(पहिल्यांद्याच स्पष्ट करु इच्छितो कि -- हलकेच घ्या!! :) )
नुकताच महाराष्ट्र सरकारने स्थानिक पातळीवरच्या निवडनुकात महिलांना ५०% आरक्षण जाहीर केले. मिपाकरांना याबद्दल काय वाटते यासाठी हा लेखनप्रपंच !!
अशा प्रकारचे आरक्षन देउन महीलांचे समाजातील स्थान खरंच सुधरेल का? आज आपण पाहतो कि भारतात किमान ५० वर्षांपासुन विविध जातिधर्माच्या व विशीष्ट आर्थीक गटातल्या लोकांना विविध प्रकारचे आरक्षण आहे तरी पण गरीबी व इतर समस्या समुळ नष्ट झाल्या काय ? महिलांचे समाजातिल स्थान सुधारले का ? बरं आनंदीबाई जोशी सारख्या काही महीला तर विना आरक्षणपण पुढे गेल्या . सोनीया गांधी , सायना नेहवाल , ऐश्वर्या राय यांना कुठले आरक्षण होते ?
जिल्हा परीषद वगैरेशी माझा जवळचा संबंध येत असल्यामुळे मला महीला पदाधिका-यांबद्दल बरीच माहीती आहे. राखीव जागेतुन निवडुन आल्यावर सुद्धा जवळजवळ सर्व कारभार त्यांचे पतीच पाहतात . अशा प्रकारचे आरक्षण कितपत योग्य आहे ? आज बर्याच मोठ्या शहरात पुरुषांशी निखळ स्पर्धा करुन प्रगती केलेल्या महीलांशी तुलना अशा आरक्षण घेउन प्रगती केलेल्या महीलांशी करता येइल का ?
माझे वैयक्तिक मत तर असे आहे की जेव्हा एखादा समाजघटक ( यात महीलासुध्दा आल्या! ) स्वतः पुढे होउन मिळनारे आरक्षण नाकारुन स्वकष्टाने प्रगती साधेल त्यांच्या आत्मविश्वासाला तुलना नसेल !!!
( कोनाच्या भावना दुखावल्यास Sorry !!)
प्रतिक्रिया
14 Mar 2011 - 5:23 pm | परिकथेतील राजकुमार
(पहिल्यांद्याच स्पष्ट करु इच्छितो कि -- हलकेच घेऊ नका!! )
तुम्ही छान लिहिता, भिकार लिहिता हा मुद्दा जरा बाजूला ठेवुन असे विचारु इच्छितो की मिपावर रोज लेख पाडणे गरजेचे आहे का? तुम्हीच नाही ह्या लेखाच्या अनुषंगाने इतरही बर्याच जणांना हेच विचारावेसे वाटते. स्वतःवर काही काळासाठी बंधन घालता येणार नाही का? रोज उठुन त्याच चार जणांचे लेख, त्याच चार जणांच्या कविता आणि त्याच चार जणांच्या पाकृ.
अक्षरश: वैताग आला आहे. ह्या अशामुळे इतर लोकांचे सकस लिखाण विनाकारण मागच्या पानावर ढकलले जाते :( तुम्हा सर्वांना* नम्र विनंती आहे की हवे ते लिहा पण जरा इतरांना पण संधी द्या.
धन्यवाद.
*ह्यात स्वतःचे भिकार धागे स्वतःच प्रतिसाद देऊन वर आणणारे, स्वतःच्या टुकार ब्लॉगच्या अतिटुकार लिंक देणारे देखील सामिल आहेत.
14 Mar 2011 - 5:52 pm | टारझन
असेच म्हणायला आलो होतो . पण ऑलरेडी प्रतिसाद देऊन पर्याने कष्ट वाचवल्या आहे.
उगा आयडी तसा घेतला म्हणुन उगा काहीतरीच लिहु णका :) लिहील्यास मनोरंजन मात्र करुन घेउ आम्ही :)
14 Mar 2011 - 6:26 pm | उगा काहितरीच
मला माहीत नव्हते की लिखानामध्ये खंड असावा . नविन माहितीबद्दल धन्यवाद! पुढ्च्या वेळेस खबरदारी घेइल!!
14 Mar 2011 - 6:30 pm | विकास
स्वतःवर काही काळासाठी बंधन घालता येणार नाही का? रोज उठुन त्याच चार जणांचे लेख, त्याच चार जणांच्या कविता आणि त्याच चार जणांच्या पाकृ.
त्यासाठी पण आरक्षण ठेवून बघायचे का? ;)
14 Mar 2011 - 6:39 pm | परिकथेतील राजकुमार
आयडीयाची कल्पना चांगली आहे. पण मग निव्वळ लेखनकंडू शमवण्यासाठी डू-आयडीचे पिक यायचे.
16 Mar 2011 - 2:28 pm | तिमा
'टुकार लेखन' असा वेगळा विभाग काढावा अशी संपादक मंडळाला विनंति आहे. किंवा टुकार लेखन हे आपोआप मागच्या पानावर जाईल व 'उच्च' कोटीचे लिखाण फ्रंटपेजवर तळपत राहील असे काहीतरी करावे.
14 Mar 2011 - 5:47 pm | वेताळ
उगाच आपले काहीतरीच.
सोनिया गांधीचे असे काय कर्तुत्व तुम्ही बघितले?
14 Mar 2011 - 5:49 pm | नि३
मग काय काही ऊपाय सापडला काय बोक्यावर..
14 Mar 2011 - 5:51 pm | अभिषेक पटवर्धन
आहो उका, जरा उदाहरणं तरी विचर करुन द्यायचीत. ऐश्वर्या आणि सायना बायका आहेत म्हणुनच तिथे पोचल्या. ऐश्वर्या बाई नसती तर अभिनेत्री कशी झाली असती? पुरुष असती तर हीरॉईन म्हणुन चल्ली असती का? आणि सायना पुरुषांविरुद्ध बॅडमिंटन खेळते कि काय? उदाहरणं अशी द्या कि जीथे बायकांसाठी वेगळी कॅटेगरी नसेल. काय उदाहरणं देताय राव!!
14 Mar 2011 - 6:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे सोनिया गांधी पुरूष असत्या तरीही गांधी घराण्यात आल्या असत्या असं काही तुम्हाला म्हणायचं नसावं.
14 Mar 2011 - 6:20 pm | उगा काहितरीच
त्या विना आरक्षन पुढे गेल्या . हेच सांगायचं होत !
माझं फक्त असं म्हननं होत की - प्रगती करायची असल्यास आरक्षन असुन नसुन काही फरक पडत नाही !
15 Mar 2011 - 6:49 pm | वपाडाव
आरक्षण द्यायलाच हवे अन्यथा तुमच्यासारखी मंडळी समोर जातील अन त्याचा काही ** फायदा नाही.
16 Mar 2011 - 2:24 pm | तिमा
विना आरक्षण कसे म्हणता ? नेहरु - गांधी घराणे हेच सर्वात मोठे आरक्षण आहे. त्या सुनबाई नसत्या या घराण्याच्या, तर इटलीतच राहिल्या असत्या.
15 Mar 2011 - 8:38 pm | अप्पा जोगळेकर
ऐश्वर्या आणि सायना बायका आहेत म्हणुनच तिथे पोचल्या. ऐश्वर्या बाई नसती तर अभिनेत्री कशी झाली असती? पुरुष असती तर हीरॉईन म्हणुन चल्ली असती का? आणि सायना पुरुषांविरुद्ध बॅडमिंटन खेळते कि काय?
ऐश्वर्या राय पुरुष असती तर हिरो झाली असती, सानिया गांधी राजीव गांधीसदॄश पुरुष राजकारणी आणि सायना नेहवाल तौफिक हिदायत सारखी कसदार पुरुष बॅडमिंटनपटू. असं अॅनालॉजी लावल्यास म्हणता येईल.
आणि सायना पुरुषांविरुद्ध बॅडमिंटन खेळते कि काय?
तिने पुरुषांविरुद्ध बॅडमिंटन खेळावे अशी अपेक्षा आहे काय?
'आत्याबाईला मिशा असत्या तर' अशा थाटाची विचारसरणी आहे.
तुम्ही स्त्री असतात तर तुम्ही कशा प्रकारची प्रतिक्रिया दिली असती असा विचार करावा काय ?
14 Mar 2011 - 5:57 pm | अविनाशकुलकर्णी
आपल्या लेकि ..सुना.. आज्ज्या...पण्ज्या..वयन्या बायका चि सोय राज्यकर्ते/ राजकारणी करीत आहेत..
आपणास बघवत नाहि का? काय हे...
14 Mar 2011 - 6:02 pm | पर्नल नेने मराठे
अशा प्रकारचे आरक्षन देउन महीलांचे समाजातील स्थान खरंच सुधरेल का?
* तुम्ही कोणत्या समाजात राहाताय त्यावर आहे..आम्च्या समाजातील महीलांचे स्थान उच्च आहे ब्वा !!!
आज आपण पाहतो कि भारतात किमान ५० वर्षांपासुन विविध जातिधर्माच्या व विशीष्ट आर्थीक गटातल्या लोकांना विविध प्रकारचे आरक्षण आहे तरी पण गरीबी व इतर समस्या समुळ नष्ट झाल्या काय ?
*त्या लोकांनी आरक्षण नाकारुन पहायला हवे होते मे बी कदाचित समस्या समुळ नष्ट झाल्या असत्या.
राखीव जागेतुन निवडुन आल्यावर सुद्धा जवळजवळ सर्व कारभार त्यांचे पतीच पाहतात .
* मात्र आमच्या घरात पुरषांना आमच्या कर्त्रुत्वाची खात्री असल्याने सगळा कारभार स्त्रियाच पहातात.
माझे वैयक्तिक मत तर असे आहे की जेव्हा एखादा समाजघटक ( यात महीलासुध्दा आल्या! ) स्वतः पुढे होउन मिळनारे आरक्षण नाकारुन स्वकष्टाने प्रगती साधेल त्यांच्या आत्मविश्वासाला तुलना नसेल !!!
* आम्ही का नाकारावे? आम्ही शिकलोय सवरलोत ते काय आरक्षण नाकारायला का... हे म्हणजे गव्हर्मेन्ट देत न बिन्डोक नाकार्तेय सारखे झाले.
14 Mar 2011 - 6:18 pm | परिकथेतील राजकुमार
चुचुचा हा प्रतिसाद बाहेरुन टंकुन आणुन इकडे युनिकोदात परावर्तित केला आहे हे उघड जाणवत आहे.
सदरहू प्रतिसाद रद्द केला जावा.
14 Mar 2011 - 6:36 pm | उगा काहितरीच
* आम्ही का नाकारावे? आम्ही शिकलोय सवरलोत ते काय आरक्षण नाकारायला का... हे म्हणजे गव्हर्मेन्ट देत न बिन्डोक नाकार्तेय सारखे झाले.
काय राव येथे तुमचा बाणा कुठे जातो ? स्वाभी मान नावाची काही गोष्ट आहे का नाही ? आरक्षन हा अधीकार नव्हे राजेहो ! आरक्षण म्हणजे सवलत , मदत .
16 Mar 2011 - 5:03 pm | पर्नल नेने मराठे
भारत सरकारकडुनच सवलत मिळतेय ना? ति का नाकारायची?
पाक सरकार कडुन घेतली असती तर वरिल विधान ठिक होते.
उद्या म्हणाल श्वास घेउ नका....उगाच काहितरिच बोलायचे म्हणुन बोलु नका...अच्र्त बव्ल्त कुठचे ;)
14 Mar 2011 - 6:15 pm | आत्मशून्य
.
14 Mar 2011 - 6:22 pm | सूड
>>( कोनाच्या भावना दुखावल्यास Sorry !!)
हे आपलं उगा काहितरीच !! कोनाला कुठे भावना असतात....कोनाला अंश असतात. आणि हो उगा काहितरीच, असं 'उगा काहीतरीच' लिहीणं थांबवा. उद्या तुम्ही चांगला लेख जरी लिहीलात तर लोक उगा काहीतरीच समजून दुर्लक्ष करतील.
14 Mar 2011 - 6:32 pm | वपाडाव
"लांडगा आला रे आला" सारखी गत व्हायची.......
14 Mar 2011 - 6:38 pm | रेवती
ज्या महिला आरक्षणाचा आधार घेऊन अधिकारी होतात आणि ज्यांचे पती कारभार पाहतात त्यांना कितपत कामाचे समाधान मिळत असेल हा प्रश्न जाऊ दे. त्यांना पतीकडूनच आरक्षण घेण्यासाठी दबाव येत असेल आणि त्या बळी पडत असतील तर काय उपयोग? ५०% महिला आरक्षणाचा फायदा करून घेणार्या पुरुषांची चांदी आहे की!;)
14 Mar 2011 - 7:11 pm | गणपा
माझ्या माहिती प्रमाणे सोनिया गांधींना १००% आरक्षण होतं. :)
14 Mar 2011 - 8:07 pm | स्वानन्द
हा हा!! लय भारी :)
14 Mar 2011 - 7:52 pm | jaydip.kulkarni
हि " पवार बाज " खेळी आहे ................ इतक्या दिवसान्नी अचानक ५० टक्के जाहीर करणे हे थोडे विचित्र वाटत आहे ..................
आज पर्यन्त राज्याला महिला मुख्यमन्त्री झालेला नाही ......... त्यान्च्या लेकी च्या नावावर हा मान जावा व पुतण्याला शह मिळावा म्हणुन हे अचानक जाहिर केले ,
मि पा करान्चे काय मत आहे .........................??????
14 Mar 2011 - 8:09 pm | स्पा
अप्रतिम लेख,
फारच छान, मला तर बुवा जाम आवडला
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
वा... खूपच चान
14 Mar 2011 - 9:34 pm | इरसाल
साहेब इतके लवकर लवकर लेख नका टाकू.अन्यथा तुमचा भाव कमी होणार. मग 'अरे राहिलेले भाग टाक लवकर', असे म्हणत कोण मागे फिरेल.
14 Mar 2011 - 9:47 pm | इंटरनेटस्नेही
सविस्तर प्रतिसादासाठी जागा आरक्षित.
16 Mar 2011 - 10:44 am | वपाडाव
इंट्याला एक ब्लॉग/साईट भाड्याने द्यावी का?
प्रत्येक धाग्यावर 'जागा' अडवुन ठेवतो.
15 Mar 2011 - 6:51 pm | वपाडाव
आरक्षण द्यायलाच हवे अन्यथा तुमच्यासारखी मंडळी समोर जातील अन त्याचा काही ** फायदा नाही.
16 Mar 2011 - 1:31 am | विकास
खालील लेखातील अनुमान बघण्यासारखे आहे.
Investing in Women
Men Still Dominate Boardrooms, but More Women at the Top Could Boost Returns
त्यातील खालील वाक्य पण विचार करायला लावणारे आहे... :-)
A 2009 Harvard Business Review article estimated that women worldwide control about $20 trillion in consumer spending each year.