नमस्कार. गेले बरेच महिने मी मराठी संस्थळांवर वाचन करतो आहे. लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. लेख काही आठवड्यांपूर्वीच लिहिलेला होता, पण प्रसिद्ध करण्याचा धीर होत नव्हता. काही चुका राहून गेल्या असतील तर मोठ्या मनाने क्षमा करावी ही विनंती.
सुमारे दोन महिन्याभरापूर्वी धम्मकलाडू यांनी सद्यपरिस्थित मराठी संस्थळे किती प्रगल्भ आहेत, त्यांची प्रगल्भता मोजावी कशी व वाढवावी कशी यावर चिंतन करणारा एक लेख लिहिला होता. दुर्दैवाने त्यांनी स्पष्टपणे लिहून इन्कार केला असला तरी त्यांचा खोडी काढण्याचा हेतू असल्याप्रमाणे वाचकांनी त्यावर मते मांडली. मात्र या सगळ्या गदारोळात प्रगल्भता मोजण्याच्या निकषांकडे दुर्लक्षच झाले. या महत्त्वाच्या प्रश्नावर सर्वांचेच लक्ष पुनर्केंद्रित व्हावे यासाठी हा लेखनप्रपंच.
लेखनहेतू
प्रगल्भतेचे निकष कसे ठरवावे हा अतिशय गहन प्रश्न आहे. कारण प्रगल्भता ही काही भौतिक राशी नाही जी एखाद्या
उपकरणाने मोजता यावी. तसेच ती जनसामान्यांच्या कौलावरूनही ठरू नये असे वाटणे साहजिक आहे. नाहीतर जे लोकप्रिय ते प्रगल्भ असे मानले जाण्याचा धोका उद्भवतो. म्हणजे केवळ आमीर खानचा चेहेरा फिल्मफेअरच्या सर्वसामान्य वाचकांना गोड वाटला म्हणून त्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट बनण्याचा मान मिळतोच, पण त्या जखमेवर मीठ चोळणे म्हणून की काय 'पापा केहेते है बडा नाम करेगा' वगैरेसारख्या रचना या गुलजारने इजाजत साठी केलेल्या कवितांपेक्षा अधिक चांगल्या आहेत असा निर्वाळा मिळतो. तेव्हा जनसामान्यांच्या मतांवरून प्रगल्भता ठरवणे योग्य नाही.
परंतु मग प्रगल्भता ठरवावी कशी, हा प्रश्न अनुत्तरितच रहातो. त्यासाठी तुलनात्मक अभ्यास हा एकच पर्याय शिल्लक रहातो. सुदैवाने संस्थळांवर होणाऱ्या लेखनात अनेक सामायिक दुवे असतात, जेणेकरून हा अभ्यास शक्य होतो. एकच लेखक, एकच लेख दोन संस्थळांवर प्रसिद्ध करतो. अशा सामायिक लेखांना विशिष्ट संस्थळावर काय प्रकारचे प्रतिसाद मिळतात, किती खोलवर चर्चा होते, चर्चा भरकटते की फुलते, अवांतरात जाते की मूळ विषयांच्या अनेकविध पैलूंना स्पर्श करते, वाचक चर्चाविषयाबाबत उदासीन आहेत की तावातावाने तावताव लिहितात यावरून काही निष्कर्ष काढता येतात. या लेखात अशाच दोन संस्थळांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे.
तुलनेच्या पद्धती व निकष
मिसळपाव व उपक्रम या दोन संस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या १४ डिसेंबर ते १४ जानेवारी या गेल्या महिन्याभराच्या काळातल्या लेखनाचा या तुलनेत अंतर्भाव आहे. या काळात जे जे सामायिक लेख दोन्ही संस्थळांवर प्रसिद्ध झाले तेवढेच या तुलनेसाठी विचारात घेतले आहेत. तुलना करताना मूळ लेखाचा अगर चर्चाप्रस्तावाचा दर्जा विचारात घेतला नाही, कारण अर्थातच तो दोन्ही संस्थळांसाठी समान आहे. त्यावर येणाऱ्या प्रतिसादांचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे. या मूल्यमापनासाठी खालील गोष्टी विचारात घेण्यात आल्या आहेत.
१. प्रतिसादसंख्या - अर्थातच संख्येवरून दर्जा ठरत नाही हे उघडच आहे, पण तरीही प्रतिसादसंख्येवरून एकंदरीत वाचकवर्गाच्या चर्चाप्रस्तावाबद्दलच्या उत्साहाचं मोजमाप होऊ शकते. अवांतर प्रतिसादांमुळे हा आकडा फुगलेला नाही याचाही विचार करण्यात आला.
२. वाचकांचा सहभाग/समरसता - निव्वळ 'लेख आवडला' इतपतच प्रतिसाद असेल तर त्या प्रतिसादांना 'हा लेख आवडला याचे कारण म्हणजे...' या स्वरूपाच्या प्रतिसादापेक्षा कमी महत्त्व दिलेले आहे. एखाद्या चर्चेत किती लोकांनी किती समरसून भाग घेतला हा प्रश्न येथे महत्त्वाचा ठरतो.
३. माहिती/पैलू - एखाद्या विषयाची नवीन माहिती चर्चेतून उपस्थित झाली का? चर्चाविषयाचे वेगवेगळे पैलू प्रतिसादकर्त्यांनी उपस्थित केले का? यावरून निश्चितच दोन चर्चांची तुलना करता येते.
४. वाचनीयता - ही चर्चा पुन्हा वाचावीशी वाटेल का? या चर्चेत सहभाग न घेणाऱ्याला ती वाचताना आनंद मिळेल का? आपण यावेळी उपस्थित असायला हवे होते, चर्चेत भाग घ्यायला हवा होता असे वाटेल का? या प्रश्नांच्या उत्तरांतून चर्चा किती यशस्वी झाली याबद्दल अटकळ बांधता येते.
या चारही निकषांचा सर्वांगीण विचार करून प्रत्येक लेखा/चर्चेसाठी मिसळपाव व उपक्रम या संस्थळांवरील चर्चांना सामान्य, चांगली, व उत्तम अशा श्रेणी देण्यात आलेल्या आहेत. सामायिक लेखांसाठी असलेल्या श्रेणींचे एकत्रीकरण केल्यास संस्थळांच्या तुलनात्मक प्रगल्भतेचा अंदाज यायला मदत व्हावी.
तुलनात्मक सारणी
Sheet1
A
B
C
D
E
F
G
H
I
J
K
L
1
2
3
4
5
6
चर्चा/लेखाचे
नाव
लेखक
उपक्रम
मिसळपाव
7
हॉम रॉंग
निनाद
6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य, माहिती
सामान्य, वाचनीयता सामान्य
6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य, माहिती
सामान्य, वाचनीयता सामान्य
8
ऍबल कॉन
एला
निनाद
१४
प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सुमार, पैलू
व वाचनीयतेला मर्यादा
१४
प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सुमार, पैलू
व वाचनीयतेला मर्यादा
9
तोक्यो गोमी
ओन्ना
निनाद
6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य
6 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग सामान्य
10
पानिपताची
मराठी भाषेला देणगी
चिंतातूरजंतू
14 प्रतिसाद, वाचकांचा सहभाग मध्यम, माहिती
व पैलू मध्यम, वाचनीयता मध्यम
52 प्रतिसाद, वाचक सहभाग उत्तम, माहिती
व पैलू उत्तम, वाचनीयता उत्तम
11
वॉल्व्हर
निनाद
9 प्रतिसाद, वाचक सहभाग मध्यम, पैलू
सामान्य, वाचनीयता सामान्य
31 प्रतिसाद, वाचक सहभाग चांगला, पैलू
व माहिती चांगली, वाचनीयता चांगली
12
सायलेंटियम
निनाद
5 प्रतिसाद, वाचक सहभाग सामान्य, पैलू
सामान्य, वाचनीयता मध्यम
13 प्रतिसाद, वाचक सहभाग मध्यम, पैलू
सामान्य, वाचनीयता मध्यम
13
घरकाम/बालसंगोपन
आणि जीडीपी
राजेश घासकडवी
13 प्रतिसाद, यथातथा सहभाग, मर्यादित
पैलू, मर्यादित
वाचनीयता
80 प्रतिसाद, समरसून सहभाग, अनेकविध
पैलूंना स्पर्श, वाचनीयता उत्तम
14
15
16
17
18
उत्तम
मध्यम
सामान्य
19
उपक्रम
0
2
5
20
मिसळपाव
2
1
4
21
एकंदरीत या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या सात लेखांसाठी सारांश असा येतो
संस्थळ ----उत्तम मध्यम सामान्य
उपक्रम ------0----2-----5
मिसळपाव----2----1-----4
उत्तम चर्चांच्या संख्येमध्ये मिसळपाव पुढे असले तरी मध्यम व सामान्य दर्जाच्या चर्चांमध्ये उपक्रमने बाजी मारलेली आहे.
निष्कर्ष व पुढील चर्चा
संस्थळांची प्रगल्भता कशी मोजावी यासाठी एक तुलनात्मक अभ्यास आम्ही सादर केला. यातून अर्थातच कुठचे संस्थळ प्रगल्भ आहे याबाबतीत निष्कर्ष काढायचा नसून धम्मकलाडूंनी मांडलेल्या मूळ प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रगल्भतेचे निकष निश्चित करण्यासाठी या चर्चेचा उपयोग होईल अशी आशा आहे. ही पद्धती प्रस्थापित झाली तर यापुढे दर महिन्याला संस्थळांचे रँकिंगही ठरवता येईल. अर्थातच या पुढच्या गोष्टी झाल्या.
प्रतिक्रिया
12 Feb 2011 - 7:58 pm | टारझन
१. संस्थळांची तुलणाच मुळात पटली नाही. त्यामुळे तुमचा लेखंच मुळात प्रगल्भ वाटत नाही. :)
२. संस्थळांवर लिहीणारी लोकं ही "अॅमेचर लेखक " प्रकारातली असतात . सगळेच रामदास किंवा पिवळा डांबीस किंवा विनायक पाचलग यांच्या प्रमाणे प्रगल्भ लिहीतील अशी अपेक्षा करणेच मुळी हस्यास्पद आहे.
३. लिहीणार्याने लिहीत जावे , चुकांतुन शिकत जावे . संस्थळांवर येणार्या प्रतिक्रियांमुळे ( मग त्या सकारात्मक असोत वा णकारात्मक) लेखक शिकत असतो ( काही त्यातुन जे शिकत नाहीत ते आमचे रंजन करतात हा भाग अलहिदा )
४. उपक्रमावर बहुदा ललित लेखणास बंदी आहे. शिवाय तिथले बरेच लोकं कोणत्याही गोष्टीचा वैचारिक किस पाडण्यात समर्थ आहेत. ह्या उलट मिसळपाव वर हलकेफुलके वातावरण असुन कोणत्याही प्रकारचे ( अडल्ट मटेरियल सोडुन , कारण ते सभ्यतेच्या बाउंड्री पल्याड आहे ) लेखन करण्याची बंदी नाही. प्रतिक्रीया दर वेळी वैचारिक असतीलंच असं नाही. तेंव्हा जर उपक्रम डिडि न्युज असेल तर मिसळपाव आजतक आहे :)
५. वर आपण दिलेले गुण देण्याची (आणि आम्ही ती माणण्याची) प्रगल्भता अपणास कोणी वाटली ?
६. कोणी बाजी मारली आणि कोणी माती खाल्ली अशा प्रकारच्या विधाणांमधे खोडसाळ पणा दिसतो.
७. पु.ले.खु.
८. काय जेवण केलंत आज ? खादीडी फिदाडी टाका एखादी .. तेवढाच रैवारचा मेणु फिक्स होईल :)
९. बाकी मिसळपावचे स्वयंघोषित षिलेदार मिसळपावच्या खरडवह्या भरवुन आणि ग्गोग्गो बोलुन मिसळपाव ची प्रगल्भता टिकवुन आहेत असे वाटते :)
१०. काही नाही १० मुद्दे कंप्लिट करायचे होते . त्यामुळे प्रतिक्रीया कशी प्रगल्भित होते :)
अवांतर : पहिलेच लेखण ह्या प्रकारचे केलं तरी मोठ्या मनाने माफ केल्या गेले आहे.
- ( ढुढ्ढाचार्य ) नर्सिंह राव
12 Feb 2011 - 9:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> ... रामदास किंवा पिवळा डांबीस किंवा विनायक पाचलग ... <<
ही तीन नावं एकाच वाक्यात?? जय हो.
12 Feb 2011 - 10:47 pm | आळश्यांचा राजा
आमच्या मते श्री टारझन यांनी ही तीनही नावे एकाच वाक्यात पूर्ण विचारांती घातली आहेत.
(कु./ सौ./ श्रीमती/ सुश्री - जे असेल ते) अदिती यांनी ज्या अप्रगल्भतेने प्रगल्भतेची तुलना करण्याची अप्रगल्भ वृत्ती आपल्या अप्रगल्भ उपप्रतिसादातून दाखवून दिली आहे, त्यावरून श्री टारझन यांचा अशा अप्रगल्भतेवरच मुळापासून हल्ला करण्याचा प्रगल्भ हेतु स्पष्ट होतो.
( दीडप्रगल्भ )
12 Feb 2011 - 11:58 pm | मस्त कलंदर
कुणी या प्रगल्भ-अप्रगल्भोत्तर संवेदनांच्या जाणीवा समजावून सांगू शकेल का?
13 Feb 2011 - 4:36 pm | टारझन
आमच्या मते श्री आळश्यांचा राजा यांनी प्रगल्भ-अप्रगल्भ संवेदना एकाच वाक्यात पूर्ण विचारांती घातल्या आहेत.
(कु./ सौ./ श्रीमती/ सुश्री - जे असेल ते) मकाताई यांनी ज्या अप्रगल्भतेने प्रगल्भतेच्या जाणिवा समजुन घेण्याची अप्रगल्भ वृत्ती आपल्या अप्रगल्भ उपप्रतिसादातून दाखवून दिली आहे, त्यावरून श्री आळश्यांचा राजा यांचा अशा अप्रगल्भतेवरच खोडापासून हल्ला करण्याचा प्रगल्भ हेतु स्पष्ट होतो.
( पाऊणप्रगल्भ )
पतंगाचा मांजा
13 Feb 2011 - 5:28 pm | नरेशकुमार
वरील अप्रगल्भ चर्चेला जे उधान आलेले आहे ते आपल्या एका प्रगल्भ प्रतिक्रियेने थांबेल असे वाटत नाही.
(दीडप्रगल्भ णकु)
13 Feb 2011 - 8:53 am | विनायक पाचलग
बाप रे .. !!!!
13 Feb 2011 - 1:32 pm | निनाद मुक्काम प...
अवलिया ह्यांना चौथे सावज मिळाले बहुदा
पु ले शु
13 Feb 2011 - 2:49 pm | पर्नल नेने मराठे
कोदांचे ग्रहमान उत्तम असल्याचे कळतेय ;)
12 Feb 2011 - 7:58 pm | श्रावण मोडक
हाहाहाहाहा... हे म्हणजे 'विद्यापीठाची मंडई' झाली की राव. आणि त्याच न्यायाने उत्तमतेच्या संदर्भात 'मंडईचे विद्यापीठ' झाले म्हणावे लागेल.
याच विषयावर तिकडे झालेली चर्चा वाचून आलो आत्ताच. "एकूण संस्थळे प्रगल्भ किंवा अप्रगल्भ नसतात, ते जे काही असते ते लोकांचे," हे सन्जोप रावांचे मत विचार करण्याजोगे आहे. ते त्यांनी तिथेच लिहून ठेवले असल्याने आता तिथल्याच इतरांना बालवाडी किंवा तत्सम काही ठरवणाऱ्यांचे त्यावर काय प्रतिसाद येतात हे पाहूया.
12 Feb 2011 - 8:06 pm | पंगा
'मिसळपाव' या संकेतस्थळाच्या वतीने अधिकृत उत्तर देऊ शकत नाही, परंतु ज्या मूळ प्रश्नाचे उत्तर देण्याचा यातून प्रयत्न करावयाचा आहे, त्या मूळ प्रश्नाबाबत उहापोह करण्यात या संकेतस्थळावरील बहुजनांना स्वारस्य असावे किंवा असण्याचे काही कारण असावे, असे वाटत नाही. तरी जेथे कोठे सदस्यांना असे स्वारस्य किंवा गरज असेल (किंवा अशा तुलनेचे महत्त्व आहे असे वाटेल), तेथे असा प्रयत्न जरूर करावा; येथे तो करून काही फायदा होण्याची शक्यता तुलनेने कमी वाटते.
तसेही मूळ प्रश्न या संकेतस्थळावर किंवा या संकेतस्थळाच्या सदस्यांस उद्देशून मांडला गेलेला नसल्याने, त्याचे थेट उत्तर येथे आणि तेही एखाद्या तिर्हाइताच्या मार्फत देण्यात येथील बहुसंख्यांस काही हशील बहुधा नसावे असे वाटते. तरीही प्रयत्नांस शुभेच्छा.
प्रगल्भतेचे निकष ठरवण्याची आणि त्यानुसार तुलना करण्याची, तसेच अशा रँकिंगची गरज नेमकी कोणास आणि का वाटते अथवा वाटू शकते, याबद्दल कुतूहल आहे.
असो. शुभेच्छा.
12 Feb 2011 - 11:07 pm | शाहरुख
संस्थळाची प्रग्लभता म्हणजे तिथं वावरणार्या सदस्यांची प्रगल्भता असे गृहित धरुन, समजा एखाद्या जाहिरातदारास प्रगल्भ आडीयन्सच टार्गेट करायचा असेल तर प्रस्तुत मॉडेल धागाकर्ते विकायचा प्रयत्न करु शकतात.
वैयक्तिक पातळीवर, जो पर्यंत आम्हाला पाहिजे असलेली माणसं इथं दिसतायंत, तो पर्यंत आम्ही इथं येत राहू..प्रगल्भता गेली फुल्या फुल्या फुल्या !
12 Feb 2011 - 9:53 pm | स्पा
असल्या तुलनांना फाट्यावर मारण्याची प्रगल्भता इथे येऊन निर्माण झालेली आहे
12 Feb 2011 - 10:39 pm | आळश्यांचा राजा
हेच म्हणायला आलो होतो !
या विषयावर दोन्ही संस्थळांवर (आतापर्यंत तरी आलेल्या) प्रतिसादांच्या संख्येवरून तरी असंच वाटतं!
13 Feb 2011 - 2:05 am | शरदिनी
अय्या खरंच की काय?
13 Feb 2011 - 8:14 am | अवलिया
अशी असते होय प्रगल्भता !! बर बर चालू द्या हो !!
आम्हाला वाटले की की लै भारी प्रकरण असतं हे प्रगल्भता का काय ते !!
(आंबलेल्या विचारवंतांना फाट्यावर मारणारा ) नाना
- अपशब्द संपादित.
13 Feb 2011 - 8:25 am | नरेशकुमार
लय भारी,
मी लीव्हलेले लेखांचा पन ईचार व्हायला पायजे व्हता की राव.
माहीत हाय की थोडं औघड आहे, पन पुन्ह्यांदा ट्राय करुन बघा की.......
13 Feb 2011 - 9:35 am | सहज
उपक्रम व मिपा दोन्ही संस्थळाच्या कट्टर समर्थकांकडून अश्या अभ्यासाला दोन्ही संस्थळावर प्रतिकूल प्रतिसाद मिळणार होतेच.
जर उपक्रमावर ललीत लेखनाला परवानगी असती व मिपाप्रमाणे उपक्रमाचे व्यवस्थापन जरासेही पारदर्शक, संयमीत असते तर उपक्रम व मिपामधे फारसा फरक नसता. पक्षी दोन्ही संकेतस्थळे समान (अ)/प्रगल्भ दिसली असती. अर्थात बर्याच जणांनी उल्लेख केल्याप्रमाणे संस्थळ, सदस्य नक्की कोण प्रगल्भ हे मुद्दे खरे तर वाद आहेत. पण दोन संस्थळांवरील एकाच गंभीर विषयावरील चर्चा याचा अभ्यास करायचा चांगला प्रयत्न वाटला. धागाकर्त्याचे अभिनंदन.
खरे तर मिसळपाव हे मनोगताला पर्याय म्हणून उभे राहीले होते असे मला वाटते पण मिपाद्वेष्ट्यांनी, मनोगतावर हवा तेवढा दंगा करता येत नाही म्हणून उपक्रमाचा वापर सुरु केला होता.
तसे पहाता उपक्रम व मिपा यांची तुलना होउ शकत नाही. मिपा हे कॉलेजकट्टा, दंगा मस्ती करायला व्यासपीठ उपलब्ध करुन दिले गेले होते हे तात्यांच्या वेळोवेळी प्रतिसादातून दिसत होते. उपक्रम मात्र शांतपणे ग्रंथालयात वाचन, लेखन, पठन करायला आलेल्या लोकांकरता होते.
उपक्रम व्यवस्थापनाने, मुठभर दंगेखोर सदस्यांना आंतरजालीय दंग्याकरता वापर करायला खुले रान दिल्यामुळे उपक्रम व मिपा अशी तुलना आजकाल ऐकू येते अन्यथा उपक्रम व मिपा दोन्ही संकेतस्थळ वेगवेगळी आहेत दोन्हीचा अभ्यास, तुलना अशी होउ शकत नाही. तसेही उपक्रमावरील वेगवेगळ्या सद्स्यांनी मुद्दाम वांझोट्या चर्चा सुरु करुन हाणामार्या करायला मजा येते ही दिलेली कबूली व उपक्रम व्यवस्थापनाकडून डु आयडींच्या दंग्याला चक्क प्रोत्साहन वाटेल अशी लवचीक भूमीका घेतल्याचे दिसून येते.
अनावश्यक धाग्यांनी, अतिवैयक्तिक चर्चांनी, सातत्याने हिणकस प्रतिसादांचा वापर इ. मुळे उपक्रमाची गंभीर, अभ्यासू प्रतीमा गेल्या एक दोन वर्षात पार धुळीला मिळाली आहे पण मिपावर मात्र अनेक नवीन, जुन्या अभ्यासु सदस्यांनी मिपावरील बर्याच चर्चेत प्रगल्भता आणली आहे हे वादातीत. मिपास्थापनेपासुन आजपर्यंत मिपावरील चर्चा मलातरी प्रगल्भ होत आहेत असेच दिसते आहे तर उपक्रमाकडे नजर टाकता मात्र ... असो. वैयक्तिक मत.
सारांश
संस्थळ ----उत्तम मध्यम सामान्य
उपक्रम ------0----2-----5
मिसळपाव----2----1-----4
हे वाचताना सुवर्ण, रौप्य, कास्य पदक तक्ता आठवला. :-)
दोन्ही संकेतस्थळावरील गंभीर विषयांवरील चर्चात प्रगल्भता यावी ही सदिच्छा.
बाकी चालू द्या.
13 Feb 2011 - 2:04 pm | गोगोल
लेख चांगला जमलाय. तुलना करयची पद्धत आवडली आणि ती शास्त्रीय ही वाटत आहे.
त्यावर हा प्रतिसाद म्हणजे दुधात साखर.
13 Feb 2011 - 8:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपक्रम व मिपा दोन्ही संस्थळाच्या कट्टर समर्थकांकडून अश्या अभ्यासाला दोन्ही संस्थळावर प्रतिकूल प्रतिसाद मिळणार होतेच.
स्सही.
अनावश्यक धाग्यांनी, अतिवैयक्तिक चर्चांनी, सातत्याने हिणकस प्रतिसादांचा वापर इ. मुळे उपक्रमाची गंभीर, अभ्यासू प्रतीमा गेल्या एक दोन वर्षात पार धुळीला मिळाली आहे
सहमत.
मिपावर मात्र अनेक नवीन, जुन्या अभ्यासु सदस्यांनी मिपावरील बर्याच चर्चेत प्रगल्भता आणली आहे हे वादातीत. मिपास्थापनेपासुन आजपर्यंत मिपावरील चर्चा मलातरी प्रगल्भ होत आहेत असेच दिसते आहे
सहमत.
-दिलीप बिरुटे
14 Feb 2011 - 5:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उपक्रम व मिपा दोन्ही संस्थळाच्या कट्टर समर्थकांकडून अश्या अभ्यासाला दोन्ही संस्थळावर प्रतिकूल प्रतिसाद मिळणार होतेच.
कौतुकाचेच प्रतिसाद तिकडे दृष्य स्वरुपात असल्यामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि प्रगल्भतेच्या बाबतीत मिपानं बाजी मारली आहे.
आंतरजालावरील संस्थळाच्या तुलनेत लोकप्रिय मिपा संस्थळ मला अधिक प्रगल्भ वाटते असे प्रतिसादही तिकडे अदृष्य होत आहेत. च्यायला, आंतरजालावर सदस्यांची लैच गळचेपी होत आहे. :)
-दिलीप बिरुटे
14 Feb 2011 - 7:07 pm | अवलिया
आंतरजालावर सदस्यांची लैच गळचेपी होत आहे.
आंतरजालावर या शब्दाला आक्षेप. तुम्हाला तिकडे सदस्यांची लैच गळचेपी होत आहे असे म्हणायचे आहे का? कारण मिपावर सदस्यांची गळचेपी होत नाही असे माझे म्हणणे आहे. खोटे असेल तर सिद्ध करा.
13 Feb 2011 - 4:07 pm | आत्मशून्य
कंपूबाजी सोडल्यास.
13 Feb 2011 - 4:40 pm | टारझन
कंसात "मला कोणी कंपुत घेत नाही तोवर .. " असे लिहायचं राहिलंय का ? :)
- ( देवकाकांच्या कंपुतला ) कंपुजन्य
13 Feb 2011 - 5:55 pm | आत्मशून्य
तसंच समजा . काही हरकत नाही आपली.
- शहाणपण
आणी हो एक सांगायच राहीलचं मीसळपाव , मी मराठी, उपक्रम या संकेत स्थळांमधे नावाला जागणारा आणी ज्याला सहज सोपा म्हणता येइल असा यू. आय. फक्त मिपाकडेच आहे. आधीच नाव मीसळपाव त्याला साजेशी लाल रंगाची ऊधळन, मग चर्चा खमंग (झणझणीत) झाल्या नसत्या तरच नवल. मला मीसळपाव आवडण्यामधे या संकेत स्थळाचे नाव आणी डीजाइन याचा सूध्दा बहूमोल वाटा आहे. आणी तो मला संस्थळाची प्रगल्भता दाखवणारा एक + पॉइंट वाटतो.
13 Feb 2011 - 4:43 pm | परिकथेतील राजकुमार
आमच्या तात्याची सही आठवली :)
--
आमची सही - मिपा आहे हे असं आहे. ते आवडणार्यांचं स्वागतच आहे , न आवडणार्यांनी चपला घालायच्या अन् चालू पडायचं!
बाकी हि तुलना म्हणजे भारतभुषण जास्ती गर्दी खेचतो का रजनीकांत ? अशी वाटली.
13 Feb 2011 - 5:44 pm | इन्द्र्राज पवार
मी 'मिसळपाव' आणि त्याचे धाकटे भावंड 'पुस्तकविश्व' या दोनच संस्थळांचा सदस्य असल्याने आणि 'उपक्रमी' नसल्याने अशा "तुलना करा ~ गुण १०" छाप प्रश्नाचे उत्तर देण्यास लायक नाही कारण दुसर्या संस्थळावर होत असलेल्या चर्चेच्या विषयांवर वा दर्जावर फक्त वरील तक्त्यातील विदावर अवलंबून मत व्यक्त करणे अवघड वाटते.....ते योग्यही नाही.
तरीही एक सर्वसाधारण विधान करायचे झाल्यास अशा तुलना अप्रस्तुत वाटतात. यातून प्रतिबिंबीत होत असलेल्या मतांचा प्रवाह पाहता केवळ एकाच महिन्यात प्रकाशित झालेल्या लेखांच्या आधारे उरलेल्या अकरा महिन्याचे सारही असेच निघू शकेल ही भावना कारण नसताना निपजते. एका गल्लीत १ हजार नागरिक आहेत आणि एखाद्या सर्व्हेक्षण करणार्या टीमने 'तुमच्या परिसरात जास्त क्षमतेचे हॅलोजन लॅम्प लावणे गरजेचे आहे का?" असे फक्त दहाच लोकांना विचारले आणि योगायोगाने या दहातील ८ काळ्या धंद्याशी निगडीत असले तर ते 'जास्त क्षमतेचेच नव्हे तर अजिबात लावलेच नाही तरी चालतील' असे उत्तर देतील, म्हणजे त्या गल्लीतील ८०% लोकांना लॅम्प्स नकोत असा सर्व्हे टीम निष्कर्ष काढीत असेल तर तो किती चुकीचा होईल याची कल्पना येते. म्हणून टीव्हीवरील 'सॅम्पल सर्व्हे'चा एरियातील किमान ३०% लोकांच्याकडून ते पत्रक भरून घेतले पाहिजे असा प्रघात असतो....असे इथेही झाले असते तरच काहीसे योग्य वाटेल असे चित्र नजरेसमोर येईल.
दोन्ही संस्थळावर त्या नमुन्या महिन्यात फक्त सातच चर्चा झडल्या का? [का असे आहे की, या तिन्ही लेखकांनी ~ श्री.निनाद यांचे ५ लेख आहेत ~ एकाचवेळी दोन्ही संस्थळावर तेच लेख प्रकाशित केले आहेत, म्हणून ते निवडीत घेतले गेले? असे असेल तर मग बरोबर आहे.]
थोडक्यात एक चर्चेचा विषय म्हणून वरील धागा ठीक आहे....पण त्यातुन 'प्रगल्भ की अप्रगल्भ' यावरून दोन्ही संस्थळात आणि सदस्यांत 'भाऊबंदकी' वाढली नाही म्हणजे मिळविली.
इन्द्रा
13 Feb 2011 - 9:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
भावनेशी सहमत आहे.
हा कौल दोन्ही संस्थळांची सदासर्वकाळ तुलना म्हणून ग्राह्य धरता येणार नाहीच. पण दिलेल्या महिन्यात, जेव्हा उपक्रमावर प्रगल्भ होण्याची (मिपाच्या भाषेत मोठं होण्याची) चर्चा सुरू होती त्या काळातला विदा जमा करून लिहीलेला वाटतो.
13 Feb 2011 - 9:27 pm | श्रावण मोडक
एकूण लेख योग्य ठिकाणी पोचलेला दिसतो हे इथल्या काही आणि तिथल्या काही प्रतिसादांवरून दिसून येते आहे. जियो.
ही अशी तुलना करावीशी का वाटली याविषयी काही लिहा. तो विषय चांगल्या चर्चेचा होऊ शकेल.
बादवे, तुम्ही स्त्री आहात की पुरूष? "गेले बरेच महिने मी मराठी संस्थळांवर वाचन करतो आहे." या दुसऱ्याच वाक्याने विकेट घेतली ना आमची. ;)
13 Feb 2011 - 9:33 pm | नितिन थत्ते
आमची एक जुनी कामवाली "मी बाजार आनाला गेलो होतो" असे म्हणायची. ;)
किंवा कदाचित त्यांनी भाटकरांकडून स्फूर्ती घेतली असेल. :)
13 Feb 2011 - 10:04 pm | श्रावण मोडक
येस्स सर. आलं लक्षात. धन्यवाद. :)
13 Feb 2011 - 11:51 pm | धनंजय
उपक्रम आणि मिसळपाव संकेतस्थळांची (किंवा कुठल्याही 'अ' आणि 'ब' वस्तूंची) तुलना होते आहे, असे जाणवले, की अशा प्रकारचा विचार विधायक असतो.
तुलनेची परिमाणे काय आहेत? तुलनेच्या क्रियाशील फलिताशी त्या परिमाणांचा संबंध कितपत घट्ट आहे? वगैरे दिशेने विश्लेषण जावे.
"सफरचंदे आणि संत्री यांची तुलना करू नये" हे परमार्थाने योग्य तत्त्व नव्हे. "अमुक एका क्रियाशील फलिताच्या संदर्भात तुलना नि:संदर्भ आहे", "तमुक एक क्रियाशील फलिताच्या संदर्भात तुलना सुसंदर्भ आहे" अशा प्रकारची मीमांसा मला जास्त उपयोगी वाटते.
ज्या बागायतदाराला उपलब्ध प्लॉटवर सफरचंदाची बागायत किंवा संत्र्यांची बागायत करायची असेल, त्याला "या फळांच्या झाडांची निगा तुलनात्मक किती कठिण आहे?", "या दोन फळांचा तुलनात्मक बाजारभाव काय आहे?", "मला घरा-गोदामात संत्र्याचा वास अधिक आवडेल की सफरचंदाचा?" वगैरे तुलना करणे ठीकच आहे. सुसंदर्भ आहे. पण सुसंदर्भता समजण्यासाठी क्रियाशील पार्श्वभूमी द्यावी लागते.
मात्र अन्य ठिकाणी तुलना नि:संदर्भ आहे. तेथेसुद्धा नि:संदर्भतेसाठी क्रियाशील पार्श्वभूमी द्यावी लागते.
मराठी भाषेतील वेगवेगळ्या संकेतस्थळांची तुलना होते, हे तर आपले साक्षात् निरीक्षण आहे. मला असे वाटते, की "संकेतस्थळ-व्यवहारासाठी आपल्या रोजच्या कार्यक्रमात मर्यादित वेळ उपलब्ध असतो, तिथे अमुक संकेतस्थळावर वेळ खर्च करावा, की तमुक" वगैरे क्रियाशील पार्श्वभूमी आहे.
कुठल्या क्रियाशील पार्श्वभूमीत असे विश्लेषण नि:संदर्भ आहे, हे श्री. चंद्रशेखर वगैरे यांनी सांगितले आहेच.
प्रगल्भ समाज की प्रगल्भ सदस्य? अशी वेगळीच आणि वेगळ्या ठिकाणी उपयुक्त क्रियाशील पार्श्वभूमी श्री. सन्जोप राव यानी समजावून सांगितलेली आहे.
पण कोणी कुठल्या कारणाने तुलना करून काही क्रिया-निर्णय घेऊ बघत असेल, म्हणा. मग त्यासाठी कोण काय निकष वापरते (प्रगल्भता, मनोरंजन, लोकसंग्रह) आणि त्यासाठी काय परिमाणे वापरते (वरील हिशोबतक्त्यातले तपशील, रंजनाबाबत असाच कुठला तक्ता, सदस्यसंख्या-प्रतिसादसंख्या) त्यांचे विश्लेषण व्हावेच.
- - -
पुढील निकष जोडता येतील काय?
१. ज्या लेखांबद्दल वरील विश्लेषण करण्यालायक आहे असे चर्चाप्रस्तावकाला वाटते, ते एकूण लेखांपैकी किती टक्के आहेत? किती सहज सापडण्यासारखे आहेत? (हे अनेकांनी सांगितलेच आहे).
२. अनेक समविचारी परीक्षकांची परीक्षणे संकलित करावी (हे अनेकांनी सांगितलेच आहे).
- - -
प्रयत्न स्तुत्य असला - आहेच - तरी माझा याबाबतीत फार डोके खर्च करण्याइतपत रस नाही. क्षमस्व.
14 Feb 2011 - 6:54 am | पंगा
हे श्री. चंद्रशेखर कोण असावेत बरे? त्यांनी असे विश्लेषण कोठे बरे केले असावे? या संकेतस्थळावर कोठे केले आहे काय? दिसले तरी नाही...
हे ठीकच. यात फार काय, जरासेही डोके खर्च करण्यालायक काहीही नाही, याबाबत अगदी सहमत आहे. उगाच फुकट नसत्या गोष्टीबद्दल डोक्याला ताप कशाला करून घ्या? अगदी योग्य!
मात्र त्याचबरोबर, दुसर्या संकेतस्थळावर अगोदरच दिलेला स्वतःचा प्रतिसाद इकडे जसाच्या तसा चोप्य-पस्ते करण्याइतपत रस आहे, हेही ठीक.
म्हटलेलेच आहे, "There's no accounting for tastes." कोणाला कशात किती आणि का रस असावा, हे कोणी ठरवावे, कसे, आणि काय म्हणून? नाही का? चोक्कस!
14 Feb 2011 - 9:13 am | धनंजय
श्री. चंद्रशेखर हे उपक्रम संकेतस्थळावरील सदस्य आहेत. त्या संकेतस्थळावर त्यांनी विश्लेषण दिलेले आहे. हा लेख जसाच्या तसा उपक्रम संकेतस्थळावर दिलेला आहे. उपक्रम आणि मिसळपाव या दोन संकेतस्थळांवर काही कॉपी-पेस्ट लेख आहेत, आणि त्यावरची त्या-त्या संकेतस्थळांवरची प्रतिसादसंख्या, लांबी, आणि गुंतागुंत तपासण्याचा एक निर्देशांक बनवण्याबद्दल आहे.
त्यामुळे हा लेख खुद्द त्यात सांगितलेल्या विश्लेषणपद्धतीसाठी, निर्देशांकासाठी साधनसामग्री बनू शकतो. या प्रतिसादापुरती तागडी समसमान करण्याचा प्रयत्न केला होता. लेखाप्रमाणेच कॉपी-पेस्ट.
आता मला हे स्पष्टीकरण लिहिण्यास भाग पडल्यामुळे माझ्या प्रतिसादापुरता साधलेला समतोल ढळला आहे. अर्थातच निर्देशांकाप्रमाणे आता मिसळपाववरती गुंतागुंतीच्या प्रतिसादांची संख्या दोनाने अधिक आहे.
(मात्र निर्देशांकाकरिता लेख उत्तम, मध्यम की सामान्य रकान्यात घातला जाईल, त्याबद्दल कल्पना नाही. ज्या कुठल्या का रकान्यात घातला जाईल, त्या रकान्यात दोन प्रतिसाद अधिक मोजले जातील.)
21 Feb 2011 - 12:14 pm | पंगा
मुळात अशा अभ्यासाचा उपयोग, गरज आणि ग्राह्यता काय, याबद्दल साशंक असल्याकारणाने, असा समतोल राखण्याची गरज कळली नाही. अर्थात, 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या न्यायाने आपली भूमिका याहून वेगळी असू शकते हे समजू शकतो.
तसेही, असा जाणूनबुजून राखावा लागणारा समतोल अशा फुटकळ प्रतिसादांनी सहज बरबाद होण्यासारख्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांची ग्राह्यता काय, याबद्दल शंका राहतेच.
तसेच, या अशा अभ्यासाचा आणि त्यातून निघणार्या अनुमानांचा आणि प्रसिद्धीचा उपयोग नेमका कोणाला आणि कसा होऊ शकतो, याबद्दलही शंका होती. कारण, बहुत विचाराअंतीसुद्धा संकेतस्थळे आणि संकेतस्थळांचे होतकरू ग्राहकवर्ग (हे दोनच वर्ग अशा अभ्यासांचे ग्राहकवर्ग असू शकतात असे वाटले.) यांपैकी कोणाच्याही दृष्टीने अशा अभ्यासाचा कोणताच उपयोग दृष्टिपथास आला नाही. (जाहिरातदारांच्या दृष्टिकोनातून अभ्यास हा मुद्दा दोन कारणांस्तव रद्दबातल ठरावा. एक म्हणजे, सर्वेक्षणाखालील कोणत्याही संकेतस्थळावर तूर्तास जाहिराती घेतल्या जात असण्याबद्दल किंवा भविष्यात तशी काही योजना असल्याबद्दल काहीही माहिती नाही. दुसरे म्हणजे, जाहिरातदारांकरिता असलेला अभ्यास हा जाहिरातदारांच्या एखाद्या संकेतस्थळावर मांडण्याऐवजी अशा संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याचे काहीच प्रयोजन दिसत नाही.) त्यामुळे, या अभ्यासामागील तथाकथित अभ्यासकाजवळ व्यर्थ घालवण्यास उपलब्ध असलेल्या मुबलक वेळेचा व्यय आणि तथाकथित अभ्यासकाचे कंडशमन, याहून अधिक यातून काही साधले असावे, असे वाटले नव्हते. आणि म्हणूनच, हा तद्दन फालतू प्रकार आहे अशी धारणा झाली होती.
संकेतस्थळांच्या ग्राहकवर्गाच्या दृष्टिकोनातून विचार करावयाचा झाल्यास, एखादे संकेतस्थळ निवडण्याकरिता ग्राहकांचे निकष हे अर्थातच 'रोज संध्याकाळच्या टाइमपासाची निश्चिंती' येथपासून ते 'संकेतस्थळाची प्रगल्भता' येथपर्यंत काहीही असू शकतात, हे ओघाने आले. पैकी, 'मी ज्या संकेतस्थळावर वावरू शकतो, ते संकेतस्थळ प्रगल्भ असूच शकत नाही' अशी (काहीशी ग्राउचो मार्क्स*च्या धर्तीवर) स्वतःबद्दल ठाम धारणा असल्याकारणाने, 'संकेतस्थळाची प्रगल्भता' हा निकष मला माझ्यापुरता कधीही उपयोगी वाटला नाही. (कारण हा निकष वापरला असता कोणत्याही संकेतस्थळावर वावरणे व्याख्येनेच अशक्य झाले असते.) त्यामुळे या निकषास अनुसरून इतरांना या अभ्यासाचे निष्कर्ष कसे उपयोगी पडू शकावेत, याबद्दल दुर्दैवाने स्वानुभवाच्या आधारावर काहीही लिहू शकत नाही; केवळ तर्क (किंवा अटकळी) बांधू शकतो. मात्र अशा तर्काच्या किंवा अटकळींच्या आधारावर मला या अभ्यासात या निकषाच्या दृष्टीने उपयुक्त असे काहीही दिसले नाही, हे नमूद करू इच्छितो.
(* नावाची लेंडी++)
माझ्या अंदाजाप्रमाणे, 'संकेतस्थळाची प्रगल्भता' या निकषावर एखादे संकेतस्थळ निवडू पाहणारा एखादा होतकरू ग्राहक (तितकाच प्रगल्भ असेल तर) हा या अशा प्रमाणपत्री 'सरकारमान्यते'वर विसंबून राहील, असे वाटत नाही. असा ग्राहक हा स्वतः अशा संकेतस्थळास जोखून पाहण्याचा प्रयत्न करेल, आणि स्वतःच्या निकषांवर स्वानुभवाच्या आधारावर काही निष्कर्षाप्रत पोहोचेल, अशी शक्यता अधिक वाटते. एखादा चित्रपट हा ज्याप्रमाणे केवळ एखाद्या समीक्षकाने बरा किंवा वाईट म्हटला या आधारावर चांगला किंवा टाकाऊ आहे हे ठरू शकत नाही (किंवा उलटपक्षी लोकप्रियतेच्या आधारावरही ठरू शकत नाही), तेथे 'स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग - किंवा नरक - दिसत नाही' हेच तत्त्व उपयोगात आणावे लागते, त्याचप्रमाणे एखादे संकेतस्थळ प्रगल्भतेच्या निकषावर निवडताना असे अभ्यास हे स्वतः होऊन स्वतःच्या निकषांवर केलेल्या पारखीकरिता पर्याय ठरू शकतील असे वाटत नाही. निदान, कोणताही चोखंदळ ग्राहक असे करेल असे वाटत नाही.
त्यामुळे, होतकरू ग्राहकाच्या दृष्टीने अशा सर्वेक्षणाचा काही उपयोग आहे, असे जाणवले नाही.
उलटपक्षी, संकेतस्थळाच्या दृष्टीने पहावयाचे झाल्यास, एखाद्या संकेतस्थळास अशा सर्वेक्षणाचा काय उपयोग व्हावा, हे समजू शकत नाही. जाहिरातबाजीसाठी उपयोग करून उन्नीसबीस** तंत्र आणि कौशल्य असणार्या सुमार, सवंग आणि अप्रगल्भ ग्राहकांस संकेतस्थळाकडे आकृष्ट करणे हे प्रगल्भ संकेतस्थळांस उपयुक्त नसावे, आणि अशा संकेतस्थळांचे असे धोरणही खचितच नसावे. (तसेही, एखाद्या प्रगल्भ संकेतस्थळास 'प्रगल्भ' म्हणून आपली जाहिरात करून आपली प्रगल्भता सिद्ध करण्यात काही हशील असू शकेल असे वाटत नाही.) याउलट, चोखंदळ आणि प्रगल्भ ग्राहकवर्ग प्रगल्भ संकेतस्थळ निवडताना अशा सर्वेक्षणांस बहुधा महत्त्व देणार नाही, हे वर मांडलेलेच आहे.
(** या एकोणिसाचे किंवा विसाचे एकक नेमके काय, आणि ही मोजणी नेमकी कशी केली जाते, या काही न समजलेल्या गोष्टी आहेत. कोठेही का असेना, पण दिसायला बर्या केलेल्या एखाद्या गोष्टीमागील तंत्र किंवा कौशल्य एका रात्रीत बदलून उन्नीस-बीस होऊ शकते, असाही क्वचित अनुभव येतो. कदाचित मध्यंतरी मोजमाप करणार्याशी काही पंगा घेतल्यास पॅरलॅक्स बिघडून विसाचे एकोणीस होत असावेत. चालायचेच; यात काही नवीन नाही. पॅरलॅक्स बिघडल्याने रीडिंग बदलण्याचा अनुभव प्रयोगशाळेत आपण सगळ्यांनीच घेतला असावा. आणि अशी रीडिंगे खपवूनही दिली असावीत. निदान मी तरी दिलीत. मोजमापे ही ठोकून देता येतात, आणि मोजमापांवर - खास करून दुसर्याने केलेल्या मोजमापांवर - म्हणूनच भरवसा ठेवायचा नसतो, हे तेव्हा शिकलो. अधूनमधून कॉलेजमध्ये जाण्याचा आयुष्यात फायदा होतो, तो असा! असो, हे विषयांतर झाले.)
याच कारणास्तव, 'अशा सर्वेक्षणात जरासेही डोके चालवण्यालायक काहीही नाही' याबद्दल सहमती दर्शवली होती.
मात्र, अशी सर्वेक्षणे आणि त्यांचे परिणाम (हा शब्द हिंदी अर्थाने वापरलेला नसून मराठी अर्थाने वापरलेला आहे, 'निष्कर्ष' किंवा 'निक्काल' अशा अर्थाने तो वापरण्याचा उद्देश नाही, याची विशेष नोंद घ्यावी.) हे मानवी स्वभावाच्या आणि वागणुकीच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून रोचक ठरू शकतील, असे अधिक विचाराअंती आणि पश्चाद्दृष्टीने आता लक्षात येऊ लागले आहे. अशा सर्वेक्षणाबद्दल संबंधित संकेतस्थळांवरील प्रतिक्रिया, अशा सर्वेक्षणांस अशा संकेतस्थळांवर दिले जाणारे तुलनात्मक महत्त्व, अशा सर्वेक्षणांच्या उगमाविषयी कोठे आणि किती प्रमाणात तर्ककुतर्क लढवला जाऊ शकतो, अशा सर्वेक्षणांत बाजी मारण्याकरिता 'नाउ इज़ द टाइम फॉर ऑल गुड मेन टू कम टू द एड ऑफ द पार्टी' छापाची आवाहने कोठे, किती प्रमाणात आणि कोणत्या पातळीवरून केली जाऊ शकतात*** (भले मग ती अगदी उपहासाने का असेनात, किंवा किमानपक्षी तसा दावा का असेना), सर्वेक्षणातील इतर संकेतस्थळांशी आपल्या संकेतस्थळाच्या प्रगल्भतेच्या वारंवार आणि विविधतेने नटलेल्या तुलनेतून आपल्या संकेतस्थळाची आणि पर्यायाने आपली प्रगल्भता स्वतःसच पटवून देण्याची आत्यंतिक निकड कोठे आणि किती प्रमाणात दिसून येते, दुसर्या संकेतस्थळावरून येणार्या प्रत्येक अप्रगल्भ (आणि कदाचित खोडसाळ किंवा चिथावणीखोर) प्रतिसादामागे किती पडसाद किती सदस्यांकडून देण्याची गरज कोणत्या संकेतस्थळावर भासते (थोडक्यात, एका संकेतस्थळावरील एखादा अप्रगल्भ सदस्य दुसर्या संकेतस्थळावरील किती प्रगल्भ जणां अथवा जणींना गुंतवून ठेवू शकतो, आणि मुख्य म्हणजे अशा गुंत्यात स्वतःस अडकवून घेण्याची गरज किती प्रगल्भ जणां किंवा जणींना भासते), या सर्व बाबींचे निरीक्षण करणे हे येत्या काही काळात मनोरंजक ठरावे. (अर्थात, एखाद्या अप्रगल्भ संकेतस्थळावर असे काही होणे हे विशेष नसावे; बहुधा आम असावे. त्यामुळे, 'कुत्रा माणसास चावला तर माणसास चौदा इंजेक्षणे घ्यावी लागण्यापलीकडे त्यास महत्त्व नाही; माणूस कुत्र्यास चावला तर मात्र ती हेडलाइन न्यूज़' या (अ)न्यायाने, आपापल्या रेडियोदुर्बिणी केवळ प्रगल्भ संकेतस्थळांच्या फ्रीक्वेन्सीवर लॉक करून देऊन कष्ट निम्म्याने वाचवण्यास प्रत्यवाय नसावा.)
(*** अशा आवाहनांना येणार्या प्रतिसादांची प्रगल्भता ही अर्थात संकेतस्थळाच्या प्रगल्भतेशी असंबद्ध आणि व्यक्तिगत पातळीवर वेगवेगळी असणे शक्य असावे. वाजपेयींना 'द राइट म्यान इन द राँग पार्टी' असे काही जण म्हणत, त्या धर्तीवर. त्याचा विचार या संदर्भात करण्याची बहुधा विशेष गरज नसावी. आणि तसेही, 'राइट पार्टी' असा काही प्रकार असू शकतो, असाही दावा नाही. असो.)
अशा रीतीने विचार केला असता, निखळ मनोरंजनाची वानवा असण्याच्या या काळात त्या अज्ञात अभ्यासकाचे उपकार मानावे तेवढे थोडेच, हे जाणवू लागते.
त्या अज्ञात उपकर्त्याचे अनंत आभार!
14 Feb 2011 - 4:06 am | निनाद
अहो चांगला लेखक शोधायचा ना.... मग प्रगल्भता कळली असती - सुमार दर्जाच्या लेखकाकडून प्रतिसादांची अपेक्षा करायची आणि वर म्हणायचे की प्रगल्भता दिसत नाही?
कशी दिसणार आडात नाही तर पोहोर्यात कसे दिसेल? ;)
चिजं आणि राजेश हे वेगळे 'लेखन प्रकल्प' आहेत. तेथे स्वतः जन्माला घातलेला/स्फूरलेला विचार आहे. त्यात माझे लेखन गोवणे योग्य नव्हे. कारण माझे लेखन हे निव्वळ प्रतिक्रियात्मक आहे.
म्हणजे काही तरी पाहिल्यावर निर्माण झालेली प्रतिक्रिया इतरांशीही जोडावी या व्यतिरिक्त काही नाही. चिजंचे लेखन पाहिलेत तर त्यात विचार जन्मलेला दिसतो.
मी मनात येईल ते मांडणारा एक सुमार लेखक घेऊन प्रगल्भतेची चर्चा करणे पटले नाही. त्यापेक्षाही खरोखर प्रगल्भ साहित्य येथे आहे हे निश्चित.
तरीही मजेदार प्रयत्न आहे!
14 Feb 2011 - 3:00 pm | नितिन थत्ते
कोणीतरी फुटकळ सर्वे करणार | दोन्हीकडे लेख टाकणार ||
पब्लिक फुल पेटणार | मजा येणार निश्चित ||
.
.
.
.
.
.
14 Feb 2011 - 7:51 pm | नरेशकुमार
षक्यता णाकरता येत णाय.
14 Feb 2011 - 10:45 pm | विकास
मला एकदम ललीताजी आठवल्या.
डिसक्लेमरः मला दोन संस्थळांची तुलना मान्यच नाही. त्यामुळे ह्या जाहीरातीतून कुठल्याच संस्थळाला त्यातील अमूक-तमूक प्रॉडक्ट म्हणून ठरवत नाही अथवा फक्त एकाच ठिकाणी "धुलाई" छान होऊ शकते असे सुचवत नाही. ;)