मला कोंबडी वडया ला लागणार पिठ द्ळुन आणायच आहे.
माझ्या कडे आहे ति रेसिपि अशि आहे..
१ किलो तांदुळ-- धुवुन वालवुन घ्यायचा
१ वाटि-उडिद डाळ - भाजुन
१ वाटि चणा डाळ - भाजुन
३ चमचे धणे भाजुन
२ चमचे बडीशेप भाजुन
२५ ग्राम मेथ्या (भाजाय्च्या नाहित्...अजुन कडु होतात)
२ मुठि गहु भाजुन
वरिल सर्व एक्त्र द्ळुन अणायच थालिपिठाच्या पिठासारख..
या मध्ये अजुन काहि सुधारणा अस्तिल तर सांगा..
बाकि कोंब्डि वडे रेसिपि लवकरच फोटोसहित कोणि टाकल्यास आभारि आहे :):)
प्रतिक्रिया
9 Feb 2011 - 9:41 pm | टारझन
सुंदर आहेत रेसेपी !! अभिनव लेखण प्रकारामुळे मिपावर पाककृती लेखणाचा नविन पायंडा पडेल असे वाटते.
- दिपस्तंभ
9 Feb 2011 - 11:09 pm | शिल्पा ब
मला वाटलं की रेसीपीचं टाकलीये की काय?
9 Feb 2011 - 11:33 pm | रेवती
मी शाकाहारी आहे पण फोटू बघायला आले होते.
9 Feb 2011 - 11:36 pm | टारझन
ओये ... कोंबडी वडे व्हेजं च असतात ... त्यात काय कोंबडी णसते काय ...
अधिक प्रकाश जाणकार टाकतील
9 Feb 2011 - 11:42 pm | रेवती
माहितिये रे. शक्यतो वड्यांबरोबर चिकन करीचा फोटू असतो तो बघायला आले होते.
तुझं भारी लक्ष रे ....
9 Feb 2011 - 11:42 pm | चिंतामणी
http://www.misalpav.com/node/849
10 Feb 2011 - 2:30 am | Mrunalini
माझी आई दुसर्या दिवशी वडे करायचे असतील तर ते पीठ आदल्या दिवशीच रात्री भिजवायची व इडलीच्या पीठा प्रमाणे आंबवायची. रात्री भिजवताना त्यात एका वाटीत गरम कोळसा ठेवुन त्यावर थोडे तुप टाकुन झाकुन ठेवते. त्यामुळे दुसर्या दिवशी त्याला मस्त एक smoked taste येते.
10 Feb 2011 - 12:13 pm | स्वैर परी
माझी आई देखील असेच करते!
10 Feb 2011 - 11:09 am | कच्ची कैरी
धन्यवा द मृणालिनी आता तुझ्या आईच्या प्रमाणे हे वडे करुन बघेल.
10 Feb 2011 - 12:29 pm | Mrunalini
वडे केल्यावर त्याचे फोटो नक्की टाका. :)
10 Feb 2011 - 12:27 pm | समई
पीठ दळुन आण्ते आहे..लवकरच वडे आणि रस्सा मि पा वर फोटो मध्ये येइल :) :)
10 Feb 2011 - 5:54 pm | पर्नल नेने मराठे
पिठ कधी दळतात का ..अच्र्त...