साहित्यः
१७५ ग्राम साखर
२ अंडी फ्रिजमधुन बाहेर काढुन ठेवणे
१५० ग्राम मारगरीन किंवा तूप
एका लिंबाचे किसलेले साल
१७५ ग्राम मैदा
१२५ मिलि दूध
लेमन सिरप चे साहित्यः
१४० ग्राम पिठीसाखर
५० मिली लिंबाचा रस
पाकृ:
१८० डिग्री वर ओव्हन गरम करायला ठेवणे. एका भांड्यात अंडी, साखर आणी मारगरीन किंवा तूप एकत्र करणे.
एकत्र चांगले हलके होईस्तोवर फेटणे.
मग त्यात किसलेले लिंबाचे साल घालणे व नीट एकत्र करणे.
मैदा हळूहळू घालणे व लाकडाच्या चमच्याने किंवा रबराच्या चमच्याने एकत्र करणे.
त्यात मग दूध घालून नीट सगळे एकत्र करणे.
तुपाचा हात लावलेल्या केक टीनमध्ये मिश्रण ओतणे व गरम केलेल्या ओव्हनमध्ये ३५-४० मिनिटे बेक करणे.
तयार केक ला टीनमध्येच ठेवुन त्यावर काट्याने टोचे मारणे.
लेमन सिरपसाठी पिठीसाखर आणी लिंबाचा रस एकत्र करुन गॅसवर गरम करणे. उकळायचे अजिबान नाही, हलकेच गरम करणे व ते केकवर थोडे थोडे ओतणे. केक आपोआपच सिरप सोषून घेईल. ( हे सिरप आंबट -गोड असे असते ,ज्यांना आंबट चालत नाही त्यांनी सिरप आपल्या चवीप्रमाणे घालणे)
थंड झाले कि त्यावर पिठीसाखर भुरभुरणे आणी लगेच खायला सुरुवात करणे :)
प्रतिक्रिया
27 Feb 2011 - 11:25 pm | पैसा
मस्त दिसतोय!
27 Feb 2011 - 11:31 pm | प्रीत-मोहर
तोंपासु!!!
28 Feb 2011 - 9:30 am | लवंगी
नक्की करुन पाहिन
28 Feb 2011 - 10:52 am | ५० फक्त
बाकी माणसं कमी होती काय मिपावर म्हणुन तुम्ही एक, असो या स्वागत आहे रोगोखाकॅवा कल्बात.
करताय केवढं छान, फोटो काय काढलेत, आयला हापिसात आल्या आल्या हे असले धागे आणि फोटो देवा बरं आहे तु अंडि खात नाहिस ते.
असो,
एकदा प्रयत्न करुन बघेन.
28 Feb 2011 - 11:24 am | गुड्डु
धासु दीसतोय
28 Feb 2011 - 12:14 pm | पियुशा
+१ :)
28 Feb 2011 - 12:27 pm | निवेदिता-ताई
अतिशय सुंदर.....
पण हा अंडी न घालता करता येईल का???
28 Feb 2011 - 12:27 pm | निवेदिता-ताई
अतिशय सुंदर.....
पण हा अंडी न घालता करता येईल का???
28 Feb 2011 - 3:31 pm | प्यारे१
निवेदिताई ,
प्रत्येक केक्/बेक नंतर हा प्रश्न का विचारता ????
28 Feb 2011 - 1:17 pm | प्राजक्ता पवार
एकदम टेम्प्टींग दिसतोय केक :)
28 Feb 2011 - 1:19 pm | प्राजक्ता पवार
यात बेकींग पावडरची आवश्यकता नाही का ?
28 Feb 2011 - 2:54 pm | खादाड अमिता
बेकिंग पावडर घातली तर तो अजून छान फुलेल आणि लेमन ग्लेझ पण आणि नित मुरेल.
छान पाक्रु.
28 Feb 2011 - 1:29 pm | टारझन
हा केक इनसाईड आउट केल्यास चांगला शिजतो.
28 Feb 2011 - 4:47 pm | स्वाती२
मस्त!
28 Feb 2011 - 6:53 pm | सानिकास्वप्निल
आभार!!
बेकिंग पावडर न घालता ही हा केक छान फुलतो अंडी नीट फेटली गेली पाहीजेत.
जे अंडे खात नाही त्यांनी १ टीस्पून बेकिंग सोडा + १/२ टीस्पून बेकिंग पावडर, १/२ कप स्प्राईट सारखे कुठले ही शितपेय घालून मिश्रण एकत्र करणे.
24 May 2011 - 3:41 pm | चैत्रपालवी
आभार सानिका,
मी काल करून पाहिला आणि मस्त्च झाला. हा बघा फोटो.
24 May 2011 - 3:47 pm | चैत्रपालवी
कोणी मदत करू शकेल का?