पाव

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
13 Feb 2011 - 4:49 am

भारताबाहेर आपल्या सारखे पावभाजीचे पाव मिळत नाहीत, म्हणुन हे पाव बनवण्याचा प्रयत्न केला होता. हा केलेला प्रयत्न बर्‍यापेकी यशस्वी झाला.

साहित्यः

मैदा - ५०० ग्रॅम
यीस्ट - ८ ग्रॅम किंवा १ छोटे पाकीट
गरम पाणी - १/२ कप
साखर - १ चमचा
unsalted बटर - ५० ग्रॅम
अंडे - १
मिठ चवीनुसार

कृती:

१. मैदा चाळुन घ्यावा.
२. एका मोठ्या बाउल मधे १/२ कप गरम पाणी, यीस्ट, १ चमचा मैदा, १ चमचा साखर व १/२ चमचा मीठ टाकुन मिक्स करावे. हे बाउल १० मिनिटे उबदार जागी ठेवावे. तुम्ही थंड प्रदेशात रहात असल्यास हे बाउल oven मधे किंवा heater जवळ ठेवावे.
३. १० मिनिटां नंतर बाउल मधील मिश्रणा वर फेस आलेला दिसेल. हे मिश्रण मैदया मधे थोडे मिठ व लागल्यास अजुन थोडे पाणी टाकुन मउसर मळुन घ्यावे.
४. एका मोठ्या भांड्यात खाली थोडा मैदा टाकुन हा भिजवलेला गोळा ठेवावा. भांड्यावर निट झाकण ठेवुन परत १-२ तास उबदार जागी ठेवावे.
५. १-२ तासानंतर भांड्यातील गोळ्याचा आकार दुपट्टीने वाढलेला दिसेल.
६. हा गोळा आता, किचनच्या ओट्यावर थोडा मैदा टाकुन त्यावर काढुन घ्यावा.
७. बटर पुर्णपणे वितळुन घ्यावे.
८. वितळलेले बटर थोडे थोडे टाकुन गोळा, सगळे बटर संपे पर्यंत मळुन घ्यावा.
९. गोळा नीट मळुन झाल्यावर त्याचे मध्यम आकाराचे गोळे करुन घ्यावेत.
१०. बेकिंग ट्रेला बटर लावुन हे गोळे ठेवावेत. प्रत्येक गोळ्यामधे १ इंचाचे अंतर ठेवावे.
११. हा ट्रे परत ओल्या कापडाने झाकुन १/२ तास बाजुला ठेवुन द्यावा.
१२. १/२ तासा नंतर हे गोळे मोठे होउन, पावाच्या लादी सारखे दिसतील.
१३. oven २५० degree celcius ला १० मिनिटे preheat करावा.
१४. एका भांड्यामधे अंडे फोडुन घ्यावे व फेटावे.
१५. हे फेटलेले अंडे हळुवार पणे ब्रशच्या मदतीने किंवा kitchen paper towel अंड्यामधे बुडवुन पावावर लावुन घ्यावे. ह्या मुळे पावाला glaze व रंग चांगला येतो.
१६. oven preheat झाल्यावर बेकिंग ट्रे oven मधे ठेवुन २५० degree celcius ला १५-२० मिनिटे किंवा पावा सारखा रंग येइ पर्यंत बेक करावे.
१७. पाव बेक झाल्यावर oven मधुन बाहेर काढावेत. पावाला वरतुन गरम असतानाच बटर लावावे.
१८. हे पाव तुम्ही पावभाजी, कछी दाबेली, वडा-पाव, मिसळ पाव या मधे वापरु शकता.

टिपः

१. अंडे चालत नसल्यास तुम्ही पावाला दुध लावुन glaze करु शकता.

pav

pav2

प्रतिक्रिया

काय यमी , फ्लफी दिसताहेत ग :)

Mrunalini's picture

13 Feb 2011 - 5:28 am | Mrunalini

हो.. thanks.. टेस्ट पण एकदम आपल्या इथे मिळतात तशीच झाली होती. :)

लवंगी's picture

13 Feb 2011 - 6:07 am | लवंगी

दिपालीच्या पावाच्या पाकक्रूतीची आठवण झाली..

ही पाकृही चांगली आणि सोपी वाटतिये.
दिपालीचा एक धागा आठवतोय व राजेश घासकडी साहेबांनी यावर बरीच मौलिक माहिती दिल्याचे आठवते आहे.
http://www.misalpav.com/node/11070

दिपाली कुठे आहे सध्या?? तिने पावभाजीचे पाव तसेच टोस्ट रस्क ची रेसिपी दिली होती..
हे पावही सही दिसताहेत. मस्तच.

@दिपाली... तू छुपी है कहा?

नरेशकुमार's picture

13 Feb 2011 - 10:00 am | नरेशकुमार

देवा मला पाव !

पंगा's picture

13 Feb 2011 - 12:07 pm | पंगा

... मूळ इंग्रजीत, "ओ लॉर्ड, गिव अस अवर डेली* ब्रेड."

*अवांतर: यातील 'डेली' हा शब्द Daily आणि Deli यांपैकी नेमक्या कोणत्या पद्धतीने लिहिला जात असावा, याबद्दल तज्ज्ञांत मतभेद आहेत, असे कळते.

५० फक्त's picture

13 Feb 2011 - 1:34 pm | ५० फक्त

पाव झाले, आता भाजी टाका, मग दाबेली, मग वडा, नग भजी आधिच स्वग्रुहावर मिसळ्पाव आहेच,

च्यायला इथं आज रविवार आहे, बाहेर जाण्याची बंदी आहे आणि तुम्ही अस्ले धागे टाकुन छ्ळा नुसतं.

@ म्रुणालिनी, आता माहेरी आलीस ना कळव, तुझ्या हातंचा ठसा घेउन ठेवतो एका टाईलवर आणि लावतो किचन मध्ये, गणपा, दिपाली, लवंगी, स्वाती आणि माझी आई या सगळ्यांच्या रांगेत..

हर्षद.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Feb 2011 - 1:38 pm | निनाद मुक्काम प...

असे काही करता येईन ह्यांची कल्पना नव्हती .
ह्यात मस्का लाऊन सकाळी चहाबरोबर पिणे म्हणजे दिव्या अनुभूती .
पु ले शु

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Feb 2011 - 1:39 pm | निनाद मुक्काम प...

असे काही करता येईन ह्यांची कल्पना नव्हती .
ह्यात मस्का लाऊन सकाळी चहाबरोबर पिणे म्हणजे दिव्या अनुभूती .
पु ले शु

स्वाती२'s picture

13 Feb 2011 - 4:55 pm | स्वाती२

मस्त! सोपी आहे पाकृ.

Mrunalini's picture

13 Feb 2011 - 5:07 pm | Mrunalini

:) सगळ्यांचे खुप आभार.

योगेश गाडगीळ's picture

13 Feb 2011 - 5:51 pm | योगेश गाडगीळ

एक एडिशन
साध्या बेकर्स यीस्ट ऐवजी हाय-पी (पी फॉर परफॉर्मन्स) यीस्ट घ्यावे. ते जेनेटिकली मॉडिफाइड असून, साध्या यीस्टपेक्षा खूप जास्त कार्यक्षम असतं. तासाभराच्या ऐवजी २०-२५ मिनिटांत काम होइल.

पाकृ आवडलि.
ह्याच पध्दतीने प्युअर व्हीट ब्रेड बनवता येईल काय?(मैदा विरहीत)

अभिज्ञ.

गुंडोपंत's picture

14 Feb 2011 - 9:24 am | गुंडोपंत

पाव पाहून अगदी लगेच चहा आणि लोणीपाव खावेसे वाटले. मस्तच.

पिंगू's picture

14 Feb 2011 - 2:09 pm | पिंगू

अहो पंत नुसता चहा पाव खाण्यापेक्षा जरा पाव बनवायचं मनावर घ्या... बाकी पाककृती बेश्ट.. घरच्याघरी पाव भारी...

- पिंगू

साहित्यसंपदा's picture

14 Feb 2011 - 3:44 pm | साहित्यसंपदा

मुंबईचे कावळे 'काव काव' न करता 'पाव पाव' करतात ------