मंडळी फिरण्याची हौस असल्याने आम्ही वेळ मिळेल तसे राज्यभर फिरत असतो. ठिकठिकाणी जाउन तिथल्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेणे हा तर आमचा सर्वात लाडका म्हणावा असा छंद!
काही कारणाने २००९ मध्ये नागपुरला जाणे झाले, आणि तिथल्या सावजी मटण याची चव तर अप्रतिम, अजुन जिभेवर रेंगाळते आहे! पण आमच्या मातोश्री पडल्या कोकणी, त्यामुळे त्याची रेसेपी काय असेल याचा अंदाज त्यांना बांधता आला नाही.. बरं मुंबई - नागपुर हे अंतर म्हणजे मुंबई - पुणे एवढे नाही, की आले मनात तर खास तिकडचे जेवण जेवुन येउ म्हणुन वाटेला लागायला! (होय, आम्ही पुण्याच्या खाद्यसंस्कॄतीचा आस्वाद घेण्यासाठी अधी मधी वाट वाकडी करुन पुण्याला येतो!)
तर आमची मिपावरील सर्व तंत्रकुशल खानसाम्यांना याद्वारे विनंती आहे की त्यांनी नागपुरी सावजी मटणाची पाककृती इथे द्यावी, मी त्यांचा व्यक्तिश: ॠणी राहीन, तसेच सावजी या नावाबद्दल अधिक खुलासा केल्यास उत्तम!
प्रतिक्रिया
6 Feb 2011 - 9:57 pm | रेवती
माझ्याकडील एका पुस्तकात दिलेली कृती व माहिती.
पुस्तकाचे नाव: भारतीय ग्रेव्हीचे रहस्य
शेफ विष्णू मनोहर यांचे पुस्तक आहे.
पुस्तक खूपच चांगले आहे. त्यानुसार सावजी म्हणजे कोष्टी, विणकर.
मसाल्याचे साहित्य: २०० ग्रॅम कांदा पेस्ट (तेलावर तपकिरी करून वाटणे). एक वाटी आलं लसूण वाटलेले मिश्रण (समप्रमाणात घेऊन पाणी घालून वाटणे),लाल मिरच्या आठ दहा, बडीशेप १ चमचा,मसाला वेलची ४ ते ५, लवंगा २, जायपत्री १ चमचा, काळी मिरी २च., शहाजिरे २ च., धणे ५ च., खसखस पाव वाटी, ज्वारीचे पीठ ५ च्.,शेंगदाणा तेल १ वाटी, खोबरेल तेल अर्धी वाटी, २ चमचे तिखट, तेजपत्ता ४ ते ५, हळद आणि चवीपुरते मीठ.
कृती: कांदा लसूण सोडून सगळे मसाले लाल भाजून नंतर पाण्यात १० मि. उकळावेत. नंतर वाटावेत. तेलात कांदा, आलंलसूण पेस्ट परतून त्यात वाटलेला मसाला व तेजपान घालावे. शेवटीहळद, तिखट व खोबरे तेल घालावे.
मटण करताना १ किलोस चार वाट्या वरील मसाला वापरावा. मटणास दही, वाटलेली हि. मिरची यांचे मॅरिनेशन करावे. नंतर शिजवावे. ग्रेव्ही घालावी. कसूरी मेथी अर्धाचमचा, थोडा गरम मसाला व कोथिंबीर घालून शिजवावे.
तळटीप: मी शाकाहारी असल्याने हा प्रकार कधीही ट्राय केलेला नाही. आपापल्या जबाबदारीवर पदार्थाचे सेवन करावे.
6 Feb 2011 - 10:37 pm | वडिल
रेवती ताइ
धन्यवाद.
ह्या असल्या देसी रेसेपी पटकन सापडत नाहित. तुमचे अभिनंदन.
(अमेरीकेत रहात असल्या कारणाने) असले फुड खाण्याची सवय गेली आहे.
मुख्य म्हणजे तुमची रेसेपी हि डायट वर असणार्या जाड माणसांना हि उपयोगी आहे. ग्रेवी मधे तशा काहि जास्त कॅलरीज नसतात असं "ओपरा" च्या शो मधे "डॉ फिल" म्हणाले होते.
7 Feb 2011 - 12:33 am | रश्मि दाते
मी नागपुरकर आहे,ही घ्या सावजी मटणाची रेसेपी
http://misalpav.com/node/13654
7 Feb 2011 - 12:37 am | चिंतामणी
आणि करणार आहात त्या दिवशी बोलवा.
खायला.
7 Feb 2011 - 8:11 pm | चिगो
अरारारा... कसल्या कातिल गोष्टीची आठवण करुन दिली राव !? जेवणानंतर पान नक्की खा हां...
(आणि शक्यतोवर दुसर्या दिवशी महत्त्वाचे काम असल्यास हे मटण टाळलेले बरे... ;-))