साहित्य :
उकडलेले बटाटे - २-३
मटार वाफवुन थोडा mash केलेला - १/२ वाटी
खवलेला ओला नारळ - १/४ वाटी
बारीक रवा - १/२ वाटी
cornflour - २-३ चमचे
आले, लसुण, मिरची पेस्ट - १ १/२ चमचा
जिरे पावडर - १/२ चमचा
धणे पावडर - १/२ चमचा
लिंबाचा रस - १/२ चमचा
साखर - १/४ चमचा
मिठ चवीनुसार
shallow fry साठी तेल
कॄति :
१. बटाट्या मधे मिठ, आले,लसुण्,मिरची पेस्ट टाकुन mash करुन घ्यावे. त्या मधे cornflour टाकुन नीट एकत्र करावे.
२. पॅन मधे थोडे तेल टाकुन, त्यात आले,लसुन्,मिरची पेस्ट टाकावी. पेस्ट थोडी परतल्यावर त्यात मटार टाकावा. चवीप्रमाणे मिठ टाकुन ४-५ min वाफ द्यावी.
३. मटार शिजल्यावर त्यात जीरे पावडर, धणे पावडर टाकुन परतावे.
४. सगळ्यात शेवटी ओला नारळ, साखर आणि लिंबाचा रस टाकुन mix करावे.
५. बटाट्याचा एक गोळा घेवुन त्यात, मटारचे सारण भरुन त्याला टिक्कीचा आकार द्यावा.
६. टिक्की रव्यामधे घोळवुन तेलावर shallow fry करावी.
७. चिंच-खजुरच्या चटणी सोबत serve करावे.
प्रतिक्रिया
7 Feb 2011 - 3:46 am | वडिल
परत एक सिक्सर मारलीत मृणालीनी ताइ.
रगडा पॅटिस सारखी रेसेपी वाटते. फोटो उत्तम आला आहे.
तुम्हि आणि तुमचे मि स्वयपाकघरात रगडा पॅटिस करत फोटो काढता हे चांगले आहे. त्यामुळे मिपा करांना खुप फायदा होतो. हॉट सॉस बरोबर ट्राय केलं तर अजुन मजा येइल.
गणपा स्वत: च्या हातानेच सगळ करतो त्यामुळे रेसीपी तेवढी चटकदार होत नाहि.
7 Feb 2011 - 3:55 am | Mrunalini
आभारी आहे. :)
हो, किचन मधे मी जेवण बनवते आणि निशांत फोटो काढतो. रगडा पॅटिस मधे फक्त मटारचे सारण नसते. बाकी जवळ जवळ सारखेच आहे.
7 Feb 2011 - 4:28 am | रेवती
मृणालीनी ताईंनी पदार्थांचा धडाका लावलाय.
रोज इनो घ्यावा लागतोय सध्या.;)
फोटू पाकृ छानच.
7 Feb 2011 - 7:02 am | शुचि
मस्त!!!!
मृणाल फक्त एक सूचना. तुला बघ पटते का. - तुझ्या नावाचा वॉटरमार्क का काय टाकतेस ना तो जरा लहान आणि कोपर्यात नाही का ग टाकता येणार म्हणजे पदार्थाचे यथासांग दर्शन घडेल.
7 Feb 2011 - 9:15 am | वडिल
पदार्था चे यथासांग दर्शन होइल हे जरी बरोबर असले तरी... घातलेला वॉटर मार्क काढल्यानी फोटो खराब होउ शकतो. पुढच्या वेळेला पुर्ण काळजी घेवुन खबरदारीचा उपाय वापरा आणि छोटा वॉटर मार्क टाकता आला तर बघा. त्यामुळे इंटरनेट वरील टारगट लोकं फोटो चोरणार नाहित.
निशांतलाहि सर्व मिपाकरांकडुन पुढच्या फोटोसेशन साठि अनेक शुभेच्छा.
7 Feb 2011 - 9:32 am | चिंतामणी
बटाटा-मटार टिक्की
चिकन आचारी कबाब
जॅम आणि कोकोनट केक
सदस्य कालावधी
1 आठवडा 11 तास
भारी वाटचाल आहे तुझी.
अजून येउ द्या.
7 Feb 2011 - 9:36 am | पियुशा
यम्मि.........................
:)
7 Feb 2011 - 10:06 am | डावखुरा
आईशप्पथ कसले सॉलीड दिसतंय....
रेवती काकु मलाही द्या थोडं ईनो...
7 Feb 2011 - 10:14 am | चिंतामणी
रेवती काकु येण्याची वाट नको बघुस. घेउन टाक.
7 Feb 2011 - 10:40 am | डावखुरा
:)
7 Feb 2011 - 1:58 pm | परिकथेतील राजकुमार
कधी बोलावताय ?
7 Feb 2011 - 2:51 pm | प्राजक्ता पवार
फोटोदेखील बेस्ट !
7 Feb 2011 - 3:23 pm | ५० फक्त
फोटो व पाक्रु दोन्ही छानच, म्रुणालिनी तु मिपा जॉईन व्हायच्या आधी फक्त पाक्रु टाकायचा होमवर्क केला होतास काय ? उपहासाने म्हणत नाहीये, असं असेल तर तुझं प्लॅनिंग जबरद्स्त आहे.
येउ द्या, आता मी आणि बायकोने वाटुन घेतलं आहे - गणपाला मी फॉलो करणार आणि बाकी सुगरणींना माझी बायको,बघुया कुणाला जास्त कष्ट करावे लागतात आता.
हर्षद.
7 Feb 2011 - 3:26 pm | कच्ची कैरी
वाह एकदम ढिनच्याक ढिच्याक फोटो आहे !रेसेपीपण छानच असेल यात शंका नाही .
एक विनंती तुमच्या कॅम्याराने एक माझापण फोटो काढा ना !
7 Feb 2011 - 3:38 pm | Mrunalini
@वडिल आणि शुची
watermark चे मी नक्की लक्षात ठेवेल.
सगळ्यांची मी आणि निशांत खुप आभारी आहोत.
@कच्ची कैरी
फोटो काढायला कधीपण तयार आहे, पण मग तुम्हाला Europe ला यावे लागेल. :)
7 Feb 2011 - 8:37 pm | इरसाल
सहि................
7 Feb 2011 - 8:54 pm | निवेदिता-ताई
मस्त,..................उद्याच करते....या सगळ्यांनी खायला...(कोण कोण येताय)
8 Feb 2011 - 4:34 am | Nile
पदार्थ उत्तमच दिसतोय! मागचं पार्सल आलं नाही आमचं अजुन, पाठवलं नसेल तर ह्या टिक्क्या पण घाला की त्या बॉक्स मध्ये. :-)
माझ्यामते वॉटरमार्कही बेस्ट कॉम्प्रोमाईज आहे. मला तर वॉटरमार्क निरखुन पाहिल्यावरच दिसला. (कुठेतरी कोपर्यात तर अजिबात लावु नका, लोक क्रॉप करुन फोटो चोरतात, तोच फोटो स्वतःच्या नावाने लावतात आणि वर श्रेय देत नाहीच पण उलट, "श्रेय काय द्यायचे जालावरुनच तर घेतला आहे असे निर्लज्जपणे सांगतात)
8 Feb 2011 - 4:08 pm | Mrunalini
पार्सल पाठवले आहे. मिळेल काही दिवसात. :)
हो, तुमचे बरोबर आहे. म्हणुनच वॉटरमा़र्क मधे टाकला. फक्त थोडा मोठा झालाय. next सुपच्या फोटो मधे नीट केलाय.
8 Feb 2011 - 4:36 am | लवंगी
आतापर्यंतच्या सर्व रेसेपी/फोटो सुंदर आहेत.
8 Feb 2011 - 6:40 pm | सविता
खतर्नाक!!!!!