आमची पण पाकृ..! वॉलनट् -बनाना केक्/ब्रेड.. :)

प्राजु's picture
प्राजु in पाककृती
27 Jan 2011 - 6:53 am

आजकाल शबरी लिहून डोकं जरा जडंच झालं होतं. दुसरं काही लिहायला सुचत नव्ह्तं. शबरीच्या पुढच्या भागांचे आराखडे तयार करताना स्वयंपाकात मीठ अंमळ जास्त होऊ लागलं तर कधी कमी! हे काही खरं नव्हे. तशी मी सुगरणच हो!! (असं फक्त माझं मत आहे:) ) तर म्हंटलं जरा पाकप्रयोग करावेत. आणि कसं झालं होतं, तो दुधी हलवा अंमळ जास्तच हिरवा झाल्यामुळे गणपा रागवला आहे आणि त्याने पाककृती लिहिणे बंद केले आहे. हा अन्याय कसा सहन व्हावा मला!! म्हंटलं भाऊ रागावला आहे.. जरा कहीतरी गोडधोड करून घालावं त्याला. नाही का?
शिवाय, आंतरजालिय विश्वात स्वातीताई दिनेश, गणपा, पांथस्त(आज्-काल कुठे हरवले आहेत देव जाणे),जागु, गेला बाजार आत्ता नविन आलेले अपर्णा अक्षय, शुभांगी कुलकर्णी, पियुषा , आणि डायटिशियन असुनही खादाड असणारी अमिता... या सगळ्यांची मोनोपॉली जरा मोडून काढायची होती. ;) उगाच सुगरण्/बल्लव्वाचार्य आहोत म्हणून भाव मारतात सगळे. :) (सगळे हलके घ्यालच)

तर.. स्वातीताई.. येस्स!! तुला कांपिटिशनला आलेच बघ. कोण म्हणतं प्राजुला स्वयंपाक येत नाही?? व्वा!तर हाच तो .. वॉलनट बनाना केक्/ब्रेड.
(महत्वाची सूचना : पाकृ करावी आणि खावी स्वत:च्या जबाबदारीवर)

IMG_8068" alt="" />
साहित्य :
१. बटर : १ स्टिक
२. मैदा : २ कप
३. अंडी : २
४. वॅनिला इसेन्स : १ थेंब
५. साखर : १ कप
६. रंगाने, रूपाने आणि स्वभावाने(स्वादाने) परिपक्व झालेली केळी - २
७. अक्रोड (फोडलेले): अर्धा कप
८. बेकिंग सोडा - अर्धा चमचा, बेकिंग पावडर - १ चमचा.
९. बेकिंग पॅन, ओव्हन आणि टूथपिक शिवाय ब्लेंडर्/हॅण्ड मिक्सी

कृती :
१. बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवावे. ते रूम टेंपरेचर ला आले की फटावे. खूप फेटावे
२. त्यात साखर घालून पुन्हा फेटावे. भरपूर फेटावे. (स्वातीताई अशीच लिहिते ना.. खूप फेटावे, भरपूर फेटावे :P)
३. अंडी फोडून त्यात घालावीत आणि पुन्हा भरपूर फेटावे.
४. आता हळूहळू मैदा(ऑल परपज फ्लॉर) घालत घालत फेटावे पुन्हा बेकिंग सोडा आणि पावडर घालून फेटावे.
६. वॅनिला इसेन्स घालून फेटावे.
७. केळी मिक्सर मधून एकदा ब्लेंड करून घ्यावीत.
८. केकच्या मिश्रणात हे केळ्याचे ब्लेंड घालून पुन्हा एकदा फेटावे.
९. ग्रिसिंग करून ठेवलेल्या बेकिंग पॅन मध्ये केकचे अर्धे मिश्रण घालावे.
१०. अक्रोड (फोडलेलेच) थोडेसे भरड बारिक करून घ्यावेत.
११. हा अक्रोडाचा चुरा केकच्या मिश्रणावर सगळीकडे पसरून घालावा.
१२. उरलेले मिश्रण पुन्हा या अक्रोडाच्या थरावर नीट पसरावे. वरून अक्रोड लावावेत.
१३. ३०० फे. ला प्रिहीट केलेल्या ओव्हन मध्ये साधारण ३० - ४० मिनिटे बेक करावे.
१४. टूथपिक केकच्या आत खुपसून पहावे. केक तयार झाला असल्यास ओव्हन बंद करावा आणि ३-४ मिनिटे केक तसाच ओव्हन मध्येच राहू द्यावा.
१५. मग बाहेर काढून जाळीवर काढून घ्यावा म्हणजे वाफ धरणार नाही. केक पूर्ण गार झाला मस्त एक पीस कट करावा आणि कुल व्हिप असेल तर त्या पीस वर घालून खावा.

IMG_8067">

IMG_8070" alt="" />

IMG_8069" alt="" />

आहे ना रेशिपी भन्नाट! आमचा केक काही अप साइड डाऊन नाहीये बुवा!! :)
आम्हीही करतो बरं केक अण्ड बेक. आमच्या इथे त्सेंटा आजी नसल्या तरी आम्ही करतो केक आणि खातो सुद्धा. कॉफी केक सुद्धा केला होता तो ही सावर क्रीम घालून!उगाच या वरच्या सगळ्या मंडळींना कॉप्लेक्स येईल म्हणून नाही टाकली रेसिपी.!!

काय मंडळी.. येताय खायला??

विशेष सूचना : गणपाने प्रथा पाडल्यामुळे उगाच सगळे पाकृ वाले स्टेपबाय स्टेप पा कृ देतात. माझा केक नीट होईलच अशी खात्री नसल्याने स्टेप्स चे फोटो काढले नाहीयेत. ही सुद्धा मोनोपॉली मोडली मी.. येस्स!! ज्यांना त्या स्टेप्स बघायच्या असतील त्यांनी स्वतः करून बघाव्यात. ;)

वॉलनट- बनाना सुफळ संपूर्ण!!

(थोडीशी कमी सुगरण) प्राजु

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

27 Jan 2011 - 7:00 am | नरेशकुमार

(महत्वाची सूचना : पाकृ करावी आणि खावी स्वत:च्या जबाबदारीवर)

हॅ हॅ हॅ
मी प्रिंटाउट काढुन देतो घरी, २ तासांत (खान्याजोगा) पदार्थ तयार असतो.

एक डायलॉक आठवला,
केक खाने कि लिये हम किध्धरभी जाते. आपका पता बताईये.
मस्त केक

शुचि's picture

27 Jan 2011 - 7:03 am | शुचि

>> ही सुद्धा मोनोपॉली मोडली मी.. येस्स!! ज्यांना त्या स्टेप्स बघायच्या असतील त्यांनी स्वतः करून बघाव्यात. >>
खी: खी: ऐसा माजुर्डेपणा मंगताय क्या उगीचच नेभळटपणा क्या कामका ;)

मस्त केक ग प्राजु :)

प्रीत-मोहर's picture

27 Jan 2011 - 7:34 am | प्रीत-मोहर

मस्त केक ग तै

५० फक्त's picture

27 Jan 2011 - 7:53 am | ५० फक्त

छान केक, करुन पाहेन आणि कळवेनच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Jan 2011 - 7:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तो दुधी हलवा अंमळ जास्तच हिरवा झाल्यामुळे गणपा रागवला आहे

गणपाचाही हिरवा माज? चॉलबे ना.

प्राजु तू लैच सुगरण आहेस हे कालच फेसबुकावर पाहिलं आणि अंमळ जळजळ झाली. रात्री इनो घेऊन झोपले म्हणून आता प्रतिक्रिया देत आहे. केक मस्त दिसतोय आणि तुझीही जळजळ दिसतेय! ;-)
मी बनाना केक बनवताना थोडी जास्त पिकलेलीच केळी घेते, आणि पावभाजी चेचायला जे उपकरण वापरतो तेच वापरते. (हे संपूर्ण वाक्य भूतकाळात वाचणे). मिक्सरच्याऐवजी हे वापरण्याचं एकमेव कारण, शेवटी भांडी धुताना त्रास नको!

तुला काय वाटलं या केक साठी मी बाजारातून नवी केळी आणली?? छ्या!! वरती वाच ना.. रूपाने, रंगाने आणि स्वभावानेही परिपक्व..!
ती केळी काळी होण्याआधी सत्कारणी लावली इतकंच. नाहीतरी अशी लिबलिबीत केळी कोण खाणार?

लॉरी टांगटूंगकर's picture

28 Jan 2011 - 12:45 am | लॉरी टांगटूंगकर

<चेचायला >हा शब्द हृदयावर लागला .दुसरा वापरला असता तर चालले नसते का???

सहज's picture

27 Jan 2011 - 11:09 am | सहज

कवयित्रीबै अजुन 'केका'वली येउ द्या!!

प्राजु's picture

27 Jan 2011 - 6:41 pm | प्राजु

हेहेहे.. कसचं कस्चं!! :)

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2011 - 11:23 am | स्वाती दिनेश

प्राजु, केक छानच दिसतो आहे.. त्सेंटा आजी नसली शेजारीण तरी येतो हो आमच्या प्राजुला केक,:)
फक्त बटर १ स्टिक म्हणजे नक्की किती ग्राम किवा किती टेबल स्पून/ किती कप?तेवढे क्लियर कर,बाकी मस्त..
वॉलनट+ गाजराचा केकही मस्त होतो, पण अधिक झालेली केळी संपवायचा हा हमखास उपाय आहे हे मात्र खरच,:)
भरपूर फेटणे- केक करताना "भरपूर फेटणे" अतिशय महत्त्वाचे, जितके फेटाल तितका केक फ्लफी, हलका होतो.म्हणून प्रत्येक वेळी तो उल्लेख करावाच लागतो..:)
स्वाती

एक स्टीक म्हणजे साधारण ७-८ टे. स्पून. :)

एका बॉक्स मध्ये ४ स्टिक्स असतात बटरच्या. त्यातली मी एक घेतली. :)

आणि तसंही बेसिक केक रेसिपी तुझीच आहे गं, स्वातीताई. त्यात फक्त मी केळी आणि अक्रोड घातले. :)

प्राजू, चेपुवर पाहिला तुझा केक, मस्तच झालेला दिसत होता :)
स्वातीताईच्या गुगलीला उत्तर देणे! हॅ हॅ हॅ... :)

विजुभाऊ's picture

27 Jan 2011 - 11:30 am | विजुभाऊ

झकास.
मी एकदा फणसाचा केक करायचा असफल प्रयत्न केला होता.
घरे कापा म्हणून आणलेला फणस चक्क बरक्या निघाला आणि मग केक शिवाय पर्याय नव्हता.
आल्यागेल्या सर्वाना मी आठवडाभर केक देत होतो. त्या नन्तरच्या आठवड्यात घरातली वर्दळ जरा कमीच झाली होती ;)

नरेशकुमार's picture

27 Jan 2011 - 7:13 pm | नरेशकुमार

आल्यागेल्या सर्वाना मी आठवडाभर केक देत होतो. त्या नन्तरच्या आठवड्यात घरातली वर्दळ जरा कमीच झाली होती

काय आयडीया आहे. !

आयडिया, जो आपका जीवन बदल दे.....

हे हे हे ... हल्कीफुली स्टाईल .. आणि जड कॅलरीची पाकृ . वा वा :)

नंदन's picture

27 Jan 2011 - 11:45 am | नंदन

पाकृ. दुसरा फोटो तर एकदम झकास आलाय!

प्राजु's picture

27 Jan 2011 - 6:44 pm | प्राजु

तशी मी फोटोही बरे काढते. ;)

मेघवेडा's picture

28 Jan 2011 - 3:46 am | मेघवेडा

मस्त पाकृ. दुसरा फोटो तर एकदम झकास आलाय!

असेच म्हणतो. फोटोग्राफीची जाहिरात आवडली! :D

कुंदन's picture

27 Jan 2011 - 11:49 am | कुंदन

छान दिसतोय केक.
इनो शोधावे लागेल आता.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2011 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार

आपण हा धागा उघडलाच नव्हता.

प्राजुताय आता त्या केकमधील अंडी वगळून केक कसा करायचा ते सांग.. बाकी केक बल्लवाचार्यांना आव्हान आहे... :)

- केकवाला पिंगू

प्राजु's picture

27 Jan 2011 - 6:46 pm | प्राजु

अंडी वगळा... अर्धा टीन कोणतंही सोडा ड्रिंक घाला. कोक, स्प्राईट .. शक्यतो फँटा नको. संत्र्याचा स्वाद येतो मग केक ला. संत्रा केक करायचा असेल तर हरकत नाही.

स्पंदना's picture

27 Jan 2011 - 12:50 pm | स्पंदना

UPSIDE DOWN!!

APARNA

वॉव कसला मस्त दिसतोय ग....
हा वॉलनट केक म्हणजे, माझा पाईनअ‍ॅपलच्या जोडीचा आवडता केक.

शेवटी तुही स्वातीताईसारखी इनोची एजंसी घेतलीस तर. :)

आवांतरः राग बीग काही नाही हो मंडळी. वाईच माझ्या जाचातुन मोकळीक दिली आहे काही दिवस. ;)

अवलिया's picture

27 Jan 2011 - 1:34 pm | अवलिया

मी धागा वाचलेला नाही.

दीविरा's picture

27 Jan 2011 - 2:21 pm | दीविरा

केक खुपच छान दिसतो आहे.

मस्त :)

सुगरण प्राजु यम्मी आहे ग केक.

RUPALI POYEKAR's picture

27 Jan 2011 - 2:46 pm | RUPALI POYEKAR

स्वातीताई, एगलेस केकची रेसेपी सांगा हो.
बाकी अफलातुन केक.

कच्ची कैरी's picture

27 Jan 2011 - 2:51 pm | कच्ची कैरी

काय एकानंतर एक एकापेक्षा एक सरस केक येताहेत मिपावर ,माझ्यासारख्या केकप्रेमींसाठी ही तर मेजवानीच!!

RUPALI POYEKAR's picture

27 Jan 2011 - 2:51 pm | RUPALI POYEKAR

बाकी अफलातुन केक.

प्राजुताई, एगलेस केकची रेसेपी सांगा हो.

RUPALI POYEKAR's picture

27 Jan 2011 - 2:51 pm | RUPALI POYEKAR

बाकी अफलातुन केक.

प्राजुताई, एगलेस केकची रेसेपी सांगा हो.

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Jan 2011 - 3:01 pm | ब्रिटिश टिंग्या

वॉव सह्हीच!

- (केकचापी) टिंग्या

प्राजु's picture

27 Jan 2011 - 6:48 pm | प्राजु

सर्वं मंडळींचे मनापासून आभार.
आणि ज्यांना छोटे छोटे चिमटे काढलेले आहेत वरच्या लेखात, त्यांनी हलके घेतल्याबद्दल धन्यवाद.
स्वातीताई, त्सेंटा आजींना सांग बरं का.. की त्यांच्या(तूच सांगितलेल्या) आणि तुझ्या रेसिपी वाचून मी सुद्धा केक करू लागले आहे. :)

रेवती's picture

27 Jan 2011 - 8:12 pm | रेवती

हे काय?
आभार मानले सुद्धा!
आमचे लेट लतिफांचे कौतुकही स्विकारावे देवी!;)
मला फोटू बघण्याआधी वाटले कि बनाना नट ब्रेड विथ साखरांबा अशी पाकृ आहे कि काय.

आम्ही अगदीच काही ह्या नाही आहोत हो!!
आणि या प्रतिक्रियेचा निषेध.. वैयक्तिक संभाषण सार्वजनिक केल्याबद्दल. ;)

चित्रा's picture

28 Jan 2011 - 3:28 am | चित्रा

लेट लतीफ नं. २

संजय अभ्यंकर's picture

27 Jan 2011 - 8:33 pm | संजय अभ्यंकर

आता बायकोला ई-मेल ने पाठवली.

मुंबईला आल्यावर प्राजुताईचा केळा केक व स्वातीताईचा गाजर केक हाणायचा!
लगे रहो!

प्राजूताई झिंदाबाद!

मदनबाण's picture

27 Jan 2011 - 8:49 pm | मदनबाण

वा... :)

अती अवांतर :--- जालावर कधी कधी काही अशाही प्रतिक्रिया देणारे काही महाभाग पाहण्याचा योग येतो !!! आता अशाही म्हणजे कशा ?
तर त्या ह्या :---
१) पहिला फोटो नीट दिसत नाही, का ?
२)दुसरा फोटो ठीक आलाय पण मॅक्रो मोड ऑन ठेवला असता तर डिटेल्स नीट दिसले असते.
३)तिसरा फोटो ठीक आलाय पण त्याच्यात ती वर डावीकडे असणारी डीश दिसतेय, त्यामुळे रसभंग होतोय !!!
४)जे पहिल्या फोटोच झालयं तेच या फोटोचं झाल आहे का ? म्हणजे फोटो दिसत नाही ना, म्हणुन विचारले..
५)या फोटोचा फोकसच गंडला आहे, घरात धुके असताना काढला होता का ? नाही सहज विचारतो.
६)हे काय ? जो पहिला फोटो आहे तोच इथे दिला आहे का ? पहिलाही दिसत नव्हता आणि हाही दिसत नाही म्हणुन शंका आली मला.
७)प्रकाशाच्या विरुद्ध बाजुने फोटो काढल्याने पदार्थाची सावली दिसत आहे, त्यामुळे जे डिटेल्स दाखवायचे होते ते दिसत नाहीत.
८) बाकी ठीक आहे पण नक्की हे कशाचे फोटो काढले आहेत? म्हणजे सब्जेक्ट आहे तरी काय ?
;)

बाकी माझी खरी खरी प्रतिक्रिया कोणी विचारली असती तर ती अशी असती :---

जे ८ व्या सेकंदला सैफ (समीर) म्हणतो तेच... ;)

(केक प्रेमी)

प्राजु's picture

27 Jan 2011 - 8:59 pm | प्राजु

मेल्या.. !! सगळे फोटो नीट दिसताहेत मला!!
उगाच आपण फार भारी फोटूमास्तर आहोत असा समज करून घेऊ नये.
आणि हो.. आमच्यकडे प्रचंड थंडी असल्याने.. सगळीकदे धुकंच धुकं आहे.. काय म्हणणं आहे यावर??

स्वाती२'s picture

27 Jan 2011 - 10:20 pm | स्वाती२

मस्त!

स्मिता.'s picture

27 Jan 2011 - 10:57 pm | स्मिता.

प्राजुताई, मस्त दिसतोय गं केक! फोटो बघून तर स्क्रिनवरून उचलून खायची इच्छा झाली.

केकच्या फिल्ड मध्ये स्वातीताईला कॉम्पिटीशन!! ;)

सुहास..'s picture

28 Jan 2011 - 10:00 am | सुहास..

तायडे , म्या जरा केक, चॉकलेट, आईस-क्रीम आणि बिस्किट या तत्सम पदार्थांपासुन दुर असतो .. तरी तु बनविली आहेस म्हणल्यावर झकासच असणार !!

गुड वन !!

प्राजक्ता पवार's picture

28 Jan 2011 - 11:25 am | प्राजक्ता पवार

मस्तं

धनुअमिता's picture

3 Feb 2011 - 4:05 pm | धनुअमिता

केक खुप छान दिसतोय.फोटो खुप छान.