खारे शंकरपाळे

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
3 Feb 2011 - 2:11 pm

रविवारी आजी आजोबा गेले ऑस्ट्रीयन आल्प्स मध्ये हिंडायला. त्यांना अशा ट्रीपमध्ये च्यावम्याव खायला म्हणून नेहमी
खारे शंकरपाळे आवडतात.(रेड वाइन बरोबरचा त्यांचा आवडता चकणा आहे तो..)
ह्या वेळी मी थोड्या वेगळ्या प्रकारे हे शंकरपाळे केले. ह्यावेळी थोडे वेगळे मसालेही त्यात घातले. हे शंकरपाळे जास्त पटकन होतात, कुटायला लागत नाही, मेहेनत कमी असे लक्षात आले म्हणून ही रेसिपी तुम्हा सर्वांसाठी..
साहित्य- १ वाटी डाळीचे पीठ (बेसन),२ वाट्या मैदा, २ चमचे रवा, २ मोठे चमचे दही किवा अर्धी वाटी ताक,
१ चमचा लाल तिखट, १/२ चमचा हळद, १/२ चमचा जिरे, १/२ चमचा ओवा, १ चमचा धनेजीरे पूड,१ मोठा चमचा ड्राय बेसल लिव्ज,चवीनुसार मीठ, तळणीसाठी तेल
कृती- वरील सर्व पदार्थ एकत्र करा. २ चमचे तेलाचे मोहन घालून घट्टसर भिजवा.
१५-२० मिनिटे झाकून ठेवा. नंतर पोळी लाटून, शंकरपाळे काता आणि मध्यम आचेवर तळा.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

3 Feb 2011 - 2:12 pm | चिरोटा

मस्तच आहेत.

हाये मार डाला.. माझा वीक पॉईंट.............बदला घेतलाच शेवटी :(

नरेशकुमार's picture

3 Feb 2011 - 2:30 pm | नरेशकुमार

चहा बरोबर मस्त लागतात.

sneharani's picture

3 Feb 2011 - 2:58 pm | sneharani

मस्त! आवडतात!
फोटोही मस्त.
:)

धनुअमिता's picture

3 Feb 2011 - 4:18 pm | धनुअमिता

खुप छान आहेत .फोटो खुप छान आलाय.
मला खुप आवडतात.

धमाल मुलगा's picture

3 Feb 2011 - 4:20 pm | धमाल मुलगा

दे पार्सल धाडून. ;)

कुंदन's picture

3 Feb 2011 - 4:24 pm | कुंदन

>>दे पार्सल धाडून.
व्हाया दुबै.

+१
दे पार्सल धाडून.
व्हाया बॉस्टन.;)

मेघवेडा's picture

3 Feb 2011 - 4:21 pm | मेघवेडा

झकास!

प्राजक्ता पवार's picture

3 Feb 2011 - 4:40 pm | प्राजक्ता पवार

खुसखुशित आणि चविष्ट .

धन्यवाद,

मैदा आहे घरी करुन पहायला हरकत नाहि, बाकी सुरेख फोटो.

कच्ची कैरी's picture

3 Feb 2011 - 5:05 pm | कच्ची कैरी

मस्त आणि सोपा पदार्थ !यात कसूरी मेथी घातली तर चालेले का?

स्वातीताई, मी तुमच्या शेजारी 'रेवती आजी' म्हणून रहायला येते.;)
आल्पस् मध्ये फिरायला जायचीही तयारी आहे.
खारे शंकरपाळे करायचं तेवढं तू बघ.;)

मस्त आहे आयडीया..
मी ही येईन आल्प्स मध्ये फिरायला.
आपण दोघी जाऊ स्वातीताईच्या शेजारी रहायला. :)

निवेदिता-ताई's picture

3 Feb 2011 - 10:38 pm | निवेदिता-ताई

मस्तच ह

सखी's picture

3 Feb 2011 - 10:51 pm | सखी

स्वाती मस्त दिसतात शंकरपाळे. आधी गोडाने (केकने) मारले, आता तु आणि गणपा खा-या, तिखट पदार्थाने मारणार असं दिसतय.

५० फक्त's picture

3 Feb 2011 - 11:11 pm | ५० फक्त

स्वाती ताई,

लई भारी, माझ्या ३४ दातांपॅकी एकच तिखटाचा आहे बाकी सगळे गोड्च, पण करुन बघेन आणि सांगेन.

माझी बायको तिखट मिठाच्या पु-या लई भारी बनवते, आता तिची परिक्षा झाली की सांगतो (विनंती करतो) तिला मग मी पण टाकतो फोटो.

हर्षद.

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Feb 2011 - 9:53 am | ब्रिटिश टिंग्या

स्वातीताई अन् गणपा यांचे आयडीज बॅन करावेत अशी विनंती मी येथे करीत आहे! :)

कवितानागेश's picture

4 Feb 2011 - 2:12 pm | कवितानागेश

चांगले तळले जाण्यासाठी या प्रकारच्या पोळ्या किती जाड ठेवाव्यात?
थालिपीठाएवढ्या की भाकरीएवढ्या ?
तसे मिलीमीटर मध्ये सांगितले तरी चालेल! ;)
हा छान आहे पदार्थ, एकदम सोप्पा.

स्वाती दिनेश's picture

5 Feb 2011 - 12:18 pm | स्वाती दिनेश

रेवती,प्राजु.. कधी येताय आल्प्स फिरायला?
कच्ची कैरी, कसूरी मेथी चालेल की, मग बेसल लिव्ह्ज नको घालू..
लीमाउजेट, आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाड पोळी लाटायची.
हर्षद, पुर्‍यांची वाट बघते.
सर्व खवय्यांनो, धन्यवाद.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

5 Feb 2011 - 12:33 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त मस्त मस्त !

आवड्या एकदम.

ज्योति प्रकाश's picture

6 Feb 2011 - 12:18 am | ज्योति प्रकाश

आ हा हा! पाहुनी डोळे धन्य जाहले.आता उद्या करावेच लागणार. असो आपल्या शेजारी येऊन राहण्यासाठी आमचा पण
नम्बर लावा म्हणजे झालं.

डावखुरा's picture

6 Feb 2011 - 12:38 am | डावखुरा

फोटो लय म्हंजे लईच भारी...
माझी आईपण मस्त करते...(पुड लावुन)
बर्याच दिवसापासुन खाल्ले नहीत बरे झाले आठवण करुन दिलीत
धन्यु...