काही दिवसापूर्वी मस्त हुरडा पार्टी हादडण्याचा योग आला होता
हुरड्याबरोबर घेतलेली अस्सल गावरान थाळी अहा अ हा हा हा अजून चव रेंगाळतेय जिभेवर !
म्हणून हा खटाटोप करावासा वाटला खास तुमच्या साठी
झणझणीत भरलं वांग :
साहित्य ;- वांगी , शेंगदाण्याच कुट ,७-८ लाल मिरच्या (मिरची पावडर हि चालेल), थोडेसे खोबर्याचे काप, लसून ९-१० पाकळ्या ,आल अर्धा इंच ,काडीपता , मीठ ,हिंग ,२ टमाटर,१ कांदा कोथिंबीर बस्स.................
मसाला कसा बनवणार :- एक कांदा कापून तव्यावर लालसर भाजा ,आता खोबर्याचे काप पण हलकेच भाजा ,थोडेस धने घाला (हवे असल्यास)
आता भाजलेला कांदा ,खोबर ,लाल मिरची, लसून, आल, मीठ ,आणि कोथिंबीर पाट्यावर( पाट्यावरची चव न्यारी )किंवा मिक्सी मध्ये पाणी घालून घट्ट वाटून घ्या
वांग्याला काप मारून वरील मसाला भरून घ्या .
कृती ;- कढइत ३ चमचे तेल टाका , जीर मोहरी आणि कढीपत्ता घालून तडतडवा आणि हि भरलीली वांगी मस्त तेलात परतून घ्या
लालसर भाजल्यावर त्यात उरलेला मसाला टाका मस्त परतावा टमाटर घाला ,आणि थोडा शेंगदाण्याचा कुट घाला ,तेल सुटून खमंग फोडणीचा वास दरवळला ....आता शिजेण्यापुर्त पाणी घालून ७-८- मिनट वाट पहा झणझणीत भरली वांगी तय्यार असतील .......
ठेचा : - ७-८ लवंगी मिरच्या ,मीठ ,लसून बस्स ....
पाटावर किंवा खलबत्त्यात जाडसर वाटून घ्या आणि तवा गरम करून थोड तेल घालून मस्त चरचरीत भाजा ...भाजत असताना दार खिडक्या उघड्या ठेवायला विसरू नका
शेंग दाणा चटणी ;- भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट , लाल तिखट अर्ध चमचा मीठ, लसून ठेचलेला ,१ चमच तेल बस्स ............
कढइत तेल गरम करा ठेचलेल लसून , लाल तिखट ,आणि मीठ घालून परतवा कुट घाला गस कमी करून मस्त मिक्स करू घ्या चटणी तय्यार
भाकरी ;सर्वाना जमते नाही जमत तर बाजरीच पीठ चाळुन थोड घट्ट मळुन छोटीशी भाकरी थापा तव्यावर टाका पाणी लावून पलती करून मस्त खरपूस भाजा ,वरती थोड तूप घालाल्यला विसरू नका
सोबतीला एक पापड , लोणच आणि ताकाची किंवा दह्याची वाटी बस्स ......................... मेनू तय्यार
प्रतिक्रिया
19 Jan 2011 - 2:00 pm | परिकथेतील राजकुमार
ला ज वा ब !
बघुनच भुक खवळली परत.
19 Jan 2011 - 2:00 pm | कच्ची कैरी
वाआआअ ! थाळी बघुन तोंडाला पाणी सुटले ,मग कधी बोलवतेस ?
19 Jan 2011 - 2:02 pm | पियुशा
याला नाव द्यायच होत अस्सल गावरान थाळि
राहुनच गेल गड्बडीत......
असो...:)
19 Jan 2011 - 2:16 pm | स्पा
झकास
19 Jan 2011 - 2:35 pm | पिंगू
सध्या पोट बिघडलय.. म्हणून निषेध करतोय ... :(
- पिंगू
19 Jan 2011 - 2:36 pm | स्वानन्द
वा वा!!
पण.. लई तिखट दिसतय राव हे!
19 Jan 2011 - 2:49 pm | पुष्करिणी
मस्त..
19 Jan 2011 - 2:55 pm | विसोबा खेचर
छान..! :)
19 Jan 2011 - 5:07 pm | प्रकाश१११
पियुषा - माझ्या कवितेपेक्षां तुझी डिश एकदम मस्त झकास .
हृदयाचा मार्ग पोटातून जात असतो. हुरडा पार्टी म्हणजे अगदी मला माझे लहानपण आठवले.
फोटो कोणी काढले .मस्त त्यातील भाकरी वांग्याची भाजी देठ असलेली .
चटणी ,मिरची वा ...वा ....वा .क्या बात ,,
19 Jan 2011 - 5:14 pm | स्वाती दिनेश
गावरान थाळी बघून आत्ताच्या आत्ता पाटावर बसून जेवावेसे वाटायला लागले,
स्वाती
19 Jan 2011 - 7:06 pm | नरेशकुमार
तडप तडप के ईस दिल से आंह निकलती रही..........................................
19 Jan 2011 - 7:32 pm | प्राजु
नकोच पहायला!
19 Jan 2011 - 10:00 pm | मेघवेडा
सॉल्लिड! खरंच ला ज वा ब!!
19 Jan 2011 - 11:36 pm | डावखुरा
मस्तच...
20 Jan 2011 - 7:09 am | नगरीनिरंजन
झकास!
20 Jan 2011 - 7:14 am | पंगा
१, ३ आणि ४ नंबरच्या चित्रांत दाखवलेली 'अॅंटाय-ग्रॅविटी ट्रिक' कशी बरे केलीत?
21 Jan 2011 - 1:00 am | मेघवेडा
'अँटाय' ग्रॅव्हिटी का? बरं बरं! ;)
- देसी बंटाय
21 Jan 2011 - 8:43 am | गुंडोपंत
हाणलास!
गुंडाय
20 Jan 2011 - 8:45 am | शिल्पा ब
मस्त...मी आज रात्री हाच बेत करतेय :)
20 Jan 2011 - 7:48 pm | निवेदिता-ताई
झकास...................
21 Jan 2011 - 9:16 am | सहज
फार छान. बारामतीला अशीच सुंदर भरली वांगी, भाकरीचे जेवण हाणल्याचे आठवून डोळे पाणावले!
22 Jan 2011 - 11:28 am | रश्मि दाते
कालच एकी ला केळवणा साठी बोलाविले होते तेव्हा,बाजरीची भाकरी आणी पातोडी रस्सा केला होता