सदसद्विवेक बुद्धी

यनावाला's picture
यनावाला in काथ्याकूट
27 Feb 2011 - 9:47 pm
गाभा: 

पं.महादेवशास्त्री जोशी यांचे आत्मपुराण हे चरित्रात्मक पुस्तक आहे.
त्यांनी सुरू केलेल्या ज्योतिष कार्यालयासंबंधीची हकीगत त्या पुस्तकात आहे. त्यांतील
काही भाग त्यांच्याच शब्दांत असा:---
"पणजीत मध्यवस्तीत जागा मिळवली आणि पाटी झळकवली :-
’ज्योतिष कार्यालय: इथे ज्योतिषविषयक सर्व कामे केली जातील.’
पाटी पाहून लोक यायला लागले.पत्रिका करू लागलो.त्यांतील ग्रहांचे लाभयोय, त्रिकोणयोग,नवपंचमयोग,युती ,प्रतियुती तसेच गोचरीतल्या ग्रहांचे जन्मपत्रिकेतील
ग्रहांशी योग हे सगळे लक्षात घेऊन जातकशास्त्रानुसार भविष्य सांगू लागलो.
थोड्याच दिवसांत लक्षात आले की माझी भविष्यवाणी खरी उतरत नाही.जेमतेम
पंचवीस टक्के जमायचे.तसेच शास्त्राच्या नियमांविषयीं सुद्धा शंका निर्माण झाली.लग्नी
रवि असेल तर माणूस उंच हे शास्त्र.पण लग्नी रवि असलेला एखादा उंच, एखादा मध्यम
तर काही बुटके आढळू लागले.
माझा आत्मविश्वास ढळला.
गोव्यात एक ख्यातनाम ज्योतिषी होते.त्यांच्याकडे माणसांची रीघ लागलेली असायची.
त्यांना भेटून शिष्यस्तेSहम् म्हटले.ते पृच्छकाशी कसे बोलतात ते लक्षपूर्वक ऐकू लागलो.
ते नेमके उत्तर कधीच देत नसत.पृच्छ्काला बोलके करीत. प्रश्न विचारून त्याच्याकडूनच
सगळी माहिती घेत. मग तेच सगळे मोठ्या चतुराईने सांगून आपण अचूक भविष्य वर्तविले
असे भासवीत.वायदे देत ते षण्मासीचे:-तुझे काम नक्की होणार .पण तीन महिने लागतील.
ग्रहदशा बदलली की अडचणी संपतील.सध्या वक्री असलेला मंगळ तेवढा सरळ होऊं दे.
मग सगळे सुरळीत होईल.
हे ऐकून आशा पल्लवित झालेला पृच्छक मान डोलवायचा.
त्या भास्कराचार्याला एक भाबडी शंका विचारली,"...पण यांत जातकशास्त्र येतेच कुठे?"
"जातकशास्त्र? तुम्ही ग्रंथाधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात.इथे शब्दजंजाळच
कामी येते.समोरच्या माणसाचे बारीक निरीक्षण करायचे.भविष्य सांगायचे ते चांगलेच सांगायचे.त्याला आशेच्या घोड्यावर बसवून पाठवून द्यायचे.अहो,हा धंदा आहे. यांत तुमचे वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके भविष्यकथन अचूक.शास्त्राला धरून भविष्य वर्तविणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे."
मी हिरमुसला होऊन परतलो.छे:, हे असले भविष्यकथन आपल्याला बापजन्मी जमायचे नाही.किती दिवस मी लोकांना आणि स्वत:लाही फसवीत राहू?.मला जाणवले की ज्योतिष हा माझा जीवन व्यवसाय होऊ शकणार नाही.मग एके दिवशी निर्धार करून ज्योतिषकार्यालयाची पाटी स्वहस्ते खाली काढली.
त्या दिवसापासून आजपावेतो कोणताही ज्योतिषग्रंथ उघडला नाही.फलज्योतिष या
विषयावर मी कायमचा पडदा टाकला."
....
फलज्योतिषशास्त्रावर पूर्ण विश्वास ठेवून,त्याचा सांगोपांग अभ्यास करून मोठ्या उमेदीने ज्योतिष व्यवसाय सुरू करणार्‍या शास्त्रीबुवांचा हा सत्य अनुभव आहे."किती दिवस मी लोकांना आणि स्वत:लाही फसवीत राहू?" अशी अंत:प्रेरणा झाली ती सदसद्विवेकबुद्धी जागृत असल्यामुळे.
ती नसती आणि जीवनव्यवसाय म्हणून सोडा पण जोडधंदा म्हणून ज्योतिष कार्यालय सुरू ठेवले असते तरी पं.महादेवशास्त्री जोशी हे गोव्यातील जनमान्यताप्राप्त विख्यात ज्योतिषी होऊ शकले असते.आर्थिक प्राप्ती ही चांगली झाली असती.मात्र सदसद्विवेक दडपून टाकल्याची टोचणी सतत राहिली असती. ते चांगल्या चित्रपटकथा लिहू शकले नसते.भारतीय संस्कृतिकोशाची रचना झाली नसती.
................................................................................................................................
कृपया कोणताही पूर्वग्रह न ठेवता या सत्य अनुभवावर विचार करावा.मग जे काही बुद्धीला पटेल ते मानावे.
**********************************************************************************

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

27 Feb 2011 - 9:59 pm | नगरीनिरंजन

ज्योतिषी लोकांकडून भविष्य ऐकतानाच लोकांच्या लक्षात हे कसे येत नाही हाच फक्त प्रश्न आहे.

प्रियाली's picture

27 Feb 2011 - 10:30 pm | प्रियाली

यनांनी मिसळपावावर लेख टाकला याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

समोरच्या माणसाचे बारीक निरीक्षण करायचे.भविष्य सांगायचे ते चांगलेच सांगायचे.त्याला आशेच्या घोड्यावर बसवून पाठवून द्यायचे.अहो,हा धंदा आहे. यांत तुमचे वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके भविष्यकथन अचूक.शास्त्राला धरून भविष्य वर्तविणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे."

परफेक्ट!! :)

आळश्यांचा राजा's picture

27 Feb 2011 - 11:15 pm | आळश्यांचा राजा

हे असले भविष्यकथन आपल्याला बापजन्मी जमायचे नाही.

अधोरेखित शब्दांवरुन असे वाटते की शास्त्रीजींना एका ठरावीक प्रकारच्या भविष्यकथनाविषयी(च) प्रॉब्लेम असावा.

चित्रा's picture

27 Feb 2011 - 11:28 pm | चित्रा

उत्तम लेख, आणि धन्यवाद मिपावर टाकल्याबद्दल.

धनंजय's picture

7 Mar 2011 - 9:45 pm | धनंजय

सहमत आणि सहमत

सहज's picture

28 Feb 2011 - 6:37 am | सहज

उत्तम लेख. मागे घासकडवी यांनी मोठ्या बुवा, बाबांचे भाकीत संख्याशास्त्रातुन बरोबर यायची शक्यता व हे असे बरोबर आलेले जातक त्या त्या बुवांचे पट्टशिष्य रादर पट्ट जाहीरातदार होउन अजुन लोक जमवतात व चक्र सुरु राहते. १००% भाकीते सोडा ५०% भाकीतेही खरी होत नाहीत तरी बोलबाला होउन धंदा चालतो. हे एका लेख अथवा प्रतिसादातून उत्तम समजावून सांगीतले होते. दुवा शोधत आहे. सापडला.

नाडीपट्टीवाल्यांची अजुन एक चतुराई फार फार आवडली. हे सगळे भविष्य हजारो वर्षांपुर्वी लिहले आहे, त्यामुळे चुकीचे असेल तर त्या हजारो वर्षांपूर्वी लिहलेल्या ऋषीमुनींची चूक. आपण फकस्त पोस्टमन, त्यामुळे तुमची पट्टी चुकली नसेल तुम्हीच पत्ता चुकीचा सांगीतला असेल!! कॅश ओन्ली प्लीज!!

किशोरअहिरे's picture

28 Feb 2011 - 6:54 am | किशोरअहिरे

माझा ज्योतीष शास्त्रावर अजिबात विश्वास नाही..
परंतु नुकताच एक अनुभव असा आला की त्या जोतीष बुवाने मुलीची पत्रिका पाहुन एकदम ढोबळ मानाने सांगितले
की मुलीचे शिक्षण कमी आहे आणि पुढे पैसा कमवेल असे वाटत नाही..
त्या मुलीचे खरोखरच शिक्षण कमी होते, आणी हाउस वाईफ राहील असेच वाटले.. असो हा फक्त एक अनुभव म्हनुन सांगत आहे..
त्याच ज्योतिष बुवानी आतापर्यंत सांगितलेल्या ६०% टक्के गोष्टी खर्या निघाल्या बाकीच्या ४०% साफ खोट्या :)

ह्यातुन मला एकच साक्षात्कार झाला तो म्हणजे .. स्वतःची सदस्दविवेक बुध्दी वापरुनच निर्णय घ्यावेत ..
ज्योतीष बुवा कडे जाऊन पैसे , वेळ ऊगाच खर्च होतो ... आणी वरुन डोक्यावर तान पण असतो जर त्याने काही ऊलट सुलट सांगितले तर.

अरे वा! यनावालांचे मिपावर पुनरागमन पाहुन आनंद झाला. त्यांनी येथे लिहित रहावे.

छोटा डॉन's picture

28 Feb 2011 - 10:24 am | छोटा डॉन

हेच म्हणतो.
यनावालांना इथे पाहुन आनंद झाला, त्यांनी लिहीत रहावे असे म्हणतो.

- छोटा डॉन

विकास's picture

28 Feb 2011 - 8:20 am | विकास

श्री. यनावालांचे मिपानक्षत्रात प्रवेश केल्याबद्दल स्वागत! :-)

असो. लेख आवडला. व्यक्तीगत विचाराल तर मी कधी ज्योतिष पाहीले नाही की त्यावर आधारून निर्णय घेतले नाहीत. पण जर कोणी बघत असले आणि त्याच्या आहारी जात नसेल तर कधी मधे पडलो नाही. मात्र असे देखील झाले आहे की कोणी तरी परीस्थितीने गांजल्याने भविष्याच्या आहारी जाण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळेस अशा व्यक्तींच्या सदसदविवेकबुद्धीस जागे करायचे प्रयत्न केलेत.

मात्र सदसदविवेकबुद्धी ही केवळ ज्योतिषशास्त्राचा फोलपणा मान्य न करण्यातच असते असे नव्हे. आज कम्युनिझमचा फोल पणा समजून देखील त्याच्या मागे (स्वतःला मोर इक्वल करत) जाणारे बुद्धीवादी हे कदाचीत ज्योतिष्य बघत नसतीलही, पण तरी देखील स्वतःचे नाही, पण देशाचे नुकसान करू पहात आहेत. माझ्या दृष्टीने तिथे सदसद्विवेकबुद्धी येण्याची अधिक तातडीची गरज आहे आणि काळजीचे कारण देखील आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Feb 2011 - 9:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

फक्त भविष्य आणि कम्युनिझमच नव्हे तर प्रत्येक गोष्टीकडेच उघड्या डोळ्यांनी आणि जागृत मेंदूने बघावं असं मला हा लेख वाचून वाटलं. ज्योतिषाविषयीचा असा अनुभव आल्यामुळे पं.महादेवशास्त्री जोशी यांचा डोळसपणा वाढला असा काही उल्लेख, घटना आहेत का?

एका प्रकारे विचार करण्याची सवय लागली, पद्धत एकांगी असेल किंवा सम्यक असेल, तर अनेक गोष्टींबाबत विचार करताना तशा पद्धतीने विचार केला जातो. शास्त्राचा (यथायोग्य) अभ्यास करणारे शास्त्रीय दृष्टीकोनातूनच (जवळजवळ) सगळ्या गोष्टींचा अभ्यास, विचार करतात. एखाद्या घटनेमुळे विचार करण्याची पद्धतही बदलते. महादेवशास्त्रींच्या आयुष्यातली ही गोष्ट मला या प्रकारची वाटली.

आळश्यांचा राजा's picture

4 Mar 2011 - 8:09 pm | आळश्यांचा राजा

फक्त भविष्य आणि कम्युनिझमच नव्हे तर प्रत्येक गोष्टीकडेच उघड्या डोळ्यांनी आणि जागृत मेंदूने बघावं

सहमत आहे.

शास्त्रीजींना एखाद्या अनुभवातून काय धडा मिळाला (असावा) याचा अर्थ लावता लावता (किंवा न लावताच) मंडळी भविष्य पाहता येऊ शकते की नाही यावर हाणामार्‍या करु लागतात याची अंमळ मौज वाटली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2011 - 9:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्री यनावालासेठ यांचे मिपावर पुन्हा एकदा स्वागत....!

लेख आवडला....!

-दिलीप बिरुटे

५० फक्त's picture

28 Feb 2011 - 10:21 am | ५० फक्त

लेख आवडला, माझा भविष्यावर विश्वास नाही, कारण ते नाहीचय मुळी, जे आहे आता माझ्यासमोर तेच फक्त खरं बाकी सगळं मिथ्या, आणि जे नाही ते जाणुन घेउन काय करणार. बाकी सद्सद्विवेक बुद्धी ही ज्याने त्याने आप्आपल्या स्वार्थासाठी आखलेल्या मर्यादा असतात, प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या.

प्रत्येक जण या आपल्या मर्यादेत राहुन दुस-याच्या मर्यादा कशा तोकड्या आहेत किंवा चुक आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो.

मी तर असे करतोच, कारण असे केले नाहीतर जगणार कसा या सद्सद्विवेक बुद्धिच्या आधारे चालणा-या जगात, हे सगळे सद्सद्विवेकबुद्धिवादी मला सुखाने जगु देणार नाहित.

शशिकांत ओक's picture

28 Feb 2011 - 11:14 am | शशिकांत ओक

कृपया कोणताही पूर्वग्रह न ठेवता (माझे शब्द- नाडीग्रंथांतील मजकुराच्या) सत्य अनुभवांवर विचार करावा. मग जे काही बुद्धीला पटेल ते मानावे.

प्रा. य.ना. वाला सर,
पं.महादेवशास्त्री जोशी यांचे आत्मपुराण पुस्तक वाचून आपला जर वरील सल्ला असेल की 'सांगोपांग अभ्यास करून मोठ्या उमेदीने ज्योतिष व्यवसाय सुरू करणार्‍या शास्त्रीबुवांचा हा जो सत्य (माझे शब्द- म्हणजे थोतांड असा )अनुभव आहे.' तो तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही तो अनुभव घेण्याची तसदी न घेता मानता आहात. मग याउलट नाडीग्रंथांवरील माझ्या शाब्दिक अनुभवांवर नुसते न विसंबता, पुर्वग्रह न ठेवता आपण सांगोपांग प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. अर्थात तो तोंड देखला नसेल, हे आपल्याला मान्य आहे. असे मी मानतो. त्या नाडीग्रंथ ताडपट्टीचा फोटो मिळवून,ताडपट्टीतल्या मजकुराचे कथन आपल्या माहितीतल्या तमिळ जाणकाराला देऊन व त्यातील लिखाणाची म्हणजे पर्यायाने आपले नाव व जन्मदिनांक वगैरे उल्लेखांची खात्री करून मग जे काही सदसद्विवेक बुद्धीला पटेल ते मानावे. म्हणजे आयुष्यभर नाडीग्रंथांच्या सत्यतेला दडपून टाकल्याची टोचणी सतत राहणार नाही अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो. आता आपण आपला सल्ला इतरांनी अमलात आणावा असे अपेक्षित असाल तर ही माझी नम्र विनंती आपण टाळणार नाही अशी अपेक्षा करतो.

पंगा's picture

28 Feb 2011 - 11:44 am | पंगा

लेख बर्‍यापैकी संयत वाटला. स्नानजलाच्या निचर्‍याबरोबरच अर्भकाच्या सुरक्षिततेचीही दक्षता विशेषेकरून स्वागतार्ह आणि संतोषजनक.

लेखाचे स्वागत आणि लेखास ईप्सित लक्ष्यभेदासाठी शुभेच्छा.

आजवर कुतुहलापोटि अनेकांकडे पत्रिका दाखवल्या आहेत
थोड्या बहुत प्रमाणात हाच अनुभव आला आहे.

यनावाला's picture

28 Feb 2011 - 2:02 pm | यनावाला

श्री.आ.रा. लिहितातः"हे असले भविष्यकथन आपल्याला बापजन्मी जमायचे नाही.

अधोरेखित शब्दांवरुन असे वाटते की शास्त्रीजींना एका ठरावीक प्रकारच्या भविष्यकथनाविषयी(च) प्रॉब्लेम असावा.

"
..
हे असले भविष्य म्हणजे :"हा धंदा आहे. यांत तुमचे वाक्चातुर्य जितके प्रभावी तितके भविष्यकथन अचूक.शास्त्राला धरून भविष्य वर्तविणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे आहे."
असे सांगणारा गोव्यातील प्रसिद्ध ज्योतिषी ज्या पद्धातीचे भविष्य वर्तवतो तसले भविष्य; हे स्पष्ट आहे.

जसे भोन्दू वैद्य असतात, म्हणून शास्त्र खोटे ठरत नही.

या इथे कोणी काहीही म्हंटलेले नसतानादेखील नाडी बद्दलचा प्रतिसाद वाचून आश्चर्य वाटले.
यालाच कदाचित सदसद विवेक अबुद्धीची टोचणी म्हणत असावेत

टारझन's picture

28 Feb 2011 - 3:13 pm | टारझन

विजुभाऊंचे "णाडीप्रेम " पुण्हा एकदा फॉर्म मधे :)

बाकी माडी , ताडी आणि णाडी , (अजुन एक "डी " आहे, पण तो समजुन घ्या) ह्या डींकडे कधीही फिरकु नये असे आमचे जाणकार मत आहे :) नेहमी आपले "व्ही" मधे खेळावे असे काल क्रिकेट एक्सपर्ट भिषनसिंग भेदी झी ण्युज वर म्हणाला.

-व्ही'जुभाऊ

एकदम सहमत. मूळातच जेव्हा इंग्रजांनी काशीमधील ज्योतीष वीशयक ग्रंथांचे ग्रंथालय जाळले ते ३ महीने तसेच जळत होते असे ऐकीवात आहे, आणी आजचे शास्त्र हे त्यातून वाचलेल्या काही ग्रंथांवर व काही पाश्चीमात्य लोकांच्या अभ्यासावर टीकले आहे. म्हणून ते कदाचीत परीपूर्ण नसेलही... पण अर्थातच काही लोक अध्यात्मीक जोराच्या बळावर भवीश्य वर्तवू शकतात हा अनूभव आहे.

नाडीग्रंथांवीषयी इतकेच म्हणता येइल की ते भूतकाळ बराच योग्य सांगतात याचा अनूभव आहे पण अजून त्याचे भवीश्य कीतपत खरे ठरते हे माहीत नाही.

मूकवाचक's picture

28 Feb 2011 - 11:06 pm | मूकवाचक

काही लोक अध्यात्मीक जोराच्या बळावर (वाचासिद्धी) भविष्य वर्तवू शकतात हा अनूभव आहे. +१

टारझन's picture

28 Feb 2011 - 3:07 pm | टारझन

एक नंबर !!

- चुनावाला

नितिन थत्ते's picture

7 Mar 2011 - 10:08 pm | नितिन थत्ते

यनांचे पुनरागमन जोरदार झाले !!!

(ठाणावाला)

असे म्हणणे हे चूकिचे आहे.
@आत्माशून्य : बरोबर आहे. असे लोक मी ही पाहीले आहेत की जे बिनचूक भविष्य वर्तवू शकतात.

अविनाशकुलकर्णी's picture

1 Mar 2011 - 9:44 am | अविनाशकुलकर्णी

भ्रुगु संहिता बरोबर असते असा एक विश्वास आहे......घाणेकर शास्त्री भ्रुगु संहिता आधारे अचुक भविष्य वर्तवायचे असा त्यांचा पंचक्रोशीत लौकिक होता...........

"मला अनुभव नाही म्हणून एखादी चीज अस्तित्वातच नाही असे म्हणणे चूक.."

या अत्यंत योग्य वाक्याविषयी थोडे:

काही वाक्ये अति योग्य असल्यानेच ती ट्रिव्हिअल , विरळ बनतात. मग त्यात नेमकेपणा येणेच शक्य होत नाही.

अश्या विचारपद्धतीने जगात काहीच "सिद्ध" करता येणार नाही. कारण मला त्या गोष्टीचे अनुभव (ज्ञान) किती आहे हा भाग कायम सब्जेक्टिव्ह राहणार. ते वादग्रस्तच राहणार. कारण पूर्ण ज्ञान ही भ्रामक समजूत आहे.

तर तसे काहीच "चुकीचे" आहे असे १००% सिद्ध करता येत नाही. किंवा जगात काहीच बरोबर आहे असेही "सिद्ध" करता येत नाही. केवळ थियरी मांडता येते. ती पटली आणि प्रेडि़क्टेबल आउटकम दिसले की आपला विश्वास बसतो. मग ज्योतिष असो, भूमितीची तत्वे असोत, क्वांटम थियरी असो की स्ट्रिंग थियरी.

विज्ञान, भविष्य, ताईत, संमोहन, भाग्यरत्ने, नजर कवच.. काहीही चुकीचे /बरोबर आहे हे ढोबळ मानाने दाखवता आले तरी "सिद्ध" करता येत नाही.

जे सकृद्दर्शनी पटेल ते स्वीकारायचे ही नैसर्गिक सवय आहे.

आपल्याला अनुभव नाही म्हणून ते "अस्तित्वात नाही" अशा एका जनरल मानण्यावर कोणी चालत असेल तर तो जगण्यातल्या सोयीचा भाग आहे आणि त्यात काही चूक नाही. (मी आणि माझे दृश्य जग एकमेकांसोबत सुखी असलो तर.)

आपल्याला अनुभव नाही म्हणून ते अस्तित्वात आहे की नाही यावर मत द्यायला आपण लायक नाही म्हणून "ते आहेच" असा अप्रोच घेऊन जगणारे मोठ्या संख्येने असतात.

मला वाटतं कोणतीही अ‍ॅबसोल्यूट सत्य अशी गोष्ट नसतेच. केवळ समोर दिसणार्‍या पुराव्यांवरुन आपण ती स्वीकारतो किंवा नाकारतो.

ज्योतिष, भविष्य, तारे ग्रह, पोपट, पत्ते, यंत्रे, पट्ट्या, नाड्या, भूर्जपत्रे, चुंबक, काचगोळा यांपैकी कशानेतरी एक शक्यता वर्तवणे हा मनोरंजक भाग असू शकतो. त्याला सत्य मानून चालण्याचे काही कारण मला दिसत नाही. पण कोणी मानत असेल तर तो भंपक, थोतांडवादी.. मानत नसेल तर प्रगल्भ, सुधारक असे म्हणायला काही आधार नाही हे खरेच. आपण केवळ आपले एक बनलेले प्रामाणिक मत रेटत राहायचे इच्छा असेल तर.

:)

ज्योतिष, भविष्य, तारे ग्रह, पोपट, पत्ते, यंत्रे, पट्ट्या, नाड्या, भूर्जपत्रे, चुंबक, काचगोळा यांपैकी कशानेतरी एक शक्यता वर्तवणे हा मनोरंजक भाग असू शकतो. त्याला सत्य मानून चालण्याचे काही कारण मला दिसत नाही. पण कोणी मानत असेल तर तो भंपक, थोतांडवादी.. मानत नसेल तर प्रगल्भ, सुधारक असे म्हणायला काही आधार नाही हे खरेच.

असहमत. (थोतांडवादी म्हणजे प्रसार करणाराच असे नाही) पण वरील काही गोष्टी मानणारा मुर्ख हे सहज म्हणता येईल तर उरलेल्या काहींना मुर्ख म्हणताना थोडे कष्ट घ्यावे लागतील इतकंच.

शास्त्र म्हणून बघायचे नाही असे गृहीत धरुनच बोलतोय. आपल्या हाताबाहेरच्या, शक्तिबाहेरच्या अनंत गोष्टी जगात आहेत आणि त्यांच्यापासून कोणाला रिलीफ हवा असेल आणि तो मिळत असेल तर कोणत्याही मार्गाचा आधार घेतला तरी काय फरक पडतो.. ?

मी पाहिले आहे की अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक हे तिथेही शंभर टक्के काही अवलंबून ठेवत नसतात. "हेही करु तेही करु" वाले हे लोक असतात. औषध चालू आहेच..होम्योपॅथीही घेऊन पहा..गोमूत्रही ट्राय करा...अंगार्‍याची पुडीही काय खिशाला जड आहे का? ठेवा तीही...आणि घाटकोपरला एक अचूक भविष्य सांगणारे आहेत, त्यांनाही भेटून घ्या..कधी संपेल ही दशा ते तरी कळेल..मग नारायण नागबळीही करुन घेऊ..त्र्यंबकेश्वर काय दूर आहे का?

अशा अनमानधपक्याने सगळं चाललेलं असतं. कोणीही जिवाच्या वर आणि खिशाबाहेर जाऊन स्वतःची अन्नान्न दशा करुन काही करत नाही. परवडेल असा ज्योतिषी आणि उपचारक निवडला जातो.

खेडेगावात औषधोपचारांऐवजी काही इतर उपाय केले जातात त्यांनी नुकसान होतं. पण त्यात जवळपास मेडिकल सुविधा उपलब्धच नसण्याचा दोष जास्त असतो. तिथे मात्र हा गंभीर प्रश्न होतो आणि त्यांना मूर्ख किंवा शहाणे ठरवण्यापेक्षा प्रत्यक्ष हस्तक्षेप करुन त्यातल्यात्यात नवीन उपचारपद्धतीकडे वळवावे अशी गरज असते.

बाकी धंद्यात खोट, लग्न न जमणे वगैरे अशा अगतिकतेमधे कोणी असे करत असेल तर मग काय बोलावे..इथेही जेवढे झेपेल तेवढेच केले जाते.

क्वचित एखादा त्यावर अवलंबून राहून दीर्घकालीन नुकसान करुन घेणारा असेल तर दुर्दैव.

Nile's picture

1 Mar 2011 - 11:11 am | Nile

मी पाहिले आहे की अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारे लोक हे तिथेही शंभर टक्के काही अवलंबून ठेवत नसतात. "हेही करु तेही करु" वाले हे लोक असतात. औषध चालू आहेच..होम्योपॅथीही घेऊन पहा..गोमूत्रही ट्राय करा...अंगार्‍याची पुडीही काय खिशाला जड आहे का? ठेवा तीही...आणि घाटकोपरला एक अचूक भविष्य सांगणारे आहेत, त्यांनाही भेटून घ्या..कधी संपेल ही दशा ते तरी कळेल..मग नारायण नागबळीही करुन घेऊ..त्र्यंबकेश्वर काय दूर आहे का?

'सगळे' करुन पाहणारे हे लोक मुळात अडाणी असतात, अन्यथा सगळं करुन पहाण्यापेक्षा जे कॉमनसेन्सने करु नये म्हणून यादीतुन वगळले जाउ शकते ते करुन पाहिले नसते. बर हे लोक नुसतं सर्व करुन पाहतात का? अर्थातच नाही, दहा लोकांना सांगतातही. वर त्याचा अगदी १००% गुण येतो वगैरे सुद्धा सांगतात त्यामुले हे हार्मलेस नाही हे मान्य नाही.

आत्मशून्य's picture

1 Mar 2011 - 1:42 pm | आत्मशून्य

अश्या विचारपद्धतीने जगात काहीच "सिद्ध" करता येणार नाही. कारण मला त्या गोष्टीचे अनुभव (ज्ञान) किती आहे हा भाग कायम सब्जेक्टिव्ह राहणार. ते वादग्रस्तच राहणार. कारण पूर्ण ज्ञान ही भ्रामक समजूत आहे.

मूळात काही सीध्द करायचेच नसते. अनूभव हा वैयक्तीक तसेच सामूहीकही असतो. वैयक्तीक अनूभव म्हणजे "कालच माझ्या स्वप्नात कत्रीना कैफ आली होती" आता हे मी तूम्हाला सीध्द कसे करणार ? म्हणून हा अनूभव वैयक्तीक ठरतो म्हणजेच सब्जेक्टिव्ह राहू शकतो.

पण समजा काल आपण कत्रीना कैफचा "तीस मार खान हा चीत्रपट पाहीला" आता हा अनूभव सामूहीक असल्याने तो एकमेकांना सीध्द करावा लागत नाही, तसेच तीकीट काढणार्‍या प्रत्येकाला त्या चीत्रपटात कत्रीना कैफ दीसत असल्याने कत्रीनाला पहायला (पून्हा पून्हा)तीकीट काढून जाणार्‍याना मूर्खही म्हणता येत नाही. मग ज्या लोकांना कधी तीकीटच मीळाले नाहीये, अथवा चूकीच्या लोकांकडून तीकीट मीळवण्याच्या प्रयत्नात फसवणूक होवून चीत्रपटच पहाता आला नाही अथवा जे फक्त ऐश्वर्या राय चे पंखे आहेत अथवा स्वभावाने चक्क नालायक व खोटारडे आहेत , त्यांनी अशी हूल ऊठवली की या चीत्रपटात कत्रीनाच नाहीये.. तर या परीस्थीतीत असे वागणारे व त्यांच्यावर वीश्वास ठेवणारे यामधे महामूर्ख कोण कोण ठरू शकेल ?

तात्कालिक तरी पटले आहे. म्हणून सध्या गप्प झालो आहे. पुन्हा विचार करुन आवश्यकतेनुसार पुन्हा टिपणी करीन.

खी खी खी. =)) =))

हे म्हणजे एड्स रोग बरा करायला आधी त्याचा अनुभव घेण्याला पर्याय नाही असे म्हणणे झाले.घ्या लेको अनुभव घ्या. बादरायण संबंध लावुन उदाहरणं देउन फोलपणाला "उच्च"सिद्ध करण्याचा प्रयत्न काही नविन नाही.

चालु दे.
आमचं इल्यास्टीक टाईट आहे तोवर येउ नंतर प्रकाशकाकांसारखं बसु कुठंतरी जगाच्या भवितव्याची चिंता करत. ;-)

आत्मशून्य's picture

1 Mar 2011 - 2:13 pm | आत्मशून्य

हे म्हणजे एड्स रोग बरा करायला आधी त्याचा अनुभव घेण्याला पर्याय नाही असे म्हणणे झाले

ह्यामधे म्हणण्या ऐकण्यासारखे काय आहे ? जर का एड्स खराच बरा करायचा असेल तर तो कोणाला ना कोणाला तरी प्रत्यक्ष होणे / झाल्याचे अनूभवणे आवश्यकच ठरत नाही काय ? असो दूसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवणार्‍यांना हे पटणे अवघडच...

स्वतः अनुभवणे हा अर्थ सोयीस्कर रीत्या नाकारलेला दिसतो. असो. बाकी कुणाच्या खांद्यावर बंदुक कोण ठेवतंय? का उगाच शब्दांचे बुडबुडे?

आत्मशून्य's picture

1 Mar 2011 - 3:42 pm | आत्मशून्य

स्वतः अनुभवणे हा अर्थ सोयीस्कर रीत्या नाकारलेला दिसतो.

अर्थातच नाही. कोण ना कोण मधे इतरांसोबत स्वत्:चा पण अंतर्भाव असतो हेच सूचवायचे आहे. आणी एड्स रोग बरा करायला त्याचा अनुभव घेण्याला पर्याय नाही असे माझे ठाम मत आहे. पण हे मत ज्या लोकांना दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवणे सोयीचे वाटते त्यांना पटणार नाही असे मी म्हटले आहे. स्पश्ट शब्दात लीहले असल्याने जर ते शब्दांचे बुडबुडे वाटत असतील तर कॄपया त्यांना हवेत वीरू देत.

Nile's picture

2 Mar 2011 - 1:25 am | Nile

>>आणी एड्स रोग बरा करायला त्याचा अनुभव घेण्याला पर्याय नाही असे माझे ठाम मत आहे.

म्हणजे एडस रोगावर औषध शोधणारे सगळे डॉ./शास्त्रज्ञ यांना एड्स झालेला आहे असे म्हणायचे आहे का?

>>पण हे मत ज्या लोकांना दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवणे सोयीचे वाटते त्यांना पटणार नाही असे मी म्हटले आहे.

म्हणजे काय? हे कोणाबद्दल आहे? एडस वर संशोधन करणारे काय दुसर्‍यांना एडसची बाधा करवुन मग संशोधन करतात का?

>>स्पश्ट शब्दात लीहले असल्याने जर ते शब्दांचे बुडबुडे वाटत असतील तर कॄपया त्यांना हवेत वीरू देत.

स्पष्ट शब्द जरा दोन मिनिट विचार करुन लिहा हो, अगदीच अस्पष्ट अर्थ आहेत त्यांचे, अर्थात नाहीतर ते विरतीलच. असो.

सहज's picture

2 Mar 2011 - 6:20 am | सहज

>एडस वर संशोधन करणारे काय दुसर्‍यांना एडसची बाधा करवुन मग संशोधन करतात का?

हो. एडसच असेच नव्हे इतर अन्य रोगांवर औषधे शोधताना अन्य जीवांवर जसे उंदीर, डुक्कर, माकडे, वानर काही उदाहरणात मनुष्य यांचा वापर होतो. १८व्या शतकात इंग्लंड तसे युरोपमधील अन्य देशात विविध रोगांवर लस बनवण्यात आल्या त्यात काही केसेस मधे लहान मुलांपासुन मोठ्यांपर्यंत व्यक्तींवर 'प्रयोग' करण्यात आले. याला श्री श्री रिचर्ड डॉकिन्सबाबा यांच्या तोंडून हे 'आज हे असे इथिक्स कमिटीमधुन कधीच पास होणार नाही' असे वर्णन ऐकले आहे (संदर्भ - बीबीसी चॅनेल वरील 'जिनियस' मालीका ) पण आजही (कमी घातक) औषध चाचणीत मनुष्याचा वापर होतो. औषधवाले लोक जास्त प्रकाश पाडू शकतील पण पेपरात क्लिनिकल ट्रायल करता लोकांना आवाहनाच्या जाहीराती वाचनात येतात.

बाकी चालू द्या. खाली अभिज्ञ जे म्हणाले त्यांच्याशी सहमत आहे.

आत्मशून्य's picture

2 Mar 2011 - 3:55 pm | आत्मशून्य

पुलेशू.

Nile's picture

3 Mar 2011 - 12:52 am | Nile

>>पुलेशू.

गरज नाही, तुमच्याकडेच ठेवा.

आत्मशून्य's picture

3 Mar 2011 - 2:55 am | आत्मशून्य

हा.का.ना.का. ह.घ्या.

आत्मशून्य's picture

1 Mar 2011 - 2:01 pm | आत्मशून्य

एखादी कृती बरोबर नसेल पण ती चूकण्यामागे त्यामागे कारणेसूध्दा बरीच असतात, (व्यक्ती तशा प्रकृती) म्हणून तशा सगळ्यांना महामूर्ख संज्ञेमधे अथवा केवळ एकाच संज्ञेने संबोधणे मलाच जरा अतीशयोक्ती वाटतेय म्हणून महामूर्ख च्या जागी "द्रूश्टीकोनात चूकीचा अंतर्भाव झालेले" हा शब्द धरावा.

सामान्य वाचक's picture

1 Mar 2011 - 2:41 pm | सामान्य वाचक

आपल्याला अनुभव नाही म्हणून ते "अस्तित्वात नाही" अशा एका जनरल मानण्यावर कोणी चालत असेल तर तो जगण्यातल्या सोयीचा भाग आहे आणि त्यात काही चूक नाही. (मी आणि माझे दृश्य जग एकमेकांसोबत सुखी असलो तर.)

-----------------
याला हरकत काहिच नही, जोपर्यन्त दूसर्याच्या 'मानण्यावर' तुम्ही हल्ले चढवत नाही.

गवि's picture

1 Mar 2011 - 2:50 pm | गवि

तेच तर.. बरोबर..

अभिज्ञ's picture

1 Mar 2011 - 10:44 am | अभिज्ञ

बर्‍याच वेळेला माणासाची आगतिकता त्याच्या सद्सद्विवेक बुध्दीवर मात करताना दिसते.
अन माणूस ज्योतिष,नाड्या ह्यांच्या जाळ्यात अडकतो.
ह्या आगतिकतेवर मात करायची कशी? हाच खरा मुद्दा आहे.

लेख आवडला हे.वे.सा.न.

अभिज्ञ.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Mar 2011 - 1:03 pm | प्रकाश घाटपांडे

अभिज्ञ शी सहमत आहे. हल्ली आम्ही या विषयावर लिहित नाही.

टारझन's picture

1 Mar 2011 - 1:18 pm | टारझन

कशे लिवनार ? विल्याष्टीक च्या गुत्तुड्यातुन सुटलात तर ल्ह्याल ना ? :)

- पोतराज बोगदापांडे

प्रकाश घाटपांडे's picture

1 Mar 2011 - 1:21 pm | प्रकाश घाटपांडे

तेच तेच लिवुन आमचच विल्याष्टिक लुज पल्डय! म्हनुन गाडी सायडिंगला लावलीय

टारझन's picture

1 Mar 2011 - 1:40 pm | टारझन

तेच तेच लिवुन आमचच विल्याष्टिक लुज पल्डय!

विल्याष्टिकंच ते .. कधीना कधी लुज पडणारंच .. म्हणुन म्हणतो .. बदलत रहा .. पण तुम्हाला लुज झालं तरी मोह सुटेणा बॉ त्या विल्याष्टिक चा =))

शशिकांत ओक's picture

1 Mar 2011 - 11:50 pm | शशिकांत ओक

जंगल जंगल बात चली है... णाडी..णाडी.. णाडी
तारजण... तारजण... ,
आपन णाडीला तान तान देऊन आ(व)लवळे, तरीही भाऊवीजू का बारगळले ... पका का सायडिंग गाठले...
यणावालांनी गुलनी का धरळी... विलास्टिका का ढिल्या पडल्या... उत्तर एकच ...अणुभव णाही म्हनूण...
आपन तरी तिकी टरकाल्या मारनार....
हलु...हुल्लू... एकाचे दोन, दोनाचे तीन... करत णाडी प्रेमी जंकळात शिरुण सिकार करत करत...
गाटे है... जंगल जंगल बात चली है... णाडी..णाडी.. णाडी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2011 - 9:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बर्‍याच वेळेला माणासाची आगतिकता त्याच्या सद्सद्विवेक बुध्दीवर मात करताना दिसते.

अभिज्ञ यांचे वाक्य पटणारे आहे.

-दिलीप बिरुटे

उदा : पूण्यात चाफयाचे झाड नाही हे म्हणण्यासाठी मला खूप फिरावे लागेल.
पण 'आहे' म्हणण्यासाठी एक झाड दिसले तरी पूरे आहे.

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2011 - 3:17 pm | नगरीनिरंजन

बरोबर आहे. पण मी समजा पुण्यात ३०-३२ वर्षं राहिलो असेन आणि कधीही चाफ्याचे झाड पाहिले नसेल तर मी म्हणेन की पुण्यात चाफ्याचे झाड नाही. जर दुसरा कोणी म्हणत असेल की पुण्यात चाफ्याचे झाड आहे तर त्या झाडाचा अचूक पत्ता मला त्याने द्यावा किंवा त्याने मला ते झाड तिथे नेऊन दाखवावे अशी माझी अपेक्षा असणे रास्त आहे. जर तो मनुष्य म्हणाला की झाड आहे पण मी तुला ते दाखवू शकत नाही तर माझ्या लेखी ते झाड अस्तित्वात नाही.
त्यामुळे जो पर्यंत चाफ्याच्या झाडाचा अचूक पत्ता सापडत नाही तो पर्यंत आहे की नाही हा वादच निरर्थक आहे. एका माणसाने एक झाड पाहिले आणि त्याला ते चाफ्याचे वाटले म्हणून वैयक्तिक अनुभवाच्या सिद्धांताने ते चाफ्याचे होत नाही. त्याचप्रमाणे एखादा ज्याला अनुभूती म्हणतो त्याला दुसरा योगायोग किंवा भास म्हणू शकेल.
शिवाय वाचासिद्धीवाले लोक असतील तर हे वाचासिद्धीवाले लोक मग आपल्या शक्तीचा वापर करून भविष्याच्या काळजीमुळे होणारी इतर क्षुद्र मानवांची दुरवस्था दूर का करत नाहीत हा प्रश्न उरतोच.

सामान्य वाचक's picture

1 Mar 2011 - 3:29 pm | सामान्य वाचक

मी पाहिलेली विहीर खरी. समुद्र आस्तित्वात नाही. कारण मला तो दिसला नाही.

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2011 - 3:36 pm | नगरीनिरंजन

जे समुद्र आहेत असे म्हणतात त्यांना दिसलेला समुद्र समुद्रच आहे हे कशावरून? कशावरून ते मृगजळ नाही?

गवि's picture

1 Mar 2011 - 3:46 pm | गवि

या वादाला अंत नाही. कोणीच कोणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा नाही असे झाले.

इथे मुद्दा असा आहे की ज्याला समुद्र बघायचाय त्याला बघण्याची (प्रत्यक्ष, नि:संदिग्ध फोटो इ इ. उदाहरण फक्त..) संधी आहे आणि तिथे तो सर्वजनवर्णनाबरहुकूम जो वांछील त्याला तसाच दिसतो.

काहींना समुद्राचा पुण्यातच अनुभव आला आणि काहींना रत्नांग्रीस जाऊनही येत नाही (समुद्र दिसत नाही..) कारण ते अश्रद्ध याला काही अर्थ नाही.

तरीही तिथे समुद्र आहेच असे मानणार्‍याला आडकाठी नसावी पण मला दिसत नाही तोपर्यंत मानत नाही असे म्हणणाराही त्याच प्रतीचा विश्वास दाखवतोय. दोघेही योग्य आहेत जेव्हा त्यांचे स्वत :शी विरोधाभास नसतील.

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2011 - 3:53 pm | नगरीनिरंजन

आहे म्हणणार्‍यांना विरोध नाही. वैयक्तिक श्रद्धा ठेवा पण वरती लेखात म्हटल्याप्रमाणे त्याचा प्रचार करून गैरवापर केला जातो म्हणूनच त्याविरुद्ध बोलावं लागतं.

>>या वादाला अंत नाही. कोणीच कोणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवायचा नाही असे झाले.

कारण हा वादच नाही. नुसती असंबंध आणि बादरायण उदाहरणं देउन फक्त तुम्ही बोलण्यात हुशार आहात इतकेच दिसते. अशीच बादरायण उदाहरणं देउन समोरच्याला निरुत्तर करुन मुद्दा सिद्धा होणार नाही.

वरती तुम्हाला ते कतरीना कैफचे हास्यास्पद उदाहरण पटले आणि त्यावर उत्तर सुचले नाही हे ताजे उदाहरण घ्या. कतरीना कैफ त्या सिनेमात आहे की नाही जे जाणुन घेण्यासाठी सिनेमा पहायचा अनुभव घेण्याची अजिबात गरज नाही. पन्नास मार्ग आहेत.

१. माझ्या काही मित्रांनी सिनेमा बघीतला त्यांना विचारतो (कीती मित्र असु शकतात)
२. सिनेमाची जाहिरात, पोस्टर पाहु शकतो.
३. सिनेमाचा आलेल्या रीव्हु वाचु शकतो
४. सिनेमाची माहिती इंटरनेटवर शोधु शकतो
५. सिनेमा खुद्द पाहु शकतो आणि खात्री करुन घेउ शकतो.

फक्त कॉमनसेन्सने मी कतरीना आहे की नाही हे पडताळुन पाहु शकतो.
हे उदाहरण बादरायण कसे आहे ते कळणे फारसे अवघड नाही. वरील कुठलाही मार्ग वापरुन कोणीही हे कतरीना आहे की नाही हे पतळातुन पाहु शकतो. प्रॉब्लेम कुठे होतो, तर करतीना नसतानाही ती आहे आणि आम्हाला दिसते असे काही लोक म्हणतात तेव्हा. आता जी गोष्ट नाहीच तीचा अनुभव घ्यायचा कसा? तरी सुद्धा ज्यांचा असा दावा आहे त्यांनी ती गोष्ट आहे असे सिद्ध करावे.

आत्मशून्य's picture

4 Mar 2011 - 3:28 pm | आत्मशून्य

१. माझ्या काही मित्रांनी सिनेमा बघीतला त्यांना विचारतो (कीती मित्र असु शकतात)
- करेक्ट, ज्यानी योग्य माणसांकडे ज्योतीश पाहीले आहे त्यांना वीचारू शकता.
२. सिनेमाची जाहिरात, पोस्टर पाहु शकतो.
- जाहीरात पोस्टर काय भाँदू जोतीशीपण करतात, तेव्हा जोतीश बघताता या पध्दातीपासून सावध रहावे
३. सिनेमाचा आलेल्या रीव्हु वाचु शकतो
- करेक्ट, क्रंमाक १ ला दीलेली सूचना पहा, तरी ज्योतीशाबाबत पेड रीव्हु वाल्यांपासून सावधच.
४. सिनेमाची माहिती इंटरनेटवर शोधु शकतो
- क्रंमाक २ व ३ ला दीलेली सूचना पहा,
५. सिनेमा खुद्द पाहु शकतो आणि खात्री करुन घेउ शकतो.
- अगदी बरोबर. आता तूम्हाला खरा मार्ग सापडला. अभीनंदन. (तत्पूर्वी क्रंमाक १ ते ४ या सूचना कटाक्षाने पाळा)

>>जाहीरात पोस्टर काय भाँदू जोतीशीपण करतात, तेव्हा जोतीश बघताता या पध्दातीपासून सावध रहावे

कुठल्या पोस्टरमध्ये काय पहायचं हा विवेक जवळ असणार्‍यांकरता आहे ते. तेच इतर "टिप्पण्यां"करता.

>>खात्री करुन घेउ शकतो.

मेंदुची कवाडं बंद असणार्‍यांना वरील वाक्याचा अर्थ समजणारच नाही त्यामुळे अधिक बोलण्यात अर्थ नाही. तुम्हाला उत्तरं देण्यात काही अर्थ नाही असे मला वाटु लागले आहे त्यामुळे इथुन पुढे तुमच्या कमेंटमध्ये उत्तरदेण्यासारखं काहीतरी विचारपुर्वक लिहलं असेल तरंच उत्तर देईन,नाहीतर राम राम.

आत्मशून्य's picture

4 Mar 2011 - 5:06 pm | आत्मशून्य

मेंदुची कवाडं बंद असणार्‍यांना वरील वाक्याचा अर्थ समजणारच नाही त्यामुळे अधिक बोलण्यात अर्थ नाही.

मंग तूम्हाला प्रतीसाद लीहातानाचे आमचे कश्ट वायाच गेले समजाय्च की.

तुम्हाला उत्तरं देण्यात काही अर्थ नाही असे मला वाटु लागले आहे त्यामुळे इथुन पुढे तुमच्या कमेंटमध्ये उत्तरदेण्यासारखं काहीतरी विचारपुर्वक लिहलं असेल तरंच उत्तर देईन.

तूमच्या प्रतीसादांमधे विचारपुर्वक व वाचण्या सारखे फार्फार असते हा गोड गैरसमज कसा नीर्माण झाला याचे थोडक्यात वीवेचन द्याल काय ?

नाहीतर राम राम.

"नाहीतर राम राम" न्हवे फक्त "राम राम" असे मनातल्या मनात सतात म्हणत रहा त्याने कदाचीत कवाडे लवकर ऊघडतील आणी पूर्वग्रहदूशीत प्रतीसाद पण टाळाल असे वाटते, प्रयत्न करायला काय हरकत आहे ?

बाकी खंत इतकीच आहे की या लेखात कोणीही ज्योतीशाकडे शास्त्र व प्रोबॅबिलिटि म्हणून पाहीले नाही अथवा त्याकडे लक्ष वेधले नाही, तर सूरूवातीपासूनच त्यावर टीका करायची हेच बहूतंशी धोरण राखले. जर प्रोबॅबिलिटि ला तूम्ही शास्त्र मानता त्याच ऊअपयोग करून हे अख्खे अंतरजाल ऊभे करता (कॉप्यूटर नेटवर्कींगमधे चक्क प्रोबॅबिलिटि वापरतात) तर त्याच गोष्टीवर जेव्हा ज्योतीश शास्त्र वसले आहे तेव्हां त्यांचा अभ्यास न करता ते थोतांड का मानता ? अगदी मूळ लेखकाने सूध्दा ते काही % च बरोबर ठरत होते असे म्हटले आहे तर त्याच्या %मधे सूधारणा कशी करावी यावर संशोधन न करता त्याल थोतांड म्हणून मो़क्ळे होतात. आपल्याला नाही झेपत तर सोडून द्याना ऊगीच रॉकेट- सायन्स ज्यांना जमते त्यांनी त्यावर काम करावे इतरांनी त्याला थोतांड कशाला म्हणायचे ?

बूध्धीचा आवाका मानवी वर्तन कसे ठरवतो त्याचा हा कीस्सा ऐका, अफ्रीकेत आजही घनदाट जंगलात अत्यंत मागासलेले आदीवासी राहतात, त्याना अजून दोन चाकी सायकल बनवता येत नाही मग इतर प्रगत गोष्टी तर त्यांना झेपणे शक्यच नाही. ते लोक जेव्हां आभाळातून प्रवासी वीमाने वगैरे जाताना येताना पाहतात तेव्हा त्याला चक्क देव मानून नमस्कार करतात. याचा अर्थ तेच लोक साय्न्स योग्य व्यक्तींकडून योग्य प्रकारे शीकले तर वीमान बनवू अथवा ऊडवू शकणार नाहीत असा होतो का ? अर्थातच नाही ? त्यासाठी गरज फक्त योग्य मार्गदर्शनाची असते, ते नसेल तोपर्यंत मन कलूशीतच राहते. अशा मनाला लोकांचे प्रतीसाद समजणार काय आणी त्यावर ते ऊत्तर देणार काय ?

पंगा's picture

2 Mar 2011 - 8:53 am | पंगा

अहो,हा धंदा आहे.

हा धंदा आहे हे खरेच आहे. आणि या धंद्याच्या प्रसारासाठी कायकाय क्लृप्त्या लढवल्या जाऊ शकतात, आणि 'उत्पादना'स कशा प्रकारच्या वेष्टनांतून खपवले जाऊ शकते, हेही पाहणे रोचक ठरेल.

मुंबईहून निघणारे एका ज्योतिर्भास्करांचे असेच एक लोकप्रिय नियतकालिक प्रकाशन आहे. राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांतून दर वर्षी प्रकाशित होते. दिनदर्शिका, पंचांग, मुहूर्त आणि ज्योतिर्भास्करांचे मासिक राशिभविष्य हा या प्रकाशनाचा गाभा आहे. विशेषतः त्यातील राशिभविष्याचा भाग हा एकंदर प्रकाशनाचा बराच मोठा भाग व्यापतो. हल्ली या प्रकाशनाच्या आंतरजालीय आवृत्तीवर या राशिभविष्याचे एक स्वतंत्र पानही आहे.

हे प्रकाशन खपावे, त्याची लोकप्रियता आणि विक्रेयता वाढावी, म्हणून त्यात इतरही बहुत लोकोपयोगी माहिती अंतर्भूत केली जाते. जसे, पाककृती, महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांची वेळापत्रके, आजीबाईंचा बटवा, 'हे करून पहा' प्रकारच्या टीपा, वगैरे. याशिवाय लोकप्रिय साहित्यिकांचे उत्तमोत्तम लेखही छापण्याकडे कल असतो (किंवा निदान एके काळी असे), जेणेकरून रसिकांनी आपापल्या आवडत्या साहित्यिकांच्या लेखांकडे आकृष्ट होऊन हे प्रकाशन विकत घ्यावे. अनेक थोर साहित्यिकांचा आणि मान्यवर व्यक्तींचा या प्रकाशनाच्या खपास अप्रत्यक्ष हातभार लागला आहे.

'प्रत्येक घराच्या भिंतीवर हे प्रकाशन असणे अनिवार्य' अशा प्रकारे या प्रकाशनास प्रसिद्धी दिली जाते.

एक जमाना असा होता, की प्रतिवर्षी या प्रकाशनाच्या जानेवारीच्या पानाच्या मागील बाजूस, ज्योतिर्भास्कर साळगांवकरांच्या राशिभविष्याच्या सदराच्या खांद्यास खांदा लावून, पु.ल. देशपांडे यांचा एखादा फर्मास लेख प्रकाशित होत असे. वर्षानुवर्षे, न चुकता, नित्य नेमाने, राशन घातल्यासारखा. आमच्यासारखे पु.ल.भक्त केवळ तो एक लेख वाचावयास मिळावा याकरिता ते प्रकाशन खरेदी करत. पु.ल. हे राशनालिस्ट आहेत, याची त्या काळी आम्हास कल्पना नसल्याने यामागील विरोधाभास काही आमच्या लक्षात येत नसे.

कदाचित 'आपण राशनालिस्ट आहोत', हे पु.लं.नाही त्या काळी ठाऊक नसावे. अन्यथा त्यांनी अशा प्रकारच्या प्रकाशनाच्या खपास वर्षानुवर्षे आपल्या लेखांद्वारे हातभार निश्चितच लावला नसता, अशी आम्हा पु.लं.च्या (अंध)भक्तांची भाबडी (अंध)श्रद्धा आहे.

सहज's picture

2 Mar 2011 - 9:10 am | सहज

क्लास म्हणूनच म्हणतो जर भिंतीवर ते प्रकाशन असणे अनिवार्य तर जालावर 'पंगा उवाच' वाचणे अनिवार्य!!!

आता ते दुसरे आद्य विदास्पेशल काका कधी येतील किंवा कोणत्या रुपात येतील त्याची वाट पहात आहे.

यनावाला's picture

2 Mar 2011 - 2:09 pm | यनावाला

प्रतिसादाप्रीत्यर्थ सर्वांना धन्यवाद! सदसद्विवेक बुद्धी हा लेख आवडल्याचे अनेक सदस्यांनी लिहिले आहे.त्या संबंधातील श्रेय पं.महादेवशास्त्री यांचे आहे.प्रारंभीच्या दोन ओळी आणि अंतिम चार सोडून उर्वरित लेखन त्यांचेच आहे. थोडा संक्षेप केला आहे एवढेच.

यनावाला's picture

2 Mar 2011 - 2:27 pm | यनावाला

भविष्यकथन सत्य असते असा अनुभव असल्याचे कांही सदस्यांनी लिहिले आहे.त्यांना विनंती की त्यांनी आपल्या अनुभवाची चिकित्सा करावी.अनुभव कोणता आला,कसा आला, किती वेळां आला याचा तटस्थपणे आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून विचार करावा.
वाचासिद्धी,दिव्यदृष्टी,अंतर्ज्ञान,सिद्धी,मंत्रसामर्थ्य,भविष्यज्ञान इ.असल्याच्या कथा पुराणात आहेत.ऐतिहासिक पुरावा कोठेही नाही.
जर कोणापाशी असे अलौकिक सामर्थ्य असेल तर ते प्रत्येक आठवड्याला लॉटरीचे पहिले बक्षीस का जिंकत नाहीत?निरिच्छ असलेल्या त्या महान विभूतींना धनलोभ नसेल हे मान्य.पण या पैशांचा विनियोग सत्कार्यासाठी करता येईलच की.मग असे का बरे घडत नाही? हा प्रश्न पडतो.असो.ज्यांची फलज्योतिषावर श्रद्धा असेल ते ती ठेवणारच.मात्र प्राणिकपणे चिकित्सक असावे.कांही स्वयंवंचनेचे बळी असतात.काही त्यासाठी डुप्लिकेट आय्.डी. सुद्धा घेतात. हे अंतिम हिताचे नाही.

ज्याना हे जमते ते त्याचा का, कसा, कुठे वीनीयोग करतात ह्या साठी स्वतंत्र लेख काढून इथे आपल्या मूळ लेखाचे काश्मीर होण्याचे टाळावे. तसेही हे दोन स्वतंत्र वीशयच आहेत.

मूकवाचक's picture

2 Mar 2011 - 5:15 pm | मूकवाचक

वाचासिद्धीने भविष्य वर्तवल्याचे ऐतिहासिक पुरावे (१९ व्या शतकामधील देखील) बरेच आहेत. (उदा. डॉ. राम भोसले यान्च्या दिव्यस्पर्शी पुस्तकातील नित्यानन्द भेटीचा प्रसन्ग. )

नगरीनिरंजन's picture

2 Mar 2011 - 9:03 pm | नगरीनिरंजन

जगन्नाथ कुंट्यांच्या नर्मदा परिक्रमेतला विनोदी प्रसंग आठवला. लेखक त्याच्या मित्राला सांगतो की आज आपल्याला मोतीचूर लाडू मिळणार आणि काय आश्चर्य पुढच्याच थांब्यावर एक माणूस येऊन त्यांना मोतीचूराचे लाडू देऊन जातो. एक माणूस त्यांच्यासमोर मगरीला बळी पडतो ते मात्र त्यांना आधीच कळत नाही. धन्य ती वाचासिद्धी आणि धन्य ते लाडूखाऊ.

मूकवाचक's picture

2 Mar 2011 - 10:25 pm | मूकवाचक

ज्याना हे जमते ते त्याचा का, कसा, कुठे वीनीयोग करतात ह्या साठी स्वतंत्र लेख काढून इथे आपल्या मूळ लेखाचे काश्मीर होण्याचे टाळावे. तसेही हे दोन स्वतंत्र विषयच आहेत. - सहमत

वाचासिद्धी, प्राकाम्य सिद्धी आणि त्रिकाल दर्शन या तिन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लाडू प्रसन्ग प्राकाम्य प्रकारातला आहे. स्थळ, काळ आणि परिस्थिती हे सन्दर्भ लक्षात घेता मला तो लाडू प्रसन्ग विनोदी वाटत नाही. लेखक हा ब्रह्मदेवाचा बाप नसल्याने त्याने जगभरचा प्रत्येक अपप्रसन्ग टाळला नाही यात नवल असे काही नाही. असो.

नगरीनिरंजन's picture

3 Mar 2011 - 9:05 am | नगरीनिरंजन

स्थळ, काळ आणि परिस्थितीचे संदर्भ लक्षात घेतल्यावरच मला तो प्रसंग विनोदी वाटला. असो. या धाग्यावर हा माझा शेवटचा प्रतिसाद.

विकास's picture

2 Mar 2011 - 9:59 pm | विकास

भवीष्य वर्तवता येते की नाही इतपतच वीशय मर्यादीत ठेवूया

(टायपो सोडल्यास ;) ) सहमत.

मूकवाचक's picture

4 Mar 2011 - 6:28 pm | मूकवाचक

भविष्यकथन सत्य असते असा अनुभव असल्याचे कांही सदस्यांनी लिहिले आहे.त्यांना विनंती की त्यांनी आपल्या अनुभवाची चिकित्सा करावी.अनुभव कोणता आला,कसा आला, किती वेळां आला याचा तटस्थपणे आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून विचार करावा.
- हे सगळे करूनही असे अनुभव नाकारता येत नाहीत.

संस्थळाचं "**क्रम" झालं!!

-एक

सामना टाय होणार असे भाकीत केले होते. आणी ते खरे ठरल्या पासून तो कोणते नंबर लॉटरीखेळताना लावतोय याला प्रचंड मागणी आली आहे.

Nile's picture

4 Mar 2011 - 3:11 pm | Nile

"Can't believe my prediction 7/8 hours ago was right - tie !! Classic, didn't think it would happen but hey-not bad !!!! 2011-my year ! Lol"

"Before u think there was something untoward re prediction of a tie, thought it was going to be a cracker-tie was tongue in cheek-but right"
-Shane warne(Twitter) 27 feb.

आत्मशून्य's picture

4 Mar 2011 - 3:20 pm | आत्मशून्य

मला इंग्रजी कळले नाही, तूम्हाला या वर काही टेपणी करायचीअसेल तर मराठीत अनूवादा.

अवांतरः शेन वॉर्न ऊत्कृश्ठ ज्योतीशी आहे असे आम्ही म्हणतो असा गैरसमज नसावा.

इंग्रजी कळत नाही? अरे रे. म्हणजे तुम्हीच वर म्हणल्याप्रमाणे, कुणावर(ही) तरी विश्वास ठेवता का? असो. सर्व प्रश्नांचा उलगडा झाला.जाउ दे जाउ दे. मी दिलेले उत्तर फक्त मेंदुची कवाडं उघडी असलेल्यांकरता आहे, ज्यांच्या विवेकात नीरक्षीरक्षमता आहे त्यांच्यासाठी. त्यांना याहुन अधिक टिप्पणीची आवश्यकता नाही.

आत्मशून्य's picture

4 Mar 2011 - 6:05 pm | आत्मशून्य

मी दिलेले उत्तर फक्त मेंदुची कवाडं उघडी असलेल्यांकरता आहे, ज्यांच्या विवेकात नीरक्षीरक्षमता आहे त्यांच्यासाठी

दूसर्‍यांदा ह.ह.पू.वा. ज्यांच्या विवेकात नीरक्षीरक्षमता आहे ते तूमचे लेखन गांभीर्याने घेतात हा तूमचा गोड समज कसा तयार झाला झाला या वीशयी धमाल ऊत्सूकता.....

बाकी तूम्ही प्रतीसाद लीहला म्हणजे तूम्ही वर म्हटल्या प्रमाणे आमच्या कमेंटमध्ये उत्तरदेण्यासारखं काहीतरी विचारपुर्वक लिहलं आहे तर....

पू.ले.शू.