सर्वप्रथम शिल्लक राहिलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा !!
सरकारी मेहेरबानीने आज मिळालेली सुट्टी उपभोगली..दुपारी वामकुक्षी घेत असताना सहज मनास प्रश्न चाटून गेला "शाहरुख, तू काय केले आहेस आत्तापर्यंत देशासाठी " ?
पहिल्यांदा वाटले अरे मी प्रामाणिकपणे प्राप्तिकर भरतो की..पण नंतर लक्षात आले अरे तो तर 'अॅट सोर्स' वजा होतोय..जर तसे नसते तर मी काय केले असते ? मी टॅक्स वाचवण्यासाठी आत्तापर्यंत कधीच खोटी मेडिकल बिलं, घरभाड्याच्या पावत्या दिल्या नाहीत, पण ही गोष्ट 'देशसेवा' या कॉलमखाली लिहीण्या इतकी तर नाही मोठी..
बाकी काहीही नव्हतेच विचारात घेण्यासारखे :-(
माझ्यासारखा इथे चुकून एखादाच/एखादीच असेल ज्याने/जिने आत्तापर्यंत देशासाठी म्हणून काहीही केले नसेल !
तर मित्रानो, आपण देशासाठी म्हणून कधीही काहीही केलेले असेल तर इथे कृपया सांगावे..त्यातील एखादी गोष्ट मला जमण्यासारखी असेल तर ती मला करायची आहे..
शतशः धन्यवाद !!
प्रतिक्रिया
27 Jan 2011 - 3:02 am | शुचि
"अमक्यांची कीव येते" वगैरे वक्तव्ये वाचून मलाही हाच प्रश्न पडला होता "आपण देशासाठी काय केलं?". मी आतापर्यंत देशासाठी काहीही केलेलं नाही. क्वचित काही वर्ष काही अनाथाश्रमांना देणगी दिली पण ते मी माझ्यासाठी दिली त्यातून काही कल्याण झालं असेल तर माझं सर्वाधिक झालं (मानसिक दृष्ट्या).
विहार तलावाच्या काठाशी पडलेल्या प्लास्टीकच्या पिशव्या भरून तो काठ स्वच्छ करण्याचा अयशस्वी आणि बाळबोध प्रयत्न केला होता पण थोड्याच काळात उपरती झाली की आपल्या एकटीच्या आवाक्यातली ही गोष्ट नाही आणि आपल्यात नेतृत्वगुणही नाहीत की आपण अन्य लोकांचे संघटन करू शकू. त्यापेक्षा अभ्यास करावा. आपल्याला आपल्या समस्या खूप आहेत.
असो!!!!
_________________________________
परवाच मला एक छानसा ब्लॉग सापडला. त्यात लेखकाने चीनी लोकांच्या अहर्निश कार्यरत रहाण्याच्या वृत्तीचा खूप सुरेख उल्लेख केला आहे. लेखकाचे मत ठळक अक्षरात देते आहे. -
"चीनमधला ग्रामीण भाग आणि भारतातल्या गावाकडच्या चित्राची तुलना करताना त्यांनी (गंगाधर गाडगीळ) लिहले आहे,"आपल्या ग्रामीण भागातून प्रवास करताना अनेक रिकामटेकडी माणसं रस्त्याच्या कडेला बसून गप्पा छाटताना आणि विड्या ओढताना दिसतात. अनेक परदेशी लोकांनी तुमच्या देशात माणसं अशी रिकामटेकडी कशी बसलेली असतात, असा प्रश्न मला विचारलेला आहे. चीनमध्ये मात्र रस्त्याच्या कडेला बसलेली अशी रिकामटेकडी माणसं मला आढळली नाहीत. सगळी माणसं कोणत्या ना कोणत्या कामात गुंतलेली होती. नाही म्हणायला एक अगदी म्हातारी बाई आपल्या घराच्या बाहेर खुर्चीवर बसलेली मला आढळली. पण तिच्या हातात सुद्धा काहीतरी विणकाम होतं." खूपच मार्मिक निरीक्षण आहे हे! डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हा वाक्प्रयोग वापरायचा मोह होतोय, तो आवरतो; मात्र काही तरी बोध देणारं नक्कीच म्हणता येईल. आणि गेल्याच काही वर्षात झपाट्याने आपल्या पुढे गेलेल्या चीनचं रहस्य उलगडणारंही! "
यातूनदेखील बरच काही शिकण्यासारखे आहे असे मला वाटते.
26 Jan 2011 - 10:21 pm | वेताळ
कसाही माझा देश असला तरी मी नावे न ठेवता भारतात आनंदाने राहतो हे मी देशासाठी करतो.
26 Jan 2011 - 10:31 pm | वाटाड्या...
आपला वाटा खारीचा का होईना पण तो असतोच...डोंगर जरी नाही उचलला तरी एखादा रस्त्यात पडलेला दगड उचलुन बाजुला केला तरी ती देशसेवाच आहे...ती तरी कितीजण करतात?
28 Jan 2011 - 12:56 pm | रणजित चितळे
आपल्याशी सहमत
हे वाचा वेळ मिळाला तर
ह्या वर मी एकदा एक लेख लिहिला होता
राष्ट्रव्रत घ्या
ह्या संदर्भात पुर्ण लेख वाचायचा असेल तर येथे टिचकी मारा
http://www.misalpav.com/node/14583
http://www.misalpav.com/node/14660
http://www.misalpav.com/node/14744
http://www.misalpav.com/node/14780
26 Jan 2011 - 10:39 pm | चिरोटा
Open source project मध्ये हातभार लावणे देशसेवेत येते काय? असेल तर मी पण.
26 Jan 2011 - 10:46 pm | विकास
चर्चा थोडी वेगळी करता येऊ शकेल असे वाटते:
देशसेवा म्हणून आपण काय करू शकतो ?
26 Jan 2011 - 10:53 pm | अविनाशकुलकर्णी
मी काम व नोकरी मन लावुन केली...
माझि देशसेवेची कल्पना इथेच संपते
26 Jan 2011 - 11:27 pm | पिंगू
देशसेवा म्हणजे काय? हेच बहुतेकांना ठाऊक नसते.. तर देशसेवा करावी हे कसे त्यांच्या मनात येणार..
बाकी मी तर पामर आहे. तरी देशसेवेची आपल्याला अभिप्रेत असणारी व्याख्या काय असेल ते तर सांगा. म्हणजे मी देशासाठी काय केलयं हे मला तरी कळेल..
- पिंगू
26 Jan 2011 - 11:37 pm | शाहरुख
व्याख्या काय सांगणार ? तुम्ही एखादी गोष्ट देशासाठी म्हणून केली असेल तर ती इथे सांगावी, भले कितीही छोटी का असेना !
26 Jan 2011 - 11:57 pm | Nile
अनभिज्ञपणे देशासाठी काहीतरी केलं आहे त्याला व्याखेत बसवण्याचा प्रयत्न करुन काय उपयोग? हे मी देशासाठी करतोय अशा भावनेनं केलं असेल तर ठीक.
शाळेत असताना वर्षभर कुष्ठरोग केंद्रात जाउन मदत करणे, वगैरे सारखी किरकोळ कामे केली आहेत. भरीव असं अजुनतरी काही नाही.
27 Jan 2011 - 12:19 am | पिंगू
नीलकांतने जे सांगीतले आहे त्या प्रकारच्या कितीतरी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. एक जबाबदार नागरिक या नात्याने केलेलं प्रत्येक कर्तव्य ही देशसेवाच असते ना..
कृपया अनुमोदन द्या..
- (जबाबदार नागरिक) पिंगू
27 Jan 2011 - 12:56 am | लॉरी टांगटूंगकर
त्यातील एखादी गोष्ट मला जमण्यासारखी असेल तर ती मला करायची आहे...........
रक्तदान नक्कीच करू शकता;मी करतो.
जमेल झेपेल अशाच गोष्टी कराव्यात,नवीन काही करण्यापेक्षा आपल्या आवाक्यातले(खरे तर रोजच्या जीवनातले ) काम अशा पद्धतीने करता येईल ना हे बघीन .नवीन approach दिल्याबद्दल धन्यवाद .......
27 Jan 2011 - 12:57 am | रेवती
आपण सगळेचजण कधी वेळ, पैसे, वस्तू यांच्या रुपाने कोणा गरीबाला देत असतो ती समाजसेवा आहे हे देणार्याने मानायचे नसते. माझ्या आईने घरी येणार्या मोलकरणीच्या मुलांचा शाळेचा फी चा खर्च अनेक वर्षे केला आहे. बाबांनी काही गरीब मुलांना सकाळची शिकवणी विनामुल्य दिलेली होती असे आठवते. आपण रोज कितीजणांशी चांगले बोलतो , आनंदाने बोलतो? हेही महत्वाचे. माझ्या सासूबाई समाजसेविका आहेत आणि त्यांनी काय, कोणासाठी केलं हे सांगितलं तर मोठ्ठी यादी होइल. आपल्यासारखेच अनेक लोक काही ना काही करतच असतात. लोकांची गरज किती आहे या पेक्षा आपल्यालाही दुसर्याला मदत करण्याची मानसिक गरज असते असे वाटते. अगदी आजारी माणसाची केलेली विचारपूसही सेवाच आहे. आपल्याला बरे वाटते तेही महत्वाचे.
27 Jan 2011 - 5:40 am | शेखर काळे
म्हणजे नक्की काय असा प्रश्न पडलेला दिसतो.
देश म्हणजे त्यातला समाज, त्यातले लोक. त्याशिवाय कुठला देश ?
या लोकांसाठीच आपण काही केले तर ती देशसेवा.
आपण दर वेळेस बाहेर पडतो, तेव्हा साधी वाहतुकीची शिस्तं पाळली तरी देशसेवा होते.
त्यानंतर लाच न देणे, कचरा कचरापेटीत टाकणे, या साध्या(?) गोष्टींनी देखील देशसेवा होते.
कारण या गोष्टींनी पुढे काही प्रमाणात, समाजाला फायदा होतोच.
वीज, पाणी वाया न घालवता जपून वापरणे यांतही देशाला, समाजाला फायदा आहेच.
कारण आपण आपल्या क्रुतींतून दुसर्याला वाट दाखवत असतो - काही करण्याची किंवा काही न करण्याची.
27 Jan 2011 - 5:49 am | गोगोल
सूपर ऑसम बनवून सुखात जगावे. हीच खरी देश सेवा. जर सगळे लोक असा आयुष्य जगायला लागले तर कुणाला वेगळी देश सेवा करायची गरज नाही. वर अविनाश कुलकर्णी म्हणतात त्या प्रमाणे सगळ्यांनी आपला काम धंदा मन लावून प्रामाणिक पणे करावा. बस्स इतकाच पुरेस आहे.
27 Jan 2011 - 6:49 am | नरेशकुमार
प्रत्येकावर (विशेषतः बायकोवर) मनसोक्त प्रेम करावे.
ती नुसती देशसेवाच नाही तर विश्वसेवा आहे.
27 Jan 2011 - 4:14 pm | मुलूखावेगळी
इथे पन बाय्को आलिच तुमची प्रतिसादात पन
ही देशसेवा अहे हा
त्यामुळे बाकिच्या महिला सेफ ;)
मी देशसेवा म्हनुन नाही पन जिथे जाइल तिथे नको असलेल्ले नळ आनि टुब बल्ब बन्द करते
आनि मोबाइल च्या कीपॅड टोन बन्द ठेवते
वेळेवर जाउन लोकान्चा वेळ वाचवते.
इतकेच आता
27 Jan 2011 - 4:27 pm | नरेशकुमार
अहो चेष्टा नाय करते.
घर सुखि असेल तर सगळि कामे सुरळित होतात. मन समाधानी होते. कामे वेळेवर होतात. सगळि कामे मन लावुन व्यवस्थित होतात. हि एक प्रकारे देशसेवाच नाही का ?
घरातिल स्त्रि सुखि असेल तर आयुष्यातिल कितितरी अडचनिंवर सहज मात करता येते.
27 Jan 2011 - 4:29 pm | टारझन
ह्यावरुन एक प्रसिद्ध म्हण आठवली ...
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक समाधानी स्त्री असते , आणि प्रत्येक समाधानी स्त्री च्या मागे एक दमलेला पुरुष
:)
27 Jan 2011 - 4:37 pm | नरेशकुमार
शब्दशः खरे आहे.
लग्न होन्याअगोदर आईची खुप मदत होत होति.
लग्न झाल्यावर आई, सासू आई, आनि बायको या तिघिंचि मदत होते.
दोन्हीकडील आज्याबद्द्ल काय बोलु, लिहिल तितके कमीच.
27 Jan 2011 - 9:14 am | यशोधरा
सामाजिक शिस्त पाळणे,
सद्ध्या वेळ देता येऊ शकत नाही , जमेल तितकी आर्थिक वा वस्तूंच्या स्वरुपात चांगल्या उपक्रमांना मदत करणे.
सद्ध्या इतकंच करु शकते.
27 Jan 2011 - 10:13 am | llपुण्याचे पेशवेll
देशासाठी मी काय केले? वाह प्रश्न छान आहे. प्रत्येकानंच देशासाठी काय केले हे शोधणे तसे अवघड आहे.
मी लहान असताना अभ्यास करून मोठेपणी कमावता झालो. फार श्रीमंत नसलो तरी सध्या रेशनवरचे रॉकेल , धान्य न घेता ते मी स्वतः विकत घेण्याइतके पैसे मिळवले. त्यामुळे लक्षांशाने का होईना सरकारवरचा मला अन्न पुरवायचा ताण कमी झाला.
तसेच लहानपणी रास्व संघात असताना वेगवेगळ्या वस्त्यांमधून, झोपडपट्ट्यांमधून रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या बांधल्या. त्यामुळे हजार राख्यांमागे एक म्हणून का होईना स्वयंसेवक रास्व संघात आला. त्याचा फायदा त्या स्वयंसेवकांना असा झाला की शाखेतले वातावरण चांगले शिक्षण घेण्याचे (बहुतेक मुले चांगल्या घरातली असल्याने) असल्याने हे स्वयंसेवकही चांगले शिकले. परत त्यांच्या आजूबाजूची झोपडपट्ट्यांमधी काही मुले त्यापासूर प्रेरणा घेऊन शिकली व चांगले नोकरीधंदे करतात. (म्हणजे ज्या धंद्यांसाठी झोपडपट्ट्या प्रसिद्ध असतात त्याहून निराळे खरोखरचे चांगले धंदे) म्हणजे मी जे काही केले त्याचे अजाणतेपणे का होईना चांगले परिणाम झाले.
27 Jan 2011 - 10:30 am | गवि
देशासाठी असे जाणवून वेगळे काहीही केले नाही.
चांगल्या वाटणार्या काही गोष्टी केल्या.
पण त्या देशासाठी अशा व्यापक भावनेने नाही. काही एका मर्यादित गटांमधेच केल्या.
फलित दाखवण्यासारखे काही नाही. आपण देशासाठी काही करणे ही फार उच्च पातळीवरची गोष्ट झाली.
काही वाईट , उपद्रवी, दुरित, अपायकारक ठरेल असं काही करणं टाळलं,..... इतकं जरी केलं, तरी देश आपली स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे.
27 Jan 2011 - 10:43 am | आजानुकर्ण
मी देशसेवा म्हणून (सक्तीचा असलेला) प्राप्तीकर नियमितपणे भरतो. (थेट कंपनीतूच टीडीएस जात असल्याने तिथे ढापाढापी करायचा प्रश्नच येत नाही.) एवढी एकच देशसेवा माझ्याहातून होते.
27 Jan 2011 - 10:49 am | टारझन
आपण कबुल करतो बॉ .. आपण देशासाठी "ग्रेट" असं काहीच केलेलं नाहीये. स्वतःच्या आई वडिलांसाठी करतोय , त्यांच्या डोळ्यात अभिमान पाहिला की आपल्याला देशाचाच काय , सर्वस्वाचा विसर पडतो.
विषय संपला. द मॅटर इज ओव्हर.
अवांतर : देशाने माझ्यासाठी काय केले आहे ? असा एक खोचक प्रश्न मनात येऊन गेला :)
- टारझन
27 Jan 2011 - 4:31 pm | नरेशकुमार
हे उदाहरण मनापासुन पटलेले आहे.
आपले घर सुखि असेल तर आपण आयुष्यातिल हजार अडचनिंवर सहज मात करु शकतो.
त्यामुळे आपले घर, घरतिल स्त्रिया, लहान मुले, व्रुद्ध व्यक्ती सुखि-समाधानी ठेवने, ही सुद्धा एक प्रकारे देशभक्तीच आहे.
27 Jan 2011 - 11:05 am | स्पंदना
जेंव्हा तिथे होते तेंव्हा लाच मागणार्या तेंव्हाच्या एल आय सीच्या नांबियारला झणझणीत सुनावल होत्,अन मग त्यच तावातावान जाउन एच डी एफ सी च्या तोरस्करला,मी अनीतीक मार्गान कमवत नाही म्हणुन तुलाही अनैतीक लाच देणार नाही अस धाडदीशी संगितल होत. जोवर होते तोवर या सार्याचा एकटीन खुप विरोध केला. मोलकरणीला बँकेत खात उघडुन देण, तीच्या मुलीली निदान रात्रीच्या शाळेत जायला उद्ध्युक्त करण असले लष्कराच्या भाकर्या भाजणे म्हणता येतील असे उद्योग मी जमतील तसे केले.
पण कुणी काही चांगल केल तर त्याच कौतुकही करण आपल्याला जमल पाहिजे अस मला मनापासुन वाटत.
27 Jan 2011 - 11:14 am | विजुभाऊ
देशसेवेची ही काही उदाहरणे
काही लोक सिगरेट विकत घेऊन ओढतात आणि देशाच्या महसूलात भर टाकतात
काही लोक दारू पिऊन देशाच्य महसूलात वाढ करतात
काही लोक चैनीच्या वस्तु वापरून मॉलमध्ये जाऊन देशाची अर्थव्यवस्था चलीत अवस्थेत राहील याची काळजी घेतात.
काही लोक सतत सरकारवर टीका करून सरकारला विरोधी पक्षांची भूमीका पुरवत असतात
काही लोक चित्रपट बघून करमणूक कर भरतात
काही लोक मंडप /कमानी वगैरे साठी रस्त्यावर खड्डे खणून मॅकॅनीक डॉक्टर याना रोजगार पुरवतात
काही लोक आजारी पडतात आणि देशातील औषधांच्या व्यवसायाची उलाढाल वाढवतात
काही लोक टीव्ही सिरीयल बघून वाया जाणारी विद्यूत उर्जा वापरात आणतात तसेच रस्त्यावर गर्दी होणार नाही याची हमी देतात.
काही लोक अर्ध पोटी राहून इतराना अन्न पुरवतात
काही लोक जास्त खाऊन देशातील अन्न वाढत राहून खराब होणार नाही याची काळजी घेतात
काही मानसे लोकसंख्या वाढवून देशाला मनुश्यबळाचा अभाव जाणवणार नाही याची काळजी घेतात
काही लोक देशातच राहून इतराना देशसेवेची संधी देतात.
27 Jan 2011 - 4:34 pm | परिकथेतील राजकुमार
जमेल तेंव्हा जमेल त्या प्रमाणात देशाला लागलेल्या दारुच्या किडीचा समूळ नायनाट करायचा प्रयत्न करतो.
27 Jan 2011 - 4:41 pm | नरेशकुमार
जय शंभो
हरहर महादेव.
हलाहलाते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो.
http://www.misalpav.com/node/2835#comment-39114
27 Jan 2011 - 4:42 pm | गवि
कसा?
27 Jan 2011 - 4:53 pm | गणपा
खरच विचार करायला लावणारा धागा आहे.
बोल बच्चन सगळेच.
लोकांच्या नजरेत भराव अस काही भरिव कार्य अजुन तरी नाही घडलं.
पण नेते/नट-नट्या/गुंड/ भ्रष्टाचारी जो खोर्याने पैसा ओढुन देशा बाहेर नेतात त्याचा सुक्ष्म अंश कष्टाच्या कमाईने गेली काही वर्ष परत भारतात धाडतोय.
ह्यात माझा स्वार्थच जास्त आहे हे कबुल. पण मझ्या सारखे अनेक जण हौद से जो गयी वो बुंद से आणण्यात हात भार लावताहेत.
27 Jan 2011 - 7:49 pm | दैत्य
अवांतर : देशाने माझ्यासाठी काय केले आहे ? असा एक खोचक प्रश्न मनात येऊन गेला
@टारझनः एकदम बरोबर! खूपदा हा प्रश्न प्रत्येकाला पडून गेला असेल.....भारत देश तरी ठीक आहे ....अफ्रिकेतले गरीब देश, जिथे आयुष्याची खात्री नाही अन्न वस्त्र नाही, अश्या ठिकाणचे लोक ह्या प्रश्नाचं काय उत्तर देतील?
27 Jan 2011 - 10:40 pm | चिगो
सरकारी नोकरी (अद्याप तरी नेकीने, आनंदाने) करतोय... इमानदारीने करणार. आजकाल त्येलापण देशसेवा मानायला हरकत नाय..
28 Jan 2011 - 12:58 pm | रणजित चितळे
आपण नेहमीच करतो. आपल्या साठी हा मि पा वर एकदा लिहिलेला लेख देत आहे राष्ट्रव्रता बद्दल.
तर मग केव्हा घेताय आपण राष्ट्रव्रत?
ह्या संदर्भात पुर्ण लेख वाचायचा असेल तर येथे टिचकी मारा
http://www.misalpav.com/node/14583
http://www.misalpav.com/node/14660
http://www.misalpav.com/node/14744
http://www.misalpav.com/node/14780