कन्फर्मिटी

शुचि's picture
शुचि in काथ्याकूट
4 Feb 2011 - 9:49 am
गाभा: 

औषधोपचार/माहीती या भागामध्ये हा लेख टाकत आहे कारण हा लेख प्रायोगिक मानसशास्त्राशी निगडीत आहे.
CONFORMITY या शब्दाला मला मराठी शब्द न सुचल्याने तोच इंग्रजी शब्द वापरला आहे. कृपया शब्द सुचवावा.
_________________________________________________
असे समजा की काही लोकांचा गट आहे. या गटाचा तुम्हीदेखील एक हिस्सा आहात. या गटातील सर्व व्यक्तींना एक प्रश्न विचारण्यात आला आहे. प्रश्नाचे स्वरूप असे आहे की या प्रश्नाला अचूक उत्तर नाही. उत्तर संदिग्ध आहे. आता गटातील प्रत्येक व्यक्ती काही ना काही उत्तर देते. तुमची पाळी येते. समजा तुमचे उत्तर आधीच्या लोकांच्या उत्तरापेक्षा नाट्यमयरीत्या वेगळे आहे. तरीही गटाचा तुमच्यावर नाही म्हटलं तरी प्रभाव पडतोच आणि तुम्ही आधीच्या उत्तरांच्या जवळ जाणारे उत्तर देता.

वरील जी प्रक्रिया आहे तिला प्रायोगिक मानसशास्त्रात "CONFORMITY" असा शब्द आहे.

थोडक्यात व्याख्या करायची तर - कोणताही दबाव असताना अथवा नसताना, स्वतःची वागणूक बदलून , आपली प्रतिक्रिया, अन्य लोकांच्या प्रतिक्रियेशी मिळतीजुळती ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे CONFORMITY.

१९३७ मध्ये शेरीफ(Sherif) नावाच्या शास्त्रद्न्याने पुढील प्रयोग केला -
(१) एका व्यक्तीला (ज्याला गिनीपिग म्हणू या) , १५ फूटावरील दिव्याकडे पहावयास सांगीतले.
(२) तो दिवा हलला व थोड्या वेळाने दिसेनासा झाला.
(३) शेरीफ - किती लांब अंतरावर तो दिवा गेला?
गिनीपिग - मला नक्की सांगता येणार नाही पण ८ इंच दूरवर गेला असावा.
(४) २ रा दिवस - आता ३ अन्य लोक या प्रयोगात सामील झाले आहेत.
परत तोच दिवा तितकाच लांब हलवला व नाहीसा झाला.
शेरीफ - किती लांब अंतरावर तो दिवा गेला?
पहीली व्यक्ती - २ इंच
दुसरी व्यक्ती - १ इंच किंवा २ इंच
तीसरी व्यक्ती - छे छे १ पेक्षा जास्त नाही.
गिनीपिग - मला वाटतं ६ इंच हलला दिवा.
सगळेजणं त्याच्याकडे तो वेडा असल्यासारखे पहातात.
(५) ३ रा दिवस
सगळं २ र्‍या दिवसाप्रमाणे फक्त आता गिनीपिग उत्तर देतो - ४ इंच
(५) ४ था दिवस
सगळं २ र्‍या दिवसाप्रमाणे फक्त आता गिनीपिग उत्तर देतो - बहुतेक २ इंच

म्हणजे ८ इंचावरून तो २ इंचावर आला आहे केवळ गटाच्या प्रभावामुळे.
________________________________________________
वरील प्रयोगात निदान उत्तर तरी संदिग्ध होते पण .....
पुढे १९५१ साली ऍश(Asch) या शास्त्रद्न्याने दुसरा प्रयोग केला यामध्ये त्याने कंपूचा आपल्यावर कळत/नकळत पडणार्‍या दबावाचा अभ्यास केला. म्हणजे आपल्याला उत्तर जरी अगदी १००% माहीत असले तरी "गटामध्ये/कंपूमध्ये" रहाण्याकरता म्हणून आपण निखालस चूकीचे उत्तर देऊ शकतो.
___________________________________________________________________
पुढे १९५५ मध्ये क्रच्फिल्ड (Crutchfield) हा शास्त्रद्न्य या निष्कर्षाप्रत आला की - जे लोक "CONFORM" करतात ते बौद्धिकदृष्ट्या कमी परिणामकारक असतात. त्यांच्यामध्ये अहंची नभावना आणि नेतृत्वनैपुण्य हे गुण कमी आढळतात.असे लोक सामाजिक नात्यांमध्ये कमी प्रगल्भता असलेले तसेच न्यूनत्वाची भावना जोपासणारे असतात. ते संकुचित मनोवृत्तीचे, दबलेले, शरणागत वृत्तीचे अधिक असून त्यांना स्वतःबद्दलचे द्न्यान अत्यल्प असते.
त्याला हेदेखील आढळून आले की सामान्यतः स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक "CONFORM" करतात.पुरुष हे पारंपारीक रीत्या स्वातंत्र्य आणि झगडा ह्या दोन गोष्टी स्पर्धात्मक अभिव्यक्ती म्हणून व्यक्त करताना आढळतात याउलत स्त्रिया हीच अभिव्यक्ती अधिक जुळवून घेण्यातून व्यक्त करतात.
_____________________________________________________________________
संदर्भ -
दुवा १
दुवा २

प्रतिक्रिया

त्याला हेदेखील आढळून आले की सामान्यतः स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक "CONFORM" करतात.पुरुष हे पारंपारीक रीत्या स्वातंत्र्य आणि झगडा ह्या दोन गोष्टी स्पर्धात्मक अभिव्यक्ती म्हणून व्यक्त करताना आढळतात याउलत स्त्रिया हीच अभिव्यक्ती अधिक जुळवून घेण्यातून व्यक्त करतात

शुची! तुझी विचारशक्ती आणि ती आजमवण्याची पद्धत खूपच प्रगल्भ आहे! :)

बाकी मला समजलेलें ( ;) ) वरचे वाक्य अधिक भावले!

_______________

मला याचा एक अनुभव आला.... (दुर्दैवाने) मी बस मधून प्रवास करत असताना... लेडीजसीटवर बसलेल्या एका साधारण पुरूषासारख्या दिसणार्‍या आणि त्याप्रमाणे वेशभूषा असणार्‍या माणसाला मी उठण्यासाठी व एका गरोदर बाईला बसण्यास जागा देण्यासाठी विनन्ती केली..

तेव्हा तो माणूस उर्मटपणे म्हणाला, "मी का उठू? मी पहिल्या स्थानकापासून (पक्षी: स्टॉपपासून) इथे बसलो आहे.. वगैरे वगैरे..)" तेव्हा बसमधली एक मुलगी त्याला म्हणाली , " ही जागा फक्त लेडीज्-साठीच आहे.. कोणत्याही स्त्रीने कधीही तिथे बसलेल्या पुरुषास (किन्वा पुरुषासारख्या दिसणार्‍या माणसास) उठायला सांगितले.. तर उठावे लागते.."
तो माणूस चिडून म्हणाला, " मी तरीही नाहीच उठणार्..जे करायचं असेल ते करा..."
मग ती मुलगी म्हणाली, "जर तू स्त्री / महिला/ मुलगी असशील तर तू तेथेच बसून राहशील."
मग तो माणूस म्हणाला ," हो तसं समजा हवं तर "
मग ती मुलगी म्हणाली," ओके... मग तसं तू सिद्ध करून दाखव... की तू एक स्त्री आहेस.... मग आम्ही तुला इथेच बसू देऊ... नाही तर धक्के मारून बाहेर काढू..."
मग तो तोन्डातल्या तोन्डात शिव्या देत उठला....आणि त्याने त्या बाईस बसायला जागा दिली...

टीप : कन्डक्टर नावाचा जो इसम असतो... तो अश्या भानगडीत पडत नाही...... तो म्हणतो.. तुमचं तुम्ही बघून घ्या!

______

तात्पर्यः "स्त्री" ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बर्‍याच गोष्टी सहन करते... निसर्गाने तिची मानसिक आणि शारिरीक जडण घडणच अशी केलेली असते... पण जेव्हा तिच्या सहनशक्तीचा अन्त होतो... तेव्हा ... संहाराला सुरुवात होते..

सूक्ष्म तात्पर्य: एखाद्या स्त्री'च्या सहनशीलतेचा अन्त कुणीही कधीही पाहू नये.. किन्वा तिच्या भावना दडपण्याचाही प्रयत्न करून नये! :)

आत्मशून्य's picture

4 Feb 2011 - 12:04 pm | आत्मशून्य

"स्त्री" ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत बर्‍याच गोष्टी सहन करते... निसर्गाने तिची मानसिक आणि शारिरीक जडण घडणच अशी केलेली असते...

तूमच्या ऊदाहरणात तूम्ही म्ह्टलेच आहे की यात कन्डक्टरने भाग घेतला न्हवता तसेच मदतीसाठी एक मूलगी पूढे आली होती ह्यालाच शूचीतै स्त्रीया "CONFORM" जास्त करतात असे म्हणतात. सामना १ वीरूध्द १ असा असता तर चीत्र वेगळे दीसले असते.

पण जेव्हा तिच्या सहनशक्तीचा अन्त होतो... तेव्हा ... संहाराला सुरुवात होते..

कशाला ? आजतागायत जगातला कोठला प्रश्न या जागात हींसेमूळे सूटला आहे ?

स्त्रीयांच्या कन्फर्मिटीबाबत फारसा अभ्यास नाही पण अनेक छोट्या छोट्या गोश्टीत त्या बरेचदा गोंधळलेल्या अवस्थेत मात्र नक्कीच अनूभवाला येतात ऊदा एका गोश्टीला "आत्मवीश्वास" हे लहानपणा पासून माहीत असलेले नाव दावे की "हेल्दी अहंकार" म्हणावे याबाबत गोंधळ ऊडणे असो वा इतर अनेक गोश्टी समजा.. स्त्रीयांच्या कन्फर्मिटीला बहूतेक त्यांचा मनाचा हाच वैचारीक गोंधळ कमीजास्त प्रमाणात कारणीभूत असावा असे राहून राहून वाटते.... बाकी जाणकार उजेड टाकतीलच.

तिमा's picture

4 Feb 2011 - 8:15 pm | तिमा

मग ती मुलगी म्हणाली," ओके... मग तसं तू सिद्ध करून दाखव... की तू एक स्त्री आहेस.... मग आम्ही तुला इथेच बसू देऊ... नाही तर धक्के मारून बाहेर काढू..."

कशावरुन तो तृतीयपंथी नसेल ? आणि त्यांना तर लेडीज मधून प्रवास करायला परवानगी आहेच.

इन्द्र्राज पवार's picture

4 Feb 2011 - 10:39 am | इन्द्र्राज पवार

अर्थातच हा विषय मानसशास्त्राशीच निगडित असल्याने त्याबाबतच्या झालेल्या (वा होत असलेल्या) प्रयोगाबाबत थेट निष्कर्षावर न येता काही ढोबळ अंदाजच प्रथमतः बांधावे लागतात. क्रच्फिल्ड म्हणतो त्याप्रमाणे Conformity ला मान डोलावणारे अभिजन नसून ते सर्वसाधारण बुद्ध्यांकाचे असू शकतात ("असतातच" असे विधान करणे धाडसाचे होऊ शकेल...)

CONFORMITY = अनुरुपता......ही एक प्रकारचे अ‍ॅग्रीमेंट तसेच वैचारिक 'सुटेबिलिटी' दर्शविणारी संज्ञा आहे. म्हणजे मी एका गावात नवखा आहे आणि नदीवर हातपाय धुवायला गेल्यावर पाहिले की पाणी गुडघाभरदेखील खोल नाही, असे असूनही काठाशेजारी मासेमारीकरीता गळ टाकून बसलेल्या व्यक्तीस "तू हकनाक तिथे बसला आहेस, कारण एवढ्याला पाण्यात मासे असण्याची सुतराम शक्यता नाही..." असा अनाहुत सल्ला मी देणार नाही....कारण त्याच्या स्थितीची Conformity मी मान्य केली आहे. कदाचित 'मासेच पकडणे' हे त्याचे मुख्य ध्येय असूही शकत नाही. असेही असू शकेल की जी गोष्ट मला माहित नाही, ती त्याला ज्ञात असेल. गिनिपिगला इतरांपेक्षा तो दिवा जास्त अंतरावर गेल्याचे जाणवणे आणि तो (त्या 'व्हिजन' मुळे) एकटा पडणे....आणि काही दिवसानंतर त्याने मेंढरासारखे खाली मान घालून "जनप्रवाहा" सामील होणे ही "माणूस समाजप्रिय" आहे हीच मानसिकता प्रकर्षाने समोर येते.

परंतु गिनिपिग अखेरपर्यंत '८ इंच अंतरा'शी हटून बसला असता तर? इतरांची उत्तरे दिवसागणीक संदिग्ध होत जातील, पण नि:संशय गिनिपिग आपल्या मताशी ठाम राहिला असता तर मग Conformity पासून तो अलग झाला असताच. अशा गिनिपिगमुळेच खरे तर नवनवीन संकल्पनाचा शोध लागत गेला आहे असा पृथ्वीचा इतिहास सांगतो.

"स्टीम पॉवर" ते "सोलर पॉवर...न्यूक्लिअर पॉवर..." आणि आता "जीओथर्मल पॉवर" हा प्रवास याच अनुरुपतेच्या माध्यमातून मानवाने साकारला आहे. कॉफी उकळत असताना भांड्यातून बाहेर पडणारी वाफ सर्वच पाहात असतात पण एखादा 'गिनिपिग' त्या वाफेत कशाप्रकारची उर्जा दडून राहिली आहे आणि तिची क्षमता एक दोन इंच आहे की आठ इंच होऊ शकते हे त्याच्या लक्षात येतेच पण Conformity Group च्या दडपणामुळे तो जर उद्या ८ वरून २ वर आला असता तर मानव अजून अश्मयुगीच राहिला असता.

"...असे लोक सामाजिक नात्यांमध्ये कमी प्रगल्भता असलेले तसेच न्यूनत्वाची भावना जोपासणारे असतात. ते संकुचित मनोवृत्तीचे, दबलेले, शरणागत वृत्तीचे अधिक असून त्यांना स्वतःबद्दलचे द्न्यान अत्यल्प असते...."

खरंय....त्यामुळे प्राथमिक्/माध्यमिक शाळेतील वर्षात एखादा अत्यंत हुशार असलेला विद्यार्थीही सामाजिक नात्यांच्या दडपणाने [वा आर्थिक परिस्थितीमुळे] प्रगल्भता असूनही पुढे शिक्षणाची दिशा बदलतो आणि कुठेतरी खेडेगावात सहकारी कुक्कुट पालन केन्द्रात वा साखर कारखान्यात मस्टर कारकून म्हणून खिन्नपणे आयुष्य घालवित बसतो, पण त्याच वेळी निव्वळ न्यूनतेची भावना मनी कधीही न बाळगणारा दुसरा ३५% वाला बाळ्या राजकारणाच्या माध्यमातून 'बाळासाहेब'ही बनू शकतो.

शुचिताई म्हणतात त्याप्रमाणे 'गिनिपिग' ला स्वतःबद्दलचे ज्ञान अत्यल्प असूही शकते...पण काहीवेळा भोवतालची कौटुंबिक आणि सामाजिक स्थितीही त्याच्या ज्ञानाला खोल अंधारभावीत ढकलून देत असते.

छान विषय !!

इन्द्रा

विसुनाना's picture

4 Feb 2011 - 2:57 pm | विसुनाना

अनुगामिता/अनुगम हा शब्द जास्त योग्य ठरेल का?

इन्द्र्राज पवार's picture

4 Feb 2011 - 3:19 pm | इन्द्र्राज पवार

Conformity साठी मी जे शब्दकोश पाहिले तीत "अनुरूपता, सारखेपणा, जुळती असणे" असेच अर्थ मिळाले. (माझ्याकडे राज्य शासनाने प्रकाशित केलेला 'शासन व्यवहार कोश'ही आहे, तिथे 'अनुरूपता' बरोबर 'अभिसंगति' असा एक अर्थ दिला आहे, पण "अनुगामिता/अनुगम" कुठेच सापडले नाहीत.)

तुम्ही सुचविलेले दोन्ही विकल्प गेयतेच्या दृष्टीने सुंदर आहेत, पण त्यातून नेमका अर्थ ध्वनीत होत नाही (असे मला व्यक्तीशः वाटते). तुमच्याकडे त्या नामाचे एखादे उदाहरण आहे? असल्यास इथे वा खरडीत दिले तरी मला त्याचा पाठपुरावा करता येईल.

(या अनुषंगाने थोडेसे अवांतर : शुचिताईनी धाग्याचा विषय देवनागरीमध्ये देताना "कन्फर्मिटी" असे टंकल्याचे दिसते. वास्तवित तिथेही "कन्फॉर्मिटी" असे हवे होते. कन्फर्मिटी याउच्चाराचा अर्थ एखाद्या मुद्द्यास "पुष्टी देणे" किंवा एखादा विषय "स्थायी रुपाने कायम होणे" असा होतो; जो धागाकर्तीस अभिप्रेत नाही.)

इन्द्रा

धन्यवाद इंद्र. होय मला वाटले होते की मी चुकून "CONFIRMITY" चा उच्चार लिहीते आहे की काय. तुमचे विवेचन अतिशय विचारपूर्ण आहे. खूप आवडले.

विसुनाना यांचेदेखील शब्द शोधल्याबद्दल आभार.

अरुण मनोहर's picture

4 Feb 2011 - 11:30 am | अरुण मनोहर

विषय छानच आहे. इंद्राज पवारांचे विष्लेशण मननीय आहे. इतर विचारवंतांचे विचार वाचायला आवडेल.

अवांतर- एक मजेशीर कल्पना -
मिपावरील कंपुबाजांमधे अनुरुपता कशी निर्माण होते/ हाताळल्या जाते....
आणि ह्या कंपुबाहेरील लोक कंपुला अनुरुप विचार हळूहळू कसे व्यक्त करू लागतात,
हे देखील अभ्यासाचे विषय होउ शकतील.

कानडाऊ योगेशु's picture

4 Feb 2011 - 6:30 pm | कानडाऊ योगेशु

१२ अँग्री यंग मॅन चा उल्लेख इथे अगदी योग्य ठरावा.
११ जण विरूध्द १ असा सामना असताना आणि हे अकरा जण एकाला त्याचे मत कसे चुकीचे आहे हे पटवुन देण्याचा प्रयत्न करत असताना तो "एक" केवळ तर्काने व वाद-विवादातुन इतरांना पटवुन देतो कि तुम्हा अकरांचे मतच कसे चूक आहे ते!

अतिशय संदर विषय आहे..
म्हणून असं म्हणत असावेत की, दहा मूर्ख ज्या ठिकाणी असतात तिथे एकटा शहाणा माणूस मूर्खच ठरतो.. ! कारण त्यालाही त्या परिस्थितीला जुळवून घ्यावे लागते.
शुची विषय खूप छान आहे हा.
बाकी.. इतर प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.

सेरेपी's picture

4 Feb 2011 - 8:46 pm | सेरेपी

१. तुम्हाला यातुन असे सुचवायचे आहे की नाही माहीत नाही, पण हा एखादा 'parsonality type ' नाही. (जसे, अ type ब type personality ) इतर अभ्यासही तसे काही दाखवत नाही. (संदर्भ: तुम्हीच दिलेली लिंक)
२. Group conformance हा समाजातील बहुसंख्य व्यक्तींमध्ये असला की त्याचे अनेक फायदे सामाजिक मानसशास्त्राचा अभ्यास दाखवतो. उदा. सुरक्षिततेची भावना, सेन्स ऑफ बिलोंगिंग, सर्वसाधारण सामाजिक नियम (सोशल नॉर्म्स) पाळले जाणे वगैरे.
३. दुसर्या हाताला मिलग्राम चा अभ्यास हा conformance /conformity चे होऊ शकणारे भयंकर परिणाम दाखवतो. त्याच्या अभ्यासात भाग घेणारे बहुतेक लोक अभ्यासकाने सांगितल्यावर ऐकायचे म्हणून काचेपलीकडच्या माणसांना (जे अभ्यासकाचे सहाय्यक होते) ४५० volt पर्यंतचे झटके द्यायला तयार झाले. अर्थात ते झटके खोटे आहेत हे त्यांना माहीत नव्हते. फक्त काही लोकांनी काचेपलीकडच्या माणसांच्या किंकाळ्या ऐकून अधिक झटके देण्यास नकार दिला. या अभ्यासावर प्रचंड टीका झाली ती लोकांच्या मनाबरोबर खेळण्यासाठी, पण तरी त्याचे महत्व घडवून आणलेले दंगे, युद्ध इत्यादी गर्दीच्या मानसशास्त्राच्या संदर्भात वापरले गेले. (संदर्भ: http://cnr.berkeley.edu/ucce50/ag-labor/7article/article35.htm)

मिलग्रअ‍ॅमचा तुम्ही दिलेला दुवा खूपच रोचक आहे. अधिकृत व्यक्तीचा/ संकल्पनेचा दबाव हा येतोच. संकल्पना (एन्टिटी) म्हणायचे कारण की माझे उदाहरण द्यायचे झाले तर जेव्हा कधी बागेत्/रस्त्यावरून जाताना समोरून एखादी व्यक्ती येते तेव्हा मी हसत त्या व्यक्तीस अभिवादन करते परंतु हेच जर त्या व्यक्तीबरोबर भला दांडगा कुत्रा असेल तर १०१% अभिवादन करते. एक प्रकारचा दबाव येतोच.

सेरेपी's picture

4 Feb 2011 - 9:38 pm | सेरेपी

तुमच्या वागण्याला मानसशास्त्राप्रमाणे कन्फॉर्मिटी नाही म्हणता येणार. ती फक्त anticipated anxiety मधुन आलेली प्रतिक्रिया आहे. यापेक्षा जर असं झालं कि तुम्ही तुमच्या मुलीला बरोबर घेऊन जाताय आणि तिला सांगत राहिलात कि कुत्रा दिसला कि दगड मार, आणि तिने ते केलं (पटत नसतानाही) तर ते कन्फॉर्मिटिचे उदा. असेल.
(तुम्ही तुमच्या मुलीला असे काही सांगता असे अजिबात म्हणायचे नाही मला ;-) )

शुचि's picture

4 Feb 2011 - 9:46 pm | शुचि

पण लोक जेव्हा कुत्रा बाळगून फिरतात तेव्हा त्यांची अपेक्षा असते की त्यांचे संरक्षण व्हावे. दुसर्‍या शब्दात लोकांनी त्यांच्याशी नीट वागावे म्हणा ना. मी या त्यांच्या अपेक्षेशी , माझ्या वर्तणूकीत बदल घडवून कन्फॉर्म होत असते असे नाही म्हणता येणार का?
मला तरी हे उदाहरण सटल कनफॉरमिटी चे वाटते.

सेरेपी's picture

4 Feb 2011 - 10:13 pm | सेरेपी

१. लोक (अमेरिकेत तरी....जिथे तुम्ही बहुधा आहात) कुत्रा संरक्षणासाठी घेऊन फिरत नाहीत. त्यांचा प्राथमिक उद्देश तरी लाड करायला कोणीतरी असावे हा असतो. उलट त्यांना त्यांच्या कुत्र्याला कोणी घाबरले तर वाईट वाटते.
२. पहिल्या गृहीतकाला खरे मानले नाही तरिही, तुम्ही म्हणता तो त्यांचा उद्देश असला तरी तो intimidation चा असतो, कोणाला काही करायला लावण्याचा (म्हणजे कन्फॉर्मिटीचा) नसतो. त्याला तुमची प्रतिक्रीया भितिची व थोडी 'जुलमाचा रामराम' यातली असते. तुम्ही त्यांचा संदेश (सटल वगैरे सुद्धा) मान्य करत नसता.

इन्द्र्राज पवार's picture

4 Feb 2011 - 10:07 pm | इन्द्र्राज पवार

"....तुमच्या वागण्याला मानसशास्त्राप्रमाणे कन्फॉर्मिटी नाही म्हणता येणार. ती फक्त anticipated anxiety मधुन आलेली प्रतिक्रिया आहे...."

~ मानसशास्त्रीय दृष्टीकोणातून अशा "Anticipated Anxiety" चा स्वतःच्या हेतूसाध्यासाठी, रक्ताचा थेंबही न सांडता, उपयोग करून घेता येतो. "लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी" चे उदाहरण शुचिताईनी मूळ धाग्यात दिलेल्या उदाहरणात आहेच, म्हणजेच पहिल्या दिवशी ९ एकीकडे तर गिनिपिग दुसरीकडे. आता गिनिच्या उत्तराकडे रोचकतेने पाहणारे त्या नऊजणात किती असू शकतील?.....शक्यतेच्या सूत्रानुसार जास्तीतजास्त १ किंवा २. याचाच अर्थ असा की दुसर्‍या वा तिसर्‍या दिवशीदेखील 'मेजॉरिटी' एकीकडे व गिनि दुसरीकडेच राहणार. हा जो 'सो कॉल्ड मेजॉरिटी ग्रुप' आहे तो 'अधिकृत व्यक्तीच्या' वा 'तशा संकल्पनेच्या" दबावतंत्राला बळी पडतोच पडतो असे शास्त्र सांगते.

बागेत फिरणारे 'ते' दांडगे कुत्रे कदाचित इतके माणसाळलेले असेल की अगदी त्याला धक्का मारून जरी एखादी (त्याच्या नजरेत अनोळखी) व्यक्ती गेली तरी तो आपले कानही हलविणार नाही. पण शुचिताईनी त्याला १०१% दिलेले अभिवादन हे स्पष्ट करेल की कुत्र्याविषयीच्या 'जनरल एन्टिटी' ला त्यानी घटना घडण्यापूर्वीच रूकार दिला आहे. 'स्टेट' (विशेषतः हुकूमशाही राज्यप्रणालीतील) नेमक्या याच हळुवार मानसिक स्थितीचा लाभ उठवून आपले इप्सित साध्य करीत असते.

चित्रपटातील याचे एक उदाहरण ~ शुचि आणि सेरेपी....तुम्ही दोघीही इंग्रजी चित्रपट पाहात असाल हे गृहित धरतो. असाल तर या विषयासाठी ब्रॅड पिट अभिनित Inglorious Bastards हा हिटलर वध कटावर आधारलेला चित्रपट पाहा. यातील एक नाझी (एस.एस.) ऑफिसर या Mass Mind Conformity चा पुरेपूर फायदा घेऊन फ्रेंच परगण्यात लपून बसलेल्या [वा फ्रेंचानी ठेवलेल्या] ज्यू जमातीतील लोकांचा छ्डा लावतो. कोणत्याही छळाचा वापर न करता, केवळ आपल्या शांतबोली पद्धतीने तो एका फ्रेंचाच्या तळघरात लपलेल्या कुटुंबाचा पत्ता लावतो ते अनुभवण्यासारखेच आहे. नाझी ऑफिसर म्हणजे कर्दनकाळ ही Mass Anticipated Anxiety बाजूला ठेवायला लावण्यात तो यशस्वी ठरतोच पण मुख्य म्हणजे आपला मूळ उद्देश्यही सफल करतो.

संकल्पनेच्या दबावाचा Conformity सोबत फार जवळचे नाते आहे.

इन्द्रा

>> कोणत्याही छळाचा वापर न करता, केवळ आपल्या शांतबोली पद्धतीने>>
आलं लक्षात - Speak softly and carry a big stick - रूझवेल्ट यांचे हे वाक्य खूप बोलकं आहे.
___________________________________________
सेरेपी आणि इंद्रा यांनी चार चांद लावले आहेत या लेखाला.

इन्द्र्राज पवार's picture

4 Feb 2011 - 10:47 pm | इन्द्र्राज पवार

"....सेरेपी आणि इंद्रा यांनी चार चांद लावले आहेत या लेखाला...."

~ शुचिताई, चारही चांद तुम्हीच लावलेले आहेत.....आम्ही (किमानपक्षी मी..) लावल्या त्या इकडेतिकडे दोनचार चांदण्याच्या टिकल्या. त्यातही उपचंद्र लावलाच असेल तर त्या जीएप्रेमीने ! (आता हा जीएप्रेमी काय प्रकार आहे, हे तुमच्याच Anticipated Anxiety ने शोधा......)

इन्द्रा

"म्यानातून उसळे तलवारीची पात" .... माहीत आहे.

इन्द्रा, जवळचे नाते आहे ते मान्य, पण तरीही संकल्पना तीच नाही.

बापरे....म्यानातून उसळे-बिसळे....असो, चार चाँद वगैरे काही नाही. बर्याच दिवसांनी काही ओळखीच्या संज्ञा पाहील्या, म्हणून लिहावसं वाटलं.

आत्मशून्य's picture

4 Feb 2011 - 11:21 pm | आत्मशून्य

मधे मला वाटत नाही की तो "केवळ आपल्या शांतबोली पद्धतीने तो एका फ्रेंचाच्या तळघरात लपलेल्या कुटुंबाचा पत्ता लावतो" .

तो चक्क गॉडफादर स्टाइलने धमकी देतो(एन ऑफर यू कॅनॉट रीफ्यूझ) की जर जर त्याने सैनीकांना घराची झडती घ्यायला लावली (ह्यात तो तळघरात लपलेल्या ज्यू बाबत घरामधे दडनार्‍या उंदीरांची ऊपमा देतो) आणी ज्यू सापडले तर त्या फ्रेंच माणसाच्या तीन तरूण मूलींची काहीही खैर नाही. मूळातच त्याची देह्बोली ही त्याच्याकडे खात्रीलायक माहीती आहे अशी असते. पण फ्रेंच माणूस जेव्हां त्याच्या कोणत्याही मानसीक दबावतंत्राच्या जाळ्यात फसत नाही तेव्हांच तो वरील धमकी देतो. म्हणजेच एक प्रकारे त्या ओफीसरची चर्चेमधे हार झाली असेच आहे म्हणूनच तो शेवटचे धमकीचे हात्यार ऊपसतो.

या चीत्रपटातील हीटलरवीरोधी लोकांना ओळखण्याचे सर्व प्रसंग हे जर्मन लोकांच्या नीरीक्षण क्षमतेशी व त्याद्वारे मीळालेल्या खात्रीशीर पूराव्यांवर अधारीत दाखवले आहेत म्हणूनच त्यांचे संशय व इन्वेस्टीगेशन हे अत्यंत आत्मवीश्वासपूर्वक आणी परीणामकारक दाखवले आहेत. असो हा चीत्रपट पूर्णपणे काल्पनीक घटनांवर आधारीत आहे हे माहीतच असेल. इट्स अ फीक्शनल वॉर मुवी.

इन्द्र्राज पवार's picture

4 Feb 2011 - 11:22 pm | इन्द्र्राज पवार

"...ज्यू सापडले तर त्या फ्रेंच माणसाच्या तीन तरूण मूलींची काहीही खैर नाही...."

~ होय....पण मुद्दा जो आहे तो त्या एस.एस.ऑफिसरच्या 'थंडगार' मनोवृत्तीचा. "General Assumption" असे तयार झाले आहे की (विशेषतः चित्रपटामुळे) दाखवायचा नाझी ऑफिसर तर तो ताडमाड, धिप्पाड, क्रूरकर्मा आणि दर सेकंदाला किंकाळ्या फोडत समोरच्याला दरदरून घाम फुटतो की नाही हे पाहण्यास उत्सुक असलेली पोशाखी व्यक्ती.

पण IB मधील तो ऑफिसर या कल्पनेला छेद देतो....त्याची बर्फासारखी वर्तणूकच शहारे आणणारी वाटते. म्हणजे प्रेक्षकाला त्या शोधाचा अंत काय होणार आहे याची कल्पना तर येतेच पण त्याने समोरच्या त्या फ्रेंच कार्यकर्त्याला "संताप" येईल असे काहीही केलेले दाखविलेले नाही. [शिवाय मुख्य काम 'ज्यू' शोधणे हेच असल्याने त्या तीन फ्रेंच मुलीपैकी एक पळून जाताना दाखविली तरी तो तिच्यावर गोळी झाडत नाही, कारण त्याचा तेथील भेटीचा मुख्य हेतू सफल झालेला असतोच)

अर्थात तुम्ही म्हणता तसे IB हा पूर्णपणे काल्पनिक कथानकावर आधारित चित्रपट आहेच, फक्त इथे ते उदाहरण मानसशास्त्रीय अभ्यासासाठी घेतले आहे.

कारण की माझ्या नीरीक्षणानूसार फ्रेंच माणूस त्याच्या कोणत्याही क्लूप्तीला/मानसीक दबावाला न फसता आत्मवीश्वासाने ऑफीसर्ला फेस करत रहातो पण जेव्हा त्याला हे कळून चूकते की हा ओफीसर फक्त चर्चेवर थांबणार नाही तर सैनीकांना घराची झडती घ्यायलाच लावणार तेव्हांच तो हार मानतो. जे माझ्या तरी मतानूसार मानसीक दबावाला बळी पडणे ठरत नाही तर पूढील वास्तवाची स्पष्ट कल्पना आल्याने कूटूम्बाला वाचवण्यासाठी घेतलेला वीचार्पूर्वक नीर्णय आहे असेच वाटले.

त्या तीन फ्रेंच मुलीपैकी एक पळून जाताना दाखविली तरी तो तिच्यावर गोळी झाडत नाही

माझी चीत्रपट पाहताना चूक झाली असावी कारण त्या तळघरातील ज्यूंना हूडकून गोळी घालण्याच्या प्रसंगामधे फ्रेंच न्हवे तर तळघरात लपलेल्यांपैकी एक ज्यू मूलगी पळून जाते आणे ती आउटॉफ रेंज गेलेली असल्याने तो गोळी झाडू शकत नाही असे दीसले. (कारण जर ज्यू कोठे लपले आहेत हे दाखवले आहे तर कोणत्याही फ्रेंच व्यक्तीला तेथून पळून जायची गरजच नाही)

इन्द्र्राज पवार's picture

5 Feb 2011 - 12:28 am | इन्द्र्राज पवार

त्या चित्रपटाची डीव्हीडी माझ्याकडे असल्याने आता चटकन 'ते' पूर्ण दृष्य नव्याने पाहिले. तो नाझी ऑफिसर आपल्या थंड वर्तनाने त्या फ्रेन्च डेअरीमनला कणाकणानेच जेरीला आणतो. त्याच्या स्वभावाचे ते वैशिष्ट्य ठासविणे हाच दिग्दर्शकाचा हेतू आहे हे दिसतेच, अन्यथा त्या तेवढ्या दृष्यासाठी तब्बल, १५ मिनिटे खर्च करण्याची गरज नव्हती....टेबलवर फक्त दोघेच असतात.....डेअरीमन त्या संभाषणानेच कोलमडून पडतो.

तळघरातून निसटून जाणारी ती फ्रेन्च ज्यू मुलगी ['शोशन्ना' तिचे नाव]....वाचते, ती पिस्तुलीच्या ट्प्प्यात येत नाही म्हणून नव्हे तर हा नाझी ऑफिसर जाणीवपूर्वक हात खाली करतो...."जा, जग जा !" या अर्थाने. मोकळा माळच असतो ती पळत जाते तो भाग....याच्याकडे तर ढीगभर वाहने आणि तितकाच फौजफाटा असल्याचे दाखविले आहे. मनात असते तर तिला पकडणे अशक्य नसावे....पण कथानकाच्या दृष्टीने तिचे "वाचणे" गरजेचे आहे, कारण चित्रपटाती तिच नायिका आहे....[शेवटी तो चित्रपट काल्पनिक कथानकावर आहे हे आपणा दोघानांही माहिती आहेच.]

असो...मुख्य मुद्दा 'सायकॉलॉजिकल ट्रीटमेन्ट अ‍ॅण्ड पॉवर ऑफ व्हर्बल प्रेशर" हा असल्याने चित्रपटातील घडामोडी इथेतरी दुय्यम मानाव्यात.

इन्द्रा

आत्मशून्य's picture

5 Feb 2011 - 1:23 am | आत्मशून्य

असो...मुख्य मुद्दा 'सायकॉलॉजिकल ट्रीटमेन्ट अ‍ॅण्ड पॉवर ऑफ व्हर्बल प्रेशर" हा असल्याने चित्रपटातील घडामोडी इथेतरी दुय्यम मानाव्यात.

होय आता आपण व्हर्बल प्रेशर देणारं व्हर्बल कम्यूनेकेशन बघूया तो ऑफीसर जाम ब्लाब्लाब्लाब्लाब्ला("सायकॉलॉजिकल ट्रीटमेन्ट अ‍ॅण्ड पॉवर ऑफ व्हर्बल प्रेशर") बडबड करतो (चीत्रपटातील १५ मीनेटे यातच जातात)त्याला फ्रेंच मनूश्य अजीबात दाद देत नाही, मग ऑफीसर शेवटी तो पूढील संवाद बोलतो,

German officer: Then I must have my men enter your home and will conduct a thorough search before officially I crush your familie's name from my list and if there any irregularity is found ,rest assure there will be.... that is unless if you have something to tell me that's makes this conducting of search unnecessary. I might add also that any information that makes a performance of my duty is here would not be met with punishment, actually quite a contrary it will be met with reward, and that reward will be your family will seize to be harresed in any way by German military during rest of our occupation of your country.

German officer: you are sheltering enemies of the state are you not ?

French guy: Yes.
तूमच्या कडे डीव्हीडी असल्याने क्रूपया १७ मीनीटे व १९ से़कंद या ठीकाणी व्हीडीओ सीक करून प्ले करावा म्हणजे जे मी लीहले आहे त्याला पूश्टी मीळेल. व ऑफीसरने ऊघड धमकी दील्यमूळेच पूढचे दूर्दैव टाळावे म्हणून फ्रेंच माणूस कबूल होतो हे कळेल. त्या आधीच्या सर्व माईंड गेम्सना,"सायकॉलॉजिकल ट्रीटमेन्ट अ‍ॅण्ड पॉवर ऑफ व्हर्बल प्रेशरला" फ्रेंच माणूस पूरून उरतो हे तर सहजच कळते.

सूर्यपुत्र's picture

5 Feb 2011 - 10:47 am | सूर्यपुत्र

>>(एन्टिटी) म्हणायचे कारण की माझे उदाहरण द्यायचे झाले तर जेव्हा कधी बागेत्/रस्त्यावरून जाताना समोरून एखादी व्यक्ती येते तेव्हा मी हसत त्या व्यक्तीस अभिवादन करते परंतु हेच जर त्या व्यक्तीबरोबर भला दांडगा कुत्रा असेल तर १०१% अभिवादन करते. एक प्रकारचा दबाव येतोच.
व्यक्तीबरोबर भला दांडगा कुत्रा असेल, तर तुम्ही नक्की कुणाला १०१% अभिवादन करता? त्या व्यक्तीला की त्या कुत्र्याला? पण जर समजा तुमच्या अभिवादन करण्याने जर त्या व्यक्तिवर किंवा त्या कुत्र्यावर (किंवा त्या दोघांवरही) दबाव येत असेल तर??

-सूर्यपुत्र.