गाभा:
आम्ही आमच्या सध्याच्या घरात भाड्याने गेली २४ वर्षे राहत आहोत
आता बिल्डर्स , मालकाला ती जागा डेवलप करण्याची ऑफर देत आहे तर मालक तडक घर खाली करण्याची नोटीस देऊ शकतो का?
कि आम्हाला जागा रिकामी करण्यासाठी तो काही पैसे देईल ?
का नवीन बिल्डींग तयार झाल्यावर त्या जागेवर आमचा (थोडा का होईना ) क्लेम राहील ?
आम्ही लेवेन मोन्थ लिव लायसन्स या पद्धतीवर राहत नाहीयोत
कृपया फारच निकडीचे असल्याने खरडफळ्याचा वापर न करता धागा सुरु केल्याबद्दल क्षमस्व. मला योग्य ते मार्गदर्शन प्राप्त होताच हा धागा अप्रकाशीत करण्यास हरकत नक्कीच नसेल.
प्रतिक्रिया
1 Mar 2011 - 12:28 pm | पैसा
http://www.landsofmaharashtra.com/Forms/Bombay%20Tenancy%20and%20Agricul...
या लिंकचा काही उपयोग आहे का बघ रे!
1 Mar 2011 - 12:34 pm | गवि
नाही.
हा शेतीच्या टेनन्सीचा कायदा आहे. (कूळकायदा)
एका चांगल्या वकिलाला (जो कन्व्हेयन्सची, प्रॉपर्टीची, त्यातल्या करारांची कामे करण्यातला स्पेशालिस्ट आहे असा) तातडीने भेटा. ऑनलाईन सल्ल्यांपेक्षा अशा व्यक्तीचा जास्त वास्तव फायदा आणि मदत होते असा माझ्या केसमधे (वरील पैसा यांनी दिलेल्या लिंकमधील कायद्याबाबत+ राहत्या फ्लॅटबाबत आलेल्या कायदेशीर भानगडीमधे) अनुभव आहे आणि तो चांगलाच तीव्र आहे.
तेव्हा तातडीने वकील गाठा. ठाण्यातला हवा तर मी देतो संपर्क. नपेक्षा तुमच्या इथला पहा. पण प्रॉपर्टी स्पेशालिस्ट पहा.
1 Mar 2011 - 12:51 pm | परिकथेतील राजकुमार
इंट्या वकिली शिकतो म्हणे. त्याला विचारा, काही मदत मिळते का बघा.
1 Mar 2011 - 12:53 pm | स्पा
ओक्के वकील तातडीने गाठायलाच हवा
कारण .. आयत्यावेळी गडबड नको व्हायला.
पण मी असे आईक्ले होते, कि २० वर्षांपेक्षा जास्त वर्ष राहिल्यावर , भाडेकरूला काही विशेष सवलत मिळते
1 Mar 2011 - 1:03 pm | गवि
पण मी असे आईक्ले होते, कि
तेच सांगतो. ऐकण्यावर अवलंबून राहून लफडी होतात. मी ही हेच केले होते. प्रत्यक्ष कारवाई लगेच चालू केलेली बरी असते. वकील केवळ फर्स्ट हँड खात्रीची माहितीच नव्हे तर प्रत्यक्ष नोटीस, शोध अशी कामेही तातडीने करतात. फी असते ती वर्थ असते.
चौकशांत (या बाबतीत तरी- गैरसमज नसावा) ..वेळ घालवू नका. रजा टाका हवे तर.
1 Mar 2011 - 1:08 pm | स्पा
येस.. मला वकिलांचा नंबर व्यनी तून धाडा
1 Mar 2011 - 1:13 pm | पर्नल नेने मराठे
माझ्या आईची अशिच जागा बिल्डरला दिली गेली होती. बिल्डरने आमची होती ती जागा फुकट दिलिच वर १०० sq ft जागा बाजारभावापेक्शा कमि दरात दिलि. बान्धकामाच्यावेळी दिड वर्शे बिल्डरनेच घर पाहुन दिले त्याचे रेन्ट हि त्यानेच दिले.
बिल्डर आपल्याला गंडवायला बघतो. तेव्हा तुम्ही निट अॅग्रिमेन्ट करुनच पुढिल व्यवहार करा. त्याशिवाय घराबाहेर पडु नका. भाडेकरुन्ची एकि असेल तर बिल्डर काहीही अटी मान्य करतो. मी तर म्हणते थोडी जागा फुकटही मागायला हरकत नाही.
1 Mar 2011 - 6:36 pm | श्री गावसेना प्रमुख
http://www.ramjethmalani.com/ हा घ्या
2 Mar 2011 - 1:23 am | नेत्रेश
तुम्हाला बहुतेक १ फ्लॅट ची ऑफर मिळेल. नवीन फ्लॅट आत्तच्या फ्लॅटपेक्षा मोठा असल्यास जास्तिच्या जागेचे पैसे बिल्डरला द्यावे लागतील. पैसे बाजारभावा प्रमाणे किंवा किंचीत कमी रेटने द्यावे लागतील. तुम्हाला आणखी मोठा फ्लॅट हवा असेल तर बाजारभावा प्रमाणे पैसे भरुन घेता येईल.
१. बिल्डरला किती FSI मिळाला आहे, किती मजली बिल्डिंगची परवानगी मिळाली आहे, आणी तो किती मजली बिल्डींग बांधणार आहे.
२. जर ५ मजल्याच्या बिल्डिंगची परवानगी मिळाली असेल तर बिल्डर ८ मजली ईमारत बांधतो. भाडेकरुंना ६, ७ व ८ मजल्यावरच फ्लॅट मिळतात. (पालिका हे मजले नंतर दंड भरुन नियमित करुन देते, ९०% + सक्सेस रेट असतो). ठाणे आणी परीसरात हे सर्रास चालते.
३. बिल्डिंग बांधताना तुम्हाला टेंपररी घर / घर भाडे बिल्डर देतो.
४. या सगळ्याचे अअॅग्रीमेंट तुम्ही घर सोडायच्या आधी करुन देता. ते अॅग्रीमेंट सही करण्याआधी स्वत: संपुर्ण वाचा. ते वाचायला २ दिवस लागले तरी चालतील. यात नवीन घर ताब्यात मिळण्याआधी तुम्हाला सोसयटी, टॅक्स, ईत्यादी साठी किती पैसे भरावे लागतील ते लिहीलेले असते (साधारण ५ लाखापर्यंत रक्कम असते). कोणत्याही परीस्थितीत न वाचता सही करुन देउ नका. तुमच्या वकीलाला दाखवलेत तर तर ऊत्तम. थोडे पैसे वकीलाला गेले तरी ते वर्थ आहेत.
2 Mar 2011 - 4:37 pm | श्रीराम गावडे
दुसरे घर बघा ना साहेब.
तुमच्यामधे आणि अशोक चव्हाण मधे काय फरक?
घर मालकाचि ति ह्क्काचि मिळकत आहे. त्यात वाटा मागणं बर दिसत नाहि. तुमच्या या अनैतिक कामात तुम्हि मद्त मागता आहात आणि लोकंहि भरभरुन देताहेत.
आनंद आहे.
2 Mar 2011 - 4:52 pm | नितिन थत्ते
सहमत आहे.
2 Mar 2011 - 4:59 pm | स्पा
वालेकुम चाचा :D
3 Mar 2011 - 10:12 am | गवि
भाडेकरूंचे हितरक्षण करणारे काही कायदे असतात. ते काही उगीच कोणा एका उच्चभ्रू गटाच्या समाधानासाठी बनवलेले नाहीत. त्यामागे "मासेस"चा विचार आहे.
मला यांचा अनुभव (फटका) बसला आहे कारण दोन वडिलोपार्जित जागांच्या बाबतीत वडिलांच्या निधनानंतर मी घरमालकाच्या भूमिकेत होतो आणि भाडेकरूंनी वर्षानुवर्षे जागा न सोडून अत्यंत कष्टदायक स्थिती आणून ठेवली. मग एक जागा मातीमोलाने विकावी लागली. (कारण घेणारी व्यक्ती भाडेकरूंची "काळजी" घेण्यास समर्थ अशी होती.)
दुसर्या जागी मला व्यक्तिगतरित्या ठाण मांडून बसावे लागले, आणि त्यांनी संपूर्ण घरावर केलेला कब्जा निस्तरण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. आता जागा सील करुन आलो आहे.
तरीही मी स्पा यांना वकिलांचा सल्ला घ्या असे सुचवले कारण कायद्याने जे काही त्यांना मिळायचे ते मिळावे ही इच्छा. मालकाच्या घरातला / मिळकतीतला भाग डल्ला मारून हडपण्यातला प्रकारच असायला हवा असे नाही. पण निदान त्यांच्या बाबतीत मालक-भाडेकरु यांनी आपापली कर्तव्ये बजावली आहेत का? त्यांना योग्य ती नोटीस मिळते आहे का? नवीन होणार्या जागेत, मालकाच्या मिळकतीपेक्षा पुष्कळ सरप्लस उत्त्पन्न आणि राहती जागा तयार होत असते. मूळ राहणार्या भाडेकरूने काही अटी पूर्ण केल्या असतील तर त्याला अशा जागेत प्राधान्य / सवलत मिळते.
मालकाने नुसती मालकी उपभोगली का?
तोच कायदेशीर मालक आहे का?
त्याने मेंटेनन्स केला आहे का? की भाडेकरूंनीच वर्षानुवर्षे जागा मेन्टेन केली आहे.
असंख्य कायदेशीर बाबींवर यातले निर्णय अवलंबून असतात. आणि ते वकीलातर्फेच स्पष्ट होऊ शकते.
मालकाने म्हटले की खाडकन जागा सोडणे हे वाटते तितके सोपे नाही. ज्याच्यावर येते त्यालाच कळते. मी घरमालक या पार्टीत असूनही हे समजू शकतो.
म्हणून इथे मजसह अनेकांनी स्पावड्याला फक्त वकील गाठायचा सल्ला दिला आहे. कोणी जर त्या मालकाची बेकायदेशीर लूट कर आणि जास्तीतजास्त त्रास दे असा सल्ला दिला असेल तर त्याचा मीही विरोधच करतो.
2 Mar 2011 - 4:58 pm | स्पा
दुसरे घर बघा ना साहेब.
ते मी बघणारच आहे, तुमच्या विशेष सल्ल्याची गरज नाही
तुमच्यामधे आणि अशोक चव्हाण मधे काय फरक?
हा प्रश्न म्हणजे नारायण राणे आणि श्रीराम गावडे यामध्ये काय फरक या तैप चा झाला
घर मालकाचि ति ह्क्काचि मिळकत आहे. त्यात वाटा मागणं बर दिसत नाहि.
त्याची हक्काचीच मिळकत आहे, अख्खं घर कोण मागतंय
मी कायद्याने काही तरतूद आहे का असे विचारले होते
तुमच्या या अनैतिक कामात तुम्हि मद्त मागता आहात
परत तेच, कायद्यात काही तरतूद आहेत का असे विचारणे म्हणजे अनैतिक , वा
हा जावई शोध लावल्याबद्दल अभिनंदन
आणि लोकंहि भरभरुन देताहेत.
प्रत्येकाने वकीला कडे जायचा सल्ला दिलेला , तुमच्या सारख्या लोकांकडे जाण्यास सुचवलेले नाही :D
आनंद आहे.
आम्हासही
गावडे तुम्ही फारच बुवा "सत्यवान" हो?????src="http://l.yimg.com/us.yimg.com/i/mesg/emoticons7/24.gif" alt="" />
बोलो श्रीराम चन्द्र की जय
3 Mar 2011 - 3:17 pm | इंटरनेटस्नेही
विस्तृत प्रतिसादासाठी जागा राखीव.
4 Mar 2011 - 9:53 am | श्रीराम गावडे
स्पा,
आपण न मागता मी दिलेल्या अवाजवि प्रतिसादाबद्द्ल क्षमस्व.
आपल्या लेखनशैलिवर व सुन्दर छायाचित्रणावर लुब्ध असणारा
- श्रीराम गावडे.
4 Mar 2011 - 10:01 am | स्पा
आपण न मागता मी दिलेल्या अवाजवि प्रतिसादाबद्द्ल क्षमस्व.
तुम्ही माझी क्षमा मागावी, असे तुम्ही काही लिहिलेले नाही, फक्त आपल्या प्रतिसादाला मी उत्तर दिले असो,
आपल्या लेखनशैलिवर व सुन्दर छायाचित्रणावर लुब्ध असणारा
ओ असं काहीतरी बोलू नका हो....
मिपाच्या जुन्या जाणत्या सदस्यांनी हे वाचलं तर कचरा करतील माझा :D