नवीन मराठी संगीताची विक्री आता तुमच्याही ब्लॉग/वेबसाईटवरून आणि तुम्हाला उत्पन्नही!

योगेश पितळे's picture
योगेश पितळे in काथ्याकूट
9 Mar 2011 - 1:03 am
गाभा: 

मिपाकरांना नमस्कार,

मी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल गेली काही वर्षे चालवत आहे.

नवीन मराठी संगीताच्या इंटरनेटवरील प्रभावी प्रसारासाठी सध्या "मानबिंदू म्युझिक शॉपी" हा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे आणि त्या निमीत्तानेच हे लेखन!

माहितीजालावर असलेल्या प्रत्येक मराठी ब्लॉग/संकेतस्थळावर नवीन मराठी संगीत सहज उपलब्ध व्हावे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे; तसच संगीताच्या ऑनलाईन् विक्रीतून संकेतस्थळ/ब्लॉग चालविणा-या व्यक्तीला उत्पन्नही मिळावे अशी "मानबिंदू म्युझिक शॉपी" या प्रकल्पाची मूळ उद्दीष्टे आहेत. "मानबिंदू म्युझिक शॉपी" तुमच्या ब्लॉग/संकेतस्थळावर सुरू करण्यासाठी "कुठल्याही" तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नसून फक्त आम्ही दिलेल्या ४-५ ओळी तुमच्या संकेतस्थळावर कॉपी पेस्ट करणे अभिप्रेत आहे! ब्लॉगसाठी तर हे काम फक्त ३ क्लिक्स मध्ये फत्ते होते!

याबद्दल सविस्तर माहिती http://shopee.maanbindu.com येथे दिलेलीच आहे. तरीही या उपक्रमात ब्लॉग लिहिणा-या जास्तीत जास्त मिपाकरांनी सहभागी व्हावे आणि आपणही ही माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवून हा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वी करण्यास आम्हाला मदत करावी असे मी सर्व मिपाकरांना विनम्र आवाहन करतो! :)

धन्यवाद
य़ोगेश

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

9 Mar 2011 - 4:10 pm | चिरोटा

छान साईट आहे. पण काही लिंक्स उघडत नाही आहेत.कुठली भाषेत बनवली आहे साईट? ASP/java/PHP?

योगेश पितळे's picture

9 Mar 2011 - 6:45 pm | योगेश पितळे

साईट Advanced Java मध्ये आहे! कुठल्या लिंक्स उघडत नाहीत ते कृपया सांगावे म्हणजे डागडुजी करता येईल! :)

परिकथेतील राजकुमार's picture

9 Mar 2011 - 4:20 pm | परिकथेतील राजकुमार

परवाच ह्याबद्दल ऐकले होते मालक. पुढील यशासाठी शुभेच्छा.

सहभागी झालो आहे :) धन्यवाद.

योगेश पितळे's picture

9 Mar 2011 - 6:47 pm | योगेश पितळे

सहभागी झाल्याबद्दल अनेक धन्यवाद!! :)

नितिन थत्ते's picture

9 Mar 2011 - 4:25 pm | नितिन थत्ते

कोणी "तुम्हाला उत्पन्नाची संधी" म्हटले की पोटात गोळा येतो.

उपक्रमासाठी सदिच्छा !!!!

योगेश, चांगला उपक्र्म, सहभागी झालो आहे, तुझ्या या उपक्रमाला आमच्या सक्रिय शुभेच्छा.

योगेश पितळे's picture

9 Mar 2011 - 6:54 pm | योगेश पितळे

सक्रिय सहभागाबद्दल अनेक धन्यवाद :)

आणि खाण्याबद्दल म्हणाल तर खाण्यासाठीच जगणारेच जे असतात ना त्यापॅकी आम्ही एक आहोत. नाही तर वर जाताना काय घेउन जाणार हो, प्लॅट च्या टॅक्सची पावती की १/२ एकराचा सात बारा की ५ तोळे सोनं.

आक्षी बरांबर!!

पाषाणभेद's picture

9 Mar 2011 - 6:51 pm | पाषाणभेद

जबरा साईट हाय रे भावा, लय भारी

योगेश पितळे's picture

9 Mar 2011 - 9:54 pm | योगेश पितळे

धन्यवाद भावा!! :)

काय राव माझा वर्ड्प्रेस ब्लॉग आहे...

योगेश पितळे's picture

9 Mar 2011 - 9:57 pm | योगेश पितळे

ब्लॉगरवर शिफ्ट व्हा की! ;)

गणेशा's picture

9 Mar 2011 - 8:11 pm | गणेशा

वा वा . ..
मस्त साईट आहे... आपल्याला शुभेच्छा.
आणि विशेष म्हणजे आमच्या येथे सर्व साईटस(शॉपींग च्या तर सगळ्या) ब्लॉक असुनही ही साईट ओपन झाली म्हणुन आनखिनच छान वाटले.

"1. मराठी वेबसाईट/ब्लॉग्समधून । मानबिंदू म्युझिक शॉपी द्वारे "
ही लिंक ओपन झाली नाही पण त्यापुढील ग्रीड चा डेटा आमच्या कंपणीने ब्लॉक केला आहे. मला नंतरच सगळे करावे लागेल वाटते.

आणि एक लॉग ईन होताना ब्लॉग बनवतानाचा जीमेल आयडी दिला आहे.. पण २ इमेल आयडी ची सोय हवी होती असे वाटते .. ऑफिस मधुन पण बर्‍याच गोष्टी हँडल होतात मग ..
असो ही फक्त विनंती होती ..

all the best

योगेश पितळे's picture

9 Mar 2011 - 10:59 pm | योगेश पितळे

"1. मराठी वेबसाईट/ब्लॉग्समधून । मानबिंदू म्युझिक शॉपी द्वारे " ही लिंक ओपन झाली नाही

लिंक ओपन झाली नाही म्हणजे ती कंपनीच्या फायरवॉलने ब्लॉक केली होती का याव्यतिरीक्त अजून काही वेगळे अडथळे आले?

पण २ इमेल आयडी ची सोय हवी होती असे वाटते ..

कशासाठी? ... आणि तुम्ही तसेही दोन वेगवेगळ्या आयडी ने वेगवेगळी खाती सुरू करू शकताच की! :)

अविनाशकुलकर्णी's picture

9 Mar 2011 - 9:02 pm | अविनाशकुलकर्णी

यशासाठी शुभेच्छा

भारी समर्थ's picture

9 Mar 2011 - 11:35 pm | भारी समर्थ

संपादकांनो, हे लिखाण 'माझी जाहिरातबाजी' नामक सदर सुरू करून त्याखाली टाका राव....

भारी समर्थ

योगेश पितळे's picture

10 Mar 2011 - 12:49 pm | योगेश पितळे

आम्ही जो उपक्रम हाती घेतला आहे तो अतिशय चांगला उपक्रम आहे असे माझे वैयक्तीक मत आहे! या गोष्टी मी जर इतरांपर्यंत पोहोचवल्याच नाहीत तर त्याचा काय फायदा? .. आणि तसे झाले तर मग मराठी माणसाला मार्केटींग जमत नाही किंवा महाराष्ट्र व्यापारात मागे कसा यावर चर्चा करायला आपण मोकळे! काय बरोबर ना :P

तुम्ही स्वत: असा एखादा उपक्रम सुरू करून जाहीरातबाजी केल्याशिवाय यशस्वी करून दाखवा, त्याचा केस स्टडी तयार करा. आम्ही त्याचा अवश्य अभ्यास करून तुमच्या पावलावर पाऊल टाकू!

.. आणि ते ही नसेल जमत तर एखाद व्यक्ती काही चांगलं करतेय तर त्याला उगाच विनाकारण टोमणे मारत बसून त्याचा आणि तुमचा वेळ वाया घालवू नये असे माझे अतिशय स्पष्ट मत आहे!!

विनायक बेलापुरे's picture

10 Mar 2011 - 1:29 pm | विनायक बेलापुरे

माझा ब्लॉग नाही म्हणून, नाहीतर सहभागी व्हायला आवडले असते.
उपक्रमासाठी शुभेच्छा.

टारझन's picture

10 Mar 2011 - 2:02 pm | टारझन

आमचा ब्लॉग आहे पण वाचक नाहीत , अन्यथा सहभागी व्हायला आवडले असते ..

गुड वर्क योगेश !

- टारायक धलापुरे

योगेश पितळे's picture

10 Mar 2011 - 2:29 pm | योगेश पितळे

ब्लॉगला वाचक येण्यासाठी ३ सोप्पे उपाय आहेत!

१.नियमीतपणे ब्लॉग लिहा. निदान आठवड्यातून एकदातरी!
२.तुमच्या ब्लॉगची लिंक ई-मेल सिग्नेचर आणि अन्य फ़ोरमवर केलेल्या पोस्टच्या सिग्नेचर मध्ये टाका.
३.तुमचा ब्लॉग ट्वीटर वर शेअर करा आणि योग्य कीवर्डच्या आधी # टाका.

इतक केलतं की वाचक आपोआप मिळतात! तोपर्यंत तुमच्या ब्लॉगवर मानबिंदू म्युझिक शॉपी सुरू करायला हरकत नाही. निदान तुमच्यापर्यंत तरी यानंतर येणार नवीन मराठी संगीत नियमीतपणे पोहोचत जाईल! माझ्यासाठी हे ही नसे थोडके ;)

अमोल केळकर's picture

10 Mar 2011 - 2:45 pm | अमोल केळकर

ब्लॉग वर वाईजेट लावले आहे

अमोल

योगेश पितळे's picture

10 Mar 2011 - 3:22 pm | योगेश पितळे

धन्यवाद अमोल!

पण तुम्ही तुमचा ब्लॉग मानबिंदूवर रजिस्टर केलेला दिसत नाही! कृपया सदस्य होऊन ब्लॉग रजिस्टर करावा!

अमोल केळकर's picture

10 Mar 2011 - 3:35 pm | अमोल केळकर

रजिस्टर कसे करावे?

अमोल

योगेश पितळे's picture

10 Mar 2011 - 5:15 pm | योगेश पितळे

http://shopee.maanbindu.com या लिंकवर "सहभागी व्हा" म्हणून एक विभाग आहे, त्यात सदस्य व्हा ही लिंक आहे!