(मला आलेल्या एका इ-पत्राचा मराठी अनुवाद)
* १०% आय.टी. कामगार हृदयविकार,मणक्याचे आजार,सांधेदुखी इ. ने त्रस्त असतात.
* २०% आय.टी. कामगार त्यांच्या सहकार्यान्शीच लग्न करतात.(च्या मायला)
* ३०% आय.टी. कामगार हे 'लिव इन रिलेशन' मध्ये राहण्यात उत्सुक असतात .कारण त्यांना ऑफिस आणि घर दोन्ही ठिकाणी जबाबदारी घ्यायला आवडत नाही. ;)
* ४०% आय.टी. कामगार हे गोंधळलेले असतात कि सेटल कुठे व्हावं.(भारतात कि भारताबाहेर ???)
* ५०% आय.टी. कामगारांची बँकेत काहीच बचत नसते. :(
* ६०% आय.टी. कामगार त्यांच्या चालू पगाराबद्दल नाखूष असतात.
* ७०% आय.टी. कामगार (जगभरातील) रोज ८ तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात.
* ८०% आय.टी. कामगार आपल्या पालकांजवळ राहत नाहीत.(खरं आहे)
* ९०% आय.टी. कामगार हे स्वत:चे जीवन,बायको,प्रोजेक्ट डेडलाईन,पगारवाढ,भत्ते,ऑनसाईट भेटी,कंपनी च्या ग्राहकांची खुशमस्करी, बढती,विसा स्टेटस,कमीटमेंट याबद्दल कधीच समाधानी नसतात.
* १००% आय.टी. कामगारांना आयुष्यात एकदा तरी असतं वाटतं कि आय.टी.सोडून इतर क्षेत्रात काम केलं असतं तर बरं झालं असतं.
....मिपाकरांना याबद्दल काय वाटते ?
(चित्र साभार - रोबर्टो मेंगोसी JerryMannel.com)
प्रतिक्रिया
15 Feb 2011 - 5:47 pm | आजानुकर्ण
८ तासांपेक्षा अधिक काळ कार्यालयात असतात हे ठीक. मात्र तेवढा वेळ काम करतात की नाही हा संशोधनाचा मुद्दा आहे.
16 Feb 2011 - 12:56 pm | मालोजीराव
तात्या आणि झुकरबर्ग ची शपथ घेऊन सांगतो कार्यालयीन वेळेत आम्ही मिपा आणि फेसबुकावर नसतो मालक ! ;)
16 Feb 2011 - 5:31 pm | आजानुकर्ण
मी मिपाचा उल्लेखही केला नव्हता.
15 Feb 2011 - 5:53 pm | मुलूखावेगळी
असं वाटणारे अजुन भेटलेच नाहीत मला.
15 Feb 2011 - 6:04 pm | असुर
मला आलेल्या एका इ-पत्राचा मराठी अनुवाद
त्यामुळे अजिबात सिरियसली घेतलेले नाही! तूर्तास 'अनुवाद चांगला जमलाय' इतुकेच म्हणेन!!
अधिक, ढकलपत्राच्या मूळ लेखकास आयटी कामगार व इतर असे वर्गीकरण का करावेसे वाटले असावे याबद्दल आपले मत जाणून घेण्यास उत्सुक. बहुतांश आयटी कामगार हे आधीच मानसिकदृष्ट्या पिचलेले असतात, त्यात असे त्यांना मुख्य प्रवाहातून वेगळे करणारे सर्व्हे पाहून वाईट्ट वाटले!
--असुर
15 Feb 2011 - 6:14 pm | sagarparadkar
असा:
"बहुतांश माहिती-तंत्रज्ञान्-बाह्य व्यावसायिक माहिती तंत्रज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञांबद्दल बरेचसे अनभिज्ञ, आणि किंचितसे मत्सरी असतात. म्हणून ते अर्धवट ज्ञानावर आधारित ई-पत्रे इतर समदु:खींना पाठवून माहिती तंत्रज्ञांची संभावना करण्याचा क्षीण प्रयत्न करतात"
हलकेच घ्यावे | सांगणे न लगे || :) :) :)
15 Feb 2011 - 6:21 pm | चिंतामणी
कॉलींग ध.मु.
कॉलींग ध.मु.
कॉलींग ध.मु.
कॉलींग ध.मु.
कॉलींग ध.मु.
कॉलींग ध.मु.
15 Feb 2011 - 6:28 pm | धमाल मुलगा
कसलं कॉलिंग....इथं आमचं पडलंय भुस्काट! १०% पासून ते ९०%पर्यंत सगळ्या चिंता जीव खाऊन भेडसावतायत इथे मला....ओ चिंतोपंत, नंतर कॉल करा हो..."इस रुट की सभी लाईनें अभी व्यस्त है, क्रिपया थोडी देऽर बाद कॉल करें" =)) =)) =))
19 Feb 2011 - 2:08 pm | रमताराम
हॅ स्साला. भाग गया.
बाकी शंभर टक्क्याचा हिशोब बरोबर आहे. आम्हाला असे नेहमीच वाटते. आणि आम्हाला वाटते म्हणजे ते १००% बरोबरच असते, वादाला जागाच नाही. ज्यांना पटत नाही त्यांना १००% टक्क्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे.
(माजी आयटीवाला) रमताराम
15 Feb 2011 - 6:35 pm | अविनाशकुलकर्णी
आय टी वाले आपणास कामगार का म्हणवतात?
कामगार तो जो मशीन च्या पुढे उभा राहून उत्पादन करतो..प्रत्यक्ष निर्माण करतो..व्हर्चुअल नाहि.....
त्यांना मिळणार्या सुविधा व सुरक्षा लाट न्याचा हा प्रयत्न तर नाही ना...
आय टी वाले सर्व्हिस सेक्टर मध्ये मोडतात ...
सर्व्हिस सेक्टर वाल्यांनी म्यानु फ्याकचार वाल्यांशी तुलना करू नये..
आपल्या चड्डित रहावे....
15 Feb 2011 - 7:56 pm | आत्मशून्य
खरे तर तीव्र असहमती दर्शवणार होतो पण वरील ओळ वाचली आणी आजपर्यंतचे संपूर्ण जगच हीकडचे तीकडे केलेत तूम्ही. मान्य आहे प्रोड्क्ट डेवलपमेंट असो अथवा सर्वीस अन मेंटेनंन्स. आय टी वाले म्यानूफॅक्चरींग मधे गणले जाऊच शकत नाहीत कारण कश्ट फक्त पहील्या सोर्सकोड साठीच असतात आणी डीलीवरीसूध्दा एकाच कोडची होते, तोच कोड दूसर्याला वीकायला पून्हा पून्हा म्यानूफॅक्चर नाही करावा लागत. कामाचा वैताग , कश्ट हे तर अकौंटंटपासून , सीइओ पर्यंत सर्वानाच असतात. पण ते अर्थातच कामगार ठरत नाहीत. मानलं साहेब तूम्हाला. यापूढे आय.टी हमाल/कामगार या संज्ञेचा/गैरसमजाचा तीव्र नीशेद नाँदवला जाइल.
17 Feb 2011 - 9:15 pm | क्लिंटन
कुलकर्णीसाहेब माफ करा. मला वाटते की काही "कट्टर इंजिनिअर" असतात त्यातले तुम्ही पण आहात का? कट्टर इंजिनिअर म्हणजे ज्यांना वाटते की मॅनुफॅक्चरिंग हेच खरे महत्वाचे काम आणि बाकीची कामे कमी महत्वाची.जरा पुढील गोष्टींची उत्तरे दिल्यास बरे होईल.
१. सेल्स आणि मार्केटिंग ही कामे कमी महत्वाची आहेत असे तुम्हाला वाटते का? मार्केटिंग हे तसे खूप मोठे क्षेत्र आहे.तरीही अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे मार्केटिंगमध्ये ग्राहकांच्या गरजा काय (needs) याचा अभ्यास करून त्या गरजा आपण कशा पूर्ण करू शकतो आणि त्या गरजा पूर्ण करायला आपण योग्य आहोत असे ग्राहकांना वाटावे (wants) यासाठी काय करता येईल हे बघितले जाते. योग्य मार्केटिंग नसेल तर ग्राहकांना नक्की कोणत्या गोष्टीची गरज आहे किंवा एखादे नवे प्रॉडक्ट लॉंच करायचे असेल तर ते बाजारात त्याला कितपत प्रतिसाद मिळेल या गोष्टींचा पत्ताच लागायचा नाही.मग नुसत्या मॅनुफॅक्चरिंगला काय महत्व आहे? तसेच योग्य सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन चॅनेल नसतील तर ग्राहकापर्यंत किफायतशीर किंमतीत आपण उत्पादन केलेल्या गोष्टी पोहोचवता येणार नाहीत. एक उदाहरण घेऊ या डिटर्जंट, टूथपेस्ट, साबण किंवा तत्सम दैनंदिन वापरातील गोष्टींचे.या गोष्टींचे उत्पादन केमिकल इंजिनिअर करतात हे अगदी १००% मान्य.पण ती गोष्ट कारखान्यातून आपल्या घराजवळच्या दुकानापर्यंत पोहोचवायला मोठी सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन साखळी असते.त्यातही विभाग पातळीवरील, जिल्हा-तालुका पातळीवरील डिस्ट्रीब्युटर हे पक्के बिझनेसवाले असतात.त्यांना चुचकारून, आंजारून-गोंजारून, त्यांना योग्य ते कमिशन देऊन ही साखळी कार्यरत ठेवावी लागते.तशी साखळी नसेल तर ग्राहकापर्यंत आपले उत्पादन पोहोचविण्यात अडचणी येऊ शकतात.तसे झाले तर नुसते मॅनुफॅक्चरिंग करून उपयोग काय?
२. अमेरिकेत इ-कॉमर्स खूपच पुढारलेले आहे.भारतातही ते मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहे.उदाहरणार्थ इन्फिबिम, फ्लिपकार्ट सारख्या संकेतस्थळावरून पुस्तके, कॅमेरे यासारख्या अनेक गोष्टी विकत घेता येतात.इन्फिबिम वरून तर अगदी प्रेशर कुकर, भांडीपण विकत घेता येतात.मी काही पुस्तके इन्फिबिमवरून विकत घेतली आहेत.अन्यथा जी पुस्तके मी राहतो त्या शहरात तरी मिळणे कठिणच होते ती पुस्तके मला एका माऊस क्लिकवर विकत घेता आली.आज अक्षरश: लाखो गोष्टी अशा माऊस क्लिकवर उपलब्ध होऊ शकतात आणि त्यामागे आय.टी बरोबरच लॉजिस्टिक मॅनेजमेन्ट महत्वाची आहेच.आणि त्या गोष्टीचे तुम्हा मॅनुफॅक्चरिंगवाल्यांना महत्व सांगायला नकोच.अशी संकेतस्थळे कसलेच उप्तादन करत नाहीत पण त्यांचे काम कमी महत्वाचे कसे?
३. बॅंका तरी नक्की कशाचे उत्पादन करतात?कसलेच नाही.म्हणून बॅंकांचे महत्व कमी आहे का?मी तर म्हणेन की बॅंकांसारखी organized यंत्रणा नसती तर बहुतांश मॅनुफॅक्चरिंग बिझनेस उभेच राहू शकले नसते.
४. शिक्षक तरी नक्की कसले उत्पादन करतात?ते काहीही उत्पादन करत नाहीत म्हणून शिक्षकांचे काम कमी महत्वाचे होते का?
५. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारेही नक्की कशाचे उत्पादन करतात?ते तर एक गोष्ट एका ठिकाणाहून दुसरीकडे नेतात.पण ते अशी एक गोष्ट एका ठिकाणाहून दुसरीकडे नेतात म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. मग त्यांचे काम कमी महत्वाचे होते का?
६. आज इंटरनेटमुळे अनेकविध कामे सोपी झाली आहेत.मुळात मिपासारखी संकेतस्थळे इंटरनेटशिवाय उभी राहिली नसती. बॅंकांचे व्यवहार, विम्याचे हप्ते भरणे, कर्जाचे हप्ते भरणे, बिले भरणे अशी अनेक कामे इंटरनेटवर घरबसल्या करता येतात.आता या सगळ्या गोष्टींमागे बॅक-एन्डला बरेच प्रोग्रॅमिंग करावे लागते.तेव्हा आय.टी वाले कसलेच उत्पादन करत नाहीत म्हणून त्यांचे काम कमी महत्वाचे कसे?
७. आज तुमच्या मॅनुफॅक्चरिंगमध्येही कॅड-कॅम, सी.एन.सी मशीन अशा गोष्टींमधून संगणकाचा मॅनुफॅक्चरिंगमध्ये उपयोग केला जात आहेच ना?पण संगणक प्रत्यक्ष कशाचेच उत्पादन करत नाही तेव्हा त्याच न्यायाने त्याच मॅनुफॅक्चरिंगमधील कॅड-कॅम, सी.एन.सी या गोष्टीपण कमी महत्वाच्या होतात का?
८. डॉक्टरांनीही कसले उत्पादन केल्याचे ऐकिवात नाही.मग म्हणून त्यांचेही काम कमी महत्वाचे होते का?
ही यादी अजूनही वाढवता येऊ शकेल.फायनान्स-सेल्स-मार्केटिंगवाले, आय.टीवाले,डॉक्टर, शिक्षक, ट्रान्सपोर्टवाले इत्यादी अनेक सर्व्हिस क्षेत्रातच कामे करतात.कट्टर इंजिनिअरांना वाटते की त्यांच्याशिवाय समाजाचे पानही हलणार नाही.ते योग्यही आहे.पण त्याचबरोबर अशा इतर अनेक सर्व्हिस क्षेत्रातील लोकांशिवाय त्यांचेही पान हलणार नाही या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष का?तसेच सर्व क्षेत्रातले लोक आपल्या कामासाठी योग्य तो पैसा घेऊनच काम करतात कोणावरही उपकार करत नाहीत हे जरी खरे असले तरी "सर्व्हिस सेक्टर वाल्यांनी म्यानु फ्याकचार वाल्यांशी तुलना करू नये..
आपल्या चड्डित रहावे..." असे म्हणायला योग्य तो आधार आहे असे वाटत नाही.
एकूणच समाजाला मॅनुफॅक्चरिंगची जशी गरज आहे त्याचप्रमाणे सर्व्हिस उद्योगांचीही.आपण आपल्या शरीरात हात जास्त महत्वाचा की पाय हा विचार करत नाही.सर्वच अवयवांचे महत्व आहे.आणि एका जरी अवयवाला दुखापत झाली तरी फार मोठी अडचण होऊ शकते हे आपल्याला पूर्ण माहित आहे.पण मग समाजात मॅनुफॅक्चरिंग जास्त महत्वाचे की सर्व्हिस उद्योग हा विचार आणि मुख्य म्हणजे "सर्व्हिसवाल्यांनी आपल्या चड्डित रहावे" यासारखे शब्द कुठून येतात? असो.
18 Feb 2011 - 12:43 pm | मालोजीराव
जोरदार हल्ला क्लिंटनराव ! आयटी सकट सगळ्यांचीच चड्डी सावरलीत
15 Feb 2011 - 6:37 pm | लॉरी टांगटूंगकर
१०% आय.टी. कामगार हृदयविकार,मणक्याचे आजार,सांधेदुखी इ. ने त्रस्त असतात.
म्हणजे ९० % हृदयविकार,मणक्याचे आजार,सांधेदुखी इ. ने त्रस्त नसतात .
२०% आय.टी. कामगार त्यांच्या सहकार्यान्शीच लग्न करतात.
प्रोब्लेम काय??मेकेनिकल इंडस्ट्रीमध्ये फिरकून बघा !!!
३०% आय.टी. कामगार हे 'लिव इन रिलेशन' मध्ये राहण्यात उत्सुक असतात .कारण त्यांना ऑफिस आणि घर दोन्ही ठिकाणी जबाबदारी घ्यायला आवडत नाही. –परत ७०% नसतात असेच !!!बाकी हि वैयक्तिक बाब आहे
५०% आय.टी. कामगारांची बँकेत काहीच बचत नसते.---अमान्य ;हान जर का शेअर्स मध्ये असली तर शक्य आहे
६०% आय.टी. कामगार त्यांच्या चालू पगाराबद्दल नाखूष असतात.
-कोणता माणूस आहे त्या पगारावर खुश असतो??
* १००% आय.टी. कामगारांना आयुष्यात एकदा तरी असतं वाटतं कि आय.टी.सोडून इतर क्षेत्रात काम केलं असतं तर बरं झालं असतं.-अमान्य
15 Feb 2011 - 7:54 pm | आत्मशून्य
माहीत नाही पण १००% एकदा का CMM level अ.ब.क. मानांकन असलेल्या कंपनीत जॉब परमनंट झाला की पोट मात्र सूटतेच सूटते. हा प्रकार आधी फक्त वीवाहीत झाल्यानंतर स्त्री, पूरूशांच्या बाबतीत व्हायाचा असे ऐकू रायलोय.
15 Feb 2011 - 8:23 pm | वाटाड्या...
धमुची अजुन वाट पहातोय....लेकाचा आपल्याच गल्लीतुन पळुन गेला....
आमचं बी २ आणं...
आम्हाला तरी लय वाटत उगाच आमचं इंजिनीयरींग सोडलं...च्यायला रोज रोज मशीन्सवर काम करुन तब्येत धडधाकट होती...आता पायलीला पन्नास त्रास होतात...मनातला त्रास सांगु...आय.टी.तला ओझ्याचा बैल झाल्यापासुन अपचनाचा त्रास सुरु झाला आणि त्यापाठोपाठ...सु.सां.न.ल. ;)
आयटीमधे ७०% लोक ८ तासांपेक्षा जास्त काम करतात असे दाखवतात..बाकीची हमाली(च) जास्त करतात..अगदी परदेशात सुद्धा..स्वाणुभवाने सांगतो मालक....
बाकीचे जवळजवळ सगळे मुद्दे वैयक्तिक आहेत सो नो कमेन्ट्स..
- आयट्या वाट्या..
आयटी हमाल पंचायतीचा विजय असो..विजय असो..विजय असो..
16 Feb 2011 - 10:02 am | पाषाणभेद
काहीही असो. मुद्दे बरेच महत्वाचे आहेत.
या साठी बर्याचशा कंपन्यांचे धोरणच जबाबदार आहे. न पेलवणारे टारगेट द्यायचे, न झेपवणारे काम करायला लावायचे असले प्रकार मॅनेजमेंट कडून होतात. बर्याचदा 'कामगारांना' तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागतो.
एक विचार बर्याचदा मनात आला होता. प्रसन्नदा शी या बाबतीत बोलणेही झाले होते.
तो असा:-
इतर क्षेत्रात कामगारांचे म्हणणे सरकार, व्यवस्थापन ऐकून घेते. आयटी बाबतीतच वेगळे नियम का? येथे सगळ्याच 'कामगारांना' अगदीच MNC सारखा पगार मिळतोच असे नाही. या विषयाचा उहापोह व्हावा.
16 Feb 2011 - 12:52 pm | मालोजीराव
अगदी सहमत, मंदीच्या काळात छोट्या कंपन्यांमध्ये २५००-३००० रु. पगारावर काम करणारे सुद्धा आय टी कामगार पाहिलेत.
कामगाराला कुठूनही कुठल्याही विभागात टाकणे...दोन विभागांचा तसा काहीही संबंध नसतो तरी सुद्धा (उदा. रिसोर्स कमी पडतात म्हणून जावा वाल्यांना डॉट नेट प्रोजेक्ट वर टाकणे इ.)
16 Feb 2011 - 10:33 am | स्पा
सुंदर चर्चा सुरु आहे...
आम्ही आयटी वाले नसल्याने प्रेक्षकांच्या भूमिकेत आहोत
कोणीतरी हे सांगाल काय कि "आय टि" म्हणजे नेमकं काय?
त्याचे ढोबळमानाने किती विभाग पडतात ?
नक्की कामकाज कसे चालते ?
नॉन आयटी वाल्या लोक्कांना फार आकर्षण असतं ब्वा, कि हे आयटी वाले नक्की करतात काय?
त्याची सुद्धा माहिती येउंद्यात
17 Feb 2011 - 12:07 pm | बाप्पा
कुठुन काढले हे %?
बाकी बोलायला सगळे विषय संपले की आयटी वाल्यांना शिव्या घालायच्या हे नेहमीचंच आहे. एकदा हॉट सीट वर बसुन पाहा म्हणजे कळेल काय असतं ते. कामचुकार आणी नाकर्ते लोक तर सगळ्याच क्षेत्रात असतात त्याला हे क्षेत्र कसं अपवाद असेन? निव्वळ कीबोर्ड बडवणे याला जर काम म्हणत असाल तर असं म्हणणाराची या विषयावर बोलण्याची कुवत नाही असं मी मानेन.
18 Feb 2011 - 12:46 pm | अविनाशकुलकर्णी
"कट्टर इंजिनिअर"
सर आपला काहितरी गैर समज झाला आहे....आम्हि कुणाच्याच कामाला कमी लेखत नाहि..पण कामगार म्हणजे जो म्यनुफ्यक्चरिंग करतो ..मशिन समोर उभे राहुन उत्पादन करतो..असे आमचे मत आहे.......
कारखान्यात सार्यांची गरज असते या वर दुमत नाहि..पण कामगार हा वर्ग निराळा आहे असे वाटते..
19 Feb 2011 - 11:57 am | अप्पा जोगळेकर
काहीतरी आदळ आपट करुन किंवा ओढून ताणून धागे काढून आपण माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहोत हे सांगण्याची जी रॅट रेस आहे ती पाहून अंमळ मौज वाटते.
- एक नोकरदार
21 Feb 2011 - 2:14 pm | मालोजीराव
न ओढता आणि न ताणता (???) :p हा धागा काढलेला आहे.

(संदर्भ-एका नामवंत कंपनीच्या स्वीय आंतरजालावरून )
बाकी आयटी वाल्यांचं लैच बेस असतंय बरका,काय टी सूटबूट वाली मानसं आन काय तो पैका !
नाईतर अमा गरीबाकड कसलं काय अन फटक्यात पाय,हा नाय म्हनायला ५०-६० एकरात उस असतुया,
थोडं कानद,बटाट हिक्डचा तिकडं कर्तु कवा कवा, यक छोटी पजेरो का काय हाय दारात !
- एक बागायतदार
(सदष्य - कृषी उत्पन्न बाजार समिती
संचालक- आयटीवालेवाडी साखर कारखाना
संचालक- आयटीवालेवाडी दुध उत्पादक संघ )