समाज जीवनाचा आरसा- मिपा.

प्यारे१'s picture
प्यारे१ in काथ्याकूट
7 Feb 2011 - 1:22 pm
गाभा: 

बर्‍याचदा मिपावर नवीन काही आले की ते आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्यावर लोक कसे कसे असू शकतात त्याची जाणीव होते.

पानभर लेखावर दाणकन दिलेल्या पानभर प्रतिक्रिया, सटासट दिलेले संदर्भ, खपकन काढलेले जुने/ नवे मुद्दे (अनासपुरे स्टाईल), प्रतिक्रियांमधे असलेला आणि दाखवून दिला गेलेला विरोधाभास, भराभर आलल्या लिंका, एकमेकांची खेचाखेची आणि बरेच काही.....
सगळे बघितले की वाटते ही माणसे 'ल....य भारी' असतील.

काही विद्वज्जनांचे वर्च्युअल चेहरे देखील डोक्यात फिट्ट झालेत. काही लोक षटीसामाटी तरी हसत असतील का किंवा त्यांना विनोद अजिबात कळत नाही का अशा पद्धतीचे वाटतात. अतिशय पोरकट आणि खेचू प्रतिक्रियेवर आलेली समीक्षापूर्ण, गंभीर आणि पानभर प्रतिक्रिया कधी कधी ' काय शॉट आहे राव डोक्याला' असे म्हणायला भाग पाडतात.

काही लोक निव्वळ टवाळी करण्यासाठी येतात. तर काही आपले बोळे काढण्यासाठी. हे बोळेकाढू स्वतःच्या इतके प्रेमात असतात की असे वाटते प्रत्यक्ष भेटले तर गदागदा हलवून 'रां**, जरा उठून जगाकडे बघ की रे भा*' असे म्हणावे. वय किती, पगार किती, बोलतात किती???

काही लोक प्रत्यक्ष प्रचंड वैताग असले तरी इकडे 'अगदी म्हणजे अगदी सगळं कसं छान चाललंय वगैरे असं' म्हणणारे नायगावकरी.

महिला मंडळ बर्‍याचदा छानपैकी गूडीगूडी, तरल, स्वप्नांना शब्दबद्ध करणारं लिहिणारं. सन्माननीय आणि 'ठळक' हा शब्दही 'पुसट' करणार्‍या अपवादांबद्द्ल नाही मी बोलत. तो विषय वेगळा.

मिपावरील चान चान मंडळींनी बनवलेल्या तरला दलालला काँप्लेक्स येईल अशा सुंदर पाकृ बघूनच पोट भरते.

दृष्ट लागू नये म्हणून लावल्या जाणार्‍या 'काळी तीट' सारखे काही लोक आणखीच मजा आणतात. विषयाशी पूर्ण विसंगत, मी एकटाच शहाणा/णी, वास्तव जगात असलेल्या पद, प्रतिष्ठा, संपती, वय (?) यांचा कळत नकळत आलेला आणि आंतरजालावर वावरताना न सोडता आलेला अहंकार, स्वतःचेच खरे म्हणण्याची वृत्ती, त्यातून होणारे वाद विवाद मजा आणतात.

जवळपास तीन वर्षे मिपा वाचतोय. वर लिहिलेल्या गोष्टी जाणवल्या. लिहिल्या. कुणाचा हिरमोड, अपमान करण्याचा हेतू अजिबात नाहीये. एवढेच म्हणेन की हा मिसळ्पाव सगळ्यांचीच बौद्धिक भूक भागवतोय. अगदी चौरसच नाही तर सर्वरस आहार देऊन.

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

7 Feb 2011 - 1:27 pm | यशोधरा

:)

टारझन's picture

7 Feb 2011 - 1:42 pm | टारझन

उगाच नाही हं लोकं तुला " प्यारे - द कळकट " म्हणत :)

- बंडा टारझन

गोगोल's picture

7 Feb 2011 - 9:33 pm | गोगोल

माल ट्रक ढमी येत आहे.

पर्नल नेने मराठे's picture

7 Feb 2011 - 1:43 pm | पर्नल नेने मराठे

लोक कसे कसे असू शकतात हे कळले आहे तुम्हाला मग प्रत्येक आयडीचे वर्णन करा ;) मजा येइल ना!!!

मुलूखावेगळी's picture

7 Feb 2011 - 2:12 pm | मुलूखावेगळी

बर्‍याचदा मिपावर नवीन काही आले की ते आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्यावर लोक कसे कसे असू शकतात त्याची जाणीव होते.

त्या जाणीवेपेक्षा कोनितरी काहीतरी इथे लिहिते तेव्हाच ते वाचन्यासाठी लोक येतात ना भौ.
प्रतिक्रिया मधे असलेले/नसलेले नालेज/शंका दाखवले नाही तर ते कळेलच कसे ? कोनापर्यन्त जाइलच कसे?
बाकि प्रतिक्रिया ह्या लिहिनार्याच्या मूडवर डीपेन्ड अस्तात असे मला वाटते
आता आज मला खव बोर झालिये
तेव्हा प्रतिक्रिया झिन्दाबाद ;)
तुमचा नाव वाचले तेव्हा वाटले काहीतरी खारे वाचायला मिळनार
पन खरेच प्यारभरा आहे.

आनि तुम्हला खोडन्यासाठी नाही पन जीवनाचा आरसा सगळीकडेच बघाय्ला मिळतो ना
मी घराबाहेर राहते माझी प्रत्येक रुममेट वेगळी आहे.
इव्हन कंपनीतले कलिग्ज वेगवेगळ्या प्रकारची आहेत.मी तर मुलूखावेगळी आहेच.

५० फक्त's picture

7 Feb 2011 - 3:03 pm | ५० फक्त

"काही लोक प्रत्यक्ष प्रचंड वैताग असले तरी इकडे 'अगदी म्हणजे अगदी सगळं कसं छान चाललंय वगैरे असं' म्हणणारे नायगावकरी" - नावे न घेतल्याबद्दल अतिशय धन्यवाद.

बाकी आपलं निरिक्षण चांगलं आहे, असं करा तुम्ही वेगवेगळ्या कॅटॅगरी तयार करा आणि सगळ्यांना त्यांना वाटणारे आयडि ज्या त्या कॅटॅगरीत टाकु देत. लई मजा देतील.

अवांतर - तरला दलाल कोण, त्या आता रिटायर्ड झाल्या आहेत ना ?

हर्षद.

काय हर्षद राव... आमच्या हापिस च जेवण आवडलं कि नाही? ;)

आवडलं हो निश्चितच, फक्त अपवाद त्या प्लॅस्टिकच्या प्लेटचा बाकी शिरा एकदम मस्त होता, आणि पोळ्या भाजलेल्या, पुर्वी हा खानावळवाला फार चांगल्या जेवणासाठी प्रसिद्ध नव्हता. त्या पेक्षा आमचा खालचा डिके (एचसिसि जुनं कँटिन) खुप चांगला होता.

हर्षद.

पर्नल नेने मराठे's picture

7 Feb 2011 - 4:59 pm | पर्नल नेने मराठे

लन्च नंतर मोठ्या उत्साहात आरश्यात पह्यायला आले पण :( काहिच नाही.. प्यारे लिहा कि कहितरी

मस्त एकदम ..
आवडले लिहिलेले

सूर्यपुत्र's picture

7 Feb 2011 - 6:44 pm | सूर्यपुत्र

अजून एक निरिक्षण : आयडी आणि त्यांची त्यांच्या नावाशी एकदम विसंगत कॄती. उदा. : "सूर्यपुत्र." आता सूर्यपुत्र म्हटल्यावर एक कसे झगमगीत आणि तेजस्वी व्यक्तिमत्व उभे राहते की नाही? पण अज्जिबात नाही. हा म्हणायला सूर्यपुत्र, पण एवढ्या फालतू आणि आचरट प्रतिक्रिया देतो, की विचारता सोय नाही. अश्या वेळी आयडीची आठवण करून द्यावीशी वाटते......
आपल्याला काय वाटते?

-सूर्यपुत्र.

सूर्यपुत्र = शनि
शनि हा झगमगीत , तेजस्वी नसून कृष्णवर्णी , अत्यंत मंद (एकेका राशीत ७ आणि१/२ वर्षे काढणारा) असा ग्रह आहे. छायेचा पुत्र असल्याने हा तेजस्वी अजिबात नाही तर काळा आहे.

सूर्यपुत्र's picture

7 Feb 2011 - 7:03 pm | सूर्यपुत्र

तरीचऽऽऽऽऽ...!!!!
आत्ता कळाले.
आणि शनी लंगडा पण आहे का?
अज्ञानाच्या अंध:कारावर उजेड टंकल्याबद्दल आभारी आहे.

-सूर्यपुत्र.

या पहा शनिमहात्म्यातील ओळी -

शनैश्वराची मूर्ती काळी|तो जातीचा होय तेली| चरण पंगु सुरत चांगली|पूजा करी काळभैरवाची||
त्याची दृष्टी पडे जयावरी|करी तयाचा चकनाचूर|अथवा कृपा करी जयावरी|तयासी सर्व आनंदच प्राप्त होय||

होय पंगू दिसतोय शनि

मुलूखावेगळी's picture

7 Feb 2011 - 7:04 pm | मुलूखावेगळी

स्वतःचा हात स्वतःला लागत नसतो हो सुर्यपुत्र
हेच २रे कोनि बोल्ले असते तर ;)

सूर्यपुत्र's picture

7 Feb 2011 - 7:10 pm | सूर्यपुत्र

दुसरं कोणी (इच्छा असूनही?) असं तोंडावर सांगत नव्हतं. :(
कुणालातरी हे काम करणे आवश्यकच होते ना....... म्हटलं चला... :)
तुम्ही बोलता का? बोला कीऽऽऽ ;)

-सूर्यपुत्र.

मुलूखावेगळी's picture

7 Feb 2011 - 7:20 pm | मुलूखावेगळी

कुणालातरी हे काम करणे आवश्यकच होते ना....... म्हटलं चला... Smile

उत्तम

तुम्ही बोलता का? बोला कीऽऽऽ

पन मी तुम्हाला ओळखत नाही/ऑब्सर्व केले नाही आनि हे ओळख्/ऑब्सर्व केले तरी इतके डायरेक्ट अ‍ॅटॅ़क करत नाही.
चेष्टा मस्करी पर्यन्तच मर्यादित.

स्पा's picture

7 Feb 2011 - 6:57 pm | स्पा

हा हा हा हा हा

शुची ताई एकदम जबऱ्या !!!!!!

सहज's picture

7 Feb 2011 - 7:31 pm | सहज
रमताराम's picture

7 Feb 2011 - 9:17 pm | रमताराम

आम्हाला नुसताचा काळा चौकोन दिसतोय इथे. नक्की काय सुचवता आहात तुम्ही? :)
नुसत्या 'पाया'ने काय राव लोक हाताने, डोक्याने, कळफलकाने कशाकशाने लढतात, नि त्या विडोमधे दाखवले आहे तसे नक्की कशासाठी लढतायत तेच कळंना झालंय राव. एकदम समर्पक प्रतिसाद.

विजुभाऊ's picture

7 Feb 2011 - 7:54 pm | विजुभाऊ

इथे काही आयडी आहेत त्यांची नावे
खचलेला दरबार , जृंभणश्वान , अजानुकर्ण अशी आहेत त्यांचे वर्णन करता येईल का?

आत्मशून्य's picture

8 Feb 2011 - 1:06 pm | आत्मशून्य

तूम्हीबी ना वाइच शेंटी हू रायलाय, मिपाच्यानं.

असो, मस्त लीहलय थोड जास्त स्पेचिपीक आन मोठ्ठ लीवलं आस्तं तर आनं जास्त मजा आली असती.

पू.ले.शू.

मिपा वर सगळ्यात जास्त उणीव जाणतेय ती जे पी मॉर्गन यान्ची...!

अगदी सुन्दर लेख आहेत यान्चे..! सदस्य होण्या आधीपासून वाचायचो..!

'एका खेळीयाने' तर अप्रतिम मालीका होती. समाज मनाच्या आरश्याचा हा कन्गोरा विलक्षण आहे.