दंडुके मारले पाहिजे

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
6 Feb 2011 - 6:15 pm
गाभा: 

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पत्रकारांवर; खास करून इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर घसरले. ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळे खोटेच दाखवतो; खरे काहीच दाखवित नाही. यांच्यावर गंडातर आणले पाहिजे. त्यांना दंडुके मारले पाहिजे,’ अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांवर आपला राग काढला.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=134...
आमचे बोलणे स्पष्ट असते..रोखठोक असते असे सांगत उर्मट भाषेत बोलण्याची नवि भाषा व संवाद संस्कृति महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनात राबवण्यचे प्रयत्न चालु आहेत..हात तोडु..जिभ छटु..बंद करु असे म्हणणे म्हणजे रोखठोक बोलणे असे समजायचे..
गंमत म्हणजे समाजातल्या अत्यल्प अश्या समूहातल्या लोकांबरोबर ज्या मधे पत्रकार..नट..लेखक..कलाकार.व सांस्कृतिक चळवळी राबवणारे लोक आहेत यांच्या बाबतच हि भाषा वापरली जाते..
वाळु.अतिरेकि.तेल..भु माफियांच्या बाबत बोलताना हे लोक तिथे शेपट्या घालतात..

प्रतिक्रिया

अन्या दातार's picture

6 Feb 2011 - 7:05 pm | अन्या दातार

अविनाशराव, काय चुकले हो साहेबांचे? जीभाच काय, यांचे तर हात, पाय वगैरे पण छाटले पाहिजेत. किती त्या गरिब बिचार्‍या राजकारण्यांना छळावे?
आणि तुम्ही जे म्हणता कि वाळू माफिया, भू माफिया, तेल माफिया यांच्याबद्दल बोलताना राजकारणी लोक शेपुट घालतात कारण तो त्यांचा साईड बिझनेस असतो ना. मग आपल्याच धंद्याबद्दल असे वाईट-साईट बोलून स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारुन घेण्याइतके ते मूर्ख नक्किच नाहीत.
आणि मिडीया असले काहीतरी नाही ते विषय काढून त्यांना जेरीस आणायचा प्रयत्न करतात, मग त्यांना दंडुके नाही मारायचे तर काय आरती ओवाळायची?

अमोल केळकर's picture

8 Feb 2011 - 6:36 pm | अमोल केळकर

सहमत

अमोल केळकर

झंम्प्या's picture

6 Feb 2011 - 7:47 pm | झंम्प्या

आन्या,
तुझं अगदी बरोबर आहे. आणी वरती आपनंच या लोकांना डोक्यावर घेतो. निवडून देतो.

वाळु माफीयानी अधीका-याला ट्रॅक्टरखाली चिणुन मारले,

सोनावण्यांना जिवंत जाळले आणि आता.........

कुंदन's picture

6 Feb 2011 - 8:19 pm | कुंदन

साखर माफिया पत्रकारांना दंडुके मारणार.

चिरोटा's picture

6 Feb 2011 - 9:18 pm | चिरोटा

बातमीतूनच

पवार यांची मुक्ताफळे ऐकताच सर्व पत्रकार कार्यक्रमातून निघाले. हे पाहून ते पुन्हा भडकले. ‘मला माहीत आहे, हे असेच करणार. यांना तर दंडुके मारले पाहिजेत,’ असे ते म्हणताच पोलीस अधीक्षक व कमांडो धावत आले. त्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. उपस्थित सर्व पत्रकारांनी या दादागिरीच्या वक्तव्याचा निषेध केला.

आ? म्हणजे मंत्री काहीतरी बोलले आणी ताबडतोब कमांडो धावत आले मारायला?बातमी में कुछ तो काला है.
(मी घड्याळ्,चेन्,कडे वापरत नाही)

अर्धवटराव's picture

6 Feb 2011 - 10:03 pm | अर्धवटराव

संभाजी ब्रीगेडच्या प्रवर्तकांकडुन आणखी काय अपेक्षा करणार साहेब ??

(ब्रीगेडवाला) अर्धवटराव

गणपा's picture

7 Feb 2011 - 1:07 pm | गणपा

सगळेच एका माळेचे मणी.

jaydip.kulkarni's picture

7 Feb 2011 - 8:38 pm | jaydip.kulkarni

आज IBN लोकमत ला आजचा सवाल हा याच विषयावर आहे ............... बघू ......कोण काय बोलतंय ..

http://ibnlive.in.com/livestreaming/ibnlokmat/

भारी समर्थ's picture

8 Feb 2011 - 7:35 pm | भारी समर्थ

अ‍ॅक्चुली पत्रकारांना दंडूके मारून फार काही होणारच नाही. उलट ते अजूनच पेटतात. आपल्या दाढीवाल्या मामांना तत्कालीन शिवसैनिक नारायण राणे व नंतर 'पत्रकार' संजय राऊतांनी मारहाण केली होतीच की. त्यानंतर टॉनिक मिळाल्यासारखा दाढीवाल्या मामांचा अश्वमेध जो उधळलाय, तो आपण सर्वच पाहतो आहोत.

भारी समर्थ

ता.क.: युवराज उद्धव साहेबांनी तसेच सौ. सौ. सौ. निलम ताई ताई ताई गोर्‍हे यांनीही अजित पवारांचा निषेध केला. कीव करण्यासारखी गोष्ट म्हणजे, वारसाहक्काने गादीवर आलेल्या कलानगर मधील युवराजांनी दिल्लीतल्या युवराजांवर कोणत्या नैतिकतेने घराणेशाहीचे आरोप केले होते? सौ. सौ. सौ. निलम ताई ताई ताई गोर्‍हे का बोलतात हेच मुळात एक कोडे आहे.