पुन्हा बालविवाह?

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
1 Feb 2011 - 6:29 pm
गाभा: 

नुकतीच ही बातमी वाचली

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7403585.cms

काही दिवसांपूर्वी एका समाजातील मान्यवर मनुष्याशी चर्चा झाली. हल्लीच्या नववी दहावीत असलेल्या पोरापोरींच्या वागण्यामुळे त्यांची लग्न परत पाच आठ वर्षाचे असतांना लावावी का असा तो समाज विचार करत आहे. त्यासमाजाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर असलेला पगडा फार आहे.

मिपाकरांना काय वाटते?

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

1 Feb 2011 - 7:05 pm | सुहास..

काही दिवसांपूर्वी एका समाजातील मान्यवर मनुष्याशी चर्चा झाली. हल्लीच्या नववी दहावीत असलेल्या पोरापोरींच्या वागण्यामुळे त्यांची लग्न परत पाच आठ वर्षाचे असतांना लावावी का असा तो समाज विचार करत आहे. >>>>

कुठला समाज ? इथे सांगण्यासारखा नसेल तर व्यनी कर !!
!!
मिपाकरांना काय वाटते? >>

मला एका वर्षापुर्वी अश्याच स्वरुपाचा प्रश्न पडला होता की वयात यायचे वय कमी असावे का ?
कारण तुला सांगतो. मी दररोज रात्री जाताना रेडियोवर ' नॉटी नाईट्स' नावाच शो एकत असे. लोकांचे काही नॉटी सिक्रेट्स आणि काही सल्ले आणि काही जुनी गाणी , अश्या स्वरुपाचा कार्यक्रम , त्या कार्यक्रमात फोन आला. आर जे च नाव आठवत नाहीये , झोया असाव बहुतेक !!

" हाय झोया, मैं १५ इयर्स की हुं और मेरा बॉयफ्रेंड १६ का है , हमारा 'झिगी-विगी' हो गया है , और हम लिव्ह-इन करना चाहते है !! "

झोया ने काय केले ते सांगत नाही, पण मला खरच प्रश्न पडला की वयात यायचे वय कमी असावे का ? नाहीतरी शाळेच्या बाहेर, शाळा सुटल्यावर एखाद तरी ' जोडप ' दिसतच की ?
वयात यायच सरकारी वय १८ आणि २१ आहे , ते शास्त्रीय दृष्ट्या ते बरोबर ही असेल . पण त्याला अपवाद नसु शकतात का ?

कवितानागेश's picture

1 Feb 2011 - 7:36 pm | कवितानागेश

आपण नक्की काय करायचे हे मला कळत नाहीये.
शाळेतली पोरे कुठे काय विचारतात कुणाला (=सरकारी वयात आलेल्याना)?

अविनाशकुलकर्णी's picture

2 Feb 2011 - 12:53 am | अविनाशकुलकर्णी

(नॉन-पेनेट्रेटिव सेक्स) वरुन ...पेनेट्रेटिव सेक्स लवकर वयात जातिल...

तरुण पिढि भाग्यवान आहे.

शिल्पा ब's picture

2 Feb 2011 - 1:07 am | शिल्पा ब

पण यातून कुमारी माता अन त्यानुषंगाने येणारे प्रश्न वाढतील त्याचं काय? भाग्य कसलं त्यात?

लग्न ही सेक्स साठी आवश्यक अट नसावी असे विचारवंत म्हणतात ना ! आणि तसेही कुटुंब व्यवस्था छळ या एकमेव पायावर उभी असल्याचे सुद्धा त्यांचे म्हणणे आहे. समाजाला प्रगतीशील बनवायचे तर हे करावेच लागेल असे ते म्हणतात ब्वा !

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Feb 2011 - 9:27 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. आर्षकाळातील आपल्या पूर्वजांचे राहणीमान सगळ्यात उच्चं होतं असं त्यांना वाटत असावं.
(आर्षकाळ वगैरेच्या अधिक माहीतीसाठी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचावा)

शिल्पा ब's picture

2 Feb 2011 - 10:29 am | शिल्पा ब

तो काळ पुन्हा आणावा म्हणता का?

लग्न ही सेक्स साठी आवश्यक अट नसावीच पण लहान वयात असे प्रकार न केलेले बरे...नविन जीवाचा विचार कोण करणार?

टारझन's picture

2 Feb 2011 - 11:04 am | टारझन

मी तर म्हणतो ए टु झेड पोरा-पोरींना "प्रजापिता ब्रम्हकुमारीचे ॐ शांती " ह्या इश्वरीय कम्युनिटी चे सदस्य बनवावे. म्हणजे सगळेच ब्रम्हकुमार आणि ब्रम्हकुमारी होतील. तिथे गेले की नॉनव्हेज सोडा , कांदा-लसुन पासुन पण मुक्ती घ्यायला लावतात. सगळेच भाई-जी आणि बहन-जी असतात. सगळ्या तामसी गुणांपासुन परावृत्त करुन एका मानसिक शांतीची अनुभुती होते असे समजले जाते.
सगळी मुलं-मुली एकदा ब्रम्हकुमार/कुमारी झाले की ... ना रहेगा बांस .. ना बजेगी बासुरी .. आणि ना रहेगा ताल ना बजेगा तबला.

- (ब्रम्हकुमार) टारझन भाई
तंबु २०१, जमुना चोटी,पाचवे शिखर , माउंट अबु , राजस्थान

नरेशकुमार's picture

2 Feb 2011 - 5:26 pm | नरेशकुमार

बादवे, कोन हे प्रजापिता ब्रह्मकुमार किंवा कुमारी.
पहिल्यांदाच नाव ऐकतोय ! काही डीटेल्स मिळतिल का ? वॅब सायीट, ब्लोग वगेरे
कायतरी जब्रा प्रकरन दिसतंय.

विनायक प्रभू's picture

2 Feb 2011 - 11:07 am | विनायक प्रभू

मुक्त वागणे आणि लग्नाचा काय संबध?
प्रिमरायटल एक्स्पोझर आधीही होते. आजही आहे. उद्याही राहील.
आधी नजरेआड. आता नजरे समोर.

लेख नीट वाचा गुर्जी. एकच एक "विषय" डोक्यात ठेवु नका.
धाग्याचा विषय वयाचा आहे... प्रिमरायटलचा नाही.

विनायक प्रभू's picture

2 Feb 2011 - 11:57 am | विनायक प्रभू

निट वाचुन प्रतिसाद दिलेला आहे.
नाउ हु इज बिइंग नाइव.?

अवलिया's picture

2 Feb 2011 - 11:58 am | अवलिया

मराठीत लिहा..

विनायक प्रभू's picture

2 Feb 2011 - 12:01 pm | विनायक प्रभू

लेखात वय आणि वागणे ह्याचा संबंध जोडला आहे का नाही.
आहे.
मुक्त वागण्याचे शेवटी फलीत काय होते हे तुम्हाला माहीत नाही का?

अवलिया's picture

2 Feb 2011 - 12:03 pm | अवलिया

लेखात वय आणि वागणे ह्याचा संबंध जोडला आहे का नाही.
आहे.

तुमच्या मूळच्या प्रतिसादात वयाबद्दल काही आहे का?
नाही.

>>>मुक्त वागण्याचे शेवटी फलीत काय होते हे तुम्हाला माहीत नाही का?

भुल गया रबड.. असं काहीसं काही ट्रकच्या मागे लिहिलेले असते ब्वा !

मुक्तसुनीत's picture

2 Feb 2011 - 11:29 am | मुक्तसुनीत

प्रभुमास्तर , तुम्ही हा धागा इथे संपवलाय ! ;-)
बाकी अजानुकर्ण म्हणतात तसे , चालू देत ! हा हा

मुलूखावेगळी's picture

2 Feb 2011 - 11:10 am | मुलूखावेगळी

"प्रजापिता ब्रम्हकुमारी" मधे पन १ दुनियावेगळा झोल आहे
माहित आहे का?
नसल्यास जाणकाराकडुन अधिक माहिती मिळ्वा

टारझन's picture

2 Feb 2011 - 11:19 am | टारझन

हम ना समझे थे बात इतनीसी,
ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की !!!!!!!!!!

ह्या ओळी मला "ब्रिटिश टिंग्या" वाटतात.

- (पत्थर से कठोर) अंजानचुर्ण
माझा प्रतिसाद तुम्हाला "ब्रिटिश टिंग्या" तर वाटत नाही ना ?

बाकी चालु द्या

कुंदन's picture

2 Feb 2011 - 11:35 am | कुंदन

एक घटना प्रत्यक्ष पाहिलेली आहे.
एकाने तिकडे जाउन तिकडची मुलगी पटवलेली.

अवलिया's picture

2 Feb 2011 - 12:47 pm | अवलिया

हा हा

अहो हल्ली काही विज्ञानप्रसारक मंडळं सुद्धा म्हणे विज्ञानाचा प्रसार कमी आणि विवाहमंडळाचे काम जास्त करत आहेत. खरे खोटे माहित नाही.

मुलूखावेगळी's picture

2 Feb 2011 - 11:40 am | मुलूखावेगळी

नाही अजुन वेगळा प्रकार आहे
ब्रम्हकुमार अनि कुमारी साठी जगावेगळा अजब गजब रुल आहे तो ;)

शिल्पा ब's picture

2 Feb 2011 - 11:45 am | शिल्पा ब

काय प्रकार आहे जरा सांगा बरं!!

मुलूखावेगळी's picture

2 Feb 2011 - 11:50 am | मुलूखावेगळी

हेच कि प्रजापिता ब्रम्हकुमार कुमारी हे १मेकान्शी लग्न करु शकत्त्तात
ते टेम्परवरी अपत्यप्राप्तीसाठी एकत्र येउ शकत्तात
पन एरवी त्यानी बहिन भाउ प्रमाने वर्तन करावे असा

शिल्पा ब's picture

2 Feb 2011 - 12:05 pm | शिल्पा ब

कल्ट आहे असं दिसतंय

हेच कि प्रजापिता ब्रम्हकुमार कुमारी हे १मेकान्शी लग्न करु शकत्त्तात

हे ब्रम्हज्ञान तुम्हाला कुठे प्राप्त झाले मुलुखावेगळ्या काकु ?
ब्रम्हकुमारीचा आश्रम आमच्या इथे जवळंच आहे. आणि बहुसंख्य ओमशांतीकर आम्च्या ओळखीचे आहेत. "पुर्ण ब्रम्हचर्याचा" पुरस्कार करणारा हा पंथ आपत्यप्राप्ती साठी टेंपररी एकत्र येतात हा अत्यंत चुकीचा आणि गैरसमज पसरवणारा गंभीर मुद्दा आहे. कृपया संदर्भ द्यावा. कुठुन माहिती मिळाली आपल्याला ही ? ऐकीव असेल तर ...

मुलूखावेगळी's picture

2 Feb 2011 - 12:17 pm | मुलूखावेगळी

हे ब्रम्हज्ञान तुम्हाला कुठे प्राप्त झाले मुलुखावेगळ्या काकु ?
कृपया संदर्भ द्यावा. कुठुन माहिती मिळाली आपल्याला ही ? ऐकीव असेल तर

ऐकीव आहे ते पन १ मारवाडी व्यक्ती कदुन कळलेले आहे
आनि त्या व्यक्तिला त्याच्न्या समाजब्द्दल खोटे सान्गुन काय मिलनारे?

लोकांना विनाकारण फेकायची सवय असते आणि असल्या गोष्टी तर जास्तंच .. तेंव्हा तुम्ही असल्या गोष्टींवर विषवास ठेवतात , अंमळ रोचक वाटले !
ही माहीती पुर्ण चुकीची आहे.

धन्यवाद.

मुलूखावेगळी's picture

2 Feb 2011 - 12:24 pm | मुलूखावेगळी

नाही
आता पुन्हा कन्फर्म केलेय
त्या २ना लग्न अलाउड तर नक्किच आहे
आनि तसे कपल आहे
फोन नं. देउ का आता तुला?

ब्रम्हकुमारीज मधे कोणत्याही गोष्टींची बंधने "लादत" नाहीत. हे अभिनव कपल एकटं असेल त्याचा अर्थ असा निघत नाही की ब्रम्हकुमारीज ची ती पॉलिसी आहे.

फोन नंबर कशाला ? :) अचरट ;)

मुलूखावेगळी's picture

2 Feb 2011 - 12:35 pm | मुलूखावेगळी

ब्रम्हकुमारीज मधे कोणत्याही गोष्टींची बंधने "लादत" नाहीत. हे अभिनव कपल एकटं असेल त्याचा अर्थ असा निघत नाही की ब्रम्हकुमारीज ची ती पॉलिसी आहे.

फोन नंबर कशाला ? Smile अचरट Wink

तेच तर म्ह्नतेय
बन्धन नाहीये
सूट आहे ही
आनि असे केल्याव्र त्या कपलला वाळीत टाकत नाहेत
नम्बर त्यान्चा बरे का माझा नव्हे

तुम्हाला समजवने व्यर्थ आहे. विषय संपवतो. तसे ही अवांतर खुप झाले आहे.

मुलूखावेगळी's picture

2 Feb 2011 - 12:41 pm | मुलूखावेगळी

तुम्हाला पन

वरील संवाद वाचून हहपुवा झाली, धन्यवाद! :-)

मनराव's picture

2 Feb 2011 - 12:08 pm | मनराव

नशीब इथे प्रजापिता ब्रह्मकुमार किंवा कुमारीचा कोणावर प्रभाव नहिये.....

स्वानन्द's picture

2 Feb 2011 - 12:53 pm | स्वानन्द

हो ना!

ॐ शान्टी :)

सहज's picture

2 Feb 2011 - 11:41 am | सहज

लहान वयात लग्न, अपुरे ज्ञान याने प्रश्न सुटणार की वाढणार? लवकर लग्न करा हा काही उपाय नाही. उलट लहान मुलींना घरातच बांधुन ठेवणे, छळणे, पर्यायाने स्त्रीयांवर बंधने आणणे वाढेल.

तर त्यापेक्षा लैंगिक शिक्षण व गर्भनिरोधक साधनांबद्दल चर्चा करा.

तंबाखू विरोधी प्रदर्शनात जसे दुष्परिणाम, उपाय दाखवले असतात. फुफ्फुस, मौखीक कर्करोगाचे भीषण छायाचित्रे असतात. तशी लैंगीक शिक्षणा, प्रदर्शना मार्फत वयात येणार्‍या मुला-मुलींना (पार घाबरवुन सोडणारी ) माहीती दिली तर आपसूक बहुसंख्य मुले-मुली काळजी घेतील.

बाकी चालू द्या.

गंभीर विषयावर चर्चा गंभीरपणेच चालावी अशी अपेक्षा.

तशी लैंगीक शिक्षणा, प्रदर्शना मार्फत वयात येणार्‍या मुला-मुलींना (पार घाबरवुन सोडणारी ) माहीती दिली तर आपसूक बहुसंख्य मुले-मुली काळजी घेतील.

अगदी .. दोन पावलं पुढे जाऊन मी तर म्हणेन .. माहिती देतांना मुला-मुलींच्या मनात ह्या विषयी घ्रुणा निर्माण करुन दिली पाहिजे. लहान वयात जर एखाद्या गोष्टीची धास्ती बसली तर ती आजन्म रहाण्याचे चान्सेस आहेत. ह्यामुळे ब्रम्हचर्याचे प्रमाण वाढेल आणि भारताच्या लोकसंख्येला आळा देखील बसेल.

आणि याचा उल्टा इफ्फेक्ट झाला तर.....??

विनायक प्रभू's picture

2 Feb 2011 - 12:55 pm | विनायक प्रभू

उलटा इफेक्ट म्हणजे काय?

म्हनजे महिती देताना घ्रुणे आइवजी जस्तच आकर्षण निर्माण झाल तर.....;)

वपाडाव's picture

2 Feb 2011 - 4:00 pm | वपाडाव

मनराव, आपल्याशी एकदम सहमत मी तर...
याच गोष्टीचे चान्सिस जास्त वाटतात मला तर
आणी त्यात दृक-श्राव्य माध्यमांचा हस्तक्षेप सुधा एक महत्वाचं अंग आहे...

नितिन थत्ते's picture

2 Feb 2011 - 2:52 pm | नितिन थत्ते

नानांना अजून थांबायला लागणार. वय १६ च वर्षांचं राहणार आहे.

शुचि's picture

3 Feb 2011 - 3:14 am | शुचि

प्रफुल्ल शिलेदार यांची कविता -

घाई
वयात येण्याची घाई झालेली एक मुलगी
नाक उडवत सांगते
घुटके घेत बियर पिण्याचे दिवस गेलेत काका
आता कॅलिफोर्निया ड्राप्स हवेत
घाई झालेला विक्रेता भर रस्त्यात पकडतो
गळ्याभोवतीचा फास
सारखा सैल घट्ट करतो
आजचा शेवटचा दिवसाय शेवटचा
घाई झालेला गायक
फ्रीस्टाईल पोहोत निघतो
छोटय़ा ख्यालाचा गज दिसताच
घट्ट धरून ठेवतो
घाई झालेल्या कवीच्या संग्रहाची
घाईघाईनं केलेली समीक्षा घेऊन
घाई झालेला संपादक
लगबगीनं पळत जातो
घाई झालेला गर्भ
वैतागलेल्या आवाजात विचारतो
बाहेर येऊ देणाराय का बाई?
मोठं होऊ देताय की नाही?
प्रेम दु:ख निराशा वासना द्वेष उल्लास
घाईघाईनं प्रवेश करतात जातात
घाईचे र्सवकष दृश्य
पापणी न उचलता पहात असलेली कविता
जवळ जाताच म्हणते
घे की रे जरा दमानं

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

3 Feb 2011 - 12:49 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

आजकाल भविष्यात लग्न ही conceptच शिल्लक राहते आहे की नाही हा प्रश्न मनात येतो.
लग्न हे सेक्ससाठीच ऑफिशियल लायसन्स अस मानणारी पिढी हे बालविवाह वगैरे काय सिरियसली घेणार आहे?
apart from sex realated issues...मानसिक परिणामहि खुप विचारात घेण्या सारखे आहेत.
या वयात आपला लाईफ पार्टनर कसा असावा याबद्दल काहि मत तयार झालेली नसतात... किंबहुना ती अक्कलच नसते.
आणि मोठे झाल्यावर जे लादलं गेलेलं नातं आहे त्याबद्द्ल काँप्लेक्स निर्माण होउ शकतो.. सहजीवन घुसमटु शकतं.
पदरी पडेल ते पवित्र असं मानणारी ही पिढी तर नक्कीच नाही.
आपण आजुबाजुला आजही हे पाहतो...कि प्रेमात पडुन्....किंवा पाहुन सवरून लग्न केलेल्या लोकांनाही ही पश्चातबुद्धी होत असते... कि this is not something which i ws looking for.
मग हे अस काहीतरी करुन मानसिक घुसमट का होउन द्यायची
नातं अस बोझ म्हणुन स्विकारायला लागणं या इतकं त्रासदायक काहिहि नसतं.
एकेमेकांना केवळ सहन करत रहाणं ही भावनाच किती विचित्र आहे

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Feb 2011 - 1:04 pm | llपुण्याचे पेशवेll

१०० टक्के मनासारखा साथी मिळणं ही केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे असे मला वाटते. शेवटी प्रत्येकजण कुठेना कुठे तडजोड करतच असतो. असो.

नरेशकुमार's picture

3 Feb 2011 - 1:46 pm | नरेशकुमार

१०० टक्के मनासारखा साथी मिळणं ही केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे असे मला वाटते.

याला अपवाद असतात.

शेवटी प्रत्येकजण कुठेना कुठे तडजोड करतच असतो.

डिपेंड्स.

असो.

असो.

नरेशकुमार's picture

3 Feb 2011 - 1:53 pm | नरेशकुमार

नातं अस बोझ म्हणुन स्विकारायला लागणं या इतकं त्रासदायक काहिहि नसतं.
एकेमेकांना केवळ सहन करत रहाणं ही भावनाच किती विचित्र आहे

देवाने दिलेल्या मेंदुचा थोडा जरी वापर मानसाने केला ना, तरि तो हे नाते अगदि सहज प्रेमाने निभावुन नेवु शकतो. पन आजकाल मानव मेंदु वापरन्या ऐवजि अहं (I am the truth) होतो. त्याचाच परिनाम आहे हा सगळा.

प्रतिसाद खचितच आपल्याला उद्देशुन नाही.

म्हणजेच कुठेना कुठे तडजोड ही आलीच नाही का नरेशकुमार.

नरेशकुमार's picture

3 Feb 2011 - 2:49 pm | नरेशकुमार

यालाच अहं म्हनतात आनी सगळ्या राड्याची सुरुवातच इथुन होते.

आई वडिलांना सांभाळताना त्यांचे ओझे होते का ? मग बायकोशी प्रेमाने वागताना का बरे ओझे व्हावे ?
आई वडीलांनि आपल्याला जन्म दिलेला असतो, बायको स्वतःचा उभा जन्म आपल्या हवाली करते. याची काहीच कींमत नसते का ?

डोक्यावर वाळुचे ओझे/फुलांचे ओझे, अशि काहीतरि एक कथा ऐकिव आहे.... आपन ओझे कशाला समजतो ते यावर अवलंबुन आहे.

मित्रा उलट अहं असला की तडजोड केली जात नाही. :)
तडजोड ही प्रेमापोटीच केली जाते नाही का ?

सध्या प्रश्न हा बालविवाहाचा आहे...
पण मुद्दा उपस्थित झालाच आहे म्हणून...

>>>एकेमेकांना केवळ सहन करत रहाणं ही भावनाच किती विचित्र आहे .

लग्न म्हण्जेच तडजोड हे आपल्याला माहिती आहे...
अनुभव नसला तरीही...
लग्न म्हणजे चित्रपटाचा खेळ आहे,
तिकीट काढणे फक्त तुमच्या हातात आहे,
चित्रपट कसा निघेल हे काही सांगता येत नाही,
तुम्ही म.टा. मधील रिव्यू वाचून गेला तरीही....
मग हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे..
तुम्हाला चित्रपट पूर्ण पहायचा का अर्धवट सोडायचा ते?
तो तुम्ही मजा मारतही पाहू शकता किंवा बोट मोडतही..
लग्न केवळ नशिबाचा एक खेळ आहे..
किंवा जुगार म्हणा हवं तर....
तुम्हाला तो लाम्बवता येइल पण थोपवता नाही येत...

>>>>यालाच अहं म्हनतात आनी सगळ्या राड्याची सुरुवातच इथुन होते.
आई वडिलांना सांभाळताना त्यांचे ओझे होते का ? मग बायकोशी प्रेमाने वागताना का बरे ओझे व्हावे ?
आई वडीलांनि आपल्याला जन्म दिलेला असतो, बायको स्वतःचा उभा जन्म आपल्या हवाली करते. याची काहीच कींमत नसते का ?>>>>

मलातरी "अहं" मध्ये येतोय असं कुठेच वाटत नाही....
कारण शेवटी तिने तिचं जीवन आपल्याला सोपवलेलं आहे..
आपणच म्हणाल्याप्रमाणे ....
मग अहं बाळगून काय "भरीत" करणार त्याचं...

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

3 Feb 2011 - 2:27 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

काही नात्यांचे सुर अगदीच न जुळणारे असतात..
त्यामुळे १००% मेंदुचा वापर जरी केला तरिहि ते नाही साधता येत.
प्रत्येक ठिकाणी मेंदुचा वापर लागु होत नाही..
आणि नात्यांच्या बाबतीत तर नाहीच.
आणि अहं बद्दल म्हणाल तर प्रत्येक ठिकाणी फक्त अहं मुळेच प्रॉब्लेम होतात असं नाही.किंवा अहं सोडला तर प्रॉब्लेम सुटतात असही नाही.
गणपाशी सहमत्...म्हणजे तडजोड आलीच .

नरेशकुमार's picture

3 Feb 2011 - 2:53 pm | नरेशकुमार

सहमत आहे.

विचार पुर्वक निर्णय घेतल्याने अनावश्यक वाद विवाद टाळता येतात, इतकेच मला म्हनायचे होते.
बाकी नशिबाचा भाग.

पन कोनत्याही नात्याचि सुरुवात मात्र अहं बाजुला ठेउनच व्ह्यायला हवी.

दुर्जनांच्या नाशासाठी : सनातन वाचा