झरदारी साहेबांचे अभिनंदन !

वडिल's picture
वडिल in काथ्याकूट
5 Feb 2011 - 1:13 am
गाभा: 

पाकिस्तान चे लाडके नेते श्री आसिफ अली झरदारी हे न्युयॉर्क येथिल नामांकित डॉक्टरीण बाइ तन्वीर झमानी यांच्याशी विवाहबद्द्द झाले. निकाह समारंभ आटोपशीर पण उल्लेखनीय होता. तन्वीर साहेबा यांनी अंतरराष्ट्रिय राजनीती शास्त्रात पि एज डि हि पदवी संपादन केली आहे.
बेनझीर जाउन तीन वर्षे झाली नाहित तर.. झरदारी साहेबांनी निकाह चा बार उडवला.राजबिन्ड्या झरदारी साहेबांनी पाकिस्तान ची मान उंच करुन दाखवली आहे.
आमचे राजपुत्र राहुल जी हि लवकरच त्यांच्या स्पॅनिश प्रेयसी बरोबर थाटामाटात लग्न करतील आणि सोनीया जीं ना स्वयंपाक घरातुन आराम देतील हे निश्वित. ४० वर्षाच्या युवराजांच मन सगळी कडे धावते आहे ... नक्कि काय करावे आणि कसे करावे हे त्याना समजत नाहिये अशी काहिशी स्थिती आहे. स्वत: चा शोध युवराज लवकरच घेतील अशी आशा भारतीय वंशाच्या काहि जाणकारांनी बोलुन दाखवली.
विशेष वार्ताहार व राजनीतिक सल्लागार बधीर गोरे ,जे ओबामा यांच्या सदैव संपर्कात असतात, हे कळवतात कि त्यांनी स्वतः या बाबत ओबामां शी पत्रा द्वारे संपर्क साधुन भारतिय राजपुत्रा साठि मदत मागितली आहे. आमच्या वार्ताहारा शी बोलताना बधीर गोरे म्हणले " जर अमेरीकेने झरदारींना नवरी दिली तर भारताच्या राजपुत्रा ला नवरा हवा "
त्यांना नक्कि काय म्हणायचे होते हे आमच्या तरुण "अ‍ॅनालिस्ट चिंटु " यांना पटकन समजले नाहि . पण लवकरच ते गुगलुन बघतिल व मिपाकरांना "आतली बातमी" सांगतील.

क्रमशः

प्रतिक्रिया

गणपा's picture

5 Feb 2011 - 1:24 am | गणपा

.
क्रमशः ??

विकास's picture

5 Feb 2011 - 1:54 am | विकास

क्रमशः ?? कुणाकुणाची लग्ने ठरली/झाली ते का?

ही अफवा आहे असे पाकीस्तान सरकार पक्षाचे अधिकृत वक्तव्य आहे.

बाकी झरदारींना लग्न करावेसे वाटले तर करूं देत काय फरक पडतोय?

मात्र टाईम्समधील वृत्ताप्रमाणे झमानींनी त्यांच्या आणि झरदारींच्या लग्नासंदर्भात विचारले तेंव्हा सर्वप्रथम आपल्याला (म्हणजे मला वाटते पाकीस्तानला) इजिप्तची समस्या हाताळायची आहे, मग पाकीस्तानातील भाववाढ आणि नंतर बिलवाल या राजपुत्रास पाकीस्तान पिपल्स पार्टीचा नेता करायचे आहे मत दिले आहे.

सगळ्या बातम्या अफवा म्हणुनच सुरु होतात. आता हि तन्वीर बॉस्टन ची का मॅनहॅटन (न्युयॉर्क) ची हा मुद्दा आहे.
पुर्ण वृत्तांत लवकरच लिहणार आहे. भारत आणि पाकिस्तान च्या बाजु काय आहेत हे पुर्ण जाणुन घेणं आवश्यक आहे.
हि लेख मालिका क्रमशः पुढे जात राहिल. मिपा करांची हि ह्या बद्दल काय मतं आहेत हे महत्वाचे.
शेवटि हा भारत-पाकिस्तान चा मामला आहे. अशा स्फोटक समस्ये चे पुर्ण संशोधन करुन लेखमाला पुढे नेउयात. सगळ्यांच्या मागण्या मान्य होणे महत्वाचे. झरदारीं चे हे दुसरे प्रकरण आहे आणि अजुन आमच्या युवराजांचा एक हि बार उडालेला नाहि म्हणजे काय ?
लेख मालिके बद्दल उत्सुकता दाखवल्या बद्दल धन्यवाद.

शेवटि हा भारत-पाकिस्तान चा मामला आहे.

झरदारींच लग्न हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे. त्याचा भारताशी काय संबंध आहे ते कळल नाही.

बर त्यांनी ज्या तन्वीरशी लग्न केलय (बातमी खरी की अफवा देव जाणे.) ती बया सानिया सारखी भारतीत असती वा भारतीय मूळाची असती तर भारताशी एकवेळ बादरायण का होईना संबंध जोडता आला असता.(खरतर तोही त्यांचा वयक्तिक मामलाच.. पण तुमच्यासाठी एक वेळ मान्य करु.)

लेखाची सुरवातच एखाद्या गल्लाभरु मिडिया चॅनल सारखी उथेळ आणि भडक वक्तव्य करुन केली आहे. जर मिपाकरांची खरच मतं हवी असतील तर जरा सविस्तर भाग टाका. ते झरदारी तिकडे लग्न करतायत तर त्याचा राहुलच्या लग्नाशी काय संबंध ते तुमच्या पहिल्या भागत तरी उलगडत नाही. मे बी तुमच क्रिप्टिक समझण्याची माझी लायकी नसावी. (मला राहुलचा पूळका नाही हे येथे नमुद करु इच्छितो)

त्यामुळे पहिला प्रतिसाद (.) एवढाच होता... बर जर का हे जनातल मनातल या प्रकारतल लेखन असत तर एक वेळ तुमच क्रमश: पाहुन तुम्ही काहीतरी विनोदी(?) लिहिताय असा ग्रह करुन घेतला असता.
पण तुम्हाला या वर मिपाकरांकडुन काथ्या कुटुन हवाय, त्यात परत क्रमशः पाहुन अजुनच गोंधळ झाला. आणि म्हणुन (??) पडले.

श्रावण मोडक's picture

5 Feb 2011 - 7:32 pm | श्रावण मोडक

पुर्ण वृत्तांत लवकरच लिहणार आहे. भारत आणि पाकिस्तान च्या बाजु काय आहेत हे पुर्ण जाणुन घेणं आवश्यक आहे.
हि लेख मालिका क्रमशः पुढे जात राहिल. मिपा करांची हि ह्या बद्दल काय मतं आहेत हे महत्वाचे.

वाचवा. संपादक कुठं आहात? वाचवा... :)

वेताळ's picture

5 Feb 2011 - 7:35 pm | वेताळ

आताच झरदारींनी लग्न केले आहे. निदान ९ महिने तरी पुढिल व्रूतांताची वाट आपण पाहिली पाहिजे.संपादक हा वेळ कमी करु शकतील ह्याबद्दल मला खात्री देता येत नाही.

कापूसकोन्ड्या's picture

5 Feb 2011 - 11:11 pm | कापूसकोन्ड्या

वडिलाना वडिलकीचा सल्ला आम्ही वडिलांचे वडिल नसलो तरी!
किबोर्ड समोर बसल्यावर ’घेउन’ बसू नये. काय घ्यायची असेल ती नंतर घ्यावी तेव्हा मिपा वर लोग औट झाले आहे याची खात्री करावी
अहॊ झरदरींचे लग्न राहूलचे पंतप्रधान होणे आणि लग्न न होणे. कशाचा काही काही संबंध? भारत पाकिस्तान संस्कृति? आइ गेल्यावर लगेच लग्न?
हे जत्रेत हरवलेल्या मुलासारखे झाले.
विजेच्या पाळण्यात बसू का ?
की मृत्युगोलात फ़िरणाया बाबाच्या मागे बसू?
फ़ुगे उडवू की, जत्रेतला रंगीत चष्मा घालून फ़ोटो काढु?
’वडिल’ पैसे देत नाहीत म्हणून मोठ्याने रडू?
का शेजारच्या राहूल साठी रडू? रडायला कारण कोणते? लग्न होत नाही म्हणून की पंतप्रधान होणार म्हणून??
हसायचे आहे तर राहूलचे होत नाही म्हणून की़झरदारीच्व दुसर्‍यांदा झाले म्हणून?
हातात किबोर्ड आला की बडव बडव बडव अहॊ वडील स्क्रिन वर काय उमटतेय ते तरी पहा.
मिपावर पूर्व दृश्य असा पर्याय आहे त्याचा वापर करा.
काय हे वडील? कधी वडिल होणार ?
परत क्रमशः?

कापुस कोन्ड्या साहेब जी
तुमचा माझ्यावर असा राग का ? जर माझी टिंगल टवाळी करुन तुम्हाला आनंद मिळत असेल तर माझी काहि हरकत नाहि.
देशाच्या गरीब, अशिक्षित जनतेला असेच टोले जन्मभर सहन करावे लागले आहेत.
तुम्हि म्हणता ते पटते.

कापूसकोन्ड्या's picture

6 Feb 2011 - 1:55 am | कापूसकोन्ड्या

माफकरा

चालायचेच..
तुम्हाला माफ करणारा मी कोण..

लेखन थांबवु नका लिहित रहा... तुम्हि चांगले धागे काढता. ते चालु ठेवा

भारताच्या राजपुत्रा ला नवरा हवा "

????:)
झरदारीला नवरी मिळाली म्हणून राहुलला नवरा कशाला हवा?

बेनझीर जाउन तीन वर्षे झाली नाहित तर.. झरदारी साहेबांनी निकाह चा बार उडवला.

बेनझीर गेल्यानंतर लग्नाला किती वर्षे थांबले म्हण्जे योग्य ठरले असते?

शुचि's picture

5 Feb 2011 - 2:37 am | शुचि

तीन वर्षं लै झाली ;)

शुचि ताइ च म्हणणं पटतय
पण भारतिय विचार सरणी वेगळी आणि पाकिस्तानी विचार सरणी वेगळी.

काहि म्हणलं तरी ... जब मिया बीबी ( किंवा बाबा) राजी तो क्या करेगा काजी

जाणकारांनी प्रकाश टाकावा

अडगळ's picture

5 Feb 2011 - 2:52 am | अडगळ

जाणकारांनी प्रकाश टाकावा
>>
लगेच कशाला प्रकाश टाकायचा ?
जरा राहू दे की नवरा नवरीला अंधारात.

Nile's picture

5 Feb 2011 - 3:37 am | Nile

=)) =)) =))

शहराजाद's picture

5 Feb 2011 - 3:19 am | शहराजाद

पण भारतिय विचार सरणी वेगळी आणि पाकिस्तानी विचार सरणी वेगळी.

भारत आणि पाकिस्तान, दोन्हीकडे आईच्या म्रूत्यूनंतर तीन वर्षांनी केलेल्या लग्नाला 'आई जाऊन तीन वर्षे झाली नाहीत तोच...' असे म्हणत नाहीत.
वडिल ह्यांना विचारसरणीतला कुठला फरक अभिप्रेत आहे?

पंगा's picture

5 Feb 2011 - 7:47 pm | पंगा

भारत आणि पाकिस्तान, दोन्हीकडे आईच्या म्रूत्यूनंतर तीन वर्षांनी केलेल्या लग्नाला 'आई जाऊन तीन वर्षे झाली नाहीत तोच...' असे म्हणत नाहीत.

श्रीमती बेनज़ीर भुत्तो या श्रीयुत आसिफ़ अली ज़रदारी यांच्या मातु:श्री होत्या, याची कल्पना नव्हती.

नवीन माहितीबद्दल आभार.

शहराजाद's picture

6 Feb 2011 - 2:10 am | शहराजाद

प्रतिसाद दोनदा आल्यामुळे का टा आ

शहराजाद's picture

6 Feb 2011 - 2:09 am | शहराजाद

वरचा प्रतिसाद लिहिताना डोक्यात धागालेखकाचे नाव 'वडिल' डोक्यात होतं. तेच डोक्यात राहिल्यामुळे टाइपिंग मिष्टेक हो गया. (तात्पर्यः झोप डोळ्यावर असताना, मूल भंडावून सोडत असताना प्रतिसाद दिल्यास तो आधी तपासून बघावा. :))
तिथे पत्नी असेच म्हणायचे होते. ल़क्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद पंगा.

विकास's picture

6 Feb 2011 - 10:16 pm | विकास

...मूल भंडावून सोडत असताना प्रतिसाद दिल्यास तो आधी तपासून बघावा. .

तिथे पत्नी असेच म्हणायचे होते.

"तिथे" म्हणजे (वर) "मूल" म्हणले तेथे का? ;)

वादाचा मुद्दा हा आहे कि तन्वीर झमानी ह्या खरया डॉक्टर आहेत का पी एच डि आहेत ह्यात अनेक स्त्रोतां मधे वाद आहे.

आता पी एच डि असतील तर त्यांना डॉ म्हणुन संबोधणे बरोबर आहे का ?
आणि जर खरच डॉ असतिल तर त्या कुठल्या प्रकारच्या ? हे सांगण्या साठि पुरावा नाहि.
वेब वर किंवा गुगल व अन्य स्थळां वर काहि माहिती मिळाली तर नक्की कळवावे.
राहुलजी ज्या मुली बरोबर बोस्टन मधे पकडले गेले तीचे नक्की नाव काय व ती कुठल्या देशाची आहे हे सुध्दा सांगणे जरा कठिण आहे. जर कोणी जाणकार मदत करु शकले तर बरं होइल.

शानबा५१२'s picture

5 Feb 2011 - 9:55 am | शानबा५१२

अजुन एक मुद्दा हा आहे की हे सारे फक्त पाकीस्तानशी निगडीत आहे व व्ययक्तीक बाबी आहेत.त्यावर चर्चा करण्याचे कारण काय?

वाहीदा's picture

5 Feb 2011 - 2:09 pm | वाहीदा

Interrogating into personal lives .....Doesn’t sound nice

शानबा५१२'s picture

5 Feb 2011 - 9:41 am | शानबा५१२

सत्ता आहे पैसा आहे,बाई येणारच.

हा मुद्दा थोड्या फार प्रमाणात बरोबर आहे.
वाक्य हि छान आहे " सत्ता आहे .. पैसा आहे.. बाई येणारच. "

पण हे नैतिक दृष्ट्या किती बरोबर आहे हे जाणकार सांगु शकतिल.

अवांतर : ल्युडवीग बोल्ट्ज्मन च वाक्य मस्त आहे.

चिरोटा's picture

5 Feb 2011 - 10:05 am | चिरोटा

वादाचा मुद्दा हा आहे कि तन्वीर झमानी ह्या खरया डॉक्टर आहेत का पी एच डि आहेत ह्यात अनेक स्त्रोतां मधे वाद आहे.

धाग्याचा मूळ उ द्देश काय आहे? झरदारींचे अभिनंदन्,तन्वीर झमानीचे credentials की आणखी काही?असो
http://www.vitals.com/doctors/Dr_Tanveer_Zamani.html इकडे माहिती सापडली. कापाकापी करणारीच बाई आहे.

तन्वीर साहेबा यांनी अंतरराष्ट्रिय राजनीती शास्त्रात पि एज डि हि पदवी संपादन केली आहे

असे असेल तरी हरकत नाही.झरदारी तनवीबाईंकडून नक्कीच काहीतरी शिकतील.

नितिन थत्ते's picture

5 Feb 2011 - 10:53 am | नितिन थत्ते

एक काल्पनिक प्रश्न...

भारत आणि पाकिस्तान दोन्हीकडे सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व अशा व्यक्ती करीत आहेत ज्या पारंपरिक सत्ताधारी कुटुंबात विवाह होऊन आल्या आहेत. त्यांचे नेतृत्व पक्षाने मान्य करण्याचे कारण केवळ हा कौटुंबिक सांधा इतकेच आहे.

त्यांपैकी झरदारी यांनी दुसरा विवाह केला आहे. तेथील कायद्यानुसार ते अजूनही भुट्टो घरण्याचे जावई असू शकतात कारण ते एकाहून अधिक विवाह करू शकतात.

भारतात अशी गोष्ट झाली* तर हे चालवून घेतले जाईल का? भारतीयांची आणि काँग्रेसची भूमिका काय असू शकेल?

* हा पूर्ण काल्पनिक आणि हायपोथेटिकल प्रश्न आहे. त्यात कोणाचीच बदनामी करण्याचा किंवा काही सुचवण्याचा हेतु नाही. तरीही जर प्रश्न अयोग्य वाटत असेल तर सदर प्रतिसाद उडवावा अशी विनंती.
.
.
.
.

झरदारीनी काय करावे किंवा काय करु नये हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे.
"वाजपेयी" हे अविवाहीत राहू शकतात. त्याबद्दल कधीच "तशी" चर्चा झाली नाही.
मग राहुल गांधींच्या बाबतीतच ही चर्चा विरोधकाना का कराविशी वाटते.
वापरु नये पण एक म्हण आठवली " आपल्या तो बाब्या......"
मला वाजपेयी साहेबांच्या बद्दल आदर आहे

"तशी "म्हणजे कशी हे कृपया समजावुन सांगा.
वाजपायीं चे किस्से वेगळे.. हे वेगळे.

राहुल जी , शहारुख आणि करन बरोबर कॉफी पीत होते म्हणुन काहिच्या काहि लोक बोलतील पण तसे प्रकाशित करणे योग्य नाहि. काहितरी ठोक पुरावे हवेत तुसते टॉक नको. असो.
राहुल जी एका मुली बरोबर काहि रक्कम बॅगेत घेवुन बॉस्टन विमान तळा वर पकडले गेले. तशी हि जुनी बातमी आहे खरी पण ती मुलगी नक्की स्पॅनीश होती का अन्य कुठल्या देशाची हे सांग्णे अवघड आहे.

उद्दा राहुलजी पंतप्रधान झाले आणि त्यांना व्हाइट हाउस वर बोलवण्यात आले तर ते मिशेल ओबामा च्या तोडिस-तोड म्हणुन कोणाला घेवुन जाणार ह्याची जनतेला उत्सुकता आहे.

"वाजपेयी" हे अविवाहीत राहू शकतात. त्याबद्दल कधीच "तशी" चर्चा झाली नाही.

वाजपेयीं बरोबर अजून इतरसुध्दा आहेत. त्यांच्याबद्दलसुध्दा चर्चा झाली नाही.

"नरेन्द्र मोदी" हे अविवाहीत राहू शकतात. त्याबद्दल कधीच "तशी" चर्चा झाली नाही.

"अब्दुल कलाम" हे अविवाहीत राहू शकतात. त्याबद्दल कधीच "तशी" चर्चा झाली नाही.

"मोहन भागवत" हे अविवाहीत राहू शकतात. त्याबद्दल कधीच "तशी" चर्चा झाली नाही.

"शशी थरूर" तिसर्यांदा बोहल्यावर चढले पण त्याबद्दल कधीच "तशी" चर्चा झाली नाही. ;)

(लिस्ट खूप मोठी होइल म्हणून येथे थांबतो. काही नमुने वगळले आहेत. उदा. करुणानिधी)

( मिपाच्या काही सन्माननीय सदस्यांचा नामोल्लेखसुध्दा टाळला आहे ते सुज्ञ जाणतीलच. ;))

आत्मशून्य's picture

5 Feb 2011 - 3:08 pm | आत्मशून्य

झरदारी साहेबांना आमच्या शूभेच्चा, लवकरच गोड बातमी कळवा म्हणजे झाले.

काहितरी गोड बातमी असल्या शिवाय असा राजबिन्डा आणि श्रीमंत माणुस लग्नाच्या बेडित अडकत नाहि.
समजेल लवकरच

भडकमकर मास्तर's picture

6 Feb 2011 - 11:16 pm | भडकमकर मास्तर

रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक रोचक

वेताळ's picture

7 Feb 2011 - 10:37 am | वेताळ

हनीमुनला कुठे जाणार आहेत? कि हनीमुन नंतर त्यानी लग्न केले? ह्यावर काही प्रकाश फेकता आला तर बरे होईल.