इजिप्त - एकाधीकारशाही कडून (कदाचीत) लोकशाही कडे

विकास's picture
विकास in काथ्याकूट
11 Feb 2011 - 10:02 pm
गाभा: 

एक दोन दिवसांपूर्वी प्रेसिडंट ओबामा म्हणल्याप्रमाणे, आपण एक इतिहास घडताना पहात आहोत. आज त्याचा एक अध्याय संपला - इजिप्शियन जनतेच्या दबावाखाली मुबारक यांनी राजीनामा दिला!

(एनपीआर)

साधारणपणे २० वर्षांपूर्वी अशीच सुरवात कम्युनिस्ट राष्ट्रांत झाली आणि अनेक दशके पोलादी वाटणार्‍या सत्ता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कलमडू लागल्या. आता बघायचे आहे की जे काही ट्युनिशिया आणि इजिप्तमधे झाले त्याचे इतरत्र कसे परीणाम होतात.

दुसरा भाग म्हणजे, जनतेला राजकीय बदलाने सामाजीक बदल पण एखाद्या स्वीच ऑन-ऑफ प्रमाणे होतात असे वाटते. त्यामुळे नवीन सत्ताधार्‍यांकडून लगेच म्हणजे पुढच्या काही आठवड्यात गोष्टी बदलतील असे वाटू लागले तर काय होऊ शकेल हा एक प्रश्न आहे. तसेच सद्य घटना ही नवीन राज्यकर्ता आणू शकत नसल्याने त्याचे काय परीणाम होतात ते देखील पहाण्यासारखे आहे.

इजिप्तच्या जनतेचे अभिनंदन पण त्याहूनही अधिक शुभेच्छा!

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

11 Feb 2011 - 10:10 pm | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

इजिप्तच्या जनतेचे (सध्या*) अभिनंदन.

*विकास यांनी कंसात कदाचित असा शब्द वापरला आहे-कारण गोष्टी अजून संपूर्ण स्पष्ट नाहीत- तसाच मी पण सध्या शब्द वापरला आहे.

गणपा's picture

11 Feb 2011 - 10:21 pm | गणपा

अगदी अश्याच घटना पाकिस्तानातही पुर्वी झाल्याचे स्मरते (झिया, मुशर्र्फ हेही एक प्रकारचे लष्करी हुकुमशाच होते.) हुकुमशहांना उलथवुन लावल्यावर येणार्‍या प्रजासत्तक सरकारचा मार्ग अत्यंत काट्या कुट्याचा असतो याच भान ठेवल पाहिजे.
सगळ काही लगेच सुरळीत होईल या भ्रमात इजिप्शियन जनतेने राहु नये.
इजिप्त चा पाकिस्तान होऊ नये एवढीच इच्छा.

प्रदीप's picture

11 Feb 2011 - 10:43 pm | प्रदीप

हा लोकमताचा रेटा जबरदस्त होता हे खरे आहे. पण एक लक्षात घेतले पाहिजे- अनेक जुलुमी सत्ताधिशांप्रमाणे होस्नी मुबारक पराकोटीचा क्रूर नव्हता. तो तसा नव्हता ह्यामुळेच हे इतके घडून आलेले आहे. इराणमधे असे होईल का? लिबीयामध्ये?

अमेरिकेला व युरोपियनांना त्यांच्या सोयीनुसार दुनियेला लोकशाहीचे डोस पाजायची उबळ येते. तसे आता हे सर्व पाश्चिमात्य जग इराकी जनता लोकशाही कशी उभारेल इथे डोळे लावून बसले आहे. मुबारक ह्यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी टोकाची राजकीय उलथापालथ त्या समाजाला झेपेल काय?- खरे तर हा प्रश्न कुठल्याही समाजास लागू व्हावा. अनेक दशके एकाधिकारशाही अनुभवल्यानंतर एकाएकी लोकशाही सुरळीतपणे प्रस्थापित होऊ शकते? ह्या चळवळीस तर धड कुणी नेता नाही. एल्-बारादेई कालपरवापर्यंत परदेशात होता, त्याला लोकांचा खरोखरीच कितपत पाठींबा आहे? झेंडे हाती घेऊन मिरवणूका काढणे वेगळे, जबाबदारीने राज्यशकट हाकणे वेगळे. आता ह्यातून बहुतेक अनार्की माजण्याची शक्यता सर्वाधिक आहे. अथवा तेथील सेना सत्ता ताब्यात घेईल, तसे झाले तर निदान काही स्थैर्य त्या देशाला मिळेल तरी.

बाय द वे, इजिप्तच्या लोकशाही वाटचालीकडे उत्साहाने पहाणारे ब्रिट्स इतर हुकूमशहांना त्याचवेळी आलिंगन देताहेत. आताच निक क्लेगच्या ट्वीटवर मुबारकला फोन केल्यावर 'आऊट ऑफ ऑफिस' आहे असा मेसेज मिळतोय ह्याची टिंगल वाचली. पण ह्याच क्लेगच्या लेबर पक्षाच्या सरकारने, ते सत्तेवर असतांना लॉकर्बीच्या बाँबिंगसाठी जन्मठेपेची सजा भोगत असलेल्या लिबीयन माणसाला सोडून घातले, आणि गड्डाफीशी हातमिळवणी केली, त्याला फारसे दिवस झालेले नाहीत! तिथे तेलाच हिशेब महत्वाचा, हुकुमशाही गेली खड्ड्यात!

विकास's picture

12 Feb 2011 - 2:26 am | विकास

मुबारक ह्यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी टोकाची राजकीय उलथापालथ त्या समाजाला झेपेल काय?- खरे तर हा प्रश्न कुठल्याही समाजास लागू व्हावा. अनेक दशके एकाधिकारशाही अनुभवल्यानंतर एकाएकी लोकशाही सुरळीतपणे प्रस्थापित होऊ शकते?

म्हणूनच "...(कदाचीत) लोकशाही कडे " असे म्हणले आहे.

अमेरिकेला व युरोपियनांना त्यांच्या सोयीनुसार दुनियेला लोकशाहीचे डोस पाजायची उबळ येते.

अगदी खरे आहे. पण हे झाले आहे ते त्यांना उबळ आल्याने नाही.

आता ह्यातून बहुतेक अनार्की माजण्याची शक्यता सर्वाधिक आहे. अथवा तेथील सेना सत्ता ताब्यात घेईल, तसे झाले तर निदान काही स्थैर्य त्या देशाला मिळेल तरी.

सैन्याकडे हंगामी का होईना पण सत्तांतर झाले आहेच. तरी देखील अनार्की माजेल का नाही ह्याबद्दल कुठल्याच बाजूने खात्री देता येणार नाही असे वाटते. आज या जनतेच्या चळवळीतील "गोंधळातील सुसुत्रता (ऑर्डर इन केओस)" बघता एकाअर्थी खरेच लोकशाही आली असे म्हणावे लागत आहे. एकीकडे निर्नायकी चळवळ असल्यानेच मुबारकला वाटले की ताणले तर लोकांचा संयम सुटेल आणि एकतर ते हिंसक होतील आणि तसे झाले म्हणून सैन्यबल वापरता येईल; अथवा जनता परत मुकाट्याने कामाला लागेल आणि मग (प्रकट) विरोधकांचे आर्मट्वीस्टींग करता येईल. पण तसे होऊ शकले नाही. अगदी विकसीत पाश्चिमात्यांपासून ते रशिया-चीनपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. (भारत सरकार स्वतःचेच गोंधळ निस्तरण्यात व्यस्त असल्याने त्यांना अजून कदाचीत माहीती देखील नसेल. ;) )

हे लिबरल पक्षाचे प्रमुख आहेत, ते लेबरमधे नाहीत व कधीच नव्हते. सध्याच्या कोऑलिशन सरकारातील ते एक प्रमुख घटक आहेत. तेव्हा वरील टिपण्णी काही अंशी चुकिची आहे. (ही चूक नजरेस आणून दिल्याबद्दल ताल भास्कर ह्यांचे आभार). 'काही अंशी' म्हणण्याचे कारण असे की ब्रिट्सांच्या दुतोंडी राजकिय वागणूकीबद्दलच्या माझ्या इतर टिपण्णीबद्दल मात्र दिलगिरी नाही, ती रास्त अहे असे मला वाटते.

वाटाड्या...'s picture

11 Feb 2011 - 11:20 pm | वाटाड्या...

विकासशेठ,

चांगला विषय..त्यावर चांगली चर्चा घडेल अशी अपेक्षा ठेवतो.

प्रदीपसाहेब..
>>झेंडे हाती घेऊन मिरवणूका काढणे वेगळे, जबाबदारीने राज्यशकट हाकणे वेगळे. आता ह्यातून बहुतेक अनार्की माजण्याची शक्यता सर्वाधिक आहे. अथवा तेथील सेना सत्ता ताब्यात घेईल, तसे झाले तर निदान काही स्थैर्य त्या देशाला मिळेल तरी. +१..लष्कराकडेच सुत्र देऊन मुबारक पसार झाले.

शिवाय मुस्लिम ब्रदरहुड कल्पना तिथे प्रत्यक्षात येऊ नये म्हणजे मिळवली नाहीतर आज पाकिस्तानचे काय चालले आहे ते आपण पहातोच आहोत. ही जी अनार्की आहे ती व मुस्लिम ब्रदरहुड एकत्र आले तर एकतर त्यांचा हळुहळु अरेबियन कंट्रीकडे प्रवास सुरू होइल असे वाटते किंवा त्यांचा पाकिस्तान/आफ्रिकेतले मुस्लिम देशांपैकी कुठलाही असा तरी प्रवास होईल.

जाणकार अजुन प्रकाश टाकतीलच..

- ( त्रिकोणी..फॅरोह..) वाटी..

आजानुकर्ण's picture

12 Feb 2011 - 12:09 am | आजानुकर्ण

तेलाच्या किमतीवर एकंदरित घटनाक्रमाचा व सैन्याच्या अमलाखाली असलेल्या इजिप्तचा काय परिणाम होईल? भारतात बरेच तेल सुवेझमार्गे येते असे वाचल्यासारखे वाटते.

विकास's picture

12 Feb 2011 - 2:08 am | विकास

त्याबद्दल असा अमेरिकन माध्यम आणि त्यात झळकणार्‍या तज्ञांचा अंदाज आहे की कोणी त्यात बदल करणार नाही. कारण त्यात त्यांना भरपूर पैसे मिळतात.

गोगोल's picture

12 Feb 2011 - 12:22 am | गोगोल

तुम्हारा चुक्याच .. तुमने किम काका से कुछ सिखाच नै :(

चर्चा वाचण्यास उत्सुक. :) उत्तम विषय.

धनंजय's picture

12 Feb 2011 - 3:19 am | धनंजय

कदाचित - बरोबर आहे.

१५-२० दिवस प्रचंड चैतन्य संचारलेली ही जनता हेच चैतन्य पुढे चालू ठेवू शकेल काय? आशावादाबरोबर काळजीसुद्धा वाटते.

शाळा-कॉलेजच्या परीक्षा, रोजच्या नोकरीची रडतरखड, बेरोजगारांची वणवण... यांच्यात वेळ गुंतल्यानंतर राजकारणातल्या पडद्यामागच्या हालचालींविरुद्ध चळवळ कशी होईल?

इजिप्तच्या सैन्याने शासनाचा ताबा घेतलेला आहे. सैन्ये ही पुष्कळदा भ्रष्ट असतात. आणि जी बिगर-भ्रष्ट फौज असते, ती सुद्धा शिस्तबद्ध उच्चनीचतेच्या तत्त्वांमुळे कार्यक्षम असते. अशा संस्थेकडे लोकशाही राबवण्याबद्दल काय ज्ञान काय असणार आहे?

पण हे जे काय झालेले आहे, ते पुढच्या काही दशकांपर्यंत लक्षणीय मानले जाईल असे वाटते.

हुप्प्या's picture

12 Feb 2011 - 7:06 am | हुप्प्या

इजिप्तमधे अतिरेकी मुस्लिम जे वहाबी तत्त्वांचा पुरस्कार करतात, असे लोक जोर धरू लागले होते. इजिप्तमधील हजारो वर्षापासून रहात असलेल्या कॉप्टिक ख्रिश्चनांवर अत्याचार सुरू होते. ह्या गटातले अनेक लोक इजिप्त सोडून परागंदा झाले आहेत. होत आहेत. काश्मीरी पंडितांप्रमाणेच.
मुबारक पायउतार झाल्यावर आता अशी पोकळी निर्माण झाली आहे. ती व्यापायला मूलतत्त्ववादी मुस्लिम संघटना नव्याने उभ्या राहू शकतील. तसे झाले तर धोका आहे. सैद कुतुब नामक एक मुस्लिम "विचारवंत" ४० वर्षापूर्वी इजिप्तम्धेच होऊन गेला. त्याने असा विचार मांडला होता की इस्लामी जगताचे अधःपतन होण्याचे कारण महंमदाच्या काळातल्या इस्लामपासून मुस्लिम लोक दुरावले. इस्लामची भ्रष्ट आवृत्ती बनू लागली होती. पुन्हा एकदा कात टाकून "खर्‍या" इस्लामचा स्वीकार करावा त्यातच तमाम मुस्लिमांचे भले आहे. यातूनच अल जवाहिरी, बिन लादेन सारखे लोक निर्माण झाले. मुस्लिम ब्रदरहूड ही संघटना ह्याचेच अपत्य म्हणता येईल.
मुबारकच्या हुकुमशाही आणि अमेरिकाप्रिय धोरणांमुळे अशा लोकांना आळा बसला होता. आता ते डोके वर काढण्याची शक्यता आहे.
इजिप्तमधे आजही इस्रायल कसे वाईट आहे, सगळ्या वाईटाचे मूळ ज्यू लोकच कसे आहेत असे विचारांचे वीष भिनवले जाते. मुबारक हा इस्रायलकडे मवाळ दृष्टीकोन बाळगणारा होता. आता तो गेल्यावर तो जे काही करत होता ते सगळे वाईट आणि त्याच्या विरुद्ध अशीच नवी धोरणे असावीत असा एक दृष्टीकोन बनू लागेल. त्यानेही पराकोटीच्या ज्यूद्वेषाला अआणि पर्यायाने मूलतत्त्ववादी इस्लामला उत्तेजन मिळेल.
एकंदरीत थोडे टेन्शनच आहे.

रमताराम's picture

12 Feb 2011 - 3:20 pm | रमताराम

इजिप्तमधे जे घडले ते सध्या तरी केवळ 'सत्तांतराची सुरवात' एवढेच म्हणता येईल. हे सत्तांतर नाही, क्रांती तर मुळीच नाही. क्रांती म्हणजे एखादा आमूलाग्र बदल. नवा नेता - जेव्हा समोर येईल तेव्हा- असे काही करेलही, पण ते आज घडलेले नाही. किंबहुना दीर्घकाल टिकलेले सत्ताधारी जातात तेव्हा खूप गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्याची उत्तरे इजिप्तची जनता नि नवे सत्ताधारी कसे देतात यावर जे घडेल त्याचे स्वागत करायचे की पस्तावा करायचा हे ठरेल. काही ठळक मुद्दे मांडतोय, विस्तार करत बसत नाही.

१. दीर्घकाल एकच सत्ताधारी असल्याने प्रबळ राजकीय पक्ष नाहीत. एखादा समर्थ पर्याय देण्यासाठी पुरेसे नेतेच नाहीत.

२. मध्यपूर्वेत बहुतेक इस्लामबहुल राष्ट्रात (तुर्कस्तानचा एखादा अपवाद वगळता) प्रामुख्याने सल्तनत/राजेशाही वा हुकुमशाही व्यवस्था आहे त्यामुळे इथे लोकशाहीचे रोल मॉडेल अस्तित्वात नाही. त्यामुळे लोकशाही आपल्यासाठी नाही ते पाश्चात्त्यांचे खूळ आहे हा मूलतत्त्वद्यांकडून होणारा प्रचार मोडून काढणे अवघड आहे.

३. मध्यपूर्वेतील बहुतेक शासनव्यवस्थांवर धार्मिक मतांचा मोठा पगडा आहे. (अपवाद फक्त तुर्कस्तान नि इजिप्त). जिथे नाही ती व्यवस्था ही प्रामुख्याने अमेरिकेतीची प्रॉक्सी सरकारे आहेत (उदा. अफगाणिस्तान, कुवेत, नि आता इराक) त्यांना जनतेचा पाठिंबा आहे की नाही याबाबत शंका घेता येऊ शकेल. मुबारक यांनी जरबेत ठेवलेली ’मुस्लीम ब्रदरहुड’ सारखी संस्था या निमित्ताने - नेपाळमधील माओवाद्यांप्रमाणे - मुख्य प्रवाहात सामील होण्याचे नाटक करून विस्तार करेल नि लोकशाही आपल्याला पुरेशी अनुकूल होत नाही म्हणता पुन्हा आपल्या मूळ मार्गावर जाईल ही भीती मोठी आहे.

४. निव्वळ सत्ता उलथण्याने क्रांती होत नाही, त्यासाठी सत्तांतरापश्चात व्यवस्थेचा आराखडा नि त्या आराखड्याला अंमलात आणण्याची कुवत असलेले नेते आवश्यक असतात. सध्या इजिप्तमधे या दोन्हीचा मागमूस दिसत नाही असे म्हटले जात आहे.

५. आणखी एक शक्यता म्हणजे इजिप्तचे पाकिस्तान होणे! मूलतत्त्ववाद्यांच्या हातात देश जाईल ही भीती घालत जसे मुबारक सत्तेवर राहिले तसेच पुरेसे लायक नेते नाहीत त्यामुळे लोकशाही पुरेशी परिपक्व नाही असा दावा करत लष्कर सत्ता आपल्या हातात राखू शकते. यातून एखादा नवीन मुबारक, सद्दाम वा झिया-उल-हक निर्माण होईल.

६. लोकशाही रुजू देण्यापेक्षा मुबारकसारखा एखादा हुकुमशहा असणे अमेरिकेच्या दृष्टीने सोयीचे आहे. त्यामुळे ती शक्यता मोठी आहे. एखाद्या मुस्लीम देशात लोकशाही रुजली तरी - धार्मिक प्रभावामुळे - ती अमेरिकाधार्जिणी राहण्याची शक्यता नगण्य आहे.

या सार्‍या मुद्द्यांकडे पाहता, तुमचा 'कदाचित' २४ पॉईंट, बोल्ड-फेस मधे लिहायला हवा. आमचे मत नव्या हुकुमशाहीलाच (जी अमेरिकाधार्जिणी असेल.)

इजिप्त मध्ये येत्या दिवसात कशी लोकशाही निर्माण होईल हे पहावे लागेल. पण लोकांच्या लोकशाहीविषयीच्या आकांक्षा आणि ज्या प्रकारे ताहरिर चौकात अहिसात्मक पद्दतीने व संयमाने आंदोलन चालवले गेले ते फारच वाखाणण्यासारखे आहे.(मध्यपुर्वेतील इतर देशात काय घडले असते याची कल्पना करता येईल). त्यामुळे इजिप्तमधल्या लोकशाही विषयी फार चिंता वाटून घेऊ नये. याविषयीची संविस्तर माहीती येत्या काही दिवसात इटरनेटवर येइलच जिज्ञासूंनी ती जरूर वाचावी.
अमेरिकेची सुरवातीची प्रतिक्रिया सावधच होती. पण मुबारक पायउतार झाल्यावर बराक ओबामांनी केलेलं भाषण फार चांगलं आहे. अमेरीकेच्या यापुर्वीच्या कुठल्याही अध्यक्षांची अशी प्रतिक्रिया आली नसती. ओबामा गांधी व मर्टिन ल्युथर किंगचे अनुयायी असल्यामुळे असे असेल. ओबामा व इतर देशांच्या प्रतिक्रीया यांच्या तुलनेसाठी खालील लिंक पहा. मिसर (इजिप्त)मधील क्राती विषयी संविस्तर प्रतिक्रीया नंतर देईन..
http://www.america.gov/st/texttrans-english/2011/February/20110211170758...

http://en.wikipedia.org/wiki/International_reactions_to_the_2011_Egyptia....