'वाक्यं रसात्मकं काव्यं' या व्याख्येनुसार भावनांचे रसपूर्ण अलगूज म्हणजे काव्य. या साहित्य प्रकारातली विविधता अतिशय सौंदर्यपूर्ण आहे. असे वैविध्य रसिक श्रोत्यांसमोर पुन्हा नव्याने उलगडून दाखवायच्या उद्देशाने शिकागो येथिल बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १५ व्या अधिवेशनात काव्यसंमेलन करायचे योजिले आहे.आपल्या संपन्न मराठीतील अभिव्यक्तीचा काळानुसार बदललेल्या नवनविन काव्याविष्कारांबरोबरच काळाच्या पडद्याआड होत चाललेल्या पारंपारिक काव्यवैभवालाही उजाळा देण्याचा हेतू आहे. या काव्यसंमेलनाचे हेच वैशिष्ट्य असेल.
यासाठी अमेरिका/कॅनडा येथिल मराठी कवी-कवियत्रींकडून काव्य मागविण्यात येत आहे. निवड समिती सर्व प्रवेशिकांमधून काही निकषांच्या आधारे ठराविक काव्यांची निवड करतील. निवडलेले काव्य अभिवाचन अथवा गायन स्वरूपात सादर करण्यासाठी त्याच्या कवी/ कवयित्रींना शिकागो येथे स्वखर्चाने यावे लागेल.
आता काव्य म्हणजे काय हे आपल्यासारखे संवेदनाशिल वाचक तसेच लेखक जाणताच. मग घ्या हाती लेखणी.
आपले सृजनत्व काव्य प्रतिभेतून फुलू द्या. लिहिते व्हा आणि लवकरात लवकर आपले काव्य आमच्याकडे chaufula@gmail.com ह्या पत्त्यावर पाठवून द्या. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख- १५ मे २०११.
प्रतिक्रिया
5 Mar 2011 - 8:39 pm | प्राजु
काल पर्यंत अप्रकाशित ठेवलेला धागा, आज प्रकशित करते आहे.
वरती काढण्यासाठी ही प्रतिक्रिया. :)
धन्यवाद.
7 Mar 2011 - 10:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
रोचक
पण कविता समजत नाहीत, लिहीता येत नाहीत त्यामुळे फक्त कोरडं गुड लक.
धाग्यात शेवटची तारीख १५ मे लिहीली आहे आणि जाहिरातीच्या चित्रात १५ मार्च आहे. नक्की कोणती तारीख ग्राह्य धरायची?
7 Mar 2011 - 10:33 pm | प्राजु
ऊप्स!! चुकून मी जुनी पत्रिका जोडली.. स्वारी!! :)
१५ मे वाचावी तारिख. :)
8 Mar 2011 - 5:19 am | चित्रा
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या चौफुल्याला शुभेच्छा. प्राजुताईंनाही शुभेच्छा!
अधिवेशनास येता आले तर नक्कीच येऊ. कार्यक्रम बघायला आवडेल.
8 Mar 2011 - 8:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निवडलेले काव्य अभिवाचन अथवा गायन स्वरूपात सादर करण्यासाठी त्याच्या कवी/ कवयित्रींना शिकागो येथे स्वखर्चाने यावे लागेल.
स्वखर्चाने आपली कविता वाचायला काही जमणार नाही बॉ...! :(
बृहन्महाराष्ट्र मंडळ औरंगाबाद ते शिकागोपर्यंतचे येण्याजाण्याचे प्रवास भाडे नै का भरणार ? :)
उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा.....!
-दिलीप बिरुटे