वारं येणे, भूत काढणे वगैरे वगैरे - काही प्रश्न - मिपाकरांकडून उत्तरे मिळतील ही अपेक्षा

आवशीचो घोव्'s picture
आवशीचो घोव् in काथ्याकूट
8 Mar 2011 - 3:32 pm
गाभा: 

काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग

मी मालवणी माणूस, सुट्टीसाठी म्हणून गावी गेलो, त्यावर्षी आमच्या घरात "देवाची कामे" करणार होते. तर त्या दिवशी
सकाळी "देवाच्या कामांना" सुरूवात झाली. कोंबडा कापणे, महापुरुषाला नैवेद्य दाखवणे असे प्रकार झाले. रात्री जेवण
आटपून सगळी मंडळी एकत्र जमली. तेव्हा नेहमी प्रमाणे आमच्या एका काकांच्या अंगात "वारं संचारलं". सगळे जण
त्यांच्या पाया पडू लागले आणि आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडू लागले. आता साक्षात देव आहे तर त्याला सगळं
माहित असणार असा विचार करून मी देवाला काही न विचारता फक्त पाया पडून बाजूला झालो. थोड्यावेळाने माझी एक
चुलत आत्या देवाच्या पाया पडायला आली. देवाने तिला सांगितले की "माझा भोवती सात प्रदक्षिणा घाल". देवाने तिचे
एक बोट पकडले आणि ती देवाला प्रदक्षिणा घालू लागली. एक झाली, दुसरी झाली आणि तिसरी प्रदक्षिणा झाल्याबरोबर
तिने अतिशय जोरदार झटका दिला. चार माणसं तिला धरायला धावली. आता तिचे रूप पालटले होते. ती अतिशय
भेसूर आणि भयानक दिसायला लागली. दात विचकून हसायला लागली. डोळे लालेलाल आणि विस्कटलेले केस. एरवी ती
अतिशय शांत स्वभावाची आहे. बारिक चणीची असून उंचीला ही कमी आहे. तिचं वजन ४० किलो पेक्षा जास्त नसावं.
मात्र आता ती ४ जणांना सुद्धा आवरायला कठीण झाली होती. असा काही प्रकार मी या पूर्वी कधीही पाहिला नव्हता. ती
आवरत नव्हती म्हणून अजून २ जण तिला पकडायला गेले. ६ जणांनी मिळून तिला देवाच्या समोर धरली. देवाने तिचे
केस पकडले. देवा आता तिला प्रश्न विचारू लागला. आणि अतिशय विचित्र आवाजात आत्याच्या अंगातील भूत उत्तरे देऊ
लागले.

देव: कोण आहेस तू?
भूत: मी सुनंदा. (आत्याचे नाव स्वाती आहे)
देव: कुठची तू?
भूत: मी अमूक अमूक ठिकाणची (मालवण शहरातील एका विभागाचे नाव घेतले जो आमच्या घरापासून दूर आहे)
देव: हिला का पकडलंस?
भूत: तिने मला पाहिलं आणि ती मला घाबरली.

मग अजून काही प्रश्न विचारले गेले. भूत आत्याला सोडायला तयार नव्हतं. मग देवाने त्याला शिक्षा करण्याची धमकी दिली.
मग भूत विनवण्या करू लागले.

देव: तूला जे काय हवं ते घे आणि निघून जा, तुझ्यासाठी अमूक अमूक ठिकाणी बकरा कापून ठेवण्यात येईल.

मग देवाने आत्याच्या तोंडावर तांदूळ आणि पाणी असे काही पदार्थ टाकले आणि आत्या शांत झाली.

मी व्यक्तिश: या भूत प्रेत प्रकारावर विश्वास ठेवत नव्हतो. पण हे जे माझ्या डोळ्यासमोर घडले त्यामुळे माझी चांगलीच तंतरली होती. त्यामुळे पुढील प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले.

१) वारं येणे म्हणजे नक्की काय?
२) ६ माणसांना न आवरता येणारी शक्ती एखाद्या काटकुळ्या व्यक्तीच्या अंगात अचानक कशी येईल?
३) विज्ञानाच्या चौकटीत हा प्रकार बसवता येईल का? असेल तर कसा?

प्रतिक्रिया

>>>>१) वारं येणे म्हणजे नक्की काय?

जे तुम्ही पाहिलं ते

>>>>२) ६ माणसांना न आवरता येणारी शक्ती एखाद्या काटकुळ्या व्यक्तीच्या अंगात अचानक कशी येईल?

६ ???
काही काही जण तर १६ लोकांना सुद्धा आवरले जात नाहीत... असं म्हणतात ब्वा ! खरं खोटं माहित नाही

>>>>३) विज्ञानाच्या चौकटीत हा प्रकार बसवता येईल का? असेल तर कसा?

विज्ञानाच्या चौकटीत बसत नसेल तर विज्ञान याच्या चौकटीत बसवा
हाकानाका

छोटा डॉन's picture

8 Mar 2011 - 4:04 pm | छोटा डॉन

>>विज्ञानाच्या चौकटीत बसत नसेल तर विज्ञान याच्या चौकटीत बसवा

:)
नाना हुशार आहे असे आमचे पहिल्यापासुन मत आहे.

- छोटा डॉन

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Mar 2011 - 6:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>काही काही जण तर १६ लोकांना सुद्धा आवरले जात नाहीत... असं म्हणतात ब्वा ! खरं खोटं माहित नाही
हीहीही.
सीता और गीता मधला एक संवाद आठवला.
चाचा :- बेटा, मैने तो सुना था की कुत्ते कि दुम १२ साल मे भी सीधी नही होती.
गीता :- चाचाजी, जरा जोर डाला होता, दुम क्या कुतीया भी सीधी हो जाती.

नरेशकुमार's picture

8 Mar 2011 - 3:45 pm | नरेशकुमार

मि स्वत; भुत आहे. त्यामुळे अ‍ॅट्लीस्ट मि तरी भुतावर ईश्वास ठेवायलाच पाहीजे.

व्हर्चुअल वारं येणं आणि भुतं काढणं हे प्रकार मिपावर फार कॉमन आहेत. प्रत्यक्षात माहित नाही.

काय आहे ते एक डायलॉग आहे ना, अगर आप भगवान में विश्वास रखते हो तो आपको सैतान में विश्वास रखना पडेगा ' त्याचा प्रकार आहे हा सारा.

स्वैर परी's picture

8 Mar 2011 - 3:52 pm | स्वैर परी

मी माझ्या मैत्रिणीच्या गावी गेले होते (वैभववाडी, सिंधुदुर्ग ). तिच्या आजोबांनी (म्हणजे त्यांच्य आत्म्याने) म्हणे तिला लहानपणापसुन त्रास द्यायला सुरुवात केली होती, कारण तिचे बाबा आजोबांचे ऐकत नव्हते, दारु पिणे सोडत नव्हते, वगैरे! तर तिला व मला तिचे काका गावात एका भगताकडे घेउन गेले. तिला एका पाटावर बसवण्यात आले. सुरुवातीला त्यांनी तिच्याशी ईकडचे तिकडचे बोलणे केले. नंतर मधेच तिचा आवाज बदलला आणि ती फार रागात बोलु लागली. तिला बरेच प्रश्न विचारले त्याची तिने उत्तरे दिली. ५-१० मिनिटांनंतर सगळं शांत झालं.
माझाही हे सगळं पाहण्या आधी या सगळ्यावर विश्वास नव्हता. पण नंतर असे काहीतरी आहे, हे मान्य केले!

खरेच हे असे कसे असते मला ही कळत नाही ...
माझातर भुतांवर काडीमात्र विश्वास नव्हता .. देवावर पण फक्त श्रद्धा बाकी काही नाही..
पण तुम्ही म्हणता तसे किंवा स्वैर परी यांच्या म्हणण्यानुसार जर असे प्रत्यक्ष पाहिले असेल तर नक्कीच असे काही तरी आहे.. जे सामान्य माणवाला निट माहिती नाही असे काहि तरी असु शकते हे नक्की..

टारझन's picture

8 Mar 2011 - 4:06 pm | टारझन

एकदा काय झालं , आमच्या धार्मिक विधीच्या कार्या साठी आम्ही सगळे जळगावला आमच्या गावी गेलो होतो. सावदा हे तसे वेलनोन गाव. ते जागरण गोंधळ त्या प्रकारात काही तरी होतं. सगळे सोपस्कर झाल्यावर आमच्या एका काकांनी जे पुण्यात गणेश पेठ मधे रहातात. सावद्या पासुन पुण्यातली गणेश पेठ खुप लांब आहे. एका म्हतारबुवांच्या अंगात पिर बाबांची स्वारी यायची. त्यांनी एका अंगात आलेल्या महिलेला विचारले, "बाबा मेरे घर के सामने का गटार कब अंडरग्राऊंड होयेंगा " आणि त्या बाबांनी जे सांगितले ते ऐकुन माझ्या सकट सर्वांनी तोंडात बोटे घातली. ते म्हणाले " २३ मार्च रोजी तुमच्या इथली गटारं खणण्यास सुरुवात करतील , साधारणतः ३० मार्च पर्यंत ते काम चालेल. पण अचानक पाऊस सुरु होउन सगळे खड्डे वाहुन शुक्रवार पेठेत जातील. शुक्रवार पेठेतली लोकं त्या खड्ड्यांना पुन्हा हुसकुन तुमच्या पेठेत पाठवतील. ह्यासाठी पुन्हा ३ दिवसांचा वेळ जाईल. मग त्यानंतर तिथे अंडरग्राऊंड गटारं बांधन्यात येतील. " मी तसंच तोंडात बोट ठेऊन होतो. बरोबर सांगितल्याप्रमाणे घडल्यामुळे माझ्या तोंडातली बोटं बाहेर निघाली. मला भेटलेली लोकं तुम्हाला हे सांगु शकतील की माझी बोटं आता तोंडात नाहीत. आज गणेश पेठेत अंडरग्राऊंड गटारं ही आहेत.
हे सगळं पाहुन मी आजही चकीत आहे. ह्याला काही विज्ञान नाही... खरंच . . खुप अद्भुत आहे हे.

जे काही असेल ते असेल , पण त्या पिरबाबांच्या स्वारी आल्यामुळे आज आमच्या काकांच्या घरासमोर अंडरग्राउंड गटारं झाली ह्याचा मला अभिमान आहे.

- अद्भुत गुत्ते
पिठ्ठला... कानदा भाकरी खाऊ आधी ....

नरेशकुमार's picture

8 Mar 2011 - 4:20 pm | नरेशकुमार

वाचुन (माझि) बोटं (माझ्याच) तोंडात गेली आहेत.

चिरोटा's picture

8 Mar 2011 - 4:23 pm | चिरोटा

पीरबाबाने केवळ भविष्य वर्तवलय.त्यांच्यामुळे underground गटारे बांधली गेली हे खरे नाही. ते काम नगरसेवकांचे आणि पालिकेचे.कदाचित एखादा नगरसेवकच पीरबाबा म्हणून आला असेल.

आवशीचो घोव्'s picture

8 Mar 2011 - 5:07 pm | आवशीचो घोव्

ह ह पु वा

इंटरनेटस्नेही's picture

8 Mar 2011 - 4:23 pm | इंटरनेटस्नेही

बहुतेक गावतल्या चालु लोकांची ही नाटके असतात.. त्यांच्या काळया धंद्यांकडे लोकांनी दुर्लक्ष करावे म्हणुन.
तरीही, असे प्रकार संपुर्णत: खोटे असतात असे म्हणता येणार नाही.
-
(मालवण व कुडाळचा) इंट्या.

मनाचे खेळ दुसरं काय !!

या प्रकाराला हिस्टेरीया असे संबोधतात

आवशीचो घोव्'s picture

8 Mar 2011 - 5:25 pm | आवशीचो घोव्

हिस्टेरीया विषयी विकी आत्ताच वाचले.
पण २/३ प्रदक्षिणा घातल्यावर असं काय घडलं असावं की ती हिस्टेरिक झाली?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Mar 2011 - 6:37 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अनेक कारणे असू शकतात. ते सायकोलोजीकल कौन्सिलिंग ने कळते म्हणे. मागे एकदा अनिस पैकी कुणाचे व्याख्यान ऐकले होते. त्यात त्यांनी हा विषय हाताळला होता आणि अशी उदाहरणे पण दिली होती.

विज्ञानाच्या कक्षेत न बसणारे काही नसतेच या मताचा मी नाही, पण अंगात येण्याचे काही प्रकार मनोविज्ञानाच्या मदतीने समजावून घेता येतात.

पण २/३ प्रदक्षिणा घातल्यावर असं काय घडलं असावं की ती हिस्टेरिक झाली?

दॅट कॅन बी ट्रिगरिंग.
हीस्टेरीया म्हणजे मोघमपणे बोलायचे झाले तर बेभान होणे.
मनाची अशी अवस्था अटीतटीचा सामना पहाताना मैदानावर प्रेक्षकांची होते.
बाबरी मशीद पाडण्याचाउन्माद हा हिस्टेरीया असू शकतो

अवलिया's picture

9 Mar 2011 - 2:12 pm | अवलिया

>>>>बाबरी मशीद पाडण्याचाउन्माद हा हिस्टेरीया असू शकतो

विजुभाऊंनी उल्लेख केलेली वास्तु ही मशीद नसुन राममंदिर/वादग्रस्त जागा असल्याचे आणि सदर इमारत मशीद नसल्याचे न्यायालयाच्या निर्णयातुन कळते. त्यामुळे बाबरी मशीद नामक कोणतीही वास्तु नाही. त्यामुळे ती पाडली असे सुद्धा म्हणता येत नाही. जी पाडली ती वादग्रस्त इमारत. मशीद नव्हे.

काही जणांना हिंदू, धर्म, संस्कृती, भारत या विरुद्ध बोलण्याचा उन्माद असतो जो हिस्टेरीया असू शकतो.

काहीजणाना प्रतिसाद देण्याचा देखील उन्माद असतो.
असो.
तो विवादीत ढाचा पाडल्यानंतर बर्‍याच लोकाना जे वाटले तो उन्माद होता असे म्हणावे लागेल

>>काहीजणाना प्रतिसाद देण्याचा देखील उन्माद असतो.
असु शकतो

>>>तो विवादीत ढाचा पाडल्यानंतर बर्‍याच लोकाना जे वाटले तो उन्माद होता असे म्हणावे लागेल

सहमत आहे. काहींना सुख काहींना दु:ख वाटले.. उन्माद दोन्हीचा असतो.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Mar 2011 - 5:03 pm | परिकथेतील राजकुमार

तो विवादीत ढाचा पाडल्यानंतर बर्‍याच लोकाना जे वाटले तो उन्माद होता असे म्हणावे लागेल

कधी कधी काय पडले ह्या पेक्षा कोणी पाडले ह्याला जास्ती महत्व मिळते :)

कदाचीत तेजोमहलचा ताजमहाल झाला तेंव्हा काही लोकांना असाच उन्माद आला असण्याही शक्यता नाकारता येत नाही.

विनायक बेलापुरे's picture

8 Mar 2011 - 4:53 pm | विनायक बेलापुरे

देवी अंगात येणे प्रकार हा ही बहुतेकदा मनाच्या अस्वस्थतेतूनच जन्म घेतो. ठराविक वारी अंगात येणारी देव-देवी ठाण मांडून बसते त्यालाही कारणे आहेत.
तरीही काही अनुभव विलक्षण थक्क करणारे, एक्स्प्लनेशनच्या पलिकडे असतात.

अंगात देव येण्यापेक्षा एखाद्याला अडचणीत मदत करण्यासाठी माणसाच्या मनात देव उभा राहणे यावर जास्त विश्वास आहे.

आवशीचो घोव्'s picture

8 Mar 2011 - 5:20 pm | आवशीचो घोव्

अंगात देव येण्यापेक्षा एखाद्याला अडचणीत मदत करण्यासाठी माणसाच्या मनात देव उभा राहणे यावर जास्त विश्वास आहे.

हे योग्य लिहिलंत :)

मला काय वाटतं, या वारं येणाऱ्या लोकांकडे जेव्हा इतर लोक आपल्या समस्या मांडतात तेव्हा हे लोक समस्याग्रस्तांना काही उपाय सांगतात.

१) ७ सोमवार शंकराला २१ बेल वहा
२) मंतरलेल्या तांदळाचा तावीज
३) अंगारे
इ. इ.

हा उपाय केल्यावर आपल्या समस्या दूर होतील असे या समस्याग्रस्तांना वाटते. किंवा मग एक आत्मविश्वास येतो की आपले
काम होणार. हा जो सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो तो त्यांना त्यांच्या समस्यांमधून मार्ग दाखवत असावा.

त्या मार्गाने समस्या सुटली की मग त्यांना वाटते की देवाने त्यांना वाचवले. पण खरंतर त्यांच्या सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास , प्रचंड इच्छाशक्ती यामुळेच ते स्वत: समस्या सोडवतात.

विनायक बेलापुरे's picture

9 Mar 2011 - 4:19 am | विनायक बेलापुरे

हा जो सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो तो त्यांना त्यांच्या समस्यांमधून मार्ग दाखवत असावा.
____________________________________________________________
समस्या सुटू नये असा नकारात्मक दृष्टिकोण कसा असेल ?

आजचे ज्ञात विज्ञान उत्तर देवू शकत नाही म्हणून त्यात न बसू शकणारे काही असूच शकत नाही असे मानणेही चुकीचे आहे. विज्ञानातील किती तरी थिअरीज अश्या आहेत की ज्या नंतरच्या काळात चुकीच्या ठरल्या आहेत. पण ह्या थिअरीज खोट्या ठरण्यापूर्वी तेच खरे आणि बावनकशी विज्ञान मानले गेले होते हे ही विसरून चालणार नाही. शिवाय विज्ञानातही अश्या गोष्टी आहेत ज्या सिद्ध करता येत नाहीत, पण ज्या दैनंदिन व्यवहारात ओवर अ पिरियड येणार्‍या अनुभवाने गृहितके मांडून स्विकारल्या जातात, सिद्धत्वाकडे नेल्या जातात. त्यामुळे आजचे ज्ञात विज्ञान म्हणजेच अंतिम सत्य म्हणणे धाडसाचे ठरेल.

अश्या अंगात येणार्यांना " रेसल मेनियाला" पाठवायला हवं

"खली" सकट सर्वाची हद्दी पसली एक होईल

अविनाशकुलकर्णी's picture

8 Mar 2011 - 5:20 pm | अविनाशकुलकर्णी

सुरत चा हंतर बाबा गाजतोय सद्ध्या..

हा माझा अनुभव आहे, मी साधारण सातवीत असेन त्यावेळेस घडलेली घटना आहे ही, एके दिवशी मी, आई आणि वडिल आमच्या गावाकडे चालत निघालो होतो, साधारण रात्री १२ ची वेळ असावी, गावाच्या बाहेर वळणावर एक वड आहे, लोकांच्या म्हणण्यानुसार तिथे एक भुताचे वास्तव्य आहे, त्या वळणावरुन जात असताना अचानक वडील तिथेच खाली बसले आणि त्यांच्या एका पायात असह्य वेदना सुरु झाल्या, काही केल्या त्यांना चालता येईना. कसेबसे मी आणि आईने त्यांना उभे केले, तेवढ्यात समोरुन दोघेजण M80 वरुन आमच्या जवळ आले आणि अचानक गाडी घसरुन पडले, हे बघताच वडीलांनी पळत जाऊन त्यांना उठ्वले, आई आणि मी हे बघतच बसलो, ज्या माणसाला काही क्षणांपूर्वी चालताही येत नव्हते त्याने पळत जाऊन त्या दोन माणसांन उठवले. पुढे आम्हि घरी आलो काही वेळ जाताच वडिलांची दातखिळी बसली, बरेच उपाय करुन त्यांना normal केले. अचानक ते जोरात ओरड्त त्या वडाच्या दिशेने पळत सुट्ले, ३-४ लोकांनांही आवरेनासे झाले, त्या रात्री ही घटना अनेक वेळा घड्ली, शेवटी त्यांना दोरीने बांधून ठेवावे लागले, पण दुसर्या दिवशी त्यांना यातले काहिही आठ्वत नव्हते.
ही घटना घडली त्यावेळी ते पिलेले होते, पण हे रोजचे होते आणि असा त्रास कधीही झाल नाही. मी पण त्या झाडाखालून बर्याच वेळा रात्रीच्या सगळ्यावेळी गेलो आहे, पण मला कधीही वेगळे जाणवले नाही. माझा भुतांवर विश्वास नाही पण ह्या घटनेची उकल मी अजुणही करु शकलो नाही.

तिमा's picture

8 Mar 2011 - 6:19 pm | तिमा

मिपावरच्या 'हडळ, खवीस, मुंजा वगैरेंची जनगणना व्हावी अशी आमची मागणी आहे.

sagarparadkar's picture

8 Mar 2011 - 6:28 pm | sagarparadkar

तुमची चुलत आत्या 'पेड (payed) ऑडियन्स मेंबर' नसेलच कशावरून ...

संमोहनाचे प्रयोग, टी.व्ही. वरील जादूचे अचाट प्रयोग ह्यांत असे पेड ऑडियन्सेस असतातच की.

तुम्ही ज्या 'देवाची कामे' ह्या प्रसंगाचा संदर्भ देत आहात त्याची 'पूर्वतयारी' आधीपासूनच झाली असेल, तुम्ही त्या पूर्वतयारीत स्वतः भाग घेतला होता का? तसे असेल तर त्या तयारीचा 'संपूर्ण' आवाका (scope) आपल्याला त्यावेळी माहिती होता का?

माझा सख्खा मामा हे असले उद्योग करण्यात (स्वयंघोषित) पटाईत आहे. पण सध्या त्याला सांधेदुखीचा अत्यंत तीव्र झटका येवून खूप त्रास होतो आहे, त्यावर तो स्वतः मात्र डॉक्टरांचेच उपचार घेत आहे. त्याच्या एकेक तर्‍हा आणि अचाट कथा ऐकून आम्हाला हसू येत असे आणि गरीब , अज्ञानी लोकांना उगाचच काहीबाही थापा मारतो म्हणून राग पण येत असे.

आवशीचो घोव्'s picture

8 Mar 2011 - 10:36 pm | आवशीचो घोव्

तुमची चुलत आत्या 'पेड (payed) ऑडियन्स मेंबर' नसेलच कशावरून ...

संमोहनाचे प्रयोग, टी.व्ही. वरील जादूचे अचाट प्रयोग ह्यांत असे पेड ऑडियन्सेस असतातच की.

तुम्ही ज्या 'देवाची कामे' ह्या प्रसंगाचा संदर्भ देत आहात त्याची 'पूर्वतयारी' आधीपासूनच झाली असेल, तुम्ही त्या पूर्वतयारीत स्वतः भाग घेतला होता का? तसे असेल तर त्या तयारीचा 'संपूर्ण' आवाका (scope) आपल्याला त्यावेळी माहिती होता का?

खी खी

असे काही नाही. ते काका मुंबईत राहतात आणि आत्या गावी. त्याचप्रमाणे हे सगळं खाजगी होतं म्हणजे नातेवाईकांमधेच आणि घरातल्या घरात पार पडलं, आणि पूर्वतयारी म्हणाल तर घरामागे जो पिंपळ आहे ज्याला महापुरुष म्हणतात त्याच्या पुजेचे साहित्य आणणे आणि कापायला एक कोंबडा आणणे हीच. या पेक्षा वेगळी तयारी नाही.

हा विधी दर तीन वर्षांनी पार पाडला जातो. प्रत्येक वेळी मी तिथे हजर असतो. (नाईलाज को क्या इलाज). मात्र हा भुताटकीचा प्रकार प्रथमच पाहिला. त्या नंतरही देवाची कामे होत राहीली / होत आहेत पण असा प्रकार झाला नाही.

अग्रजा's picture

8 Mar 2011 - 11:26 pm | अग्रजा

तुमची चुलत आत्या 'पेड (payed) ऑडियन्स मेंबर' नसेलच कशावरून ...

spelling mistake???? इतकी वाईट ???

sagarparadkar's picture

9 Mar 2011 - 1:18 pm | sagarparadkar

ही अक्षम्य चूक झाली आहे ... निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद ... दुरुस्ती करता येते का बघतो.

तसंच रजणीकांटचा चंद्रमूखी आन अक्षयखूंखारचा भूलभूलैया चीत्रपट आठवला.....
असो. सूंदर लेख. लीहीत रहा.

काव्यवेडी's picture

8 Mar 2011 - 10:25 pm | काव्यवेडी

हे सगळे माणसाच्या मनाचे खेळ असतात.
कमकुवत मनाची माणसे अशा गोष्टीन्ना सहज बळी पडतात.
असे मला वाटते.

प्रियाली's picture

8 Mar 2011 - 10:41 pm | प्रियाली

कोकणातल्या माणसांना भुतांसारखा दुसरा प्रिय विषय नाही. त्यांना भुतांनी धरलं-बिरलं नाही तर कसं व्हायचं त्यांचं?... त्यांचं म्हणजे भुतांचं, तेव्हा चालायचंच. कोकण आहे तोवर सगळी भुतं आलबेल आहेत.

जोशी's picture

8 Mar 2011 - 11:04 pm | जोशी

युटुब वर Masked Magician चे प्रयोगात गाडी, माणूस, बाई, कबूतर... वगैरे गायब करायला शिकवीले आहे.

संमोहन Uncovered अशी कुठ्ली मालीका कोणच्या पाहाण्यात आहे काय ? संमोहन शीकून आसले प्रकार करता येतील असे वाट्ते.

अप्पा जोगळेकर's picture

8 Mar 2011 - 11:46 pm | अप्पा जोगळेकर

इथे प्रतिसाद दिल्यास ताबडतोब हिंदू धर्माविरुद्ध गरळ ओकल्याचा आरोप होईल शिवाय अंगात वारं शिरलेल्या लोकांच्या बॅड बुक्स मध्ये जाव लागेल. म्हणून तूर्तास हात आवरता घेतो.

लवंगी's picture

9 Mar 2011 - 8:23 am | लवंगी

भूतं काय फक्त हिंदूच असतात का? काहितरीच तुमच... लिहा तुम्ही बिंधास्त.. कोणत भूत त्रास देत बघू तुम्हाला.. :)

विजुभाऊ's picture

9 Mar 2011 - 2:18 pm | विजुभाऊ

भूते आणि हिंदू धर्माच काय संबन्ध?
भूत ही संकल्पना हिंदू धर्मातील नाहिय्ये.ती इतरधर्मीयांकडून भारतात आली.
हिंदू धर्मात आत्म्याला मुक्तीअगोदर दुसर्‍या जन्मात प्रवेश करावा लागतो.
मधल्या काळात म्हणजे दुसरा जन्म लाभायच्या अगोदर पितर ( आत्मे) हे नरकात्/स्वर्गात रहात असतात
अवांतर : हे मलाआयटी सारखे वाटायला लागलय. कन्स्लटन्ट हे प्रोजेक्टवर असतात. कंपनी तून मुक्ती मिळण्या अगोदर ते प्रोजेक्टवर असतात. एक प्रोजेक्ट संपला की दुसरा सुरू होतो. मधल्या काळात ते बेन्च वर असतात. परंतु कंपनीतच असतात.
( कंपनी बदलताना एका कंपनीतून रीलीव्ह झाला आहे आणि दुसर्‍या कंपनीत अजून जॉइन व्हायचा आहे अश्या मधल्या अवस्थेतला कन्सल्टन्ट घरच्या लोकाना भुतासारखाच भासत असेल . अर्थात असा कन्सल्टन्ट कधी पहायला मिळत नाही)

रमताराम's picture

9 Mar 2011 - 3:53 pm | रमताराम

कधी कधी विजुभाऊ सुद्धा सहमत व्हावे असा प्रतिसाद लिहितात बुवा...कदाचित झपाटलेले असताना...

-(कन्सल्टंट ) रमताराम

हा माझा अनुभव, माझा दादा आणि वहिणी माझ्या सहा महिन्याच्या भाच्याला घेउन फिरायला गेले होते, त्यांना रात्री घरी
यायला दहा वाजले, तरी आईने जाताना सांगितले होते उशीर करु नका, त्यानंतर तीन दिवस माझा भाचा बरोबर रात्री
नऊच्या ठोक्याला इतका रडायचा की आम्हाला तो कंट्रोल व्हायचा नाहि, मग आमच्या शेजारच्या आजीने त्याच्या
अंगावरुन काढ्ले तेव्हा तो कुठं शांत झाला होता, आज तो नऊ वर्शाचा आहे, तेव्हापासुन माझा विश्वास बसला या
गोष्टीवर, काहि गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात असे मला वाटते.

नितिन थत्ते's picture

9 Mar 2011 - 11:04 pm | नितिन थत्ते

>>मग आमच्या शेजारच्या आजीने त्याच्या अंगावरुन काढ्ले तेव्हा तो कुठं शांत झाला होता

त्याला न आवडणारे कपडे घातल्यावर तो रडणारच.
तरी बरं शेजारच्या आजींना हे कळलं आणि त्यांनी ते कपडे त्याच्या अंगावरून काढले.

अप्रतिम's picture

9 Mar 2011 - 4:57 pm | अप्रतिम

फोरेन मधल्या बायकान्च्या अंगात येते का?

नितिन थत्ते's picture

9 Mar 2011 - 11:07 pm | नितिन थत्ते

घोस्ट नावाचा डेमी मूरचा पिक्चर होता. त्यात एक हिडिंबा मांत्रिक दाखवली आहे. तिच्या बहुतेक अंगात यायचं.

विनायक बेलापुरे's picture

10 Mar 2011 - 1:15 am | विनायक बेलापुरे

हिडिंबा मांत्रिक = व्हूपी गोल्डबर्ग

अवलिया's picture

10 Mar 2011 - 8:12 am | अवलिया

कसली आठवण दिलीत... मस्त पिच्चर होता !

मडकं बनवण्याचा शॉट कसला होता... वा !!

अरे रे, यावर गोट्याने २०-२५ वर्षांपुर्वीच उत्तर दिलं आहे. ४ मि. नंतर पाहणे.

बाकी अडाण्यांच्या जत्रेला शुभेच्छा.