ब्लॅकबेरीचा राष्ट्रीय सुरक्षेसाठी मदत करण्याचा नकार ?

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
22 Feb 2011 - 3:13 pm
गाभा: 

णमस्कार्स ,

http://www.esakal.com/esakal/20100804/4795822777043890252.htm
आज ऑनलाईन बातम्या वाचताना ह्या बातमीवर नजर पडली .. ब्लॅकबेरी नामक कंपनी ने ब्लॅकबेरी थ्रु जाणार्‍या एसेमेस आणि इमेल्स वर पाळत ठेवण्याची गृहखात्याची मागणी धुडकावुन लावली आहे , ह्याचे आश्चर्य वाटले .
ह्यात नक्की काय खाचाखोचा आहेत , झोल आहेत हे जाणुन घेण्यासाठी हा काथ्याकुट आहे.
ब्लॅकबेरी म्हणते आमच्या कडुन ह्या प्रकारची माहिती उपलब्ध होऊ शकत नाही त्याला तांत्रिक अडचणी आहेत ( आणि हेच सर्वांत हस्यास्पद विधान आहे ) जर मेसेज इन्क्रिप्ट करता येतो तर तो डिक्रिप्ट करता येतोच येतो . त्याशिवाय समोरचा त्याला वाचुच शकणार नाही. इनक्रिप्षन च्या फँड्या नुसार , जर ब्लॅकबेरी ग्राहकाकडे प्रायव्हेट की असेल तर त्याची पब्लिक की ब्लॅकबेरी कडे आहे ह्यात तिळमात्र शंका घेण्यास जागा नाही.

एखादी परराष्ट्रीय कंपनी आपल्या सरकार ला असं शेंबड्या पोराला झटकावं तसं उत्तर कसं देऊ शकते ? राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाला एवढ्या सहजतेने घेता येऊ शकते काय ? न्युज चॅनल्स वर तरी ह्या बातमीचा अजुन गाजावाजा दिसत नाही.
जाणकार काही प्रकाश टाकु शकतील काय

प्रतिक्रिया

टारझनकडून असा काथ्याकुट पाहून आश्चर्य वाटले. :)

जाणकार आणि विचारवंतांची मते वाचण्यास उत्सुक !

नाना , धिस इज सिरियस इश्यु ऑफ णॅशणल षिक्युरिटी , अँड वी काण्ट अफॉर्ड टु टेक एणि चाण्स , डु वी ?
तेंव्हा ह्यावर काथ्याकुट करा , धागा कुणी काढला ह्याला काय अर्थ आहे ?
आजकाल सुका पण पाकिस्तान-अमेरिका न अनुबॉम्ब सोडुन क्रिकेट बिकेट वर लिहीतात , त्याचं तुला बरं नाही वाटलं हे आश्चर्य ?

अरे बाबा ! मी केवळ नाव पाहून धागा क्लिक करतो... तुझे नाव वाचले, केला क्लिक. बाकीच्यांशी कशाला तुझी तुलना करतोस? ऑ !!

आणि ते सिक्युरीटी काय असेल तर बिहारमधुन घे की मागवुन दोन चार सुभेदार गार्ड!! १२ तास ड्युटी करतात बोल !

नितिन थत्ते's picture

22 Feb 2011 - 3:24 pm | नितिन थत्ते

मागे कधीतरी अ‍ॅक्सेस द्या नाहीतर चालू लागा असे गृहखात्याने बजावले होते. नंतर मुदतवाढ दिली होती.

तांत्रिक अडचण असू शकेल हे पटत नाही. अ‍ॅक्सेस न देण्यामागे कॉर्पोरेट ग्राहकांचा (ज्यांना हल्ली India Inc. म्हटले जाते) दबाब असावा.

सरकारने ब्लॅकबेरीची सेवा बंद करायला हवी.

टारझन's picture

22 Feb 2011 - 3:30 pm | टारझन

पण ब्लॅकबेरी वाल्यांनी गृहखात्यात थोडेफार पैसे फेकले की गृहखातं मवाळ होणार नाही कशावरुन ? देशाच्या सुरक्षेचा असा बाजार बसलेला पाहु शकत नाही !

कल्पनाच करवत नाहीये ! असा जर टोटल सेक्युअर्ड चॅनल चुकीच्या लोकांनी वापरला तर .. ते पकडले जाणे तर सोडाच .. अजुन हिम्मत येऊन कारवाया वाढणार नाहीत का ?

थत्ते काकांनी वाचलेलीच बातमी मीही वाचली होती. खर तर त्यावेळी तर न्युज चा सुर असा होता की आता इथुन पुढे बी बी चा वापर बंद करावा लागणार.
अजुनही जर ते लोक अ‍ॅक्सेस देत नसतील तर खरच चायनान जे गुगल च केल ते आपणही करायला हरकत नसावी.
भारत अश्या कंपन्यान साठी 'सोन्याची खाण' समजली जाते , जरा कमरेत लाथ बसली तर लगेच येतील वठणीवर.
खरच इतक्या इनसेक्युअर वातावरणात हे लोक सेक्युरिटी साठी केलेल्या 'डिमांड' ला नाही कसे म्हणु शकतात. निव्वळ माज म्हणावा लागेल याला.

नितिन थत्ते's picture

23 Feb 2011 - 10:01 am | नितिन थत्ते

>>निव्वळ माज म्हणावा लागेल याला.

हो. आणि India Inc. ची फूस.

छोटा डॉन's picture

22 Feb 2011 - 3:27 pm | छोटा डॉन

>> न्युज चॅनल्स वर तरी ह्या बातमीचा अजुन गाजावाजा दिसत नाही.
ऑ ?
ओ ओ ओ, कुठे घुसताय ? काय पाहिजे ?
काय म्हणता ? देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची बातमी आहे ?
व्हा बाहेर, दिसत नाही का इथे लोक 'क्रिकेट मॅच' कव्हर करत आहेत, लै शाणे आले देशाची काळजी करणारे.
अरे, ह्याला आत कोणी सोडला रे ?
( हे क्रिकेट वर्ल्डकप है मेरी जान....)

अवांतर :
बहुतेक डेटा डिक्रिप्ट करण्याची सुविधा खरोखर 'सध्या' अस्तित्वात नाही.
ब्लॅकबेरीने मध्यंतरी ही सुविधा आणण्यासाठी २ वर्षे ची मुदत मागितल्याचे व ( बहुतेक ) भारतीय सरकारने ती दिल्याचे वाचले होते असे आठवते.
असो, जाणकारांच्या भाष्याच्या प्रतिक्षेत :)

- ( न्युज चॅनेलवाला) छोटा डॉन

टारझन's picture

22 Feb 2011 - 3:33 pm | टारझन

बहुतेक डेटा डिक्रिप्ट करण्याची सुविधा खरोखर 'सध्या' अस्तित्वात नाही.

बातमीतंच वाचल्या नुसार बाकी देशांत ती उपलब्ध आहे . आणि मला सांगा .. मी तुम्हाला मेल इन्क्रिप्ट करुन पाठवली .. आणि तुमच्या वरिल वाक्यात तथ्य आहे असे गृहीत धरले , तर तुम्ही ती मेल वाचणार कशी ? का ऑटोमॅटिक समजुन घेणार ? मुळात २ वर्षे मुदत दिलीच कशी ? जेंव्हा मार्केट मधे कंपनी एंटर करते तेंव्हा तिला ह्या नियमांची माहिती दिली जात नाही काय? काँट्रॅक्ट कसे साईन होतात ? !
कनफ्युजन वाढले !

छोटा डॉन's picture

22 Feb 2011 - 3:58 pm | छोटा डॉन

>> मला सांगा .. मी तुम्हाला मेल इन्क्रिप्ट करुन पाठवली .. आणि तुमच्या वरिल वाक्यात तथ्य आहे असे गृहीत धरले , तर तुम्ही ती मेल वाचणार कशी ?

सांगतो.
जेव्हा तुमची ई-मेल मला येईल तेव्हा ब्लॅकबेरी त्यासोबत एक 'डिक्रिप्शन की' पण पाठवेल, ती की वापरुन माझा ब्लॅकबेरी फोन तो ई-मेल मला वाचण्यायोग्य बनवेल व मी तो वाचेन.
अर्थात ही 'की' फक्त माझ्या मोबाईलसाठी बनवलेली असल्याने त्याचा वापर फक्त माझ्या एंडलाच होऊ शकतो व केवळ 'की'चा वापर झाला तरच ई-मेल वाचता येऊ शकतो.

आता समजा कुणी मध्येच ही ई-मेल इंटरसेप्ट केली तरी त्याच्याकडे येणारी 'की' ही त्याच्या डिवाईससाठी नसल्याने ती युसलेस ठरेल व त्या 'की' चा वापर न झाल्याने तो ई-मेल उघडता येणार नाही.

मेन मुद्दा असा आहे की संदेशाबरोबर येणारी 'डिक्रिप्शन की' ही त्या त्या संचासाठी बनवलेली असते व त्याचा वापर दुसरीकडे होऊ शकत नाही, मग कसे काय तुम्ही आम्हाला इंटरसेप्ट करणार बॉ ?

- छोटा डॉन

टारझन's picture

22 Feb 2011 - 4:07 pm | टारझन

ड्युड ... तुम्ही जीमेल वर सुद्धा हा मेल वाचु शकता .. ई मेल आहे ती :) कुठे ही कुठुनही वाचु शकता .. फक्त सेंडर ब्लॅकबेरी आहे .. :)

बघा आता ..

नितिन थत्ते's picture

22 Feb 2011 - 4:13 pm | नितिन थत्ते

आम्ही मेकॅणिकल असल्याने नक्की सांगता येत नाही. पण तुमचा हॅण्डसेट वारला तर नवीन सेटसाठी तुम्हाला परत की देणार ना? म्हणजे तुमची की ब्लॅकबेरीकडे कुठेतरी साठेवली आहे ना? ज्याच्या सेटची की पोलीस मागतील ती पोलिसांना देणे एवढेच ब्लॅकबेरीला करायचे आहे.

छोटा डॉन's picture

22 Feb 2011 - 4:22 pm | छोटा डॉन

अजुन सांगतो थोडेसे ..
नुस्ती 'की' अशीही हॅक करुन मिळवता येऊ शकते ( किंवा गुप्तचर संस्था ती इंटरसेप्ट करु शकतात ) अशी माहिती आहे, पण जोवर तिच्यासाठी करेक्ट डिवाईस मिळत नाही तोवर त्या 'की' चा काय उपयोग ?
ती तुम्ही डिक्रिप्ट करुन तो संदेश वाचु शकणार नाहीच.

१. बहुतेक सगळ्या हाय-एन्ड ( किंवा सगळ्याच ) ब्लॅकबेरी हँडसेटमध्ये ही 'डिक्रिप्शन टुल्स' बसवलेली असतात. शिवाय ही 'की' ही एन्ड युजर नंबर स्पेसिफिक असते, म्हणजे तो विशिष्ठ नंबर चालु असणार्‍या हँडसेटमध्येच ही 'की' चालत असावी असे वाटते, अधिक माहिती गोळा करतो. त्यामुळे जरी हँडसेट वारला तरी फरक पडणार नाही असे वाटते
( सीम फिशिंग वगैरे तत्वज्ञान ब्लॅकबेरीच्या सर्व्हरवर डोके आपटुन डोके चोळत परत निघुन जाते, म्हणुन तर ते मोस्ट सिक्युर्ड आहेत )

@ टारु :
अहो मालक, ते 'जी-मेल' साठी न्हाई. खास ब्लॅकबेरी सिक्युर्ड सर्व्हिसेस आहेत त्यांचे चालु आहे.
तुम्हाला काय वाटते की आपल्या कंपन्यांचे सीईओ, अजुन कोण अधिकारी, उद्योगपती वगैरे ब्लॅकबेरी वापरुन 'जी-मेल' वर मेलामेली करतात.
आपल्या कंपन्या त्यासाठी खास ब्लॅकबेरीकडुन 'सर्व्हिस विकत घेते' ह्या ई-मेल आणि डेटा ट्रान्सफरसाठी,कारण हे 'ई-मेल कम्युनिकेशन' अजिबात तिसर्‍या पार्टीला कळत नाही. ई-मेल बरोबर ब्लॅकबरी इतर शेअर्ड डेटाबेस पण पुरवते.

बाकी मला इतर जास्त माहिती नाही, जे शक्य आहे ते सांगेन

- छोटा डॉन

सॉरी .. चहापानासाठी मित्र मला ओढुन नेत होता त्यामुळे घाई घाईत प्रतिसाद दिला. ही माहिती नविन आहे माझ्या साठी.. मग जर हे फक्त ब्लॅकबेरी टु ब्लॅकबेरी असेल तर मग किती लोकं अ‍ॅबयुज करु शकतात ? बहुतेक हे लिमिटेड होईल. ब्लॅकबेरी वरुन दुसरीकडे मेल्स पाठवता येत नाहीत काय ?
आणि मेन म्हणजे हे सॉफ्टवेयर टोटली ब्लॅकबेरी नेच डेव्हलप केलेलं आहे तेंव्हा फक्त हँडसेट स्पेसिफीक बनवले असल्यास मधेच क्रॅक करता येणार नाही काय ? त्यांनाच ? चाह है तो राह है असे म्हणतात.

बाकी आपल्या प्रतिसादांमुळे खुप चांगली आणि नविन माहिती मीळाली , धन्यवाद

मग जर हे फक्त ब्लॅकबेरी टु ब्लॅकबेरी असेल तर मग किती लोकं अ‍ॅबयुज करु शकतात ?

मिसयुज करणारे जरी दोनच असले आणि ते आतंकवादी (भगवे/पांढरे/हिरवे कसेही) असले तर?
त्यामुळे किती हा मुद्दा उरतच नाही.
चीने नी जसा गुगलला, बुकलला होता तासचा BBलाही दणका देणेत यावा.
पण लाचार्/लाचखोर सरकार पुढे म्हणा की गाढवापुढे म्हणा गीता वाचुन काय उपेग?

चिरोटा's picture

22 Feb 2011 - 5:01 pm | चिरोटा

ब्लॅकबेरीवाल्यांना सरकारने ऑगस्टमध्ये "३/४ महिन्यांत सोल्युशन घेवून या' असे सांगितले होते. नंतर त्याचे काय झाले कळत नाही.
अमेरिकावाले ब्लॅकबेरी मिसयुज करणार्‍यांवर नजर कशी ठेवतात?

रमताराम's picture

22 Feb 2011 - 6:33 pm | रमताराम

अमेरिकावाले ब्लॅकबेरी मिसयुज करणार्‍यांवर नजर कशी ठेवतात?
कित्ती भाबडे हो तुम्ही. ते काय डिक्रिप्टर मागत बसणार होय.

अवांतर: एका कथेत कम्युनिस्टांबद्दल गंमतीशीर वाक्य वाचले होते. 'द कम्युनिस्ट पार्टी विल इम्पोज इट्स व्यूज इन डेमोक्रेटिक वे'. काळ बदलतो... इजम बदलतात... माणसे तीच असतात ना! ;)

चिरोटा's picture

22 Feb 2011 - 6:57 pm | चिरोटा

डिक्रिप्टर मागणार नाहीत ते माहित आहे पण मग अमेरिकेत लोक ब्लॅकबेरी लोक वापरतात ना? त्यांच्या डेटावर पोलिस यंत्रणा नजर कशी ठेवतात?NSA चा हे सगळे 'किडे' करण्यासाठी पूर्णवेळ स्टाफ आहे असे वाचले आहे.

रमताराम's picture

22 Feb 2011 - 7:35 pm | रमताराम

आम्ही हेच सुचवत होतो. वाटाघाटींच्या घोळात दुसर्‍याच कोणी फायदा उठवण्यापेक्षा स्वावलंबन हाच सुरक्षित मार्ग. डिक्रिप्टर मागण्यात वेळ घालवत नाहीत थेट क्रॅक मारतात. :)

चिरोटा's picture

22 Feb 2011 - 4:47 pm | चिरोटा

ही माहिती ब्लॅकबेरीच्या साईटवर सापडली-
The BlackBerry Enterprise Solution uses a symmetric key encryption algorithm to protect all data that the BlackBerry smartphone sends or receives, while the data is in transit between the BlackBerry smartphone and the BlackBerry Enterprise Server. This standard BlackBerry encryption, which is designed to provide strong security, verifies that a BlackBerry message remains protected in transit to the BlackBerry Enterprise Server while the message data is outside your organization's firewall

http://www.blackberry.com/btsc/search.do?cmd=displayKC&docType=kc&extern...
सरकार ब्लॅकबेरीकडून हे मेसेजेस decrypt कसे करायचे ते विचारतेय? पाठवलेला ईमेल हा encrypted असणार.

ह्म्म हे म्हणजे स्विस बँके सारख झाल की. ते सिक्युरिटीच्या नावा खाली इतर देशातला काळा पैसा साठवतात. आणि हे काळी(गुप्त) माहीती साठवतील, ज्याचा दुरुपयोग करणारी मंडळी लाभ उठवुशकतील.

रमताराम's picture

22 Feb 2011 - 7:36 pm | रमताराम

टारझनचे काय झाले हे.... अरे ही वेळ तुझ्यावर का आली रे? आणि इतरांच्या राखीव कुरणात घुसलास तर तुझे काम कोण करणार रे. ते काही नाही आमचा ष्ट्रांग णिषेद.

आमचे मतः ब्लॅकबेरीवर बंदी घातली तर आपल्या म्यानेजर लोकांचे - जे काही थोडेफार असेल ते - काम ठप्प होईल ना. मग देशाची प्रगती कशी होणार. तस्मात असले प्रश्न उपस्थित करणार टारझन प्रतिगामी आहे असे आमचे -नेहमीप्रमाणे -स्पष्ट मत आहे.

टारझन's picture

22 Feb 2011 - 8:16 pm | टारझन

ह्हा ह्हा ह्हा ... कधी कधी वाटतं .. एखादा आयडी आणिक असावा :(

नरेशकुमार's picture

23 Feb 2011 - 10:39 am | नरेशकुमार

मला दोनेक वर्शापुर्वि असंच वाटायचं पन......................

बिबि वरुन मिसळ्पावला डुआयडिने आल्यास कोणाला कळेल काय, ही फक्त एक शंका आहे, माझ्याकडे नाही बिबि आणि डुआय्डि.

विजुभाऊ's picture

23 Feb 2011 - 10:40 am | विजुभाऊ

हर्षद " व्ही बी " की बीबी नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला

विजुभाउ, व्हिबि नाही ओ बिबि ब्लॅकबेरी, आयला ते सगळं टायपायचा कंटाळा केला सकाळी सकाळी.

चीनी बनावटची वस्तु जसे आपण सर्व भारतीय विकत घेत नाही. भले त्या गेल्या कित्येक वर्ष दुकानात महीनोमहीने आयात होउन पडून आहेत. तसेच पाकीस्तानी बनावटीच्या साखर, कांदा इ. पदार्थांचा धिक्कार करतो, गोदामात सडू देतो.

त्याचप्रमाणे आपल्या देशप्रेमाचा पुरावा द्यायची संधी ब्लॅकबेरीने आपल्याला दिली आहे. टिळक्-सावरकर यांचे स्मरण करुन लडकीपूलावर टारझन यांच्या नेतृत्वाखाली तमाम पुणेकरांनी आपापल्या ब्लॅकबेरींची होळी करायचे ठरवले आहे. आधीक माहीती लवकरच.

महत्वाची सुचना:- ज्यांच्याकडे खरा ब्लॅकबेरी आहे केवळ त्यांनीच सामील व्हावे. तुमच्याकडचा ब्लॅकबेरी प्लॅस्टीक खेळण्यातला फोन आणू नये. धूर जास्त झाल्यास ५००/- रु दंड आकारला जाईल.

हुकूमावरुण

आरारारा =)) =)) =))

रमताराम's picture

23 Feb 2011 - 1:22 pm | रमताराम

लकडीपुलावर नको सहजराव. जवळच विदेशी कपड्यांची होळी केली होती सावरकरांनी, तिथेच या नव्या मन्वंतराची सुरवात करू या. कसं म्हन्ता?

अवांतरः फक्त पुणेकरांणी (इथे आलेला 'ण' हा केवळ या लढ्यासाठी टारझन यांचे नेतृत्व मान्य केल्याचा पुरावा आहे, रमताराम हा टारझन यांचा डुआयडी असल्याचा शोध लावून नाचत येऊ नये) आपल्या ब्लॅकबेरीची होळी करायचे ठरवले आहे हे अंमळ संकुचित प्रादेशिकतावादी वाटत नाही का? अजून तुम्ही पुरेसे कम्युनिस्ट झालेले दिसत नाही. जरा व्यापक विचार करा हो सहजराव.

पंगा's picture

24 Feb 2011 - 1:22 am | पंगा

(इथे आलेला 'ण' हा केवळ या लढ्यासाठी टारझन यांचे नेतृत्व मान्य केल्याचा पुरावा आहे, रमताराम हा टारझन यांचा डुआयडी असल्याचा शोध लावून नाचत येऊ नये)

हे विशेष आवडले! (योग्य डिक्रिप्शनअभावी काय होऊ शकते याची अंधुकशी कल्पना या उदाहरणातून येऊ लागते. थोडक्यात, हॅकिंग किंवा क्रॅकिंग हे वाटेल त्याने केल्यास निष्कर्षांच्या अचूकतेची हमी नसावी. (तेवढा या दोन संज्ञांमधील फरक कोणी समजावून सांगू शकेल काय?))

(अतिअवांतर: वरील प्रकार हा काहीसा वन वे एन्क्रिप्शनसदृश होत आहे काय?)

गुंडोपंत's picture

23 Feb 2011 - 10:54 am | गुंडोपंत

गंभीर क्रिप्टीक प्रश्न दिसतो आहे. आम्हाला काही त्यातले समजले नाही.
टाझनशेटनीच अजून तांत्रिक माहिती द्यावी.

नन्दादीप's picture

23 Feb 2011 - 11:27 am | नन्दादीप

प्रत्येक ब्लॅकबेरी ला एक PIN (PRIVATE IDENTIFICATION NUMBER) असतो. हा पिन वापरून आपण B.B. TO B.B. फ्री मेसेज पाठवू शकतो. आणि हे मेसेज कोणताही सर्विस प्रोव्हायडर रेकॉर्ड करू शकत नाही (त्यांच्या सर्वर ला नोंद होत नाही.) म्हणून सरकार चिडले आहे....दहशत्वादी असे sms पाठवून काहीही करू शकतात.
आणी ब्लॅकबेरी ने चिन सरकार ला वेगळा server टाकून ही सोय करून दिली आहे...म्हणून आपली अजून जळते आहे.....

कुंदन's picture

23 Feb 2011 - 11:38 am | कुंदन

समजा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे याबद्दल पुरेशी माहिती आधी मिळाली , तर आपण कशाच्या जोरावर तयारी करणार आहोत ? कालबाह्य झालेल्या जुनाट रायफलींच्या जोरावर ?

कुंदन्शेट भापो.
पण आगावु मिळालेल्या माहितिच्या आधारे अश्या अनेक दुर्घटना टाळता आल्या आहेत, दुर्दैवाने अशी प्रकरण मिडिया हँडल करत नाही आणि त्या बद्दल सर्वसामान्यांना माहिती कळत नाही.

जर चीनच्या मागणी नुसार त्यांना वेगळा सर्व्हर देउन ही सोय उपलब्ध होत असेल तर आपणही त्याचा पाठपुरावा केलाच पाहीजे. भारतासारखी मोठी बाजरपेठ गमवण BBच्या हिताच नाही. नाक दाबल की आपसुक तोंड उघडतय पाहा.

(जरी वरील बातमी खरी असो वा नसो)

शिल्पा ब's picture

23 Feb 2011 - 11:43 am | शिल्पा ब

भक्कम स्टँड घ्यायचा आणि त्यांना हाकलून लावले कि गपगुमान ताळ्यावर येतील....पण आपलं सरकार अन नोकरशहा पुळचट तिच्यायला!!!

नगरीनिरंजन's picture

23 Feb 2011 - 12:32 pm | नगरीनिरंजन

कै तरीच तै तुमचं. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे कोट्यवधी गरीब, मध्यमवर्गीय बाजारबुणग्यांची सुरक्षा थोडीच असते वो?
राष्ट्रीय सुरक्षा म्हनजे मोठमोठे उद्योगपती, नेते, राजे, संस्थानिक आणि त्यांचे हितसंबंध यांची सुरक्षा असते. कै बी जालं तरी बिझ्नेस गेला नै पायजे. मंग कुटून भक्कम स्टँड घेनार? तसंबी भक्कम स्टँड आजकाल सगले चायनामेड असत्यात.

रमताराम's picture

23 Feb 2011 - 1:35 pm | रमताराम

काही महिन्यापूर्वी आम्ही आमच्या गरीबबापडया देशातील आम्हा गरीबांची गरीबबापडी दुचाकी घेऊन चाललो होतो. मुख्य रस्त्यावरून एका गल्लीत वळण घेतले तर अचानक समोर एखादा पाण्याच्या टँकर गेल्यासारखी पाण्याची धार रस्त्याच्या मधून गेलेली दिसली. आम्ही अंमळ बेफिकीरीने त्यावरून गाडी नेली नि काय देवा रे... आमची गाडी मस्तपैकी घसरत गेली नि धराशायी झाली. जे पाणी वाटले होते ते ऑईल होते. आम्ही घसरलेले पाहून बाजूच्या वस्तीतील पोरे खदाखदा हसली. उठून गाडीचे नि आमचे काय काय बिनसले आहे ते बघत होतो तर अजून दोघे तिघे घसरले. आमच्या आधी घसरलेले एव्हाना चालते झाले होते. ती पोरेच काय पण जे घसरले होते त्यांनीही ऑईलवर माती टाकून वा काही एखादा अडथळा लावून इतरांना सूचना देण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. हे बघून आम्ही गाडी बाजूला लावून प्रथम रस्त्याच्या कडेला असलेली माती आणून तो ऑइलचा ओहोळ पूर्ण बुजवला. आम्ही हे करत असताना त्या पोरांनी आमच्यावर शिव्यांचा भडिमार केला. त्यांची करमणूक आम्ही बंद केली म्हणून.

येताजाता आपल्या देशातील व्यवस्थेवर टीका करणार्‍या वा तिची टवाळी करणार्‍यांना पाहिले की आम्हाला उगाचच त्या खदाखदा हसणार्‍या पोरांची आठवण होते.

नगरीनिरंजन's picture

23 Feb 2011 - 1:56 pm | नगरीनिरंजन

धन्यवाद! आम्ही तुम्हाला पडताना पाहिलं नाही तरी तुम्ही तपशीलवार वर्णन करून आमची करमणूक केलीत याबद्दल.
असे माती टाकणारे लोक असल्याने हे ब्लॅकबेरी पासून बेरीबेरी पर्यंतचे सगळे प्रॉब्लेम्स सुटणार याची खात्री असल्यानेच आम्ही निवांतपणे टवाळी करून स्वतःचे मनोरंजन करून घेतो. तुमचं चालू द्या. आमच्याकडे लक्ष देऊ नका. महासत्ता झाल्यावर आमच्यासारख्यांचा मुखभंग होणारचे. तोवर तरी हसून घेतो.

रमताराम's picture

23 Feb 2011 - 1:37 pm | रमताराम

प्रकाटाआ

गोगोल's picture

23 Feb 2011 - 1:57 pm | गोगोल

पराचा कावळा करण्यात काय अर्थ आहे?
एन्क्रिपशन डिक्रिपशन नक्की कस करतात आणि त्याचे अल्गोरिदम्स काय असतात आणि मूळ तत्वे काय आहेत ते समजल तर कुठ्ल्याही अतिरेक्यांना अशी प्रणाली प्रस्थपित करणे किती सोपे आहे ते सहज समजेल. एक ब्लॅक्बेरी ला बंदी घातली तरी अ‍ॅन्ड्रॉईड चे काय? फुकट प्रणाली डाऊनलोड करून अशा प्रणाली सहज प्रस्थापित करता येतात.
बर तर बर मग सेक्युर मेल च काय?

उगाचच खाबुगिरिसाठी बाबु लोकांनी काढलेली टूम आहे. सर्व सामान्य लोकांचा गोंधळ होणं साहजिक आहे पण जे लोक आयटी मध्ये काम करतात त्यांना सहज यातील फोलपणा कळेल.

ही एक प्रतिक्रिया वाचून हसावे का रडावे ते कळेना:

"मी स्वत: एक Computer Engineer असून Blackberry च्या म्हणण्याशी सहमत नाही... Blackberry च्या म्हणण्यानुसार जरी त्यांचे ग्राहक स्वत: encryption key तयार करीत असतील तरी ती कार्यप्रणाली तसेच त्याची आज्ञाप्रणाली (software) Blackberry ने स्वत: विकसित केले आहे. म्हणूनच encryption चा source code त्यांच्या कडेच असल्यामुळे ग्राहकांचा data decrypt करणे Blackberry ला अशक्य नक्कीच नाही "

हरे राम...

चिरोटा's picture

23 Feb 2011 - 3:34 pm | चिरोटा

मेलो.cryptography मलाही कळत नाही पण प्रतिसाद वाचून उडालो आणि दुपारची झोप गेली.

चिरोटा's picture

23 Feb 2011 - 3:46 pm | चिरोटा

..

चिरोटा's picture

23 Feb 2011 - 3:48 pm | चिरोटा

..

बस , आता कितीक वेळा मराल चिरोटा

मलाही हे पटले नाही. तांत्रिक अडचण नसावी. उगीच काहीतरी...
त्यांना भारतात बिझनेस करू देवू नये........म्हणजे तशी अट ठेवावी.

शाहरुख's picture

23 Feb 2011 - 11:36 pm | शाहरुख

>>जर मेसेज इन्क्रिप्ट करता येतो तर तो डिक्रिप्ट करता येतोच येतो

वन-वे-इन्क्रिप्शन असते हो मालक.साधारणपणे पासवर्ड या पद्धतीने डेटाबेसमधे साठवले जातात..शाळेत शिकलो होतो, विसरलो आता ! विकीवर असेल बघा.

ब्लॅकबेरी वापरत नाही...सदर विषयात फारसे लक्ष घातले नाही :D

पंगा's picture

24 Feb 2011 - 12:02 am | पंगा

एन्क्रिप्शनबद्दल जवळपास काहीच कळत नाही, पण...

पासवर्ड डेटाबेसमध्ये साठवण्यासाठी वन-वे एन्क्रिप्शन वापरता येते, हे ठीक. कारण तेथे तो पुन्हा डीक्रिप्ट करण्याची गरज नसते. फ्रंटेण्डला यूज़रने टंकलेल्या पासवर्डला एन्क्रिप्ट करून या दोन्ही (यूज़रने टंकलेल्या आणि डेटाबेसातल्या) एन्क्रिप्टेड पासवर्डांची तुलना करून काम भागते. (बहुतेक असे वन-वे एन्क्रिप्टेड पासवर्ड रिवर्स इंजिनियर करून डिक्रिप्ट करणेही शक्य नसावे. कारण अनेक वेगवेगळ्या पासवर्डांची एन्क्रिप्टेड व्हॅल्यू सारखी असणे तत्त्वतः शक्य असावे असे वाटते. खात्री नाही.)

पण मेसेज पाठवण्याच्या बाबतीत वन-वे एन्क्रिप्शनचा काय उपयोग?

बेसनलाडू's picture

24 Feb 2011 - 12:08 am | बेसनलाडू

एन्क्रिप्शन आणि हॅशिंग मध्ये शाहरूख साहेबांची गल्लत होते आहे असे वाटते :) डेटाबेस वगैरे मध्ये पासवर्ड साठवण्यासाठी जी 'वन-वे' पद्धत वापरली जाते, ते हॅशिंग्/सॉल्ट होय. एक प्रकारचे एन्क्रिप्शन असले, तरी एन्क्रिप्शन नव्हे! असो.
पंगांनी म्हटल्याप्रमाणे हॅशिंग रिवर्सिबल नसणे हेच अपेक्षित असते. तसेच अगदी मामुली फरक असलेल्या दोन भिन्न पासवर्ड्स चे हॅश खूपच वेगळे असणे अपेक्षित आहे. असा हॅशिंग कृतीक्रम उत्तम, विश्वासार्ह समजला जातो.
मेसेजच्या बाबतीत एन्क्रिप्शन असेल, तर डिक्रिप्शनही हवेच; तरच मेसेज 'वाचता' येईल. वन वे पद्धत उपयोगी नाही.
(जाणकार)बेसनलाडू

गोगोल's picture

24 Feb 2011 - 12:44 am | गोगोल

समजा मला दुसर्या एखाद्याला सुरक्षित मेसेज पाठवायचा असेल तर मी पब्लिक की क्रिप्टोग्राफी वापरून सरळ पब्लिक अँड प्राइवेट की जनरेट करीन आणि त्या माणसाला माझी पब्लिक की पाठवून देईन (दुसर्या एखाद्या चॅनेल वर, जसे की ईमेल). मग ब्लॅकबेरी/अ‍ॅन्ड्रॉईड वर सरळ एस एस एल अप्लिकेशन डाउनलोड करून त्याला मेसेजस पाठविन. ब्लॅकबेरी चा संबंध कुठे आला?

म्हणजे काय की उद्या सरकार नि जरी अशा किज मिळवल्या तरी अतिरेकी अगदी कमी कष्टात (आणि थोड्याशा तांत्रीक माहितीवर) त्यांची स्वत: ची अशी सिस्टम सहज उभी करू शकतात. कुणी म्हणेल की असे तांत्रीक माहिती अतिरेक्यांना कुठून मिळेल? अशा लोकांनी पुण्यातील कंप्यूटर इंजिनियर आणि याहू मध्ये उच्चतम पदावर कार्यरत असलेल्या पण अतिरेक्यांना सामील असलेल्या मुलाची कहाणी आठवून बघावी. त्यांना फक्त अशी प्रणाली सेटअप करून देणे आवश्यक आहे. जे की एखाद्या छोट्या टीम च काम आहे. त्यानंतर अशी अप्लिकेशन्स फुकटात डाउनलोड करता येतील किंवा अशी अप्लिकेशन असलेले फोन्स अतिरेक्यांना पुरवण्यात येतील. या सगळ्या सवंग प्रसिद्धी मुळे अतिरेक्यांच नसल तर आता ब्लॅकबेरी कडे लक्ष जाईल.

हे जे सगळ काही चालू आहे ते अतिरेक्यांपेक्षा नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी चालू आहे. अगदी अमेरिकेत ही हेच चालू आहे अतिरेकी अतिरेकी करून भलभलते सुरक्षेचे अ‍ॅक्ट पास करून घ्यायचा प्रयत्न. बर यांचे आदर्श कोण तर चीन, यु ए ई सारखे देश जिथे की मानवी हक्कांची पायमल्ली सर्रास होत आहे.

हे म्हणजे कस आहे की आम्हाला आमच्या देशाच्या नागरिकांची सुरक्षा तर करता येत नाहीच, पण प्रत्येकाच्या जीवनात काय चालू आहे त्यात मात्र नाक खूपसायला आवडेल. त्यासाठी आम्ही नागरिक ज्या गोष्टी ला खूप भितात त्याचा बागुलबुवा करून त्यांना घाबरवून सोडणार.

दुर्दैव अस की ज्या आय टी इंडस्ट्री बद्दल आपण अभिमान बाळगतो, त्यातील लोक पुढे होऊन काय चालल आहे ते लोकांना सांगत नाहीत. काही बिनडोक लोक (वरील ई सकाळ मधील प्रतिक्रिया वाला) आपल्याला नसेल त्या माहिती बद्दल छाती ठोकपणे माहिती देतो आणि कारण काय सांगतो तर मी एक कंप्यूटर इंजिनियर आहे. म्हणजे सामान्य लोकांची रिअ‍ॅक्शन काय तर हा कंप्यूटर इंजिनियर आहे म्हणजे बरोबरच असणार.

एकंदर काय की सरकार चा १९८४(ऑरवेल) मधील परिस्थिती चालू करायाच प्रयत्न आहे, ज्याना बोलायला पाहिजे ते शांत बसून आहेत, जे मूर्ख आहेत ते चुकीची माहिती पसरवत आहेत, लोक या अफवा ऐकून भावना भडकवून घेत आहेत, आणि कुणीच माहितीची शहानिशा करून घ्यायच्या भानगडीत पडत नाही.

गल्लत नाही हो..

मला टारझनजीला फक्त येव्हढेच सांगायचे होते की सरकार मागत असलेली गोष्ट वन-वे हॅशमधे घोळवलेली पण असु शकते.

बाकी, देशात काय चालले पाहिजे हे ठरवण्याचा हक्क सरकारचा आहे..कंपनीकडे, तांत्रिक बदल करायचा नसल्यास, सरकारला मॅनेज करणे किंवा गाशा गुंडाळणे हे दोनच मार्ग आहेत..अ‍ॅज सिंपल अ‍ॅज दॅट !

तुमचे क्रिप्टोलॉजीवरचे लेख रविवारची दुपारची झोप झाल्यावर वाचणार आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Feb 2011 - 2:14 am | निनाद मुक्काम प...

काही महिन्यांपूर्वी हि बातमी वाचली होती .व अखेर ब्लेकबेरीने नमते घेतले होते असे वाचले होते .आता परत त्यांनी आगाऊ पणा केला वाटते .
मुळात फार वाचलेल्या ह्या बातम्यांवरून मला हे प्रकरण जसे उमजले( भारतात व रिम मधील राड्याची माहिती ) ती सांगतो .
ह्याची मूळ कंपनी हि केनेडाची आहे रिम हे तिचे नाव .
.जगभरात तिची व नोकिया व अजून एक अमेरिकन मोबाईल कंपनी विंडोज फोन ७ ह्याच्यात बाजारपेठांसाठी स्पर्ध्ध आहे
.ह्यात ब्लेक बेरीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा कंपनीचा सर्वर हा केनेडा मध्ये आहे .त्यामुळे आशियायी खंडातील देशांना ह्या उपकरांतून पाठविल्या जाणार्या मेल्स डिकोड करता येत नाहीत .(अमेरिका व चीन व इतर प्रगत देश ) मध्ये मात्र ब्लेक्बेरीने सर्वर दिला आहे अशी एक आशंका होती
त्यावेळी
२६/ ११ नंतर देशातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला .देशात दहशतवादी /गुन्हेगार /व इतर समाजकंटक जसे हवाला किंवा बेटिंग वाले ह्यांचा ट्रेस लावणे भारतीय सरकारला जरुरीचे वाटले .

तिकडे आखतात त्याच दरम्यान यु ए इ मध्ये दुबईत मोसाद च्या काही हेरांनी फिल्मी पद्धतीने विविध युरोपियन देशाचे नागरिक असल्याचे पासपोर्ट दाखवून प्रवेश केला .तेथील पंचतारांकित हॉटेलात फिलीस्तानी नेत्याला त्याच्या खोलीत टोर्चार करून मग निर्घुण हत्या केली (आम्ही दाउद ला पाकिस्तानमध्ये जाण्या पर्यत वाट पहिली .)
तेव्हा ह्या घटनने अरब जगतात त्यांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाले .तर सौदी अरेबियामध्ये राजसत्तेच्या विरोधात अलकायदा प्रेमी धार्मिक गट नेहमीच उचापत्या करत असतात .त्यांना सुद्धा सुरक्षेसाठी ब्केक बेरीवर वेसण
घातली पाहिजे असे वाटले ,माझ्या मते भारतने ह्या दोन राष्ट्रासोबत मिळून रिम ला कचाट्यात पकडण्यासाठी मोठीम आखली .
प्रथम प्रसार्माध्यामान्द्वारे आपापल्या देशात वातावरण तापवले (मी अबू धाबीत असल्याने ह्या बातम्या इंग्रजी पेपरात नेहमीच अग्रक्रम राखून होत्या .) मग भारताने एकत्र भारतात सर्वर द्या नाहीतर तुमचा गाशा गुंडाला असा १ महिन्याच्या मुदत दिली .अखातातील देशांनी दबाव तंत्र म्हणून ह्यांच्या काही सेवा बंद केल्या मुख्यत्वे इंटरनेट
मग भारत हा अर्थकारण व बाजारपेठेत मोठा खेळाडू म्हणून त्याने रिम ला प्रथम शिंगावर ग्यायचे ठरविले .त्यातील एक खेळी म्हणून नोकिया व दुसर्या अमेरिकन मोबाईल कंपनीने आम्ही मात्र भारतात सर्वर उभारू असा साळसूद पवित्रा घेतला
.ह्या दरम्यान जागतिक रंगमंचावर अहून एक दबाव तंत्रांचे नाट्य घडले .भारताच्या लष्करी आणि आय बीच्या वरिष्ठ अधिकार्यांना केनेडा ने विसा नाकारला (कारण काश्मीर मध्ये मानवी हक्काची पायमल्ली होत आहे ) मनमोहन ह्यांच्या आगामी दौर्याच्या दृष्टीने सुरक्षेची पाहणी म्हणून हे अधिकारी जायचे होते .
भारताने लगेच केनेडला जर हे विसा नाकारले तर आम्ही केनेडियन लष्करी अधिकारी जे भारतामार्गे अफगानिस्तानला जातात त्यांचा विसा रद्द करू अशी धमकी दिली ( ह्या परीस्थित पाक जमिनीवरून जाणे म्हणजे त्यांना भलीमोठ्ठी बिदागी आणि अजून काय काय द्यावे लागले असते .) शेवटी त्यांच्या सरकारने जाहीर माफी मागितली . व प्रकरण मिटवले .
ह्यावरून भारत सरकारने साफ संकेत दिले कि हम अब झुकेंगे नही.( बाकी अमेरिकन उत्पादकांना मंदीच्या काळात भली मोठ्ठी बाजारपेठ मिळत होती व अमेरिकन बाजारपेठेत ब्लेक बेरीच्या मुसंडीला चोख उत्तर देता आले असते .अगदी ओबामा ह्यांनी प्रथमच वाईट हॉउस मध्ये गेल्यावर मी ब्लेक बेरी वापरणार त्याने मी माझ्या सहकार्यांशी संपर्कात राहू शकतो राहू शकतो अशी विधाने करून २००९ च्या सुमारास ह्या उत्पादनाची क्रेझ वाढवली होती .)

शेवटी महिन्याखेरीस ह्या कंपनीने नमते घेतल्याचे वृत्त होते.
मागे चीनने गुगलला असाच दणका दिला होता .
आम्ही वेळकाढू धीरान स्वीकारतो .एकप्रकारे
सर्वात सुरक्षित नेट वापरण्याचे माध्यम म्हणून ह्या उत्पादनाची एकप्रकारे जाहिरात करत आहोत जगभर ..

Nile's picture

24 Feb 2011 - 4:15 am | Nile

.

काही महिन्यांपूर्वी हि बातमी वाचली होती व अखेर ब्लॅकबेरीने नमते घेतले होते असे वाचले होते. आता परत त्यांनी आगाऊपणा केला वाटते. मुळात फार वाचलेल्या ह्या बातम्यांवरून मला हे प्रकरण जसे उमजले (भारतात व रिम मधील राड्याची माहिती) ती सांगतो.
ह्याची मूळ कंपनी ही कॅनडाची आहे, रिम हे तिचे नाव. जगभरात तिची, नोकिया व अजून एक अमेरिकन मोबाईल कंपनी विंडोज फोन ७ ह्यांच्यात बाजारपेठांसाठी स्पर्धा आहे. ह्यात ब्लॅकबेरीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा कंपनीचा सर्वर हा कॅनडामध्ये आहे. त्यामुळे आशियायी खंडातील देशांना ह्या उपकरणांतून पाठविल्या जाणार्‍या मेल्स डिकोड करता येत नाहीत. (अमेरिका, चीन व इतर प्रगत देश ) मध्ये मात्र ब्लॅकबेरीने सर्व्हर दिला आहे अशी एक शंका होती. त्यावेळी २६/ ११ नंतर देशातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. देशात दहशतवादी /गुन्हेगार / इतर समाजकंटक जसे हवाला किंवा बेटिंग वाले ह्यांचा ट्रेस लावणे भारतीय सरकारला जरुरीचे वाटले.

तिकडे आखतात त्याच दरम्यान यु ए इ मध्ये दुबईत मोसादच्या काही हेरांनी फिल्मी पद्धतीने विविध युरोपियन देशाचे नागरिक असल्याचे पासपोर्ट दाखवून प्रवेश केला. तेथील पंचतारांकित हॉटेलात पॅलेस्टीनी नेत्याला त्याच्या खोलीत टॉर्चर करून मग निर्घृण हत्या केली. (आम्ही दाउदला पाकिस्तानमध्ये जाण्यापर्यत वाट पहिली.) तेव्हा ह्या घटनने अरब जगतात त्यांच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाले. तर सौदी अरेबियामध्ये राजसत्तेच्या विरोधात अलकायदाप्रेमी धार्मिक गट नेहमीच उचापत्या करत असतात. त्यांना सुद्धा सुरक्षेसाठी ब्लॅकबेरीवर वेसण घातली पाहिजे असे वाटले. माझ्या मते भारताने ह्या दोन राष्ट्रासोबत मिळून रिमला कचाट्यात पकडण्यासाठी मोठीम आखली .
प्रथम प्रसारमाध्यामान्द्वारे आपापल्या देशात वातावरण तापवले (मी अबू धाबीत असल्याने ह्या बातम्या इंग्रजी पेपरात नेहमीच अग्रक्रम राखून होत्या.) मग भारताने एकत्र भारतात सर्व्हर द्या नाहीतर तुमचा गाशा गुंडाळा अशी १ महिन्याच्या मुदत दिली. आखातातील देशांनी दबाव तंत्र म्हणून ह्यांच्या काही सेवा बंद केल्या मुख्यत्वे इंटरनेट. मग भारत हा अर्थकारण व बाजारपेठेत मोठा खेळाडू म्हणून त्याने रिमला प्रथम शिंगावर घ्यायचे ठरविले. त्यातील एक खेळी म्हणून नोकिया व दुसर्‍या अमेरिकन मोबाईल कंपनीने आम्ही मात्र भारतात सर्व्हर उभारू असा साळसूद पवित्रा घेतला. ह्या दरम्यान जागतिक रंगमंचावर अजून एक दबावतंत्रांचे नाट्य घडले. भारताच्या लष्करी आणि आयबीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना कॅनडाने व्हिसा नाकारला (कारण काश्मीरमध्ये मानवी हक्काची पायमल्ली होत आहे.) मनमोहन ह्यांच्या आगामी दौर्‍याच्या दृष्टीने सुरक्षेची पाहणी म्हणून हे अधिकारी जायचे होते. भारताने लगेच कॅनडाला, जर हे विसा नाकारले तर आम्ही कनेडियन लष्करी अधिकारी जे भारतामार्गे अफगानिस्तानला जातात त्यांचा व्हीसा रद्द करू, अशी धमकी दिली. (ह्या परिस्थितीत पाक जमिनीवरून जाणे म्हणजे त्यांना भलीमोठ्ठी बिदागी आणि अजून काय काय द्यावे लागले असते.) शेवटी त्यांच्या सरकारने जाहीर माफी मागितली व प्रकरण मिटवले.
ह्यावरून भारत सरकारने साफ संकेत दिले कि "हम अब झुकेंगे नही". (बाकी अमेरिकन उत्पादकांना मंदीच्या काळात भली मोठ्ठी बाजारपेठ मिळत होती व अमेरिकन बाजारपेठेत ब्लॅकबेरीच्या मुसंडीला चोख उत्तर देता आले असते. अगदी ओबामा ह्यांनी प्रथमच व्हाईट हाऊस मध्ये गेल्यावर, मी ब्लॅकबेरी वापरणार त्याने मी माझ्या सहकार्‍यांशी संपर्कात राहू शकतो राहू शकतो, अशी विधाने करून २००९ च्या सुमारास ह्या उत्पादनाची क्रेझ वाढवली होती.)

शेवटी महिन्याखेरीस ह्या कंपनीने नमते घेतल्याचे वृत्त होते. मागे चीनने गुगलला असाच दणका दिला होता. आम्ही वेळकाढू धोरण स्वीकारतो. एकप्रकारे सर्वात सुरक्षित नेट वापरण्याचे माध्यम म्हणून ह्या उत्पादनाची एकप्रकारे जाहिरात करत आहोत जगभर...

सरकारी रिसोर्सांंची अशी उधळपट्टी पाहुन डोळे पाणावले!

सरकारी रिसोर्सांंची अशी उधळपट्टी पाहुन डोळे पाणावले!

ब्लॅकबेरी चे एकही सर्वर भारतात नाहीत , त्या मुळे ब्लॅकबेरी चा डाटा आपल्या गूवरमेंट ला मिळू सकत नाही .
अमेरिकेतील गुप्तचर शाखेकडे हे माहिती सहज उपलब्ध आहे, कारण ब्लॅकबेरी वल्यांचे सर्वर हे अमेरिकेत व कन्नडा मक्षिको या ठिकाणी आहेत,
भारतीय गूवरमेंट नि ब्लॅकबेरी सर्विस वर बंदी आणावी, हाच शेवटचा मार्ग .