गाभा:
आत्ताच एका मित्राने सांगितले की माझे लेख चोरले गेलेत.
http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:335404
ही लिंक पण दिली. या पल्लवी शेलार कोण बाई आहेत ते मला माहीत नाही.
इथे जाऊन बघितले तर माझ्या दोन बालकथा माझ्या परवानगीशिवाय स्वतःच्या नावावर टाकल्या आहेत. ब्लॉगवर कॉपीराईट्स चे चिन्ह असतानाही !
मित्र सांगत होता या साईटवरचे जवळजवळ सगळे लेखन चोरलेले आहे !
कोणती कारवाई करावी ? कशी ?
कृपया आपणही आपले लेख इथे आहेत का ते बघावे.
प्रतिक्रिया
2 Feb 2011 - 4:33 pm | गणपा
जलावर चोरांची संख्या कमी नाही. कोण कुठवर लक्ष ठेवणार? पन जेव्हा जेव्हा अस आढळुन येईल तेव्हा त्या विरुद्ध आवाज उठावायलाच हवा.
मितान तै ताबडतोब मराठी अड्डा च्या व्यवस्थापकाशी संपर्क साध आणि तिथे तक्रार नोंदव..
कॉपीराईट बद्दलही बोल.
2 Feb 2011 - 8:24 pm | स्वानन्द
याशिवाय, मिसळ्पाव वर हे प्रसिद्ध झाले असल्याने, मिसळपाव व्यवस्थापनातर्फे या चोरीविरूद्ध काही करता येइल का?
आत्ताच मिपा चे धोरण पाहत होतो. पण त्यात लेखन हक्कासंदर्भात काही धोरण दिसले नाही :(
2 Feb 2011 - 11:49 pm | वाहीदा
मिसळपाव हे लेख सर्वात आधी प्रकाशित झाल्याने मिसळपाव व्यवस्थापनाने यात लक्ष घालावे
हि विनंती
3 Feb 2011 - 2:15 am | प्रियाली
मिसळपावने त्यांच्याकडे प्रकाशित झालेल्या लेखांकडेच पहावे. इतरत्र त्या लेखांचे काय होते हे तपासू नये. मिसळपाववर प्रकाशित होणारे लेख लेखक स्वतःच स्वतःच्या ब्लॉगवर आणि इतर संकेतस्थळांवर प्रसिद्ध करत असतात. मिसळपावने त्यावर कधी आक्षेप घेतल्याचे आढळत नाही. मिसळपाववर प्रसिद्ध होणारे लेखन चोरून किंवा ढापून टाकलेले नाही हे पाहण्यास मात्र मिसळपाव व्यवस्थापन बांधील आहे आणि त्यावर ते अॅक्शन घेत असतातच. इथे होणारा प्रकार थोडा वेगळा आणि आक्षेपार्ह असला तरी तो मिसळपावच्या आवाक्यात होत नाही त्यामुळे मिसळपाव व्यवस्थापनाचा त्याच्याशी काही एक संबंध नाही असे वाटते.
3 Feb 2011 - 7:19 am | स्वानन्द
परिस्थिती काय आहे हे तर स्पष्टच आहे. पण तसे धोरणात्मक बदल करता येतील का, यावर तर नक्कीच फेरविचार करता येऊ शकतो.
2 Feb 2011 - 4:44 pm | यशोधरा
एकतर तिथे प्रथम आयडी घेऊन प्रतिक्रिया नोंदव की हे माझे लिखाण असून त्यांनी चोरले आहे. तुझ्या लिखाणाचे दुवे दे. तारखांमधल्या फरकावरुन कळेलच कोणाचे आहे ते. दुसरे म्हणजे, त्या साईटच्या अॅडमिनना लिही आणि चोरलेले लिखाण उडवायची विनंती कर वा तुझ्या नावाने करायला सांग. तुझ्या मित्रमैत्रिणींना तिथे आयडी घेऊन ह्या चोरीबद्दल निषेध नोंदवायला सांग.
2 Feb 2011 - 4:58 pm | नंदन
वरील सूचनांशी सहमत आहे. पाठपुरावा केल्यास निदान जनाची लाज बाळगून तरी काही लोक उचललेली पोस्ट्स काढून टाकतात किंवा योग्य तो श्रेयनिर्देश करतात, असा अनुभव आहे. अर्थात, सगळेच असं करत नाहीत. एक उपाय म्हणून अलीकडेच 'कांचन कराई' ह्या ब्लॉगरने केलेला पाठपुरावा इथे वाचता येईल.
2 Feb 2011 - 5:09 pm | मेघवेडा
सहमत आहे. आपण पाठपुरावा न केल्यास हे चालतच राहील, या चोर्या होतच राहणार. याला अंत नाही. मानवी स्वभावधर्म आहे तो. आज तुझं लेखन चोरलंय उद्या कुणा दुसर्याचं चोरलं जाईल. सॅम्पल स्पेस इव्हेंटच्या तुलनेत खूप मोठा असल्यानं जनरली कुणाच्या लक्षात येण्याची प्रोबॅबिलिटी कमीच असते! पण आता तुला कळलंय तेव्हा यशो नि नंदन म्हणतात तसं, तू पाठपुरावा करच.
2 Feb 2011 - 5:19 pm | बिपिन कार्यकर्ते
+३
2 Feb 2011 - 5:55 pm | परिकथेतील राजकुमार
धन्यवाद रे नंदन. कांचनतैंच्या ब्लॉगचीच लिंक द्यायला आलो होतो :)
2 Feb 2011 - 10:56 pm | संदीप चित्रे
कांचनने केलेल्या डिटेक्टिव कामगिरीची माहिती द्यायला आलो होतो :)
2 Feb 2011 - 10:45 pm | प्राजु
नंदनशी सहमत आहे.
2 Feb 2011 - 5:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
फक्त इतकेच करता येईल? चोरी सारख्या गुन्ह्या साठी फार कमी आहे.
त्या चोर बाई विरुध्द काहि कारवाई करता येणार नाही?
मितानताईंनी परिश्रम घेउन केलेले काम मातीत गेले का?
उद्या ही बाई त्या सगळ्या आठही गोष्टींचे पुस्तक छापेल स्वतःच्या नावाने.
नाही नाही अजून काहीतरी असायलाच पाहीजे. ईतके सोपे सोडायचे नाही त्या बाईला.
2 Feb 2011 - 5:07 pm | मालोजीराव
संदर्भ,सौजन्य,साभार हे तरी वापरायला पाहिजे होतं त्या बाईंनी !
2 Feb 2011 - 5:14 pm | मितान
मीमराठीचा अॅडमिन असणार्या राजे यांनी त्या साईटच्या अॅडमिनचा मेल आयडी दिला. त्या आयडीवर मी तक्रारीचा मेल केला आहे. पण राजेच्या म्हणण्यानुसार त्यानेच हे लेख टाकलेत !
मेलच्या उत्तराची वाट बघते.
2 Feb 2011 - 5:15 pm | यशोधरा
त्या साईटचे अॅडमिन कोण आहे तुला कळालय का? नाव जाहीर करुन टाक मग. चोरांची नावे तरी कळूदेत.
2 Feb 2011 - 5:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे.
जाहिर चोरी करणार्यांच्या नावाने जाहिर ओरड झालेली उत्तम.
2 Feb 2011 - 5:40 pm | चिगो
चोरांच्या नावाने बोंबा झाल्याच पाहीजेत.. तुमच्या लेखणावर स्वतःची शेकतांना लाज वाटायला पाहीजे लोकांना..
2 Feb 2011 - 5:42 pm | असुर
+१
त्यांना चोरी करताना लाज वाटत नसेल तर आपणास त्यांची नावे जाहीर करताना संकोच का वाटावा? किंबहुना त्यांना लाज नाहीच असे गृहीत धरुन नावे जाहीर करावीत.
--असुर
2 Feb 2011 - 5:45 pm | मेघवेडा
होऊन जाऊ दे शिमगा!
2 Feb 2011 - 5:48 pm | इन्द्र्राज पवार
मितान....तिथे मेल केला आहेस हे ठीक झाले. त्यांचे उत्तर येईल अशी अपेक्षा आहे....कारण तिथल्या अॅडमिन वा संपादक मंडळ सदस्यांनाही त्या "पल्लवी शेलार' यानी टाकलेले लेख हे त्यांचे स्वतःचे नाहीत हे तुझ्या मेल मजकुरातून कळेलच. तसे समजले तर खुद्द ते मंडळच त्या आयडीविरूध्द प्रशासकीय कारवाई करेल असे मला वाटते.
तोपर्यंत वेट अॅण्ड सी....अशीच भूमिका राहू दे.
इन्द्रा
2 Feb 2011 - 5:54 pm | मिलिंद
हा डोमेन (http://www.marathiadda.com) लहु गावडे याच्या नावावर रजिस्टर्ड दिसतोय हु इज लुकअप वरुन त्यावर lahu48@gmail.com असा विरोप पत्ता दिसत आहे.
2 Feb 2011 - 6:08 pm | मितान
मी त्याच मेल आयडीवर मेल केला होता. उत्तर नाही. पण आत्ता बघितले तर माझ्या दोन्ही कथा तिथुन उडविलेल्या दिसत आहेत. चेक करणार का अजुन कोणीतरी ?
खजिना
हत्ती आणि मासोळी
या दोन कथा होत्या.
2 Feb 2011 - 6:14 pm | ५० फक्त
+१ मिलिंद, मी पण हेच शोधत होतो आणि हेच सापडले मला सुद्धा.मी प्रयत्न करतो आहे मराठी अड्डा ला जॉईन करण्याचा पाहुया काय होतंय ते.
मितान, आम्ही आमच्या परीने जे शक्य असेल ते करु. वर सुचविल्याप्रमाणे कांचन कराईंना काँटॅक्ट करता आला तर पहा, हे त्यांचे गुगल प्रोफाईल - http://www.google.com/profiles/mogaraafulalaa - सध्या त्या पण अशाच एका चोराला शोधत आहेत. तसेच ही त्यांच्या व्टिटरची लिंक - http://twitter.com/mogaraafulalaa.
तसेच, तु जे काही प्रयत्न करशील ते इथे पण अपडेट करीत रहा.
हर्षद.
2 Feb 2011 - 6:18 pm | टारझन
णेकी कर .. दरिया मे डाल ...
मला माझे लेख चोरीलाअ गेल्याचा आनंद होतो. आपले साहित्य चोरीला जाते म्हणजे नक्कीच त्याची काही तरी लायकी आहे. तेंव्हा मी त्या चोराचे धन्यवाद मानतो. आहो खरे दु:ख त्यांना व्हायला पाहिजे ज्यांचं लिहीलेलं पब्लिक वाचतंच नाही :) ओळखीचे म्हणुन तेवढ्यापुरत्या (न वाचता मिळालेला) चान चान प्रतिक्रीया :)
बाकी लेख चोरीला गेल्याबद्दल अभिनंदन माया.
पु.चो.शु.
2 Feb 2011 - 6:31 pm | नरेशकुमार
मी तर म्हनतो, घ्या, माझे लेख जितके चोरता येइल तितके करा, करा copy paste वाट्टेल तिथे.
पन माझे लेख कोनीच चोरत नाही यार, काय करु, की माझे लेख सुद्धा चोरीस जातील ?
खुप परेशान झालोय.......
दरियागंज मे रेहेके नेकी करनेवाला..
2 Feb 2011 - 7:06 pm | मुलूखावेगळी
मी केला प्रयास पन त्या लेखांवर कोनितरी पहारा देते(ओळखा कोन?)
तवा चोरी जायचा प्रश्नच नाही
निश्चिन्त ह्रावा.
2 Feb 2011 - 7:49 pm | नरेशकुमार
बराबरे, माझ्या लेखांवर मी एक ट्रॅकर लावलाय.
जो कोनी माझे लेख कॉपी-पेस्ट करतो, लगेच तो ट्रॅकर लगेच मला त्याचा फोटो, घरचा/कामाचा पत्ता, त्याचे सगळ्या वॅब सायीट वरील आयडी/लेख, तो सकाळी/दुपारी काय काय जेवला, त्याने कोनते कपडे घातले आहेत, आनी सगळ्या बॅकेतील बॅलन्स, एमेल करतो.
2 Feb 2011 - 8:34 pm | मुलूखावेगळी
चोरावर मो(अ)र आहात
तो चोर फाशी घेइल जर त्याने काही तुमचे चोरले तर
2 Feb 2011 - 8:34 pm | मुलूखावेगळी
चोरावर मो(अ)र आहात
तो चोर फाशी घेइल जर त्याने काही तुमचे चोरले तर
2 Feb 2011 - 7:07 pm | मनराव
कांचन काकू किंवा मितान चे लेख ढापणार्या व्यक्तिला न्हवे न्हवे चोरला कॉन्टॅक्ट कर......
2 Feb 2011 - 7:14 pm | प्रियाली
जालावरचे लेखन चोरीला जाणे हे काही नवे नाही. काही वर्षांपूर्वी ऑर्कुटवरील मराठी कम्युनिटीवर माझे लेख दिसले तेव्हा ते चोरीचे आहेत हे मी निदर्शनास आणले तेव्हा त्यांनी मला कळवले की लोक लेखनाचा आस्वाद घेतात. लेखक कोण आहे त्याच्याशी त्यांना काय काम? (बघा म्हणजे चोर तो चोर वर शिरजोर) तेव्हा मी कळवले की 'असे असेल तर मीच माझे सर्व लेख इथे चिकटवते म्हणजे इतरांना चोरून चिकटवयाचे कष्ट नकोत.'
दुसर्यांदा अशीच एक गोष्ट एका ब्लॉगवर चिकटवलेली दिसली. तेथे लोकांनी कमेंटमध्ये ती माझी गोष्ट असल्याचे कळवले होते तेव्हा ब्लॉगधारकाने चक्क 'मी माझी म्हणून लावलेली नाहीच, इमेलमधून फिरत आलेली कथा असे टाकले आहे.' असे स्पष्टीकरण दिले.
तुमच्या नजरेस आले आहे तर आवाज उठवा. बाकी हा प्रकार नवा नाही आणि फारसा मनावर घेण्याजोगाही नाही. आज एकाने चोरले उद्या दुसरा चोरेल.
2 Feb 2011 - 10:58 pm | टारझन
अजुन एक सुचना. लेखन चोरीलाच जाऊ नसेल असं वाटत असेल तर एकदम बोर, पकाऊ आणि फडतुस क्वालिटीचं लिहायचं .. गेला बाजार कोणत्याश्या इंग्लिश लेखकाचं भाषांतर पण चालेल .. एकदम सडेल लेख लिहावेत .. म्हणजे कोणाची चोरायचि हिम्मत होणार नहि आणि आपल त्रास वाचेल .. ;)
3 Feb 2011 - 5:03 am | Pain
हाहाहा
रतीब घालणार्यांना पाठीशी घालतोस काय रे ;)
1 Apr 2011 - 1:13 pm | नरेशकुमार
असं घालुण पाडुण का बोल्तोयेस, व्हय रे ?
2 Feb 2011 - 7:39 pm | jaydip.kulkarni
विचार सुचत नसतील वाचावेत , चोरी करून स्वतःच्या नावावर खपवणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच म्हणायची
2 Feb 2011 - 7:56 pm | गणेशा
मितान ..
जालावर लिहिलेले लेखन इतर ठिकाणी दूसरी कडे चोरीला गेले की त्या मुळे लेखकाला कवीला काय वाटते हे जाणतो.
परंतु कीतीही साईट जाईन केल्या अआणि तक्रारी केल्या तर काहीच फायदा नसतो ... आणि कीती साईट किती लोकांना वॉर्णिंग देणार आपण
एकच उपाय आहे.. आपले लेखन कॉपीराईट करायचे (येथे साहित्य परिषद, पुणे येथे करतात वाटते) .
आणि कोणी चोरले तर त्यावरती आपल्याकडे पुरावा असतो .
आपण स्वतः कॉपीराईट न करता कोअॅणे दुसर्याने जावुन ते केले तर ते लिखान त्याचेच असते व तोच आपल्या विरुद्ध तक्रार करु शकतो .
--
माझ्या अनेक कविता चोरुन त्यांच्या नावाने ब्लॉग वर टाकल्यावर मी पण भांदलो होतो .. नाव ही माहित आहे त्या व्यक्तीचे आणि सर्व भेटलो पण ... पण अश्या लोकांअना त्याचे काही नसते. मुळ लेखकाच्या मनाची त्यांना व्यथा कळत नाही ..
---
अवांतर : मिपावरच पहिल्या १-२ कवितांना/वाक्यांना आलेले रिप्लाय असे वाटत होते की मीच हे सर्व कॉपी पेस्ट करत आहे , कारण त्यांनी हे आधीच वाचले होते मेल मध्ये .. असे बर्याच ठिकाणी झाले आहे.
असो ..
सद्या मी तरी या पलिकडे गेलो आहे.. लिहित राहयचे .. चोरायचे तर खुशाल चोरा .. माझ्या लिखानातील आनंद मात्र तुम्हाला कधीच मिळणार नाही .. ..
2 Feb 2011 - 7:59 pm | शुचि
काही कवी स्वतःचे नाव गुंफतात कवितेते. ते छान.
2 Feb 2011 - 10:39 pm | गणेशा
गझलेमध्ये ते शक्य असते हो शुचि जी कवितेत नाही करता येत
नाहितर शृंगार कवितेत गणेशा नाव यायचे
आणि विरह कवितेत गणेशालाच विरह झाला असे वाटेल
2 Feb 2011 - 10:38 pm | माझीही शॅम्पेन
अहो मितान , तुम्ही इथे लिहिलेल्या कथा इतक्या सुंदर आहेत की अस काही होन यात काही नवल नाही , बाकी तुमचा फॉलो-अप चालू ठेवा.
पण ह्या निमित्ताने मिसळ-पाव कॉपी-राईट धोरण काय आहे ,कोणी प्रकाश टाकेल काय ?
अवांतर - हे नक्की कस कळल तुम्हाला. गुगल करून ?
2 Feb 2011 - 11:33 pm | अविनाशकुलकर्णी
शेवटी जावुन जावुन कोर्टात जावे लागेल..अगोदरच कोर्टात कोट्या वधि प्रकरणे प्रलंबित आहेत..
न्यायास विलंब लागेल...
चोरी करण्याचा मोह व्हावा इतके सुंदर लिहता या बद्दल तुमचे व गुण ग्राहक चोराचे अभिनंदन...
3 Feb 2011 - 12:27 am | रेवती
चोराला कश्याला उगीच दोष देतेस माया!;)
तू लिहितेसच इतकं छान्.......मग चोरायचा मोह झाला असेल.
माझं लिखाण चोरायची काय हिम्मत कोणाची.....;)
3 Feb 2011 - 2:11 am | धनंजय
तुमच्या कथा छान म्हणून कोणाला उचलाव्याशा वाटतात, ही प्रशंसा चांगलीच आहे. पण तरी वाईट वाटतेच.
(तसे माझे पाकीट छान आहे, म्हणूनच ते कोणाला घ्यावेसे वाटते - माझ्या फाटक्या चपला फारशा कधी आपणहोऊन चालत्या झालेल्या नाहीत.)
पण एक सांगावेसे वाटते. जालावर आहे, त्याबद्दल श्रेय देण्याची गरज नाही - घाई असली, तर श्रेय दिले नाही तर चालते, श्रेय देणे कटकटीचे आहे, असा विचार आपल्यात अजूनही आहे.
कालपरवाच मिसळपावावर पुढील वाक्ये वाचली :
अहो दिले आहे आहे श्रेय, तर "कटकट झाली" अशा प्रकारची ही टीप कशाकरिता?
हे वाचले आणि वर प्रियाली यांचा अनुभव तंतोतंत जुळवला :
हे एवढे लांबलचक "गूगल सर्च इमेज माध्यमातून उपलब्ध होतात", "ईमेलमधून उपलब्ध होतात" वगैरे विचार करायला आणि टंकायला वेळ मिळतो, तर "गोष्ट अमुक ठिकाणहून मिळाली" असे टंकायचे म्हणजे कुठला मोठा जुलूम वाटतो?
त्याच्या खाली उत्तम वागणुकीचे उदाहरण : श्री. धुमकेतू यांनी दिलेल्या प्रतिसादात चित्रे मिळालेल्या पानाचा दुवा नावासहित दिलेला आहे. सहजगत्या त्या पानावर जाता येईल, सुटसुटीत लिहिलेल्या नावाने पान ओळखता येईल, असा दुवा दिलेला आहे. त्यांनी नाव एचटीएमएल मध्ये दिसणार नाही असे लपवले नाही. हे इतके सोपे असताना वरील "खुलासे", कटकट होते म्हणून तक्रारी वगैरे केवळ वल्गना वाटतात.
किंवा वल्गना नसतील - श्रेय न देण्यात, किंवा "गूगल सर्च करून श्रेय शोधायची जबाबदारी वाचकाची" असे म्हणण्यात, किंवा "श्रेय देणे म्हणजे किती कटकट - ही घ्या श्रेय-नोंद" असे म्हणण्यात खरोखर काही नैतिक तत्त्व, जालीय स्वातंत्र्याचे तत्त्व वगैरे दडले आहे, असे लोकांना वाटत असावे.
हे असे कुठले तत्त्व जर खरेच सर्वमान्य होऊ लागेल, तर काय करावे? मितान, आपण आपली तत्त्वे बासनात गुंडाळून ठेवू. लोकांना चूक वाटत नाही, तर आपणच चूक समजून उगाच कशाला त्रागा करून घ्या.
(पण मिसळपाव संपादकमंडळ आपल्या श्रेय-नोंद-करा याच मताचे आहे. म्हणून अजून तत्त्वे बासनात गुंडाळण्याची गरज नाही.)
3 Feb 2011 - 2:53 am | Nile
काही नाही हो, चोर्या करुन पुन्हा वारंवार अश्या चोर्या करण्याला लोकांनी आक्षेप घेउ नये म्हणुन केलेला कांगावा आहे हा.
(अश्या वागणुकीला आमचे एक काका "ढुंगणावर फोकाने वळ उमटवले पाहिजेत यांच्या" असे म्हणायचे त्याची आठवण आली.)
3 Feb 2011 - 12:00 pm | आजानुकर्ण
धनंजय यांच्या मताशी आणि नाईल यांच्या प्रतिसादाशी सहमत
3 Feb 2011 - 3:59 am | रेवती
धनंजय, टाळ्या.
3 Feb 2011 - 8:37 am | अवलिया
माझ्या नावाचा उल्लेख करुन धनंजय यांनी हा प्रतिसाद दिला आहे आणि खरडीमधुन या प्रतिसादावर काही भाष्य असावे अशी विनंती केली आहे म्हणून हा प्रतिसाद.
सर्व प्रथम माझे वाक्य हे केवळ चित्रांसंबंधी होते आणि त्यामागे काही एक निश्चित भुमिका होती. सदर वाक्य ज्या परिस्थितीत आले त्या संबंधी पाहिले तर असे दिसते की त्यादिवशी विजुभाऊंनी काही धागा टाकला होता आणि त्या धाग्यात काही चित्रे टाकली होती ज्यांच्या मुळ स्थानाचा उल्लेख नव्हता. चित्रांचा उल्लेख असायला पाहिजे की नको हा भाग जरा बाजुला ठेवु. त्या धाग्यावरुन विजुभाऊंना नोटिस आली की जर चित्रांचे श्रेय नोंद केली नाहीत तर धागा अप्रकाशित करु. वा ! काय हा कार्यक्षमतेचा आवाका ! अरे श्रेय नोंद नसेल तर चित्रे उडवा ! पूर्ण धागा का अप्रकाशित? एखादा प्रतिसाद आवडला नाही तर तुम्ही त्यातला "मजकूर संपादित" करता ना? मग इथे का संपूर्ण धागाच अप्रकाशित करता? बर तेही एकवेळ मान्य केले असते जर हाच नियम सगळ्यांना लागू असता तर. अनेक जण चित्रे प्रतिसादात, लेखात देतात. व्हिडीओच्या लिंक देतात. त्याच्याखाली असतो का उल्लेख? बर ते सोडा. विजुभाउंना नोटीस दिल्यावर त्यांनी श्रेय नोंद केली पण त्यांनी त्याचबरोबर एक मोठा मुद्दा काढला होता. त्याचे काय? अहो ! खुद्द मिपा संकेतस्थळाच्या मुखपृष्टावर भीमसेन जोशींचे चित्र आहे. कुठे आहे ते चित्र कुठुन घेतले याचा उल्लेख. आणि नसेल तर का नाही? नियम हवे तर ते सगळ्यांनाच हवे नाही तर कुणालाच नको. केवळ काही जणांना विशिष्ट नियमांचे पालन करायला लावायचे आणि इतरांना रान मो़कळे सोडायचे हा आपपरभाव का? मला माहित आहे यांची उत्तरे मिळणार नाहीत आणि आतातर त्याची अपेक्षाही नाही. असो.
या सर्व पार्श्वभुमीवर वरचे वाक्य वाचावे. सूज्ञांना समजेल नक्की काय ते. बाकीच्यांना नाही समजले तरी फरक पडत नाही.
अवांतर - नेट करोडो लोकं वापरतात. दोनपाचशे नियमित सदस्य असलेल्या संकेतस्थळांच्या नियमनाने परिस्थिती सुधारणार नाही हे जरी नक्की असले तरी जर संकेतस्थळावर नियम असलेच तर ते सर्वांना समान असावेत. धन्यवाद.
3 Feb 2011 - 10:17 pm | धनंजय
याबाबत नीलकांतशी संबंध साधला आहे काय? तुमची निषेधाची तर्हा पटली नाही.
सर्वांना एकच कायदा नसतो, कारण संकेतस्थळाच्या मालकीहक्कांची एक उतरंड असते. मुखपृष्ठाचे संपादन करण्याची जबाबदारी संपादनमंडळाकडे आहे काय? बहुधा नसावी. काही विवक्षित पाने बनवण्याची जबाबदारी एका मोजक्या तंत्रकुशल मंडळाकडे असावी. "लोकविकास" संस्थेतील हे तंत्रकुशल लोक कुठले याबद्दल मिसळपावावर उल्लेख मागे कुठेतरी आलेला आहे.
मिसळपाव व्यवस्थापन खुद्द जर कायदा भंग करत असेल, तर त्यासाठी दंड देणारे भारत (किंवा महाराष्ट्र) शासन आहे. जर मिसळपाव मुखपृष्ठावरील प्रकाशचित्राची श्रेय-नोंद देण्याची कमतरता अनवधानाने झालेली असेल, तर त्यासाठी दंडही तितकाच सौम्य व्हावा.
आणि तुमचा "सर्वांना शिक्षा नाहीतर कोणालाच शिक्षा नाही" हा मुद्दा अव्यवहार्य वाटतो.
"अमुकतमुक विवक्षित व्यक्तीने केलेल्या बलात्कार/चोरी/दरोड्याला अजून दंड झालेला नाही. म्हणून आज चालू असलेले अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे सर्व तपास बंद पाडावेत, आणि हे गुन्हे नाहीत असे घोषित करावे!" हे ठीक नाही.
आणि त्याबद्दल तक्रार करायची ही विवक्षित पद्धत तर त्याहून विचित्र वाटते.
"अमुकतमुक विवक्षित व्यक्तीने केलेल्या चोरीला अजून दंड झालेला नाही. त्याचा निषेध म्हणून मी तिसर्याच कुठल्या व्यक्तीकडून चोरी करणार, आणि चोरलेला माल मिरवणार!" हे ठीक नाही. मिसळपाव व्यवस्थापनाकडून सापत्नभावाबद्दल तक्रार आहे, आणि तिसर्याच कुठल्या संकेतस्थळातील मजकूर-चित्रे उचलायची? "कायदेभंग" निषेधात सुद्धा काहीतरी न्याय हवा. (उदाहरणार्थ पूर्वीच्या काळी सरकारविरुद्ध कायदेभंग करणारे क्रांतिकारक/समाजसुधारक होते, त्यांनी तिसर्याच कुठल्या देशाचे नुकसान केले का? आपली तक्रार नसलेल्या बिगरसरकारी लोकांचे/संस्थांचे नुकसान केले का?)
आणि बघा - जर मिसळपाव संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील चित्र अनवधानाने - चुकून - तसे असेल, आणि व्यवस्थापनाच्या व्यग्रतेमुळे किंवा आळसामुळे तसे राहिले, म्हणून काय आपण सदस्यांनी मुद्दामून, वेळ आणि अवधान असून त्या चुका करायच्या?
"बाबांच्या हातून चुकून-निसटून शेजार्यांचा ग्लास पडला-फुटला. त्यांनी अजून नवीन ग्लास विकत आणून भरपाई केलेली नाही. म्हणून मी शेजार्यांच्या घरून एक-एक ग्लास आणून आपल्या घरात फोडणार आहे." अशा प्रकारचे धोरण कुटुंबात चालते का? नाही. गल्लीत चालते का? गावात-राज्यात-देशात चालावे का? मग हा विचित्र न्याय मिसळपावाच्या मुखपृष्ठावरील चित्राच्या संबंधात काय म्हणून सुचतो?
3 Feb 2011 - 10:39 pm | अवलिया
सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की सदर धागा हा मितान यांचे लेख मिपावरुन चोरीला गेले यासंबंधी होता. चर्चा इथुन चोरी होते त्याबाबत काय करायला हवे याबाबत असायला हवी होती. त्यात आंतरजालावर असे काहीही निर्बंध घालु शकत नाही, असे माझे मत असल्याने मी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता.
आपण प्रतिसादात माझे नाव गोवले आणि खरडीतुन लिंक दिली म्हणुन माझा प्रतिसाद जो त्या वाक्यापुरताच होता तो दिला. यासंबंधी माझे कोणाशी काय आणि कसे बोलणे झाले, त्यावर काय उत्तर आले हा इतिहासाचा भाग. जो इथे या धाग्यावर देण्यात मला स्वारस्य नाही कारण प्रतिसाद अवांतर होतो. असो.
बाकी चर्चेत भाग घेण्यास आणि आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास मी असमर्थ आहे असे सांगुन आपली रजा घेतो. हा माझा ह्या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद.
धन्यवाद.
3 Feb 2011 - 4:35 am | निनाद
कोणतेही विचार लेखन स्वरूपात आले की प्रताधिकार लागू होतोच.
त्यामुळे त्यासाठी वेगळी नोंदणी वगैरे करावी लागत नाही.
जाल लेखनाचा फायदा असा की त्यावर काळ-वेळाची मोहोरही लागलेली असते.
चोराचे सर्व्हर्स अमेरिकेत, युरोप मध्ये किंवा आशियातील देशात असतील तर तो अधिक गाळात आहे. भारतात असतील तरीही तेच!
चोरीचा पाठपुरावा केलाच पाहिजे.
त्यावर चोरानेच मुजोरी केली तर कायद्याची मदतही घ्यायला हरकत नाही.
भारतीय, अमेरिकन, युरोपीय व इतरत्रही प्रताधिकार कायदा सर्व प्रकारच्या बेकायदेशीर वापराला मनाई करतो.
भारतीय कायद्याची अधिक माहिती येथे मिळावी -
दुवा : http://copyright.gov.in/frmFAQ.aspx
भारतीय प्रताधिकार कार्यालय
4th Floor, Jeevan Deep Building, Parliament Street, New Delhi - 110001.
Telephone No. : +91-11-23382436, (23382549, 23382458 Extn.: 31 & 45)
3 Feb 2011 - 7:25 am | स्वानन्द
>>जाल लेखनाचा फायदा असा की त्यावर काळ-वेळाची मोहोरही लागलेली असते.
ब्लॉगर वर तर जुन्या तारखेने पण पोस्ट टाकता येते!
3 Feb 2011 - 8:10 am | विंजिनेर
१. तुमच्याकडे हाताशी वेळ असलातर कांचन सराईने केले तसे ट्रॅक करता येईल. ट्रॅक केल्यानंतर पोलीसांत तक्रार नोंदवायची असेल तर अर्थात भारतात असणे जरूरीचे आहे. तक्रारीचे निष्पन्न लगेच झाले नाहीतरी अशा अनेक तक्रारी यायला लागल्या नंतर कदाचित पोलीस यंत्रणा सक्रिय होईल, कारवाई होईल इ. इ.
२. एव्हढं करून सुद्धा पुन्हा लेखन चोरी होणारच नाही ह्याची खात्री नाहीच.
३. पण महत्वाचे म्हणजे जर चोराच्या नावाने येनकेन उपायेण शिमगा झाला तर बाकीचे चोर चोरी करण्याधी कदाचित विचार करतील :)
3 Feb 2011 - 8:46 am | सहज
अशी ढापुगिरी दिसुन येते.
ढापलेले. कॉम, साहीत्यचोरी.कॉम अश्या संकेतस्थळाची मराठी आंतरजालात गरज आहे. नीलकांत, राजे बघा मनावर घ्या. जर मिसळपावला ह्या संबधात काही करावेसे वाटत असेल तर एक वेगळा विभाग सुरु करता येइल. अर्थात एक प्रयोग म्हणुन. करावे असा आग्रह नाही.
त्याच बरोबर आपण चकटफू पण इतरांची प्रताधिकार असलेली डाउनलोड केलेली पुस्तके, कथाकथन, गाणी, सिनेमे, सॉफ्टवेयर्स इ इ आठवली तर उत्तम. अर्थात एक प्रयोग म्हणून प्रत्येकाने वाईट वाटून घेतले पाहीजेच असे नाही.
जर आपल्या साहीत्याविषयी आपण खरच जागरुक असु तर कायदेशीर कारवाई करणे, जालावर न छापणे, आधी पुस्तक प्रकाशन करणे इ मार्ग आहेतच.
सध्या तरी असे धागे काढणे, त्याकरता एक वेगळा विभाग असणे, खरे तर संकेतस्थळ असणे व तिथे असे चौर्यकाम करणारे ब्लॉग, संकेतस्थळ व चोरांची माहीतीसूची असणे त्या मानाने सोपा मार्ग वाटतो.
3 Feb 2011 - 9:07 am | विंजिनेर
सहजरावः मी फार पुर्वी असाच एक चोरी बद्दल धागा काढला होता. तेव्हाचे मिपाकरांचे विचार वाचून निश्चितच मनोरंजन होईल.तेव्हानंतर परिस्थिती फार बदलली असेल असे वाटत नाही. असो.
3 Feb 2011 - 1:32 pm | विलासराव
मला तर वाटते की या संपूर्ण प्रकाराकडे तुम्ही दुर्लक्ष करावे. आनी तुमच्या कवीता/कथा लिहिण्यावर पुर्ण लक्ष केंद्रीत करावे. अशा एकापेक्षा एक सरस साहीत्याची निर्मीती करण्यावर लक्ष केंद्रीत करा.
बाकी चोरीकडे ढुंकुनही पाहु नका. तुम्ही लिहित रहा , लिहिण्यातला आनंद मिळवत रहा. चोराला कधीही सॄजनातला आनंद मिळु शकत नाही. राहिला श्रेयाचा प्रश्न? तुम्ही स्वतःचे आत्मनिरीक्षण करा. तुम्हाला सृजनात जास्त आनंद मिळतो की त्याचे श्रेय तुम्हाला मिळाले याचा आनंद जास्त होतो. मला वाटते तुम्हाला जे या प्रश्नाचे उत्तर मिळेल त्यानंतर हा प्रश्न निकाली निघावा.
यातील माझा एखादा विचार तुम्हाला पटला नाही तर त्याबद्द्ल अगोदरच दिलगीरी व्यक्त करतो.
4 Feb 2011 - 1:08 am | दिपाली पाटिल
अगं मितान, म्हणतातच ना... नथिंग इज सेफ ऑन द नेट...मागे एकदा एक मिपाकर क्लिंटन यांचा लेख तर सकाळने छापला होता, बहुतेक त्यांच्या परवानगीशिवायच... आपण इकडे कितीही कॉपीराइट्स टाकले तरीही काही गॅरंटी नसते की ते लेख कोण कसे आणि कुठे छापेल. पण तू कांचन कराई यांचा लेख वाचून बघ काय करता येइल ते... फारच माहीतीपूर्ण लेख आहे.
4 Feb 2011 - 5:11 am | अलख निरंजन
तुम्ही सरळ पोलिसात तक्रार का देत नाही? इथे चर्चा करुन काय होणार आहे?
4 Feb 2011 - 6:43 am | मराठे
पोलिसांत तक्रार करायची असेल तर ते लेखन खरोखरच आपण केले आहे याचा पुरावा द्यावा लागेल का? (माझ्या मते द्यावा लागेल) आणि जर असे असेल तर पुरावा म्हणून काय सादर करता येईल ?
एखादा लेख प्रकाशित झाल्यानंतर त्याची प्रकाशन तारिख बदलून जूनी तारिख टाकणे एखाद्या सामान्य हॅकरला अवघड नाही.
त्यामुळे फक्त तारिख हाच एक निकष होउ शकत नाही. म्हणजे थोडक्यात आपलं लेखन कुठेतरी रजिस्टर करणं आवश्यक आहे. शिवाय ही रजिस्ट्री सरकार-मान्य (किंवा पूर्ण आंतरजालावर मान्य) असली पाहिजे. ह्याबाबतीत कोणी मार्गदर्शन करेल का?
4 Feb 2011 - 6:50 am | मराठे
सहज बघितलं तर 'झेंडा मराठीचा' ही कविता त्याच्या खालच्या कॉमेंट सकट (गणपांचा उल्लेख सुद्धा) जशीच्या तशी छापली आहे.
http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:338494
4 Feb 2011 - 1:32 pm | प्रसन्न केसकर
महत्वपुर्ण आणि गंभीर विषय चर्चेला आणला आहे धागाकर्तीने.
कॉपीराईट इ. बाबत काही प्रतिसाद खरेच रंजक आणि हमरातुमरी असल्याने रोचक वाटले.
त्यामुळे प्रतिसाद वाचुन मस्त मनोरंजन झाले.
@ मितानः
इथे धाग्यावर येणार्या प्रतिसादातुन ज्ञान-मार्गदर्शन वगैरे मिळेल अशी अपेक्षा ठेवु नकोस. त्यापेक्षा सरळ नीलकांतला खरड किंवा व्यनि कर. या आणि अश्या विषयांवर खरी मदत मिळु शकेल असा इथे तोच एकटा आहे. तो बराच व्यग्र असल्यानं बर्याचदा ऑनलाईन नसतो. पण आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवावरुन तुझ्या खरड किंवा व्यनिला नक्कीच उत्तर मिळेल तो ऑनलाईन आल्यावर. बाकी इथे दस्तुरखुद्द नीलकांत असल्याने मी मुळ चर्चाविषयावर काही लिहित नाही.
@ नीलकांतः
दादा इथे लोक जे तारे तोडताहेत ते पाहिल्यावर एकदा तुच या विषयावर सविस्तर लिहावेस आणि अश्या घटना, त्याबाबतचे कायदे इ. बाबत उहापोह करावास अशी विनंती तुला करण्याचा मोह आवरत नाही.
1 Apr 2011 - 7:01 am | रेवती
आत्ताच सखीनं कळवल्यामुळे मला समजले कि माझी पाकृ आणि फोटू चोरून ग्लोबल मराठी या स्थळावर कोणीतरी चढवलेत. काय चावट लोक असतात मेले!:(
http://globalmarathi.com/PakkalaDetails.aspx?BlogId=5589666467846864843&...
आता फोटूंवर जलचिन्ह करायलाच हवे. तिथे "या चोरीचा निषेध" अशी प्रतिक्रिया दिली आहे. बघुया काय करतात.
1 Apr 2011 - 4:31 pm | गणपा
तुझ्या या लिंक मुळे माझ्या ही काही पाककृती ढापल्या गेल्याच आढळुन आल आहे.
मी रीतसर मेल धाडला आहे कायदेशीर कारवाई केली जाईल म्हणुन.
प्रभ्याचं थालीपिठ ही आढळुन आलं तिथे.
1 Apr 2011 - 10:49 am | वेताळ
तुम्ही अजुन नव्या नव्या पाकृ शोधा व आम्हासाठी इथे मिपावर टाका. चोर ते चोरच...