अपेक्षित होता. पण याचे कथानक आर्थिक गैरव्यवहार वगैरे आहे. आपल्याला अपेक्षित असलेला चित्रपट हा नसावा.
19 Nov 2007 - 12:52 am | देवदत्त
ती कथा मी इथे लिहिली आहे. बघा काही आठवते का?
3 Nov 2007 - 4:27 pm | बेसनलाडू
ध्रुवशी सहमत.
एकूणच भारतात रुजू होत असलेल्या अनेक फ्याशन्सपैकी आयटीवाल्यांच्या नावाने शिमगा ही एक असल्याबाबतचे माझे मत अधिकाधिक दृढ होते चालले आहे.
(आयटीवाला?)बेसनलाडू
6 Nov 2007 - 12:14 pm | देवदत्त
'विविध क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा ग्राफही चांगला वाढल्यामुळे फायनान्स कंपन्यांच्या होम लोन्सला भरघोस प्रतिसाद मिळतोय. त्यामुळेही घरांच्या विक्रीत तेजी आहे, असे आकाश शिंत्रे (होम फायनान्स रिसर्च ऍण्ड ऍनालिस्ट) यांनी सांगितले.
मटा मधील ह्या बातमीमधील हे विधान मला प्रातिनिधीक वाटते.
आणखी ,
मागणी/पुरवठा ह्या तत्वाचाही भाव वाढण्यात सहभाग आहे. त्यात मागणी वाढली की भाव वाढतोच.
लोकांनी भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वतःचे घर घेणे जास्त पसंत केले. वाढत्या पगारामूळे ते शक्य झाले. आणि त्यांना साथ मिळाली विविध बँकाच्या कर्ज सुविधांची. गेल्या काही वर्षात (बहुधा २००४/५ पर्यंत) कर्जांवरील व्याजदर ही कमी झाले होते. त्यामुळे ही लोकांच्या इच्छेला ती लवकर पूर्ण करणारे साधन मिळाले. ते दर आता पुन्हा वाढत आहेत. पण मागणी तेवढीच असल्याने (किंवा वाढल्याने) घरांचे भाव तेवढे कमी झाले नाहीत. (नाहीतरी किती गोष्टींचे भाव वाढल्यानंतर लवकर कमी होतात?)
असो, हे माझे मत आहे.
चू.भू.द्या.घ्या.