गाभा:
राम राम मंडळी,
उद्या आम्ही काही महत्वाच्या कामाकरता पुण्यात येत आहोत. दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी आम्हाला थोडी सवड मिळेल. तेव्हा मिसळपाव डॉट कॉमचे तंत्रविभाग प्रमूख नीलकांत यांची भेट घेणार आहोत. त्याचप्रमाणे आमचे काही मित्र धमाल मुलगा, डॉ दाढे, आनंदयात्री, पेठकरशेठ, इनोबा यांचीही भेट घ्यायची आमची इच्छा आहे. अर्थात, सदर मंडळींना आपापले उद्योगधंदे आहेत याची आम्हाला कल्पना आहे त्यामुळे कुणावरही सक्ति नाही.
'पुरेपूर कोल्हापूर' या नावाचे एक हॉटेल पुण्यात आहे. संध्याकाळचे भोजन आम्ही त्या हॉटेलात घेऊ. वरील मंडळींनी आम्हाला तेथे जेवायची कंपनी दिली तर आम्हाला आनंद होईल...!
आपला,
संत तात्याबा,
मिसळपाव परिवार.
प्रतिक्रिया
11 Jun 2008 - 4:44 pm | महेश हतोळकर
वरील मंडळींनी आम्हाला तेथे जेवायची कंपनी दिली तर आम्हाला आनंद होईल...!
बाकिच्यांनी दिली तर चालणार नाही का?
11 Jun 2008 - 4:52 pm | विसोबा खेचर
बाकिच्यांनी दिली तर चालणार नाही का?
अवश्य चालेल. आम्ही फक्त वानगीदाखल काही नांवे घेतली होती..
अवश्य भेटूया उद्या..
तात्या.
अरे धमाल मुला,
अरे क्षमा कर. आमचा बेत अचानक ठरला! पुढच्या वेळेस निश्चित आगाऊ कल्पना देऊ!
तात्या.
11 Jun 2008 - 5:01 pm | धमाल मुलगा
च्छ्या!
कै च्या कै काय तात्या?
क्षमा वगैरे कसली मागताय?
उगाच लाजवू नका ह्या लेकराला!
आपल्याला काय हो, पुण्यात नायतर ठाण्यात करु कट्टा :) कसें?
(स्वगतः ह्म्म...पि'ण्यात' ला असल्याने पु'ण्यात' ठा'ण्यात' असे यमक जुळताहेत की काय?)
11 Jun 2008 - 4:48 pm | धमाल मुलगा
तात्याबा...ये नाइन्साफी है|
मी काल रात्रीपर्यंत पुण्यातच होतो. कालच फाफलत मुंबईला परत आलोय :(
ह्यॅट्ट....एक झक्कास कट्टा चुकणार माझा :((
असो...मंडळी, मज्जा करो ! खुप खुप गप्पा मारो...तात्याशेठ मुडमध्ये असतील तर उनसे गाणं-बिणं ऐको!!!!
आम्ही आपले बसतो भांडूपात एकटेच भाकरतुकडे मोडत :(
नेक्श्टैम तात्याबा, मेरेको लवकर सांगो, म्हणजे मेरेको थोडा सेटींग करने को येगा! क्या?
11 Jun 2008 - 6:20 pm | छोटा डॉन
हा तात्यांच्या "अचानक तरुण मंडळाचा" कट्टा आहे ...
माझे तात्यांशी बोलणे झाले आहे, मी पुण्यात आल्यावर साधारणता "२१,२२" जेव्हा जमेल तेव्हा "तात्या" वेळ काढून आपल्या "खास सात्विक [ हसु का जोरात ?] कट्ट्याला" येणार आहेत....
तेव्हा आपल्या "हौसखास मंडळ, वर्ष ९१ " चा कट्टा जोरदार होणारच ...
आत्ता मारु दे ह्या मंडळींना मजा !!!
अवांतर : ह्यावेळी मी " काडी टाकून " पळून जाणार नाही ...
अतिअवांतर : तु काय ठरवलेस, आहेस की फिरंग्यानी पकडून ठेवले मुंबापुरीत ???
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
12 Jun 2008 - 12:20 pm | धमाल मुलगा
है शाब्बास रे!!!
थोडीफार सेटींग लावायला सुरुवात केलेलीच आहे मीही!
हौसखास मंडळ देऊ जोरात दणाणून!
मी काय ठरवायचंय आत्तापासून? मेंबरं फिक्स होऊदेत आधी. मग स्थळ, तजवीज ठरवू ;)
तजवीज म्हणजे, तुळशीच्या बिया, दूध, गवती चहा, भजनी मंडळ, बादशाहीतून जेवणाची पार्सलं, भरपूर गुलकंद घातलेली बिन-सुपारीची मसाला पानं, इ.इ. (आता खास सात्वीक कट्टा म्हणतोय म्हणून हो! नाहीतर आमची तयारी वेगळीच असते. आम्ही साले गुत्त्यावरचे पडीक बेवडे!)
आणि हो, मस्त ग़जला, गाणी-बजावणी पण होऊन जाऊ द्या हौसखासच्या कट्ट्याला, मास्तर येणार असतील तर सोन्याहून पिवळं! नाट्यचर्चाही घडेल :) क्काय?
11 Jun 2008 - 4:51 pm | आनंदयात्री
संध्याकाळ पर्यंत सांगतो !
11 Jun 2008 - 4:59 pm | ऋचा
बाकिच्यांना यायच असेल तर काय करायच????
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
11 Jun 2008 - 5:04 pm | विसोबा खेचर
बाकिच्यांना यायच असेल तर काय करायच????
आम्हाला सगळ्याच मिपाकर पुणेकरांना भेटायची इच्छा आहे. परंतु उद्या कार्यालयीन दिवस आसल्यामुळे सर्वांनाच जमेल, सवड होईल असे नाही याची कल्पना आहे...
ऋचाताई, तुम्ही मांसाहार करत असाल तर अवश्य या. 'पुरेपूर कोल्हापूर' या हॉटेलात फार छान स्वयंपाक करतात.. :)
तात्या.
11 Jun 2008 - 5:06 pm | कुंदन
दुर्दैव आमचे , कारण आम्ही पुण्यात नाही ....
11 Jun 2008 - 5:08 pm | राजे (not verified)
मला प्रचंड त्रास होत आहे.... सुदैव तुमचे की आम्ही पुण्यात नाही आहोत.... ;)
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
11 Jun 2008 - 5:04 pm | मनिष
संध्याकाळी ८ नंतर असेल तर मी नक्की भेटतो! कुठे आहे हे 'पुरेपूर कोल्हापूर'?
11 Jun 2008 - 5:07 pm | विसोबा खेचर
कुठे आहे हे 'पुरेपूर कोल्हापूर'?
ते मलाही नीटसं माहीत नाही. खरं तर मी तेथे दोनतीनदा गेलो आहे पण रिक्षाने गेल्यामुळे मला नेमका पत्ता सांगता नाही येणार! ते तुम्हाला कुणीतरी पुणेकरच सांगतील.. :)
आपला,
(रस्ते हमखास चुकणारा) तात्या.
11 Jun 2008 - 6:12 pm | छोटा डॉन
तुम्हाला "स.प. महाविद्यालय" माहित आहे ना ???
त्याच्यासमोर थोडी खालच्या म्हणजे डेक्कन साईडला एक गल्ली जाते ती सरळ "लक्ष्मी रस्त्या" कडे ...
त्याच रस्तावर आहे ...
पहिल्यांदा "दुर्गा नॉनव्हेज" लागेल, त्यानंतर ५० पावलांच्या आत "पुरेपुर कोल्हापुर " ...
लक्ष्मी रस्त्याकडून आलात तर पहिल्यांदा "सेटी प्राईड शूज" हे दुकान हुडका ...
त्याच्यासमोरुन सरळ चालत "टिळक रोडकडे" निघा, ३५-४० पावलात "पुरेपुर" लागेल ...
पण, हम्म् , काय उपयोग ?
आम्ही नसणार तिथे !!!
पुणेकर मंडळी ऐश करा, चांगले शिकरण खावा, मटार उसळ खावा ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
11 Jun 2008 - 6:53 pm | विजुभाऊ
याला म्हणायचे अस्सल सदाशिवपेठी पुणेकर पुणे ३० वाले
लोकाना चुकीचे पत्ते सांगुन पुणे दर्शन घडवण्याचे पुण्य पदरात पाडुन घेतात
तू सांगतो ते नुस्ते कोल्हापुर. "
"पुरेपुर कोल्हापुर हे मेहेंदळे गॅरेज जवळ आहे. नळ स्टॉप जवळ.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
11 Jun 2008 - 7:05 pm | ध्रुव
पुरेपुर कोल्हापुर यांची दोन दुकाने आहेत एक स.प. महाविद्यालयाच्या समोरच्या गल्लीत व दुसरे मेहेंदळे गॅरेज एरंडवणे येथे.
तुम्ही कुठे जमणार आहात आणि किती वाजता??
--
ध्रुव
11 Jun 2008 - 7:08 pm | छोटा डॉन
आयला मे त्या "पुणे - ३० " वाल्याला एवढ्या दिवस "पुरेपुर" समजून हाणत होतो ...
पण कोल्हापुरी साज आहे खाण्यात !!!
स्वगत : घातला की "विजूभाऊंनी" शेवटी धोतराला हात ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
11 Jun 2008 - 5:06 pm | विजुभाऊ
तात्या
उद्या तो रीपोर्टिंग साहेब येणार आहे.
खडुस लौकर गेला तर लै बरे होईल.
अन्यथा मला यायला थोडा उशीर होईल. हाटेल कोठे आहे ते सांगा .
मी येईन
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
11 Jun 2008 - 7:55 pm | llपुण्याचे पेशवेll
जी गल्ली बादशाही बोर्डींग किंवा टिळकस्मारक मंदिरासमोर आहे जी पेरूगेट कडे जाते. त्याच गल्लीत आहे 'पुरेपूर कोल्हापूर'. त्यांची एक शाखा मेहेंदळे गॅरेज समोर 'अभिषेक प्युअर व्हेज' शेजारी आहे.
(माहीतगार)
पुण्याचे पेशवे
11 Jun 2008 - 5:23 pm | मनस्वी
'अचानक कट्ट्याला' शुभेच्छा.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
11 Jun 2008 - 5:13 pm | ऋचा
नक्की कुठे आहे म्हणजे
मेहेंदळे गॅरेज आहे ना तिथुन सरळ पुढे यायच आणि तिथे अभिषेक नावाच भलं मोठं हॉटेल आहे.
त्याच्या शेजारीच आहे "पुरे पुर कोल्हापुर"
आवांतर : तिथे पांढरा रस्सा खुप छान मिळतो.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
11 Jun 2008 - 5:16 pm | मनिष
धन्यवाद ऋचा!
थोडा घासफूस (व्हेज) मिळेल ना? मी येतो ८.१५ - ८.३० पर्यंत.
11 Jun 2008 - 5:19 pm | विसोबा खेचर
थोडा घासफूस (व्हेज) मिळेल ना? मी येतो ८.१५ - ८.३० पर्यंत.
हो, नक्की मिळेल. मीही तेथे ८.१५ पर्यंत पोहोचतो आहे! :)
तात्या.
11 Jun 2008 - 5:13 pm | भोचक
तात्या एकदा इंदुरात या. खायची मजा खरी इथे. डाळबाटीपासून काय वाट्टेल ते इथे छान मिळतं. कधी तरी इथेही कट्टा जमवायला या बुवा.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत.
विजूभौ हे वाक्य फार आवडलं.
11 Jun 2008 - 5:21 pm | धमाल मुलगा
"पुरेपुर कोल्हापुर" ह्या नावाची पुण्यात २ हॉटेलं आहेत.
१.पेरुगेट पोलिस चौकीपाशी.
२.एरंडवणा, कोथरुड (दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जाण्याच्या रस्त्यावर)
तात्याबांनी ह्या २ पैकी नक्की कोणतं हे सांगितल्यास मंडळींना येणे/ठरवणे सोपे जाईल :)
- (तांबडा-पांढरा रस्साप्रेमी) ध मा ल.
स्वगतः च्यामारी, ह्या सगळ्यांना एकदा आमच्या हेमंतरावांच्या हातचं कोल्हापुरी मटन्/चिकन खिलवलं पाहिजे....रस्सा म्हणजे काय असतो त्याची व्याख्या ठरावी असा हेमंतरावांचा हातखंडा तांबड्या-पांढर्या रश्याबाबत!
11 Jun 2008 - 5:31 pm | विजुभाऊ
पेरुगेट पोलिस चौकीपाशी आहे ते नुस्ते "कोल्हापुर" आहे.
"पुरेपुर कोल्हापुर" हे दिनानाथ हॉस्पिटलपाशीच आहे.
(तरी बरे तात्यानी ते हाटेल कोणत्यातरी गणपतीच्या का मारुतीचा देवळापाशी आहे असे नाही सांगितले. केवढा घोळ झाला असता ना. पुण्यात अचानक मारुती पासुन सोन्या,जिलब्या, पत्र्या ...असे बरेच मारुती आहेत. माती, दगडी,हती,असे बरेच नावाचे गणपती आहेत्.एके ठिकाणी खुन्या मुरलीधर पण आहे.धन्य ते पुणे)
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
11 Jun 2008 - 7:09 pm | ध्रुव
अरे नाय रे विजुभाऊ...
दोन्ही सेम आहेत. कुठल्याच दुकानात आमची शाखा नाही असे लिहीलेले नाही. अरे दोन्हीकडचे वाढपी अधुन्मधुन इकडे तिकडे येत जात असतात.
--
(रेग्युलर मेंबर पुपुकोपु :) )ध्रुव
11 Jun 2008 - 5:24 pm | ऋचा
घासफुस मिळेल पण बाकीचे लोक मस्त रस्सा भुरकत असतील :P
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
11 Jun 2008 - 5:30 pm | झकासराव
असत ओ तिथे.
मी एकदा तिथे भरली वांग्याची भाजी बोटे चाखत माखत खाल्ली आहे. :)
तात्या नेमक कुठल दोन्हीतल??
उद्या कामाचा दिवस असल्याने जमेलच असे नाही पण जोरदार प्रयत्न करु.
तात्या शेठ तुमचा फोन नं देवुन ठेवा.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
11 Jun 2008 - 5:34 pm | विसोबा खेचर
मी गेलो होतो ते 'पुरेपूर कोल्हापूर' मेहेंदळे गॅरेजच्या जवळ होतं एवढं मला आठवतंय!
11 Jun 2008 - 5:43 pm | इनोबा म्हणे
हे हाटील माझ्या घराजवळच आहे. नळस्टॉप चौकातून म्हात्रे पुलाकडे जाताना एक सिग्नल आहे. तिथून उजव्या हाताला(मेहेंदळे गॅरेजकडे) वळायचे. सिग्नलपासून दोन मिनीटाच्या अंतरावर आहे.
येणार असेल तेव्हा संपर्क करा, अर्थात आम्ही सद्ध्या पथ्य पाळत असल्यामुळे जेवण्याकरिता कंपनी देऊ शकत नाही. तरिही भेटण्यास आनंद होईल.आणखी कोण कोण येणार आहे?
भ्रमणध्वनी: ९३७२ ९३७२ १८
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
11 Jun 2008 - 5:48 pm | शितल
पुरेपुर कोल्हापुर हे हॉटेल तुम्हाला लहान पडेल असे मला वाटते, कारण तेथे खुप गर्दी असते, (माझ्या नवर्या मुळे मला माहित) आणि मी पाहिली आहे गर्दी, खुप वेळ बसु देतील की नाही माहित नाही .
पण पुण्याच्या कट्ट्याला शुभेच्छा !
11 Jun 2008 - 6:27 pm | प्रभाकर पेठकर
पुरेपुर कोल्हापुर नांवाने २-३ उपहारगृह पाहिली आहेत. त्या पैकी , मेहेदळे गॅरेज (ह्याचे नांव खरे तर 'मेहेंदळे मॅरेज' असे असायला हवे. तिथे लग्नाचा हॉल आहे) जवळचे उपहारगृह मला जवळ आहे. पण ते खरेच खूऽऽऽपच छोटेसे आहे. आरामात बसून गप्पा झोडता येत नाहीत.
तात्या, आलात की मला फोन कराल? मी भेटेन.
तसेच, उद्या दुपारी मी मुंबईला येतो आहे. दोघे बरोबरच जाऊ म्हणजे मामलेदार मिसळीचा कार्यक्रमही उरकता येईल. तुम्ही म्हणत असाल तर, तुमच्या सोयीनुसार, जाण्याची वेळ पुढे-मागे करता येईल.
11 Jun 2008 - 6:29 pm | रामराजे
उद्याच्या कट्ट्याला मनःपुर्वक शुभेच्छा..
मी नुकताच पुण्याला घरी जाउन आलो. पुढच्यावेळी आगाऊ कल्पना नक्की द्या!
11 Jun 2008 - 6:33 pm | डॉ.प्रसाद दाढे
वाहवा! काय योग आलाय! मी नक्की येणार. मात्र पुरेपुर कोल्हापूरात आपल्याला मैफल जमविणे मुष्किल आहे बर॑ का तात्या..एकतर तिथे जागा फार नाहिये आणि फार वेळ बूड टेकवून देत नाहीत, मग त्या केसमध्ये आपण एकतर समोरच 'अभिषेक नॉनव्हेज' मध्ये बसू शकतो कि॑वा जवळपास 'शा॑ग्रिला' मध्ये वगैरेपण जाऊ शकतो. तात्या॑च्या पुणे भेटीचा मॅणिजर कोन हायेत.. त्या॑नी कृपया ठरवावे (व आम्हा॑स तसे कळवावे)
11 Jun 2008 - 6:40 pm | छोटा डॉन
"शा॑ग्रिला" म्हणजे तेच का " गच्चीतल्या ओल्या पार्टी" वालं ...
मागच्या कट्ट्याला ह्या हाटेलाच घोडं एकजण लै नाचवत होता ... नाव आता लक्षात नाही ...
बाकी हाटेल मस्त निवांत आहे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
11 Jun 2008 - 7:00 pm | विजुभाऊ
मीच की तो शांग्रीला चे घोडे नाचवणारा
.............................. विजुभाऊ टांगेवाला
( आमचे येथे घोडे/ टांगे/लग्नाचा हॉल/तेराव्याचे महाभोजन/ श्राद्धाचे स्पेश्यल मेनु मिळेल ( वडे /तांदळाच्या खिरीसह) ,पिंडासाठी चांगले कावळे भाड्याने मिळतील) पुणे ३०
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
11 Jun 2008 - 7:10 pm | छोटा डॉन
आरारा ... आमच्या [ कम्]नशिबाने ते घोडे नाचवणारे " विजूभाऊ" निघाले...
मेलो आता ...
आता स्वप्नात येऊन मनोसोक्त चावल्याशिवाय रहात नाहीत, आज रात्री झोपेलाच कल्टी ...
बघु कसे येतात ते स्वप्नात !!!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
11 Jun 2008 - 7:27 pm | विजुभाऊ
आता स्वप्नात येऊन मनोसोक्त चावल्याशिवाय रहात नाहीत, आज रात्री झोपेलाच कल्टी ...
बघु कसे येतात ते स्वप्नात !!!
काळजी करु नकोस्.वत्सा...अम्ही "डॉन"च्या नव्हे तर "ऍन" च्या स्वप्नात तीला भेटायला जात असतो
विजुभाऊ टांगेवाला
( आमचे येथे घोडे/ टांगे/लग्नाचा हॉल/तेराव्याचे महाभोजन/ श्राद्धाचे स्पेश्यल मेनु मिळेल ( वडे /तांदळाच्या खिरीसह) ,पिंडासाठी चांगले कावळे भाड्याने मिळतील) पुणे ३०
12 Jun 2008 - 10:38 am | नीलकांत
चला या निमित्ताने डॉ.प्रसाद दाढे, विजुभाऊ आणि भेटुया भेटूया म्हणनार्या मनिष ला भेटता येईल. नवीन लोक येताहेत तेही उत्तमच.
डॉ.प्रसाद दाढे म्हणतात त्याप्रमाणे पुरेपुर कोल्हापुर हॉटेल टाळावं असंच मला सुध्दा वाटतं. अर्थात मेहेंदळे गॅरेज समोरच्या शाखेत मी कधी गेलो नाही. आमची पेरूगेट जवळची म्हणजेच विजुभाऊंच्या शब्दात पुणे ३० ची शाखा आम्हाला जवळची, ओळखीची आणि मोक्याची. ;)
मात्र आमचा जेवणासाठी पहिला प्राधान्यक्रम असतो तो आवारे मराठा खाणावळीला. तेथे सुध्दा खुप गर्दी असते. बसु देणार नाहीत. त्यामुळे जेथे थोडं निवांत बसता येईल. अश्या जागेची निवड करावी असं वाटते.
नीलकांत
12 Jun 2008 - 10:52 am | मनस्वी
मी चांदणी चौकातील कावेरी सुचवीन.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
11 Jun 2008 - 6:44 pm | राजे (not verified)
वा वा !!!!
पार्टी.. कट्टा... ओसरी... सात्विक ओसरी असे काही लेख आले की प्रतीसादाचा पुर येतो मिपावर ;)
खरं तर हेच ह्या संकेतस्थळाच्या जिंदादिलीचे कारण देखील आहे.... :)
शुभेच्छा माझ्या ही !!!!
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
11 Jun 2008 - 6:44 pm | राजे (not verified)
वा वा !!!!
पार्टी.. कट्टा... ओसरी... सात्विक ओसरी असे काही लेख आले की प्रतीसादाचा पुर येतो मिपावर ;)
खरं तर हेच ह्या संकेतस्थळाच्या जिंदादिलीचे कारण देखील आहे.... :)
शुभेच्छा माझ्या ही !!!!
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
11 Jun 2008 - 6:49 pm | शितल
एन्.डी.ए.रोड वरचे गार्डन हॉटेल ही छान आहे. मस्त निवा॑त गप्पा होतील तुमच्या सगळ्या॑च्या आणि जेवणी उत्तम असते.
12 Jun 2008 - 12:05 am | भाग्यश्री
गार्डन कोर्ट नाव त्याचं.. तिथे आहेत तशी चांगली हाटेलं.. अप न अबॉव्ह वगैरे.. पण लांब पडेल..
पूरेपूर कोल्हापूर लहान पडेल.. संध्याकाळी तिथे आणि अभिषेकला इतकी लांबलचक लाईन असते की प्रश्न पडावा पुणेकर घरी जेवतात की नाहीत.. त्यामुळे वेळेचं बघावं लागेल..श्या पुण्यात असते तर आले असते.. २मिनिटांच्या अंतरावर आहे माझ्या घरापासून! :(
असो.. तुम्ही मजा करा! आणि छान वृत्तांत टाका, फोटो टाका!! शुभेच्छा!
http://bhagyashreee.blogspot.com/
11 Jun 2008 - 11:54 pm | भडकमकर मास्तर
आम्हीही वेळात वेळ काढून येत आहोत....
... आज नेमका दुपारी मि पा वर आलो नाही आणि हे वाचतोय.......
उद्या भडकमकर क्लासेस च्या इव्हीनिंग बॅचला सुट्टी देऊन आम्ही येतच आहोत...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
12 Jun 2008 - 10:42 am | नाखु
एक पुणेकर (आत्ता चिंचवडात)
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
12 Jun 2008 - 10:57 am | डोमकावळा
मस्त जमणार दिसतेय.... :)
तात्या फोटो टाका बरका....
म्हणजे आम्ही आपली दुधाची तहान ताकावर भागवू... :D
12 Jun 2008 - 11:20 am | मनिष
चांदनी चौकात पंजाबी तडका पण चांगले आहे....मस्त ऐसपैस निवांत बराच वेळ बसता येते तिथे. नक्की जागा सांगा! मी कुठेही यायला तयार आहे! :)
विजुभाऊ - एक विनंती; उठसुठ पुण्याला शिव्या घालू नका...बर्याच वेळा गैरसमजामुळे चुकीचा पता सांगितला जातो...त्यात इतर काही उद्देश नसतो. विचित्र नावे कुठल्याही गावात सापडतील... त्याला त्या गावाच्या इतिहासामधे कारण असतात...उगाच पुण्याला किती शिव्या घालणार. मी स्वतः पुणेरी नाही (जाज्वल्य अभिमान वगैरे अजिबात नाही), लहानपणापासून बर्याच शहरात राहिलो/वाढलो आहे...तसेच आता पुण्यात...प्रत्येक गावाची स्वतःची वैशिष्ट्य असतात...आपल्या मनातल्या गावाशी तुलना केल्यास फरक जाणवणारच....फक्त त्या 'फरका' ला सतत 'उणीवा' म्हणून हिणवू नये.
- मनिष
बाकी बर्याच मुंबईकरांचे अमेरिकनांसारखे असते, आपल्यापलीकडे जग असते हे त्यांना पटतच/मान्यच/समजतच नाही. इतरत्र आपल्यापेक्षा वेगळी, पण त्या परिसराच्या दृष्टीने परीपुर्ण/योग्य अशी सिस्टीम असू शकते हे ते समजवून का घेत नाही?
12 Jun 2008 - 11:31 am | अमोल केळकर
बाकी बर्याच मुंबईकरांचे अमेरिकनांसारखे असते, आपल्यापलीकडे जग असते हे त्यांना पटतच/मान्यच/समजतच नाही. इतरत्र आपल्यापेक्षा वेगळी, पण त्या परिसराच्या दृष्टीने परीपुर्ण/योग्य अशी सिस्टीम असू शकते हे ते समजवून का घेत नाही?
अमेरिकन लोकांचे माहित नाही पण मुंबईकर नाहीत हो असे. कदाचीत रोजच्या हालअपेष्टा सहन करणारे मुंबईकर कुठलिही सिस्टीम मस्त ऍन्जॉय करतात. हा पण मुंबईबाहेर जास्त नाही राहु शकत. या शहराची नशाच अशी आहे.
कृपया वरील सर्व ह. घ्या. केवळ मुंबईप्रेमापोटी लिहिले. राग मानु नका.
बाकी चांदणी चौकात बंजारा हील ही मस्त
आपला
( पुण्याची पुर्ण माहिती असलेला मुंबईकर) केळकर
12 Jun 2008 - 11:49 am | धमाल मुलगा
श्री. केळकरांशी सहमत!
मी गेली ८ वर्षं सदाशिव / शनवार पेठेत राहून अगदी पक्का नसलो तरी ८०-९० % पुणेरी झालो आहे असं बरेचजण म्हणतात.
त्या अनुशंगाने बोलायचं झालं तर.... गेल्या ६ महिन्यांपासून मी मुंबईत आहे, पण मला ओळख-पाळख नसतानाही रस्त्यात चालता चालता येणारे जाणारे मदत करणारे बरेच भेटले.
अगदी आजच उदाहरण सांगतो, बस-स्टॉपवर रांगेत उभा होतो, रांग बरीच मोठी असल्याने स्टॉपच्या शेडबाहेर बरीच पसरली होती. अचानक पाऊस यायला लागला, मी छत्री / रेनकोट काहीच बरोबर आणलं नव्हतं! भिजायला लागल्यावर वैतागून मी "आयच्चा घो! " असं पुर्ण म्हणेपर्यंत डोक्यावरचा पाऊस थांबला, वर पाहिलं तर छत्री! वळून पाहिलं तर रांगेतला मागचा माणूस स्वतःची छत्री माझ्याही डोक्यावर ऍडजेस्ट करुन मंद हसत माझ्याकडे पहात होता....
अगदी असाच पण उलटा अनुभव मला एकदा टिळक रोडवर आला होता. पावसात भिजायला लागलो म्हणून मागच्या काकांना म्हणालो, "तुमच्या छत्रीखाली मीही थांबू का २ मिनिटं?" एकाही अक्षरानं उत्तर न देता म्हातारा माझ्याकडं चपलेखाली चिरडलेला झुरळाकडं पहावं तसा पहात राहिला....छत्री थोडीशी माझ्यापासून दूर घेऊन...
:) चलता है! गावागावाची पध्दत आपली. कोल्हापूर-सातारा-सांगली भागात गेलात तर आदरातिथ्य म्हणजे नेमकं काय ह्याचा अर्थ उमगतो, तर मुंबईत आल्यावर "वेळ" किती महत्वाची असते ते कळतं. मराठी सांस्कृतिक जगतात वावरायचं असेल तर पुण्याशिवाय पर्याय नाही :)
अन् जोरदार भाऊबंदकी बघायची असेल तर या आमच्या बारामतीला. एकरभर बागायतीसाठी कसे भाऊ भावाच्या डोक्यात कुर्हाडी घालतात दाखवतो :)
12 Jun 2008 - 12:00 pm | आनंदयात्री
प्रतिसाद.
12 Jun 2008 - 12:07 pm | श्री
बाकी बर्याच मुंबईकरांचे अमेरिकनांसारखे असते, आपल्यापलीकडे जग असते हे त्यांना पटतच/मान्यच/समजतच नाही.
=======================================================
मनिष भाउ,
बाकि काहिंचे माहित नाही, परंतु ज्यानी २६ जुलॅ व बोम्ब्स्फोटाच्या वेळी रस्त्यावर येउन अनुभव घेतला असेल ते कदाचीत आपल्या मतांशी सहमत होणार नाहीत.
12 Jun 2008 - 11:55 am | विजुभाऊ
मनिष भौ
एक विनंती; उठसुठ पुण्याला शिव्या घालू नका
शिव्या नाही घालत हो मीही पक्का पुणेकर आहे.
त्या 'फरका' ला सतत 'उणीवा' म्हणून हिणवू नये.
पुण्यात काहीही उणे नाही.मी पुण्यात रहाणे एन्जॉय करतो.
हिणवणे वगैरे माझ्या मनात नाही.
पुण्याची वैषिष्ठ्ये मला आवडतात. तरीही तुमची सूचना सर आखोंपर....
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
12 Jun 2008 - 12:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सायंकाळच्या अचानक मिपाकट्ट्याला शुभेच्छा !!!
पुण्याची वैषिष्ठ्ये मला आवडतात. तरीही तुमची सूचना सर आखोंपर....
रुकनेका नै विजुभौ, आम्हाला पुण्याची खरी ओळख होते आहे. येऊ द्या अजून पुण्याची काही वैशिष्टे :)
( आमचे येथे घोडे/ टांगे/लग्नाचा हॉल/तेराव्याचे महाभोजन/ श्राद्धाचे स्पेश्यल मेनु मिळेल ( वडे /तांदळाच्या खिरीसह) ,पिंडासाठी चांगले कावळे भाड्याने मिळतील) पुणे ३०
हाहाहाहाहा :)
12 Jun 2008 - 2:05 pm | नीलकांत
संध्याकाळी साडेसात वाजता पुरेपुर कोल्हापुर समोर भेटूया. त्या नंतर ठरवूया की कुठे जायचे ते. कोण कोण येतंय ते सांगा म्हणजे उशीर झाल्यास ठरलेल्या जागेवरच येता येईल. तात्या, इनोबा ,डॉ. प्रसाद दाढे किंवा मला फोन करू शकता.
पुरेपुर कोल्हापुर समोरचे डॉ. दाढेंनी सुचवलेले हॉटेल किंवा मग चांदणी चौकातील कुठलेही हॉटेल असा काहीसा विचार आहे. तुमचं मत काय?
नीलकांत
12 Jun 2008 - 5:41 pm | कलंत्री
प्रिय तात्या,
आपण येणार आहात हे वाचुन बरे वाटले. गप्पा टप्पाच्या दृष्टिने चांदणी चौक बरे पडेल. तेथे बावधन चौपाटी आहे आणि निवांत गप्पाही मारता येतील.
कार्यक्रम पत्रिका वितरीत केली तर अजून बरे होईल.
१००% भेटणार.
कलंत्री
13 Jun 2008 - 7:48 am | विसोबा खेचर
काल आम्हाला आमचे पुण्यातले काही मिपाकर मित्र वेळात वेळ काढून भेटले याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
प्राजू, डॉ प्रसाद दाढे, भडकमकर मास्तर, इनोबा, गमभनकार ओंकार जोशी, मनिष, नीलकांत, आणि विजूभाऊ या मंडळींचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. या सर्व मित्रांना भेटून आम्हास आम्हास अत्यंत आनंद झाला. मिसळपावबद्दल सर्वांनी भरभरून प्रेम व्यक्त केले ही गोष्ट आम्ही मोलाची समजतो!
काल जेवत असतांनाच अमेरिकेहून डांबिसकाकांचा फोन आला व त्यांनी प्रेमाने सर्वांची चौकशी केली. त्याचप्रमाणे धमालमुलगा व आनंदयात्री यांनीही सर्व कट्टेकरींची चौकशी केली! :)
सध्या डॉक्टरांनी पूर्ण बंदी केली असून अण्णांना कुणासही भेटू देत नाहीयेत. तरीही त्यांच्या घरच्यांनी आम्हाला विशेष परवानगी दिली आणि आम्हाला आमचे मानसगुरू भीमण्णा यांचे दर्शन मिळाले. अण्णांनी हातात हात घेऊन आमची विचारपूस केली, जरा वेळ शेजारी बसवलं, यापरीस दुसरे भाग्य ते कोणते?
असो..
एक दोन महत्वाची कामे आटपून आज संध्याकाळपर्यंत संत तात्याबा ठाण्याला परततील. पुन्हा एकवार सर्व मिपाकर पुणेकरांचे मनापासून आभार...
तात्या.
13 Jun 2008 - 9:14 am | भडकमकर मास्तर
सर्वांना भेटून आम्हालाही फार बरे वाटले...
... क्लासला दिलेली सुट्टी कारणी लागली...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
14 Jun 2008 - 8:14 am | झकासराव
आयला,
इनोबाने माझी फिरकी घेतली की काय??
मग मी कोणाशी फोनवर बोल्लो तात्या म्हणून???
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
13 Jun 2008 - 9:33 am | डॉ.प्रसाद दाढे
मलाही स॑त तात्याबा महाराजा॑चे सदेह दर्शन प्रथमच घडले, त्याचप्रमाणे नीलका॑त, मनिष व सर्वव्यापी प्राजूही पहिल्या॑दाच भेटले. विजूभाऊ॑नी रजनिशा॑चेही प्रत्यक्ष दर्शन घडविले (आता ते सर्व मिपाकरा॑नाही ते लवकरच मिळणार आहे. मला ठाऊक आहे, आ॑बटशौकीन आता जिभल्या चाटत असतील.. :)
काल फक्त एकाच गोष्टीची रूखरूख लागली. तात्या॑चे गाणे राहूनच गेले.. ते स्थळ गाण्याच्या मैफिलीला योग्य नव्हते हे खरे आहे पण पुढच्या वेळेस मात्र ही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पण गप्पा मात्र पुष्कळ झाल्या (सविस्तर वृत्ता॑ताचा पोवाडा शाहिर ओमकार सादर करणारच आहेत..)
बरीच म॑डळी काल फोटू काढत होती.. टाका की राव
13 Jun 2008 - 11:22 am | मनिष
मलाही सगळ्यांना भेटून फार आनंद झाला... :)
13 Jun 2008 - 10:56 am | भाग्यश्री
भेटलात कुठे पण?? सगळा सविस्तर वृत्तांत यायची वाट पाहत आहे..
http://bhagyashreee.blogspot.com/
13 Jun 2008 - 11:53 am | सचीन जी
अरेरे ! मिपा करांना भेटण्याची चांगली संधी आहे.
पण काय करणार! आम्ही पडलो आहोत बंगळुरात.
मजा करा पुणेकरांनो !
मिपा करांना भेटण्याकरीता तळमणारा,
सचीन जी!
13 Jun 2008 - 3:26 pm | संजीव नाईक
प्रेम विर तात्या.
जेवणा बरोबर मिसळपाव पण मिळेल काय? त्यां अनुशंगाने मि.पा. चे नावचे सार्थक होईल.
इतके दिवस संन्यास घेतलेला
संजीव