गाभा:
भारतामध्ये नुकताच आधार ( UNIQUE ID) क्रमांक देण्याचे काम चालू झाले आहे हे ऐकले आणि मागच्या आठवड्यात गुरवारी वेळ मिळाल्यामुळे स्वतःचा आधार क्रमांक काढून घेतला.
आज सहज वेळ मिळाला म्हणनू http://uidai.gov.in/ ह्या साईट ला भेट दिली तर महाराष्ट्राचा क्रमांक सातवा असल्याचे पहिले या वरुन असे वाटते की जास्ती लोकांना ह्या गोष्टीची माहिती नाही असे वाटले म्हणून माहिती देण्याकरिता हा काथ्याकुट.
कृपया जिथे आंग्ल शब्द वापरले आहेत तिथे मराठी शब्द सुचवल्यास बदल करण्यात येतील. संपादक मंडळीनी हे बदल परस्पर केले तरी चालतील
धन्यवाद.
प्रतिक्रिया
15 Feb 2011 - 2:28 pm | गणपा
कसा मिळवलात हे सांगीतलेत तर बरेच जणांना याचा फायदा होईल.
15 Feb 2011 - 2:37 pm | वपाडाव
+१
मी ही हेच म्हणत होतो.
त्याबद्दल डीट्टेल माहीती मिळाल्यास आनन्दच आनन्द !!
15 Feb 2011 - 3:51 pm | सुकामेवा
काढण्या साठी माहिती खालील प्रमाणे
लागणारे पुरावे
१) तुमचे ओळखपत्र (PAN कार्ड), पारपत्र, वाहन चालवण्याचा परवाना तत्सम.
२) रहिवासाचा पुरावा ( Ration कार्ड, महावितरणाचे बिल, दूरध्वनी बिल शक्यतो भारत संचार निगम मर्यादित).
आमच्या इथे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत याची व्यवस्था करण्यात आली होती.
तिथे गेल्यावर एक अर्ज भरून द्यावा लागतो. नंतर तुम्हाला तो पूर्ण भरलेला अर्ज (फॉर्म) त्या संबधित व्यक्ती कडे दिल्यावर ते तुमच्याकडचे ओळखपत्र व रहिव्साचा पुरावा बघतात व स्कॅन करून त्यांच्या संगणकावर घेतात.
नंतर हाताच्या १० बोटांचे ठसे घेतात व नंतर बुबुळाचे छायाचित्र घेतात.
सर्वात शेवटी तुम्हाला सर्व माहिती बरोबर आहे का नाही ते बघून झाल्यावर पोचपावती देतात.
ज्यांच्या कडे रहिवासी पुरावा नाही त्यांच्या करिता सुद्धा काही तरी पद्धत आहे पण ती मला माहित नाही. ती तिथे जुनाच बघावी लागेल.
पोहच मिळाल्या नंतर साधारण २५ दिवसांनी UNIQUE ID कार्ड घरी येईल असे सांगितले आहे.
15 Feb 2011 - 5:38 pm | गणेशा
>> आमच्या इथे पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत याची व्यवस्था करण्यात आली होती.
अजुन आहे का व्यवस्था?
माझ्या ड्रायविंग लायसन्स वरील पत्ता हा जुन्या घराचा म्हणजे उरुळी कांचन चा आहे.
नविन घर रहाटनी मधेय आहे, पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतच येते.
मग येथील इडेक्स २ आणि पेन कार्ड चालेल काय ? की रेशन कार्ड पण आधी इकदचे पाहिजे .. ?
थोडी मदत करा राव
15 Feb 2011 - 5:44 pm | आजानुकर्ण
पिंपरी चिंचवड महापालिकेत ही व्यवस्था अजूनही आहे का?
15 Feb 2011 - 6:06 pm | सुकामेवा
हो चालू आहे आजुन बरेच दिवस असेल, नक्की माहित नाही.
15 Feb 2011 - 6:04 pm | सुकामेवा
तिथे जाउनच चौकशी करावी लागेल
15 Feb 2011 - 4:24 pm | ज्योति प्रकाश
आधार क्रमांक काढण्यासाठी प्रत्यक्ष जावे लागते कां?माझा मुलगा परदेशात शिक्षणासाठी असतो.म्हणुन विचारले.
15 Feb 2011 - 5:23 pm | सुकामेवा
हो आधार क्रमांक काढण्यासाठी प्रत्यक्ष जावे लागते, कारण तिथे बोटाचे ठसे व बुबुळाचे छायाचित्र घेतात
15 Feb 2011 - 5:50 pm | पंगा
ड्युप्लिकेट आयडीची सोय नाही काय? छ्या:! मग काय मजा?
ते काही नाही. ड्युप्लिकेट आयडीची सोय झालीच पाहिजे. खुद्द पंतप्रधानांपासून सुरुवात झाली पाहिजे. (म्हणजे मग 'यथा राजा, तथा प्रजा' या न्यायाने इतरांनाही अनुकरण करता येईल, नि पायंडा पडेल.)
पंतप्रधानांनासुद्धा कधी उफराटे धंदे करावेसे वाटत असतीलच की नाही? तेही आपल्या "स्वच्छ" (आणि भारतीय पंतप्रधान या नात्याने "प्रतिष्ठित") प्रतिमेस धक्का लागू न देता? मग त्यांना अशी सोय नको?
शिवाय, फारच होऊ झाले, तर पंतप्रधान म्हणून स्वतःच्याच ड्युप्लिकेट आयडीला जाहीर समज दिली, की काम झाले! पब्लिकला काय समजतेय?
विचार करायला गेले, तर या सोयीचे आनुषंगिक फायदे कितीतरी दिसतात. तेव्हा अशी सोय उपलब्ध करून देणे इष्ट ठरेल.
(बाय द वे, पंतप्रधानांचा ड्युप्लिकेट आयडी काय रहावा बरे? 'ग्रीन स्प्यान'? भारतीय रिज़र्व ब्यांकेचे माजी गवर्नर म्हणून, अॅलन ग्रीनस्प्यानच्या धर्तीवर?)
15 Feb 2011 - 9:09 pm | गोगोल
मनोरंजक प्रतिसाद. फेटेवाला?
16 Feb 2011 - 11:10 am | पंगा
अरे हो, एक सांगायचे राहूनच गेले. वरील सर्व हा निव्वळ कल्पनाविलास आहे हं. "पंतप्रधान उफराटे धंदे करतात" असले काही यातून आडमार्गानेही सुचवायचे नाही.
भारतीय पंतप्रधानांविषयी मला संपूर्ण आदर आहे.
हं, आता "पंतप्रधान कोणाचेतरी पिथ्थू आहेत, कोणाच्यातरी आदेशाप्रमाणे वागतात, कोणाच्यातरी हातातले बाहुले आहेत" असेही काहीकाही पंतप्रधानांबाबत समज आहेत म्हणे. पण त्याहीबद्दल आपल्याला काही माहिती नाही बुवा.
नसावेत!
15 Feb 2011 - 5:41 pm | अविनाशकुलकर्णी
पुण्यात कुठे मिळतो..?
क्रूपया सांगावे
15 Feb 2011 - 6:07 pm | सुकामेवा
नगर पालिकेत जाउनच चौकशी करावी लागेल