भारत सरकारने गुरुदेव टागोरांच्या स्मरणार्थ १५० रुपयांचे आणि पाच रुपयांचे अशी दोन नाणी बाजारात आणली आहेत
या दोन्ही नाण्यांच्या संदर्भात एक समस्या वाटते
भारतसरकारचे हे जुने एका रुपयाचे नाणे पाहिल्यावर ती कदाचित लक्षात येईल
किंवा या एकोणीसशे नव्याण्णव साली काढलेल्या पाच रुपयाच्या नाण्याकडे पाहूनहे लक्षात येईल
एक रुपयाचे काय किंवा पाच रुपयाचे १९९९ सालचे नाणे दोन्ही नाण्यांवर छापा आणि काटा ( हेड /टेल ) कोणते ते नीट सांगता येते.
या पूर्वीची बहुतेक नाणी अशाच प्रकारे बनवलेली असायची
अशोक स्तंभावरील सिंहाचे चित्र असलेली बाजू ती हेड ( छापा) आणि अंक लिहीलेली बाजू ती टेल ( काटा) असे सामान्य ज्ञान मला माझ्या शाळेच्या शिक्षकानी दिले होते.
पण नव्या १५० रू. च्या नाण्यावर किंवा नव्या ५ रु. च्या नाण्यावर सिंहाचा छाप आणि संख्या हे एकाच बाजूला आहेत.
तर दुसर्या बाजूवर टागोरांचे चित्र आहे.
समस्या ही आहे की या नाण्याच्या कोणत्या बाजूला छापा म्हणावे आणि कोणत्या बाजुला काटा म्हणावे.
( चित्रे जालावरून rbi ,wikie आणि इतर संस्थळांवरून )
प्रतिक्रिया
9 Mar 2011 - 4:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विजुभौ, अशोक स्तंभावरील सिंहाचे चित्र असेल ते हेड [छापा] मानावे.
-दिलीप बिरुटे
[हेडवर भरवसा असलेला]
9 Mar 2011 - 7:03 pm | श्री गावसेना प्रमुख
शाळेतच शिक्षक लोक छापा काटा शिकवितात हे नविन ऐकल !
(बाकी शिक्षणाच्या .......घो हा खरा वाट्तो उगाचच नाव बदलल)
9 Mar 2011 - 4:16 pm | वपाडाव
विजुभौ...
मला असे वाटते की, ज्या बाजुला "अशोक-स्तंभाचा सिंह" आहे ती बाजु म्हंजे हेड्स.
अवांतर : कुणाची येवढी बिशाद आहे १५०च्या नाण्यानं छाप-काटा खेळण्याची. पत्ता तर द्या त्याचा.
9 Mar 2011 - 4:16 pm | कवितानागेश
छापा-काटा करायला १ रुपयाचेच नाणे वापरावे.
असे १५० रुपयाचे नाणे उडवून झेलायला भिती नाही का वाटत?
;)
अवांतरः गुरुदेव टागोरांबद्दल आदर असल्याने सिंव्हाच्या आयाळीबद्दल काही लिहिणार नाही!
9 Mar 2011 - 4:23 pm | परिकथेतील राजकुमार
विजुभौंना डायरी द्यायची वेळ आली आहे; असे खेदाने नमुद करावेसे वाटते.
विजुभौंचा हितचिंतक
परा
9 Mar 2011 - 4:38 pm | टारझन
मी चुकुन "विजुभाऊंना डायरीया " झालाय असे वाचले :)
-( इजिभाऊंच्या 'चांगल्या' लेखांच्या प्रतिक्षेत) टारझन
9 Mar 2011 - 6:33 pm | अवलिया
सहमत आहे.
9 Mar 2011 - 4:34 pm | ५० फक्त
आत्ता वर्ल्डकपात छापा काटा केलेली नाणि विकताहेत ना, ती घेउन ठेवा. तेवढीच आपल्या गरीब बिसिसिआय आणि आयसिसिला मदत होईल.
ही घ्या लिंक, https://secure.auctiondesq.com/index.cfm?fuseaction=category&CategoryID=...
9 Mar 2011 - 4:41 pm | गणेशा
समश्या खुपच आत्मकेंद्रीत आहे.. कुठल्याही बाजुला छापा म्हणा त्यात काय येव्हडे ..
9 Mar 2011 - 4:48 pm | बोलघेवडा
हे नाणे शोले पार्ट २ मध्ये वापरायला हरकत नाही.
9 Mar 2011 - 4:55 pm | विनायक प्रभू
मज्जाच आहे विजुभौ ची.
दिल्ली ला काटा की छापा ची वेळ आली की काय?
9 Mar 2011 - 8:23 pm | नितिन थत्ते
10 Mar 2011 - 9:34 am | पंगा
चार सिंह (दर्शनी तीनच) आणि संख्या एकाच बाजूस येण्याची ही पहिलीच वेळ नाही. किंवा वर श्री. नितीन थत्ते यांनी दिलेल्या छायाचित्रांतील नाणीसुद्धा अशा प्रकारची पहिलीच नाणी नव्हेत. यापूर्वी हे अनेकदा झालेले आहे. (माझ्याकडे चित्रे उपलब्ध नाहीत.)
मात्र, 'चार (दर्शनी तीन) सिंह' ही या ठिकाणी अधिकृत राजमुद्रेच्या ठिकाणी असल्याने, ही राजमुद्रा असलेली बाजू म्हणजे छापा किंवा 'हेड्स', हे व्याख्येस धरून आहे. मग भलेही शेपटाच्या बाजूस कोणाचेही मुख का असेना.
अतिअवांतर: नाण्यांच्या संदर्भातील आणखी एक समस्या यावरून आठवली.
एकदा एक सद्गृहस्थ 'आपल्याला पहिल्या जॉर्ज राजाच्या काळातील नाणे सापडले' असा दावा करीत नाणेतज्ज्ञांकडे गेला. पाहतात तर काय, त्या नाण्यावर खरोखरच पहिल्या जॉर्ज राजाचे चित्र आणि त्याबरोबर 'जॉर्ज पहिला, इंग्लंडचा राजा' अशा अर्थीचा इंग्रजीतून मजकूर होता. अतिशय रास्त किमतीस तो ते नाणे तज्ज्ञांस विकावयास तयार होता. मात्र, नाणेतज्ज्ञांनी त्वरित पोलिसांस बोलावून खोटे नाणे विकण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली त्या सद्गृहस्थास अटक करविली.
तर हे नाणे खोटे आहे हे नाणेतज्ज्ञांस कसे समजले? (साध्या तर्काने उत्तर सापडण्यासारखे आहे.)
10 Mar 2011 - 9:50 am | पंगा
... जागा राखून ठेवलेली आहे.
अमेरिकन नाण्यांना छापाकाट्याची वरील व्याख्या नेमकी कशी लावता येईल हे तूर्तास कळलेले नाही. कदाचित तेथे 'कोणाचे का थोबाड असेना, पण ज्या बाजूस आहे, ती छाप्याची बाजू' असा नियम लावावा लागेल असे वाटते. (खात्री नाही.) कारण अन्यथा कोणतीही समाईक अशी 'राजमुद्रा' या नाण्यांवर असल्याचे चटकन लक्षात येत नाही. (अमेरिकन नाण्यांचे अधिक बारकाईने निरीक्षण करावे लागेल.)
10 Mar 2011 - 9:51 am | विजुभाऊ
तर हे नाणे खोटे आहे हे नाणेतज्ज्ञांस कसे समजले?
जॉर्ज पहिला याने मान्य करुया की स्वतःच्या हयातीतच स्वतःचे चित्र असलेले नाणे काढले.
पण पहिल्या जॉर्ज ला हे कसे माहीत की तो पहिला आहे?
तो पहीला आहे किंवा नाही हे दुसर्या जॉर्ज ने ठरवायचे असते. पहील्या जॉर्ज ने नाणे काढले तर तो ते नुसते "जॉर्ज" असेच काढेल
10 Mar 2011 - 9:52 am | पंगा
धन्यवाद.
9 Mar 2011 - 9:31 pm | घाशीराम कोतवाल १.२
ओ ईजु भाउ हे १५० रुपयाचे नाण मिळल कुठ ते तर सांन्गा राव
न्हाई म्हणजे त्यानी छापा काटा करावा म्हणतो ....
10 Mar 2011 - 5:51 am | पिवळा डांबिस
असं लक्ष्मीशी खेळू नये, विजुभाऊ!!!
10 Mar 2011 - 9:47 am | वपाडाव
=))=))=))
10 Mar 2011 - 6:05 am | विजुभाऊ
नाण्यांच्या बाबतीत छापा काटा ( हेड टेल ) संदर्भात काही कन्वेन्शन आहे का.
नितीन तुम्ही दाखवलीत तसे नवे दोन रुपये देखील आहेत .
अवांतर : तुही मेरी लक्ष्मी तूही मेरी माया
ओ लक्ष्मी छाया....
10 Mar 2011 - 8:59 am | अभिज्ञ
नाणे नसेल तर विजुभाऊ तुम्ही "ओली -सुकी" का करत नाही?
गल्ली क्रिकेट कधी खेळला नाहित का?
;)
अभिज्ञ.
10 Mar 2011 - 9:44 am | वपाडाव
अवांतर :
पण मी म्हणतो ....
नाणंच उसळायची गरज काय?
गोवा, सितार, आर.एम.डी. तत्सम प्लास्टिकची पाकिटे घेउन करा की विजुभौ....
मराठी / ईंग्रजी...
आणी मराठी माणुस असल्यामुळे मागणार्याने प्रथम पसंती देवनागरी लिपीतील बाजुला द्यावी.
10 Mar 2011 - 9:08 am | रमताराम
ते 'हेड' म्हणजे ज्या बाजूला व्यक्तिचे अर्धचित्र अर्थात हेड असते ती बाजू. हा हेड्स नि टेल्स चा उगम इंग्लंडात झाला असावा. तिथे बहुतेक नाण्यांच्या एका बाजूस 'भो पंचम जॉर्ज भूप' अथवा राणीचे अर्धचित्र असावे. त्यामुळे हे 'डोके' ज्या बाजूला ती बाजू 'हेड्स' नि -म्हणून- विरुद्ध बाजू टेल्स (स्वयंघोषित का होईना पण सभ्य असलेल्या माणसांनी केलेली व्याख्या म्हणून, अन्यथा अमेरिकन्सनी या बाजूला काय नाव दिले असते ते तर्क करण्याजोगे आहे. ;) ). तस्मात १५० रु च्या नाण्याच्या ज्या बाजूला रोबिन्द्रोनाथ ठाकूरांचे चित्र आहे ती बाजू हेड्स नि दुसरी बाजू टेल्स म्हणा. हाकानाका.
10 Mar 2011 - 11:05 am | माझीही शॅम्पेन
सोताच्या जबबदरीवर पुढील प्रकार करून पाहा (मी न करतच फुकट सल्ला देतोय ;) )
पहिल्या (किवा तळ मजला सोडून कुठलाही ) माळ्यावरून उडी मारा ,
डोक्यावर पडलात तर हेड ,
माकड-हाडच्या जागी पडलात तर टेल (जिथे पुर्वी शेपटी होती)
शरीराच्या इतर कुठल्याही भागावर पडलात तर हेड किवा तेल येई पर्यंत उड्या मारत राहा !!