साहित्यः-१)उडिदाची डाळ २)कोहाळा ३)मिठ ४)हिन्गपूड ५)धण्याचा भरडा.
६)हिरवी मिरची चवीप्रमाणे ७)हळद
कृती :-१)उडदाची डाळ भिजत घालून ४-५ तास ठेवावी.
२)रात्री बारिक वाटून घ्यावी.वाटताना पाणी बेताचे घालावे.
३)कोहाळा किसून घ्यावा व वर वजन ठेवावे.
४)पाणी निघून गेले की वाटलेल्या डाळीत मिसळावा.
५)त्यात मिठ,हळद,हिन्गपूड व थोडा धण्याचा भरडा घालावा.
६)हिरव्या मिरच्या अगदी बारीक कापून घालाव्या.
७)सर्व एकत्र कालवून त्याचे सान्डगे प्लासटीकवर घालावे.
खडखडीत वळले की भरून ठेवावे.
अश्याप्रकारे मी सान्डगे घरी करते हे नुसते खोबरेल तेलात तळून सुद्धा छान लागतात्.तसेच
ह्याची कोशिम्बीर पण छान लागते.एप्रिलमध्ये करणार त्यामुळे आज फक्त पा.कृ.टाकते आहे.
प्रतिक्रिया
21 Jan 2011 - 1:36 am | प्राजु
रेसिपी छान आहे.
असे ऐकले आहे की, कोहाळाचा रस/गर/ जे काही असेल ते... ते जर केसांना लागले.. (खास करून खिसताना हात जर केसांना लागला) तर केस पांढरे होतात. हे खरे आहे का? जाणकार प्रकाश टाकू शकतील का यावर?
21 Jan 2011 - 9:17 am | निवेदिता-ताई
एप्रिल मध्ये???? एवढ्या उशिरा का?
21 Jan 2011 - 11:32 am | स्वैर परी
एप्रिलच्या कडक उन्हात सुकावेत म्हणुन असाव कदाचित!
21 Jan 2011 - 3:48 pm | ज्योति प्रकाश
मार्च्-एप्रिलच्या दरम्यान जून व चान्गले कोहाळे मिळतात व सावन्तवाडीला त्याच वेळेस उन कडक असत म्हणुन.
21 Jan 2011 - 10:16 am | टारझन
फोटो कॅलेंडर कुठाय ?
21 Jan 2011 - 11:37 am | जागु
ज्योती मस्तच.
आमच्याइथे असे म्हणतात की एक वर्ष सांडगे केले की ते सलग तिन वर्षे करावे लागतात. माझा असल्या गोष्टिंवर विश्वास नाही. ह्यामागे नक्की काय लॉजिक आहे ते अजुन कळल नाही.
21 Jan 2011 - 12:10 pm | पिंगू
>> आमच्याइथे असे म्हणतात की एक वर्ष सांडगे केले की ते सलग तिन वर्षे करावे लागतात.
चूक.. सांडगे दरवर्षी करावे लागतात.. ही सुधारणा... :)
- पिंगू
21 Jan 2011 - 3:28 pm | RUPALI POYEKAR
कोहाळाविरहित सांडगे रेसिपि द्या
21 Jan 2011 - 3:41 pm | ज्योति प्रकाश
कोहाळाविरहित सान्डग्याची कृती:-मुगाची डाळ ७-८ तास भिजत घालून जाडसर वाटून घ्या.वाटलेल्या डाळीत
हळद्,हिरवी मिरची बारीक चिरून अथवा लाल मिरची पूड ,मिठ्,थोडा हिन्ग
थोडी धणे पूड घालून मिक्स करून त्याचे प्लास्टिकवर छोटे सान्डगे घाला.
खडखडीत सुकल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
ह्याला विदर्भात मुगोड्या म्हणतात.
21 Jan 2011 - 4:12 pm | RUPALI POYEKAR
तुमचे आभार
24 Jan 2011 - 11:01 am | शुभांगी कुलकर्णी
प्राजु,
होय कोहळा चिरताना त्याच्या रसाचा हात चुकुन केसांना लागला की केस पांढरे होतात.
आमच्या आदरणिय मातोश्रींनी केलाय तो प्रताप. त्यांचे सगळेच केस पांढरे आहेत. आज्जीनी सांगितलेल खर आहे का बघण्यासाठी त्यांनी दोन्ही हात डोक्यावरुन फिरवले आणि पंचविशीतच केसात रुपेरी छ्टा (पट्ट्या म्हणायला हव तर)अवतरल्या.
विषयांतरा बद्दल क्षमस्व.
पाकृ उत्तम. मी मिक्स डाळींचे सांडगे करते.