जैतापूर प्रकल्प

चन्द्रशेखर सातव's picture
चन्द्रशेखर सातव in काथ्याकूट
3 Feb 2011 - 3:26 am
गाभा: 

नुकताच लोकसत्ता मध्ये जैतापूर प्रकल्पाच्या अनुषंगाने श्री गिरीश कुबेर यांचा लेख वाचनात आला त्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे नारायण राणे यांच्यावर शरसंधान केले आहे.या लेखातील मुद्द्यांचा प्रतिवाद करणारा श्री राणे यांचा आणि त्याच अंकात कुबेर यांचा लेख आहे. या प्रकल्पाच्या समर्थनार्थ आणि विरोधात जे मुद्दे मांडले जात आहेत त्या बद्दल एक सामान्य माणूस या नात्याने गोंधळ वाटतो.(कोकणातील आंब्यांना मोहोर येणार नाही नपुंसकता वाढेल आदि मुद्दे नाही).या प्रकल्पामुळे होणारे फायदे किंवा त्याचे दुष्परिणाम या बद्दल मिपा वरील जाणकार सदस्यांची मते जाणण्यास उत्सुक

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर सातव's picture

3 Feb 2011 - 3:32 am | चन्द्रशेखर सातव

वरील लेखात धागे आले नाहीत,श्री गिरीश कुबेर यांचा मुळ लेख

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=132...

श्री नारायण राणे यांचा लेख

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=133...

पुन्हा श्री गिरीश कुबेर यांचा लेख

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=133...

चिप्लुन्कर's picture

3 Feb 2011 - 2:24 pm | चिप्लुन्कर

मुळात जैतापुरात का हवा हा प्रकल्प? दुसरीकडे न्या त्या विदर्भात नाही तर लातूर नांदेड असे किती तरी जिल्हे आहेत ना?
आमच्या कोकण भकास करणारे प्रकल्प आम्हाला नकोत. एक लोटे औद्योगिक वसाहत पूर्ण पंचाक्रोशीची वाट लावते तर हा प्रकल्प की करेल याची कल्पना करवत नाही.त्यापेक्षा पर्यटन , आंबा , काजू आणि इतर कोकण मेवा उत्पादन वाढेल असे काही तरी द्या.
----------------------------
अजाणते पणाने कधी काळी पावसाळ्यात कंपनीचे विषारी केमिकल ड्रम नदीच्या पाण्यात ओतून साहेबाची शाबासकी मिळवून आता त्याच्या बद्दल नेहमी खंत बाळगणारा.

चिपळूणकर

अवांतर :
नांदेडच नाव ऐकून फार आनंद झाला बघा...
अख्या वर्षभराच्या कालावधीत चर्चेत (सर्व चर्चा) असे नांदेडच नाव कधी निघाले नव्हत ( आणी निघाले जरी असेल तरी वाचण्यात आले नाही)...

>>>मुळात जैतापुरात का हवा हा प्रकल्प? दुसरीकडे न्या त्या विदर्भात नाही तर लातूर नांदेड असे किती तरी जिल्हे आहेत ना?

पण आज जेव्हा अशी (जैतापुरातील धोक्याची? मलाही अजून माहिती नाहीये ह्यात किती तथ्य आहे ते.. पण सध्या तरी असे मानून चालूया.. ) गोष्ट समोर आली तेव्हा ह्या लोकांना विदर्भ आणी मराठवाडा (वि/म) आठवतोय होय...

>>>आमच्या कोकण भकास करणारे प्रकल्प आम्हाला नकोत.

म्हणे कोकणातील पर्यटन वाढावे नि भकास होऊ नये याची काळजी घेण्यात यावी...
प्रश्न हा नाहीये की कोकणाची दुरवस्था झाली तर काय?
आम्हालाही असे वाटत नाही की कोकणची वाट लागावी..
पण हे म्हणजे त्या गोष्टीतल्या माकडीणसारखंच झाले ना म्हणजे आपण बुडू नये म्हणून दुसर्याला बुडवा (त्याच्या छातीवर उभे राहून) ..
या आधी सगळ्या योजनांचे पैसे लाटताना काही सोयर-सुतक सुधा नव्हते वि/मचे .....
कधी आठवण पण येत नसावी..
जर हा प्रकल्प आमच्याकडे शयेडूल झाला असता तर लोक झपाटून गेले असते विकासाच्या वारयाने...
पण काय करणार दुर्भाग्य आमचे...
चांगले राजकारणी लाभले ना तुमच्या विभागांना...
शेवटी म्हणणे इतकेच आहे की,
उष्टी-खरकटी पाने आमच्या तोंडाला पुसलेली चालतील का?

मराठवाड्याचा चाहता...
"वपाडाव"

आता जाणकारांनी जैतापुराच्या प्रश्नाला हात घालायला काहीच हरकत नाही....
आणी प्रक्षोभक वाणी तसेच अवांतर बाजूला विषय नेल्याबद्दल दिलगीर...

चिप्लुन्कर's picture

4 Feb 2011 - 10:38 am | चिप्लुन्कर

कोयनेचे पाणी दारात असून ४० वाड्या तहानलेल्या मी स्वत: पाहिलेल्या आहेत . तसेच कोयना धरण क्षेत्रातले भुकंपाचा हि अनुभव घातलेला आहे . असे लहान मोठे धक्के हे लागतच असतात समजा असा एखादा मोठा धक्का जैतापुरात बसून काही घडले तर ? बाकी कोकण चा विकास करण्यास काही विरोध नाही. ( येथे जैतापूर आणि कोयना धरण अंतर किती आहे संपूर्ण कोकण भूकंप प्रवण आहे हे गृहीत धरलेले आहे.)
तारापूर ची परिस्थिती आज काय आहे हे ठाऊक आहे का? त्या लोकांनी अजून विकास पहिला नाही.
त्यांचा विकास आधी पूर्ण झाला का ते पाहावे. मग आमच्या विकासाच्या गमज्या माराव्यात
कोकण रेल्वे च्या नावा खाली काय झाले . १ सावंतवाडी , १ रत्नागिरी या २ बैल गाड्या आणि कोकण कन्या आणि मांडवी या २ सायकली आणि वर दादर सावंतवाडी चे गाजर. जमिनी गेल्या आणि त्यावर अखंड धडधडत जाणार्या परप्रांतातील सुपरफास्ट गाड्या , मालगाड्या आणि मलिदा खाणारी रेल्वे हे कोकणी माणसाने उघड्या डोळ्याने पाहिले आहे.

तेंवा जैतापुरातून नक्की कोणाचा विकास सरकार करणार हे सिद्ध करावे .

रत्नागिरीने आधीच एनरॉन पहिले आहे अंजनवेल- दाभोळ ला याचा सरकारने विचार करावा आणि मग कोकण चा विकास किती आणि कसा करणार हे सांगावे .
----------------------------------------------------------------------------------------------------
कोकणचा चाहता
विरोधकांना ' नडाव ', 'बडाव' आणि मग करतो त्यांचा ' पाडाव '
===================================
आमच्याकडे रजनीकांतची चड्डी बनवण्याची ' शिलाई मशीन ' आहे .

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Feb 2011 - 10:52 am | llपुण्याचे पेशवेll

कोकण रेल्वे च्या नावा खाली काय झाले . १ सावंतवाडी , १ रत्नागिरी या २ बैल गाड्या आणि कोकण कन्या आणि मांडवी या २ सायकली आणि वर दादर सावंतवाडी चे गाजर. जमिनी गेल्या आणि त्यावर अखंड धडधडत जाणार्या परप्रांतातील सुपरफास्ट गाड्या , मालगाड्या आणि मलिदा खाणारी रेल्वे हे कोकणी माणसाने उघड्या डोळ्याने पाहिले आहे.

१०० टक्के सहमत.

नन्दादीप's picture

4 Feb 2011 - 11:31 am | नन्दादीप

चिपळूण्कर शी १००% सहमत...

जैतापूर आधी हा प्रकलप देवगड (विजयदुर्ग) येथे होणार होता....पण जोरदार विरोध केल्याने तो रद्द झाला आणि आता जैतापूर ला होणार आहे.
विरोधाची कारणे :
१. होणारा किरणोत्सर्ग...अनुषंगाने होणारे आजार
२. पर्यावरणाचा र्‍हास....हे तर अनुषंगाने येतेच....विकास म्हणजे पर्यावरणाचा र्‍हास हे आजचे समिकरणच आहे.
३. परिसरातील महत्वाच्या नगदी पिकंवर होणारे परिणाम...आंबा, नारळ, सुपारी ई.
४. सांडपाणी निचरा - एकच पर्याय, अर्थातच समुद्र. पर्यायाने मासे तसेच ईतर मिळणारे उत्पन्न.
५. निर्माण होणारी राख...याबाबत असे गाजर दाखवले गेले की, रेल्वे मार्गे ही राख वाहतूक केली जाणार आहे...

यावेळी पण राणे साहेबांनी पाठपुरावा केला...पण ग्रामस्थांच्या विरोधात त्यांची डाळ शिजली नाही...

खरेच की. म्हणूनच तर मुंबईहून कोंकणी बोलणार्‍या गोव्यातून कोंकणी बोलणार्‍या मंगळूरास जाणार्‍या "मत्स्यगंधा सुपरफास्ट"चा उल्लेख वरच्या यादीत नाही.

ही गाडी कुर्ला, ठाणे, माणगाव, खेड, चिपळूण रत्नागिरी, कुडाळ या इतक्या महाराष्ट्रातल्या स्टेशनांवर थांबते. पण गोवा-कारवार-मंगळूर या माशाच्या दुर्गंधाने भरलेल्या ठिकाणी जाणार्‍या या "मत्स्यगंधे"त महाराष्ट्रातला कोंकणी माणूस का म्हणून बसावा? "बैलगाडीने जाईन पण गोवेकरां-मंगळूरकरांबरोबर नव्हे" म्हणत तो रत्नागिरीला प्यासिंजरने जाईल.

(अच्छा-अच्छा गोवेकर चालतात, म्हणून यादीत मांडवी एक्स्प्रेस आणि कोकणकन्या दिलेल्या आहेत काय? गोवेकरांना कारवार-मंगळूरच्या कोंकणी बांधवांबद्दल आपुलकी वाटते, तिथे प्रवास करायचा असेल... या अनैसर्गिक संबंधाचे महत्पाप कुठे फेडतील!!)

- - -
मत्स्यगंधा उदाहरणासाठी. कोंकणातून जाणार्‍या, आणि महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या गावांत थांबणार्‍या अनेक गाड्या कोंकण रेल्वे चालवते.
- - -
(जमिनीची धून जाते, शेतकर्‍यांचे पुनर्वसन करण्यात हयगय होते... वगैरे मुद्दे ठीक असतील. म्हणून हा उपप्रतिसाद चिपळूणकर यांच्या मूळ प्रतिसादाला दिलेला नाही. कोंकण रेल्वेच्या वेळापत्रकाचा भंपक मुद्दा वेगळा काढलेल्या पुपे यांच्या उपप्रतिसादाला हा उपप्रतिसाद दिलेला आहे.)

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Feb 2011 - 9:40 am | llपुण्याचे पेशवेll

हा हा हा
ही गाडी कुर्ला, ठाणे, माणगाव, खेड, चिपळूण रत्नागिरी, कुडाळ या इतक्या महाराष्ट्रातल्या स्टेशनांवर थांबते. पण गोवा-कारवार-मंगळूर या माशाच्या दुर्गंधाने भरलेल्या ठिकाणी जाणार्‍या या "मत्स्यगंधे"त महाराष्ट्रातला कोंकणी माणूस का म्हणून बसावा? "बैलगाडीने जाईन पण गोवेकरां-मंगळूरकरांबरोबर नव्हे" म्हणत तो रत्नागिरीला प्यासिंजरने जाईल.

कधीतरी या महाराष्ट्रातल्या कोकणीमाणसाप्रमाणे खेड, रत्नागिरी, चिपळूणचे तिकीट काढून बघा मिळते का ते. मला तर आजवर कधी मिळाले नाही चिपळूणपर्यंतचे तिकीट. चौकशी केली तर सांगितले जाते की चिपळूणला जायचे तर यष्टीने जा त्यासाठी रेल्वे नाही.चिपळूणला कोटा १० सीटांचाच आहे.
नुसते वेळापत्रक बघून गाड्या धावतात हे सांगणे सोपे आहे.
राहीला प्रश्न पाशिंजर गाड्यांचा तर पाशिंजर गाड्यांमधून जाणार्‍या महाराष्ट्रातील कोकणी माणूस माणूसच नाही म्हणून तथाकथित गोवा-निजामुद्दीत वगैरे 'परप्रांतीय' गाड्यांना क्लीअरन्स देण्यासाठी कुडाळ पाशिंजर रात्री ११ ते सकाळी ५ रत्नांग्रितच थांबवून ठेवतात.

मत्स्यगंधा उदाहरणासाठी. कोंकणातून जाणार्‍या, आणि महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या गावांत थांबणार्‍या अनेक गाड्या कोंकण रेल्वे चालवते.

आमच्यासाठी "मत्स्यगंधा उदाहरणासाठी. कोंकोकणतून जाणार्‍या, आणि महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या गावांत थांबणार्‍या पण तिथली तिकीटे उपलब्ध नसणार्‍ञा अनेक गाड्या कोंकोकण रेल्वे चालवते."

(अच्छा-अच्छा गोवेकर चालतात, म्हणून यादीत मांडवी एक्स्प्रेस आणि कोकणकन्या दिलेल्या आहेत काय? गोवेकरांना कारवार-मंगळूरच्या कोंकणी बांधवांबद्दल आपुलकी वाटते, तिथे प्रवास करायचा असेल... या अनैसर्गिक संबंधाचे महत्पाप कुठे फेडतील!!)

नव्हे नव्हे. शोध घेतला तर इतर अनेक परप्रांतीय गाड्या कोकणातून जातात हे कळेल. उदा. गोवा निजामुद्दीन
आणि परप्रांतीय गाड्या जायला हरकत नाही पण स्थानिकांचे अहित करून परप्रांतीय जन्मशताब्द्या आणि राजध्यान्या १३० कि.मी/प्रतितास वेगाने धावू लागल्या तर मात्र आक्षेप नक्कीच आहे.

आणि राहीली गोष्ट बिगर महाराष्ट्रीय कोकणी वगैरे लोकांचा तर त्यांचा द्वेष आम्ही करायचे काही कारणच नाही, प्रत्येक ठीकाणी कोंकणी कोंकणी करून वेगळी चूल मांडून तेच लोक इतका आमचा द्वेष करत असतात की आम्ही त्यांचा द्वेष करण्याचा कोटाही ते लोक भरून काढतात. ;)

नितिन थत्ते's picture

8 Feb 2011 - 10:15 am | नितिन थत्ते

मी २० ते २५ वेळा तरी ठाणे ते रत्नागिरी असा प्रवास या गाडीने केला आहे. (यापेक्षा कमीच वेळा मांडवी/कोकन कन्या ने गेलो असेन) तिकीट मिळण्यात कधी अडचण आली नव्हती. अर्थात उन्हाळ्याच्या सुट्टीत अडचण येतेच आणि ती कोणत्याही गाड्यांना येतेच. (म्हणजे मंगळूरला जाणार्‍यांना सहज तिकिटे मिळतात आणि रत्नागिरीला जाणार्‍यांना मिळत नाहीत असे नसते).

अवांतर : कोकण रेलवे फक्त गोव्यापर्यंतच जाणार अशी बॅ. नाथ पै यांची कल्पना होती का?

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Feb 2011 - 10:20 am | llपुण्याचे पेशवेll

अनुभव. मी ४-५ वेळा मुंबई ते चिपळूण हा प्रवास केला आहे. कारण पुण्यात राहत असल्याने कोकण रेल्वेने जायची वेळच येत नाही. जेव्हा केला तेव्हा सगळ्या वेळेला चिपळूण पर्यंत तिकीट मिळाले नाही. मग काय यष्टी झिंदाबाद.

पुपेंशी सहमती आहेच. चिपळूणापर्यंत तिकिट मिळतच नाही. ते असोच. बरं एखाद्या कट्टा, कसालकडचा माणूस असेल आणि त्यानं मत्स्यगंधेनं जायचं ठरवलंनच तर बघा तो दुपारी ३.२० ला कुर्ल्याहून सुटेल. मत्स्यगंधा ही सुपरफास्ट एक्स्प्रेस असल्याने ती 'सायडींग'ला काढण्यात येणार नाही, तेंव्हा ती ठरलेल्या वेळेप्रमाणे अर्थात रात्रौ ११.५३ वाजता कुडाळ रेलवे स्टेशनला पोहोचेल. पुढे?? ती रात्र स्टेशनवर काढायची? की कट्ट्यावर जायला किमान ४०० रूपये द्यायचे रिक्षावाल्याला - तोही तिथं असला तर!!

कुडाळ-कसाल हे केवळ उदाहरणासाठी. बाकी गोव्यातल्यांसाठी मत्स्यगंधा अजिबात उपयोगाची नाहीच. आणि हो, मत्स्यगंधा फक्त उदाहरणासाठी हो. अशा अनेक आहेत, मंगला, नेत्रावती, मरूसागर इ. इ.

असोच.

धनंजय's picture

9 Feb 2011 - 3:26 am | धनंजय

कुठलीतरी गाडी कुठेतरी रात्री पोचेलच ना?
त्या मार्गावर दिवसा आणि रात्रीसुद्धा गाड्या जाव्यात, यात सुज्ञ व्यवस्थापन आहे. रात्री गाड्या जातात आणि दिवसा गाड्या नाहीत, असे म्हणणे आहे काय?

मरुसागरने दिवसा रूळ आडवावे, हे वेळापत्रकाचे व्यवस्थापन तुम्हाला हवे आहे काय?

मत्स्यगंधा माझ्या गोवेकर आप्तांनी वापरलेली आहे. त्यांना उपयोगाची नाही की काय हे त्यांनी ठरवले आहे.

वेळापत्रकाचे काय व्यवस्थापन अपेक्षित आहे.

लांब पल्ल्याची कर्जत जलद लोकल विद्याविहारला थांबत नाही. (आताचे माहीत नाही, पण विद्याविहार, कांजुरमार्ग येथे कुठल्याच जलद लोकल थांबत नसत.) जलद लोकल या स्टेशनावरून धडधडत पुढे जाते. ही विद्याविहार येथे राहाणार्‍या मुंबईकरांची गैरसोय करून बिगरमुंबईकरांची सोय साधणे आहे काय? आणि भायखळ्याहून दादरला जाणारे-येणारे लोक जलद लोकली कितपत वापरू शकतात - बहुतेक जलद लोकल दोन्ही ठिकाणी थांबल्या तरी!

डेक्कन क्वीन पासून सुरुवात करून वाटेल तितक्या मुंबई-पुणे जलद गाड्या घ्या. मळवलीला थांबणार्‍या किती आहेत? ही पुण्यामुंबईच्या लोकांची सोय करून मळवलीच्या स्थानिक लोकांची मुद्दामून केलेली गैरसोय आहे काय?

कोल्हापूर-नागपूर महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये वर्धा-नागपूर साठी किती आरक्षित जागा उपलब्ध आहेत? ही "बृहन्महाराष्ट्रा"ची विदर्भावर कुरघोडी आहे काय? अजनी-नागपूर असे तर या गाडीत आरक्षणच करता येत नाही! म्हणजे महाविदर्भाची नागपूर-स्थानिकांवर कुरघोडी... आणि तिकडे सांगली-मिरज प्रवासासाठी कोटा नाही...

तुमच्यासाठी आदर्श वेळापत्रक कुठले, आदर्श कोटा-व्यवस्थापन त्याचे उदाहरण देऊ शकाल काय? महाराष्ट्रात कुठले नाहीच असे समजले तरी महाराष्ट्राबाहेरच्या किंवा भारताबाहेरच्या वगैरे कुठल्या रेल्वे वेळापत्रकाचे आणि आरक्षण-कोट्यांचे उदाहरण देता येईल काय?

- - -
कोकण आणि कोंकण यांतला अनुस्वाराचा फरक मला माहीत आहे. (गोव्यात "कोंकण" आणि "कोंकणी" असे लेखन प्रचलित आहे.) तो अनुस्वार खोडून तुम्ही मुळातल्या उपरोधाची सत्य-सिद्धता करू इच्छिता काय?

मी_ओंकार's picture

9 Feb 2011 - 10:29 am | मी_ओंकार

धनंजयशी १००% सहमत. हा म्हणजे मेट्रो माझ्या घराखाली थांबत नाही म्हणून मेट्रोच नको असा प्रकार दिसतो.

तीन महिने आधी जरी तिकीट काढले तरी मिळत नाही हे पटण्यासारखे नाही. कदाचित चिपळूणलाच जायचे आहे मग लवकर तिकीट कशाला काढा असा विचार असेल आणि मग महिनाभर आधी पण तिकीट मिळत नसेल. बाकी जाण्यायेण्याचे सोडा. स्टेशनवर, रिक्षा-टांगे चालवणे असे रोजगार तरी आले का?

बाकी चर्चा कोकण रेल्वे विषयी नसून जैतापूरची आहे. त्यामुळे चर्चा पुन्हा मार्गावर आणावी. कोकणरेल्वे साठी वेगळा धागा काढता येईल.

- ओंकार.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Feb 2011 - 12:45 pm | llपुण्याचे पेशवेll

वेळापत्रकाचे काय व्यवस्थापन अपेक्षित आहे.

असे म्हणूया की कोणतेच वेळापत्रक परफेक्ट नाही . पण आहे त्यात अधिक न्याय्य होऊ शकते. आणि जे आता फारच अन्याय्य आहे असे मला वाटते. आणि चिपळूण ते रत्नागिरी पट्ट्यात राहणार्‍या अनेकांना वाटते. म्हणूनच
" १ सावंतवाडी , १ रत्नागिरी या २ बैल गाड्या आणि कोकण कन्या आणि मांडवी या २ सायकली आणि वर दादर सावंतवाडी चे गाजर."
या वाक्याला १०० % सहमती दाखवली होती.

कोकण आणि कोंकण यांतला अनुस्वाराचा फरक मला माहीत आहे. (गोव्यात "कोंकण" आणि "कोंकणी" असे लेखन प्रचलित आहे.) तो अनुस्वार खोडून तुम्ही मुळातल्या उपरोधाची सत्य-सिद्धता करू इच्छिता काय?
होय आणि त्यातील वरच्याच माझ्या प्रतिसादातला हा
आणि राहीली गोष्ट बिगर महाराष्ट्रीय कोकणी वगैरे लोकांचा तर त्यांचा द्वेष आम्ही करायचे काही कारणच नाही, प्रत्येक ठीकाणी कोंकणी कोंकणी करून वेगळी चूल मांडून तेच लोक इतका आमचा द्वेष करत असतात की आम्ही त्यांचा द्वेष करण्याचा कोटाही ते लोक भरून काढतात. भागही मांडतो आहे.

त्याच कोकण रेल्वेतून प्रवास करून आम्हाला निसर्गराईने नटलेला कोकण पाहण्याची सोय झाली..
अन्यथा माझ्यासारख्या गरीब, बापड्या इसमाला ती गोष्ट फक्त स्वप्नातच पहावी लागली असती..
आणी व्यक्ती/प्रसंग सापेक्ष गोष्टी बदलत असाव्यात कदाचित, किंवा आम्हाला जी जाणीव आहे..(कोकण, पश्चिम महा इ.) या प्रगत इलाक्या विषयींची ती आणी वस्तुस्थिती यातील फरक म्हणा हवं तर...
प्रकल्प दारी येतात नि ते पूर्णत्वासहि जातात.. काही अपवाद वगळता (इंरोन, तत्सम) बाकी कार्याला सुरुवातही होते...
इकडची वस्तुस्थिती काही वेगळी आहे अशातलाही भाग नाही,
पण प्रकल्पाचा आराखडा दाखल तरी होतो हो तिकडे,
इकडे आराखड्यांची आखणी करण्यात ५-५ वर्षांचा वेळ जातो....
दाखल होईपस्तोर अजून ४ वर्ष निघून जातात..
२ पिढ्या तर फक्त त्यांची कार्यवाही पाहतच निघून जातात..
आमच्या कडे जागा आहे पाणी आहे मनुष्यबळ सुधा उपलब्ध आहे..
पण मागील १० वर्षापासून जे प्रकल्प जागा मिळाल्यानंतरही फक्त नेतृत्व (initiation) अभावामुळे रखडलेले आहेत ..
अशांच काय हो? (अशी ५-६ उदाहरणं आहेत माझ्या कडे जी आमच्या तीर्थरूपांच्या बालपणी सुरु होणार असल्याचं ऐकिवात होतं पण आज आम्ही तीर्थरूप होण्याची वेळ आलीये तरी पानही हललेले आढळत नाही...)
याला कदाचित आपण दुरून डोंगर साजरे असेही उत्तर द्याल....
कारण प्रकल्पातील लाभार्थ्यांच पुनर्वसन झाले की नाही किंवा त्या प्रकल्पाची फळं खायला भेटत आहेत किंवा नाही हे तर फक्त प्रकल्प तडीस गेल्यानंतर कळणारी बाब आहे...
पण सुरुवात तर व्हायला हवी....
रणशिंग फुंकल्या शिवायचं का मावळे लढायला तयार होणार...
............................................................................................................................
बाकी मग आमटी "उकळून्कर" का "घुस्ळूणकर", चविष्ट व्हायला हवी... म्हणजे काय तर "जेवणाचा" फडशा पडता येतो....
............................................................................................................................

मी_ओंकार's picture

4 Feb 2011 - 12:55 am | मी_ओंकार

लेखांच्या दुव्याबद्दल धन्यवाद. मलाही या प्रकल्पाबद्दल बरेच कुतुहल आहे. मिपावर चर्चा कशी काय झाली नाही याचेच आश्चर्य वाटत होते.
परवा सह्याद्रीवर आणि आयबीएन लोकमत वर अनिल काकोडकर यांची मुलाखत पाहिली. मुलाखत जालावर मिळाली नाही.
सविस्तर प्रतिक्रिया नंतर देईन.

संपादन :

खालील प्रतिक्रिया वाचून काय म्हणावे ते कळेना.

काकोडकरांच्या मुलाखतीतील मुख्य मुद्दे असे.

अणु उर्जेला पर्याय नाही. सध्या वापरात असलेले कोळशाचे साठे लवकरच संपतील. औष्णिक वीजनिर्मीती करायला कोळसा हे इंधन वापरतात. पवन, सौर, जल हे खाली म्हटल्याप्रमाणे तुटपुंजे आहेत.

वीजेचा तुटवडा प्रचंड आहे. हे कोणीही मान्य करेल.

जैतापूरचा प्रकल्प हा देशात चार (बहुतेक आकडा बरोबर आहे. चु. भु. दे. घे.) ठिकाणी उभ्या राहणार्‍या अणुभट्ट्यांपैकी एक आहे. त्यातल्या दोन पूर्व किनार्‍यावर आणि दोन पश्चिम किनार्‍यावर असतील. या जागांची निवड ही पूर्णपणे पाहणी करून ठरवण्यात आली आहे. खाली म्हटल्याप्रमाणे भट्टी थंड करण्यासाठी समुद्राजवळ प्रकल्प असणे गरजेचे आहे. विदर्भात प्यायला आणि शेतीला पाणी नाही. याला कुठुन आणणार? समुद्र आणि लगेचच काही फूट उंचीवर विस्तीर्ण पठार अशी रचना आवश्यक आहे.

गरम पाणी समुद्रात सोडल्यावर त्या भागातील पाण्याचे तापमान ५ अंशानी वाढले जे माशांसाठी अपायकारक नाही. उलट सागरी वनस्पती वाढल्या.

किरणोत्सर्गाचा फळांवर परिणाम होणार नाही कारण उत्सर्जन अत्यंत कमी असेल. आताही सुर्यापासून किरणोत्सर्ग होतच असतो. अपघातांचा धोका खूप कमी आहे कारण आधीच्या अनुभवांवरून तंत्रज्ञान चांगले विकसित झाले आहे.

असे आणि अनेक मुद्दे त्यांनी मांडले जे पटण्यासारखे आहेत शिवाय त्यांच्या या क्षेत्रातील ज्ञानाबद्दल आपण शंका घेण्याचा प्रश्नच नाही.

त्यामुळे विरोधकांचा नेमका कशाला विरोध आहे आणि त्यांचे नेमके मुद्दे काय आहेत याबद्दल कुतुहल आहे. अर्थात ते जर खाली दिसतायत तसे हास्यास्पद असतील तर काही अर्थ नाही. लेखातल्या मुद्यांना तिथेच कोणीतरी चांगली प्रतिक्रिया दिली आहे.

आता या विरोधामुळे हा प्रकल्प कर्नाटक किंवा गुजरात मध्ये गेला, तिथली वीजटंचाई दूर झाली की मग पुन्हा हे सगळे महाराष्ट्रात अंधार का म्हणत रडायला मोकळे.

बाकी अणुशास्त्रज्ञ होण्यासाठी सुरुवात बीएसी फिजीक्सने करायला लागते. तेवढी सोय तरी कोकणात नक्की आहे. आणि कोकणात तयार होणारी वीज कोकणालाच दिली पाहिजे म्हणजे पुण्यात तयार होणार्‍या मोटारी टाटाने पुणेकरांनाच विकल्या पाहिजेत असे म्हटल्यासारखे झाले.

- ओंकार.

विकास's picture

4 Feb 2011 - 1:33 am | विकास

या विषयावर सविस्तर प्रतिसाद लिहीनच पण येथे एका मुद्याबद्दल:

आता या विरोधामुळे हा प्रकल्प कर्नाटक किंवा गुजरात मध्ये गेला, तिथली वीजटंचाई दूर झाली की मग पुन्हा हे सगळे महाराष्ट्रात अंधार का म्हणत रडायला मोकळे.

मला जैतापूरबद्दल माहीत नाही पण अजून एका कोकणातील औष्णीक उर्जा प्रकल्पासंदर्भात माझे त्याच्या विरोधकांतील काही व्यक्तींशी, त्यातील पर्यावरणीय प्रश्नांवरून सविस्तर बोलणे झाले होते. त्यांचा मुद्दा होता की तयार झालेली उर्जा ही नॅशनल ग्रीडला जोडली जाणार होती. अर्थात ती वीज "कोकण" अथवा "महाराष्ट्रा"स मिळेल याची कोणतीच ग्वाही दिली गेलेली नव्हती.

येथे नक्की काय आहे? वादापुरते म्हणूया की, आज जैतापूर प्रकल्प हा अतित्वात आहे आणि उर्जानिर्मिती होत आहे, तर ती उर्जा प्रामुख्याने कोकणवासीयांना आणि नंतर उर्वरीत महाराष्ट्रास आणि मग इतर प्रांताना मिळणार आहे का? अर्थात उर्जेचे वितरण कसे होणार आहे?

मी_ओंकार's picture

4 Feb 2011 - 2:13 pm | मी_ओंकार

अर्थात याबाबत बोटचेपे धोरण घेता कामा नये. जरी नॅशनल ग्रीडला वीज जोडली गेली तरी महाराष्ट्राची गरज भागवल्यानंतर बाकींना देण्याचा आग्रह घरला पाहिजे.

या प्रकल्पाची उभारणी ही टप्प्या-टप्प्याने होणार आहे. ३ टप्प्यात प्रत्येकी २ असे ६ रिअ‍ॅक्टर उभारले जातील. त्यामुळे अगदी पहिल्या टप्प्यातच सगळ्या कोकणात वीज मिळेल असे म्हणण्यात अर्थ नाही. पण प्रकल्प पुर्ण झाल्यावर नक्कीच मिळू शकते.

पण यासाठी प्रकल्पाला विरोध म्हणजे 'बाजारात तुरी' अशी गत वाटते.

- ओंकार.

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Feb 2011 - 3:20 pm | llपुण्याचे पेशवेll

मला वैयक्तीक कोकणात एखादा चांगला प्रकल्प आला तर हवा आहे. त्यायोगे कोकणात उद्योगधंदे भरभराटीस येतील. परंतु ते उद्योगधंदे चालावेत यासाठी लागणारे मनुष्यबळ कोकणातूनच निर्माण होण्याची गरज आहे.

या प्रकल्पात मी जैतापूरचा रहीवासी असतो तर मी खालील गोष्टींसाठी या प्रकल्पाला विरोध केला असता.
१. येणार्‍या पॉवर प्लांटसाठी लागणारे कामगार, तंत्रज्ञ कुठले आणणार? अर्थातच महाराष्ट्राबाहेरचे. कारण महाराष्ट्राने अणुविद्युत प्रकल्पांमधे लागणारे इंजिनियर निर्माण करणारी किती कॉलेजे महाराष्ट्रात काढली? त्यातली किती या जैतापुरात काढली. कोणी प्रयत्न केले ते कौशल्य स्थानिक पातळीवर निर्माण करण्यासाठी? उत्तरः कोणीही नाही. त्या नतद्रष्ट राणेने कधीही नाही. आणि यावर सुमाररावांनी अग्रलेखही लिहीला नाही. मग या प्रकल्पामुळे जैतापुरात येणार्‍या 'परप्रांतीय' लोकांमुळे तिथल्या स्थानिक लोकांवर जो ताण पडेल तो भोगायला हे प्रकल्पाचे 'समर्थक' येणार का? नाही. त्यांच्या स्वार्थापुरते बघणार.

२. परत या तथाकथित १२० स्पीडने होणार्‍या विकासामुळे त्या भागातील सर्व गोष्टींचे भाव गगनाला भिडतील त्याला जबाबदार कोण. कारण त्या प्रकल्पाच्या इतर सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्या आजूबाजूला लोकवस्ती वाढू न देण्याचा शहाणपणा स्वतःच्या लोभीपणावर मात करून तिथले राजकारणी दाखवतील असे वाटत नाही. कारण तसा महाराष्ट्राचा गेल्या ५० वर्षातला इतिहास नाही.

३. शासनाने प्रकल्प कोकणात काढला म्हणून कोकण विजटंचाई मुक्त होईल का? खात्री नाही. कोयना प्रकल्प कोकणात आहे पण तरीही कोकण अंधारात या राणेंच्या ते शिवसेनेत असताना केलेल्या विधानास उत्तर प्रकल्प कोकणात असला तरी तो महाराष्ट्रासाठी आहे फक्त कोकणासाठी नाही असे उत्तर मिळाले होते. आता राणे सत्तेत आले म्हणून त्यात काही फार सुधारणा झाली आहे असे नाही. कोकणरेल्वे हा असाच देशासाठी उपयोगी आणि कोकणासाठी निरुपयोगी प्रकल्प कोकणात चालू आहे. मग असे स्वतःसाठी निरुपयोगी आणि देशासाठी उपयोगी प्रकल्प (इथे कोकणासाठी निरुपयोगी आणि महाराष्ट्रासाठी उपयोगी) प्रकल्प कोकणाने किती दिवस वागवत बसायचे? या राजकीय धेंडांना त्यांच्या सुपिक जमिनी "आयटी" कंपन्यांना अव्वाच्या सव्वा किमतीनी विकण्यासाठी त्यांच्या गावात आयटी पार्क करायची तयारी असते. मग त्यांना विचारा ना त्यांच्या गावातल्या जमिनी देता का अणुविद्युत प्रकल्पाला? नाही देणार ते. कारण सरळ आहे. त्यातुन राजकीय फायदा काहीच नाही.

मेघवेडा's picture

3 Feb 2011 - 7:08 pm | मेघवेडा

पुपेंच्या वाक्यावाक्याला सहमती आहे. स्थानिकांच्या जमिनी जातील त्या जातीलच पण पुढे भविष्याच्या तरतुदीच्या नावे बोंब आहेच. पुन्हा प्रकल्पासाठी समुद्राचं पाणी वापरण्यात येणार असल्याने जवळपासच्या मच्छीमारांच्या पोटावरही पाय येण्याची शक्यता आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आण्विक कचरा. विकीवरील माहितीनुसार उत्सर्जित किरणोत्सारी कचर्‍याचं काय करण्यात येणार आहे हे स्पष्ट केलेलं दिसत नाही.

बाकी साध्याभोळ्या कोकणी माणसाच्या टाळूवरलं लोणी हे साले खाणार नि कोकण रेलवेसारखंच या प्रकल्पाचंही 'तेल गेल तूप गेलं हाती राहिलं धूपाटणं' होणार हे स्पष्ट दिसतं आहे.

तिमा's picture

3 Feb 2011 - 9:08 pm | तिमा

अणूउर्जेसाठी जेंव्हा एखादे प्रकल्पस्थळ निवडले जाते तेंव्हा त्यातून निघणारी प्रचंड उष्णता शोषून घेण्यासाठी पाण्याचा प्रचंड साठा जवळ असावा लागतो. असा अमर्याद पाण्याचा साठा समुद्राशिवाय कुठला वापरणार ? त्यामुळे असा प्रकल्प जिथे आधीच पाण्याची बोंब आहे त्या विदर्भात करता येणार नाही. समुद्राच्या पाण्यात मीठ पण असते त्यामुळे ते जास्त थंड करता येते. (त्याला शास्त्रज्ञ ब्राइन असे म्हणतात)
असा प्रकल्प हा जैतापूरलाच का करावा हा वादाचा विषय होऊ शकतो पण तो वाटेल त्या जागी करता येणार नाही हे सांगण्यासाठी लिहिले आहे.

सौरउर्जा किंवा पवन उर्जा प्रकल्पावर संशोधन करून तशा प्रकारचे प्रकल्प जास्त प्रमाणात उभे केले तर अणुउर्जा प्रकल्पाची गरजच भासणार नाही , पाण्यावर उभारलेले छोटे प्रकल्प देखील बरेच काम करून जातात ....जैतापूर प्रकल्पात राजकरण बरच आहे .......आणि भविष्याच्या दृष्टीने हा प्रकल्प धोकादायक आहे ........

हुप्प्या's picture

3 Feb 2011 - 10:05 pm | हुप्प्या

गेल्या पन्नास वर्षात दोन अपघात झाले म्हणून अणूऊर्जेचा बागुलबुवा उभा केला जात आहे. हे योग्य नाही. अनेक देशात अनेक अणूभट्ट्या गेले पन्नासहून जास्त वर्षे अविरत ऊर्जा निर्माण करत आहेत.
भरपूर प्रमाणात, स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. त्याचा असा आंधळा तिरस्कार करणे चूक आहे.
सौर आणि वारा हे पर्याय पुरेशी वीज बनवू शकतच नाहीत. कितीही कौतुक केले तरी हे पर्याय हे "क्यूट खेळणे" इतकेच आहेत. हवी तेव्हा, हवी तितकी वीज बनवायला हे निरुपयोगी आहेत. जगभर ह्यावर संशोधन चालू आहे परंतु आजही ह्या स्रोतांचा समाधानकारक वापर करता आलेला नाही.

अणूऊर्जा निर्धोक आहे. इतक्या वर्षाच्या संशोधनानंतर त्या प्रक्रियेत अनेक सुधारणा झालेल्या आहेत. त्यामुळे अणूऊर्जेला अणूबाँब सारखे समजून त्याचा बागुलबुवा करणे थांबवावे.

अणूभट्टीतून निघणारे किरणोत्सारी इंधनाचे अवशेष हे कोळशाच्या राखेपेक्षा वा अन्य वेस्टपेक्षा खूप कमी असतात. ते किरणोत्सारी अवशेष १५० वर्षात पूर्णपणे निर्धोक बनतात.

मी_ओंकार's picture

4 Feb 2011 - 1:13 am | मी_ओंकार

सहमत बाकी मुद्दे वर मांडलेले आहेतच.

कालच पीबीएस वर 'मेकिंग स्टफ क्लिनर' हा कार्यक्रम पाहिला..
थोडा वेळ काढून जरूर पहा:
http://video.pbs.org/video/1768954299
यात स्वच्छ ऊर्जा निर्मितीसाठीचे वेगवेगळे प्रयोग दाखवलेले आहेत.
या दोन भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी केलेले प्रयोगही दाखवलेले आहेत....

भले मोठे विद्युत प्रकल्प व त्यातुन निर्माण होणा-या विजेचे वितरण ही अगदी गोंधळात टाकणारी गोष्ट नाही. जर हे प्रकल्प केंद्र सरकारकडुन राबवले जात असले तरी त्यात होणारी गुंतवणुक आसपासच्या २-३ राज्यांनी मिळुन केलेली असु शकते आणि त्या गुंतवणुकीच्या टक्केवारीनुसार विज वितरण होत असते. जर प्रकल्प एकाच राज्याचा असेल तर विज त्याच राज्यासाठी वापरली जाते. आता नविन धोरणानुसार खाजगी प्रकल्प पण येत आहेत, त्यांना देखिल एकुण विजनिर्मितीच्या काही हिस्सा ज्या राज्यात तो प्रकल्प आहे त्या राज्याला द्यावालागतो आणि बाकीचा खुल्या बाजारात विकता येतो.

सध्या विज निर्मिती, पारेषण व वितरण क्षेत्र फार मोठ्या स्थित्यंतरातुन जात आहे, येत्या ३-४ वर्षात या क्षेत्रात प्रचंड बदल दिसुन येतील. अगदी विजेच्या क्वालिटि पासुन ते संबंधित सेवांच्या क्वालिटि सगळ्यात. अर्थात हे सगळे एका विशिष्ट किंमतीला होईल. जी तुमच्या आमच्या खिशातुन जाणार आहे.

पण कोकणातल्या प्रकल्पातील विज कोकणात वापरली जाईल असे सांगणे तांत्रिक द्रुष्ट्या कठिण आहे, आत्ता मि लिहिताना व तुम्ही वाचताना जी वीज वापरता आहात ती चंद्रपुर , डहाणु ते उत्तर पुर्व ते भुतान ते पंजाब अशी अखिल हिन्दुस्थानातुन कुठुनही आलेली असु शकते. या प्रकल्पातील विज राष्ट्रिय विज जाळ्यावर (ग्रिड) चढवली जाईल व तिथुन ती वापरली जाईल.

आणि मुळ ईंधनाचा प्रश्न आहे तर त्या साठी आज तरी अणुउर्जेला पर्याय नाही, सोलर, विंड, टायडल, जिओथर्मल हे प्रयोग अजुनही प्रायोगिक अवस्थेत आहेत, त्यांची व्यावसायिक उपयोगिता व टिकुन राहण्याची क्षमता ( इकॉनॉमिक व्हायबिलिटी) अजुन भारतात सिद्ध करता आलेली नाही. भारतात मिळणारा बराचसा कोळसा हा विज निर्मितीसाठी फारसा चांगला नाही तरी सध्या या क्षेत्रातली मंडळी १. या कोळश्यासाठी योग्य बॉईलर बनवणे आणि २. उत्तम प्रतिचे कोल गॅसिफायर बनवणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित करुन आहेत, या पैकी एक जरी व्यावसायिक द्रुष्ट्या यशस्वी झाली तर अणु उर्जेचे प्रमाण कमी करता येईल.

हर्षद.

वडिल's picture

4 Feb 2011 - 11:45 pm | वडिल

चांगला प्रतिसाद.
तुम्हाला सडे तोड उत्तर आमचे अ‍ॅनालिस्ट लवकरच देतील. हा प्रकल्प अमेरीकन प्रकल्पा सारखा कसा आहे किंवा नाहिये हे समजावुन सांगतिल. त्यांच नाव आहे ......चिंतन

चिंतन उर्फ चिंन्टु हे गुगलुन गुगलुन काय वाट्टेल ते शोधतील आणि जिडिपी, एफ डिआर वैगरे शब्द पेरुन एक लांब लचक प्रतिक्रिया ओकतील. हसुन पुरेवाट झाली कि कंपुतिल कोणीतरी "चांगली माहिती " अशी प्रतिक्रिया देतिल..

बघु आता भविष्य खरं होतं का नाहि !

विकास's picture

5 Feb 2011 - 12:32 am | विकास

औष्णिक उर्जेपेक्षा मला अणूउर्जा पर्याय म्हणून अधिक श्रेयस्कर वाटतो. कोकणात तो करावा का हा एक वेगळा मुद्दा आहे. अमेरिकेत, मी ज्या राज्यात रहातो तेथे किनारपट्टीला लागून असलेल्या गावातच अणूशक्तीप्रकल्प आहे. शिवाय अणूउर्जासंशोधनासाठीच्या त्यामानाने लहान पण मोठ्या इमारती सारख्या असलेली अणूभट्टी अगदी धावत्या/गर्दीच्या रस्त्याला लागून एम आय टी या संस्थेच्या आवारातही आहे आणि युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स च्या आवारात देखील. हे मी पाहीलेले, अजून देखील इतरत्र असे विद्यापिठात असतील. थोडक्यात सुरक्षा आणि पर्यावरण हे मुद्दे असून देखील ह्या वर्षानुवर्षे येथे आहेत,

आता काही प्रश्नः

या प्रकल्पातील विज राष्ट्रिय विज जाळ्यावर (ग्रिड) चढवली जाईल व तिथुन ती वापरली जाईल.
ते योग्यच आहे. पण आज जिथे दिवसाचा काही काळच उर्जा मिळत आहे त्या कोकणात आणि उर्वरीत महाराष्ट्राला या प्रकल्पामुळे उपलब्ध होणारी वीज दिली जाईल का नाही हा मुद्दा आहे. तसा करार राज्यशासनाने केला आहे का? ह्याचा संबंध बाहेरची कंपनी कुठली याच्याशी नसून अंतर्गत राजकारणाशी आहे. (मी जयगड औष्णीक प्रकल्पाबाबत उलट ऐकले होते की काही गॅरेंटी दिली नव्हती म्हणून. खरे खोटे कल्पना नाही.)

Environmental Impact Assessment Report वरून किती सार्वजानीक चर्चा (पब्लीक मिटींग्ज) झाल्या ज्यात दोन्ही बाजूच्या विविध स्तरातील/क्षेत्रातील मंडळींनी भाग घेतला होता?

अणुप्रकल्पाच्या बांधकामामुळे कितपत पर्यावरणीय आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होणार आहे?

अणूकचरा कुठे टाकला जाणार आहे?

सुरक्षेच्या नावाखाली किती जमीन ताब्यात घेतली जाणार आहे?

तुमचे काहि मुध्दे पटले..
आता एम आय टि च्या दारात अणुभट्टी आहे... म्हणुन तिथली मुलं हुशार होतात असे काहि आहे का ?
शिवाय अनेक विद्दापिठात अशा भट्ट्या लावल्या जातात... तो मुद्दावेगळा

पण मग कोकणातच का? आय आय टि पोवई किंवा मद्रास चा दारात का नाहि ?

विकास's picture

6 Feb 2011 - 8:30 pm | विकास

आता एम आय टि च्या दारात अणुभट्टी आहे... म्हणुन तिथली मुलं हुशार होतात असे काहि आहे का ? आय आय टि पोवई किंवा मद्रास चा दारात का नाहि ?

तुमचा नक्की काय मुद्दा आहे? सांगण्याचे कारण इतकेच आहे की प्रगत जगात विविध ठिकाणी अणुभट्ट्या आहेत आणि त्या आणि त्यांचा सभोवताल सुरक्षितही आहे.

तुम्हाला माझी भुमिका नक्की काय समजली? मी कुठे असे म्हणले आहे का की कोकणात (जैतापूरला) अणुभट्टी बांधा म्हणून?

माझे म्हणणे इतकेच आहे की विरोध करायचा असला तरी सर्व बाजू समजून करावा आणि तो देखील अभ्यास करून योग्य कारणासाठी करावा.

जेंव्हा तसा तो होत नाही आणि सामान्यांना कळावे म्हणून अतिसुलभीकरण करत माहीती प्रसारीत करत भिती/विरोध तयार केले जातात तेंव्हा त्याचे एक तर हसे होऊ शकते, तो मुद्दा, जर कायद्याने लढायला गेलो तर कोर्टात टिकू शकत नाही, राजकारण्यांचे फावते तसेच चळवळीच्या म्होरक्यांचा पण त्यांचा बायोडेटा वाढवण्यात वेळ सत्कारणी लागतो. सामान्य जे भरडले जाणार असतात ते जातातच.

असो.

विकास जी,
तुम्हि माहितगार आणि अभ्यासु आहात. खरंतर त्याचा मला मिपाकर म्हणुन अभिमान आहे.
माझा मुद्दा हा :

१) गारबेज पासुन विज तयार करण्याचे तंत्रझान अमेरीकेत विकसित आहे त्या बद्दल काहि माहिती देउ शकाल का ?
२) ह्युमन वेस्ट ( ऑरगॅनीक) पासुन विज तयार करण्याचे तंत्र तर अमेरीकेत काहि विद्दापिठात अतिविकसित आहे. ते भारतात आणता येइल का?

भारतात गारबेज आणि ह्युमन वेष्ट ची काहि कमी नाहि. हवं तर वाढवता येइल.

कृपया काहि माहिती असेल तर जरुर द्दा. अणुशक्ति भारताला फार महाग पडेल. शिवाय अतिरेकि आहेतच भट्ट्या उडवायला.

अविनाशकुलकर्णी's picture

6 Feb 2011 - 11:35 pm | अविनाशकुलकर्णी

अणु उर्जा स्वस्त नाहि......विजेचे बिल भरताना कंबरडे मोडुन जाईल...
आताच विजेचि बिले परवडत नाहित...

मी_ओंकार's picture

7 Feb 2011 - 11:07 am | मी_ओंकार

वीज नसल्यामुळे सामान्य जीवन, उद्योगधंदे, शेती यांच्यावर परिणाम होण्यापेक्षा ज्यास्त दराने वीज उपलब्ध असेल तर बिघडले कोठे. भारनियमन असताना आयटी कंपन्यात भरमसाठ डिझेल जाळले जाते. शेतीचे पंप चालू करायला रात्री अपरात्री शेतात जावे लागते.
अणूउर्जेवर गेले ५० वर्षांहून अधिक काळ संशोधन चालले आहे आणि सुरू आहे. तेव्हा कुठे वीज तयार करण्याची शक्यता दिसू लागली. आणखी ५-१० वर्षात थोरियम हे इंधन म्हणून वापरता येईल ज्याचे साठे भारतात प्रचंड आहेत. (जगात दुसरा वगैरे.) जर खाजगी वितरकांना परवानगी दिली किंवा धोरणे व्यवस्थित राबवली तर मोबाईल प्रमाणे वीज सुद्धा स्वस्तात मिळू शकेल.

- ओंकार.

चन्द्रशेखर सातव's picture

8 Feb 2011 - 12:37 am | चन्द्रशेखर सातव

प्रतिसादा बद्दल सर्व जाणकारांचे आभार

श्री वडील यांनी सुचवल्या प्रमाणे गारबेज पासुन विज तयार करण्याचे तंत्रज्ञान (Plasma Incineration) http://en.wikipedia.org/wiki/Plasma_arc_waste_disposal#See_also हि एक पर्याय आहे.या तंत्रज्ञानावर आज जगात बरेच संशोधन चालू आहे.फक्त त्याची आर्थिक व्यवहार्यता तपासणे महत्वाचे ठरेल.भारतात नागपूर मध्ये प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प सुरु झाला होता पण आर्थिक प्रश्नामुळे तो सध्या बंद आहे http://en.wikipedia.org/wiki/Landfill हा सुद्धा अजून एक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो,पुण्या जवळ उरुळी कांचन मध्ये पुण्याच्या कचऱ्याने जे भयानक प्रश्न निर्माण झालेत अश्या प्रश्नांची देखील उत्तरे मिळू शकतात

विकास's picture

8 Feb 2011 - 12:46 am | विकास

कचर्‍यापासून वीज निर्मिती होऊ शकते. मात्र त्यासाठी कचर्‍याची कॅलरीफिक व्हॅल्यूपण चांगली असावी लागते. भारतातील कचर्‍याची ती तितकीशी मिळू शकत नाही कारण सेंद्रीय कचरा जास्त असतो वगैरे. प्लाझ्मा आर्कची तसेच तत्सम इतर तंत्रज्ञानाची किंमत अजूनही खूप आहे आणि रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट चे गणित तितकेसे जुळत नाही...

ह्युमन वेस्ट ( ऑरगॅनीक) मधे कितपत आर ओ आय आहे ?
कॅलोरीफिक व्हल्यु नक्की असणार.

अमोल केळकर's picture

9 Feb 2011 - 10:33 am | अमोल केळकर

हे जैतापूर नक्की कुठे आहे? रत्नागिरी - पावस रोडला आहे का?

अमोल

विकास's picture

9 Feb 2011 - 7:58 pm | विकास
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Feb 2025 - 3:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या काय स्थिती आहे ?

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

22 Feb 2025 - 12:58 pm | मुक्त विहारि

माडबन अणुऊर्जा’सह आयलॉगला मिळणार गती

https://pudhari.news/maharashtra/kokan/ratnagiri/madban-nuclear-energy-i...

----

गुगल बाबा मुळे, छापील स्वरूपातील माहितीचा स्रोत, उपलब्ध होतो.