गाभा:
नमस्कार,
मला मुंबई तसेच ठाण्यातील अभ्यासिकांबद्दल अतिशय त्वरेने माहिती हवी आहे.. घर आहे.. चांगले ३ बी एच के, अंशतः वातानुकुलीत पण "घर म्हणजे प्रेम जिव्हाळा, दुसरं तिसरं काही नसतं" या ओळी तुम्ही ऐकल्या असतीलच, त्याच प्रमाणे घर कितीही सुंदर, लक्सझुरीअस असो पण घरात जर अभ्यासाला लागणारी मनशांती मिळत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही.. तेव्हा माझे मिपाकर मित्र मला याही बाबतीत मदत करतील अशी आशा आहे.
-
आपला कृपाभिलाषी,
इंट्या अभ्यासकडवी., बी एम एस, मुंबई विद्यापीठ,
विद्यार्थी: एल एल बी मुंबई विद्यापीठ, कंपनी सेक्रेटरी (आय सी एस आय), एम कॉम (आय बी ओ) आय. गांधी. एन. ओ. युनिवर्सीटी.
प्रतिक्रिया
27 Feb 2011 - 3:03 am | प्रियाली
मी शाळाकॉलेजात असताना काही विद्यार्थी केशव गोरे ट्रस्टच्या हॉलचा अभ्यासिका म्हणून वापर करत असत. तिथे चौकशी केली का?
3 Mar 2011 - 4:49 pm | मेघवेडा
आयला इंट्या तू गोरेगावचा? मेल्या आरे कॉलनीत जा सकाळीसकाळी! मस्त अभ्यास कर एखादं झाड वगैरे पकडून त्याखाली.. (पुढेही हा अनुभव उपयोगी येईल रे!) नि येताना चेकनाक्याजवळच्या मिनि-गुत्त्यावर एक तांब्या ताडी लावून ये हाकानाका! ;)
27 Feb 2011 - 1:48 pm | अप्पा जोगळेकर
डोंबिवलीत आहे एक मस्त अभ्यासिका. पण लोकल ट्रेनने अभ्यास करण्यासाठी तू लोकल ट्रेनचा प्रवास तर करणार नाहीस.
- वारंवार नापास झालेला उनाड
27 Feb 2011 - 1:59 pm | Nile
>>घर म्हणजे प्रेम जिव्हाळा, दुसरं तिसरं काही नसतं
मैत्रिणीच्या घरी जा मग! तिथे "सासु म्हणजे दुस्वास" असला की होईलना अभ्यास?
28 Feb 2011 - 2:08 pm | गुड्डु
ठाण्याला शिवाइनगर ला गजानन महाराज ट्र्स्टचि चांगली
अभ्यासिका आहे
28 Feb 2011 - 4:53 pm | माझीही शॅम्पेन
ओके !
कळव्यात एक भर बाजारात जवाहर वाचनालय़ होत !
अवांतर :- कोणे एके काळी महान लोक दिव्याखाली अभ्यास करून प्रकाश पाडायचे , तुमच घर अंशता: वातानुकुलित असून अभ्यासाबद्दल जिव्हाळा वाटू नये कमाल आहे बुवा !
(दिवा म्हणजे प्रकाश पाडणारी एक वस्तू दुसरा कुठली अर्थ लावू नये)
28 Feb 2011 - 5:17 pm | परिकथेतील राजकुमार
ज्यांना मनापासून अभ्यास करायचा असतो त्यांचा जिन्याखालच्या अंधारात आणि बँडच्या गदारोळात देखील अभ्यास होतो. पण ज्यांना करायचाच नसतो किंवा कष्टाची तयारीच नसते त्यांना सर्व सुखसोयींनी उपयुक्त जागेत बसवले तरी काही उपयोग नसतो.
दरवेळी मदतीचे धागे काढून स्वतःच्या अभ्यासाची, विपशन्येची, ३ बिएचके घराची, ए.सी. ची आणि इतर धंद्यांची जाहिरात करणे आता थांबवावे आणि अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
28 Feb 2011 - 7:02 pm | टारझन
जाहिरातबाजी ला आळा घालणारा प्रतिसाद :) जियो
-
28 Feb 2011 - 8:51 pm | इंटरनेटस्नेही
परा यार तसं नाहीए खरोखर.. माझ्या घरी काही इश्युज सुरु आहेत (जे इथे लिहिणं अप्रस्तुत ठरेल) आणि म्हणूनच मी अभ्यासासाठी जागा शोधत आहे.. असो. मित्र असुन सुद्धा तु असा प्रतिसाद दिल्यामुळे मी दुखावाला गेलो आहे. :(
आणि माझ्या घराची किंवा शिक्षणाची जाहिरात इ. करायला मिपा म्हणजे काही जीवनसाथी.कॉम नाही. मी केवळ बॅकग्राऊंड सांगितला एवढचं जेणे करुन मायबाप वाचकांना एकुण परिस्थीतीचा अंदाज येऊ शकेल. तसंही केवळ:
मला मुंबई तसेच ठाण्यातील अभ्यासिकांबद्दल अतिशय त्वरेने माहिती हवी आहे. एवढं लिहिणं चांगलं दिसत नाही शिवाय एक ओळीचे धागे नियमाला धरुन नाहीत. तेव्हा मजकुर वाढण्यासाठी काही भर घालणे आवश्यक होते.
पुन्हा एकदा मी अतिशय दुखावला गेल्याचे सुचित करतो.
28 Feb 2011 - 9:03 pm | स्पा
पुन्हा एकदा मी अतिशय दुखावला गेल्याचे सुचित करतो.
इंट्या उगी उगी बाला , अशा नाही कलू
आपण परा बुवाला " वा " कलू हा !!! :D
असो
इंत्या सगळ्यात बेष्ट आयड्या म्हणजे, गच्चीवर जाऊन, पाण्याच्या टाकी खाली अभ्यास करत जा.. आरामात....
1 Mar 2011 - 11:08 am | परिकथेतील राजकुमार
तिकडे येऊन लाथ घालीन आता.
तुझा हाच धागा मी तुला जाहिरात न करता आणि एकोळी न बनवता लिहुन दाखवतो :-
नमस्कार,
मला मुंबई तसेच ठाण्यातील अभ्यासिकांबद्दल अतिशय त्वरेने माहिती हवी आहे.. तसे घरात देखील अभ्यास करणे शक्य असतेच असते, पण सध्या घरात काही वेगळे काम चालु असल्याने वा इतर न सांगता येण्याजोग्या अडचणींमुळे घरात शांततेने व एकाग्रतेने अभ्यास करता येणे शक्य होणार नाही. तेव्हा माझे मिपाकर मित्र मला याही बाबतीत मदत करतील अशी आशा आहे. कृपया फारच निकडीचे असल्याने खरडफळ्याचा वापर न करता धागा सुरु केल्याबद्दल क्षमस्व. मला योग्य ते मार्गदर्शन प्राप्त होताच हा धागा अप्रकाशीत करण्यास हरकत नक्कीच नसेल.
-
आपला कृपाभिलाषी,
ॠषिकेश चिंदरकर
विद्यार्थी: एल एल बी मुंबई विद्यापीठ, कंपनी सेक्रेटरी (आय सी एस आय), एम कॉम (आय बी ओ) आय. गांधी. एन. ओ. युनिवर्सीटी.
1 Mar 2011 - 11:18 am | Nile
च्यायला एलएलबी करतोय इंट्या अन वकिली करतोय पर्या.
काय रे चोच्या इंट्या, तुमच्या कालेजात लायब्ररी फिब्रररी नाय का रे? अन एलएलबी करतोयस शिंच्या तर एक धागा काढता येत नाही का रे तुला.. केस आल्यावर* काय मिपावरच धागे काढणारेस का?
कोर्टातली म्हणतोय, इंट्या लहान आहे म्हणून लगेच "केसांचा" आचरटपणा करत नाचत येऊ नये.
1 Mar 2011 - 1:38 pm | कुंदन
अभ्यास करुन कोणाचे भले झालेय?
28 Feb 2011 - 8:38 pm | सुहास..
दुखावल्याचा प्रतिसाद आल्याने, प्रतिसाद स्वयं-संपादन करित आहे..
धन्यवाद !
28 Feb 2011 - 8:43 pm | क्लिंटन
ठाण्यात तलावपाळीजवळ नमस्कार हॉटेल आणि गडकरी रंगायतन दरम्यान एक अभ्यासिका पूर्वी होती. सध्याही ती अभ्यासिका तिथे आहे की नाही हे माहित नाही. नाहीतर प्रभात चित्रपटगृहाजवळील मराठी ग्रंथ संग्रहालयात कुठलातरी कोपरा गाठता येईल. ते रात्रभर नाही तरी ९ वाजेपर्यंत तरी उघडे असावे असे वाटते.
28 Feb 2011 - 11:54 pm | वाहीदा
इंट्या दुखावल्यागेल्या मुळे, हि प्रतिक्रिया काढून टाकली आहे.
इंट्या यशस्वी हो !!
28 Feb 2011 - 11:59 pm | इंटरनेटस्नेही
वाहीदा आजकाल माझा मुलीं मधला रस कमी झाला आहे.. सध्या फक्त अभ्यासाकडे लक्ष देतो आहे.. पण तुझ्या प्रतिक्रियेत असं दुखावलं जाण्यासारखं काहीही नव्हतं.. मला फक्त पराची प्रतिक्रिया अतिशय बोचरी वाटली.
1 Mar 2011 - 12:03 am | टारझन
तुला वाईट वाटु णये म्हणुन ही हाफ वॉली सोडली आहे.. . :)
- (रसिला) टाऋ उसकर
1 Mar 2011 - 12:09 am | वाहीदा
Hey Intya,
Hope He must be just kidding,
Chill & Relax ... Chillax :-)
and Do not take it to heart
Cheer Up !! It's high time now, to concentrate on your studies ...
28 Feb 2011 - 10:47 pm | सुनील
गोल्डन डाइज नाक्यावर इंडियन लायब्ररी आहे, जी २४ तास उघडी असते.
1 Mar 2011 - 1:44 pm | इंटरनेटस्नेही
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद. आज रात्री हाच प्रतिसाद संपादित करुन समर्पक उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. :)
1 Mar 2011 - 1:49 pm | टारझन
खरडीतुन लिंक दिल्याने बुच मारले आहे
- ग्रॅहम बुच
1 Mar 2011 - 1:51 pm | Nile
=)) =)) =))
आयच्यान लोळलो! =)) येरे तु इंट्या आम्हीबी तुझी उलटतपासणी घेउ, गरज पडली तर रजा बी टाकु.. ये तु ये.
1 Mar 2011 - 1:59 pm | परिकथेतील राजकुमार
=)) कहर =))
फावड्या
1 Mar 2011 - 4:54 pm | वाहीदा
इंट्या,
तुला अभ्यास करायचा आहे ना ? का प्रतिसादाला उप्-प्रतिसाद देऊन वेळ घालवायचा आहे ??
3 Mar 2011 - 1:14 am | इंटरनेटस्नेही
सर्व वाचक प्रतिसादकांचे मनापसुन आभार.
आमच्या एका बालमैत्रीणीने केलेया रेकेमेंडेशन नुसार आम्ही मुंबई मराठी ग्रंथसंग्राहलय, डिसिल्वा मार्ग, दादर प., मुंबई -येथे अभ्यासिका व वाचनालयाचे सदस्यसत्व घेतेले आहे. अतिशय चांगली अभ्यासिका आहे.
अवांतर (पण महत्त्वाचे):
१. बोलता बोलत कोपरखळी मारणार्या पद्ध्तीचे वरील काही प्रतिसादांसारखे प्रतिसाद हा इसेन्शियली 'मिपाचा आत्मा' आहे असे आम्हाला वाटते! अशा प्रतिसादकांचे धन्यवाद.
२. या धाग्यावरुन आलेल्या काही आक्षेपांची (जे घेणारे सदस्य आमचे मित्र तसेच मिपाचे जुने जाणते सदस्य आहेत), योग्य ती नोंद घेण्यात आली असुन यापुढील लेखनात त्यांनी सुचविलेल्या बाबींचा समावेश करण्यात येईल व त्यांनी अयोग्य ठरविलेल्या बाबी व्यावहारिकतेच्या मर्यांदांपर्यंत काढुन टाकण्यात येतील.
-
आपला नम्र,
इंट्या आभारी.
3 Mar 2011 - 8:34 am | अवलिया
अरे वा ! अभ्यास पण करतोसा का तु?
3 Mar 2011 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार
आपल्याला मैत्रिण ती पण बालमैत्रिण वगैरे आहे हे दाखवण्याचा क्षिण प्रयत्न...
3 Mar 2011 - 1:10 pm | बिपिन कार्यकर्ते
मैत्रीण आहे ते ठीक... पण मग मैत्रिणी फेबुवर काय म्हणतात त्याचीही दखल घ्यावी की माणसाने!!! :D
3 Mar 2011 - 1:07 pm | स्पा
आपल्याला मैत्रिण ती पण बालमैत्रिण वगैरे आहे हे दाखवण्याचा क्षिण प्रयत्न...
हॅ हॅ हॅ
3 Mar 2011 - 1:20 pm | कुंदन
अरे स्पाम मेल , तुला वकील पाहिजे होता ना.
ईंट्याचा सल्ला घे की मग.
3 Mar 2011 - 1:36 pm | स्पा
नमस्कार माननीय इन त्या जी
आपली मदत अपेक्षित आहे , आपण आमच्या धाग्यावर डोकावून जावे हि जाहीर विनंती
(आपल्याला आमचा राग तर नाही न आला? )