माझी १ मैत्रिण गेली ३/४ वर्षे SFO ला रहात आहे. तिला थोडे दिवसांपूर्वि मुलगा झाला.(C-section) It is her first baby. तिची आई भारतातून गेली आहे महिन्याभरापूर्वि तिला मदत म्हणून.
New Born Mother साठी हा सगळा अनुभव खूप वेगळा असतो आणि आयुष्यात खूप उलथापालथ घडवून आणणारा असतो. त्या प्रसंगी अनुभवी लोकांच्या सल्ल्याची खूप गरज असते. अनुभवाचा खूप फायदा होतो.
भारतातले अनुभव आणि US मधले अनुभव खूप वेगळे असणार. (कारण तिथे स्वयंपाक, घरकाम, बाळाची आंघोळ यासाठी कामाची बाई मिळणे अवघड आणि महाग आहे. ) भारतापेक्षा खूप वेगळे वातावरण, जीवनमान, culture तिथे असल्याने माझ्या या मैत्रिणिला मी hardly काही मदत करू शकते.
म्हणून US स्थित मैत्रिणींना मी विनंती करते की शक्य असल्यास त्यांनी खालील बाबतीत त्यांचे अनुभव शेअर करावे किंवा काही सल्ला/टीप्स द्यावा.
१) मैत्रिणीला पोषक असा काय आहार तिने घ्यावा. या गोष्टी कुठे मिळतील.
२) रोजच्या कामातील वेळ वाचवण्याच्या काही टीप्स. (कारण तिच्या आईवर घरकाम आणि तिची काळजी घेणे याचा बराच लोड येत असेल.)
३) तुमच्या अनुभवावरून काही टीप्स/सल्ले.
प्रतिक्रिया
23 Feb 2011 - 1:06 pm | पाषाणभेद
महत्वाच्या टिप्स आहे. :
* जर त्या आई वेणी ठेवत असेल तर तिने बॉबकट ठेवावा. खुप वेळ वाचेल.
* बेबीला पाणी उकळून गार करून पाजावे. (आत्ता लगेच नाही. तो खातापिता झाला की.)
त्यांना आई झाल्याबद्दल शुभेच्छा!
23 Feb 2011 - 2:11 pm | कच्ची कैरी
मी भारतातच स्थित आहे पण मला माहित असलेल्या काही टिप्स खाली देत आहेत -
जास्तीत जास्त पालेभाज्या किन्वा पचायला हलके असेच अन्न खावे .
भाज्या पातळ रस्स्याच्या असाव्यात
मैद्याचे तसेच तळलेले पदार्थ खाउ नयेत ,बाळाला कुठल्याही घुटी किंवा मधाचे वैगरे चाटण देऊ नये त्याने इन्फेक्शन होऊ शकते .
बाजारात मिळणारे बाल आहाराचे तयार डबे वापरु नयेत
बाळाच्या डोळ्यात काजळ व काना-नाकात तेल घालु नये .
जन्मापासुन सहा महिन्यापर्यंत बाळाला आईच्या दूधाव्यतिरिक्त काहीही देउ नये अगदी पाणीसुद्धा तसेच स्तनपान करतांना बाळाशी गप्पा माराव्यात त्याचे गूणगान करावे त्यामुळे त्याला बौद्धीक व मानसिक चालना मिळेल.
काही औषध ही दूधावाटे बाळाच्या पोटात जाण्याची शक्यता असते तेव्हा आईने कुठलेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेउ नये अगदी पॅरासिटेमॉलही .
23 Feb 2011 - 2:21 pm | स्वैर परी
तसेच,
१. पालेभाज्यांमध्येही, मेथीची भाजी द्यावी.
२. बाळाला आजारपणात देण्यात येणारी औषधे देखील आईच्या दुधातुनच देण्यात यावी.
23 Feb 2011 - 8:13 pm | निवेदिता-ताई
पालेभाज्या जास्त खाव्यात, तसेच हलका सामिष आहार घ्यावा.
मुगडाळ-भात गुरगुटी खिचडी, पापड भाजुन, लिंबाचे गोड लोणचे, त्यावर भरपुर लोणकढ तूप असा आहार असावा. भाकरी करणे तिकडे शक्य आहे काय???असल्यास गरम भाकरी, त्यावर भर्पुर साजुक तुप, लसणाची अगदी कमी तिखट पण खोबरे जास्त अशि चटणी,पालेभाजी, किंवा हिंग, हळद, गूळ, मिठ घालून केलेले वरण असे घ्यावे.
अजुनही टिप्स देईनच.
23 Feb 2011 - 2:23 pm | गवि
व्हॉट टू एक्स्पेक्ट - द फर्स्ट ईअर नावाचे अप्रतिम पुस्तक आहे. त्यात जे हवे ते आणि जे कधी स्वप्नातही आले नसेल असे सर्व उत्कृष्ट माहितीरुपात मिळेल.
जरुर विकत घ्यावे. कोणालाच काही विचारायची गरज उरणार नाही. (अर्थातच सल्ला विचारणे / देणे हा जिव्हाळा म्हणून उरेलच, पण त्याची खरोखरची गरज उरणार नाही..)
याच पुस्तकाचा आधीचा भाग : व्हॉट टू एक्स्पेक्ट - व्हेन यू आर एक्स्पेक्टिंग..
आणि नंतरचा व्हॉट टू एक्स्पेक्ट - द टॉडलर ईअर्स..
हेही अत्यावश्यक संग्रही बाळगण्यासारखे आहेत. नुसत्या टिप्सचे कलेक्शन असं रुप नसून उपलब्ध असलेल्यांपैकी सर्वात काँप्रिहेन्सिव्ह मॅन्युअलच आहे म्हणा ना अगदी .. :) इमर्जन्सीत काय करावे / आजार, नेमके डॉक्टरकडे कधी न्यावे, व्हेन टू वरी / पोषण / वाढीचे लँडमार्क्स / कोणत्या कालखंडात बाळाचे काय काय चेक करावे.
या महिन्यात त्याने काय काय केलं पाहिजे ..त्याचं रडणं, झोप, इथपासून अचानक काही होऊ लागलं तर त्याची कारणं काय असतील, त्यावर उपाय काय हे सगळं सगळं.
कोणत्याही प्रसंगी हे पुस्तक म्हणजे जणू जितेजागते धीराचे माणूस ठरेल. मला आणि माझ्या पत्नीला त्याचा अविस्मरणीय अनुभव आहे.
23 Feb 2011 - 5:05 pm | स्वाती२
सहमत!
23 Feb 2011 - 2:28 pm | स्पा
गवि विंग्रजी न येणाऱ्या मातांनी काय करावे? ;)
23 Feb 2011 - 2:46 pm | गवि
तीन चार वर्षे SFO नामक ठिकाणी राहणार्या मैत्रिणीला इंग्रजी येत नसेल तर बालसंगोपनापेक्षाही प्राथमिक अशा अनेक दैनंदिन समस्या येऊ शकतील.
आणि ही सजेशन देणार्या माझे इंग्रजी इतके कच्चे आहे की SFO म्हणजे काय ते ही कळलेलं नाही. पण तरीही मी सल्ला दिला आहे की नाही..? :)
समझींग्ड क्या स्पावड्या ?
मूळ धागाकर्त्यासः पुस्तक जेन्युईनली उत्कृष्ट आहे. घेतले नसल्यास जरुर मिळवा आणि मैत्रिणीस भेट द्या.
इंग्रजीची समस्या आल्यास श्री. स्पा यांस मराठी तजुर्म्याची विनंती करा. ;)
लिंकः
http://www.flipkart.com/expect-first-year-heidi-murkoff-book-0743461568
23 Feb 2011 - 2:49 pm | स्पा
तीन चार वर्षे SFO नामक ठिकाणी राहणार्या मैत्रिणीला इंग्रजी येत नसेल तर बालसंगोपनापेक्षाही प्राथमिक अशा अनेक दैनंदिन समस्या येऊ शकतील.
अहो गवि, यांच्या बद्दल नाही..
इतर भारतीय माता, ज्यांना इंग्रजी विशेष येत नसेल, अश्यांसाठी म्हणत होतो मी ;)
समझींग्ड क्या स्पावड्या ?
समझींग्ड
इंग्रजीची समस्या आल्यास श्री. स्पा यांस मराठी तजुर्म्याची विनंती करा
हा हा हा हा हा :D
23 Feb 2011 - 4:23 pm | वपाडाव
मग हे शिवधनुष्य पेला की हो !!!
होउन जाउ दे !!
समझ के वळिंग्ड ??
23 Feb 2011 - 5:32 pm | चिरोटा
म्हणजे लेखमाला भाग १ ते १० नक्की येणार तर!
23 Feb 2011 - 6:05 pm | धमाल मुलगा
तेंच्यासाटी बालाजी तांबेनी गर्भसंस्कार पुस्तक काडलंय ना?
पाहिजे तर तू दुसरं पुस्तक काढ की!
- (लेटेष्ट माहितगार :D ) ध.
23 Feb 2011 - 9:40 pm | सखी
वरती कच्ची कैरी, निवेदिता ताईंनी दिलेल्या सुचनांशी सहमत आहे.
अजुन काही ठरविक माहीती हवी असेल तर खरड किंवा संदेश पाठवा.
आता माझ्याही दोन शंका. बाळंतिणीला कडधान्ये देणे चांगले का? माझ्या जवळच्या नातेवाईकांमध्ये ते रोज फक्त दुध-पो़ळी/भाकरी, दुध-भात, असेच तिला द्यायचे. याउलट माझ्या सा.सु. रोज एकतरी पालेभाजी, उसळ, कोशिंबीर जेवणात येइल असे बघायच्या. मला वाटते तसा सर्वांगीन आहार कधीही चांगला, पण खात्री नाही. तसेच कांदा पूर्ण व्यर्ज करावा का?
23 Feb 2011 - 11:16 pm | शाहरुख
>>तसेच इथे काही दुकानात खायचा डिंक मि़ळतो, मी इंग्रजी-गुजराथीत काय म्हणतात हे विचारुन सांगते.
edible gum असेच ऐकून आहे.
24 Feb 2011 - 2:29 am | चित्रा
सल्ला देणे अवघड आहे, पण प्रयत्न करते.
१. मैत्रिणीला पोषक असा काय आहार तिने घ्यावा. या गोष्टी कुठे मिळतील.
माझ्या मते पोषक आहार वेगळा काहीच नाही, जे आपण नेहमी पोषक समजतो तेच खायचे. फक्त पिष्टमय (बटाटे इ) पदार्थ कमी खावेत असे म्हणतात. इथे सगळ्या भाज्यांचे काप मिळतात, गाजर, ब्रॉकोली, किंवा सेलरी या सर्व भाज्या चिरलेल्याही मिळतात तेव्हा जास्त कष्ट करायला नकोत. (बाळाकडे लक्ष द्यायचे म्हणून वेळ जितका वाचवता येईल तेवढा वाचवावा). सूप घ्यावे, ते सोपे असते. पालक आणि मेथी या भाज्या इथे मिळतात. पालकाची पातळ भाजी, मेथीची वरण घालून दाट किंवा पातळ भाजी करायला सोपी असते.
इथे मेथीची भाजी सहज करता येते, शेपूची भाजी करता येते. शेपू नेहमीच्या दुकानातही मिळतो. मेथी इंडियन स्टोरमध्ये, हे तुमच्या मैत्रिणीला माहिती असेलच.
कधीतरी न्याहारीला मला हमस-पिटा आवडत असे. एकतर करायचे कष्ट नाहीत. बाकी मी सगळे पदार्थ खात होते.
२) रोजच्या कामातील वेळ वाचवण्याच्या काही टीप्स. (कारण तिच्या आईवर घरकाम आणि तिची काळजी घेणे याचा बराच लोड येत असेल.)
मुख्य म्हणजे कटकट करून घ्यायची नाही. लोक काय म्हणतात त्याकडे लक्ष द्यायचे नाही. तुम्हाला वाटले की बाळाला आणि आईला तेलाचे मालिश करायचे तर करा, पण लोक (अगदी जवळचे नातेवाईकही) म्हणाले म्हणून होत नसताना करू नका. आई अमेरिकेत पहिल्यानेच येत असली तर लाँड्री लावणे, स्वयंपाकघर, मायक्रोवेव्ह या सगळ्याची सवय असतेच असे नाही. त्यात गरज नसेल त्या कामांची भर नको. बाकी कपडे नवर्यालाही लाँड्री करून आणता येतील. एका दिवशी लिस्ट करून सगळी बाहेरची कामे करावीत.
बाळे रात्री उठतात, सर्वांनी उठून काही फायदा नसतो. बाळाच्या आईला त्रास होतोच, पण सर्वांना एकाच वेळी तो होऊ नये. त्याऐवजी सकाळची कामे आजीने, दुपारची आईने आणि संध्याकाळची नवर्याने जमेल तेवढी वाटून घ्यावीत.
३) तुमच्या अनुभवावरून काही टीप्स/सल्ले.
प्रायॉरिटी ठरवाव्या. काय महत्त्वाचे आहे? बाळाची आई नोकरी करते का? का घरात असते? नसल्यास किंवा असल्यासही बाळाला माणसात असण्याची सवय लावावी, नंतर सोपे जाते. मुलांकडे लक्ष द्यावे, स्वतःची काळजी घ्यावी, कामाचे तास ठरवून घ्यावे (ही मला सोय नव्हती, पण हे अनुभवातून) आणि मस्त बाळाचे लहानपण एंजॉय करावे. परत हे दिवस येत नाहीत. तेव्हा काळज्या असल्या तरी त्या बाजूला ठेवा आणि मस्त सुखात रहा.
24 Feb 2011 - 8:09 am | रेवती
तब्येत सांभाळण्याच्या टिप्स तर चांगल्या आहेतच पण महत्वाचे म्हणजे बाळाचे तान्हेपण मनात साठवून ठेवणे (आणि क्यामेर्यातही). बाळाला तसं काही समजत नसताना आईला वासावरून ओळखतं, हसतं, एकटक पहात राहतं, झोपेत हसतं.......या आठवणी संपूर्ण आयुष्यभर पुरतात.
24 Feb 2011 - 11:07 am | Pearl
सर्वांना प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद :) अजून येउ द्यात. तेवढीच अजून माहितीत भर पडेल. धन्स अगेन.
तिला ही लिन्क पाठवून देइन.
मि.पा. वर कोणी आहे का S.F.O. ला रहाणारे. व्य. नि. करावा.