सोया पुलाव
सोयाबीन क्युब्स हा नॉनवेज ला एक पर्याय आहे असे म्हणतात (मला नक्की माहित नाही )
असो ........
सोयाबीन क्युब्स, पाऊन किलो तांदूळ ,हिरवे मटार,कांदा उभा चिरलेला ,टोमाटो चीरलेल, हि. मिरची पेस्ट १-२ चमचा आल-लसून पेस्ट १ चमचा ,बिर्याणी मसाला १/२ चमचा ,तूप (तेल) मोठे २ चमचे ,मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर ,खडा मसाला दालचिनी ,तेजपत्ता ,मीर ,लवंग ................
कृती ;- सोयाबीन क्युब्स ५-६ मिनिट कोमट पाण्यात भिजवा ,ते स्पोन्जी होऊन फुलून येतील , तांदूळ अर्धा शिजवून घ्या .
कढइत २ चमचे तूप घाला ,खडा मसाला घाला ,कांदा घाला गुलाबी परतून घ्या , आल लसून आणि मिरची पेस्ट घाला ,छान मिक्स करून घ्या
आता टोमाटो आणि हिरवे मटार घाला ,बिर्याणी मसाला ,आणि मीठ घाला ,आता अर्धे शिजलेले तांदूळ घाला ,छान परतून मग सोयाबीन क्युब्स घाला आणि शिजण्यापुरत पाणी घाला कोथिंबीर घाला बस .६-७ मिनिटात पुलाव रेडी टू इट.
(टीप ;-सोयाबीन क्युब्स पाण्यात भिजल्याने स्पोन्जी होतात ,जास्त शिजले तर आकार चपटा होईल म्हणून तांदूळ अर्धा शिजवून घ्यावा )
सुकी भाजी :-
सोयाबीन क्युब्स ,कांदा बारीक चिरलेला ,मटार ,लाल तिखट १/२ चमचा ,टोमाटो बारीक चिरलेला ,चिकन मसाला १/२ चमचा ,गरम मसाला १/२ चमचा ,मीठ ,कोथिंबीर
सोयाबीन क्युब्स ५-६ मिनिट कोमट पाण्यात भिजवा ,ते स्पोन्जी होऊन फुलून येतील ,त्यातील पाणी पिळून घ्या .
कृती ;- कढइत २ चमचे तेल घाला जीर मोहरी हिंग घाला ,तडतडल्यावर कांदा परतून घ्या ,मटार ,लाल तिखट घाला ,टोमाटो घाला छान परता
आता चिकन आणि गरम मसाला घाला ,मीठ घाला आणि सोया क्युब्स घाला, मस्त मिक्स करा वरून चिरलेली कोथिंबीर घाला .तय्यार...
प्रतिक्रिया
20 Jan 2011 - 3:28 pm | स्वानन्द
धन्यवाद :)
20 Jan 2011 - 3:29 pm | मितान
झकासच दिसतोय पुलाव :)
20 Jan 2011 - 5:53 pm | आत्मशून्य
.
21 Jan 2011 - 10:22 am | मुलूखावेगळी
वा छान मस्त
पन मला सोया मह्न्जे ह्युमन फूड नाही वाटत २रेच काहीतरी वाटते
तेव्हा करुन बघेल पन सोया न घालता
सोया ऑप्शन दे ना असल्यास
21 Jan 2011 - 11:44 am | पिंगू
सोया म्हणजे शुद्ध शाकाहारी मटण अजुन काही नाही.. :)
- (सोयाप्रेमी) पिंगू
21 Jan 2011 - 11:59 am | स्पा
मस्त झलय पुलव, कधि खाय्ल येउ सन्ग :)
21 Jan 2011 - 1:18 pm | कच्ची कैरी
पियुशा सगळे चांगले चांगले पदार्थ एकटीच खातेस मला बोलवत नाहिस ना?कट्टी !!!!!!!!!
21 Jan 2011 - 1:28 pm | टारझन
कैरी काकुंशी सहमत .
- पक्का वैरी
21 Jan 2011 - 7:28 pm | कच्ची कैरी
टार्झन आजोबा तर तुम्ही पण मझ्याशी सहमत आहत?
24 Jan 2011 - 11:52 am | प्रकाश१११
पियुषा - प्रतिक्रिया दिली होती. कुठे गेली...??
पुलाव मस्त झालाय. चळकण तोंडात पाणी सुटलेय ...!!
24 Jan 2011 - 1:47 pm | गवि
सोया चंक्स एकदम रसरशीत बनतात. मसाला योग्य प्रमाणात असला की चविष्टही लागतात.
धागा आवडला. टायपो उचक्याही खूप कमी आहेत यात. त्यामुळे भातात खडे लागले नाहीत.. छान मऊ लागला.. :)