गाभा:
पांढरा हत्ती म्हणजे काय रे भाऊ ?
न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च ?
का
न झेपणार्या , न पटणार्या पण प्रवाहासोबत राहण्याकरता अंगीकारलेल्या सवयी ?
का
न झेपणारी, पण पटणारी पण प्रवाहाविरुध्द पोहण्याची धड्पड ?
का
मुल्यांशी केलेली तडजोड जी जीवाला बोचणी लावते ?
---------------------------------------------------------------------------------------------------------------
( मा़झा पहिला धागा)
---------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
18 Jan 2011 - 2:01 pm | पर्नल नेने मराठे
माझ्यामते..
न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च.
19 Jan 2011 - 1:26 pm | असहकार
प्रतीसादाकरता धन्यवाद
18 Jan 2011 - 2:21 pm | मुलूखावेगळी
पांढरा हत्ती मह्न्जे ऐरावत (इंद्राचा हत्ती)
मराठी मधे ह्याचा अर्थ आपल्या औकादी बाहेर जाउन एखादी गोष्ट विकत घेने,पाळने, साम्भाळने इतकाच
व्यवहारातील उदाहरन- कमी आमदानीवाल्याने क्वालिस किंवा इन्नोवा घेने.
ज्याला मेन्टेननस जास्त असतो.
इथे तुम्ही दिलेल्यापैकि हे ऑप्शन लागू पडेल
न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च
आधिक माहितीसाठी मराठीचे शब्दसंग्राहक आणि शुद्धलेखन्तज्ञ जाणकार श्री टारझन ह्याना सम्पर्क साधा.
18 Jan 2011 - 2:39 pm | नन्दादीप
हेच म्हणतो....
18 Jan 2011 - 2:27 pm | गवि
न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च.
ज्यामुळे इकॉनॉमी फळफळते (की सुजते..?!)
पण तेजी येण्यास हेच पांढरे हत्ती आवश्यक असतात..
जगात अनावश्यक असे काही नाहीच..
18 Jan 2011 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार
आमच्याकडे अँबेसेडर गाडीला म्हणतात.
18 Jan 2011 - 2:42 pm | ५० फक्त
पांढरा हत्ती म्हणजे - भारतात तरी सरकारी नोकरशाही आणि नेते. - तुम्ही यालाच न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता , बडेजावाकरता करत असलेला खर्च म्हणा. इफिशयन्सी / एक्सपेन्सेस हा रेशो या लोकांचा सगळ्यात कमी असतो. पण हे पांढ-या हत्ती एवढे दुर्मि़ळ नसतात सापडायला. पण आपल्या मालकालाच कफल्लक करुन आपलं पोट भरणं हे यांना व्यवस्थित येत असतं.
18 Jan 2011 - 2:56 pm | टारझन
( मा़झा पहिला धागा) च्या आधी "का" राहिला वाटते :)
18 Jan 2011 - 4:20 pm | योगी९००
अगदी हेच माझ्या मनात आले होते...
मस्त प्रतिक्रिया...
18 Jan 2011 - 6:16 pm | आत्मशून्य
म्हणजे लहानपणी पाहीलेल्या "सफेद हाथी" या चीत्रपटातील नायक हत्ती होय.
18 Jan 2011 - 11:59 pm | jaydip.kulkarni
पांढरा हत्ती म्हणजे नाका पेक्षा जड झालेली नथ !!
जी काढवत नाही आणि घालवत पण नाही !!
19 Jan 2011 - 9:20 am | नरेशकुमार
हात्ति च्या.......एवढंच
पांढरा हत्ती म्हणजे 'न झेपणारा पण खोट्या मानपानाकरता, बडेजावाकरता करत असलेला खर्च ?'
19 Jan 2011 - 1:27 pm | असहकार
सर्वांना प्रतीसादाकरता धन्यवाद
26 Jan 2011 - 7:49 pm | ashvinibapat