हुकुमशहांना विनोदाचं वावडं का असतं?

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in काथ्याकूट
26 Feb 2011 - 12:43 am
गाभा: 

एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा गटाच्या (उदा: मराठी संकेतस्थळांचे संपादक! सं.मं: ;-) ह. घ्या. बरंका!) विषयी पसरणारे विनोद हे त्यांच्याविषयी जनतेच्या मनात असणाऱ्या रागाचं द्योतक असतीलच असं नाही. उदा: बेल्जिअन लोक मूर्ख असतात असं दाखवणारे पुष्कळ फ्रेंच विनोद लोकप्रिय असूनही बेल्जिअन लोकांविषयी फ्रेंचांना विशेष राग आहे असं दिसत नाही. आपल्याकडेही ‘संता-बंता’सारखे विनोद शीख लोकांना मूर्ख दाखवतात, पण शिखांविषयी फार राग जनमानसात आढळत नाही. उलट एखाद्या व्यक्ती/गटाविषयी असणाऱ्या द्वेषाचं रुपांतर विनोदांमध्ये होईलच असंही नाही. उदा: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये जपान्यांविरुद्ध चीड होती, पण जपानी लोकांबद्दल विनोद मात्र निर्माण झाले नाहीत. किंवा आपल्याकडे मुस्लिमांबद्दल राग/द्वेष बाळगणाऱ्या हिंदुत्ववाद्यांमध्ये मुस्लिमांविषयी विनोद ऐकू येत नाहीत.

अनेकदा असे विशिष्ट जमाती/समाजांविषयीचे विनोद सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून किंवा अभिरुचीहीन असल्याचे मानले जातात आणि म्हणून संपादित होतात. बहुतेक संकेतस्थळांच्या धोरणातच असा उल्लेख केलेला असतो. आणि तरीही असे विनोद अस्तित्वात रहातातच. व्य.नि, खरडी अशा स्वरुपात ते फिरत रहातात. ते जनसंस्कृतीचा एक सच्चा (आणि इरसाल) अविष्कार असतात, म्हणूनच त्यांचं अस्तित्व मुळापासून नष्ट करणं अशक्यप्राय असतं. आणि तरीही, (अगदी इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणारेसुद्धा) अनेक लोक अशा विनोदांच्या अभिव्यक्तीत अडथळे आणताना दिसतात. विनोदाचं लक्ष्य असणाऱ्या व्यक्ती/समूहावर विनोदांतून एक प्रकारे हल्लाच केला जातो असं मानणारे हे लोक असतात.

पण खरं तर विनोदांमुळे सामाजिक/राजकीय उलथापालथ होत नाही. इतकी ताकद खरं तर त्यांच्यात नसतेच. त्यांना अभिव्यक्त होण्यापासून रोखण्यानं काही हशील होत असेल, तर ते एवढंच की ही अभिव्यक्ती रोखणाऱ्याची दमनशक्ती आणि नियंत्रणपिपासू (कंट्रोल फ्रीक) वृत्ती यांचं त्यातून प्रदर्शन होतं. त्यांचे त्या दमनाच्या समर्थनार्थ दिले जाणारे सर्व युक्तिवाद हे अंतिमत: खोटे आणि काहीसे बावळटदेखील ठरतात.

पण म्हणजे विनोद हे अगदी बिनमहत्त्वाचे असतात का? तर अगदी तसंही म्हणता येणार नाही. तो लोकांनी लोकांसाठी आणि लोकांविषयी बनवलेला असा म्हणजेच एक निर्मम लोकशाहीवादी अविष्कार असतो. शब्दांशी, संकल्पनांशी खेळण्याचं लोकांना उपलब्ध असं ते एक साधंसोपं खेळणं आहे. आपल्याकडे गोष्टी सांगण्याची एक फार मोठी मौखिक परंपरा पूर्वीपासून होती. आजच्या डेली सोपच्या गदारोळात ती नष्ट झालेली आहे. पण तरीही ही विनोद पसरवण्याची परंपरा मात्र अजूनही चांगलीच जिवंत आहे. किंबहुना आधुनिक तंत्रज्ञान तिला पोषकच ठरलेलं आहे. जगाच्या एका कोपऱ्यात (उदा: इजिप्त किंवा पुणे) चाललेल्या राजकीय घडामोडींबद्दलचा एखादा विनोद जगाच्या दुसऱ्या एखाद्या कोपऱ्यात (उदा: सिंगापूर) बसलेला कुणीतरी जगाच्या तिसऱ्या कोपऱ्यात बसलेल्या (उदा: डीसी) कुणालातरी पाठवतो, आणि मग चेहरापुस्तक, व्य.नि. वगैरेंद्वारे तो असाच पुढे पसरत जातो. विनोदांमधून मिळणाऱ्या आनंदामुळे हे सर्व होऊ शकतं. थोडक्यात, विनोद तितकाही बिनमहत्त्वाचा नसतो.

पण तरीही, शब्दांचा वापर करणाऱ्या साधनांचा विचार केला असता खरं तर जाहिरात, प्रचारकी थाटाचं लिखाण, गॉसिप किंवा एखादं काळजीपूर्वक पसरवलेलं धादांत असत्य अशांचा राजकीय परिणाम विनोदांहून अधिक घातक असतो. हजरजबाबीपणा किंवा विनोद हे त्या मानानं शस्त्र म्हणून कमी प्रभावी आहेत.

पण मग विनोदांमुळे लोक इतके का चिडतात? आणि त्यांना सेन्सॉर करण्यात इतकी उर्जा आणि वेळ का घालवतात? हुकुमशाही राजवटींत किंवा दमनशाही राजवटींत कुजबुजलेला एखादा विनोदसुद्धा तुमच्या छळाचं कारण का ठरू शकतो?

ज्यांच्या हाती प्रसारमाध्यमांच्या आणि पर्यायानं लोकांच्या अभिव्यक्तीच्या दोऱ्या असतात, अशांना अर्थात विनोदाचे बळी व्हावं लागतं, कारण ज्या सामाजिक वातावरणात विनोद फोफावतो असं वातावरण बनू देणं न देणं त्यांच्याच हातात असतं. उदा. शीतयुद्धाच्या काळातला हा विनोद पहा:
स्टालिन, क्रुश्चेव आणि ब्रेझ्नेव एकदा आगगाडीनं जात असतात. गाडी अचानक थांबते. स्टालिन म्हणतो, “मी गाडीची हालहवाल बघतो.” तो खाली उतरतो. काही वेळानं परत येऊन तो म्हणतो, “आता सर्व काही ठीक होईल. मी ड्रायव्हरला गोळी घालायचा आदेश देऊन आलोय.” पण काहीच होत नाही. मग क्रुश्चेव जातो. काही वेळानं परत येऊन तो म्हणतो, “आता सर्व काही ठीक होईल. मी ड्रायव्हरला रि-हॅबिलीटेट करून आलोय.” तरीही काहीच होत नाही. मग ब्रेझ्नेव उभा राहतो. खिडक्यांवरचे काळे पडदे तो ओढून घेतो. डबा पूर्ण अंधारात जातो. “पहा,” तो म्हणतो, “गाडी चालू झाली आहे.”

(टीप: या तीन नेत्यांच्या कम्युनिस्ट राजवटी ज्यांनी भोगल्या किंवा दुरून पाहिल्या आहेत त्यांना या विनोदाची धार लक्षात येईल. बाकीच्यांना त्या काळाची किमान माहिती असावी लागेल (उदा: http://en.wikipedia.org/wiki/Rehabilitation_%28Soviet%29 हे पहा). नाहीतर, हेटाळणी करायला लायक वाटणार्‍या आपापल्या फेवरिट संकेतस्थळांवरच्या वेगवेगळ्या व्हिलनना इथं कल्पून, आणि गोळ्या घालण्याऐवजी प्रतिसाद उडवणं, खातं गोठवणं वगैरे कल्पना करून थोडी मजा घेता येईल.)

किंवा हे पहा:
कम्युनिस्ट पार्टी मुख्यालयातून फोन येतो: “काय? या वर्षी पीकपाणी कसं काय आहे?”
शेतकरी: “उत्तम आहे साहेब. बटाटे इतके आले आहेत की त्यांची एकच रास रचली तर ती पार देवाच्या पायांपाशी पोहोचेल.”
पार्टी मुख्यालय: “पण देव तर अस्तित्वातच नाही.”
शेतकरी: “मग बटाटे तरी कुठे आहेत, साहेब?”

हे विनोद सार्वजानिक ठिकाणी सांगतासुद्धा येत नसत. मग ते छापील साहित्यात सापडणं तर अशक्यच होतं. आणि तरीही ते सगळ्यांना माहीत असायचे आणि ते हिरीरीनं एकमेकांना सांगितले जायचे. अगदी त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात हे माहीत असूनही.

आणि तरीही प्रत्यक्षात सोव्हिएत साम्राज्य कोसळून पाडण्यात या विनोदांचा हातभार शून्य होता. साम्राज्य कोसळण्याच्या पहिल्या दहा कारणांमध्ये कुणीही या विनोदांचा समावेश करणार नाही. विनोद सांगणं हा काही विद्रोह नव्हता. साम्राज्यात सर्वत्र पसरलेल्या परात्मभावाचा (एलिअनेशन) मात्र ते आरसा होते. ते सांगण्यात मजा होती. ते प्रतिबंधित होते यामुळे ती मजा अधिक होती. बाकीच्या कंटाळवाण्या वातावरणात सामान्य माणसाचा तो एक विरंगुळा होता. प्रचंड सत्ता थोड्याच लोकांच्या हातात असण्याच्या परिस्थितीत जनसामान्यांसाठीची ती एक मौज होती. मौजमजेच्या इतर साधनांप्रमाणेच यातही असलेला धोका हा त्या मौजेत भर घालत असे.

लोकांचे विचार किंवा भावना यांवर जेव्हा पोलिसी कारवाईचा बडगा असतो, तेव्हा विनोद सांगणाऱ्यांना अधिक चेव येतो. किंवा अगदी बौद्धिक, सांस्कृतिक उच्चभ्रूपणाच्या बेगडी वातावरणातही जो दंभ असतो, तो देखील अशा चेव येण्यासाठीचं पुरेसं कारण असू शकतो. उदा: कम्युनिस्ट राजवटीत आस्तिकांच्या मूर्खपणाविषयी विनोद करायला परवानगी असे आणि हा एक उच्चभ्रूपणा आहे असा त्यात अंतर्भूत दंभ असे.

ज्या भावना किंवा विचार अधिकृत (state sponsored) असत ते तुमच्यावर सतत आदळत असत. त्यांच्या या कर्णकर्कश साखळदंडांपासून तात्पुरती सुटका मिळवण्याचा विनोद हा एक मार्ग होता.

पण अगदी प्रगल्भ लोकशाहीसुद्धा अशा दमनप्रक्रियेतून मुक्त असेलच असं नाही. काही वर्षांपूर्वी एका अमेरिकन विद्यापीठात घडलेली गोष्ट आहे. ‘गे प्राईड’ दरम्यान एका विद्यार्थ्यानं गंमत म्हणून एक भित्तिचित्र विद्यापीठात डकवलं. त्यावर ‘पशुगमन प्राईड आठवडा’ ('Bestiality Pride Week' – पहा: http://en.wikipedia.org/wiki/Bestiality) असं लिहिलं होतं. समलिंगी समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्या मुलाची विद्यापीठातून हकालपट्टी झाली. आता गंमत म्हणजे ‘गे प्राईड’ दरम्यान निघणाऱ्या परेडमध्ये पुष्कळ विनोदी गोष्टी घडत असतात. उदा: ननच्या पोशाखातले पुरुष स्वत:ला ‘Sisters of Perpetual Indulgence’ म्हणवून घेत परेडमध्ये सहभागी होतात. किंवा S&M लेस्बिअन्स (पहा: http://en.wikipedia.org/wiki/Sadomasochism) ‘काळं-निळं सुंदर असतं’ अशा घोषवाक्यासहित त्यात सहभागी होतात. (पहा: http://en.wikipedia.org/wiki/Black_is_beautiful 'ब्लॅक इज ब्यूटिफुल' या वंशभेदविरोधी घोषवाक्यावरची ही कोटी आहे.) आता ज्या संस्कृतीत या गोष्टींची चेष्टा होते तीत या विद्यार्थ्याला होमोफोबिक म्हणून हाकलून देणं ही एक प्रकारची गळचेपी आहे. थोडक्यात, ज्यांना इतरांवर प्रच्छन्न टीका करायची असते त्यांना ती स्वत:वर झालेली मूग गिळून सहन करून घ्यावी लागते; त्याची तयारी ठेवायला लागते.

ज्यांच्या हाती प्रसारमाध्यमांचं नियंत्रण असतं ते नेहमीच विनोदांच्या तथाकथित ताकदीबद्दल नको तितके गैरसमज बाळगून असतात आणि समाजाच्या नैतिकतेचे आपणच तारणहार असल्याचा उगाचच गैरसमज करून असतात. उदा: १९४८मध्ये बी.बी.सी. मध्ये खालील विषयांवरच्या विनोदांना बंदी होती: मुताऱ्या, स्त्रैण पुरुष, अंजीर-पानं (Fig-leaves पहा http://en.wikipedia.org/wiki/Fig_leaf), स्त्रियांची अंतर्वस्त्रं...

तर १९४९मध्ये या यादीत समाविष्ट झालेले विषय पहा: रंगांचा संदर्भ (पिवळा, निगर, काळा), भारतीय योगी (पण फकीराबद्दलचे विनोद चालतील!)

इतकंच काय, काही काळ ‘काळा बाजार’ या विषयावरसुद्धा विनोद करता येत नसे (काय करता, रंग पडला नं!). दुसऱ्या महायुद्धादरम्यान मार्शल गोअरिंगच्या लठ्ठपणावर विनोद केलेला चालेल का, यावर बी.बी.सी. मध्ये गरमागरम चर्चा झाल्या!

एकंदरीत, ज्यांच्यापाशी अभिव्यक्ती सेन्सॉर करण्याची सत्ता असते ते आपली नैतिकता हीच समाजाची नैतिकता आहे असा दिखावा करत ती इतरांवर लादतात, तर त्या निर्बंधांना न जुमानणारे किंवा अधिकृत नैतिकतेहून वेगळी नैतिकता असणारे आपल्याला उपलब्ध फटींतून त्या लादलेल्या नैतिकतेवर विनोद करत राहतात, आणि अर्थात संपादित होण्याचा धोका पत्करतात. ज्यांच्यापाशी सत्ता असते त्यांचे विनोद जर इतरांना दुखावत असतील तर त्याची फिकीर सत्ताधारी कधीच करत नाहीत. उलट त्यांच्या गैरसोयीचे विनोद एका छोट्याशा खाजगी अवकाशापुरते मर्यादित कसे राहतील आणि तो अवकाश अधिकाधिक संकुचित कसा होईल, याची काळजी ते घेत रहातात. आपण प्रच्छन्न सत्ता उपभोगतो आहोत हे या सत्ताधाऱ्यांना कधीच मान्य होत नाही. अनिर्बंध हुकुमशाहीचं ते एक व्यवच्छेदक लक्षणच आहे. मग कधीतरी याचा कडेलोट होतो आणि लोक म्हणतात, ‘आता बास! आम्हाला जे विनोद करायचे आहेत ते आम्ही करणारच. मग ते तुम्हाला आवडोत न आवडोत, आम्हाला त्याची पर्वा नाही. आमचे मार्ग आम्ही शोधून काढू! गर्जा जयजयकार विनोदाचा आणि विनोद करायच्या हक्काचा!!!’

टीप: कोणत्याही मराठी/अमराठी संकेतस्थळावर घडलेल्या ताज्या/शिळ्या घटनांचा किंवा त्यांच्याशी संबंधित युनिक/डुप्लीकेट आय.डींचा या धाग्याशी सुतराम संबंध नाही. तशी शंका आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

प्रतिक्रिया

गोगोल's picture

26 Feb 2011 - 12:53 am | गोगोल

एकाच लेखात महायुद्धापासून ते इजिप्त पर्यन्त सर्व काही कव्हर केलय.
खूप छान. मी देत आहे तुम्हाला ९/१० गुण.

पंगा's picture

26 Feb 2011 - 1:28 am | पंगा

लेख आवडला. पटलाही.

... जाहिरात, प्रचारकी थाटाचं लिखाण, गॉसिप किंवा एखादं काळजीपूर्वक पसरवलेलं धादांत असत्य...

हेदेखील 'हा अत्युच्च कोटीचा विनोद आहे' अशा गैरसमजुतीखाली करता येणे शक्य असावे काय? दडपलेल्या अभिव्यक्तीतून उसळी मारू पाहणारा विनोद आणि गॉसिप यांच्यातील सूक्ष्म सीमारेषा कोणती?

पण खरं तर विनोदांमुळे सामाजिक/राजकीय उलथापालथ होत नाही. इतकी ताकद खरं तर त्यांच्यात नसतेच.

आणि

खरं तर जाहिरात, प्रचारकी थाटाचं लिखाण, गॉसिप किंवा एखादं काळजीपूर्वक पसरवलेलं धादांत असत्य अशांचा राजकीय परिणाम विनोदांहून अधिक घातक असतो.

या दोहोंचा विचार करता, "ज्याच्यातून बजबजपुरी माजते ते गॉसिप, अन्यथा तो दडपलेल्या अभिव्यक्तीतून उसळी मारू पाहणारा विनोद" असे ढोबळमानाने म्हणता यावे काय?

असो. "लेख प्रगल्भ आहे" एवढेच तूर्तास म्हणतो.

विकास's picture

26 Feb 2011 - 1:40 am | विकास

यात नक्की हुकुमशहांना विनोदाचे वावडे असते हे कुठल्या उदाहरणातून सिद्ध होते ते समजले नाही. :(

कम्युनिस्ट राज्यात, जनतेने नक्की काय केलेले चालायचे (विशेषतः शीतयुद्धाच्या काळात) हा एक संशोधनाचाच विषय आहे. किंवा सोपे म्हणजे १९८४ वाचणे... त्या संदर्भात अजून एक विनोदः

एक माणूस क्रेमलीनच्या बाहेर जोरात ओरडत असतो, स्टॅलीन वेडा आहे, मूर्ख आहे वगैरे... त्याला पकडून खटला भरण्यात येतो. न्यायाधीश दोन शिक्षा देतातः पहीली राष्ट्राध्यक्षाच्या अपमानासाठी एक वर्ष आणि दुसरी राष्ट्रीय गुपीत फोडल्याबद्दल पन्नास वर्षे!

बीबीसीवर ज्या कशावर बंदी होती ती कदाचीत "पॉलीटीकल करेक्टनेस" च्या संदर्भात असावी, त्याचा विनोदाशी संबंध नसावा.

जगातल्या कुठल्याही लोकशाही मधल्या सत्ताधार्‍यांविषयी चपखल असलेला आणि मला आवडलेला विनोद:

It's tough being a politician. Half your reputation is ruined by lies the other half is ruined by the truth! :-)

बाकी क्लिंटन (मोनिका लुइंन्स्की प्रकरणानंतर) नी आणि जॉर्ज बुशनी (केवळ जॉर्ज बुश म्हणून) अमेरिकेतील स्टँडअप कॉमेडीयन्स (जे लेनो/लेटरमन) ना भरपूर कच्चा माल पुरवला होता. :-)

नाटक्या's picture

26 Feb 2011 - 2:04 am | नाटक्या

या विषयावर जितके बोलू तितके कमीच आहे. पण यात आमच्या लाडक्या वुडहाऊसचा उल्लेख नसल्याचे प्रचंड खटकले. वुडहाऊसने नाझी जर्मनांच्या कैदेत राहून त्यांची जी टोपी उडवली त्याला तोड नाही. एकंदर लेख छानच जमलाय...

एका डॅनिश कार्टूनिस्टने इस्लामी अतिरेकाविषयी काही कार्टून एका पेपरात छापली होती. त्यातला विनोद तितका हीन वा अभिरुचीहीन नव्हता. पण त्याने इस्लामी जगतात जो असंतोष निर्माण झाला तो प्रचंड होता. मुस्लिम अतिरेक्यांनी इतक्या अतिरेकी कारवाया आजवर केल्या आहेत. ह्या अतिरेकी कारवायांविरुद्ध शांतताप्रेमी मुस्लिमांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. ह्या कुठल्याही आंदोलनाला किरकोळ म्हणता येईल असा धुमाकूळ ह्या कार्टूनविरोधी मुस्लिम समर्थकांनी केला. भारतातही लाखाहून अधिक लोकांनी अशा मोर्चात सहभाग घेतला.

शिवाजीबद्दल एक हीन व अभिरुचीहीन पण तरी निव्वळ एक विनोद जेम्स लेनने आपल्या पुस्तकात उध्दृत केला होता. त्याविरुद्ध उठलेला गदारोळ सगळ्यांना आठवत आहेच.

तात्पर्य, जेव्हा एखाद्या व्यक्तीविषयी पराकोटीचा भक्ती भाव (खरा वा दिखाऊ) वा निष्ठा व्यक्त करायचा/ची असेल तर त्या व्यक्तीचे अनुयायी त्या व्यक्तीबद्दल केलेल्या विनोदाला जीव तोडून विरोध करून आपली निष्ठा सिद्ध करतात.

हुकुमशहांविरुद्धचा विनोद ह्याच गटात मोडतो.

अरुण मनोहर's picture

26 Feb 2011 - 4:08 am | अरुण मनोहर

नक्की काय?
>>> युनिक/डुप्लीकेट आय.डींचा या धाग्याशी सुतराम संबंध नाही. तशी शंका आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा<<<

"शंका येणे" हा योगायोग असू शकेल ही अशी शंका ह्यापुर्वी कधी आली नव्हती!

राजेश घासकडवी's picture

26 Feb 2011 - 4:25 am | राजेश घासकडवी

लेख अतिशय आवडला. असंच सकस आणि दर्जेदार लिहीत राहा.

एकंदरीतच सेन्सॉरशिपबाबत जग जुन्या काळात आहे असं मला वाटतं. एके काळी लिखित शब्द मर्यादित होते. त्यामुळे छापून आलेलं पांढऱ्यावरचं काळं हे दगडावरच्या रेषेसारखं मानलं जायचं. त्यामुळे काय लिहिलं गेलं पाहिजे, आणि काय लिहिलं जाता कामा नये याबाबत खूप कर्मठ, काहीशा अतिरेकी कल्पना होत्या. त्या अजूनही पुरेशा निवलेल्या नाहीत असं वाटतं. त्यात अनेक धर्मात पाप हे बाह्य स्वरूपात असतं, आणि शोधून शोधून ते नष्ट केलं तर जगात फक्त पवित्रताच नांदेल असा एक अलिखित संदेश असतो. त्यामुळे इष्टानिष्टतेच्या संकल्पना निर्माण होतात.

अनेकदा असे विशिष्ट जमाती/समाजांविषयीचे विनोद सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून किंवा अभिरुचीहीन असल्याचे मानले जातात आणि म्हणून संपादित होतात.

ही पोलिटिकल करेक्ट भावना तशी नवीनच असावी असं वाटतं. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी जेव्हा एखाद्या वर्गाची, वर्णाची, वंशाची हेटाळणी करणं जनमान्य होतं तेव्हा हे कमी असावं.

थोडक्यात, ज्यांना इतरांवर प्रच्छन्न टीका करायची असते त्यांना ती स्वत:वर झालेली मूग गिळून सहन करून घ्यावी लागते; त्याची तयारी ठेवायला लागते.

या नाण्याची दुसरी बाजूदेखील आहे - जी खरीतर तुम्ही आधीच्या उदाहरणात मांडलीत. ती म्हणजे एका विशिष्ट वर्गाने स्वतःवर विनोद करणं हे पोलिटिकली करेक्ट असतं, तेच 'विरुद्ध' किंवा एके काळी स्वतःला त्यांच्यापेक्षा वरचे समजणाऱ्या वर्गाने तो विनोद केला तर तो प्रचंड अपमान समजला जातो. उदा. अमेरिकेतले काळे लोक एकमेकांना बिन्धास 'hey, nigger' म्हणू शकतात, म्हणतात. पण तेच जर गोऱ्याने म्हटलं तर त्याला हेट क्राइम म्हटलं जाईल. मला वाटतं नुसत्या शब्दांपेक्षा त्यांना चिकटलेले हेत्वारोप महत्त्वाचे ठरतात. ते खरे असोत नसोत, ते तसे आहेत हे गृहित धरलं जातं.

हुकुमशहांच्या बाबतीत मला असं वाटतं की असे शब्द बुडबुडे फोडत बसलं तर जनतेचं लक्ष त्यांच्या मूलभूत भुकांपासून, कमतरतांपासून वळवता येतं, हे एक कारण असावं. दुसरं कारण बहुधा शक्तीप्रदर्शनाचं असावं. आपली जनतेवर इतकी पकड आहे की एक विनोदही आपल्या परवानगीशिवाय होत नाही; आपल्याविरुद्ध ब्र काढणं, आवाज उठवणं सोडाच पण विनोद करण्याइतकाही कणा जनतेत नाही (कारण तो पद्धतशीरपणे लेचापेचा केला गेलेला आहे). तिसरं कारण हे एखाद्या पूजनीय व्यक्तीविषयी बोललं की समाज चवताळून उठतो त्या प्रकारचं असावं. हुकुमशहांना स्वतःला सर्वात पूजनीय व्यक्ती म्हणजे अर्थातच ते स्वतः असतात. त्यामुळे ते चवताळून उठतात.

Nile's picture

26 Feb 2011 - 5:23 am | Nile

उत्तम लेख आणि आमच्या जिव्हाळ्याचा विषय. असे विनोद करुन संपादकांच्या (म्हणजे फक्त मराठी संस्थळावरील नव्हे!) कात्रीस बळी पडणारे आम्हाला क्रांतिकारकांच्याच जोडीचे. यावरुन आम्हाला आमच्या जॉर्ज कार्लिनची आठवण आली. त्याशिवाय कुठल्याही देशात जोपर्यंत जॉन स्टुअर्ट आणि कोलबेर शो सारखे कार्यक्रम सुरु होत नाहीत तोवर अभिव्यक्ती स्वतंत्र झाली असे म्हणता येणार नाही असे आम्हाला वाटते. (भारतात एक सुरु करावा काय चिंजं? ;-) )

सन्जोप राव's picture

26 Feb 2011 - 6:54 am | सन्जोप राव

उत्तम लेख. खूप आवडला.
मला वाटते, विनोद आणि राग या दोन वेगळ्या भावना आहेत. ज्या घटनांवर, ज्या व्यक्तींवर आपल्याला विनोद करावासा वाटतो, त्यांचा प्रत्येक वेळी राग येत असतो असे नाही. आणि उलटेही आहे. हुकुमशाही ही विनोदापेक्षा रागावर आधारित आहे, त्यामुळे पु.लं. म्हणतात त्याप्रमाणे हुकुमशाहीत पहिला बळी जातो तो विनोदाचा. वुडहाऊसचा वर उल्लेख आला आहे (किंवा उल्लेख नसल्याबद्दल निषेध आहे!). जर्मनीत वुडहाऊसने केलेल्या विनोदी भाषणांबद्दल इंग्लंडमध्ये राग निर्माण झाला याचे कारण बर्‍याचशा इंग्रजांना वुडहाऊसचा तो विनोद समजलाच नाही. समाजाकडे बघताना सदैव तिरळ्या विकृत नजरेने बघणार्‍या एखाद्याचे आपल्याला खूप हसू येते, पण राग येतोच असे नाही. अशा व्यक्तीला आपण फारफारतर 'वा विकृतभौ, आपण फ्यान तुमचे आजपासून. काय प्रोफाईल तुमचा! डिट्टो दामुअण्णा मालवणकर!' असे म्हणू, पण यामागे रागापेक्षा कणव ही भावना अधिक तीव्र आहे. एखाद्या स्वयंघोषित विदुषीचे परपुष्ट लेखन वाचून आपण म्हणू,'बाई, काय व्यासंग तुमचा! पण एक सांगा, विकिपिडीया नसते, तर तुम्ही आपले लिखाण कसे केले असते?' हा काय राग आहे? नक्कीच नाही. पण हा विनोद जरुर आहे. 'उठवळ' हा शब्द सभ्य आहे की असभ्य याबाबत खल होऊन समाजात एक नवी चळवळ उभी राहिली पाहिजे अशा आवेशाने हातोपे सरसावणार्‍याला कुणीतरी 'चाकलेट घेता का चाकलेट?' असे विचारेल तेंव्हा त्याला चाकलेट म्हणजे काय हे सहजपणे न कळाल्याने रागही येईल. हा राग आहे, पण विनोद नाही. 'काय दाक्तरांनु, आज क्यासं कलप लावल्यावानी दिसत्याती..' हे वरकरणी निष्पाप वाक्य आहे. थोडे 'टंग इन दी चीक' स्वरुपाचे, फारफारतर. पण निशान-ए-पकिस्तान डॉक्टर युसुफखान सरवरखान पठाण यांना ते चांगलेच झोंबेल. तात्पर्य काय, तर विनोद वेगळा आणि राग वेगळा.
वरीले लेखाचेच उदाहरण घ्या. 'दमनप्रक्रिया' हा सुरेख शब्द चपखलपणे वापरताना लेखकाने 'चेहरापुस्तक' ही गोची करुन ठेवली आहे. त्यावर कुणी अशी प्रतिक्रिया दिली तर चर्चाप्रस्तावकाला हसू येईल की राग येईल?

नितिन थत्ते's picture

26 Feb 2011 - 9:46 am | नितिन थत्ते

हुकुमशाहीतील विनोदांवरचे गंडांतर याबाबत राजेश घासकडवी यांच्याशी सहमत.

इतर काही विनोदाबाबत म्हणायचे तर स्वतःचे क्षुद्र कर्तृत्व झाकण्यासाठी विनोदाचा आसरा घेणे. अंतुबर्वामधील बरेचसे विनोद* याचे प्रातिनिधिक आहेत. याने कदाचित कर्तृत्वहीनतेची जाणीव असल्याने जो न्यूनगंड येत असेल त्यावर फुंकर घालणे हा हेतू साध्य होत असेल.

*टीप: विनोद करणारे पुल नव्हे तर ते ज्यांच्या तोंडी आहेत ती अंतूबर्वा वगैरे पात्रे क्षुद्र कर्तृत्वाची आहेत.

पाषाणभेद's picture

26 Feb 2011 - 10:28 am | पाषाणभेद

एकदम झकास लेख चिं

योगप्रभू's picture

26 Feb 2011 - 11:19 am | योगप्रभू

विनोद हे राग अथवा वैफल्य या भावनांना वाट करुन देणारे निकोप माध्यम असले तरी वेळप्रसंगी ते शस्त्रही ठरु शकते. हुकूमशहा नेहमीच आपल्याकडे रोखल्या जाणार्‍या शस्त्रांकडे (मग शाब्दिक असोत वा कुठलीही) सावधपणे पाहात असतात. लोकांच्या भावनांपेक्षा त्यांना स्वतःची उजळ प्रतिमा महत्त्वाची असते. म्हणून ते विनोदाचा द्वेष करत असावेत. पण विनोद हा व्यक्ती आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी तसेच विकासासाठी उपकारक असतो. त्यामुळे लोकशाहीवर विश्वास असणारे आपल्याकडील हे औषध जपून ठेवतात.

मला आवडलेला हुकूमशाहीविरोधातला एक विनोद नमूद करतो.

कामातून कंटाळा आल्यावर एकदा हिटलर आपल्या ड्रायव्हरला घेऊन कारमधून जर्मनीच्या ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर गेला. वाटेत अचानक एक पाळलेले डुक्कर गाडीसमोर आडवे आले. ड्रायव्हरने ब्रेक दाबले, पण उशीर झाला होता आणि डुक्कर मेले होते. हिटलरच्या मनात काय आले कुणास ठाऊक? तो ड्रायव्हरला म्हणाला, 'अरे! आपण एखाद्या गरीब शेतकर्‍याचे नुकसान नको करायला. तू एक काम कर. या डुकराच्या मालकाला जाऊन भेट. वाटल्यास भरपाई म्हणून थोडे पैसे दे.' ड्रायव्हर जवळच्या शेतात गेला आणि पाचच मिनिटांत परतला. गाडी सुरु करत असताना हिटलरने त्याला विचारले, 'काय रे काय झालं? रागावला असेल ना तो शेतकरी?' त्यावर ड्रायव्हर म्हणाला, 'नाही साहेब. आधी एकतर माझा गणवेश बघून तो शेतकरी घाबरला. नंतर त्याने मला विचारले 'काय झाले?' मी आपल्या शिस्तीप्रमाणे मोजकेच बोललो, की ' हेल हिटलर. डुक्कर मेले' त्यावर त्या शेतकर्‍याने प्रेमाने माझा हात दाबला आणि म्हणाला, 'बरे झाले' आणि तो ते बायकोला सांगण्यासाठी घरात पळाला. विचित्रच वाटला मला तो शेतकरी.

पंगा's picture

26 Feb 2011 - 11:01 pm | पंगा

मला आवडलेला हुकूमशाहीविरोधातला एक विनोद नमूद करतो.

कामातून कंटाळा आल्यावर एकदा हिटलर आपल्या ड्रायव्हरला घेऊन कारमधून ... ' हेल हिटलर. डुक्कर मेले' त्यावर त्या शेतकर्‍याने प्रेमाने माझा हात दाबला आणि म्हणाला, 'बरे झाले' आणि तो ते बायकोला सांगण्यासाठी घरात पळाला. विचित्रच वाटला मला तो शेतकरी.

याच धर्तीवरचा एक विनोद रोमेनियाचे हुकूमशहा निकोलाय चाउसेस्क्यू (उच्चार?) यांच्या संदर्भात ऐकलेला आहे.

या साहेबांना म्हणे हरून-अल-रशीदाप्रमाणे वेषांतर करून जनतेत फेरफटका मारायची सवय होती. फरक एवढाच, की यामागचा उद्देश अर्थातच जनतेची हालहवाल बघणे हा नसून लोक आपल्याविषयी काय बोलतात, यावर लक्ष ठेवणे हा.

तर एकदा महाशयांनी टॅक्सी पकडली. दूरचा प्रवास होता, म्हणून टॅक्सीवाल्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. बोलताबोलता विचारले, "काय रे, तुला चाउसेस्क्यूबद्दल काय वाटते?"

टॅक्सीवाल्याने आजूबाजूला बघितले, आणि हलक्या आवाजात म्हणाला, "इथे नको. कोणी ऐकेल."

टॅक्सी थोड्या विरळ वस्तीत गेल्यावर साहेबांनी पुन्हा विचारले. टॅक्सीवाल्याचे पुन्हा तेच उत्तर.

मग टॅक्सी गावाबाहेर आली आणि शेतेबिते दिसू लागली, तशी साहेबांनी म्हटले, "आता तरी सांग."

टॅक्सीवाला म्हणाला, "गाडीत नको. त्या शेतात जाऊन बोलू."

गेले शेतात. मग पुन्हा एकदा आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेत टॅक्सीवाला साहेबांच्या कानात कुजबुजला, "साहेब, कोणाला सांगू नका हं प्लीज, पण मला तो खूप आवडतो."
==================================================================
आणखी एक (नक्की कोणाबद्दल ते आठवत नाही.):

एकदा अशाच कोण्या एका हुकूमशहाने, लोकांना आपले तोंड रोज दिसावे, आणि आपली लोकप्रियता वाढावी, म्हणून म्हणे आपल्या पोष्टखात्याच्या प्रमुखास हुकूम देऊन आपले चित्र असलेले एक पोष्टाचे तिकीट बनवून घेतले.

काही दिवसांनंतर पो.खा.प्र.स बोलावून, तिकिटाचा खप कसा आहे याबद्दल चौकशी केली.

"काय सांगू साहेब, पण लोक तिकीट फारसे विकत घेत नाहीत."

"का?"

"ही तिकिटे पत्रास चिकटत नाहीत अशी लोकांची तक्रार आहे."

"अरे मग डिंक बदला, जरा चांगल्या प्रतीचा डिंक वापरा..."

"तसे नाही साहेब. डिंक उच्च प्रतीचा आहे."

"मग?"

"आता लोक पण अडाणी आहेत ना साहेब! चुकीच्या बाजूवर थुंकतात त्याला काय करणार!"

विकास's picture

27 Feb 2011 - 1:33 am | विकास

चॉसेस्क्यूवरील विनोद ऐकताना सुधीर गाडगीळांनी सांगितलेला किस्सा आठवला.

बाळासाहेबांनी त्यांना राजकीय विनोद सांगायला सांगितले:

एक माणूस (१) स्वारगेटला मुंबईकडे जाणार्‍या बसची वाट पहात उभा असतो. त्याचा शेजारी उभ्या असलेल्या माणसाशी (२) संवाद होतो:

(१): कुठे चाललात?
(२): मुंबईला
(१) बाळासाहेबांना भेटायला का?
(२) नाही हो..
(१): मग मनोहर जोशींना
(२) छे छे!
(१) मग सेनाभवनात?
(२) (वैतागून) अहो काय चाललयं? माझा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही!
(१) नक्की का?
(२) (रागातच) हो हो नक्की!
(१) (जोरात खेकसत म्हणतो) मग xxx माझ्या पायावरचा पाय बाजूला कर ना!

अर्थात बाळासाहेब मनमुराद हसले. पण म्हणाले की विनोद करायला शिवसेनाच दिसली का?

मग पुढचा विनोदः दिल्लीत चर्चा चाललेली असते २+२ किती? मग त्याचे उत्तर अडवाणी, अर्जूनसिंग, लालू, जयललीता, वगैरे कसे देतील हे त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितले, शेवटी प्रश्न पवारांना विचारण्यात येतो, २+२ किती? पवार म्हणतात : देयचेत का घेयचेत?

बाळासाहेब जोरात हसतात आणि म्हणतात की अहो पण आमचे जोशीबुवा इतके सभापती असून त्यांना नाही हा प्रश्न विचारला! गाडगीळ म्हणाले अहो जोशी असोत अथवा अजून कोणी, रिमोट तुमच्याच हातात आहे ना!

अर्थात बाळासाहेबांना विनोद आवडतो. ;)

प्रकाश घाटपांडे's picture

26 Feb 2011 - 11:24 am | प्रकाश घाटपांडे

लेख आवडला. विडंबन वा प्रहसन हे पचवण्याची प्रगल्भता येण्यासाठी समाजात लोककलेच्या माध्यमातुन प्रयत्न होतच आले आहेत.

सहज's picture

26 Feb 2011 - 12:54 pm | सहज

एक एक परिच्छेद पुन्हा पुन्हा वाचावा असा.

आणि हो, अन्य घटनांशी संबध लावून बघता प्रचंड बिंदूगामी लक्ष्यभेदी लेखन!! बहुदा त्यामुळेच "एजंट"विनोद (आपलं पंतप्रतिनिधी ) देखील एकदम रागावून आला आणी जमेल तितक्यांना नावे ठेवुन गेला. त्यात आता नविन ते काय म्हणा!

:-)

इन्द्र्राज पवार's picture

26 Feb 2011 - 12:58 pm | इन्द्र्राज पवार

लेख जितका प्रभावी तितकेच त्याचे शीर्षक फसवे. म्हणजे असे की, भारतीयांचा जसा समज आहे की विनोद हा फक्त शिखांच्यावरच केला जातो, तद्वतःच राजकारण्यांमध्ये हा मान फक्त हुकूमशहांनाच मिळतो. अर्थात आपल्याकडे जे विनोद आले, वाढले ते इंग्रजी भाषेमुळे आणि इंग्लंडच्या 'पंच' ला आणि अमेरिकेच्या 'न्यू यॉर्कर' ला कम्युनिझम आणि हिटलर हे दोन भक्कम उमेदवार सापडल्याने आपल्याकडेही या दोन घटकांवरच करण्यात आलेले (कित्येकदा बाष्कळ वाटणारेही...) विनोद मुबलक प्रमाणात 'आयात' झाले आणि त्यामुळे 'डिक्टेटरशिप इज इक्वल टु लाफ अ लाऊड...' ही संज्ञाच रूढ झाली. त्यातही हॉलीवूडचा नेहमीचा मसाला....म्हणजे दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील जर्मन सैनिकासारखे 'गाढव' सैन्य जगात कुठेच असणार नाही. "व्हेअर ईगल्स डेअर" सारख्या युद्धपटात जिथे मुंगीलाही आत प्रवेश करताना आवश्यक ती कागदपत्रे दाखविल्याशिवाय आत जाता येणार नाही अशी जर्मन सैन्याने केलेली भक्कम सुरक्षा व्यवस्था दाखवायची आणि त्याचवेळी अमेरिकन नायक व उपनायक कट्ट्यावरील गप्पा मारत मारत पुढे जात आहेत आणि गेट आल्यावर त्यातील नायकाच्या अंगावरील 'जर्मन अधिकार्‍या'चा ड्रेस पाहून व जर्मन भाषेतील संवाद पाहून गार्डने त्याला सलामी ठोकायची आणि ते गेट उघडून या दोन गंप्यांना अलगद आत सोडलेले दाखवायचे....हा 'विनोद' हॉलीवूड करू शकते, कारण शेवटी ते जेते !

लोकशाही प्रणाली मानणार्‍या आपल्या देशातदेखील कित्येकांना विनोदाचे वावडे आहेच. इथे गांधी-नेहरू-इंदिरा-मोरारजी-चरणसिंग-मनमोहनसिंग आदीवर डझनावारी विनोद होऊ शकतात, नव्हे करतातच, पण त्याचवेळी ज्यांच्याबद्दल आपल्या मनी आदराची भावना आहे अशा नेत्यांवर (शिवाजी-नानक-गोविंदसिंग-भगतसिंग-सुभाषबाबू-सावरकर) यांच्यावर एका ओळीचा विनोद शोधूनही सापडायचा नाही.

शीख-पारसी-मारवाडी-बनिया ह्या "कम्युनिटीज" कोणत्याही अर्थाने 'हुकूमशाही' पंगतीत येत नसूनही आम्ही त्यांचे विनोदाच्या नावाने कांडात काढू शकतो, पण त्याचवेळी त्यानी 'महाराष्ट्र" परंपरेवर विनोदाची तार छेडण्याचा प्रयत्न केला की आम्ही चूड घेऊन त्याला पेटवायला निघालोच....बाळासाहेब ठाकरे यानी विनोदाच्या जोरावर महाराष्ट्रात अतोनात प्रेम आणि आदर प्राप्त केला, पण त्यांच्या सेनेला सरसेनापतीवर केलेला विनोद चालत नाही. "वरळीचे डुक्कर, मैद्याचे पोते, लखोबा लोखंडे..." आदी विनोदाच्या नावाने केलेले 'घाव' इतरानी सोसायचे, पण त्यावर प्रतिघाव कुणी करू नये, ही अपेक्षा ठेवणे हेही इथेच घडते. विनोदाला सहन करण्याचा संयतपणा दाखविणे वा पचविणे एकूणच मराठी मनाला पटत नाही. फक्त साहित्यातील आणि चित्रपट-नाटकातील विनोदाला तो हसतो पण स्वतःवर झालेल्या विनोदाला टाळी देण्याचा प्रश्न आला की हात आखडता घेतलाच.

हुकूमशहाना विनोदाचे वावडे नसते हे दाखविणारा एक हजरजबाची विनोद प्रसिद्ध आहे. [माओबद्दल आहे, आणि माओ जरी कम्युनिस्ट पक्षाचे चेअरमन होते, तरी त्याना हुकूमशहा असेच मानले जाते]

अमेरिकन पत्रकारांनी बेजिंगमध्ये माओ-त्से-तुंग यांची भेट घेतली. रशियाची जागतिक बाजारपेठेतून होत असलेली पिछेहाट आणि त्याचवेळी अमेरिकेचा जगात वाढत असलेला भांडवलशाही वाद यावर चर्चा झाल्यावर एका पत्रकाराने माओला विचारले, "मि.चेअरमन, यदाकदाचित जॉन केनेडी यांच्या जागी ख्रुश्चेव्ह यांचीच हत्या झाली असती तर जगात काय परिणाम झाले असते?"

एक क्षणभर माओने विचार केला आणि उत्तर दिले, "काय झाल असते? बाकीचे काही माहीत नाही, पण तसे झाले असते तर अ‍ॅरिस्टॉटल ओनॅसिसने श्रीमती ख्रुश्चेव्ह यांच्याशी कधीच लग्न केले नसते !"

इन्द्रा

योगप्रभू's picture

26 Feb 2011 - 1:50 pm | योगप्रभू

इंद्रराज यांच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने काही अवांतर माहिती...

'व्हेअर इगल्स डेअर'मधील प्रसंग अगदीच हास्यास्पद म्हणून मोडीत काढण्यासारखा नाही. कारण हेरगिरीतील प्रसिद्ध तंत्र म्हणजे शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी सहजतेचा आवीर्भाव करणे. जिथे आपण नक्की अडकू याची शंका येते तेथे हेरांसाठी हे तंत्र महत्त्वाचे ठरते. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अशी अनेक उदाहरणे आहेत. एक कसलेला हेर होता. त्याचे काम इतकेच होते, की ठराविक बागेतील बाकावर बसायचे. कुणी बघत नाही असे पाहून गुप्त कागदपत्रांची भेंडोळी तेथील कचराकुंडीत टाकायची आणि निघून जायचे. एके दिवशी तो असाच बाकावर जाऊन बसला आणि त्याच्या लक्षात आले, की बागेत येणार्‍या प्रत्येकावर गुप्त पोलिसांची नजर आहे. आपली कृती आपल्याला गोत्यात आणू शकेल, हे उमगल्यानंतर हा हेर सावध झाला. त्याने जवळ खेळणार्‍या एका लहान मुलाला बोलावले. त्याच्याशी बोलता बोलता एक कागदी खेळणे तयार केले आणि म्हणाला, ' हे तुझ्या आईला नेऊन दे.' ते मूल जरा लांब गेल्यावर हा त्याच्या मागोमाग ' अरे बाळा! जरा थांब' असे म्हणत गेला. आजूबाजूच्यांना काय होतंय हे समजण्यापूर्वीच हा हेर बागेच्या प्रवेशद्वारातून बाहेरच्या गर्दीत मिसळून नाहीसा झाला.

शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर छापा घातला तेव्हा हेच तंत्र वापरले होते. आपल्याच सवंगड्यांना मुसलमान सरदारांचे पोशाख देऊन पुढे ठेवले होते. पुण्याच्या प्रवेशद्वारावर मोगल पहारेकर्‍यांनी अडवले. त्यावर सोंगे घेतलेल्या मुसलमान घोडेस्वारांनी ही खानसाहेबांची गस्तीची फौज असल्याचे सांगितले. तरीही पहारेकरी दिवट्यांच्या प्रकाशात चेहरे निरखून पाहायला लागले. त्यांना संशय येण्याच्या आत काही तरी करणे गरजेचे होते. तेव्हा घोड्यावरील एका स्वाराने त्या पहारेकर्‍याच्या कानफाटात वाजवली आणि ओरडला, 'बदतमीज! खानसाब को नही पहचानता?' त्यावर तो पहारेकरी गांगरला आणि बाजूला झाला. मग महाराजांची तुकडी राजरोसपणे आत गेली. शिवाय जाताना दम देऊन गेली, 'नीट पहारा करा. चौकस राहा'

त्याशिवाय व्हेअर इगल्स डेअर हा सत्यघटनेवर आधारीत पिच्चर आहे असे म्हणतात.

आनंदी गोपाळ's picture

25 Nov 2011 - 3:08 pm | आनंदी गोपाळ

मग पुढे काय झालं शाहिस्ते खानाचं?
अन तुम्ही कुठे बसून पहात होता ही सिरियल? कोन्त्या च्यानेल वर?

(ष्टोर्‍या ऐकायला आवडणारा)
आनंदी गोपाळ

आता नावच हूकूमशहा आहे तर स्वतःच्या वीरोधात वीनोदच काय कोणतीही गोश्ट कशाला खपवून घेतील ? त्यांची वीचारसरणीच ही असते की आज वीनोद करातील.... उद्या अपमान.... नंतर वीरोधी कंपू तयार कराल.... आणी तेरवा आणखी काही(सत्ता ऊलथवाल)..... मूळात असे काही खपवायचे/खपवून घ्यायचे प्रकार घडू लागले तर हूकूमशाहीचा बट्याबोळ नाही का ऊडणार ? "Accidents don't happen to people who take accidents as a personal insult." असे मापूने सांगीतल्या प्रमाणे हुकुमशहां त्यांच्या वीरूध्द केलेल्या वीनोदापसून ते ऊठावापर्यंत सर्व गोश्टीना फार्फार बीचकून असतात.

बाकी वीनोद या वीशयावर एकदम माहीतीपूर्ण लेखन ....

प्रदीप's picture

26 Feb 2011 - 4:42 pm | प्रदीप

ह्या अनुषंगाने अलिकडेच आमच्या येथील दैनिकाच्या साप्ताहिक पुरवणीत विनोदांवरील एका लेखात दिलेले काही विनोद इथे उर्ढ्रुत करीत आहे.

ह्या लेखात अरेबिक जगतांत तेथील राजकारणी व हुकुमशहा ह्यांवरील विनोदाविषयी थोडी टिपण्णी केली आहे. लेखकाच्या निरीक्षणानुसार अरेबियात राजकारणी व हुकुमशहांवरून जे विनोद केले जातात त्यातील भर त्या हुकुमशहांच्या मूर्खपणावर तसेच त्यांच्या जीवनसाथीदारांच्या स्वैर जीवनपद्धतिवर असतो. त्याचा एक मासला दिला आहे:

पॅलेस्टाईनमधे एके रात्री गाझाच्या समुद्रकिनारी गस्त घालणार्‍या पोलिसास एक युगुल जरा जास्तच लगट करतांना आढळले. जवळ जावून तो त्यांची चौकशी करणार इतक्यात ते युगुल म्ह़णजे साक्षात अराफत व सुहा आहेत असे त्याच्या लक्षात आले. म्हणून तो माघारी वळणार इतक्यात अराफतांनी त्याला थांबवले "करच तू आमची चौकशी. अलिकडे मीच स्वच्छ कारभाराची हमी जनतेस दिली असल्याने आता सर्वांना एकच न्याय. तेव्हा आमची चौकशी होऊन जाऊ दे". पोलिसाने नाईलाजाने त्यांना जवळच्या फरासखान्यात नेले. रीतसर चौकशी होऊन त्यांना दंड ठोठावण्यात आले: अराफत ह्यांना १०० शेकेल तर सुहा हिला २०० शेकेल. "असे का?" अराफतांनी आश्चर्याने विचारले. 'तुमचा ह्या तर्‍हेचा पहिलाच गुन्हा होता, साहेब' पोलिस उत्तरला.

एका समूहाने दुसर्‍या समूहावर केलेले विनोद जगभर असतात, ह्याची अनेल उदाहारणे लेखात दिलेली आहेत. उदा. द. अमेरिकेत, विशेषतः उरुग्वेत अर्जेंटिनाच्या आत्मप्रौढी मिरवणार्‍या पुरुषांवरील विनोद, नॉर्वेत स्वीडिशांवर केलेले विनोद, ब्रिटनमधे इंग्लिश, आयरिश व स्कॉट्स ह्यांचे एकमेकांवर केलेले विनोद इत्यादी.

अशा विनोदांचे काही नमुने:

* एक नॉर्वेजियन, फारोय आयंडर व आईसलंडर अशा तिघांना देहदंडाची शिक्षा होते. तत्पूर्वी प्रत्येकास शेवटची इच्छा काय आहे, अशी विचारणा केली जाते. फारोई आंबट शार्क व सुके व्हेल मांस त्या तिघांना मिळावे अशी इच्छा व्यक्त करतो. आईसलंडरला त्याला किती वाईट तर्‍हेने वागवले गेले आहे, व त्याचा देश कसा महान आहे, ह्यावर एक जुन्या पठडीचे कवन रचण्याची मुभा हवी असते. मग येथे नॉर्वेजियनची पाळी. " हे असले खाद्य आम्हास दिले जाण्याच्या, व ह्या आईसलंडरची कविता वाचली जाण्याच्या अगोदर मला देहदंड देण्यात यावा" तो उत्तरतो.

*इंग्लिश लोकांतील विनोदात आयरीश आपल्या सरदारजींची भूमिका वठवतांना दिसतात:

एक इंग्लिश, एक आयरीश व एक स्कॉट असे तिघे एका बांधकामावर काम करीत असतात. जेवणाच्या वेळेस तिघे आपापल्या शिदोर्‍या सोडतात. इंग्लिश माणूस, जॉन, आपली शिदोरी उघडताच उद्वेगाने म्हणतो "छे, पुम्हा एकदा ट्यूना सँडविच! आज खाईन मी, पण अजून एकदा तेच खायची वेळ आली, तर मी आत्महत्याच करीन."

स्कॉटमन, जॅक त्याच्या शिदोरीतील कॉर्न बीफ सँडविच पाहून हेच उद्गार काढतो. आणि आयरीश पॅडी त्याच्या डब्यातील टर्की सँडविच पाहून असेच म्हणतो.

दुसर्‍या दिवशी जेवणाच्या वेळेत, त्या तिघांच्या डब्यातून नेमकी तीच सँडविचेस आल्याने, उद्वेगाने ते तिघेही अगोदर म्हटल्याप्रमाणे आत्महत्या करतात.

त्यांच्या सामूहिक अंत्ययात्रेच्या वेळी जॉनची इंग्लिश बायको रडत म्हणते, "जॉनने मला कधीही कल्पना दिली नाही त्याला ट्यूना सँडविचेस आवडत नाहीत, ते? त्याला जे काही आवडते ते करून घातले असते ना मी?' जॅकची पत्निही तेच दु:खाने आपल्या पतिबद्दल म्हणते. त्या दोघी पॅडीच्या पत्निकडे पाहू लागतात, तीही डोळे पुसत म्हणते " आश्चर्याची बाब ही की पॅडी नेहमी स्वतःच त्याचे सँडविच बनवायचा!"

* फ्रेंचांचे विनोद बेल्जियनांच्या बावळटपणावर असतात --

एका बेल्जियन माणसाने व्हेंडिंग यंत्रात एक नाणे टाकले, व एक कोकचा कॅन त्यातून बाहेर पडला. मग त्या बेल्जियनाने दुसरे नाणे टाकले, व अजून एक कोकचा कॅन बाहेर आला, मग तिसरा, चौथा... असे सुरूच राहिले. मागे उभ्या असलेल्या एका फ्रेंच माणसास शेवटी राहवेना, 'अच्छा, तुला कोक खूपच आवडतो तर?' त्याने विचारले. 'छे, छे, तसे काही नाही' बेल्जियन उत्तरला, ' अरे मी जिंकतो आहे, तेव्हा त्यात खीळ कशाला घाला?'

एका विनोदात प्रत्यक्ष सरदारजीही आले आहेतः

एका इंग्लिश, अमेरिकन व भारतीय सरदार अशा तिघांची एकदा 'लाय- डिटेक्टर' ने चांचणी घेतली जात होती.

'मला वाटते मी एका बैठकीत बीयरच्य वीस बाटल्या संपवू शकेन' असे इंग्लिश माणसाने म्हणताच डिटेक्टर खणखणू लागतो. 'बरे तर, वीस नाहीत, दहा तरी' इंग्लिश माणूस म्हणतो, व डिटेक्टर शांत होतो.

'मी एका बैठकीत १५ हँबरगर्स सहज फस्त करू शकेन' असे अमेरिकनाने म्हणण्याचा अवकाश, डिटेक्टर खणखणू लागतो. 'बरे तर, १५ नाहीत,' अमेरिकन शरमून म्हणतो ' पण ८ नक्कीच'. डिटेक्टर शांत होतो.

सरदाराने 'मला वाटते' असे म्हणताच डिटेक्टर खणखणू लागतो.

आणि मराठी व मेक्सिकन माणसांच्या वृत्तित किमान एक साधर्म्य असावे. कारण आपल्या मराठी खेकड्यांचा विनोद मेक्सिकेतही चालतो म्हणे!

आनंदी गोपाळ's picture

25 Nov 2011 - 3:13 pm | आनंदी गोपाळ

सरदाराने 'मला वाटते' असे म्हणताच डिटेक्टर खणखणू लागतो.

जम्या नै.
तो "आय थिंक" म्हणतो हो. विचार करतो म्हटल्यावर मशिन बोंबलते. नुसता वाटल्यावर नाही.

(आनंद वाटून घेणारा)
गोपाळ

श्रावण मोडक's picture

26 Feb 2011 - 4:54 pm | श्रावण मोडक

लेख आवडला. टीपेशी मात्र सहमत नाही.

तिमा's picture

26 Feb 2011 - 5:47 pm | तिमा

लेख आवडला. त्या अनुषंगाने आत्ताच्या राजकारणातील 'हुकुमशहा' व त्यांना विनोद आवडतात का नाही याची पण चर्चा हवी होती.

निवांत पोपट's picture

26 Feb 2011 - 8:00 pm | निवांत पोपट

हुकूमशाहीतून काही कारूण्य जन्माला येतं त्यातील हे पण एक. अर्थातच ह्याला विनोद म्हणवत नाही.
दोन ज्यू रस्त्याने चालत असताना त्यांना दोन नाझी समोरून येताना दिसतात.
पहिला ज्यू दुसय्रा ज्यूला म्हणतो “अरे ते बघ! नाझी येत आहेत.”
दुसरा ज्यू "अरे असू दे. शिवाय त्यांच्याकडे बंदुका नाहीत".
पहिला ज्यू..अरे पण ते दोघे आहेत आणि आपण दोघे एकटे आहोत.

चित्रा's picture

26 Feb 2011 - 7:55 pm | चित्रा

लेख उत्तम आहे. आवडला. पण अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा इतिहास, असा एक लेख जरूर यावा.
जॉन स्टुअर्ट आणि कोलबेर यांसारखे लोक घेऊन भारतात शो करण्याची इच्छा उत्तम आहे, पण ही कल्पना प्रत्यक्षात सफळ व्हायला वेळ लागेल तो देण्याची तयारी आहे काय, हा प्रश्न आहे. कोलबेर किंवा स्टुअर्ट हे अचानक तयार झाले नसावे. स्टुअर्टचा जन्म १९६२चा. यांचे शोज २००० सालाच्या आसपासचे. याआधी असे विनोद करण्याची आणि त्याबद्दल तुरूंगात न जाण्याची सोय अमेरिकेत होती का, ते शोधून काढायला लागेल.

बदल हवे हे मान्य आहे, बदल वेगाने हवे हेही मान्य आहे, पण तो वेग काय असावा, याची इच्छा/कल्पना वेगळी असणे ह्यामुळे काहीजण कॉन्जर्वेटिव ठरतात तर काही लिबरल. प्रत्येकजण आपलीच कल्पना सर्व समाजासाठी योग्य असे समजतो, याहून अधिक मोठा विनोद काय असेल?

आमचा जन्म... वगैरे वगैरे सालचा... आणि आताचं साल... फार फरक नाही हो! ;-)

कार्लिनचा दुवा याच करता दिला आणि माझ्या माहिती प्रमाणे ही परंपरा जॉन स्टुअर्टने नक्कीच सुरु केलेली नाही फक्त जॉन स्टुअर्ट "फक्त" पॉलीटिक्स बद्दल विनोद करणारा पहिला असावा. जॉन स्टुअर्टचा पहिला शो (जॉन स्टुअर्ट शो) बहुदा ९२ च्या आसपास सुरु झाला (तो चांगलाच गाजलाही होता), त्या आधीही जॉन ह्याच धर्तीवर "स्टँड-अप" करत होताच. त्याच्याही आधी, जॉनी कार्सन, स्टीव्ह अ‍ॅलन , एड सुलिव्हन होतेच. असो.

चित्रा's picture

27 Feb 2011 - 10:42 am | चित्रा

वयाची जाहिरात छान आहे :)
स्टँडअप कॉमेडीचे वय जुने आहे हेही खरे आहे. असे तुम्ही म्हणणार हे भविष्य आम्ही जाणले होतेच. म्हणून ही रांग -
(स्वत:साठी) जे बोलणे फायद्याचे असते तेवढे चालते. जे तसे नसते, ते चालत नाही.

उदा. एनपीआरच्या विल्यम्सचा जॉब जाणे http://www.msnbc.msn.com/id/40954239/ns/us_news-life/

हेलन थॉमस - पॅलेस्टाईनबद्दल कॉमेंट. http://www.youtube.com/watch?v=RQcQdWBqt14
तिचे उत्तर - http://www.youtube.com/watch?v=2M1Qo83CoGU&feature=related

(टीप - वरील दोन्ही भाष्यांबद्दल मला बरोबर/चूक काही बोलायचे नाही. फक्त पोलिटिकली करेक्टनेस हा कसा काहीजणांच्या फायद्यापुरता टांगला जातो, अभिव्यक्तीस्वातंत्र्याची स्वतंत्र अमेरिकेतही कशी गळचेपी होते हे दाखवून देण्याचा क्षीण प्रयत्न आहे).

>>अभिव्यक्तीस्वातंत्र्याची स्वतंत्र अमेरिकेतही कशी गळचेपी होते हे दाखवून देण्याचा क्षीण प्रयत्न आहे

होतच नाही असे आमचे म्हणणे नाहीच, पण असे झाल्यास ती उघडकीस-जनतेसमोर आणण्याचे काम करणारे स्टुअर्ट, कोलबेर यांसारख्या लोकांची गरज आहे इतकेच आम्ही म्हणालो.

>>वयाची जाहिरात छान आहे

आता जाहिरात करायचं वयंच आहे म्हणल्यावर! :-)

विकास's picture

27 Feb 2011 - 7:31 pm | विकास

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची अमेरिकत चाचणी करायची असेल तर सगळ्यात सोपी जागा म्हणजे,जेथे अभिव्यक्तीस्वातंत्र्याला सगळ्यात जास्त सक्रीय मान दिला जातो, ती अमेरिकन विद्यापिठे. स्वतःच्या अ‍ॅडव्हायजरवर विनोद करून बघा अथवा त्याच्या रिसर्च मधील चुका सांगा... फक्त त्या आधी स्वतःचा रेज्यूमे अपडेट करून अजून ३ चांगले रेफरन्सेस आहेत ना तेव्हढी खातरजमा करून घ्या. जस्ट टू बी ऑन सेफर साईड. ;)

अ‍ॅडवाईजर अमेरीकन असेल तर. आमचा नसल्याने आम्ही गिनीपिग होउ शकत नाही, क्षमस्व. ;-)

विकास's picture

27 Feb 2011 - 7:52 pm | विकास

अ‍ॅडवाईजर अमेरीकन असेल तर. आमचा नसल्याने आम्ही गिनीपिग होउ शकत नाही, क्षमस्व

अच्छा! म्हणजे अभिव्यक्तीस्वातंत्र्य जरी सर्वांना असले, तरी त्याचा वापर हा स्थलकालव्यक्तीसापेक्ष आणि सारासार विवेकबुद्धी (पक्षी: स्वतःचे बूड वाचवणे) पद्धतीने केला जातो. ;) पण जेथे मऊ लागते तेथे "मुस्कटदाबी होते" असे म्हणत कोपराने खणता येते असे म्हणायचे आहे का? :?

अहो मानसिकता हो. आता उदाहरणच जर द्यायचे झाले तर अमेरीकेतील पण मुळ भारतीय संपादक नेहमीच अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा कीती पुरस्कार करतील हा प्रश्नच आहे. ;-)

>>पण जेथे मऊ लागते तेथे "मुस्कटदाबी होते" असे म्हणत कोपराने खणता येते असे म्हणायचे आहे का? :?
छे छे. उलट कारण नसताना अ‍ॅडवायजरवर विनोद करायला गेलात तर अ‍ॅडवायजरला वाटेल की तुम्ही त्याला मउ समजत आहात. बाकी चुका सांगण्याचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य उपभोगुन झाले आहे (आणि पुढेही भोगु यात शंका नाही).

(ह. घ्या)

विकास's picture

27 Feb 2011 - 8:01 pm | विकास

अहो मानसिकता हो. आता उदाहरणच जर द्यायचे झाले तर अमेरीकेतील पण मुळ भारतीय संपादक नेहमीच अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा कीती पुरस्कार करतील हा प्रश्नच आहे.

त्याची देखील चाचणी करून पहा... जो पर्यंत अभिव्यक्तीस्वातंत्र्य दाखवण्यातील "मानसिकते" मधे "मान" सोडून "नुसतीच, "सिकता" (इंग्रजी मधली) नसले तो पर्यंत काही फरक पडेल असे वाटत नाही. :-)

अशीच काहीतरी कारणं देउन दमन केले जाते असेच लेखात म्हणले आहे असे वाटते. ;-)

हे तुमचे लेखातल्या मुलभुत प्रश्नाला उत्तर आहे का? ;-)

विकास's picture

27 Feb 2011 - 9:22 pm | विकास

हे तुमचे लेखातल्या मुलभुत प्रश्नाला उत्तर आहे का?

माझ्या मूळ प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे, नक्की हुकूमशहांना वावडे असते असे काही त्या लेखातील उदाहरणावरून स्पष्ट होत नाही, असे मला वाटले. किंबहूना मला वाटते प्राडॉं.नी दिलेल्या उदाहरणात क्रुश्चेव अथवा मी दिलेल्या उदाहरणातील बाळासाहेब (जे हुकूमशाहीचे समर्थक आहेत) हे दोघेही स्वतःवर विनोद केला तरी हसताना दिसतात.

त्यापुढे जाऊन असेही म्हणावेसे वाटते की नक्की हुकूमशहा कोणाला म्हणावे?

जो आपल्या देशात जन्माला आलेल्या, आपल्याच माणसांना स्वतःच्या मनमानीखाली वाटेल तसे वापरतो त्याला. आता अशा ठिकाणी स्वतंत्र व्यक्तीमत्वे स्वखुषीने आणि स्वत:च्या फायद्यासाठी जाऊन जर परत त्याच्या विरोधात ओरडायला लागली तर ते कसे काय बरोबर. (लोकशाही प्रस्थापनेच्या उदात्त हेतून जात असतील तर तो भाग थोडा वेगळा, पण मग दोन हात करायच्याच तयारीने जायला हवे.)

म्हणजे खालील उदाहरण बघा, केवळ कपोलकल्पित आणि सुभाषबाबूंचा अनादर अथवा हिटलरचे समर्थन असा त्यातून अर्थ घेऊ नये. तसेच मूळ लेखातील इतर डिसक्लेमर्स पण येथे लागू होतातच. :-) पण मुद्दा समजून सांगण्यासाठी इतकेच समजावे:

हिटलर हा हुकूमशहा होता हे वास्तव आहे. असं देखील समजूया की त्याला विनोदाशी वावडं होतं आणि बरोबर चूक जाऊंदेत, पण अगदी तसा नियम होता... तरी देखील (hypothetically:) सुभाषबाबू आपणहून जर्मनीत गेले, स्वतःला जे हवे ते घेण्यासाठी जर्मनीचा उपयोग होईल असे समजून गेले. आणि मग हिटलरशी एका भेटीत त्याच्या मिशीवर जोक करत फिदीफिदी हसले. म्हणून हिटलरने त्यांना शिक्षा केली. तर ते ओरडायला लागले की अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी झाली! मग हिटलर म्हणाला, "अरे पण मी तुम्हाला थोडेच म्हणालो होतो की कसेही करून नाझी जर्मनीत या म्हणून! येता ते येता, आमचा फायदा घेता ते घेता आणि वर आमची थट्टा केली म्हणून शिक्षा करायला लागलो तर अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी म्हणून गळे काढता! नका येऊ मग! हे बरं आहे, ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी! " तर मला सांगा त्यात हिटलरचे काय चुकले? ;)

पण या कपोलकल्पित गोष्टीत, सुभाषबाबूंनी मग अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी काय करायला हवे होते? तर इतर स्वतंत्र देशात जाऊन जर्मनीविरुद्ध आवाज उठवायला हवा अथवा ज्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या उद्देशासाठी जर्मनीचा उपयोग करण्यासाठी ते आले होते, त्यावर लक्ष देऊन, त्यांचे इतर नियम कसेही असले तरी तात्पुरते पाळून जर्मनांचा वापर करायचा. (आणि मला वाटते वास्तवात सुभाषबाबूंनी तसेच करायचे ध्येय ठेवले होते.) कारण जर्मनी हा काही त्यांचा देश नव्हता अथवा हिटलरने कसेही करा पण आमच्याकडे याच असा हट्ट धरला नव्हता... :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Feb 2011 - 9:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला. फक्त हुकुमशहांना विनोदाचे वावडे का असते ते नीटसे समजले नाही. उतरंडाच्या विरोधात समाजात विनोद दिसतो. जसे, गरीब श्रीमंतावर विनोद करतील. श्रीमंत त्याहीपेक्षा अधिक श्रीमंत असणार्‍यांवर विनोद करतील. राजावर प्रजा विनोद करेल. अधिक कामात व्यग्र असणा-यांवर रिकामटेकडे लोक विनोद करतील. शोषण करणार्‍याच्या विरोधात शोषक विनोद करतील. यातल्या एकाला कोणाला विनोदाचे वावडे आहे असे काही म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ मराठी कवितेत रविकिरण मंडळाच्या सदस्यांनी काव्याला प्रतिष्ठा देण्याच्या नादात हसे करुन घेतले. चहापान्याच्या निमित्ताने काव्यविस्तार, गायन,प्रचार, चिकित्सेच्या नादात नुसत्या कविता पाडण्याचे उद्योग सुरु केले. [काही कार्य उत्तम होते] वरील मंडळींच्या काव्य सुळसुळाटावर 'झेंडुची फुलां' च्या निमित्ताने विडंबनाची निर्मिती झाली. रविकिरण मंडळाच्या सदस्यांवर टीका करण्यासाठी विडंबने आणि विनोदाची नुसती लाट सुरु झाली होती. सांगायचा मुद्दा असा की, कोणी मोठा असलेला, आणि जरासा मिरवायला लागला, तोच तो पणा दिसू लागला की इतर त्यावर विनोदाच्या माध्यमातून तुटून पडायला लागतात. हुकुमशहाच काय, प्रसंगाचे भान सोडले तर विनोदाचे वावडे कोणालाच नसावे असे वाटते.

अमेरिकेचे अध्यक्ष मि. केनेडी यांनी क्रुश्चेव्हची एक विनोदी गोष्ट एकदा सांगितली. ते म्हणाले ''क्रुश्चेव्ह स्वतः विनोदी होता, पण त्यानेच आपल्याविरुद्ध घडलेली एक विनोदी गोष्ट मला सांगितली. एकदा क्रेमलिनच्या वाड्यात एक रशियन माणूस धावत धावत घुसला आणि ओरडू लागला की, क्रुश्चेव्ह मूर्ख आहे ! क्रुश्चेव्ह मूर्ख आहे ! तेव्हा त्याला तेवीस वर्षाची शिक्षा देण्यात आली. प्रेसिडेन्ट केनेडेंनी विचारले, '' तेवीस वर्षाची शिक्षा का म्हणून ? ''
तेव्हा क्रुश्चेव्ह मिश्किल चेहरा करुन म्हणाला '' कम्युनिष्ट पार्टीच्या सेक्रेटरीचा अपमान केल्याबद्दल तीन वर्षाची आणि एका महत्त्वाच्या सरकारी रहस्याचा गौप्यस्फोट केल्याबद्दल वीस वर्षाची मिळून तेवीस वर्षची शिक्षा होते'' '' थ्री फॉर इन्सल्टींग दी पार्टी सेक्रेटरी & ट्वेंटी फॉर रिव्हीलिंग ए स्टेट सिक्रेट..!'' [साभार : प्रतिभावंताचे विनोदी किस्से]

-दिलीप बिरुटे

प्रियाली's picture

27 Feb 2011 - 12:06 am | प्रियाली

मिसळपावावर मध्यंतरी सरपंचांनी संपादकांवर टीका करू नये असे सांगितल्याचे आठवते परंतु सदर लेखकाने

टीप: कोणत्याही मराठी/अमराठी संकेतस्थळावर घडलेल्या ताज्या/शिळ्या घटनांचा किंवा त्यांच्याशी संबंधित युनिक/डुप्लीकेट आय.डींचा या धाग्याशी सुतराम संबंध नाही. तशी शंका आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

अशी टीप दिल्याने त्या गोष्टीचा या लेखाशी काहीही संबंध नसावा हे खरेच. ;)

प्रत्येक समाजात काही क्षुद्र जीवांना सत्ताधार्‍यांविषयीचा आपला राग बाहेर काढण्यासाठी अशा विनोदांची गरज लागत असावी. अन्यथा, या रागाचे रुपांतर निराशेत, मनोस्वास्थ बिघडण्यात, कधीकधी साखर वाढणे, ब्लडप्रेशर वाढणे अशाप्रकारेही होऊ शकते.

चिंतातुर जंतू's picture

27 Feb 2011 - 1:23 am | चिंतातुर जंतू

प्रत्येक समाजात काही क्षुद्र जीवांना सत्ताधार्‍यांविषयीचा आपला राग बाहेर काढण्यासाठी अशा विनोदांची गरज लागत असावी. अन्यथा, या रागाचे रुपांतर निराशेत, मनोस्वास्थ बिघडण्यात, कधीकधी साखर वाढणे, ब्लडप्रेशर वाढणे अशाप्रकारेही होऊ शकते.

क्षूद्र लोक क्षूद्र असतातच, त्यामुळे त्यांना असे सर्व होणे ठीकच आहे. प्रश्न हा आहे की सत्ताधार्‍यांना अशा त्यांच्याविषयीच्या विनोदांमुळे निराशा/मनोस्वास्थ्य बिघाड/साखर-रक्तदाब वाढणे अशा गोष्टी का बरे होऊ लागतात? ते तर क्षूद्र नव्हेत?

प्रियाली's picture

27 Feb 2011 - 1:41 am | प्रियाली

क्षूद्र लोक क्षूद्र असतातच, त्यामुळे त्यांना असे सर्व होणे ठीकच आहे.

अगदी! अगदी!! याच्याशी सहमती आहेच.

प्रश्न हा आहे की सत्ताधार्‍यांना अशा त्यांच्याविषयीच्या विनोदांमुळे निराशा/मनोस्वास्थ्य बिघाड/साखर-रक्तदाब वाढणे अशा गोष्टी का बरे होऊ लागतात? ते तर क्षूद्र नव्हेत?

सत्ताधार्‍यांना असे रोग झाल्याचे ऐकिवात नाही कारण रागाचे शमन करण्याची पावर/ ताकद त्यांच्या हातात असते. आपल्याकडे उदाहरणे असल्यास अवश्य द्यावीत. सत्ताधार्‍यांना राग येतो आणि फतवे काढले जातात हे मात्र ऐकले आहे.

हं! मिपावर संपादकांना त्रास होऊ नये म्हणून सरपंचांनी मध्यंतरी काही घोषणा केल्या होत्या हेही या प्रतिसादाच्या निमित्ताने आठवले.

>>आपल्याकडे उदाहरणे असल्यास अवश्य द्यावीत.

डोक्यावर वरवंटा फिरवताना होतो इतका त्रास झाल्याची कबुली आम्ही खुद्द मिपावरच वाचली आहे. ;-) बाकी तसे आम्ही मिपावर नविनच असल्याने हे उदाहरण ग्राह्य होईल की नाही हे आम्हास ठाऊक नाही!

>>रागाचे शमन करण्याची पावर/ ताकद त्यांच्या हातात असते

बाकी रागाचे शमन करण्याची ताकद असते की नाही कुणास ठाउक, ते कळणार तरी कसे बुवा? मात्र अनेक हुकुमशहा आमच्याकडे विरोधकांचे शमन-दमन करण्याची पावर आहे असे मात्र सारखे म्हणत असतात हे आम्हास अनुभवाने माहित आहे. ;-)

>>मिसळपावावर मध्यंतरी सरपंचांनी संपादकांवर टीका करू नये असे सांगितल्याचे आठवते परंतु सदर लेखकाने

चिं.जं., पहा बरे तुम्हाला उत्तर सापडले काय? विनोद आपल्यावरच आहे अश्या विचाराच्या उगमाचे उदाहरण वगैरे दिसले तुम्हाला ऑर इज इट जस्ट मी? ;-)

आता आहे आमच्यावर संक्रांत.

चिंतातुर जंतू's picture

27 Feb 2011 - 1:55 am | चिंतातुर जंतू

सत्ताधार्‍यांना असे रोग झाल्याचे ऐकिवात नाही कारण रागाचे शमन करण्याची पावर/ ताकद त्यांच्या हातात असते.

क्षुल्लक विनोदांचे दमन करावेसे वाटणे हेच रोगाचे एक लक्षण आहे. राजा-उंदीर-टोपी या गोष्टीमध्ये 'राजा भिकारी! माझी टोपी पळवली' किंवा 'राजा घाबरला! माझी टोपी दिली' असे म्हणणारा उंदीर हास्यास्पद ठरतो, की त्याची टोपी जप्त करणारा राजा हे तुमचे तुम्हीच ठरवा.

प्रियाली's picture

27 Feb 2011 - 2:59 am | प्रियाली

राजा-उंदीर-टोपी या गोष्टीमध्ये 'राजा भिकारी! माझी टोपी पळवली' किंवा 'राजा घाबरला! माझी टोपी दिली' असे म्हणणारा उंदीर हास्यास्पद ठरतो, की त्याची टोपी जप्त करणारा राजा हे तुमचे तुम्हीच ठरवा.

जेव्हा राजा किंवा प्रजा नवा विनोद निर्माण करते (उदा. केक नसेल तर भाकरी खा असा राज्यकर्त्यांकडून किंवा वर आलेल्यापैकी काही प्रजेकडून) तेव्हा ते क्षुल्लक आहेत त्यात काय एवढे रागवण्यासारखे, बंड करण्यासारखे किंवा फतवे काढण्यासारखे असे त्या त्या व्यक्तिला वाटत असते. असे अनेक क्षुल्लक लोक एकत्र जमून विनोद निर्मिती करतात किंवा अनेक क्षुल्लक विनोद एका ठिकाणी जमा होतात तेव्हा त्याला क्षुल्लक म्हणणे राजाला किंवा प्रजेला डोईजड होत असावे. विशेषतः आपण पांचट विनोद केला तरी तो विनोद हा आतापर्यंतचा सर्वात ग्रेट विनोद आहे असे त्या निर्मात्याला वाटू शकते आणि मग त्यावर निर्बंध लावला की त्रास होऊ शकतो.

राजा उंदराची गोष्ट ही बोधकथा आहे. त्यात सत्यांश असला तरी पूर्णतः सत्यकथा नव्हे. राजाने उंदराकडे लक्ष देऊ नये हे खरे असले तरी अनेक उंदिर एकत्र येऊन रोज राजाची फजिती करू लागणे किंवा एकच उंदिर रोज येऊन राजाची फजिती करू लागणे याची शक्यता नाकारता येत नाही. वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे पोलिटिकल करेक्टनेस ही काळाची गरज असू शकते.

इथे राजा आणि प्रजा सर्वच रोगी असले तर राहिले कोण? :(

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2011 - 4:22 am | राजेश घासकडवी

जेव्हा राजा किंवा प्रजा नवा विनोद निर्माण करते (उदा. केक नसेल तर भाकरी खा असा राज्यकर्त्यांकडून किंवा वर आलेल्यापैकी काही प्रजेकडून)

हा विनोद खरोखरच नवीन असावा, कारण मी ऐकला आहे तो 'भाकरी नसेल तर केक खा' या धर्तीचा होता.

इथे राजा आणि प्रजा सर्वच रोगी असले तर राहिले कोण?

इतकी नकारात्मक भूमिका बाळगू नये असं वाटतं. जगात काही लोक तरी चांगले आहेत यावर विश्वास ठेवा. चीअर अप.

प्रियाली's picture

27 Feb 2011 - 8:49 am | प्रियाली

'भाकरी नसेल तर केक खा' या धर्तीचा होता

भाकरी नसेल तर केक खा असेच हवे. माझ्या गडबडीत लिहून जाण्यात हे होतेच. यात नाविन्य नाहीच. ;) असं होतं कधीतरी. माणूस सुविधा दिलेली नसतानाही धन्यवाद मानून जातो. असो. सुधारणेबद्दल धन्यवाद.

इतकी नकारात्मक भूमिका बाळगू नये असं वाटतं. जगात काही लोक तरी चांगले आहेत यावर विश्वास ठेवा. चीअर अप.

ही माझी भूमिका नाही. वरील प्रतिसादांतून तसे सिद्ध झाल्याचे दिसते आहे. कल्जी नसावी.

राजेश घासकडवी's picture

27 Feb 2011 - 9:21 am | राजेश घासकडवी

माणूस सुविधा दिलेली नसतानाही धन्यवाद मानून जातो.

हा हा... अहो सुविधेचा उपभोग घेतल्यानंतर तृप्त मनाने यजमानाला दिलेला धन्यवाद आहे तो. खोटा कसा असेल? प्रत्यय पहायचा असल्यास तुम्हीही क्रिकेट विभागात थोडं लेखन करून पहा.

ही माझी भूमिका नाही.

नक्की ना? तुम्हाला नसलेली भुतं दिसतात म्हणून विचारलं. पण तुम्ही सांगितल्यावर दिलासा मिळाला. आता काळजी कसली?

प्रियाली's picture

27 Feb 2011 - 9:25 am | प्रियाली

प्रत्यय पहायचा असल्यास तुम्हीही क्रिकेट विभागात थोडं लेखन करून पहा.

प्रत्यय सर्वत्रच यायला हवा. फक्त क्रिकेटविभागात असून चालत नाही. योग्य शहानिशा न करता निष्कर्षावर येण्याची पद्धत विनोदी वाटते. ;)

तुम्हाला नसलेली भुतं दिसतात म्हणून विचारलं. पण तुम्ही सांगितल्यावर दिलासा मिळाला. आता काळजी कसली?

नसलेली भुतं नाही पण उगा उभी केलेली भुतं नक्कीच दिसतात पण तुम्हाला दिलासा मिळाला हे बरे झाले.

सत्ताधार्‍यांनी लेख फारस शिरीयसली घेतलेला दिसतोय.. अहो विनोदावर लेख आहे हो... ;-)

(पळतो आता.)

प्रियाली's picture

27 Feb 2011 - 9:01 am | प्रियाली

सत्ताधार्‍यांच्या लक्षात या लेखाचा अर्थ आलाच नव्हता. :)

टीपः मी सत्ताधारी नाही. गैरसमज नसावा.

Nile's picture

27 Feb 2011 - 11:34 am | Nile

>>सत्ताधार्‍यांच्या लक्षात या लेखाचा अर्थ आलाच नव्हता.

हे खरं मानावं तर तुम्ही सत्ताधारी आहात अशी कबुली दिसते.

>>टीपः मी सत्ताधारी नाही. गैरसमज नसावा.
पण मग हे खरं मानाव तर अजुन गडबड होते.

ज्ञानेश...'s picture

27 Feb 2011 - 9:12 am | ज्ञानेश...

बहुत बढिया लेख आणि प्रतिसाद. तबियत खुश झाली.
(वुडहाऊसला मीसुद्धा शोधत होतो लेखात.)

या वाक्याने सगळेच समजले. ;)

(म्हणजे पुढचा लेख वाचला नाही असे नव्हे. लेख वाचला. लेख आणि प्रतिक्रीयासुद्धा छान आहेत)

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची स्वतंत्र अमेरिकेतही कशी गळचेपी होते हे दाखवून देण्याचा क्षीण प्रयत्न आहे

हे होतं हे मान्यच आहे. याचं उदाहरण तर मूळ लेखातच दिलेलं आहे. पण अगदी राष्ट्राध्यक्षांविषयीची प्रच्छन्न टिंगल तिथे जाहीर करता येते. त्यामुळे शासनव्यवस्था दुर्बळ होते असं दिसत नाही. याउलट -

राजा उंदराची गोष्ट ही बोधकथा आहे. त्यात सत्यांश असला तरी पूर्णतः सत्यकथा नव्हे. राजाने उंदराकडे लक्ष देऊ नये हे खरे असले तरी अनेक उंदिर एकत्र येऊन रोज राजाची फजिती करू लागणे किंवा एकच उंदिर रोज येऊन राजाची फजिती करू लागणे याची शक्यता नाकारता येत नाही.

बोधकथा आहे हे बरोबरच आहे. नक्की कोणत्या गोष्टींमुळे शासनव्यवस्था दुर्बळ होते याविषयी सारासार विचार करून नक्की कशाचं दमन करायचं आणि कशाकडे क्षुल्लक मानून दुर्लक्ष करायचं याविषयी शासनकर्ते वेळोवेळी निर्णय घेत असतात. त्या निर्णयांवरून शासनकर्त्यांचा वास्तवावर कितपत ताबा आहे हे जनसामान्यांना दिसत असतं. किरकोळ गोष्टींचं दमन होऊ लागतं, तेव्हा शासनकर्त्यांचा वास्तवावर ताबा सुटत चाललेला आहे याचं ते एक निदर्शक लक्षण बनतं. राजा-उंदीर गोष्टीत हेच दिसतं. हा एक प्रकारचा पॅरानोईआ असतो. प्रत्येक क्षुल्लक गोष्टीत स्वतःच्या (किंवा स्वतःच्या सत्तेच्या) नाशाची बीजं दिसू लागणं हे म्हणून धोक्याचं ठरतं. 'शासनकर्त्यांचा पॅरानोईआ' याची इतिहासात पुष्कळ उदाहरणं दिसतात.

नरेशकुमार's picture

28 Feb 2011 - 5:14 am | नरेशकुमार

चिंतातुर जंतू's picture

28 Feb 2011 - 11:47 am | चिंतातुर जंतू

नक्की हुकूमशहांना वावडे असते असे काही त्या लेखातील उदाहरणावरून स्पष्ट होत नाही, असे मला वाटले. किंबहूना मला वाटते प्राडॉं.नी दिलेल्या उदाहरणात क्रुश्चेव अथवा मी दिलेल्या उदाहरणातील बाळासाहेब (जे हुकूमशाहीचे समर्थक आहेत) हे दोघेही स्वतःवर विनोद केला तरी हसताना दिसतात.

क्रुश्चेवच्या किश्श्याची सत्यासत्यता मला माहीत नाही, पण दिलेल्या उदाहरणांत हसणार्‍या व्यक्ती खाजगीत हसत आहेत ही कळीची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. कम्युनिस्ट शासनकर्त्यांबद्दलचे विनोद त्यांच्या कारकीर्दीत एखाद्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ शकत नव्हते. खाजगी अवकाश आणि सार्वजनिक अवकाश यांत मोठा फरक आहे.

इतकंच काय, कम्युनिस्ट राजवटीत तुमचा जोडीदार किंवा पालक/पाल्य अशी एखादी तुमच्या जवळची व्यक्ती खबर्‍या असू शकत असे. त्यामुळे अगदी खाजगी अवकाशही संकुचित होता. उद्या जर तुमचे व्य.नि. कुणी वाचत आहे आणि त्यांतल्या शासनकर्त्यांविषयीच्या टिप्पणीवरून तुमचं खातं उडवलं जाऊ शकतं अशी परिस्थिती आली तर कसं वाटेल? तसंच काहीसं हे आहे.

लेखातला या विषयीचा मजकूर खाली पुन्हा दिलेला आहे:

त्यांच्या गैरसोयीचे विनोद एका छोट्याशा खाजगी अवकाशापुरते मर्यादित कसे राहतील आणि तो अवकाश अधिकाधिक संकुचित कसा होईल, याची काळजी ते घेत रहातात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Feb 2011 - 12:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माहितीपूर्ण लेख विचार करण्यास प्रवृत्त करणारा असा आहे. काही मतं संपूर्णपणे पटलीच असं नाही, उदा: विनोदामधे सत्तापालट करण्याची शक्ती नसते.
विनोद हे एक प्रकारे स्वतःला व्यक्त करणं आहे. विचार विनोदी पद्धतीनेही मांडले जाऊ शकतात आणि विचार बदल घडवून आणण्यात कारणीभूत होऊ शकतात. एखाद्याची चूक दाखवताना योग्य तरीही विनोदी पद्धतीने मांडली तर ती चूक मान्य करणं सोपं जातं, होऊ शकतं. अर्थात कम्युनिस्ट राजवटींना हे कितपत लागू पडेल याबद्दल मला शंका आहे. स्वतःवर विनोदी पद्धतीने भाष्य करून दुसर्‍याची चुक हसताहसता दाखवता येते.

पंगा's picture

28 Feb 2011 - 12:47 pm | पंगा

काही मतं संपूर्णपणे पटलीच असं नाही, उदा: विनोदामधे सत्तापालट करण्याची शक्ती नसते.

याबद्दल काही विवेचन करू शकाल काय?

काही उदाहरणे वगैरे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Mar 2011 - 2:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण विनोद हे एक प्रकारचं वक्तव्य, अभिव्यक्ती आहे. एखादा विचार गंभीरपणे मांडता येतो तसाच विनोदी पद्धतीनेही मांडता येतो. एखादी गोष्ट आवडत नाही* हे सांगण्यासाठी गंभीर निबंध लिहीता येतो नाहीतर त्या गोष्टीचं विडंबनही करता येतं. माझा मुद्दा(/आक्षेप) असा की लिखाण, अभिव्यक्तीमधून जर (सत्तापालटाची) शक्ती असेल तर विनोदामधे ती नसते हे पटत नाही.

*उदा: पूर्वी मिपावरच्या खादाडीत ज्या प्रकारची चित्रं दिसायची.

पंगा's picture

1 Mar 2011 - 11:16 pm | पंगा

एखादी गोष्ट आवडत नाही* हे सांगण्यासाठी गंभीर निबंध लिहीता येतो नाहीतर त्या गोष्टीचं विडंबनही करता येतं. माझा मुद्दा(/आक्षेप) असा की लिखाण, अभिव्यक्तीमधून जर (सत्तापालटाची) शक्ती असेल तर विनोदामधे ती नसते हे पटत नाही.

*उदा: पूर्वी मिपावरच्या खादाडीत ज्या प्रकारची चित्रं दिसायची.

मतपरिवर्तन... कदाचित. पण सत्तापालट?

"Imitation, though often not the sincerest form of flattery, is certainly the cheapest." © 2011.

चिंतातुर जंतू's picture

1 Mar 2011 - 5:58 pm | चिंतातुर जंतू

माझा मुद्दा(/आक्षेप) असा की लिखाण, अभिव्यक्तीमधून जर (सत्तापालटाची) शक्ती असेल तर विनोदामधे ती नसते हे पटत नाही.

मुळात अभिव्यक्ती आणि प्रत्यक्ष कृती यांमध्ये मूलभूत फरक आहे आणि तो अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मर्यादेविषयी कळीचा मुद्दा ठरतो. एखाद्याला थोबाडीत मारणं आणि त्याच्याविषयी अद्वातद्वा बोलणं यांत फरक केला जातो. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांविषयी विनोद करणं कायदेशीर असेल, पण त्याला थोबाडीत मारणं किंवा त्याच्या खुनाची धमकी देणं मात्र तसं ठरणार नाही. विनोद, खुनाची धमकी आणि थोबाडीत मारणं या उतरंडीत विनोद सगळ्यात मवाळ ठरेल असं वाटतं.

अवांतरः अगदी स्वामित्वहक्क कायद्यांमध्येही स्वामित्वहक्क असणार्‍या एखाद्या कृतीचा पॅरडीसाठीचा वापर (उद्धृत करणं वगैरे) मान्य होऊ शकतो.

आता मूळ लेखातल्या हुकुमशाहीच्या विशिष्ट मुद्द्याकडे वळायचं म्हटलं तर असं सांगता येईल, की कम्युनिस्ट देश असोत किंवा अगदी आताची इजिप्तमधली परिस्थिती असो, निव्वळ विनोदानं (किंवा अभिव्यक्तीनं देखील) सत्ताबदल होत नाही. त्यासाठी लोक रस्त्यावर उतरणं, मोर्चे, धरणं, संप अशा अहिंसक कृती किंवा हिंसक क्रांतिकारी कारवाया अशा सरकारविरोधी कृतींची गरज भासते. म्हणून विनोद आपोआप सत्ताबदल करत नाही. या बाबतीत अभिव्यक्ती आणि विनोद दोन्ही अपुरे मानता येतील.

विनोदावरचं एक चांगलं वैचारीक म्हणून वाचायला मिळालं म्हणून लेख वरती काढतोय

राजेश घासकडवी's picture

30 Aug 2011 - 8:44 pm | राजेश घासकडवी

सहा महिन्यांपूर्वी हा लेख वाचलेला होता. तेव्हाही आवडला होता, आणि पुनर्वाचनातही तितकाच आवडला.

हा लेख म्हणजे वैचारिक लेखन कसं करावं याचा आदर्श नमुना आहे. नवीन लेखकांना मार्गदर्शनाविषयी चर्चा चालू आहे. त्यातल्या मुद्द्यांत भर घालून, ज्यांना आपलं लेखन सुधारायचं असेल त्यांनी अशा आदर्शांचा अभ्यास करावा असं सुचवतो.

अत्रुप्त आत्मा's picture

31 Aug 2011 - 12:49 am | अत्रुप्त आत्मा

आचार्य अत्र्यांनी विनोदानेच विरोधकांची काय भयंकर हालत केली होती याची साक्ष मिळण्यासाठी त्यांची पुस्तकेच पुरेशी आहेत... उदा- हशा आणी टाळ्या, वाघनखं ...

साती's picture

31 Aug 2011 - 12:55 am | साती

लेख आणि अधलेमधले विनोद छान आहेत.

क्रेमर's picture

1 Sep 2011 - 4:05 am | क्रेमर

'सॅटॅनिक व्हर्सेस' मधला कवी बाल आठवला. खरे तर सगळे पुस्तकच आठवले.

<<<हुकुमशहांना विनोदाचं वावडं का असतं?
काय सांगता!!
बाळासाहेब ठाकरे तर मस्त विनोद करतात, व्यंगचित्रे काढतात आणि मिपाचे तात्या सुद्धा मला विनोद आवडणारेच वाटले. माझं आपलं निरीक्षण बाकी कै नै.

मन१'s picture

25 Nov 2011 - 12:09 pm | मन१

अजून एक बुकमार्क मिळाला.
तांत्रिक टीमला एक हात जोडून विनंती:-
मायबाप इथून पुधं जर तांत्रिक बदल करायचे असतील तर आधी पूर्व कल्पना द्यावी. लाख लाख उपकार होतील. आम्ही आमच्या आवडत्या लेखांच्या लिंका कुठे अजून साठवून ठेवू. फार फार वेळ जातो हो एक एक चांगला धागा शोधायला.

आपला उपकाराभिलाषी

धर्मराजमुटके's picture

9 Jan 2015 - 9:13 pm | धर्मराजमुटके

चांगला धागा. फ्रान्समधे घडलेल्या घटनेने परत या धाग्याची आठवण झाली म्हणून वर काढत आहे.

पिंपातला उंदीर's picture

9 Jan 2015 - 9:25 pm | पिंपातला उंदीर

माझा मिपा वर चा सगळ्यात आवडता धागा आहे हा.

काळा पहाड's picture

9 Jan 2015 - 11:27 pm | काळा पहाड

अतिरेकी मेले त्याचं वाईट वाटलं. कुठल्याही पोलिसाला या अतिरेक्यांना दररोज अगदी आराSSSमात टॉर्चर करण्यात जो आनंद मिळाला असता त्याला ते मुकले असं वाटतं.