१४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
10 Feb 2011 - 12:23 pm
गाभा: 

णमस्कार्स लोक्स ,

अ‍ॅज यु वॉल णो .. चवदा फेप्रुवारी येऊन घातलेली आहे ... बरेचशे तुंबलेले बोळे मोठ्या मोठ्या अपेक्षा मनात ठेउन ह्या दिवसाची गेल्या पंधरा फेप्रुवारी पासुन वाट बघत आहेत... काहींच्या गाड्या सुटल्या तर काहींना गाडया भेटल्या .. काही भेटलेल्या गाडीतुन उतरले आणि पुन्हा नव्या गाडी मागे धावत आहेत ... काही मात्र अजुनही त्या गाडीला लटकुन आहेत ..

तर अशा सगळ्यांच्या भावनांचा विचार करुन एक जनहितार्थ धागा काढावा अशी हाक मला अंतर्मनातुन आली . आणि हा धागा काढल्या गेला. आपण सगळे तर जाणतात, मिपावर कशाची मदत मिळत नाही ? गुलाबजामाच्या उरलेल्या पाकाचं काय करायचं ? पासुन ते " फाटलेल्या चड्ड्या पुन्हा कशा वापरात येतील " इतपर्यंत .. "गॅस ची शेगडी कुठली चांगली ? " पासुन ते "डब्बा कुठे चांगला भेटतो " पर्यंत . "हनुमान चालिसा स्तोत्रा " पासुन ते "दत्ताच्या आरत्यां" पर्यंत .. मिपाकरांनी दर वेळी असेल नसेल तेवढी त्यांच्या ज्ञानाची पोतडी सकल जनांसाठी नेहमीच रिती केली आहे . मिपा करांच्या ह्या चांगल्या स्वभावाचं आणि मोठ्या मनाचं , औदार्याचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे.

तेंव्हा मोठ्या अपेक्षेणे हा काथ्याकुट काढत आहे, आपण सगळे जाणताच .. मिपाचा वाचक वर्ग सगळ्या वयोगटातला आहे. तसेच आता तो अधिक विपुल संख्येतही आहे. तेंव्हा सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे हा धागा.

मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे. जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का? आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ? त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ?
एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा .

कृपया ह्या शुभकार्यास हातभार लावावा . देव तुमचं घर पोरासोरांनी भरुन टाकेल :)

"अखिल मानवजातीय पुरुष उमेद्वार हितार्थ जारी "

- टारझन

प्रतिक्रिया

पियुशा's picture

10 Feb 2011 - 12:30 pm | पियुशा

विनायक पाचलग's picture

10 Feb 2011 - 6:05 pm | विनायक पाचलग

योग्य वयात फेसबुक वर असण्याचे फायदे घेत आहे !!!! ;) ;)

कवितानागेश's picture

10 Feb 2011 - 12:52 pm | कवितानागेश

मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे.
अन्याय, अन्याय!
बिन्सुंदर मुली पण शेवटी मुलीच असतात ना!
त्यांना पण काही भावना असतात! ;)
सुंदर, बिन्सुंदर आणि इतर अशा सगळ्या प्रकारच्या मुलींना प्रपोज करण्यात यावे ही विनंती/ धमकी!

जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ?
जास्तीत जास्त सक्सेस्चा अर्थ एकाच वेळेस जास्तीत जास्त मुलींनी (सुं.बिन्सुं. व इ.) लाजून, मुरकून 'व्हय' म्हणावे असा आहे का?
कशाचीही प्रोबॅबिलिटी वाढवायला मिपावरचे 'स्टॅटिस्टिक्स' वर का.कू. करणारे दिग्गज मदत करतीलच.
किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ?
ते अण्तर मुलीच्या उंची व तिच्या हाताच्या लांबी सापेक्ष बदलेल.
तिची 'पोच' कुठपर्यंत आहे हेदेखिल आधीच 'परीक्षा करून' तपासून पहावे.
पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का?
नाय बा!
या हंगामात रबी पिके साम्भाळावीत. आंब्याचा मोहोर सांभाळावा.
सेन्सेक्स घसरतोय. स्टॉक्स्मध्ये पैसा गुंतवावा. फालतू, महागड्या गिफ्टस्मध्ये फायदा दिसत नाही.

आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ?
जे मुलांना मुलींमध्ये हवे असते तेच सगळे!

त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ?
तिचे दुसर्‍याशी लग्न झाल्यानंतरसुद्धा तिच्या मागे मागे करुन! ;)

एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा .
पास.
मझ्या कविता चोरीला जाउ देनार नाही मी कधीच!

कृपया ह्या शुभकार्यास हातभार लावावा . देव तुमचं घर पोरासोरांनी भरुन टाकेल

ठांकू! ;)

अन्याय, अन्याय!
बिन्सुंदर मुली पण शेवटी मुलीच असतात ना!
त्यांना पण काही भावना असतात!

कर दी ना छोटी बात .... तुम्ही भावणा दुखावल्यात प्रेमविरांच्या .. कारण प्रेमात पडलेल्या प्रत्येक प्रियकराला आपली प्रेयसई सुंदर दिसत असते... आपलं चॅलेंज आहे ... कोणी प्रेमवीर असेल ज्याला आपली प्रेयसी सुंदर वाटत नसेल तर सांगा .. आपण ताबडतोब वाक्य मागं घेऊ :)

बाकी प्रतिसाद भारीच :) अजुन येऊन द्या :)

नरेशकुमार's picture

10 Feb 2011 - 1:54 pm | नरेशकुमार

प्रेमात पडलेल्या प्रत्येक प्रियकराला आपली प्रेयसई सुंदर दिसत असते... आपलं चॅलेंज आहे ... कोणी प्रेमवीर असेल ज्याला आपली प्रेयसी सुंदर वाटत नसेल तर सांगा ..

जोरदार सहमती.

तु तर एकदम अनर्थाचा अर्थ केलास.

गवि's picture

10 Feb 2011 - 2:14 pm | गवि

टारबा आणि नकु दोघांशी दणदणीत सहमती.. "अनर्थाचा अर्थ" आवडले..

दिल आया गधी पे तो परी भी क्या चिज हय

अवलिया's picture

10 Feb 2011 - 1:01 pm | अवलिया

हम्म. तसे एखाद्या मुलीला प्रपोज करण्यासाठी १४ पेबुरवारी हवाच असे नाही. पार्श्वभागात दम, फासे उलट पडल्यास दुसरीकडे वळून पहाण्याची तयारी एवढ्या दोन गोष्टी आणि महत्वाचे म्हणजे जिला प्रपोज करायचे तिने हो म्हटले तर स्विकारायची तयारी असेल तर कोणताही दिवस शुभ.

शक्यतो पोरींच्या मागे लागु नये, त्यांच्याकडे दुर्ल़क्ष केले की त्याच आपोआप लाईन देतात असा अनुभव आहे. स्वजबाबदारीवर दुर्लक्ष करुन पडताळा घ्यावा, हातचे सुटल्यास आम्हाला बोल लावू नये. काही काही शायंटीस्टलोक पण असेच बोलतात ब्वा http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-1354817/Playing-hard--Men... !

टारझन's picture

10 Feb 2011 - 1:44 pm | टारझन

णाणा , तुम्ही उलटीचं औषध देऊन म्हणताय .. जर जुलाब लागले तर जबाबदार नाही ... आहो कसं काय घ्यायचं मग हे औषध :(

वपाडाव's picture

14 Feb 2011 - 1:42 pm | वपाडाव

नाना,

महत्वाचे म्हणजे जिला प्रपोज करायचे तिने हो म्हटले तर स्विकारायची तयारी असेल तर कोणताही दिवस शुभ.

अस्सेच झाले एकदा....
आम्ही एका टवळीला प्रपोज करायला म्हून गेल्तो. तिला यवडा घाम सुटला अन ती पळून गेली, माज्या येका दोस्ताला सांगत व्हती, मी प्रपोज केल्याचं. नंतर इचार केला जर तिन "व्हय" मनली आस्ति तर काय र्हायल व्हत आमच???? ;-)

नरेशकुमार's picture

10 Feb 2011 - 1:08 pm | नरेशकुमार

......................... अशी हाक मला अंतर्मनातुन आली .

च्या मारी ! हा रोग तुला पण जडला का ?
मला वाट्टे हा रोग फकस्त मोठ्ठ्या मोठ्ठ्या लोकास्नी होतो.

मला सांगा एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे.

तिच्या बरोबर तिचे भाऊ नसताना तिला भिडावे.

जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ?

प्रेमाने नाही म्हटले तरी तो सक्सेसच आहे.

किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे

डोक्यावर हेल्मेट घालुन प्रोपोज मारावे.

पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का?

पोरिंना पटविन्याचा हंगाम १२ महिने १८ काळ असतो.

आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ?

मनी आनी हनी

त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ?

तीला जळवुन, तिच्या समोर दुसर्‍याच पोरीला पटविन्याचा प्रयत्न करा.

एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा .

हे असलं रोमँटिक फीमँटिक आपल्याला काय जमत नाय.

वपाडाव's picture

14 Feb 2011 - 1:43 pm | वपाडाव

+१

वेताळ's picture

10 Feb 2011 - 1:08 pm | वेताळ

राजश्री मॅडमनी काय करायचे?त्यानी प्रपोज केले ते चुकले काय? तो हंगाम योग्य नव्हता काय?
ह्यावर देखिल प्रकाश टाका.

राजश्री म्याडम चा मंगळ अतिषय स्ट्राँग असावा .. आणि त्याची शांती झाली नसावी ... त्यांच्या ग्रहांची लोकेशण पण काही ठिक नव्हती म्हणे .. त्यात त्यांना भेटला छोटासा णेपच्युण .. त्याला काय करायचं तेच माहिती नव्हतं .. मग काय होणार ?
असो , जास्त प्रकाश युयुस्तु सारखे जाणकार टाकतील ;)

अवांतर : चौदा फेब्रुवारी चे ग्रहयोग आणि होकार - नकार यांचा काही संबंध आहे काय ? :)

अवलिया's picture

10 Feb 2011 - 1:45 pm | अवलिया

णेपचुण नाही प्ल्युटो रे.. नेपचुन मोठा आहे
प्लुटो आणि प्लुटॉनिक काही संबंध असाव्वा का ?

टारझन's picture

10 Feb 2011 - 1:51 pm | टारझन

हो हो .. तेच तेच ... लांबुन मॉठा दिसला होता पण कसा ..
असो .. मला एक सांगा ... माणवाने आकाशात सोडलेले उपग्रह पण माणवाच्या राषीभविष्यात लुडबुड करतात का ? :)
म्हणजे कुंडलीतल्या एखाद्या स्थानात घर करुन बसतात का ? जर चंद्रमा करु शकतो तर बाकी उपग्रह पण करु शकतात असे वाटते.
जाणकारांनी प्रकाष टाकावा :)

- मिपाचे जाणकार

यावर एक धागा काढावा असे मी सुचवतो. या धाग्यावर ती चर्चा अवांतर होईल

परिकथेतील राजकुमार's picture

10 Feb 2011 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार

टार्‍या लेका परवानगी घेउन काढला आहेस ना धागा ? का पाठवु लिंक तिकडे ? ;)

बाकी प्रेम ह्या क्षेत्रात शून्य अनुभव असल्याने ह्याबद्दल फक्त जाणकारांच्या प्रकाशाने डोळे दिपवावे म्हणतो.

तुंबलेले बोळे मोठ्या मोठ्या अपेक्षा मनात ठेउन ह्या दिवसाची गेल्या पंधरा फेप्रुवारी पासुन वाट बघत आहेत...

अब्बे सक्काळी सक्काळी एकाने फोन केला मला आणि म्हणे "प्लिज मला ते 'अज दिन चढेया..' चे हिंदी लिरिक्स शोधून देच !" एक पिझा खायला घालायला तयार झाला. =)) त्याला शोधून दिले आणि कहर म्हणजे त्यातल्या चार ओळी मी पण चेपुच्या स्टेटसला टाकुन दिल्या ;)

टार्‍या लेका परवानगी घेउन काढला आहेस ना धागा ? का पाठवु लिंक तिकडे ?

=)) =)) =)) तुम्ही चिमटे काढायची संधी काय सोडु णका .. :)

एक पिझा खायला घालायला तयार झाला. =))

रोफ्ल ... आपणंच सांगितलेला .. सीसीडी मधला "किपिचिनो" चा सिन आठवेश =))

त्याला शोधून दिले आणि कहर म्हणजे त्यातल्या चार ओळी मी पण चेपुच्या स्टेटसला टाकुन दिल्या

हा हा हा .. पब्लिकचं हल्ली फेसबुक अ‍ॅडिक्शन वाढलंय .. कुठे तरी वाचलं होतं .. एक पोर्‍या पोरी ला प्रपोज करतो , ती हो म्हणते तर हा भावड्या डायरेक्ट पळतंच सुटतो .. पोरगी म्हणते काय रे कुठे चाललास .. तर पठ्ठ्या म्हणतो .. कैनै .. जरा फेसबुक वर स्टेटस अपडेट करुन येतो =))

बाकी आतापर्यंत मला " फक्त मिसळपावमुळे" या अप्रतिम काव्याचे विडंबण करुन मिपा ऐवजी पोरीचं नाव टाकुन तिला देण्याचे अफलातुन पर्याय सुचत आहेत :)

चुचु सारख्या जाणकारणीच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत् :) ती एक प्रांजळ प्रतिक्रीया देते ;)

चुचुआत्या सध्या ध्यानाच्या बदल्यात कढई मिळते का शोधात आहे. मागच्या हलव्याच्या वेळेस जळालेली कढई अजुन निघत नाही असे काहीसे म्हणत होती. खरे खोटे माहित नाही

अवलिया's picture

10 Feb 2011 - 1:50 pm | अवलिया

किंचित सुधारणा -
'ध्यानाच्या' आणि 'बदल्यात' या मधे 'कपड्यांच्या' हा शब्द वाचावा ही विनंती.

नितिन थत्ते's picture

10 Feb 2011 - 5:04 pm | नितिन थत्ते

वरील सुधारणेमुळे 'ध्यान' नाराज होण्याची शक्यता किती असेल?

छोटा डॉन's picture

10 Feb 2011 - 1:49 pm | छोटा डॉन

>>बाकी प्रेम ह्या क्षेत्रात शून्य अनुभव असल्याने ह्याबद्दल फक्त जाणकारांच्या प्रकाशाने डोळे दिपवावे म्हणतो.

+१, हेच म्हणतो.
इतरांचे प्रतिसाद वाचण्यास उत्सुक, आमचे कसले आलेय प्रेम न काय काय अजुन.
असो.

- छोटा डॉन

घ्या डॉनराव .. आहो तुमच्या सारख्या नौजवाण , हुशार , आणि उमेदीच्या तरुणांसाठीच तर आम्ही धागा सुरु केलाय ना ? ह्यातुन बर्‍याच तरुणांना ( काही काकांना पण होऊ शकतो , हु नोज ? ) फायदा होणार :)

- ( जनहितचिंतक ) टारझन

छोटा डॉन's picture

10 Feb 2011 - 1:59 pm | छोटा डॉन

प्रपोज करणे आणि त्यातल्या तत्सम काळज्या हे सगळे एखादी 'सुंदर पोरगी' मिळाल्यानंतरचे प्रकार आहेत.
तुर्तास आम्हाला ह्याचा अजिबात उपयोग नाही. धागा बुकमार्क करुन ठेवतो, एखादी सुम्दर कन्या मिळाली की ह्यातले सल्ले वाचुन प्रपोज करीन असे सांगतो.
सध्या आम्ही केवळ प्रतिसाद वाचुन मनोरंजन करुन घेऊ.

बाकी चालु द्यात :)

- छोटा डॉन

माझीही शॅम्पेन's picture

10 Feb 2011 - 1:51 pm | माझीही शॅम्पेन

माझे दोन सेंट्स - १३ लाच प्रपोस मारा , १४ ला जास्त स्पर्धा असते , १३ ला हो म्हटल तर १४ ची सोय होते नाहीतर १४ ला बॅक-अप / DRP प्लान कामास येतो :)

अनुभवी !

टारझन's picture

10 Feb 2011 - 1:56 pm | टारझन

एक शंका : जर १५ ला प्रपोज मारले तर ? उरल्या सुरल्या माला मधे सापडण्याचे जास्त चाण्स नाही असु शकत क ? :)

माझीही शॅम्पेन's picture

10 Feb 2011 - 2:02 pm | माझीही शॅम्पेन

ओके !!
कुठलीच शक्यता नाकारता येत नाही , क्लीयरांस मध्ये चांगला "माल" हाती लागण्याची शक्यता आहे , पण मग नऊ महिने (बाल-दिन) पर्यंत थांबणार आशालील तर पॅकेज डील पण मिळेल ;)

कृपया मामा बणण्याच्या टिप्स णकोत :) त्या सगळ्यांना ठाऊक असतीलंच .. त्यासाठी विषेष काही करावं लागत नाही :) नुस्तं बसुन राहिलं तरी मामा होता येतं :)

माझीही शॅम्पेन's picture

10 Feb 2011 - 2:49 pm | माझीही शॅम्पेन

माणूस हा एक क्षणाचा प्रिय्कर आणि प्रपॉजल आपटल तर अनंत क्षणाचा मामा असतो ( अस आमाचच सू-वाक्य आहे)

बाकी अधिक तयारीसाठी फूडचा धागा गुंडाळून बघा (छोट्या डॉना यांचा मास्टर-पीस)

http://www.misalpav.com/node/996

जर नाही उत्तर आल तर न्यूक्लियर डिसेप्शन" सगळे भाग एका दमात सांगतो अशी धमकी देऊन बघ

अजुन एक चांगला धागा पहिला होता ज्याच्यावर एक दिवसासाठी काय प्लान करता येईल ह्या बद्दल बर्‍याच मिपाकरणी तारे तोडले होते :) पण दुवा सापडेना

चिंतामणी's picture

10 Feb 2011 - 5:50 pm | चिंतामणी

कृपया मामा बणण्याच्या टिप्स णकोत

एव्हढी ताकद कोणाची आहे रे?????

विनायक प्रभू's picture

10 Feb 2011 - 1:53 pm | विनायक प्रभू

काय सांगताय डॉन राव?
कमालच झाली म्हणायची.

छोटा डॉन's picture

10 Feb 2011 - 1:56 pm | छोटा डॉन

मास्तर, त्यात कसली कमाल ?
आम्हाला 'प्रेमाचा' अनुभव नाही म्हणलो तर ह्यात कमाल कशी असु शकते ? ;)

- (आश्चर्यचकित) छोटा डॉन

विनायक प्रभू's picture

10 Feb 2011 - 1:59 pm | विनायक प्रभू

नाही?
हीच कमाल आहे?

टारझन's picture

10 Feb 2011 - 2:04 pm | टारझन

ओ मास्तर ... माहित असेल तर सल्ले द्या ... उगाच डॉण्याच्या कमाली ची काय कमाल करताय ? आमचा डॉण्यावर पुर्ण विष्वास आहे ... डॉण्या तु लढ रे आम्ही आहोत कापडं संभाळायला !!

मास्तर .. एखादी जाणकार प्रतिक्रीया द्यावी ... लोकांचे सिमकार्ड एक्पायर होण्या आधी !!

विनायक प्रभू's picture

10 Feb 2011 - 2:49 pm | विनायक प्रभू

भरपुर आहे रे टारबा.
पण तो प्रबंध होइल.
सर्व फ्रेम ऑफ रेफरन्स चा विचार करुनच वन टू वन योग्य राहील.

कच्ची कैरी's picture

10 Feb 2011 - 2:27 pm | कच्ची कैरी

तु ना टारझन एखाडी अडाणी मुलगी शोध तिचे तुला होकार देण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा एखादी अशी मुलगी जिचे मिसळपावला खाते नसेल किंवा जिचे मिपाला खाते असुन तुझ वरीजनल नाव जिला माहित नसेल अशी किंवा एखादी मुक बधीर किंवा एखादी बिनडोक किंवा एखादी ...............

मी पोरी कशा णिवडाव्या ह्यावर सल्ला मागितलेला नाहीये :) तुम्ही आडाणी दिसता ;)

पोरींच्या णकारात पण होकार असतो असे जाणकार म्हणतात ..
समजा , जर आम्ही तुम्हाला प्रपोज केले ( फक्त समजा ) तर तुमचा णकार असेल का होकार ? ;)

- अंब्याचा करंडा

कच्ची कैरी's picture

10 Feb 2011 - 3:14 pm | कच्ची कैरी

जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ?
असे आधीच तुम्ही विचारल्याने मी वरील सल्ल दिला आहे आणि तुम्ही मला प्रपोज कराल अस गृहित धरल फक्त समजा म्हणुनही घेतले तरी माझा नकार आणि नकारच असेल

टारझन's picture

10 Feb 2011 - 3:17 pm | टारझन

आपल्या णकारा मुळे अंमळ गुदगुल्या झाल्या ...

बाकी आत्ताच हाती आलेल्या माहिती णुसार , कानाखाली खायची वाचवायचे असेल तर निवडुंगा सारखी दाढी वाढवावी .. पोरींचे हात आधिच कोमल असल्याने ते मारण्याची रिस्क घेत नाही...

आमची उंची जास्त असल्याने पोरींचे हात पोचुच शकत नाही तेंव्हा .. :) :) :) (हल्ली पोरी स्टुल बरोबर घेउण फिरतात असं ऐकलंय .. खरंय का ? कुठे गेले जाणकार .. बॅट्री मारा हो )

सूर्यपुत्र's picture

10 Feb 2011 - 4:21 pm | सूर्यपुत्र

साक्षात लव्ह "गू"रू ला अश्या मदतीची गरज वाटावी.....
काय आहे "गू"पीत? ;)

-सूर्यपुत्र.

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Feb 2011 - 8:34 pm | लॉरी टांगटूंगकर

अरे भौ ;निवडूंगा सारखी दाढी वाढवली कि सक्सेस ची प्रोबाब्लीती कमी होते ना.
optimization झाले पाहिजे

मला सांगा

एखाद्या सुंदर मुलीला कसे प्रपोज करावे. जास्तित जास्त सक्सेस ची प्रोबॅबिलीटी कशी वाढवावी ? किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? पोरगी पटवण्यासाठी आताचा हंगाम उत्तम आहे का? आजकाल मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ? त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ?
एखादी रोमँटिक कवीता / चारोळी / धडा , किंवा विषय किंवा स्टाईल किंवा जे काही म्हणुन सुचेल ते सांगा .

जनहिताची कळकळ लक्षात आली का ?

पर्नल नेने मराठे's picture

10 Feb 2011 - 2:41 pm | पर्नल नेने मराठे

खरे प्रेम असेल तर एक गुलाबाचे फुल घेउन जावे व एका गुढघ्यावर उभे राहुन मस्त फिल्मी प्रपोज करावे. उगाच जास्त विचार करु नये. कानाखाली वैगरे जाळचे दिवस गेलेत आता. होकार किवा नकार येइल फक्त. पण मग होकार आला कि गिफ्ट्स देत राहावे वारंवार ...नाहीतर जाळ निघु शकतो ;)

बाकी नानाचा सल्ला योग्य वाटला नाही. मुलींना भाव द्यावा लागतो नाहितर मुली ढुन्कुनही बघत नाहीत आणी तुमचा आयडी जि तॉक वरुन दिलिट होउ शकतो =))

तुर्तास इतके पुरे.

. पण मग होकार आला कि गिफ्ट्स देत राहावे वारंवार ...नाहीतर जाळ निघु शकतो

=)) =)) =)) ही पोरगी अगदी कहर आहे =)) =))

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Feb 2011 - 2:46 pm | llपुण्याचे पेशवेll

या सगळ्या विभागात आम्ही अगदीच अनभिज्ञ आहोत.

पर्नल नेने मराठे's picture

10 Feb 2011 - 2:51 pm | पर्नल नेने मराठे

पुप्स बस क्या यार ;)
हमको उल्लु मत बना. हम अलिबागसे नही आये.

नगरीनिरंजन's picture

10 Feb 2011 - 3:06 pm | नगरीनिरंजन

पुप्स????
=)) =))

नगरी ष्टाईलमध्ये लवशिप देणार का विचारायचे (आता काय विचारतात म्हायती नाय). पोरगी आपल्याला वाटते तशी असंल तर घाबरून नाही म्हणायची किंवा लाजून हो म्हणायची. बाराची असेल तर केवढ्याला घेणार असं विचारून लाजवायची किंवा तोंड रंगवायची.
तरीपण न लाजता फ्रेंडशिप तरी दे म्हणणार्‍यांचे काम व्हायचे बहुतेकवेळा.
मागं मागं करून मागणे हा यशाचा मंत्र होता आणि आहे. तो ज्याना जमत नाही ते आमच्यासारखे नुस्ते लांबून बघत बसतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Feb 2011 - 3:32 pm | llपुण्याचे पेशवेll

आहे ते आहे चुचुआत्ते.

कानडाऊ योगेशु's picture

10 Feb 2011 - 2:58 pm | कानडाऊ योगेशु

अरे त्या कुठल्या तरी चित्रपटात आहे ना प्रसंग..
मागुनच तुला आवडणार्या मुलीला " आय लव यु" म्हणुन प्रपोज मार.ती मागे वळुन पाहील.
ती हसली तर ठिक.
चिडली तर "कैसे फसाया दिदि को..कैसे फसाया दिदिको.." (हिंदीतच बोल) असे म्हणुन उड्या मारत कल्टी मार.
हाय काय अन नाय काय..

अजुन एक बी धासु सल्ला नाही आला........

पर्नल नेने मराठे's picture

10 Feb 2011 - 3:05 pm | पर्नल नेने मराठे

मनराव तुम्ही मनात मांडे खाउ नका =)) तुमच्या मनात कोणता ढासु सल्ला आहे तो द्या .

टारझन's picture

10 Feb 2011 - 3:11 pm | टारझन

चुच्स . .. आपल्या प्रेयशी ला एखादी " मसालाडिष ढासु स्टाईल " खाऊ घातली तर ? हो म्हणेल ? :)

अवलिया's picture

10 Feb 2011 - 3:12 pm | अवलिया

डिपेंडस ! ति अधिकाराच्या जागेवर असेल तर फेकुन मारेल

टारझन's picture

10 Feb 2011 - 3:18 pm | टारझन

=)) =)) =)) बरोबर .. ऐण ठायमाला कॉण आक्षेप घ्यायचा उगाच =))

मुलूखावेगळी's picture

10 Feb 2011 - 3:21 pm | मुलूखावेगळी

आपल्या प्रेयशी ला एखादी " मसालाडिष ढासु स्टाईल " खाऊ घातली तर ? हो म्हणेल ? Smile

सुगंध घेउनच पळुन जाइल.
बाकि जरा गायन, वाद, न्रुत्य कला ह्यातले काही जमतेय का बघा.

वपाडाव's picture

14 Feb 2011 - 2:08 pm | वपाडाव

गायन वाद्य नृत्य...

म्हणजे तुनतून/डफ हातात देण्याची क्लृप्ती शोधताय म्हणा की तुमी...
किंवा मग बोटावर नाचवणार त्या बिचार्याला...
-सर्वासारखी

१४ फेब्रुवारी सोडून कोणत्याही दिवशी जमेल त्या पोझ मधे प्रपोझ करावे (मारू नये..).

अवलिया's picture

10 Feb 2011 - 3:23 pm | अवलिया

तूझ्या डॉलीचा काय प्लॅन आहे रे यंदा ?

टारझन's picture

10 Feb 2011 - 3:29 pm | टारझन

काय माहित नाही बा ... फेस्बुक वर अपडेट टाकेल तेम्व्हा समजेल :) तुमच्या टॉम्याचा काय प्लान ?

मनराव's picture

10 Feb 2011 - 3:32 pm | मनराव

टारबा,
अच्छा म्हनून डोलीसाठी अता पसूनच हा स्पेशल धागा काढलास.....

पर्नल नेने मराठे's picture

10 Feb 2011 - 3:40 pm | पर्नल नेने मराठे

आम्च्या इकडे एक डॉली पोळ्या करुन विकते =))

नरेशकुमार's picture

10 Feb 2011 - 6:23 pm | नरेशकुमार

पोळ्यांचा रेट काय आहे ?
पोळ्या चवीला कश्या असतात ?
पोळ्या मउ असतात कि कडक ?
पोळ्या बरोबर तोंडी लावायला भाजी मिळते का ?

पन्नाशी भरली बगता बगता.......

मागे तुच एकदा तुझ्या एका लेखात सांगितल होतस तेच सांगतो.. तिच्या समोर तिच्या मैतरणीला लाल गुलाबाच फुल नेउन दे ;)
आणि मग पुढे घडणार्‍या प्रसंगांना धिराने तोंड दे. =)) =))

प्रकाश घाटपांडे's picture

10 Feb 2011 - 4:50 pm | प्रकाश घाटपांडे

टार्‍या आदुगर प्रपोशन पघ मंग प्रपोजलच बोल!

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Feb 2011 - 8:44 pm | llपुण्याचे पेशवेll

वाडा कितीही मोठा असला तरी दिंडी दरवाजा एक माणूस जेमतेम आत जाईल इतकाच असतो असे आमचे एक आजोबा म्हणायचे.
असो.

टारझन's picture

10 Feb 2011 - 10:10 pm | टारझन

हा हा हा .. पण अलिकडे वाड्यालाही भलं मोठं शटर बसवलेलं असतं .. मोठं सामान आत न्यायला ..

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2011 - 8:14 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. म्हणजे प्रपोशनचा मुद्दा गौण ठरतो असे म्हणायचे का मग? फक्त प्रपोझल महत्वाचे.

आशिष सुर्वे's picture

10 Feb 2011 - 4:53 pm | आशिष सुर्वे

प्रश्नः १४ फेब्रु पेश्शल - प्रपोज कषे माराल ?:

उत्तरः तोंडाणे..

चिगो's picture

10 Feb 2011 - 5:10 pm | चिगो

किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ? <<

हेल्मेट घालून ट्राय मार...

मुलींना मुलांमधे नक्की काय हवे आहे ?<<

मागल्या जन्मी काय वेताळ होतास का रे बाबा? येवढा कठीण प्रश्न?

त्यांचं प्रेम खरं आहे ह्याची जाणिव ते त्या पोरीला कशी करुन देऊ शकतात ?<<

हॅ हॅ हॅ हॅ....

५० फक्त's picture

10 Feb 2011 - 5:21 pm | ५० फक्त

एका कागदावर घरच्या महिन्याच्या सामानाची यादि पेन्सिलने लिहा आणि तुमच्या मढ्यातल्या, म्हणजे, मनातल्या भावना, कल्पना, योजना पेननं लिहा. तो कागद द्या ज्या पोरिला द्यायचा ते, पोरी जास्त असतील तर तेवढ्या कॉप्या तयार ठेवा.

१. पोरगी कागद परत करेल, वाचता येत नाही म्हणुन. - ( स्वानुभव)
२. तिनं फक्त तुमच्या भावना, कल्पना वाचल्या आणि हो म्हणाली तर - पोरगी फक्त गैरफायदा घेईल सांभाळुन.
३. तिनं तुमच्या भावना कल्पना + यादि वाचली आणि हो म्हणाली तर - पोरगी संसार सुखाचा करेल.
४. तिनं तुम्ही केलेल्या यादित चुका काढल्या तर - लगेच खिशातुन एक राखी काढुन तिच्या कडुन बांधुन घ्या.
५. कागद तसाच परत केला - तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात, अजुन एक वर्ष स्वातंत्र्य उपभोगा.

महेश-मया's picture

10 Feb 2011 - 6:20 pm | महेश-मया

आजु बाजुला तीचा भाउ, बाप (पुरुष नातेवाईक) नाही आहे ह्याचि खात्री करुनच प्रपोज प्रेमाने करावे,
सर्वात म्ह्तवाचे जिथे कोणी नसेल अश्या ठीकानि,किंवा आपल्याला तीथे कोणि ओळ्खनार नाहि अश्या ठिकानी प्रपोज मारावा , अश्याने काय होईल जर का तीने नकार दीला किंवा ओरडली तरी आपल्याला कोणि ओळ्खत नसल्याने काहि एक फरक पडत नाहि.

>>तीने नकार दीला किंवा ओरडली तरी आपल्याला कोणि ओळ्खत नसल्याने काहि एक फरक पडत नाहि<<

ओरड्ल्यावर तुला ओळखणारं कोणी नसलं तरिहि वाहात्या गंगेत हात धुवायला कोणी मागे पुढे बघणार नाही त्याची तयारी पण ठेव......... :P

अरे मित्रा प्रपोज मारतांना नेहमी आपल्या मित्रांना सोबत न्यावे, पन त्यांना लांब उभे राहण्यास सांगावे, अश्याने काय होईल वाहात्या गंगेत हात धुवायला कोणी आलाच तर आपले मित्र वाचवायला येतील, माझ्या मते प्रपोज हा पुर्न प्लान करुनच मारवा

शिल्पा ब's picture

10 Feb 2011 - 6:28 pm | शिल्पा ब

एक छानसे फुल, कोणतेही चालेल...धोत्रा वगैरे नको..तर असे एखादे फुल द्या...एखादी छानसी ज्वेलरी शक्यतो कानातले किंवा pendent द्या...आजकाल अमेरिकन डायमंडच्या ज्वेलऱ्या मिळतात त्यातूनच घ्या आणि एखाद्या पॉश हाटेलात खायला घेऊन जा...एवढा खर्च करायच्या आधी थोडा अंदाज घ्या किंवा ऐपत असेल तर त्याची गरज नाही...
तर, गिळताना मधेच " एक विचारू का?" असं म्हणून काय विचारायचं ते विचारा...आणि हो hallmark च ग्रीटिंग कार्ड द्यायला विसरू नका.

काय झालं ते आम्हालापण कळवा.

खरं सांगायचं तर १४ पेब्रूवारी पेक्षा दुसर्या एखाद्या दिवशीच तिला मस्त सरप्राईज मिळेल आणि तुमची "हो" ऐकायची शक्यता वाढेल.

बाकी ऐपतीनुसार हाटेल, फुल, ज्वेलरी वगैरेत बदल करावा.

विजुभाऊ's picture

10 Feb 2011 - 7:01 pm | विजुभाऊ

सोप्प्य रे टारु. तू खरेतर येथे नविदिताना मार्गदर्शन करायचेस तर तुच सल्ले मागत बसला आहेस.
तसे प्रपोज मारणे सोप्पे आहे.
भग्वद गीतेचा सल्ला ऐक
कर्म करताना फळाची चिंता करायची नाही. बिन्धास्त जे करायचे आहे ( म्हणजे फक्त प्रपोज मारणेच) ते करून मोकळे व्हायचे . परिणामांची चिम्ता कशाला करायची.
जे जे होईल ते ते सहावे.
शहाणे करून सोडावे सकल जन

ए टार्‍या, या धाग्याची तुला काय गरज?
तुझं ठरलय ना लग्न्....मग गप्प बैस.
दुसर्‍यांची घरं पोरासोरांनी भरण्याची काळजी करण्यापेक्षा स्वत:च्या घराचं (आणि पोरांचं) बघा म्हणजे मिळवली.;)
तू बायकोला काय भेटवस्तू देतोयस हे सांगायचं असेल तर सांग (नसेल सांगायचं तर नको सांगूस).....मी तिला विचारीन.

ए टार्‍या, या धाग्याची तुला काय गरज?

खि खि खि .... खि खि खि ....

तुझं ठरलय ना लग्न्....मग गप्प बैस.

खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ... खॉ खॉ खॉ ...

दुसर्‍यांची घरं पोरासोरांनी भरण्याची काळजी करण्यापेक्षा स्वत:च्या घराचं (आणि पोरांचं) बघा म्हणजे मिळवली.

आहो का तुम्ही भिती दाखवता सारखी मला ? आय लव माय लोणलीणेस :) अँड माय लोणलीणेस इज किलिंग मी ... आय मस्ट कन्फेस .. .आय स्टिल बीलिव्ह .. व्हेण अ‍ॅम णॉट विथ यु आ लुज मा माईड ... गिव्ह मी अ साईड ... हिट मी समवन विथ बेसबॉल स्टिक ..... ( मी काय लिहीतोय ? )

तू बायकोला काय भेटवस्तू देतोयस हे सांगायचं असेल तर सांग (नसेल सांगायचं तर नको सांगूस).....मी तिला विचारीन.

णक्की विचारा , आय होप आय वोंट डिसपॉईंट यु :) वेळेवर खबर पोच करिन :)

सूर्यपुत्र's picture

10 Feb 2011 - 8:02 pm | सूर्यपुत्र

फक्त तोंडी प्रपोज करावे, लिखित स्वरूपातील कोणतीही मटेरीयल (उदा. ग्रीटींग, प्रेमपत्र) देऊ नये. या गोष्टी, ती जर हो म्हणाली, तर मागाहून देता येतील. पण जर ती नाही म्हणाली, तर आपण तिला प्रपोज केले आहे, याचा कोणताही लिखित पुरावा मागे सोडू नये. कारण ते मटेरीयल तिच्याव्यातिरिक्त दुसर्‍या कुणाला (भाऊ किंवा बाप) सापडले, तर तिला (आणि आपल्याला सुद्धा) जरा जास्तच प्रॉब्लेम फेस करावे लागतात.

-सूर्यपुत्र.

लॉरी टांगटूंगकर's picture

10 Feb 2011 - 8:43 pm | लॉरी टांगटूंगकर

किमान गेला बाजार कानाखाली जाळ निघणार नाही ह्या साठी किती अंतरावरुन प्रपोज मारावे ?

फोन वरुन मारावे??

कर बोंबाबोंब तुझाच फोन तुतेल !!!

टार्‍या तुला पोरींबद्दल सल्ला देणे म्हणजे कावळ्याने राजहंसाला चालणे शिकवण्यासारखे होईल. तर्रीपण सांगतो. आपण ज्या गोष्टीकडे पाठ फिरवतो ती आपल्या पाठी येते. बास्स सिंपल.

अवांतरः आमचे परममित्र डॉनराव यांच्या विस्तृत प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

प्रतिक्रीये बद्दल धन्यवाद छत्रपती सरकार ... आम्ही कसले हो पोरींबद्दल ज्ञानी ? पोरी तर आम्हाला हेट करतात :(

बाकी परमाणु मित्र डॉण आजकाल फक्त स्वतःच्या लेखांवर् प्रतिक्रिया देतात ...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Feb 2011 - 11:18 pm | निनाद मुक्काम प...

होशील का माझ्या बाळाची आई
का मी होऊ तुझ्या बाळाचा मामा
असे विचारल्याने (लोकशाहीत त्यांना पर्याय दिल्याने एखादी डाव्या व उजव्या विचारसरणीची जहालपंथीय मुलगी सुध्धा एक पर्याय नक्की निवडेल
कानाखाली जाळ वैगेरे हिंसक प्रकार होणार नाहीत .( बाकी बाबा बर्व्यांसारखा हदयापरिवर्तनावर विश्वास ठेवणारे पण खूप आहेत ह्या जगात ) तेव्हा ट्राय ट्राय बट डोंट क्राय

निनाद, अरे मेलो फुटलो वाचुन, सगळं हापिस बघतंय माझ्याकडे काय झालं याला म्हणुन.

असो, मुळ धागा टारझनचा आणि त्यावर हे असले प्रतिसाद, हे सगळे घरी रात्रीच वाचायला हवं होतं, हापिसात हे ऊघडायची रिस्कच घ्यायला नको होती.