गाभा:
शिवरायांचा पुतळा समुद्रात हे काही पटले नाही. शिवाय पुतळा उभारणार्या नेत्यांना महाराजांविषयी किती आस्था आहे हे जनता चांगलेच ओळखून आहे. स्मारक हवेच तर सर्व प्रमुख गडांच्या डागडुजीसाठी काहीतरी करा. राजगडाकडे तर सरकारचे लक्षच नाही.
आपले नेते (सर्व पक्षातले) एक दिवस जरी शिवबांसारखे प्रामाणिकपणे वागले तरी मोठे आश्चर्य म्हणावे लागेल!
प्रतिक्रिया
5 Jun 2008 - 7:57 pm | अभिज्ञ
आपण हया विषयावरील कालच्या लोकसत्तेतला अग्रलेख वाचलेला दिसतोय.
शिवाय पुतळा उभारणार्या नेत्यांना महाराजांविषयी किती आस्था आहे हे जनता चांगलेच ओळखून आहे.
स्मारक हवेच तर सर्व प्रमुख गडांच्या डागडुजीसाठी काहीतरी करा. राजगडाकडे तर सरकारचे लक्षच नाही.
शिवसेना-भाजप सत्तेवर असताना त्यांना कोणि आडवले होते?
हाच उपक्रम जर शिवसेना भाजप ह्यांनी केला असता तर?
मुळात मला तरी आपला आक्षेप हा राष्ट्रवादी-कोंग्रेस ह्यांनी स्मारक उभारण्यावर वाटतोय.
तुम्हाला राजगडाचाही "सिंहगड" करायचा आहे का?म्हणजे अगदि गडाच्या माथ्यावर नेणारे रस्ते वगैरे?
हे राजकारणि लोक गडा-किल्ल्यांकडे लक्ष देत नाहित ते एका द्रॄष्टिने उत्तमच आहे.नाहितर तिथेहि हि लोके आपल्या "गढ्या" उभारतील.
त्यापेक्षा हे स्मारक समुद्रात उभारत आहेत तेच उत्तम.
अभि़ज्ञ
5 Jun 2008 - 8:14 pm | हेरंब
माझा आक्षेप सध्याच्या सरकारबद्द्ल नाही. सर्व राजकारणी सारखेच. म्हणूनच आज केतकरांच्या घरावर हल्ला झाला.
तुमचा मुद्दाही पटला. राजगड तर आम्हा ट्रेकर्स् चा आवडता आहे. त्याचा काय कुठल्याच गडाचा 'सिंहगड' होऊ नये. पण समुद्रांत एवढा खर्च करुन तो बांधायला माझा आक्षेप आहे.
5 Jun 2008 - 8:48 pm | llपुण्याचे पेशवेll
मध्यंतरी प्रतापगड किल्ल्याचा एक बुरुज ढासळला. आणि या प्रकाराची शक्यता अनेक गिरीप्रेमींनी अगोदरच वर्तविली होती. तसे निवेदनही पुरातत्व खाते आणि सरकारला दिले होते. पण सरकारने दुर्लक्ष केले.
मंडणगड तालुक्यातील गोपाळगड त्यावर एका व्यक्तीने तटबंदीच्या कमानीत भक्कम दरवाजा बसवून आतमधे आंब्याची बाग केली आहे. आणि ती जमिन माझीच आहे म्हणतो मग सरकार तेव्हा काय करत आहे?
कोट्यावधी रुपये खर्चून स्मारक उभारण्याआधी ह्या तटबंद्या तर पक्क्या करा.
पुण्याचे पेशवे
5 Jun 2008 - 9:59 pm | देवदत्त
आहेत त्याच मूर्त्या/पुतळे सांभाळणे कठीण आहे. त्यांच्या विटंबनेवरूनच तर मारामार्या/ जाळपोळ /दंगली होत असतात. आता ऐतिहासिक महापुरूष तर सोडाच एखाद्या मंत्र्याच्या फोटोला काळे लावले म्हणून लोक रस्त्यावर जाळपोळ करतात. ह्या पार्श्वभूमीवर नवीन काही स्मारके बनविणे गरजेचे तर नाहीच, उलट खरे तर गल्लोगल्ली आहे तेच पुतळे काढून एकत्र ठेवावेत व त्यांचा सांभाळ करा असे म्हणावेसे वाटते.
आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे.
शिवसेना-भाजप सत्तेवर असताना त्यांना कोणि आडवले होते?
हाच उपक्रम जर शिवसेना भाजप ह्यांनी केला असता तर?
तर मी तोही दिखाऊपणा आहे असे म्हणालो असतो. वास्तविक कोणत्याही पक्षाने असे काही करावे असे मला नाही वाटत.
6 Jun 2008 - 12:10 am | भाग्यश्री
पूर्णपणे सहमत !!!!
बायदवे.. 'शुद्धलेखन' नही सांगते.. पण मूर्तीचे अनेकवचन मूर्तीच राहते..
6 Jun 2008 - 5:41 pm | देवदत्त
बायदवे.. 'शुद्धलेखन' नही सांगते.. पण मूर्तीचे अनेकवचन मूर्तीच राहते..
दुरूस्ती सांगितल्याबद्दल धन्यवाद . मी आपला तो शब्द नेहमीच्या वापरातील म्हणूनच लिहिला. आणि तुम्ही सांगितल्यावर शोधले तर 'मूर्त्या' हा शब्द ही भरपूर ठिकाणी मिळाला. त्याचाच परिणाम असेल :)
असो, तो मुद्दा गौण आहे.
नेमक्या मुद्यावर पुन्हा लिहिन.
6 Jun 2008 - 12:18 am | विसोबा खेचर
देवदत्ताशी सहमत आहे!
उगाच स्मारकांची शोबाजी करण्यापेक्षा राजकारण्यांनी जनतेचा पैसा प्रामाणिकपणे व सचोटीने जनतेच्याच हिताकरता खर्च करावा. आज महाराष्ट्रातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्याकरता काहीतरी ठोस कार्यक्रम आखला पाहिजे!
खुद्द महाराजांनादेखील तेच अधिक आवडेल असं मला वाटतं!
आपला,
(महाराजांचा भक्त) तात्या.
6 Jun 2008 - 12:25 am | मन
अगदि मनातलं बोललात.
१००% सहमत.
आपलाच,
मनोबा
6 Jun 2008 - 12:42 am | अभिज्ञ
आहेत त्याच मूर्त्या/पुतळे सांभाळणे कठीण आहे. त्यांच्या विटंबनेवरूनच तर मारामार्या/ जाळपोळ /दंगली होत असतात. आता ऐतिहासिक महापुरूष तर सोडाच एखाद्या मंत्र्याच्या फोटोला काळे लावले म्हणून लोक रस्त्यावर जाळपोळ करतात. ह्या पार्श्वभूमीवर नवीन काही स्मारके बनविणे गरजेचे तर नाहीच, उलट खरे तर गल्लोगल्ली आहे तेच पुतळे काढून एकत्र ठेवावेत व त्यांचा सांभाळ करा असे म्हणावेसे वाटते.
आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे.
अहो अशा अनेक गोष्टी आहेत.
दर वेळेला काहि वेगळा विषय आला कि काहि लोक (उदा.केतकर...) लगेच आधिच पैसा कमी आहे त्यात केवढी गरिबि आहे,
कुपोषण आहे,पुर आहेत,दुष्काळ आहेत वगैरे ठराविक रडगाणि गायला सुरु करतात.
हे प्रोब्लेम्स गेले कित्येक वर्षे भारतात आहेतच.अजुन पुढची १०० वर्षे गेलीत तरि सुध्दा हे प्रोब्लेम्स राहणारच.
म्हणुन काय हे असले उपक्रम सरकारने कधिच हाति घेउ नयेत का?
आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे.
हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो?
वास्तविक पाहता हि ओरड महाराष्ट्रातील संकुचित विचार करणारी मंडळि सतत करत असतात हेच महाराष्ट्राचे दुर्दैव.
हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत
गावभर फिरले असते.
असो,
अभिज्ञ.
6 Jun 2008 - 10:41 am | उदय सप्रे
आपल्या सगळ्या बुजुर्ग लोकांना विरोध म्हणून मी म्हणत नाहिये पण मला असे वाटते की.....
शिवाजी महाराजांसारख्या उन्नत व्य्क्तीमत्वाच्या पुतळ्यावर हे पैसे खर्च झले तरी "गंगेत घोडे न्हाले" म्हणायची वेळ आहे , त्यामुळे वाईटातून चांगले शोधायची सवय लागलेले मन असे सांगते की, त्या निमिताने अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा जर आमचे महाराज जगाला दिसणार असतील तर आमच्या मुख्यमंत्र्यांना ही सुबुध्दीच झाली म्हणायची नाही का?
शिवाय अभिज्ञ यांनी म्हटल्याप्रमाणे :आधीच सरकार म्हणते पैसे नाहीत/ कमी आहेत. पुन्हा १०० कोटी रू खर्च करून स्मारक उभारणार. त्यापेक्षा ते पैसे लोकांच्या इतर कामाकरीता वापरा म्हणावे.
हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो:"
हे पण खरेच आहे.
तेंव्हा मला जरी तुमच्या सगळ्यांच्या मनातील भावना / सद्हेतू कळले तरी पण या आपल्या सगळ्यांच्याच "वांझोट्या" भावना कवटाळत बसण्यापेक्षाही "महाराज" अजून "उंच" होत जगाला दिसणार , विमानातून आपण मुंबईजवळ आलो की आधी आपल्याला आप्ल्या हृदयावर विराजमान असलेला परमेश्वर - आपले महाराज दिसणार असा व्यापक दृष्टीकोन हवाय.....
हे फक्त माझे मत आहे , कुणावरही टीका नव्हे.....तसे वाटत असल्यास क्षमस्व !
हेरंब साहेब , आपले मत : आपले नेते (सर्व पक्षातले) एक दिवस जरी शिवबांसारखे प्रामाणिकपणे वागले तरी मोठे आश्चर्य म्हणावे लागेल!
हे फारच अपेक्षा करताय तुम्ही ! अहो, आपल्याला अटल बिहारी वाजपेयी किंवा ए.पी.जे.अब्दुल कलाम यासारखे संशोधक नकोच आहेत हो, आपल्याला "सावरकरांचा पुतळा / फोटो विधान्भवनात नको" असे म्हणणारे माजोरडे दाक्षिण्यात्य मणीशंकर अय्यरच हवे आहेत हो ! तेंव्हा हे सगळे लोक (कोण ते कळले असेलच , लिहीत नाहिये , महाराजांचे शिष्य म्हणवणारे) का शांत असतात? एम्.एफ. हुसैन सारख्या आपल्या देवी देवतांची खिली उडवणारे "आंबट शौकीन" लोक उजळ माअथ्याने रहातातच आहेत ना आपल्या मराठी लोकांच्या नाकावर टिच्चून?
.....असो विषय खूपच जहाल आहे.....
आपला विनम्र,
उदय सप्रेंम
6 Jun 2008 - 2:01 pm | रम्या
.. सहमत.
अशा प्रकारच्या पुतळ्याकडे फक्त एक दगडमाती आणि घातूंनी बनवलेली मुर्ती समजायचं कारण नाही.
ही मुर्ती शिवरायांच्या पराक्रमाचं प्रतिक म्हणून मानूया ना. हा पुतळा मुंबईत येणार्या परदेशीयांचं महाराजांबद्दलचं कुतुहल तरी जागृत करेल. त्यांना पुतळा कोणाचा? कोण हे शिवाजी महाराज? असे प्रश्न विचारणं भाग तरी पडेल.
मान्य आहे की गडकिल्ल्यांचे संरक्षण महत्वाचे आहे, ते व्हायलाच पाहिजे पण त्यासाठी या पुतळ्याला विरोध करायची काय गरज आहे?
खर्चाचं म्हणाल तर ज्या सरकार कडे मुंबईचं शांघाईकरण करायला पैसा आहे त्यांच सरकारला मुंबईचं थोडं तरी मराठीकरण करायला पैसा उभा करणं काहीच अवघड नाही. अहो यापुर्वी सरकार तर्फे खर्च होणारा सारा पैसा विधायक कामासाठीच खर्चं झाला? अहो धरणं, रस्ते, कालवे, पुल बांधताना एवढा भ्रष्टाचार होऊन एवढा पैसा खर्च होतो तेव्हा का नाही सुमार साहेबांना जाग येत.
रम्या
6 Jun 2008 - 9:15 pm | चिन्या१९८५
ज्या पध्दतीने सरकारने योजना सांगितली आहे ती तशीच्या तशी अमलात येणार नाहिच पण जर तशी अमलात आणली तर हे नक्कीच स्वागतार्ह आहे. पण पुतळ्याबरोबर तिथे एक संग्रहालय पण बनवणार आहेत. माझ मत इतकच आहे की या सर्व स्थळाच्या स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय सरकारला या अशा प्रोजेक्ट्सचा फारसा अनुभव नसल्याने खासगिकरणातुन ही मोहिम राबवली तर अजुन चांगले होईल असे वाटते. शिवाय याचबरोबर याचे मार्केटिंगही चांगल्या पध्दतीने करावे त्यामुळे हे एक प्रेक्षणिय स्थळ बनायला हवे व त्यातुन पर्यटकांना आकर्षीत करायला हवे. त्याचबरोबर किल्ल्यांच्या डागडुजीसाठीही काही अशीच मोठी तरतुद करावी.
6 Jun 2008 - 10:47 pm | देवदत्त
हे विधान फक्त टाळ्या घेण्यासाठी ठीक आहे.परंतु असे कधि होते का हो?
बहुधा अशाच विधानामुळे केतकरांना टाळ्या नाही मिळाल्या पण त्यांच्या घरावर हल्ला झाला. (वाचून बघावाच लागेल आता त्यांचा अग्रलेख.)
अरेच्च्या, बहुतेक प्रतिसाद केतकरांकरीताच लिहिले आहेत :)
मी त्यांचा अग्रलेख अजून पाहिलाही नाही आहे. मी आपले एक सर्वसामान्य नागरीक म्हणून माझी प्रतिक्रिया दिली.
आणखी एक,
इथे लिहिल्याप्रमाणे सर्वांकरिताच स्मारके बनवावे लागणार आहेत. मग कशाला सरकारने लोकांच्या इतर प्रश्नांकडे बघावे? वर्षानुवर्षे हे प्रश्न राहणार आहेतच त्याकडे नंतर पाहता येईल. आणि नाहीतरी सरकार कुठे सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे बघते.
असो, हे मतभेद राहणारच. तुम्ही तुमचे मत सांगितले, मी माझे. उगाच वाद का वाढवावा? :)
7 Jun 2008 - 12:05 am | पक्या
अभिज्ञ , उदय यांच्या मताशी सहमत.
महाराज" अजून "उंच" होत जगाला दिसणार , विमानातून आपण मुंबईजवळ आलो की आधी आपल्याला आप्ल्या हृदयावर विराजमान असलेला परमेश्वर - आपले महाराज दिसणार असा व्यापक दृष्टीकोन हवाय.....
ज्यांना माहीत नाही त्यांना महाराजांबद्द्ल आपसूकच माहीती मिळेल. एक मराठी माणसं सोडली तर देश पातळी वर आपल्या शिवबांचा पराक्रम आहे का माहित इतर अमराठी माणसांना? असला माहित तरी त्रोटक च असणार.
महाराजांचे भव्यदिव्य स्मारक बांधणे हा स्वागतार्ह प्रकल्प आहे. एवढ्या खर्चिक प्रकल्पाचे काम तेवढ्याच उच्च प्रतिचे असावे आणि स्मारक बांधून पूर्ण झाल्यावर त्याचा मेंटेनन्स उत्तम सांभाळावा ही अपेक्षा मात्र आहे.
7 Jun 2008 - 12:57 am | शेखस्पिअर
अजूनही आपल्याकडे महाराजांचेच पुतळे उभे होतायत यात काही अर्थ नाही...
तरीही माझा पक्या,अभि़ज्ञ,देवदत्त यांना पाठिंबा आहे...
फक्त अभि़ज्ञचे एक वाक्य खटकते...
"हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत
गावभर फिरले असते."
7 Jun 2008 - 8:04 pm | अन्या दातार
"हे च स्मारक जर आंबेडकर किंवा गांधी ह्यांचे असते तर मात्र हेच तथाकथित पुरोगामी संपादक सरकारचा उदो उदो करत
गावभर फिरले असते."
यात काहीच खटकण्यासारखे नाही. आजच माणणीय रामदास आठवले यांनी आंबेडकरांचे स्मारक उभे करण्याची मागणी केली आहे. त्यावर कोणीच काही बोलत नाहीए.
8 Jun 2008 - 4:07 pm | शेखस्पिअर
आपली रेघ मोठी करण्यासाठी दुसरी लहान करायची नसते.
8 Jun 2008 - 5:22 pm | अभिज्ञ
अहो ,
इथे आपलि रेख मोठीच आहे. मी म्हणो ,वा कोणि ना म्हणो ,ती मोठिच राहणार.
तसेच बाकिच्या रेषाहि ब-यापैकी मोठ्याच आहेत.
इथे रेषांच्या लाबींची तुलना मुळीच नाहिये.
प्रश्न हा कोण कुठल्या रेषेकडे कुठल्या महत्वाने पहाते आहे त्याचा आहे.
किंवा जास्तच सविस्तर बोलायचे झाले तर इथे ह्या रेषेचा रंग हा काहि जणांना नेहमी खटकत असतो.
माझे विधान आपण काळजीपुर्वक वाचले असतेत तर ते आपल्याला खटकले नसते.
असो.
अभिज्ञ.
24 Jun 2008 - 12:14 am | अनन्त जोशि
शिवाजि महाराजान्चे स्मारक उभाराय चे नाहि तर मग काय कुमारस्मारक उभारायचे काय....?
24 Jun 2008 - 7:52 am | सर्किट (not verified)
नक्कीच . महाराष्ट्रात कुमार गंधर्वांचे स्मारक देखील उभारावे. पुण्यात बालगंधर्वांचे स्मारक म्हणून पुलंनी नाट्यगृह उभारले. मुंबईचे लोक कुमारांचे स्मारक उभारण्यात किती पुढाकार घेतात, ते बघायचे.
- सर्किट
24 Jun 2008 - 8:19 am | अनन्त जोशि
कुमार केतकर स्मारक म्हनतोय्...मि.....